Sunday, February 5, 2012

कार्यकर्त्याचा जाहिरनामा


आयुष्याच्या संध्याकाळी बाबा म्हणाले
सांजवात लाव, आईपुढे अंधारले
तेव्हा मशाल होती माझ्या हातात
रस्त्यावरच्या काळोखात
नगरपालिकेचे दिवे वाकूनच उभे होते
ठिबकणार‘या निळ्या प्रकाशात
समाजाचे जिवंत कलेवर चालतच होते
उंबरठ्याने मशाल ओलांडली
माझी सावली रस्ता भरून चालू लागली
बिचकली क्षुल्लक माणसे
सावल्या माझ्यात मिसळल्या
उगाच वाटले काळोखात
सावलीने मशाली उजळल्या
उगाच उर्मी उसळल्या यज्ञात उडी घ्यायला
त्यातच जळणारया समीधेची एक ज्वाला व्हायला
पण यज्ञाला हवा बळी आणि सतीला हवी चिता
समजायला उशीर झाला, मशाल विझली आता