हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था
मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था
पण जितके संवेदनाशील असतो, तितका आपल्याला लौकर रागही येतो. पण त्यातला दोष असा आहे, की आपला राग तितक्याच लौकर शांतही होतो. कालपरवा आपण कशामुळे संतप्त वा प्रक्षुब्ध झालो होतो? त्याचे चार दिवसानंतर आपल्याला पुर्णविस्मरण झालेले असते आणि तीच खरे तर आपल्यासारख्या संवेदनशील समाजाच्या शत्रूंची मोठी ताकद असते. ते आपल्या विस्मरणशक्तीच्या बळावरच त्यांचे डावपेच खेळत असतात आणि सातत्याने आपल्याला आपल्याच क्षेत्रात पराभूत करीत असतात. कालपरवा पुलवामा येथे ४० हून अधिक भारतीय जवानांची भर ताफ़्यावर चढाई करून हत्या झाली, तेव्हा अवघा देश प्रक्षुब्ध होऊन उठला होता. पण ती तशी पहिली घटना अजिबात नव्हती. दहा वर्षापुर्वी अशीच घटना मुंबईच्या भर रस्त्यात घडलेली होती आणि सैनिकांचा नव्हेतर पावणेदोनशे सामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेलेला होता. दोनतीन वर्षापुर्वी असाच हल्ला पठाणकोट व उरी येथील लष्करी तळावरही झालेला होता आणि आपण इतके़च संतप्त होऊन रस्त्यावर आपला संताप व्यक्त करण्यासाठी उतरलो होतो. पण त्यामागची कारणमिमांसा वा त्यातली रोगबाधा शोधून त्यावर कायमचा उपाय योजण्यासाठी आपल्याकडून कितीसे प्रयत्न झाले? ज्या जवानांच्या हौतात्म्यामुळे आपल्या मनाचा प्रक्षोभ झाला, त्यापैकीच काहीजणांना अधूनमधून काश्मिरात सुरक्षा कारवाई करताना मागून दगडफ़ेकीचे हल्ले सोसावे लागतात. तेव्हा आपण इतकेच रागावतो काय? नसेल तर एखाद्या मोठ्या घटनेनंतर असा प्रक्षोभ किती कामाचा आहे? कारण तशा किरकोळ वाटणार्या व भासणार्या घटनांमधून मोठ्या हल्ल्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असते. सज्जता केली जात असते. त्या किरकोळ वाटणार्या प्रसंगातून आपल्या संवेदना शिथील वा गाफ़ील केल्या जात असतात. परिणामी मोठ्या घटनेसाठी पुरेसे निर्धास्त वातावरण घातपात्यांसाठी तयार व्हायला हातभार लागत असतो. कारण अशा घटना रोखण्याचेच काम प्राण पणाला लावून लढणार्यांकडे आपण पाठ फ़िरवलेली असते. आपल्याला पुलवामानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित आठवला काय? आपल्याला टीएसडी हे शब्द वा अक्षरे आठवली काय? सगळे रहस्य तिथेच तर दडलेले आहे ना?
श्रीकांत पुरोहित नऊ वर्षे तुरूंगात सडत पडलेला होता आणि त्याच्यावर हिंदू दहशतवादाचा चेहरा म्हणून सगळीकडून शिक्कामोर्तब केले गेले होते. कुठलाही सज्जड वा कोर्टात टिकणारा पुरावा विरोधात नसताना, पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांना दिर्घकाळ जामिन कुठल्या कारणास्तव नाकारला जात होता? आपण त्यासाठी कुणाला जाब विचारायला पुढे सरसावलेले होतो काय? त्या नुसत्या आरोप व जामिनाचे निमीत्त करून सतत हिंदू दहशतवादाचे आरोप करणार्यांना जाब विचारण्यासाठी आपल्यातले कितीजण पुढे आलेले होते? नऊ वर्षानंतर श्रीकांत पुरोहितला जामिन मिळाला आणि मध्यंतरीच्या काळात त्याचा पोलिसांकडून अनन्वीत छळ झाला. तेव्हा आपण मस्त झोपा काढत नव्हतो काय? श्रीकांत पुरोहित हा लष्करी गुप्तचर सेवेतला मोक्याचा अधिकारी होता आणि समाजात मिसळून तिथे गुपचुप चाललेल्या काही हालचालींची माहिती मिळवत होता. त्याच माहितीच्या आधारे भविष्यात होऊ शकणार्या डझनावारी घातपातांना रोखणे शक्य झालेले होते. कुठल्या वर्तमानपत्राने किंवा माध्यमाने कधी पुरोहित लष्करी सेवेत कुठले काम करीत होता, त्याची कधीच माहिती दिली नाही किंवा लपवली. आपण सामान्य वाचक वा नागरिक म्हणून अशा माध्यमे किंवा पत्रकारांचा कान पकडून सत्य माहिती मिळवण्याचा आग्रह धरला होता काय? मुंबईत कसाब टोळीचा हल्ला होऊन दिडदोनशे लोकांचा बळी पडल्यावर आपण खडबडून जागे झालो आणि शहीदांसाठी मेणबत्या लावायला पुढे सरसावलो. तेव्हाही कर्नल पुरोहित कार्यरत असता किंवा गजाआड खितपत पडलेला नसता, तर मुंबई हल्ला होऊ शकला असता काय? आपल्या मनाला हा प्रश्नही शिवला नाही. ज्यांनी पुरोहितला गजाआड टाकले त्यांनीच वास्तवात कसाब टोळीचा समुद्रमार्गे मुंबईत आरामात पोहोचण्याचा मार्ग खुला करून ठेवलेला होता. नेमके तसेच काही आता लष्करी ताफ़्यात स्फ़ोटकांनी भरलेले वाहन घुसवण्यासाठी निघालेल्या आदिल दार याला कोणीतरी मदत केलेली आहे. ती मदत पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था देत नसते, तर पुलवामातील काही गद्दार तशी मदत दारला देत असतात आणि भारत्तीय लष्कराच्या ४० सैनिकांना ठार मारण्यासाठी पाकिस्तानला मदत करत असतात. आपल्या मनाला हा विषय कधी शिवला आहे काय? तो किंवा तसे हल्ले पुरोहित किंवा टीएसडी अशा सेवांमुळे शक्य होत नव्हते. पुरोहित वा टीएसडी नेमके काय काम करतात?
टीएसडी म्हणजे भारतीय सेनादलाच्या कुठल्याही कागदपत्रात नोंद नसलेली एक लष्करी तुकडी होती. तिला गुप्तचरही म्हणता येणार नाही. गुप्तचर विभागाच्या कामकाजाची निदान कुठेतरी कागदोपत्री नोंद केलेले असते. पण टीएसडी वा टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन ही तुकडी वा तिचे कामकाज कुठल्याही कागदोपत्री नोंदी्त सापडणार नाही. कारण दफ़्तरी नोंदीत अशी कुठली तुकडी नसते आणि अस्तित्वात असल्याचे भारत सरकार वा संरक्षण खातेही मान्य करणार नाही. आपण ज्याला लष्करे तोयबा वा जैश महंमद वगैरे म्हणतो, तसेच काहीस टीएसडीचे स्वरूप असते. त्या तुकडीचे काम बेकायदा व नियमबाह्य असल्याने कुठल्याही सरकारी दफ़्तरात त्यांची नोंद होणार नसते. किंवा केलेल्या कारवाईचे कसलेही श्रेय घ्यायला हे लोक पुढे येणार नाहीत. कारण ते असल्याची नोंद कुठेच नसते, तर त्यांचा पराक्रम वा कार्य याविषयी जाहिर चर्चा होणारच कशी? पण अशा तुकड्या सावलीत राहुन काम करतात आणि त्यांच्यावर कधी प्रकशझोत टाकला जात नसल्याने, त्यांची सावलीही कोणाला कुठे आढळत नाही. हे लोक देशासाठी आपले भवितव्य आणि प्राणही पणाला लावत असतात. दिर्घकाळ पाकिस्तानी माध्यमात भारताविरोधी दिलेल्या बातम्यात या टिएसडीचा उल्लेख आपल्याला बघायला मिळू शकतो. पण तसा उल्लेख एका भारतीय माध्यमात आला आणि खुद्द भारत सरकारलाच त्यांच्या विरोधात कारवाई करायची वेळ आणली गेली. म्हणजेच भारताविरुद्ध चाललेल्या घातपाती पाकिस्तानी युद्धाच्या विरोधात चाललेल्या तशाच प्रतिकाराला कमकुवत व नेस्तनाबुत करण्याचे काम इथे बसलेल्या काही पत्रकार, राजकारणी व अधिकार्यांनी पार पाडलेले आहे. मात्र आपल्याला त्या अधिकारी वा लष्करी तुकडीचे नामोनिशाणही ठाऊक नसते. त्यांच्यविषयी आस्था कौतुकही नसते. तुमच्यामाझ्यासाठी जे आपला जीव ओवाळून टाकतात, त्यांच्याविषयी आपल्याला किंचीत आपुलकी वा त्यांची ओळखही नसावी, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना? पण ती वस्तुस्थिती आहे आणि स्वत:च्या कौतुकासाठी हे खरेखुरे देशभक्त कधी लाचार ओशाळवाणेही नसतात. उलट आपण सामान्य लोक इतके बेछूट वा बेजबाबदार असतो, की आपल्याच नाकर्तेपणाने वा बेफ़िकीरीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो आणि पाकिस्तानचे काम सोपे करीत असतो.
कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव स्फ़ोटातला संशयीत म्हणून सप्टेंबर २००८ मध्ये आरोप ठेवला गेला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कसाब टोळी मुंबईत राजरोस येऊ शकली. कुलाब्यासारख्या वर्दळीच्या जागी कोळीवाड्याच्या वस्तीतून हे दहा मारेकरी आरामात हमरस्त्यापर्यंत चालत आले. त्यांच्याकडे असलेली हत्यारे वा स्फ़ोटके कोणाच्या नजरेत आली नाहीत? त्या वर्दळीच्या संध्याकाळी त्यांना तिथून सहजगत्या टॅक्सी मिळू शकली? इतकी मुंबई सोपी आहे? कुणीतरी आधीपासून त्यांचे स्वागत करायला व लागेल ती मदत करायला तिथे सज्ज असल्यानेच पहिल्या मुंबई भेटीत या दहा घातपात्यांना इप्सित स्थळी पोहोचता आले. पण अजूनपर्यंत अशा सहाय्य देणार्यांचा शोध लागला आहे काय? पुलवामा येथेही स्थानिक मदतीशिवाय इतकी मोठी हायवेवर घटना घडवणे शक्य नव्हते. कुलाब्याची स्थितीही वेगळी नाही. मुद्दा असा, की त्या सहाय्य देणार्या स्थानिकांचा वास काढून त्यांना आधीच नामोहरम करावे लागते आणि पर्यायाने असे घातपाती मोठी घटना घडवू शकणे रोखले जाणार असते. पुरोहित व त्यांच्या अन्य सहकार्यांनी अशा शंकास्पद गट व लोकांमध्ये घुसून काढलेली गुप्त माहितीच तशा घटना मोठ्या प्रमाणात रोखू शकलेली होती. तर त्यांच्याच मुसक्या बांधणार्या तथाकथित मालेगाव स्फ़ोट तपासाने कुणाला मदत केली? त्या धरपकडीने कुलाब्यात कसाबला मदत करणार्यांना मोकळीक दिली आणि त्यापेक्षा वेगळे काहीही पुलवामा येथे घडलेले नाही. उरी वा पठाणकोटलाही वेगळे काहीही घडलेले नव्हते. कसाब वा पुलवामा येथील हल्लेखोरांची स्फ़ोटके तेव्हा़च भेदक होतात, जेव्हा ती योग्य जागी वा घटनास्थळी पोहोचू शकतात. पुरोहित वा टीएसडी अशा लोकांकडून तोच मार्ग रोखला जात असतो व होता. तर त्यांच्याच मुसक्या ज्यांनी बांधल्या, ते प्रत्यक्षात तोयबा वा जैशचे इथले एजंट वा हस्तक असू शकतात. कारण त्यांच्याशिवाय अशा हल्ले व घातपाताचा मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. करकरे यांच्या तपास पथकाने वा त्यांच्या राजकीय म्होरक्यांनी कसाबसाठी ते काम पार पाडले होते. पुलवामा उरीसाठी तेच काम, टीएसडीला निकामी करणार्या माध्यमे व पत्रकारांनी पाकिस्तानसाठी पार पाडलेले आहे. म्हणूनच नुसते रागावून चालणार नाही की पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या डरकाळ्या फ़ोडूनही भागणार नाही. आपल्याला वास्तविक शत्रू ओळखता आला पाहिजे. तो शत्रू पाकिस्तान नाही, किंवा कसाबसारखे घातपातीही आपले खरे शत्रू नाहीत. आपले शत्रू आजही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात आणि युक्तीवादाच्या आडोशाने त्या हल्ल्याला समर्थनही देत असतात. त्याकडे आपण डोळसपणे बघणार आहोत काय? (अपुर्ण)
खरा शत्रू ओळखता आला पाहिजे...
ReplyDeleteत्यासाठी परिस्थिती त्रयस्थपणे हाताळण्याची क्षमता अंगी बाणवता आली पाहिजे.
मला वाटते, आपल्या लेखात आपण हेच सुचवले आहे.
True. These are the real threat
ReplyDeleteफारच मार्मिक भाष्य
ReplyDeleteखरय भाउ,काल पाक मिडीयावर शेखर गुप्ताचा तो पण आता कसा विरोध करतोय,आधि असा नव्हता उल्लेख सतत केला जात होता.म्हनजे पाक त्याकडे इथला अॅसेट समजत आहे.गुप्ता,ndtv,बरखा,राजदीपची तिथे खुलेआम कौतुक होत असते.
ReplyDeleteराष्ट्रवादी(? की पाकिस्तान वादी) जित्या ने शहिद इशरत जहाँ या नावाने रुग्णवाहिकेचे उद्घघाटन केले होते.
ReplyDeleteविलासराव मुलाची सिनेमात सोय लावण्यासाठी बॉलीवूड दिग्दर्शक घेऊन फिरत होते.
शब्द नाहीत
ReplyDeleteकरन थापर, राघव बहेल, प्रवीण स्वामी - या तिघांनी कुलभूषण जाधव हे RAW चे agent आहेत ,आणि अतिशय गलिच्छ भाषेत त्यांना लेख लिहून शिव्या दिल्या. पाकिस्तान ने याच लोकांचे लेख ICJ मध्ये वापरले. (The Quint, India Today, FirstPost, NDTV हे या बाबतीत एकाच माळेचे मणी )
ReplyDeleteबरखा दत्त- 1)बुऱ्हाण वाणी हा गरीब शाळा मास्तरांचा मुलगा ,त्याला दुसरी संधी मिळाली पाहिजे होती , 2)काश्मिरी हिंदू हे पैसेवाले असल्याने 1990 साली त्यांच्या विरुद्ध तो पर्यंत दबलेल्या लोकांनी उठाव करून त्यांना हाकलून दिले.
राजदीप सरदेसाई - भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना हरल्यावर दाऊद इब्राहिम ढसा ढसा रडला
जोशीबुवा - आझाद मैदान दंगल झाली. अमर जवान स्मारकाची तोडफोड केली गेली. एबीपी ची ओबी व्हॅन जाळली गेली. महिला पोलिसांवर दंगलखोर धर्मांध लोकांनी त्रास दिला तरीही त्या दिवशी आणि नंतरही जोशीबुवा प्रसन्नच.
Purohit was made scapegoat by Congress . Karkare and company obliged Congress and NCP. God gave them punishment.
ReplyDeleteBhau
ReplyDeleteIf u ask me personally, Then Yes aware of TSD (Technical Support Division of our Army), what happened with Purohit. Who arrested him was an army officer called Shrivastava & he is still enjoying his Rank & service in Army. Why ? Madhu kiswar has wrote allot on this & I followed her. There are many more like me too.
Tell me Bhau did you wrote on these topics in depth like Madhu Kishwar did ? I haven't seen. Any way that's not matter here.
Bhau we know how & Why TSD was closed but tell me one thing what a common man can do on this when the Opposition of that time (BJP) haven't / couldn't do anything. What we can do is to tell it to as many we can & I did that & doing that.
However these anti national powers are too strong politically, financially & by all means. They control the media in this country so how do you expect a common man to know all these details when they don't have sources.
Few people like us who have internet & all stuff available & know what to search & where to look are very less. So we cant blame a common man in this country for not knowing truth. In the name of truth our media constantly telling lies & false information.
Still people protest at their level as best as they can. So many people don't buy china product do you know? why this is? because they are doing what they can do from their side. But a common man cant fight with these anti nationals on full scale & why should they when we have Govt, Military & all establishments in place.
What stops you from blaming Modi govt for
1. Stopping the action on PAK after a single Surgical strike? 2. Why the separatist still had & few still have govt. security?
3. Why there is no action to cancel Section 370 by govt in 5 yrs?
4. Why there is no action in 5 yrs. on all the anti nationals who openly challenge this nation & its integrity?
5. Why Army had not given free hands to get back POK which is our land only?
There are so many such questions Bhau where Modi govt has totally failed & you ask a common man to fight with these power? Absolute Rubbish.
Appreciate if you can Write one article to expose what this govt has failed to do in the national interest.
It's very simple. Common man can resolve to vote for Modi in 2019 also.
DeleteOne post received by me is pasted here below. I am not on facebook/twitter. So, I cannot confirm the veracity of this post. Every facebook/twitter user can check.
Delete#hacker Anshul Saxena #अंशुल_सक्सेना
#पुलवामा
#आजच्या_चर्चेतील_महत्वाचे_नाव...
जास्त नाही फक्त ३ दिवसापासून ह्या नावाला ओळखतोय....
आज हे नाव फक्त काश्मिरी विद्यार्थी नव्हेच तर आपल्या देशाच्या कान्याकोपऱ्यात लपून बसणाऱ्या गद्दारांसाठी एक भीती बनलीय. कारण पण तसेच आहे ..ज्यां लोकांना आपला चांगला जॉब गमावयाला लागलाय त्या मागचे कारण आहे हे नाव !
खर महत्वाच्या मुद्द्यावर येतो गेलेली १४ तारिख हिंदुस्थानाच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून कायमचीच रुजली गेलीय... पाकिस्तान्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे पाठीमागून वार केले अन त्यात आपले ४२ जवान शहीद झाले ..अन तेव्हापासून अक्खा हिंदुस्तान पाकड्यांविरुद्ध पेटून उठलाय पण काही आपल्याच देशात राहणारे गद्दार देशद्रोही ह्या गोष्टीची मजाक उडवत होते... आपल्या सैनिकांविरुद्ध द्वेषपूर्ण कमेंट करत होते तर काही पाकिस्थानचे समर्थन करत होते. आंतकवाद्यांचे समर्थन करत होते...मी ही स्वतः खूप विरोधाभास कमेंट,हसण्याचे रिऍक्ट वैगरे बघितले...पण मनात चीड निर्माण होऊन अश्रू वाहण्यापलिकडे काहीच होऊ शकत नव्हते अन करु तरि काय शकत होतो?...पण एक कुणीतरी होता ज्याला हे सहन झालं नाही अन त्याने १४ फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच एक नीश्चय केला की अश्या लोकांना तो अद्दल घडवणारच...अन लगेच तो कामाला लागला..सोशल मिडियावरच्या प्रत्येक पेज वरच्या आक्षेपार्ह कमेंट ज्या आपल्या शहीद जवानांच्या विरुद्ध, हिंदुस्थानच्या विरुद्ध होत्या त्या सर्व त्याने एकत्र केल्या...ते कमेंट करणारे कुणी नोकरी करत होते तर कुणी विद्यार्थी तर कुणी इतर ठिकाणी काही ना काही काम करत होते... अंशुल ने सोशल मीडिया चा आधार घेऊन ह्या गद्दारांची सर्व माहिती जमा केली अन तेथील लोकल पोलिसांना, कंपन्यांना तसेच कॉलेजांना ह्या अश्या लोकांवर लवकरात लवकर कार्यवाही करा नाहीतर मी ह्यावर लीगल नोटीस पाठवेल असे सांगितले✌️अन त्यावरूनच सर्वानाच कार्यवाही करावी लागली....कंपन्यांनीही अश्या लोकांना नोकरी वरून काढून टाकले, कॉलेज वाल्यांनी अश्या विद्यार्थ्यांना काढून टाकले...आज कितीतरी देशद्रोही लोकांना अंशुल मुळे अनेक कार्यवाहीना तोंड द्याव लागतं आहे तर काहींना आपली हातची नोकरी गमवावी लागत आहे.... जयपूर,बंगाल चे विद्यार्थी असो किव्वा राजस्थान च्या एका कॉलेज चे प्रिन्सिपल ह्या सर्व गद्दारांना अंशुल मुळे चांगलाच धडा भेटलाय.
अंशुल चा राग इथं पर्यंत शांत होणारा कसा असेल...त्याच दिवशी त्याने पाकिस्तानचे अनेक महत्वाचे पेज,वेबसाईट हॅक केले... त्यावर "हिंदुस्थान जिंदाबाद" लिहले ..काही पेज डिलीट ही केले....५० पेक्ष्या जास्त पेज त्याने हॅक केलेत ज्याची बातमी आपण ऐकलीच असेल...अंशुल ही दररोज होणाऱ्या कार्यवाही अन पाकिस्ताण्यांचा तळतळाट ह्याबाबत सर्व माहिती फेसबुक, ट्विटर वर देत असतो.
आज प्रत्येक पाकिस्तानी प्रेमी, जवानांवर मजाक बनवणारे सर्वच हिंदुस्थानि पाकिस्तान प्रेमी अंशुल मुळे घाबरत आहेत.
देशाबाहेरील धोक्यांवर आपली सेना तर आहेच पण खरा धोका त्या लोकांपासून आहे जे भारताच मीठ खाऊन भारताचीच गद्दारी करतात... त्याचे आत्ताचेच जिवंत उदाहरण म्हणजे पुलवामा हल्ला...ज्यात आपल्याच गद्दार लोकांमुळे आपण आपले वीर सुपूत्र गमावून बसलोय.
खरी तर आपली सर्वांची जवाबदारी आहे की आपल्या आसपासच्या सर्व पाक प्रेमी गद्दारांविरुद्ध ठोस पावले उचलले पाहिजे कारण आजचे दगड फेकणारेच उद्याचे बॉम्ब फेके होतात ह्यात दुमतच नाहीच....अंशुल थांबला नाहीये...३-४ दिवसातच फेसबुक पेजवर त्याचे माझ्यासारखे लाखो फॉलोवर्स झालेय... त्याच्याकडून पाक प्रेमींना झालेली अद्दल तो नेहमी आपल्या पेजवर टाकतोय... पाक प्रेम्यांचे ते पेज डिलीट व्हावे म्हणून खूप सारे रिपोर्ट येतायत...त्याच्या रिपोर्ट केलेल्या खूप साऱ्या पोस्ट फेसबुक कम्युनिटी ला डिलीट कराव्या लागत आहे...तरी पण रात्रीतून सोसिअल मीडियाचा किंग झालेला अंशुल न थकता पळतोय च अन सर्व देश द्रोह्यांमध्ये एक भीती तयार झाली की पुढचा नंबर माझा तर नाही ना?? अनेक पाक प्रेमी आपला आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट डिलीट करत आहे. काही तर अकाउंट बंद करून पळालेत. अंशुलच्या नजेरत येणाऱ्या एकही आक्षेपार्ह कमेंट वाल्यांना तो सोडणार नाहीये हे त्याने ठाणलयच... त्यामुळे कुणी हिंदुस्थानी पाकप्रेमी कुठे कमेंट द्यायलाही घाबरत आहेत....कारण फक्त #अंशुल_सक्सेना !
Please refer to today's news item. A vigilant bus conductor alerted police about a bomb like item planted in Karjat Apte bus, which turned to be an IED planted with serious object.
DeleteA common man can do a lot of things by remaining alert and cautious.
Remember the atmosphere in the local trains after 1993 Mumbai blasts. Everybody used to be very alert about unidentified objects.
भाऊ ,अगदी खरं आहे. आपल्या देशात जे बुद्धिवादी,विचारवंत,विकाऊ पत्रकार जे आधिच्या सरकारच्या मेहेरबानीने दिल्लीत ल्युटेन्स सारख्या भागात बंगले बळकाऊन बसले आहेत ते खरे घातक आहेत बाहेरील शत्रु पेक्षा यांच्यापासुन खरा धोका आहे.हे जे अस्तनीतले साप आहेत यांचा आधि कठोर पणे नायनाट केला पाहिजे.अजुनही काही मंडळी युद्ध हा ऊपाय नाही काश्मिर प्रश्न हा पाकिस्तान बरोबर चर्चेने सोडवला पाहिजे हा राग आळवत आहेत अशा लोकांना ऊघडे पाडले पाहिजे. आपल्या पुढील लेखाची वाट पाहतो.
ReplyDeleteBhau Salam tumhla, right
ReplyDeleteBhau, you are absolutely correct,
ReplyDeleteभाऊ, अती सुंदर लेख. तितकाच दुर्मिळ.असे विवेचन इंग्रजी भाषेत सुद्धा कोणत्याही निवृत्त सुरक्षा अधिकाऱ्यांनी लेखी किंवा मौखिक केले नाही. येथे बी. रामन यांची राहून राहून आठवण येते. अस्मादिक नेहमी मत व्यक्त करतात - 'फुकटात मिळालेले स्वातंत्र्य देशाला anarchy पातळीवर आणून ठेवते.' मोदी आहेत तो पर्यंत लोक उत्साही असतात मग नंतर आसवे गाळण्याकरीता सुद्धा उत्साह दाखवायला पुढे असणार. तरुणांची संख्या जास्त असणाऱ्या देशाला शिस्त दहा पैशाची पण नाही. उरुस भरवायचे निमित्त लागत नाही. त्यामुळे लेख वाचायचा आणि थंड बसायचे. निदान नागपूरवाल्यांनी मनावर घेतले पाहिजे. सगळ्यात मोदी वापरून त्यांचा चंद्रशेखर (फिरकी गोलंदाज) होण्याची भीती आहे.
ReplyDeleteसुशीलकुमार शिंदे : 1: बाटला हाऊस एन्काऊंटर मध्ये जे अतेरिकी/दहशतवादी मारले गेले, ते कळल्यावर सोनियाजींना रडू आले.
ReplyDelete2: हाफीज सईदजी.....(या देशाच्या गृहमंत्र्यांना काय आदर होता या दहशतवाद्याबद्दल)
दिग्विजय सिंग/ मुश्रीफ - 26/11 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान
ममता बॅनर्जी - पुलवामा हल्ला हा मोदींनी निवडणुकीच्या फायद्यासाठी घडवून आणला (काँग्रेस इकोसिस्टीम / डावे हेच म्हणतात)
सिद्धू : दहशतवाद्यांना देश नसतो (आधी फक्त धर्म नसायचा)
नॅशनल हेराल्ड : आदिल दार क्रिकेट वेडा आणि धोनीचा चाहता होता
ReplyDeleteइंडिया टुडे : सब्जार भट (बुऱ्हाण वाणी चा साथीदार) हा प्रेम प्रकरणात अपयश आल्यामुळे हिजबुल मुजाहिदिन मध्ये सामील झाला
The Quint : On Osama's sixth death anniversary , we take a look at his roles as a father and a husband. (बहुतेक या लादेन पेक्षा प्रेमळ बाप जगात झाला नसावा )
निधी सेठी (NDTV ): Where a grisly 44 has been proven to be greater than the mythical 56 #HowstheJaish. (या बाईंचे फक्त दोन आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. म्हणजे परत मुक्ताफळे उधळायला बाई मोकळ्या . बहुतेक NDTV मध्ये हीच पात्रता असावी. ही वृत्तवाहिनी अशाच गोष्टींसाठी प्रसिध्द आहे )
टाइम्स ऑफ इंडिया : Govt blames Pak after local youth rams CRPF convoy with IED-packed SUV in worst-ever J&K terror Strike ( हेच वृत्तपत्र दहा पंधरा शिवसैनिकांनी यांच्या ऑफिस समोर येऊन घोषणा दिल्या की लोकशाही धोक्यात आली म्हणून आकांडतांडव करत असते)
THE RIGGED AND CORRUPT MEDIA IS THE TRUE ENEMY OF THE PEOPLE!
ReplyDeleteएक वकील आहेत, जे Member Collegium- Bar Asso. of All Courts of India आहेत.
ReplyDeleteत्यांच्या म्हणण्यानुसार : कश्मीर में मरने वाले जवानों मे १ भी ब्राम्हण नही है।
Agree
ReplyDeleteकित्येक दशके दहशतवादाला धर्म नसतो हे ऐकत आलो आहोत, पत्रकारितेचा नीच कळस द कारवा नी दाखवून दिला.
ReplyDeleteट्विटर हॅन्डल : @thecaravanindia
The CRPF jawans who were killed in the #PulwamaAttack were predominantly lower-caste. Only five out of 40 jawans, or 12.5 percent, came from Hindu upper-caste families.
https://twitter.com/thecaravanindia/status/1098439671107837952
काय म्हणावे असल्या पत्रकारितेला ??
तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे. असे लिहीणाऱ्या सर्व हलकटांची चौकशी व्हायला हवी. याना परदेशातून पैसे येत असणार.
Deleteशंभर टक्के खरं
ReplyDeleteमर्मावर बोट ठेवलेत भाऊ 🙏🏻
ReplyDelete