Thursday, February 21, 2019

जैश आणि कॉग्रेसचे महागठबंधन?



पुलवामाचा घातपाती हल्ला होऊन त्यात ४० जवान शहीद झाले तर पाकिस्तान त्यातला आरोपी आहे. हे सगळ्या देशाला प्रथमदर्शनीच वाटलेले आहे आणि म्हणून तर आगामी विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानी संघाशी क्रिकेट सामना खेळू नये, म्हणून देशव्यापी आग्रह धरला गेला. पण कॉग्रेससहीत विरोधी पक्षनेत्यांना त्यातही मोदी सरकार गुन्हेगार वाटते आहे. ही महत्वाची बाब विचारात घेतली पाहिजे. पंतप्रधानांनी सर्व विरोधकांची बैठक बोलावून त्यांना घटनाक्रमाची माहिती दिली आणि त्यांना विरोधी पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहू; अशी ग्वाही सुद्धा दिली. पण बैठकीतून बाहेर पडल्यावर सर्वच विरोधी नेत्यांची वक्तव्ये तपासून बघायला हवीत. आपण सरकारच्या पाठीशी आहोत, म्हणजे काश्मिरात जसे तिथले युवक सैनिकांच्या मागे असतात, तसेच आम्ही आहोत, याचीच आपापल्या वक्तव्यातून विरोधकांनी साक्ष दिलेली आहे. काश्मिरी युवक सैन्याच्या पाठीशी असतात म्हणजे अतिरेक्यांशी चाललेल्या चकमकीत भारतीय सैनिकांच्या मागल्या बाजून दगडफ़ेक करण्यासाठी पाठीशी असतात. विरोधी नेत्यांनी नेमकी तीच भूमिका बजावलेली नाही काय? भारत सरकार जगासमोर पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवण्यासाठी डावपेच राबवित असताना कॉग्रेसचा प्रवक्ता भारत सरकारच्या निर्णयावर आणि घटनाक्रमावर शंका घेतो. हल्लेखोराला भारतातला दहशतवाद म्हणून संबोधतो. पाकचे पंतप्रधान इमरान खान तीच भाषा बोलतात आणि सुरजेवालाही तेच शब्द नेमके बोलतात. याची सुरूवात बंगालच्या मुख्यमंत्री मनता बानर्जींनी केली. हा हल्ला निवडणूकांच्याच मुहूर्तावर कसा झाला, असा प्रश्न विचारून ममतांनी जणू हा हल्ला भाजपाच्या सरकारने निवडणूकीपुर्वी भारतीयांच्या भावना चिथावण्यासाठी होऊ दिला वा केला, असाच सुर लावला. अशा लोकांच्या माहितीसाठी महत्वाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. निवडणूकीत पाकिस्तानने हस्तक्षेप करून मोदींना पराभूत करण्याचे मुळ आमंत्रण कोणी दिले होते? तो कॉग्रेस नेताच नव्हता काय?

चार वर्षापुर्वी पाकिस्तान दौर्‍यावर गेलेले कॉग्रेसचे मजीमंत्री व ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी तिथले माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ यांच्या शेजारीच बसून उधळलेली मुक्ताफ़ळे आपल्या लक्षात आहेत काय? भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा वाटाघाटी सुरू व्हाव्यात, अशी मागणी पाकिस्तान सातत्याने करीत आलेला आहे. पण घातपाती हल्ले व दहशतवाद चाललेला असताना संवाद होऊ शकत नाही; अशी मोदी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यावरचा उपाय सुचवताना पाकच्या पत्रकार परिषदेत अय्यर यांनी एक तोडगा सुचवला होता. तुम्ही (म्हणजे पाकिस्तानने) मोदी हटवण्यासाठी आम्हाला मदत करावी. त्यातून पुन्हा कॉग्रेसला सत्तेवर यायला साथ द्यावी. मगच दोन देशात बोलणी सुरू होतील आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ शकतॊल, असा तो तोडगा होता. त्यामुळे ममतांना निवडणुकीच्या मुहूर्तवर असा हल्ला कशाला झाला, त्याचे उत्तर सरकार नव्हेतर मणिशंकर अय्यर देऊ शकतॊल. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधीच देऊ शकतील. कारण त्यांच्याच पक्षाच्या वतीने तीनचार वर्षापुर्वी अय्यर पाकिस्तानची मदत मागायला गेलेले होते. मागितलेली मदत मोदींना निवडणूकीत हरवण्यासाठीची होती. या दोन गोष्टी जोडल्या, तर निवडणूकीच्या तोंडावर हा घातपात कशाला झाला व पाकिस्तानने कोणासाठी केला, त्याचे उत्तर ममतांना सहज मिळून जाऊ शकेल. ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्याचा अनेक जागी उल्लेख आलेला आहे. तेव्हा अय्यर यांच्या शेजारी बसलेले लष्करशहा आजही हल्लेखोर जैशे महंमद संघटनेचे व त्यांच्या कृत्याचे समर्थन करीत आहेत. मात्र उत्तर ज्याच्यापाशी आहे, ते मणिशंकर अय्यर गप्प आहेत. उलट राहुल गांधी मात्र मोदी सरकारला सवाल विचारत आहेत. बेशरमपणा इतकाही करू नये, की तोंड लपवायला उद्या जागा शिल्लक राहू नये. खरे तर यातला मोठा बेशरमपणा माध्यमांचा म्हणावा लागेल.

आज जेव्हा ममता किंवा कॉग्रेस प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला पुलवामा हल्ल्यातील आरडीएक्स कुठून आले? हल्लेखोरांच्या कारवाईचा प्रश्न विचारतात, तेव्हा अगोदर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानच्या मागितलेल्या मदतीचा प्रतिसवाल केला पाहिजे. चार वर्षापुर्वी अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार पराभूत करण्यासाठी काय मदत मागत होते? कोणाकडे मदत मागत होते? जैशचे इथले पुरस्कर्ते हुर्रीयतचे मुखंड असलेल्यांना अय्यर गळाभेट कशाला करीत होते? असले सवाल कोणी विचारायचे असतात? चौकस पत्रकारांनी की भाजपाच्या प्रवक्त्यांनी? पत्रकारितेत असे सवाल विचारण्याचे अधिकार असतात आणि कर्तव्यही असते. किती पत्रकारांनी राहुल वा त्यांच्या प्रवक्त्यांना असे प्रश्न गेल्या काही महिन्यात विचारलेले आहेत? त्यांनी वाटेल ती मुक्ताफ़ळे उधळावीत आणि त्या खुळ्या प्रश्नांचा उलटा भडीमार पत्रकारांनी व माध्यमांनी भाजपावर करावा, हा सुद्धा बेशरमपणाच नाही काय? ममतांना आलेली शंका चुकीची अजिबात नाही. ऐन निवडणूक मुहूर्तावर असा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादी हस्तकाने कोणासाठी केला? त्याचा हल्ला व त्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार पुर्ण झालेले नाहीत, इतक्यात कॉग्रेसच्या प्रवक्त्याने असले बेशरम प्रश्न विचारण्यातला हेतूही लपून रहात नाही. म्हणजे यांच्याच इशार्‍यावर हल्ले होणार आणि त्यांनीच मोदी सरकारला उलटे प्रश्न विचारायचे. पाकिस्तानी कलावंतांना भारतात प्रतिबंध घालण्याचा विषय आला, तेव्हा त्यांना अगत्याने आमंत्रित करून सरकारी खर्चाने त्यांचे भव्य कार्यक्रम कोणी ठेवलेले होते? ममता आणि केजरीवाल यांनीच त्यावर भारतीय जनतेचा पैसा खर्च केला होता ना? आज तेच बेशरम लोक भारत सरकारला सैनिकांच्या मृत्यूचा जाब विचारतात. कुणालाच काडीमात्र शरम उरलेली नाही काय?

पुलवामाच्या हल्ल्यानंतर किंवा उरी वा पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कॉग्रेस आणि मणिशंकर अय्यर यांना एक प्रश्न विचारला जायला हवा होता. ‘तुम्ही मोदी हटावसाठी हीच मदत पाकिस्तान व मुशर्रफ़ यांच्याकडे मागितली होती काय? हाच तो प्रश्न आहे. मग त्यातून अनेक प्रश्न समोर येतात. ही मदत कोणासाठी मागितली होती? राहुलना पंतप्रधान करण्यासाठी अशी मदत हवी होती काय? मोदींना देशाचा कारभार करता येत नाही व सुरक्षा मोदींच्या आवाक्यातली नाही, हे सिद्ध करण्यासाठीच अशी जिहादी हल्ल्याची मदत अय्यरनी मागितली होती काय? कोणाच्या इशार्‍यावर अय्यर अशी मदत मागायला पाकिस्तानात गेलेले होते? त्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर करून घेतला होता काय? कुमार केतकर म्हणतात, तो व्यापक कटाचा भाग हाच आहे काय? म्हणजे मोदी सरकार अपेशी वा नालायक ठरवण्यासाठी पाकिस्तानने घातपाती वा दहशतवादी हल्ले करावेत. मग त्याचा आधार घेऊन इथे कॉग्रेसने त्याच हल्ल्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरावे, अशी कॉग्रेसची रणनिती आहे काय? नसेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि इथले कॉग्रेसी व त्यांचे मित्रपक्ष एकाच भाषेत कशाला बोलत असतात? कॉग्रेसने पाकिस्तानशी मोदींच्या विरोधात महागठबंधन केलेले आहे काय? नाहीतर अशा हल्ल्यांनी विचलीत होण्यापेक्षा कॉग्रेस व अन्य विरोधी पक्ष सुखावत कशाला असतात? पत्रकार म्हणून कोणाला असे प्रश्न पडत नसतील, तर त्या माध्यमांकडेही संशयाने बघण्याची गरज आहे. कारण कालपरवा पाकिस्तानच्या वकीलाने कुलभूषण जाधवच्या सुनावणीमध्ये भारतीय पत्रकार करण थापरच्या लेखाचे दाखले कशाला दिले असते? केजरीवालनी सर्जिकल स्ट्राईकविषयी घेतलेल्या शंकेला पाकिस्तानने आपला बचाव कशाला बनवले असते? महागठबंधनाची व्याप्ती इतकी दुरवर पसरलेली कॉग्रेसचे खासदार म्हणून कुमार केतकरांनाच ठाऊक असू शकते. म्हणून त्यांनी व्यापक कटाची थिअरी मांडली असेल काय? कितीतरी प्रश्न आहेत आणि त्यातला कुठलाही प्रश्न तथाकथित नामवंत पत्रकार संपादकांना पडत नसेल, तर त्यांची पत्रकारीताही शंकास्पद नाही का?

ज्यांना अधिक कुतूहल आहे त्यांनी साडेतीन वर्षापुर्वीचा हा माझा लेख वाचावा
http://jagatapahara.blogspot.com/2015/11/blog-post_18.html

14 comments:

  1. he sagla tumhala samjta tar mg D S hooda na pn samjat aselch mg tyani congress ka join keli? as aiknyat aal ki delhi madhe2015 madhe ek desk suru kela hota tyachi task pakistan shi aslelya political parties chya link shodhne. D S hooda or ajun lok yasathi congress join kartayt ka? ani hayat hindutwa madhe ghatlele yasathi gala bhet ghetayt ka?

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.indiatoday.in/india/video/-i-am-not-joining-congress-party-confirms-surgical-strike-hero-ds-hooda-1462002-2019-02-21

      Delete
    2. D S Hooda hasn't joined Congress that's a rumour and he has clarified it on air

      Delete
    3. http://www.wionews.com/india-news/have-not-joined-congress-says-lt-gen-retd-ds-hooda-198835

      Delete
    4. Unknown....grow up....Hooda did not join congies....he's being offered a position as a consultant....hope you are able to understand this

      Delete
  2. भाऊ
    खरच आपल्या देशाला धोका घर भेदयां पासून जास्त आहे.

    ReplyDelete
  3. This is exactly the analysis being done in many grout. And shamlesss media is not raising this point ,if this is the help ,which Ayer was asking at time when election are around.

    ReplyDelete
  4. भाऊ,हे काँग्रेसवाले सत्ताप्राप्ती करता देशाचा लिलाव करायला मागे पुढे पाहणार नाहीत ते कोणत्याही निचस्तरावर जाऊ शकतात व यात त्यांना विकाऊ प्रसारमाध्यमांची साथ आहे हे दुर्दैव.

    ReplyDelete
  5. भाऊ आता सेना-भाजप युतीवर लिहा.

    ReplyDelete
  6. लेख वाचुन तळपायाची आग मस्तकात गेली. सत्तेवर येण्यासाठी भाजप विरोध,मोदी विरोध समजू शकतो पण लश्कराच्या क्षमतेवर,त्यांच्या निर्णयांवंर संशय घेणारी वक्तव्ये करणे व रणजीत सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर आरोप करणे व मोदींच्या आधिच ठरलेल्या कार्यक्रमावरुन हास्यास्पद प्रश्न ऊपस्थित करणे हे सगळे भयावह वाटते.पाकिस्तानला सोयिस्कर असे प्रश्न ऊपस्थित करुन सामान्य माणसाचा बुद्धीभेद करुन मोदी विरोधात जनमत वाढवण्याचा हा प्रयत्न सुज्ञ जनता हाणून पाडेल व हे लोकसभा निवडणुकी दिसुन येउल.आपण आपल्या लेखांद्वारे अशा लोकांना वस्त्रहरण करुन ऊघडे पाडत आहात हे फार मोठे सत्कार्य करत आहात.आपल्या कडून जनजागृती करता निवडणुका होईस्तर अशाच परखड लेखांची अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  7. 26 जून 2018 ला "युद्धाची चाहूल" म्हणून तुमचा लेख आला होता आता अगदी बरोबर तसे घडत आहे की परिस्थती तशी आहे तुमचे काय म्हणणे आहे ?

    ReplyDelete
  8. भाऊ ह्या पत्रकारांचं काय करायचं सांगा

    ReplyDelete
  9. भाऊ,
    तुमचा हंटर जबरदस्त च
    पण जनतेला हे कोणत्या पातळीचे कोडगे हे समजत नाही हे खुप मोठे दुर्दैव

    ReplyDelete
  10. तुमचा लेख WhatsApp वर पाठवू शकते का?

    ReplyDelete