Friday, February 8, 2019

फ़ुगा फ़ुटला की हो‌‌‌ऽऽऽऽऽऽऽ

rahul priyanka के लिए इमेज परिणाम

दोन आठवड्यापुर्वी अचानक कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भगिनी प्रियंका वाड्रा हिला पक्षाची सचिव म्हणून नेमले आणि माध्यमातील व राजकीय विश्लेषणात लुडबुडणार्‍या अनेकांना डोहाळे लागले होते. आता उत्तरप्रदेश प्रियंका एकहाती राहुलना जिंकून देणार असल्याची दिवास्वप्ने अनेकांना त्या मध्यान्हीला पडलेली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे तेव्हा खुद्द प्रियंका भारतात नव्हती व पतीसह परदेशी होती. पण दरम्यान प्रियंकाचा पती रॉबर्ड वाड्रा याने न्यायालयात धाव घेतलेली होती. आपल्याला सक्तवसुली संचालनालयाचे समन्स येण्याच्या भयाने त्याने अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुलनी त्याच्या पत्नीची पक्षात नेमणूक केलेली होती. हे सत्य दडपण्यासाठी मग प्रियंका पक्षात आली, याचा डंका पिटण्याचा उद्योग सुरू झाला. त्यामागे प्रियंकाच्या कौतुकापेक्षाही वाड्राची घबराट झाकणे हा मुख्य हेतू होता. तो साधण्यासाठी मग उत्तरप्रदेश प्रियंकाच्या करिष्म्याने जिंकण्याचे वेगवेगळे युक्तीवादही सादर झाले. पण जितका आत्मविश्वास अशा भुरट्या पत्रकार विश्लेषकांना होता, तितका खुद्द प्रियंका वा राहुलना तरी होता काय? आहे काय? असता तर त्याचे प्रतिबिंब त्यांच्याच बैठकीत पडायला हवे होते. पण तिथेच तर विश्लेषकांनी फ़ुगवलेला फ़ुगा फ़ुटलेला आहे. कारण विश्लेषक पत्रकारांना लागलेल्या डोहाळ्याचे बाळंतपण उरकण्यापुर्वीच राहुलही त्यांचा गर्भपात करून टाकलेला आहे. उत्तरप्रदेशात पुढल्या दोन महिन्यात प्रियंका काही चमत्कार घडवील अशी आपली अजिबात अपेक्षा नाही; असे राहुल यांनी पक्षाच्या बैठकीत सांगून टाकलेले आहे. ज्याला दोन आठवडे करिष्मा म्हणून गाजवले, तो फ़ुसका बारच ठरला ना मग? चमत्कार घडवू शकत नाही, त्याला विश्लेषक पत्रकार करिष्मा कधीपासून म्हणू लागले? कोणी त्याचा खुलासा करणार आहे काय?

मागल्या दोन आठवड्यात यावर खुप चर्वितचर्वण झालेले आहे. प्रियंकाचा चेहरा कसा आजी इंदिराजींसारखा आहे आणि त्यांचा जनमानसावर अजून कसा प्रभाव कायम आहे, अशा कहाण्यांना ऊत आलेला होता. किंबहूना उत्तरप्रदेशात आता प्रियंका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणशीत ठाण मांडून बसेल आणि भाजपाचा हुकमी प्रचारक कसा आपल्याच मतदारसंघात अडकून पडणार, याच्या मनोवेधक कहाण्याही रंगवल्या गेल्या होत्या. एका वाहिनीने तर पुर्व उत्तरप्रदेशात भाजपाचे कोण कोण प्रभावी नेते आहेत आणि प्रियंकाच्या आगमनाने त्यांची कशी कोणी येत्या लोकसभा निवडणूकीत होणार, त्याचीही जंत्री सादर केलेली होती. पण त्यांनी आपली हीच विद्वत्ता व अभ्यास राहुलपर्यंत पोहोचेल अशी कुठली काळजी घेतली नाही. अन्यथा राहुलनी अपेक्षा कशाला सोडल्या असत्या? प्रियंकाच्या नेमणूकीची घोषणा झाल्यावर कमरेचे सोडून थयथया नाचू लागलेल्यांना ती महिला परदेशातून मायदेशी येण्यापर्यंत कळ काढता आली नाही. प्रियंका खुद्द आपल्या कामाची सुत्रे हाती घेण्यासाठी लखनौला जाईपर्यंत संयम राखता आला नाही. त्यांनी घाईगर्दीने उत्तरप्रदेशचे निकालही लावून टाकलेले होते. फ़ार कशाला, मागले चार महिने आपणच उत्तरप्रदेशात अखिलेश आणि मायावती यांच्या महागठबंधनाला बहुतांश लोकसभेच्या जागा वाटून दिलेल्या आहेत आणि प्रियंकाने जिंकण्यासाठी तिथे अधिकच्या जागा आपणच आपल्या विश्लेषणात शिल्लक ठेवलेल्या नाहीत, याचेही भान असल्या अभ्यासकांना उरलेले नव्हते. कालपर्यंत अखिलेश मायावतींना ऐंशीतल्या ५०-६० जागा देऊन बसलेल्यांनाच त्या दोघांचे महागठबंधनही स्मरणात राहिले नाही. ह्या अशा शहाण्यांचा अभ्यास मान्य करायचा तर उत्तरप्रदेशात दिडदोनशे जागाच असायला हव्यात. पण आता आपल्याच अशा बडव्यांची राहुलनीच बेअब्रु करून टाकली आहे. प्रियंका कुठलाही चमत्कार घडवू शकत नसल्याची ग्वाही राहुल देत आहेत.

ही वस्तुस्थिती आहे. राहुलनाही खात्री आहे, की त्यांची भगिनी उत्तरप्रदेशच काय उरलेल्या देशातही काहीही चमत्कार घडवू शकत नाही. ते शक्य असते, तर विधानसभा वा पुर्वीच्या लोकसभेतही प्रियंका तिथेच होती आणि काही करू शकली असती. उलट प्रियंका नसताना वा काही खास राजकारण करीत नसतानाही तिने कॉग्रेसच्या असलेल्या जागा गमावण्यापलिकडे काहीच केलेले नाही. करिष्मा असेल तर तो रॉबर्ट वाड्रापाशी आहे. या जावयाने कुठलाही कामधंदा न करता कोट्यवधी रुपयांची माया व संपत्ती मात्र गोळा करून दाखवलेली आहे. किंबहूना तीच माया चव्हाट्यावर येऊ लागल्याने प्रियंका आपल्या पतीच्या बचावाला राजकीय आखाड्यात उतरलेली आहे. तिनेही ते साफ़ सांगून टाकलेले आहे. आपण पतीच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगून प्रियंका थांबलेली नाही. पतीवर अफ़रातफ़रीचे गंभीर आरोप असताना आणि त्याला चौकशीला सामोरे जावे लागत असताना, प्रियंका पक्ष कार्यालयाच्या आधी वाड्राला सोडायला ईडीच्या कार्यालयाकडे गेलेली होती. तिथून मग कॉग्रेस कार्यालयात आलेली होती. आपण कॉग्रेसचे उत्तरप्रदेशात पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्षात आलेल्या नसून, घोटाळ्यात अडकलेल्या पतीला पक्षाची राजकीय कवचकुंडले मिळावी म्हणून कॉग्रेस सचिव झाल्याचे, या पतिव्रतेने कृतीतून दाखवून दिलेले आहे. आपल्यालाही कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी बहिणीची मदत नको असून जिजाजीला वाचवण्यासाठी कॉग्रेस पक्षाची अबु पणाला लावायची आहे, हे राहुलनाही सांगायचे आहे. पण हयात बडवेगिरी करण्यात गेलेल्यांना पांडुरंग काय म्हणतो, त्याच्याशी कुठे कर्तव्य असते ना? ही आजच्या राजकीय अभ्यासक व पत्रकार संपादकांची दुर्दशा आहे. आपली सामान्य बुद्धीही वापरण्याची त्यांना भिती वाटु लागलेली असून ते नुसत्या आरत्या ओवाळण्यातच धन्यता मानु लागले आहेत. अन्यथा त्यांनी प्रियंकाचा फ़ुगा इतका मोठा कशाला फ़ुगवला असता?

ज्या दिवशी प्रियंकाची सचिव म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर तिचा खरा करिष्मा पक्षापेक्षाही माध्यमात आणि बुद्धीवादी वर्गात दिसला होता. कॉग्रेस मरगळली आहे आणि तिच्यापाशी संघटनात्माक बळ उरलेले नाही, याचे भानही यापैकी एकाही अभ्यासकाला उरलेले नव्हते. म्हणून मग राजकीय वास्तविकता बघण्यापेक्षा प्रियंकामध्ये इंदिराजी शोधण्याचे खुळ सुरू झाले. अमेठी रायबरेलीत प्रियंकाच प्रचार करीत असताना २००७, २०१२ आणि २०१७ विधानसभा निवडणूकात तिचे अपयश ढळढळित समोर आहे. पण करिष्मा म्हणून थापा मारण्यात सगळे दंग झालेले होते. क्वचित त्यांच्याच आहारी जाऊन राहुलनी आरंभी आपण उत्तरप्रदेश २०२२ सालात कॉग्रेसला एकहाती जिंकून देण्यासाठीच प्रियंकाला आणल्याचे बोलून टाकलेले होते. किंबहूना महागठबंधनात अखिलेश मायावतींनी सोबत घेतले नाही तरी स्वबळावर लढण्यासाठी र्पियंकाला मदतीला घेतल्याचा दावा राहुलनी केला. पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे लक्षात आल्यावर पप्पूनेही हात आवरता घेतला आणि प्रियंका चमत्कार घडवू शकत नसल्याचे बोलून टाकलेले आहे. पण तिकडे लक्ष कोणाचे आहे? अभ्यासकांना तर देशव्यापी करिष्मा दिसलेला आहे. अर्थात कर्तृत्व संपलेले असले म्हणजेच करिष्मा वा चमत्काराच्या आशेवर जगावे लागत असते ना? कष्टाला सज्ज असलेल्यांनाही चमत्कार हवा असतो. पण ते त्याच्यावर विसंबून रहात नाहीत. मेहनत सुद्धा करीत असतात. राहुलसह पुरोगामी मंडळी आजकाल कमालीची श्रद्धाळू झालेली आहेत. त्यांचा मानवी कर्तृत्वावरचा विश्वास साफ़ उडालेला आहे. त्यामुळेच प्रियंका वा अन्य कुठल्या वाड्रापुत्राच्या करिष्म्याने कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होईल, असले नवससायास करण्याखेरीज त्यांच्याहीपाशी कुठला पर्याय उरलेला नाही. आणखी दहा वर्षांनी त्यापैकी अनेकजण वाड्रापुत्र रेहानच्या करिष्म्याविषयी बोलताना लिहीताना दिसले, तरी नवल वाटायचे कारण नाही. सध्यातरी त्यांचा भविष्य भाकितावर राहुल गांधींचा देखील विश्वास उरलेला नाही, हे सत्य आहे. कारण त्यांनी तसे पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीतच बोलून दाखवल्याचे वृत्त आलेले आहे.

19 comments:

  1. भाऊ नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख. पण यावेळी नेहमीपेक्षा जबरदस्त भाष्ये, उपरोधअलंकाराचा जबरदस्त वापर. फक्त एकाच ठिकाणी आलेला 'पप्पू' हा शब्द मात्र खटकला. तुमच्या लेखात नाही बरा वाटत. बासमतीच्या बिर्याणीत खडा लागल्यासारखे वाटाते. बाकी लेख मराठीत एक नंबर. तुम्हाला दोन नंबर माहीतच नाही हेच खरे.

    ReplyDelete
  2. Good and rational artical. Priyakaji entered in politics to save her husband.Her husband needs party defence .Your blog is very good. I am fully support your view. Thanks for your the best writing. Apparao kulkarni

    ReplyDelete
  3. परखड व वास्तवादी परिक्षण !

    ReplyDelete
  4. This statement is an open admission by RaGa that his party is completely uncompetitive.

    And if that is so, then it will take at least 15 to 20 years of solid hard work to make it competitive again... !!!!

    ReplyDelete
  5. भाऊ,
    णिशेध (३ वेळा )
    अहो, आम्ही त्याला 'पप्पू' म्हटले तर चालेल,
    पण तुम्हीसुद्धा ? असहिष्णुता फारच वाढलेय बा.

    ReplyDelete
  6. Bhau
    as I Remember you was also one of those too, you too praised her out of proportion & I commented on that too.
    Now you are saying its Fuska Baar, we already know its Fuska Baar only.

    There is a reason to pull her in party because if Pappu & Mom goes to jail due to the cases on them then they wanted to have someone from Family to control the Party.
    So they foresee their chances to visit Tihar & you too joined the party of so called secular's to praise her.

    it wasn't expected from you but good you corrected it now.

    ReplyDelete
  7. Yogesh Wagaj सरांचा अप्रतिम लेख.-

    ५५ वर्षातील फक्त उणीवाच काढायच्या असतील तर मग मेंदू रजेवर पाठवावा का ? ५५ वर्षे विरूध्द ५५ महिने ही मार्केटिंग गिमिक आहे .

    कॉंग्रेस जर इतकी चुकीची होती तर तुम्हाला सत्तेत यायला इतकी वर्षे का लागली ?

    वाजपेयी सारखे नेतृत्व असताना इंडिया शायनिंग असताना , सोनिया गांधी यांच्यावरील व्यक्तिगत प्रचार टोकाला असताना सलग दोन टर्म भाजपाला जनतेने बाहेर का बसवले ?

    ५५ वर्षांच्या चुकांच्या बेरजेनंतर भाजपाला बहुमताने सत्तेत आणले , याउलट भाजपांच्या ५५ महिन्यानंतर कॉंग्रेस ला ११० महिने सत्ता दिली याचा अर्थ कसा लावणार ?

    ६५ , ७१ ची युद्धे काय चहा गाळणीने लढलेली नव्हती .पहिली अनुचाचणी कधी झाली. हरित क्रांती , दुधमहापुर पण युद्धाच्या काळातच आला. धरणे ,सहकार , उद्योग उभारणी कधी चाली. चाल कासवाची पण भरवशाची होती.

    इंदिरा गांधीवर टीका करताना आणि सर्जीकल स्ट्राइक च्या बाता मारताना एक गोष्ट विसरु नका एका दणक्यात पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. अमेरिकेला फाट्यावर मारत ..

    ओद्योगिक विकासाचा पाया , कृषी क्रांती , संपर्क क्रांती , आणि जवळपास ४० कोटी लोकांचा नवा मध्यम वर्ग , नवा समाज , नवी बाजारपेठ उभी राहिली . यात देशातील सर्वच स्तरातील सर्वच लोकांचे योगदान सढळ ह्स्ते होते.

    ७० सालच्या भारताची तुलना आज करुन त्याची तथ्ये मोडून सांगण्यात काय हाशील ? मास हिपनॉटीजम आहे . पाकिस्तान मध्ये ७० साली लष्कर , धर्म आणि ISI ने राजकिय वातावऱणात हस्तक्षेप केला आणि देशाची चौकट मोडली . धर्म आणि फाजील राष्ट्रवाद एकत्र आला आणि एक फेल स्टेट म्हणून पाकिस्तान बिघडला.
    चार पाच दिवसापुर्वी पाकिस्थानातील सर्वोच्च न्यायालयाने लष्कर , आयएस आय आणि धर्मगुरुनी राजकाऱणात हस्तक्षेप करु नये असा निर्वाळा दिला आहे ..

    आपल्याकडे सध्या काय चालु आहे . पाकिस्तान ने ७० च्या दशकात केलेल्या चुका आपण आज करायला लागलो आहे काय ? याचा शांतपणे विचार करा .

    ReplyDelete
    Replies
    1. Neharu Ni velich anuchachni Keli nahi, UNSC ch permanent sadasyatvasnakaral, Chin kade neat Laksha dil nahi,Tibet Gilu fila, Kashmir prashna tyanich ubha kela..Indira ji kade Kashmir prashna kaymacha sodvanyachi suvarna sandhi Hoti, 93K pow..Field Marshal ni ha prashna kela..hya ch Kay?

      Delete
  8. भाऊ अप्रतिम लेख,प्रियांकाला सचिव बनवण्याचे एकमेव कारण काँग्रेस पक्षाचा ताबा गांधी परीवाराकडे कायम रहावा कडे म्हणून आधिच तरतुद करुन ठेवली आहे.भविष्यात माय लेक व जावई हे सर्व तुरुंगात गेले तर पुढील भानगडी निस्तरायला 'आपलं माणुस'असलेलं बर.लोकसभा निवडणुकीत प्रियांकाच्या येण्याने फार फरक पडणार नाही. राहुल दिवसेंदिवस बिथरल्या सारखे वागत आहे व मोदींवर बेछुट आरोप करायला आहे हे पराभव दिसू लागल्याचे लक्षण आहे.

    ReplyDelete
  9. भ्रष्ट पतीची पाठराखण करणारी प्रियंका गांधी काय देशाचं आणि समाजाचं भलं करू शकणार आहे ?

    ReplyDelete
  10. भाऊ माध्यमातले पत्रकार हे उघड उघड काँग्रेसचे प्रवक्ते असून मोदींचा द्वेष करतात त्यामुळे या मंडळींची विश्वासहर्ता पूर्णपणे संपली आहे त्यामुळे कितीही खोटारडा प्रचार केला तरी आता लोकांचे मतपरिवर्तन करू शकत नाहीत,12 वर्षे मोदींची अखंड बदनामी करूनसुद्धा 2014 मध्ये त्यांना स्वतःचे बहुमत मिळाले,या खेपेला मोदींना आधीपेक्षा जास्त मोठे बहुमत मिळेल आणि ही माध्यमातील मंडळी अक्षरशः कालबाह्य होतील

    ReplyDelete
  11. जबरदस्त ....फटकेबाजी भाऊ ....

    ReplyDelete
  12. Excellent account of failure of Rahul Gandhi and his congress party.
    He is day by day proving his inability of progressing his party.

    ReplyDelete
  13. The current generation of voters doesnt know Indira Gandhi..how non proven Priyanka beneficial to Congress just by similar in look...

    ReplyDelete
  14. खात्रीलायक सूत्रानुसार आणि खास डेटा analytics च्या माध्यमातून असे कळून येते की आपला ब्लॉग गेल्या सहा महिन्यांपासून अमराठी भाषिक सुद्धा आवर्जून वाचत आहेत विशेषतः उत्तर प्रदेश निवडणुकीतला विजयात आपल्या ब्लॉग मताने वैचारिक परिवर्तन लक्षणीय ठरले आहे त्यानंतर अमराठी भाषिक वाचकांमध्ये आपला ब्लॉग लोकप्रिय झाला आहे.पत्रकाराने कसे असावे हे उमेदवारी करणाऱ्या पत्रकाराने आपल्याकडून धडे गिरवले पाहीजेत. मुर्खांना आपली मते भाजपधार्जिणी वाटतील पण आपल्या लेखात अशा मुर्खांना योग्य युक्तीच्या ठरणाऱ्या आवश्यक गोष्टी अनावश्यक वाटत आहेत आणि त्यामुळेच त्यांचा राजकीय पराभव होत आहे. त्यांची लायकी दिवसेंदिवस उघडी पडत आहे फक्त दुर्दैवी गोष्ट एवढीच आहे की अशा मुर्खांना अजूनही निवडणुकीत ३०% मते मिळत आहेत कारण हीच मते देशाला हजारो वर्षे गुलामगिरीत रुजवून ठेवणारी होती आणि आजही देशाला खिळखिळी करत आहेत

    ReplyDelete

  15. https://www.youtube.com/watch?v=Ns2Y6dWbqj4&feature=share&fbclid=IwAR03sCysirqyMBqXr7CWg11N7dLep4e66vrZTpiQEQZwXwaadyEUQ_-bNP0

    You can listen to the audio of this article on this link.
    Thank you.

    ReplyDelete