"Anyone who doesn't take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either." - Albert Einstein
बुधवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात एका सुरक्षा दलाच्या ताफ़्यावर फ़िदायीन म्हणजे अत्मघाती जिहादीने स्फ़ोटकाने भरलेली गाडी आद्ळून ४० जवानांचे प्राण घेतले. त्याच्या दुसर्या दिवशी मी उस्मानाबाद येथे माझ्या नव्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेला होतो. पहाटे उशिरा पोहोचलो आणि मिलींद पाटील यांच्या घरी थोडावेळ डुलकी काढली. आठ वाजता उठलो, तेव्हा चहा घेताना हाती दैनिक ‘लोकसता’ होता. पुलवाम्यात घडलेल्या भयंकर घटनेची बातमी वाचली आणि सकाळचे विधी उरकले. अंधोळ नाश्ता झाल्यावर त्या कुटुंबाशी बोलत होतो आणि पाटिल यांना कार्यक्रम होणार की रद्द झाला, याविषयी फ़ोन येते होते. इतक्यात तिथेच टेबलावर पडलेल्या ‘दिव्य मराठी’ दैनिकाच्या स्थानिक आवृत्तीकडे लक्ष गेले. सगळ्याच वर्तमानपत्रात मथळा त्याच घटनेचा होता. पण दिव्य मराठीच्या या आवृत्तीत तुलनेने छोट्या टायपातील पोटमथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले. लष्कराच्या ताफ़्यात स्फ़ोटकांनी भरलेली कार घुसवून स्फ़ोट घडवल्याचे त्यात म्हटलेले होते. मी चकीत झालो. कारण लोकसत्ताच्या बातमीत स्फ़ोटकांनी भरलेल्या ट्रकचा उल्लेख वाचला होता. पुन्हा एकदा दिव्य मराठी बाजूला ठेवून लोकसत्ता हाती घेतला. काळजीपुर्वक बातमी वाचली. मी थक्क झालो. कारण त्यात ट्रकच लिहीलेले होते आणि दिव्य मराठीत कारचा उल्लेखच होता. घटना एकच व एकाच स्थानी झालेली असेल, तर दोन बातम्यांमध्ये इतकी तफ़ावत कशाला असायला हवी? अशा बातम्या आता इतक्या नगण्य झाल्यात, की आपल्या शहीद जवानांचे जीव आपल्यासाठी इतके क:पदार्थ झालेत काय? नसेल तर अशा बातम्या लिहीणारे व छापणारे काय दर्जाचे पत्रकार म्हणावेत? ते भारतीय संवेदनशील नागरिक म्हणवून घ्यायच्या तरी लायकी़चे उरलेत काय, अशी शंका मला आली. कारण हा कुठल्या गावातला वा हमरस्त्यावरचा एक मोठा अपघात नव्हता, तर देशावरचा सर्वात मोठा घातपाती हल्ला असे प्रत्येक बातमीत म्हटलेले होते. त्यातली ही बेफ़िकीरी वा बेछूटपणा घातपातापेक्षा किंचीत वेगळा आहे काय?
ही घटना राजकीय लाभासाठी वापरणार नाही असे कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वच्छ सांगून टाकलेले होते. पण त्यांच्याच पक्षाचे पंजाबातील एक नामवंत मंत्री नवज्योत सिद्धू यांनी तात्काळ प्रतिक्रीया देताना निषेध वा बदल्याची बाब बाजूला ठेवून पाकिस्तानशी संवाद करूनच संघर्ष रोखता येईल, अशी मुक्ताफ़ळे उधळलेली आहेत. दुसरीकडे राहुलच्याच सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख दिव्य स्पंदना यांनी अगत्याने त्याच राष्ट्रीय भावनांना पायदळी तुडवित प्रशांत भूषण यांच्या सिद्धूसारख्याच प्रतिक्रीया सोशल मीडियाच्या कॉग्रेस खात्यावर पुनर्मुद्रीत केल्या होत्या. आदि्ल अहमद दार नावाच्या कश्मिरी तरूणाने केलेला हल्ला आहे आणि काश्मिरातील तरूण अशाप्रकारे दहशतवादाकडे वळत असल्याला भारत सरकारचे धोरण व तिथली लष्करी कारवाईच जबाबदार असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केलेला आहे. त्यांनी काश्मिर पाकिस्तानला देऊन टाकावे, असी सुचना यापुर्वी अनेकदा मांडलेली आहे आणि अशा जिहादी दहशतवादी घातपातानंतर त्यातल्या संशयितांना वाचवण्यासाठी भूषण यांच्यासारखे वकील नेहमीच पुढे आलेले आहेत. अशाचप्रकारे भारतीय संसद भवनावरच्या हल्ल्यात अफ़जल गुरू दोषी ठरलेला असताना त्याच्याही समर्थनाला भूषण व तत्सम अनेकजण समोर आलेले आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या फ़ाशीचा निषेध करणार्या सोहळ्यात या लोकांनी वारंवार सहभाग घेतलेला आहे. अशा एका सोहळ्याचे आयोजन नेहरू विद्यापीठात झाले, तेव्हा अफ़जल गुरूचे समर्थन व भारताचे तुकडे करण्याच्या डरकाळ्या फ़ोडल्या गेल्यावर काहूर माजले. तर घोषणा देणार्यांच्या समर्थनाला राहुल गांधींसह केजरीवालही जाऊन पोहोचले होते. असे लोक आणि दोन वृत्तपत्रात अशा घटनेची बातमी देताना होणार्या बेजबाबदारपणात नेमका किती फ़रक असू शकतो? आपल्या जागी आपले काम वा कर्तव्यही ज्यांना धड बजावता येत नाही, ते आज शिरजोर झालेत. ही आपल्याला घातपातापेक्षाही अधिक भेडसावणारी समस्या झालेली आहे.
संपुर्ण देश ज्यामुळे हळहळला ती ४० भारतीय जवानांना एकाच स्फ़ोटात ठार मारणार्या घटनेची बातमी देताना मुंबई महाराष्ट्रातले पत्रकार संपादक इतके गाफ़ील असू शकतात? एका जागी कार आणि दुसर्या जागी ट्रक असल्या बातम्या बेछूट छापणारे कोण असतात? हेच लोक मग अग्रलेख लिहीतात आणि गुप्तचर खाते झोपलेले होते काय? असलेही सवाल सरकारला विचारत असतात. बंगालमध्ये सीबीआयला आपली कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अधिकार्यांना अटक करण्यापर्यंत मजल मारणार्या ममता आता त्याच थाटात गुप्तचर व सुरक्षा सल्लागार काय करीत होते; असा सवाल करीत आहेत. त्यांच्या बातम्या व आरोप अगत्याने व ठळक छापणारे उद्या त्यावरच अग्रलेखही लिहीत असतात. मात्र आपल्या हाती जो छोटा अधिकार वा स्वातंत्र्य आलेले आहे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे सौजन्यही त्यांच्यापाशी कधी आढळून येत नाही. आपल्या कर्तव्यात लहानसहान बाबतीत कसुर करणारेच; सरकार, गुप्तचर, सुरक्षा दलांना नित्यनेमाने सवाल विचारू लागतात, तेव्हा आधीच जीव धोक्यात घालून राखण करणार्यांचे लक्ष किती विचलीत होत असेल? त्यांचे विचलीत लक्ष वा गोंधळलेपणा आदिल दार वा पाकिस्तानच्या दहशतवादी संस्था संघटनांसाठी सर्वात मोठी मदत असते. चकमकीत गुंतलेल्या लष्कराच्या जवानांना मागून धोंडे मारून विचलीत करणारे हुर्रीयतचे भाडोत्री निदर्शक आणि उठल्यासुटल्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नांचा भडीमार करणार्यांमध्ये नेमका कोणता गुणात्मक फ़रक असतो? पाकिस्तान कुणा कश्मिरी वा भारतीय बहकल्या मुस्लिम तरूणाला केवळ घातपाताचे प्रशिक्षण व हत्यारे पुरवित असते. पण त्यांनी तशी हिंसा वा घातपात घडवण्यासाठी पोषक गोंधळाची परिस्थिती पाकिस्तान निर्माण करू शकत नाही. तशी स्थिती इथेच कोणी तरी निर्माण करावी लागते, जिचा लाभ आदिल दार उठवू शकत असतो. असे गद्दार आपल्यातच उजळमाथ्याने वावरणारे नाहीत काय?
अशा सिद्धू वा प्रशांत भूषणवर आता टिकेची झोड उठलेली आहे. पण ४० जवानांचा मारेकरी आदिल दारला अशी परिस्थिती निर्माण करून देणार्यांना प्रतिष्ठेने आपण वागवत आहोत, त्याचे काय? आदिल दार कुठून पैदा होत असतो? तो आईच्या उदरातून थेट जिहादी म्हणून जन्म घेत नसतो. तर आसपासच्या वातावरणातून त्याची जडणघडण होत असते. कश्मिरात हजारो मुस्लिम तरूण आहेत. त्या प्रत्येकाने हाती बंदुक घेतलेली नाही की स्फ़ोटकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पकिस्तानला प्रयाण केलेले नाही. जे मुठभर त्या दिशेला वळतात, त्यांना तिकडे ढकलण्याचे काम फ़क्त हुर्रीयतवाले करीत नाहीत. तर त्यांच्या अशा उचापतींना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा व मुभा देण्याचे पाप करणारे जथ्थे इथेच बोकाळलेले आहेत. त्यातून आदिल दार उपजत असतात. अरुंधती रॉय, प्रशांत भूषण, केजरीवाल किंवा राहुल गांधी कन्हैय्याकुमार यांच्या समर्थनाला जातात, तेव्हा प्रत्यक्षात संसदेवरील घातपाती हल्ल्याला प्रतिष्ठा मिळवून देत असतात. कोणी अफ़जल गुरूच्या फ़ाशीच्या विरोधात मानवाधिकाराचा गळा काढणारा अग्रलेख लिहीतो, तेव्हा आदिल दारला अफ़जल गुरू आदर्श वाटत असतो आणि त्याला पाकिस्तानात जाऊन जिहादी फ़िदायीन होण्याचे डोहाळे लागत असतात. थोडक्यात पाकिस्तानला भारताच्या विरोधात हिंसाचार घडवण्यासाठी जी तरूणांची भरती करायची असते, तिला प्रोत्साहन देणारे आपल्यातच दबा धरून बसले आहेत. कधी ते नयनताराच्या नावाने आक्रोश करताना दिसतील, तर कधी भारताचे तुकडे पाडण्याच्या डरकाळ्यांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवण्यासाठी आपली सर्व बुद्धी पणाला लावताना दिसतील. त्यांचा बंदोबस्त सुरक्षा सैनिक, गुप्तचर वा पोलिस सरकार करू शकत नाही. ती जबाबदारी आपण सामान्य नागरिकांची असते. आज टाहो फ़ोडणारे आपण ती कितीशी पार पाडत असतो? आपण काय करू शकतो? हाच प्रश्न मनात आला ना?
आईनस्टाईन त्यालाच किरकोळ लहानसहान गोष्टीतले सत्य म्हणतो. जो समाज वा नागरिक अशा बारीकसारीक गोष्टीतले सत्य गंभीरपणे लक्षात घेत नाही, त्याच्यावर मोठ्या बाबतीत विश्वासही ठेवता येत नसतो. त्याचा अर्थ इतकाच, की आपल्यातच उजळमाथ्याने वावरणार्या अशा गद्दार फ़ितूर लोकांविषयी आपण गंभीर नसू; तर आपण देशाच्या सुरक्षेविषयी उगाच आक्रोश करण्यात काहीही अर्थ नसतो. त्यालाही देखावाच म्हणावे लागेल. तुम्हाला कोणी काश्मिरात जाऊन आदिल दार किंवा बुर्हान वाणीचा बंदोबस्त करायला सांगितलेले नाही. पण त्यांच्यासारख्या जिहादींना भारतीय सेनादलाच्या विरोधात हिंसा माजवायला प्रोत्साहन व हिंमत देणार्या कन्हैय्याकुमार किंवा उममर खालीद यांच्या पाठीशी उभे रहाणार्यांचा बंदोबस्त तुम्ही आम्ही नित्य जीवनात करू शकतो ना? त्यासाठी आपल्यालाही हाती बंदुक वा बॉम्ब घेण्य़ाची काही गरज नाही. आपल्या साध्यासरळ वागण्यातून वा कृतीतून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे शक्य आहे. अगदी छोट्या छोट्या कृतीतून अशा देशद्रोह्यांचा बंदोबस्त आपण करू शकतो. आज जो उठतो, तो भारत सरकारला वा भारतीय लष्कराला पाकिस्तानला धडा शिकवा, म्हणून घोषणा देत रस्तोरस्ती फ़िरताना दिसतो आहे. पण दुसर्याने काय करावे हे सांगताना आपल्याला काय करणे शक्य आहे, त्याचा साधा विचारही आपल्या मनाला शिवलेला नाही. सैनिकांनी वा सरकारने काय करावे याची माहिती आपल्याला पक्की आहे. पण आपल्या जागी आपण खुप काही करू शकतो, कुठलाही कायदा न मोडता खुप काही करू शकतो, त्याचा आपल्याला पुर्णपणे विसर पडला आहे. आपल्याला बंदुक बॉम्ब ही हत्यारे वाटू लागली आहेत. पण आपल्यापाशी असलेले स्वातंत्र्य व अधिकार देखील अधिक भेदक हत्यारे असल्याचे भान सुद्धा आपल्याला राहू शकलेले नाही. म्हणून आपण पटकन म्हणतो. आम्ही सामान्य माणसे काय करू शकतो? मित्रांनो करायचे असेल तर आपण खुप काही करू शकतो.
चकीत झालात ना? आपण सामान्य नागरिक वा माणसे काय करू शकतो? जे सैनिकाला वा भारत सरकारला शक्य नाही, त्यापेक्षाही मोठा पराक्रम आपण नागरिक करू शकतो. फ़क्त आपल्याला आपल्यात दडलेली भेदक शक्ती व आपले हत्यार ओळखता आले पाहिजे. एक बोनसाय जपानी पद्धत आहे. कुंडीतल्या मोठ्या झाडाची मुळ खालच्या खाली सतत छाटत राहिले मग त्या झाडाची जात कुठलीही असो, त्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर होऊ शकत नाही. इवल्या कुंडीत विशाल वड पिंपळही खेळण्यासारखे इवले होऊन जातात. आपण आपल्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात घुसून बसलेल्या असल्या देशद्रोही प्रवृत्तीची आपल्या आसपास दिसणारी पाळेमुळे अखंड व नित्यनेमाने छाटत राहिलो, तरी काश्मिरातला दहशतवाद आटोक्यात येऊ शकतो. जे कोणी आपल्या आसपास कन्हैय्याकुमार वा अफ़जल गुरूचे उदात्तीकरण करतात, तेच जवानांचे जीव धोक्यात आणत असतात. आपण त्यांना आपल्या जगण्यातून बहिष्कृत करू शकतो ना? त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, की कुठलेही व्यवहारही करायचे नाहीत. पर्यायाने आपल्या भागात, परिसरात व गावात अशा लोकांचे जगणेच अशक्य करून टाकले, तर कन्हैय्या अफ़जल गुरू पैदा होत नसतात, की त्यांना प्रोत्साहन मिळू शकत नसते. अशा लोकांचे प्रोत्साहन मिळाले नाही, तर काश्मिर वा अन्यत्रच्या मुस्लिम तरूणांची माथी भडकवण्याचे काम पाकिस्तानला शक्य नाही. कारण त्यांना असे माथेफ़िरू तरूणच उपलब्ध होणार नाहीत. असे निराश वैफ़ल्यग्रस्त मुस्लिम तरूण घडवण्याचे काम सिद्धू-भूषण वा कन्हैयाचे समर्थ राहुल-केजरीवाल करीत असतील, तर त्यांचा बंफ़ोबस्त कायदा व सरकार करू शकत नाही. पण आपण नक्की करू शकतो. दिसायला किरकोळ गोष्ट आहे. आपल्याला जमणार आहे का? अशांना बहिष्कृत करणे शक्य नसेल तर उगाच धडा शिकवण्याच्या डरकाळ्या नकोत आणि सरकारला कारवाई करण्याचे सल्लेही द्यायला नकोत. रोजच्या जगण्यात कोंबडी बकरीसारखे जगावे आणि आपला नंबर लागला की निमूट मरावे.
This guide is really helpful.(s)
ReplyDeleteपुर्णपणे सहमत भाऊ. ...
ReplyDeleteपरवा ABP माझा वर तो P जोशी म्हणाला "मानसिक रित्या आपण काश्मीर गमावलेले आहे" १०००% संताप आला. तिथे वेळीच एका पाहुण्याने याचे खंडन करून हे विधान ५००% चूक असल्याचे सांगितले त्या मुळे त्याचे नाक कापले गेले.. पण अशी विधाने कशी काय हे करू शकतात ?????
ReplyDeleteहे विधान 500% चूक असल्याचे सांगणारे धर्माधिकारी सर (अविनाश धर्माधिकारी) होते. इतकेच नाही... तो जोशी जेव्हा त्यांना बोलताना अडथळे आणायला लागला तेव्हा त्याला सरळ "मला बोलताना अडवणार असाल तर मी फोन कट करीन" असेही वाजवले त्यांनी..!
Deleteआता इतके थोबाड फुटल्यावर तरी "चुक झाली,दिलगीरी व्यक्त करतो किंवा माफी मागतो" असे बोलावे की नाही? पण हे वाक्य शेवटपर्यंत त्याच्या तोंडून निघाले नाहीच. उलट नेहमीच्याच निगरगट्ट चेहऱ्याने त्याने कार्यक्रम पुढे चालू ठेवला ! (याचा जास्त संताप आला)
भाऊ त्यामुळेच ABP Majha वर सहसा येत नाही. तो प्रसन्ना जोशी देवाने दिलेली अक्कल तोंडातील गटारातुन मुर्खपणे बोलुन ओकत असतो.
Deleteएबीपी माझा न्यूज चॅनेलवर ज्या कंपन्या जाहिरात देतात त्यांचा माल विकत घेऊ नका, तसे जाहीर करा, बघा कसे लाईनीत येतात.
DeleteTimes of India ची हेडलाईन पण खुप बोलकी होती , त्या दिवशी
ReplyDeletePerfect
ReplyDeleteLoksatta made a typo. But TOI crossed all the limits. Tya baddalnpan liha.
ReplyDeleteHe bagha, with the photo of that TOIlet paper.
https://bandyauwach.blogspot.com/2019/02/the-enemy-within.html?m=1
Agreed
ReplyDelete
ReplyDelete47 नंतर भारतीय लोकांना विशेषतः बहुसंख्य हिंदूंना
खोट्या समधर्मवादाची शिकवणूक देण्याच्या नावाखाली कायमचे अपॉलॉजिस्टीक करून काँग्रेस ने षंढ देश तयार
केला. 71 च्या युद्धात भारतीय सैन्याने संपूर्ण विजय
मिळवला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले पण आपल्या
सैन्याने दैदयपमान विजय मिळवून सुद्धा शिमला
करार करताना तत्कालीन काँग्रेसी राजवट इतकी अपॉलॉजिस्टीक झाली कि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले बंगाल्यानी बांगलादेश मिळवला पण भारतीयांना आपला
काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही. भारतीयांना आपला
काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही कारण तत्कालीन काँग्रेसी लोकांना तो भूभाग आपला आहे हेच देशाला जाणवू
द्यायचे नव्हते.. भाऊ तुम्ही अत्यंत समर्पक तोडगा देशद्रोह्यांबाबत दिलेला आहे. अपॉलॉजिस्टीक झालेल्या हिंदूंना तो किती रुचेल कुणासठाऊक..
उत्तम विश्लेषण... वीर जवानांचा कुटुंबाला मदतही करता येईल
ReplyDeletehttps://bharatkeveer.gov.in/viewMartyrsGalleryPage
मी लोकसत्ता केव्हाच बंद केला अन म टा सकाळी शी ला वापरतो न वाचता, आता तुम्ही म्हणाल म टा का घेता तर 500 रु त वर्षभर रद्दी,सगळे पैसे दामदुप्पट!!!
ReplyDeleteमी पण लोकसत्ता बंद केलाय खूपच छान
Delete100% correct I agree just for Raddi, and glass clelaing
Deleteअप्रतिम भाऊ.. अतिशय समर्पक मुद्दे तुम्ही मांडले आहेत. आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यात किती प्रामाणिक आहोत याची साक्ष म्हणजे इतर क्षेत्रांसोबत पत्रकारिता क्षेत्राचीही असलेली दयनीय अवस्था म्हणेन मी. आणि असंही आम्ही तरी कुठे बातमी पसरवण्यात जबाबदार असतो..Whattsapp वरून आलेला इकडचा कचरा तिकडे असल्या गर्दीत तुमचे लेख खरोखर विचार करायला लावणारे असतात.
ReplyDeleteअसे करून पाहण्यास हरकत नाही..समर्थनीय विचार..!!
ReplyDeleteOne newspaper mentioned that car/truck was loaded with 100 kg, another 200 kg & others mentioned 300 kg explosives. They also have mentioned different explosive type i.e. IED, RDX. Poor knowledge, poor reporting.
ReplyDeleteम लोकसत्ताचा अग्रलेख वाचुन खुप राग आला तुम्ही म्हनताय तसच झाल.तेच बेकारीमुल तिथली तरुण अस करतात,हे पालुपद.मग देशात कितीतरी बेरोजगार आहेत ते नाही अस करत.उलट काश्मीरी तरुणांना पर्यटनासारखा हक्काचा रोजगार मिळु शकतो.जस कोकणात महाबळेश्वर मधे घरटाी हाॅटेल असतात.पण त्यांना तो मार्ग नकोच आहे.नंदनवन रक्तबंबाळ करुन टाकलय.आणि इतले अतिशहाणे पेपर खरडतात
ReplyDeleteकुबेर केतकर सारख्या कुत्यांची नसबंदी करणे आपल्या हातात नक्कीच आहे .
ReplyDeleteभाउ इथले गद्दार म्हनतात की सैनिक त्याच कामच करतात उपकार करत नाहीत पगार घेतात आमच्या टॅक्स मधुन.मग डार तयार होणार नाही तर काय?
ReplyDeleteLet's come forward and strengthen our Indian army by donating to the National Defense Fund. This way we get the following benefits:
ReplyDelete1. We will increase the money power of the army. They will certainly give a befitting reply to the terrorists.
2. We get 100% deduction of the donated amount in income tax, under section 80G.
3. We get a letter of appreciation from the PMO for donating to the NDF.
You can click on the link and give your contribution
https://ndf.gov.in
Thx a ton just now paid on ndf site directly instead of giving in wrong hand it is always better.
Deletethanks once again.
आपल्याला एका तथाकथित वेड़्या , अगदी ठार वेड़्या व प्रचंड़ बहूमत पाठीशी असलेल्या प्रंतप्रधानाची गरज आहे.
ReplyDeleteKharay
Deleteया सगळ्या गोंधळात टीव्ही9 नावाच्या वाहिनीवर राष्ट्रवादीचे बेजबाबदार बडबड करणारे जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रिया काही थोडा वेळ दाखवली गेली । भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो म्हणून पुलवामासारख्या घटना घडतात अशा प्रकारचे मत त्यांनी मांडलेले ऐकायला मिळाले । थोड्या वेळाने त्या वाहिनीवरून ती प्रतिक्रीया हटवली गेली । आव्हाडांसारख्यानी देखील दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे आणि तथाकथित 'जाणते राजे ' त्यांच्यासारख्यांना प्रोत्साहन देत आहेत । मुळात पुलवामानंतरची त्यांची प्रतिक्रिया देखील ह्या विकृत मानसिकतेतून आलेली होती । अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या लोकांना समाजमधून बहिष्कृत करणे आवश्यक आहे ।
ReplyDeleteBhau
ReplyDeletewhat u say may b right but it doesnt mean govt has no role or action to take. This is the time to react srongly .
we have one worlds top 5 Miltry so we should use it when needed. Arm forces have never given free hand else we wouldnt be in such shameful position.
Govt. is marketing the only surgical strikeeverywhere and trying to say they did the best which is absolutely not true as per General G D Bakshi and other x miltry officers. they said its very basic action and we need such 3 per week.
So bhau its also ur responsiblity to tell the facts to ur readers rather than putting it on them solely.
Can u give guaranty if everuone started behaving as u mentioned then this will stop? Again is itfeasible and realistic? If its so then why do we need a govt?
Its fine bhau u wrote a book on why we need modi govt again as pm but you should not stop criticizing govt where its needed. Its not ecpexted of you bhau.
Dont get carried away by ur followers who always comment 'अप्रतिम भाउ & परखड विश्लेशण'.
101% वास्तव सत्य आहे भाऊ
ReplyDeleteभाऊंनु खरंय पण एवढ समजण्याएवढी आमच्या लोकांची अक्कल असती तर भारत विश्वगुरू बनला नसता का?
ReplyDeleteAgadi Maza manatla le vichar mandalet Bhau...
ReplyDeleteभाऊ काका काही लोकांनी सुरुवात केली म्हणायला पुलवामा हल्ला मोदींनीच घडवून आणला निवडणूक जिंकण्यासाठी.
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteठाण्यातील १७-०२=२०१९ चे तुमचे भाषां ऐकले आणि नंतर हा ब्लोग वाचला. निदान आणि उपाय अचूक आहेत. नंतर Whatsapp वर हुतात्मा आलेल्या कॅप्ट विनायक गोरे यांच्या आईचे ३ मिनतांचे भाषण ऐकायचा योग आला. त्यानीही हा मुद्दा मांडला आहे.
धन्यवाद भाऊ. नक्कीच गोष्टी प्रत्यक्षात उतरवू.
ReplyDeleteVijay Mhaiskar plz send link of bhashan
ReplyDelete101% TRUE sir will start from today only
ReplyDelete