सुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गेल्या लोकसभेत जिंकणे इतके अवघड झाले होते, की पित्याला कन्येसाठी नरेंद्र मोदींना बारामतीत प्रचाराला येऊ नका, अशी गळ घालावी लागली होती. मोदींनीही पवारांना अभय दिले आणि म्हणून आज सुप्रिया सुळे संसदेत दिसू शकत आहेत. कारण निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच सर्वात कमी फ़रकाने बारामतीत कुणा पवारांना यश टिकवावे लागलेले आहे. अशी आपली अवस्था कशामुळे झाली, त्याचा विचार अजून शरद पवार करायला तयार नाहीत, तर त्यांची कन्या कशाला करील? त्यापेक्षा नित्यनेमाने तोंडाची वाफ़ दवडण्याला त्यांनी प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. मग अशी वाफ़ भाजपावर सोडली जाते तर कधी ती शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोडली जात असते. योगायोग असा, की गेल्या वर्षी पित्याने जे उद्गार काढले; त्याच दिव़शी यंदा सुप्रियाताईंना शिवसेनेची महत्ता आठवली आहे. पुर्वीची किंवा बाळासाहेबांची शिवसेना कशी महान होती आणि आजची सेना कशी लेचीपेची झाली आहे; त्याचे किर्तन करण्यात या बापलेकींची वाचा थकत नाही. पण अशी इतरांची कुंडली मांडून भवितव्य सांगण्यापेक्षा सुप्रियाताईंनी आपला भूतकाळ व भविष्याची चिंता करायला काय हरकत आहे? किमान आपल्या वर्तमानाची तरी थोडीफ़र फ़िकीर करावी ना? नाव सुळे आहे म्हणून खायचे दात लपवलेच पाहिजेत, अशी सक्ती नसते सुप्रियाताई! अजून महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वा देवेंद्र फ़डणवीस यांची परिक्षा घेऊन उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुळे मॅडमवर कोणी सोपवलेले नाही. पण खुमखुमी त्यांना गप्प बसू देत नसेल, तर ताईंनी तरी दुसरे काय करावे? दात लपवले तरी सुळे दिसणारच ना?
विदर्भात ताई संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी कोणाशी संवाद साधला ते माहित नाही. पण संवाद दौरा संपल्यावर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलेले आहे. राज्याचा मुख्यमंत्री ‘ढ’ विद्यार्थी असल्याचे प्रमाणपत्र ताईंनी देऊन टाकलेले आहे. सध्या विविध परिक्षांच्या निकालाचे दिवस असल्याने ताईंनाही निकाल लावण्याचा मोह झाल्यास नवल नाही. म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय काढला. त्यांच्या मते राज्याचा मुख्यमंत्री सलग तीन वर्षे एकाच वर्गात कायम आहे आणि अभ्यासच करत बसला आहे. त्यामुळे त्याला ढ संबोधण्याखेरीज ताईंना पर्याय उरला नाही. एकाच वर्गात म्हण्जे नेमके काय, तेही ताईंनी सांगितले असते तर खुप बरे झाले असते. अर्थात विविध विषयांवर निर्णय घेण्यापुर्वी फ़डणवीस अभ्यास करू असे सांगतात, त्यामुळे ताईंना मुख्यमंत्र्यांची परिक्षा घेण्याचा अनावर मोह झालेला असावा. म्हणून मग अभ्यास आणि परिक्षा अशी सुसंगत शब्दावली त्यांनी वापरलेली असावी. पण एकाच वर्गात म्हणजे काय? सुप्रियाताईंना आपले पिताजी पाव शतकापासून पंतप्रधान पदाच्या परिक्षेला बसत राहिल्याचे ठाऊकच नाही काय? १९९१ सालात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडून देशाच्या पंतप्रधान पदाची परिक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली होती. त्यांचा अभ्यास अजून संपलेला नाही. परिक्षा किती दिल्या वा कोणते पेपर्स कोणी तपासले, तेही ठाऊक नाही. पण अजून पिताश्री ‘ज्येष्ठ नेते’ नामक एकाच वर्गात बसून आहेत. कोणी त्यांना वरच्या वर्गात पाठवत नाही की खालच्या वर्गातही जायला फ़र्मावत नाही. तेही जागचे हलायला राजी नाहीत. मग अशा अभ्यासू विद्यार्थ्याविषयी ताईंचे मूल्यांकन काय आहे? तीन वर्षे एकाच वर्गात बसलेला विद्यार्थी ‘ढ’ असेल, तर पंचवीस वर्षे एकाच बाकावर बसलेला विद्यार्थी, कुठल्या श्रेणीतला असेल हो सुप्रियाताई?
देशात दोनच व्यक्ती सुखी आहेत आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहा असाही शेरा सुप्रियाताईंनी मारलेला आहे. त्यांच्या मते बाकी देशात कोणीही सुखी नाही. अर्थात त्यांचे दु:ख यातून लक्षात येऊ शकते. ताईंचा दादा खरेच पुणे पिंपरी चिंचवडच्या मूठभर लोकांना सुखी करू शकला असता, तर त्या दोन महानगरातील लोक दादांच्या विरोधात प्रगतीपुस्तक घेऊन मतदानाला कशाला घराबाहेर पडले असते? बाकीच्या गोष्टी सोडून द्या. दादांचे काय करायचे? त्यांनी किती वर्षे कुठल्या वर्गात काढली आहेत? कुठल्या परिक्षा दिल्या आहेत आणि किती कॉपी केली आहे? सध्या त्यांचे ‘पेपर्स’ एसीबीकडे तपासायचे पडून आहेत. त्यांनी सोडवलेली गणिते इतकी गुंतागुंतीची आहेत, की त्यांचे मॉडरेशन करण्यासाठी अखेरीस सक्तवसुली संचालनालयाला पुढे यावे लागलेले आहे. त्याविषयी ताईंना पत्ताच नसेल काय? विदर्भ किंवा अन्यत्र कुठे संवाद करायला जाण्यापुर्वी ताईंनी जरा दादाशीच संवाद केला असता, तर त्यांना उद्धव किंवा देवेंद्रापेक्षाही आपल्या दादांचे ‘पेपर्स’ कठीण गेल्याची जाणिव झाली असती ना? पण ताईंची गोष्ट वेगळी! त्या बारामतीच्या असल्याने त्यांना कधी अभ्यास करावा लागला नाही, की परिक्षा द्यावी लागलेली नाही. वर्गात बसावे लागले नाही की कॉपी करावी लागली नाही. थेट शाळेत मास्तरकीचा हुद्दा मिळू शकला आहे. बिचार्या देवेंद्राचे नशीब इतके कुठे होते? त्याला बालवर्गापासून प्रत्येक वर्षी अभ्यास वा परिक्षा द्यावी लागली आहे. वर्गात बसावे लागलेले आहे. त्यामुळे त्याला ‘ढ’ म्हणायची सुविधा आहे. ज्यांनी कधी अभ्यास केला नाही वा परिक्षाही दिल्या नाहीत, त्यांचे काय? जन्माला येताच ज्यांना लोकमताची गुणवत्ता आपोआप प्राप्त होते, त्यांचा वर्ग कुठला असतो ताई? नशीब देवेंद्र एकाच वर्गात बसून आहेत तीन वर्षे! म्हणून अजून मंत्रालय शाबूत आहे. दादा असते तर दुसर्यांदा तिथे आग लागली असती ना?
सुप्रियाताईंना जुनी शिवसेना कशी रुबाबदार होती, तेही आठवले आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु असल्याचा शोध लागला आहे. आणि यु-टर्न असतो, तेही नव्याने उमजलेले आहे. पण यु-टर्न ही पिताश्रींची ऐतिहासिक राजकीय भूमिका राहिल्याचे ताईंना अजून उमजलेले नाही. ज्या पक्षाच्या खासदार म्हणून सुप्रियाताई मिरवतात, त्या पक्षाची स्थापना कशासाठी व कोणत्या तत्वावर झाली, ते ठाऊक आहे ताई? सोनिया गांधी परदेशी जन्माच्या आहेत, म्हणून पिताश्री कॉग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. पण अवघ्या काही महिन्यात त्यांनी त्याच सोनियांशी हातमिळवणी करून राज्यातली सत्ता बळकावली होती. त्या वळणाला काय म्हणतात हो ताई? पुढे पाच वर्षांनी त्याच कॉग्रेससोबत राज्यात जागावाटप व सत्तावाटप करण्यात काकापुतण्याची दहा वर्षे गेली, त्याला कुठला टर्न म्हणतात? बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा धाक वाटायचा, कारण ते बोलतील ते कृतीतून करून दाखवत होते, असेही ताई अगत्याने सांगतात. तसे अनेक नेते आहेत देशात व राज्यात. बोले तैसा चाले, अशा नेत्यांची टंचाई नाही. मग सुप्रियाताईंना त्याचे कौतुक कशाला? पिताश्रींनी कधी बोलले ते शब्द खरे करून दाखवले नाहीत ना? विधानसभेचे निकाल लागले तेव्हा विनाविलंब भाजपाला पाठींबा दिला आणि महिनाभरात सरकार चालवणे आपली जबाबदारी नाही म्हणून झटकून टाकले. असे पिताश्री नशिबी आले, मग ताईंना बाळासाहेबांचे कौतुक वाटणे स्वाभाविकच आहे. आज वाघाची शेळी झाली असे सांगण्यापुर्वी आपल्या पक्षाची दुरावस्था कशाला झाली, त्याचेही वर्णन करायचे होते. निदान अभ्यास तरी करायचा होता. पण चावायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असले; मग असेच व्हायचे. देवेंद्र वा उद्धव यांची फ़िकीर करू नका, सुप्रियाताई! त्या गजाआड पडलेल्या छगनरावांना बाहेर कसे काढता येईल, त्याच जरा विचार करा. बाळासाहेबांच्या त्या वाघाला पिताश्रींच्या सहवासात बळीचा बकरा का व्हावे लागले, त्याचा खुलासा केलात तर अधिक बरे होईल.
कृष्णाजी भास्कर मध्यावधी निवडणुकांसाठी जागवलेला आहे. गेल्या वेळी साई बाबा उकरून काढले होते तसेच.
ReplyDeleteApratim lekh ahe. Maharashtra Che "Laloo Yadav" family ahe hi.
ReplyDeleteApan jara baramatila ya yathil zaleli vikas kame paha va mhana ki yadav family ahey mhanun...
Deleteमस्तच भाउ.वडिलांच्या जीवावर निवडुन आलेल्याची जीभ फार घसरते.राहुल नाही का तसाच.सुळेबाइ म्हने कार्यकरत्यात पन नीट मिसळत नाहित संपर्क कला नाहीय.दादांना आहे पन त्यांचे वेगळे प्रकार आहेत त्यामुळ देवेन्द्र ची चिंता करु नका नी उद्धवचीपन शिवसेना शाबुत आहे अजुन .तुमच काय?
ReplyDeleteझणझणित लिहिलंत भाऊ! खूपच छान! आवडलं!
ReplyDeleteहा हा हा हा । भाऊ एकच नंबर हो। सभ्य शब्दात वर्णन करून समोरच्याची कशी फाडून टाकायची ते आपणाकडून शिकावे । लय भारी लेख । एकदम माहोल....
ReplyDeleteजाम आवडला आपल्याला ।
बाळासाहेबांच्या त्या वाघाला पिताश्रींच्या सहवासात बळीचा बकरा का व्हावे लागले, त्याचा खुलासा केलात तर अधिक बरे होईल.
ReplyDeleteअप्रतिम शेवट!
मी सांगतो.
Deleteकुणीतरी सत्य सांगायला हवे ।एक अप्रतिम लेख ।
Deleteखरमरीत
ReplyDeleteThe irony is mody & pawar both were state level chief ministers, mody had a bad patch of गोधरा incident & Gujrath riots there after, in spite of all these odds, he succeed in becoming p.m. Where as sharad pawar miserably failed.
ReplyDeleteसुप्रिया ताई ह्या त्यांच्या परमप्रिय दादांच्या वाणी बद्दल अनभिज्ञ आहेत बहुतेक...
ReplyDelete"धरणात पाणी नाही तर काय ..... का ?"
राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या काळात ह्यांच्या मते सगळं रामराज्य चालू होत...
Ek number...Lay bhari...I really enjoyed on her thinking... swatache thevayche zakun dusryache pahayche vakun
ReplyDeleteMast lekh lihla aahe tumhi sir
ReplyDeleteSharad pawar should retire from public life.
ReplyDeleteHe had similarities compared मोदी, both were chief ministers for couple of years, pawar was in central ministry also, modi had no national image/presence as such, but had a black spot by way Godhra riots, in spite of such odds, he had a Mr. Clean/non corrupt image
He succeeded in becoming a vibrant image asp. P.M. Whereas pawar miserably failed, now he is engaged in leading anti brahmin campaign.
Cant compare modi with pawar...modi has very high credentials. Modi served as CM of Gujrat for 3 full terms and ensured BJPs resounding victory in every election. In a PM role also he is highly successful while pawar is always happy doing caste based regional politics and releasing controversial statements. Pawar family has already lost all their credibility though their deeds in last so many yrs. Actuay they did nothing except garnering hugh money using different avenues.
Deleteइतिहास
ReplyDeleteएका कृष्णा कुलकर्णया मुळे जर अवघा ब्राह्मण समाज बदनाम होत असेल तर खालील माहिती पण वाचा. मी कोणत्याही समाजाचा द्वेषी नाही पण हल्ली ब्राह्मण समाजावर अश्लाघ्य टीका बघून काही नावं आठवण करून द्यावं वाटली.
शहाजी राजेंच्या भावाला ज्यांनी मारलं व खुद्द शहाजी राजेंच्या जीवावर उठले ते जाधव मराठे होते.
रांझा चा पाटील ज्याचा चौरंग्या महाराजांनि केला तो पाटील मराठा होता.
जावली चे मोरे ज्यांनी महाराजांच्या उपकारांना विसरून महाराजां सोबत गद्दारी केली ते मोरे मराठे होते.
अनेक सरदार ज्यांनी महाराजांना स्वराज्या साठी विरोध केला ते मराठे होते.
छत्रपती संभाजी राजे जन्माला आले व राणी साहेब सईबाईंना बाळांत रोग झाला, संभाजी राजेंना दूध पाजायला दाई ठेवावी लागली पण एकाही सावत्र आईने दूध पाजलं नाही त्या स्त्रिया मराठा होत्या.
संभाजी राजेंना ज्याने पकडून औरंगजेबाच्या ताब्यात दिलं तो छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गुणोजी शिर्के मराठा होता.
इतके मराठे नाव असतांना आम्हाला फक्त आठवतो कृष्णा कुलकर्णी कारण त्यांची जात ब्राह्मण होती.
छत्रपती संभाजी राजें सोबत शेवटच्या श्वासा पर्यन्त जो होता तो कविकलश ब्राह्मण होता हे विसरतो आपण.
आताच एक अफझल खान च पिल्लू बरळल की अफझल खान त्याच्या राज्यविस्तरा साठी आला होता, माझा त्या त्या ला प्रश्न आहे ..
अफझल खानाच्या राज्यविस्ताराच्या मनिषे मध्ये जर राजेंचा बळी गेला असता तर चाललं असत का रे भाऊ तुला??
अफझल खान जर त्याच्या धर्माच्या प्रचारा साठी नव्हता आला तर त्याने तुळजापूर आणि पंढरपूर वर आक्रमण का केलं ?पण तुला त्याच का जित्या तुला मतांशी घेणे देणे आहे .
एक ब्राह्मण मुख्यमंत्री बनला आणि सर्वांना त्यांची जात दिसायला लागली आजवर पुरोगामी म्हणवून घेणारे सांगू लागले. ब्राह्मणांच्या मंत्र पाठ असतात, काहींनी ज्योतिष सेंटर उघडायला सांगितलं, महाराष्ट्रात पेशवाई आली आणखी बरच आणि वरून म्हणतात की आम्ही जातीच राजकारण करत नाही . अरे घड्याळी चिंच नाही सगळे काटे बंद पडले तरी जातीच राजकारण सोडलं नाही तुम्ही.
आज साहेबांना सुचलं म्हणे महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते. इथे गोब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे साहेब जे की तुम्ही कधीच करणार नाही, गो म्हणजे गाय आणि गाय ही अति गरीब प्राणी म्हणून ओळखल्या जाते. त्या सोबत ब्राह्मण हा शब्द जाती चा उल्लेख करतोच पण त्या काळात ब्राह्मण म्हणजे विदवता असा सुद्धा होता म्हणून गरीब आणि विद्वानांचे रक्षण करणांरे असे "गोब्राह्मण प्रतिपालक" होते पण तुम्ही ते समजून नाही घेणार.
आणि कुलकरण्या च नाव घेतांना जाणून बुजून घेतलेला स्वल्पविराम तुमच्या मनात जातीय वाद आहे की नाही हे पोचलं आमच्या पर्यन्त .
म्हणे एका विशिष्ट समाजाने आज वर अनेक पिढ्याना चुकीचा इतिहास शिकवला तो चुकीचा इतिहास होता तर साहेब गेली पन्नास वर्षे तुम्ही ते सहन कस केलं , असं विचारू नये तुमचं वय बघून पण आज विचारावं वाटते "इतकी वर्षे तुम्ही गोट्या खेळत होता का????"
Bara zala bolalas mitra !
Deleteदणदणीत व सणसणीत..
Deleteकोणी sangel ka मोरे नी काय गद्दारी केली.....
Deleteयांचा ईतिहास खूपच अभ्यास पूर्ण आहे... पण मोरे यांनी काय गद्दारी केली हे कोणाला देखील माहित नाही.....ज्यानी 160 वर्ष राज्य एका प्रदेशा वर केले त्या बाददल यांना काहीच माहित नाही.
Deleteजावळीचे खोरे मोऱ्यांना मिळाले महाराजांमुळे अन त्यांनी नंतर वेळेला महाराजांनाच सहकार्य करायला नकार दिला.
Deleteआजकाल छत्रपती संभाजी सिरीयल मध्ये पण हेच चालू आहे. सगळा दोष ब्राम्हनांवर टाकून मोकळे. त्या सिरीयल मध्ये तर संभाजी महाराजाचे खरे शौर्य ना दाखवता संभाजी महाराजांचे त्यांच्या बायकोबरोबरचे म्हणजेच येसूबाई बरोबरचे संभाषणं जास्त दाखवले आहे. खरच जर हि सिरींयल संभाजी महाराजांनी बघितली तर त्यांनादेखील हसावे कि रडावे असा प्रश्नच पडेल.
Deleteमुंडदाजी छान लिहिलं आहे आपण...
Deleteसगळे छान लिहिले आहे फक्त एक बाब सोडून. संभाजी महाराजांना दूध आई लावावी लागली पण त्यांच्या कुठल्याही आईने दूध पाजले नाही असे तुम्ही लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरता आहात की तोपर्यंत इतर राण्यांना मुले नव्हती आणि मूल नाही म्हणजे दूध पण येत नाही.������
Deleteललितजी
Deleteआपण खूपच छान लिहिले आहे.
अगदी माझ्या मनातले लिहिले आहे
खूप खूप धन्यवाद
अनिल मेहेंदळे
DeleteVery nice article. Parakhad mat! You are awesome writer.
ReplyDeleteभाऊ एक चूक केलीत "यावेळी मंत्रालय जळले नसते तर ते वाहुन गेले असते " असा शब्द प्रयोग योग्य ठरला असता अस मला वाटत
ReplyDeleteWa,Sal kadhlit Taincha IQ Vadhyla Madat Hoil
ReplyDeleteभाऊ.. Ha ब्लॉग वाचून प्रतिक्रिया कळवा..
ReplyDeletehttp://kahitariasech.blogspot.in/2017/06/blog-post.html?m=1
True Bhau. भाऊ योग्य त्या शब्दात समज दिली. शेवट तर फार आवडला. "बाळासाहेबांच्या त्या वाघाला पिताश्रींच्या सहवासात बळीचा बकरा का व्हावे लागले, त्याचा खुलासा केलात तर अधिक बरे होईल."
ReplyDeleteKadakch
ReplyDeleteVery nice.....bhau
ReplyDeleteभाऊंची लेखणी म्हणजे ठेवणीतली तलवार आहे शब्दांचे सपासप वार होतात ,ज्याच्यावर वार होतात तो एकदम गार पडून राहातो प्रत्युत्तर द्यायला तोंडच उघडणार नाही.......
ReplyDeleteभाऊ बरोबर ताईंंच्या सुळ्याला हात घातलात हे सगळेजण सध्या महाराष्ट्रात फार अजारजक माजल्याचा कांंगावा करण्यात सरसावलेले आहेत....कारण थोरल्या साहेबांंचा हा जुना खेळ परत चालु झालाय..या जुन्याच झोपाळ्यावर ताईही झुलालयला लागल्यात पण झालय कसंं हा झोपाळा आता झालाय जुना त्याच्या सगळ्या साखळ्या गंंजुन गंंजुन कुरकुरून तुटण्याच्या अवस्थेपर्यंंत आल्यात आता त्यात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता जवळपास संंपलेली आहे...पण यातुनसुद्धा थो.साहेब हा तुटका झोपाळा सत्ताधारी पक्षाच्या डोक्यावर कसा पडेल आणी त्यासाठी किती मोठा "झोका" घ्यावा लागेल "याच कृृती संंबधीची"तजवीज करण्यात गुंंतलेले दिसतायत....
ReplyDeleteअसो.... भाऊ आपलंं लिखाण जबरस्तच असतंं हे वाचुन वाचुन आम्हाला प्रेरणा नक्किच मिळते...म्हणुन हा लेखनाचा ऊपद्व्याप.....धन्यवाद...!
भाऊ बरोबर ताईंंच्या सुळ्याला हात घातलात हे सगळेजण सध्या महाराष्ट्रात फार अजारजक माजल्याचा कांंगावा करण्यात सरसावलेले आहेत....कारण थोरल्या साहेबांंचा हा जुना खेळ परत चालु झालाय..या जुन्याच झोपाळ्यावर ताईही झुलालयला लागल्यात पण झालय कसंं हा झोपाळा आता झालाय जुना त्याच्या सगळ्या साखळ्या गंंजुन गंंजुन कुरकुरून तुटण्याच्या अवस्थेपर्यंंत आल्यात आता त्यात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता जवळपास संंपलेली आहे...पण यातुनसुद्धा थो.साहेब हा तुटका झोपाळा सत्ताधारी पक्षाच्या डोक्यावर कसा पडेल आणी त्यासाठी किती मोठा "झोका" घ्यावा लागेल "याच कृृती संंबधीची"तजवीज करण्यात गुंंतलेले दिसतायत....
ReplyDeleteअसो.... भाऊ आपलंं लिखाण जबरस्तच असतंं हे वाचुन वाचुन आम्हाला प्रेरणा नक्किच मिळते...म्हणुन हा लेखनाचा ऊपद्व्याप.....धन्यवाद...!
तूफ़ान हानलय भाऊ ....
ReplyDeleteBest answer!
ReplyDeleteBhau ekdum mast lihilay.Nirbhid lekhan.
ReplyDeleteभाऊ साहेबांचं लिखाण नेहमीच जबर असतं.हे जास्तीत जास्त शेअर करता आलं पाहिजे.प्रत्येक
ReplyDeleteमाणसापर्यंत हे पोहोचलं पाहिजे.
कृष्णाजी भास्कर हा खानाच्या नोकरीत होता तो मिठाला जागला, पण फ़ितूर होऊन महाराणी येसूबाई आणि
ReplyDeleteशाहूंना शत्रूच्या ताब्यात देणार्या पिसाळाचं काय?
भाऊ, जबरदस्त लेखणी....
ReplyDeleteअजित पवारांचा धरणाचा किस्सा झाला, त्या दिवशीची गोष्ट...
ReplyDeleteमित्राचे काका औरंगाबादला आमदार आहेत. मित्र फोनवर त्यांना म्हणाला, हे किती चुकीचं आहे?? पण पुढच्या वेळी परत हेच कारभारी म्हणून डोक्यावर बसणार...
काका म्हणाले, बेटा, सियासती मामले में अगर आपको आपकें कही बात पर माफ़ी मांगनी पडे,तों समझ लेंना तुम्हारे बुरे दिन शुरु हो गये...
तेव्हा विश्वास नव्हता की याचं उत्तर मिळेल...
पण उत्तर दिलं गेलं!
इंग्रजीत एक म्हण आहे
ReplyDeletePOWER CORRUPTS,
AND
ABSOLUTE POWER CORRUPTS ABSOLUTELY...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा 15 वर्षांचा कारभार त्याचा पुरावा आहे.
शरद पवारांच्या नावात 'S' आहे, सोयीनुसार वेडीवाकडी वळणे व लागोपाठ 'यू' टर्न
ReplyDeletetumcha navat pn 'S' ahech ki
Deleteपवारांच्या नावात कुठेच U नाही,
Deleteकदाचीत त्यामुळेच U आवडता आहे.
"उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु असल्याचा शोध लागला आहे. आणि यु-टर्न असतो, तेही नव्याने उमजलेले आहे. पण यु-टर्न ही पिताश्रींची ऐतिहासिक राजकीय भूमिका राहिल्याचे ताईंना अजून उमजलेले नाही. ज्या पक्षाच्या खासदार म्हणून सुप्रियाताई मिरवतात, त्या पक्षाची स्थापना कशासाठी व कोणत्या तत्वावर झाली, ते ठाऊक आहे ताई? सोनिया गांधी परदेशी जन्माच्या आहेत, म्हणून पिताश्री कॉग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. पण अवघ्या काही महिन्यात त्यांनी त्याच सोनियांशी हातमिळवणी करून राज्यातली सत्ता बळकावली होती. त्या वळणाला काय म्हणतात हो ताई?"
ReplyDeleteत्याला 'S' टर्न म्हणता येईल नाही?
दोन 'U' सामावलेत !!!
सणसणित, भाऊ!
ReplyDeleteSarcasm at its best
ReplyDeleteते मनात म्हणत असतील
ReplyDeleteतलवार परवडेल पण भाऊंची लेखणी नको च,
भाऊ तुम्ही अत्रे किंवा परुळेकर यांचा जाज्वल्य वारसा जपलाय,
पण मी अत्रे किंवा परुळेकर बघितले नाहीत आणि पण मला चांगला आठवतोय, सकाळ पवारांनी टेकओव्हर करण्या अगोदर चा