"Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr. (1929-1968)
दहा वर्षापुर्वी रिदा शेख नावाची मुलगी पुण्यात मरण पावली. ती देशातली पहिली स्वाईनफ़्लुची बळी होती. पण तिचा मृत्यू त्या घातक आजाराने घेतलेला नव्हता, तर चुकीच्या निदान व उपचाराने घेतलेला होता. अत्याधुनिक रुबी इस्पितळात तिच्यावर उपचार चालले होते आणि आईबापांनी पाण्यासारखा पैसा तिला वाचवण्यासाठी खर्च केला होता. पण चुक झाली होती, ती निर्बुद्ध गाफ़ील डॉक्टरांकडून! रिदाला स्वाईनफ़्लु झालेला होता आणि रुबी इस्पितळात तिच्यावर न्युमोनियाचे उपचार चालले होते. ती त्या उपचारांना प्रतिसाद देत नसतानाही आपल्या अर्धवट ज्ञान व समजूतीचा अट्टाहास करीत डॉक्टरांनी न्युमोनियाचेच उपचार चालवले होते आणि त्याच गैरलागू उपचारांनी रिदा शेखचा बळी घेतला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आजाराने योग्य निदान झाले व देशातली ती पहिली स्वाईनफ़्लुची बळी ठरली. कश्मिरची समस्या किंवा आजार किंचीतही वेगळा नाही. स्वातंत्र्योत्तर काळात हा रोग सतत बळावत गेला आहे आणि त्या आजाराला जोजवत चाललेले चुकीचे निदान व उपचारच आजच्या भीषण परिस्थितीला कारणीभूत झालेले आहेत. मुळात आजार मानायचा नाही आणि नंतर त्यावर चुकीचे औषधोपचार करायचे, हे मृत्यूला आमंत्रण असते. काश्मिर असो की जिहादी दहशतवाद असो, त्याचे मागल्या तीन दशकापासून निदानच चुकीचे चाललेले असून; उपचार सतत निरूपयोगी ठरलेले आहेत. बाळासाहेबांनी पाकवर सर्वंकश बहिष्काराची भूमिका मांडली, तेव्हा काश्मिर जवळपास शांत होता आणि तिथला मुस्लिम तरूणही जिहादी झालेला नव्हता. पण रोगाला चुचकारण्यातून किंवा नाकारण्यातून आज तो रुग्ण किंवा प्रश्न मृत्यूशय्येवर येऊन पडलेला आहे. करोडो भारतीय बाळासाहेबांच्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. पण याचा पहिलाच इशारा देणार्या त्या भविष्यवेत्ता नेत्याचे स्मरण कोणाला होऊ नये याचे दु:ख होते.
अठ्ठावीस वर्षे उलटून गेली आता त्या घटनेला. तेव्हा काश्मिरात कुठे अतिरेकी घातपात घडवत नव्हते, की जागोजागी बॉम्बस्फ़ोट घडत नव्हते. पण सीमा वा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार व्हायचा. त्यात भारतीय सैनिकांचा किंवा लगतच्या गावातल्या सामान्य नागरिकांचा बळी जायचा. आज तोंड वर करून वचवचा बोलणार्या महबुबा मुफ़्तीच्या भगिनी रुबाया, यांचे अपहरण झाले होते आणि तिच्या सुटकेसाठी अतिरेक्यांची चार खतरनाक कैद्यांच्या मुक्ततेची मागणी मान्य झालेली होती. पण बाकीचा काश्मिर शांत होता आणि सामान्य काश्मिरी सैन्यावर पोलिसांवर दगडफ़ेक करीत नव्हता. चकमकीही घडत नव्हत्या. थोडक्यात आजच्या तुलनेत काश्मिर खुपच शांत होता. पण तिथे आगडोंब पेटवण्याचे प्रयास पाकिस्तान करीत होता. अशावेळी एकच माणूस ठामपणे पाकिस्तानशी संवाद नको, की वाटाघाटीही नकोत; असा आग्रह धरून पाकला युद्धातून धडा शिकवण्याची भाषा ठामपणे बोलत होता. त्यानेच तेव्हाच पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये म्हणून आग्रह धरलेला होता. त्याच्याच शब्दावर शिशीर शिंदे नावाच्या विभागप्रमुखाने मुंबईच्या वानेखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून दोन देशांच्या सामन्यात व्यत्यय आणलेला होता. कोणाला त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण तरी आज झाले आहे काय? तेव्हा त्याच्यावर युद्धखोर हिंसेचा पूजक, असले आरोप झाले होते. दोन देशातील वैमनस्य वाटाघाटी व संवादातूनच संपवता येईल असा बुद्धीवाद जोरात झालेला होता. आता जवळपास तीन दशकांनंतर कित्येक वाटाघाटी व संवादातून काय निष्पन्न झाले? हजारो सैनिक व तितकेच सामान्य नागरिक पाकिस्तानी घातपाताचे बळी झाले आहेत. कोट्यवधी भारतीय पाकिस्तानशी कुठलेच संबंध नकोत म्हणून एकसुरात बोलू लागले आहेत. मात्र शिवसेनेलाही बाळासाहेब नावाचा तो भविष्यवेत्ता आठवलेला नाही.
खेळ आणि राजकारणाची गल्लत नको, हा तेव्हाचा युक्तीवाद बुद्धीवाद होता आणि किरकोळ स्वरूपात आजही तोच युक्तीवाद चालू आहे. मात्र किंमत मोठीच मोजली गेली आहे. हे दिडशहाणे कुठल्या अवास्तव जगात जगतात ठाऊक नाही. कारण असल्या युक्तीवादाची किंमत भारताने आपल्याच भूमीत मोजलेली आहे आणि असल्या युक्तीवादाचे प्राणघातक चटके श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानात जाऊन सोसलेले आहेत. भारत पाकिस्तानच्या संघर्षाशी किंवा जिहादशी आपला संबंध काय; म्हणून श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. तेव्हा एका सामन्याच्या दरम्यान त्यांच्या बसवर हल्ला होऊन, त्यांना थेट खेफपट्टीवरून हेलिकॉप्टरने मायदेशी पळ काढावा लागलेला होता, सचिन तेंडूलकर किंवा सुनील गावस्करला त्याची कल्पना नाही, असे कोणाला म्हणायचे आहे काय? पाकिस्तान इस्लामी देश असून तिथला खेळाडू वा कलाकार लोकशाहीवादी उदारमतवादी असू शकत नाही. कुठल्याही प्रचलीत सभ्यतेचा गंध त्याला नाही. म्हणून कलाकार साहित्यिक वा खेळाडू आणि जिहादी यात तसूभर फ़रक नसतो. ते सगळे मुखवटे असतात आणि जिहाद हेच उद्दीष्ट असते. याची साक्ष मला देण्याची गरज नाही. २०१४ मध्ये अहमद शेहजाद नावाच्या पाक खेळाडूने खेळपट्टीवरच दिलशान तिलकरत्ने या श्रीलंकन खेळाडूला मुस्लिम धर्म स्विकारण्याचा किंवा नरकात जाण्याचा इशारा दिला होता. क्रिकेटचा धर्माशी संबंध नसेल, तर असल्या घटना कशाला घडतात? हा अनुभव कुठल्याही क्षेत्रातल्या पाकिस्तानी व्यक्तीचा असताना खुळ्यासारखे युक्तीवाद कामाचे नसतात आणि त्यातून कुठला उपाय शक्य नसतो. उलट आजार बळावत जातो. म्हणून तर १९९१ सालात बाळासाहेबांनी सांगितलेला उपाय हसवण्यावारी नेण्याची किंमत भारताला आज मोजावी लागते आहे. काश्मिर दहशतवादाच्या आहारी गेलेला आहे आणि बुद्धीवादी वर्गाला नव्हेतर सामान्य नागरिक व सैनिकांना प्राणाचे मोल मोजावे लागते आहे.
बाळासाहेबांनी जेव्हा असा अट्टाहास केला, तेव्हा त्यांच्यावर अतिरेकी राष्ट्रवादाचा आरोप झाला. बौद्धिक खिल्ली उडवली गेली होती. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिशीर शिंदे आणि काही शिवसैनिकांनी मुंबईत होणार्या भारत पाक क्रिकेट सामन्याची खेळपट्टी उखडून टाकली होती. तिथे डिझेल ओतून खेळपट्टी खेळ्ण्याला्यक रहाणार नाही अशी व्यवस्था केलेली होती. तेव्हा त्यांना गुन्हेगार ठरवले गेले. त्यांच्यावर खटले भरले गेले. पण तेव्हाही कोणी मायका लाल क्रिकेटपटू बाळासाहेबांच्या समर्थनाला आलेला नव्हता. पण साहेबांच्या आग्रहातले तथ्य क्रिकेट क्षेत्रातल्या एका जाणकाराने तेव्हाही स्पष्टपणे मांडलेले होते. अनेक सामन्यात पंच म्हणून काम केलेले माधव गोठोस्कर यांनी लेख लिहून पाकिस्तानी क्रिकेटसंघ कसा त्या देशाची राजकीय धोरणे खेळातही अंमलात आणतो, त्याची ग्वाही दिलेली होती. पण तिकडे कोणी लक्ष दिले होते? श्रीनगर येथे दोन देशातील सामना ठरलेला असताना काश्मिर वादग्रस्त भूप्रदेश असल्याने ती भारताची भूमी नाही, म्हणून पाक संघाने श्रीनगरचा सामना खेळण्यास नकार दिला. तो खेळ होता की राजकारण? असा सवाल गोठोस्करांनी विचारलेला होता. कोणी त्याचे उत्तर आजपर्यंत दिले आहे काय? ती घटना १९९१ सालची आणि दोनच वर्षात बौद्धीक दिवाळखोरीची किंमत पाकिस्तानने मुंबईकडून वसुल केली होती. त्याच मुंबईत मग पाकिस्तानी कारस्थानामुळे बॉम्बस्फ़ोट मालिका घडलेली होती. सैनिकांच्या जीवाची पर्वा नसलेल्या भारतीय क्रिकेटशौकीन व खेळाडूंचा उदारमतवाद मुंबईकरांना वाचवू शकला नाही. पाठीशी घातल्याने गुन्हेगार सोकावत जातो, तसाच पाकिस्तान सोकावलेला आहे. मात्र मुर्ख युक्तीवाद आजही संपलेले नाहीत. क्रिकेट थांबवून दहशतवाद संपणार नाही आणि युद्धानेही दहशतवाद संपणार नाही, म्हणून आपण त्या हिंसेची जुळवून घ्यावे हे आता बुद्धीवादाचे सुत्र झालेले आहे.
=======================
रिदा शेखच्या मृत्यूविषयी अधिक तपशील ज्यांना हवा, त्यांच्यासाठी बातमीचा हा दुवा
https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/others/rape-victims-family-seeks-speedy-trial/articleshow/67983790.cms?utm_source=Articleshow&utm_medium=Organic&utm_campaign=Related_Stories
https://www.hindustantimes.com/india/swine-flu-victim-s-family-to-sue-hospital-for-negligence/story-UDELuPGsfWVXmyobWpb7NK.html
Khoopach chhan lekh ahe bhau.
ReplyDeleteखरय भाउ
ReplyDeleteLast sentence a fiery eye opener....
ReplyDeleteबाळासाहेब सांगत होते ते समजले नाही, गोठोस्करांना विचारतो कोण....
ReplyDelete"क्रिकेट थांबवून दहशतवाद संपणार नाही आणि युद्धानेही दहशतवाद संपणार नाही, म्हणून आपण त्या हिंसेची जुळवून घ्यावे हे आता बुद्धीवादाचे सुत्र झालेले आहे"......
हा एकदम षटकार ...
Osho speaking on the Kashmir problem.
ReplyDelete“In India, I knew many politicians, but I have not seen any brains in them. Simple things that anybody will understand, things which don’t need great genius, politicians will miss.
One of my friend was commander-in-chief of the Indian Army. When Pakistan invaded India, this man – his name was General Chaudhri – asked permission of the Prime Minister to counter attack; it was needed, just being defensive would not help. That’s a simple military strategy; if you become defensive you are already defeated. The best way is to be aggressive.
If Pakistan had invaded one part of Kashmir, Chaudhri’s idea was that we invade Pakistan from four or five fronts. They will be confused, they will run amok, they will not be able to decide where they have to send their armies. Their attack will become a failure because they have to defend all the borders of their country.
But politicians! The Prime Minister, Nehru, informed him – ‘Wait till 6 ‘o’ clock in the morning.’
General Chaudhri told me that he was thrown out of the army – not publicly. Publicly he retired honorably, but he was kicked out. He was told – ‘either you resign or we will throw you out.’
The reason was that he attacked Pakistan at 5 ‘o’ clock in the morning – one hour before the order. That was the right time, by 6 ‘o’ clock, it would be sunrise, people would be awake. 5 ‘o’ clock was the perfectly right time – everybody was asleep – to drive them crazy. And he did what he was saying – he made the whole of Pakistan tremble. He was just 15 miles from Lahore – Pakistan’s biggest city.
The whole night Nehru and his cabinet were discussing this way or that way – to do it or not to do it. And even by 6 ‘o’ clock in the morning they had not come to any conclusion. They just heard on the radio – ‘General Chaudhri is entering Lahore.’
That was too much for the politicians. They stopped him just 15 miles before Lahore. And I can see that was sheer stupidity. If the man had taken Lahore, the problem of Kashmir and India would have been solved forever. It is not ever going to be solved, the problem of the territory of Kashmir which Pakistan has occupied – and it was because General Chaudhri was told to come back, ‘because India is a non-violent country and you did not wait for the order.’
He said to them – ‘I do understand military strategy, you don’t. Even by 6 ‘o’ clock where was your order? Pakistan has already occupied a certain territory, the most beautiful part of Kashmir – and you were just discussing the whole night. This is not a question to be discussed – this has to be decided on the warfield. If you had allowed me to take over Lahore then we would have been in a position to bargain. Now we are not in a position to bargain. You pulled me back. I had to come back.’
The UN decided for a ceasefire line. So now for 40 years, UN armies have been there patrolling, on the other side Pakistani armies are patrolling, on this side Indian armies are patrolling. For 40 years – just nonsense! And in the UN they go on discussing and nothing comes out of it.
And the territory that has been taken by Pakistan you cannot take back because of the ceasefire. They have decided in their Parliament that the territory occupied by them is combined into Pakistan. Now they show it on their maps. It is no longer occupied territory, it is Pakistani territory.
I had told General Chaudhri – ‘This was such a simple thing that you had to be in a bargaining position. If you had taken Lahore, they would have immediately agreed to leave Kashmir because they could not lose Lahore. Or if a ceasefire was to come, okay, then Lahore remains with us when we ceasefire. Either way there will be something to bargain. India doesn’t have anything to bargain with – why should Pakistan bother?’
But politicians certainly don’t have brains.”
~ Osho, From Darkness to Light (1987)
खूप छान लेख झणझणीत अंजन घालणारा.... नाठाळ्याचा माथी काठी मारलीच पाहिजे ...
ReplyDeleteVery well said zir.पण लक्षात कोण घेत
ReplyDeleteभाऊ आपणास दोन्ही हातांनी नमन
ReplyDeleteभारतात फक्त दोनच राजकीय विचारधारा आहेत. गांधीवाद व सावरकरवाद. सावरकरवाद नष्ट झाला नव्हता तर क्षीण झाला होता म्हणून भारताला अनेक दशके मार खावा लागला. आता गांधीवाद क्षीण होतोय पर्यायाने सावरकरवाद दृढ होऊन भारत जगात कणखर देशाच्या रूपाने पुढे येणार.
ReplyDeleteकाश्मीरला झालेल्या आजाराचे नाव आहे... इस्लाम. हे जोपर्यंत मान्य करण्याचे धाडस सरकार व मिड़ीया दाखवणार नाही तोपर्यंत इलाज करता येणार नाही. इलाज दोनप्रकारचा आहे. [१] हिजरत म्हणजे भारत सोडून जाण्यास भाग पाड़णे. [२] सामूहिक धर्मांतरण घड़वणे.... हे पचायला अवघड आहे पण हे दोनच उपाय आहेत.
ReplyDeleteVery true....last line is true eye opener.....
ReplyDeleteSir, very good article.
ReplyDeleteपंच माधव गोठोस्कर यांचा लेख वाचावयास मिळेल काय?
ReplyDeleteपचन्यास हलका आहार भारतीय जनतेला द्या.
ReplyDelete