Friday, February 22, 2019

तो नुसता गणवेश नाही रे

Sachin Tendulkar

सचिन,

होय आज नुसते सचिन लिहावेसे वाटले. अलिकडे प्रिय वगैरे शब्द लिहायची हिंमतच झाली नाही. कशी होणार? तुझ्या बोलण्यातून आणि वागण्यातून तू तशी हिंमत कोणा भारतीयात जागवलीसच नाही ना? भारतीय सेनादलाचे अंग असलेल्या हवाई दलाने तुला ग्रुप कॅप्टन असा सन्माननीय हुद्दा दिला, आपला ब्रान्ड अम्बॅसेडर बनवलेले होते. तेव्हा तू अंगावर चढवलेला गणवेश कुठल्या आयपीएल संघाचा गणवेश नाही रे. आज भारतीय संघाकडून खेळताना निळ्या रंगाची जर्सी परिधान करावी आणि उद्या मुंबई इंडियन्सच्या संघातर्फ़े खेळताना त्यापेक्षा वेगळ्याच रंगसंगतीची जर्सी परिधान करावी; इतका तो हवाई दलाचा गणवेश स्वस्त नसतो रे सचिन! त्या गणवेशाला परिधान केल्यावर देशाचा सैनिक आपल्या घरकुटुंब किंवा सग्यासोयर्‍यांना विसरून फ़क्त देशाचा विचार करतो. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतो. आणि तू विश्वचषकाच्या स्पर्धेतल्या दोन गुणांसाठी बोलतोस? एका क्षुल्लक पैशाच्या खेळातले गुण आणि देशाची इभ्रत, यातला फ़रक कधी कळला कारे तुला? एका स्पर्धेतले गुण देशापेक्षा मोठे नसतात आणि अशा कित्येक स्पर्धा देशाच्या अस्तित्वासाठी व तिरंग्यासाठी ओवाळून टाकायचे म्हणून शेकडो हजारो जवान आपल्या अंगावर असा गणवेश चढवत असतात. तुझ्यासारखा प्रत्येक स्पर्धा वा सामान्यानुसार त्यांच्या अंगावरचा गणवेश बदलत नसतो. त्या गणवेशामागे लाखो लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यांना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षाही छोटा किंवा कुठलेही विक्रम आपल्या खात्यात नोंद नसलेला तो हरभजन सिंग, मोठा म्हणायची पाळी आणलीस. त्याला पुलवामा घडल्यानंतर काही तासाचा विलंब लागला नाही, विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करायला. आणि तू सचिन, चार दिवस उलटून गेल्यावर पाकिस्तानला दोन गुण द्यायचे काय, म्हणून विचारतोस? कुणाच्या कसल्या उपकाराची ओशाळवाणी परतफ़ेड करतो आहेस?

पुढल्या जुनमध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा व्हायची आहे आणि यापुर्वीची तिथली स्पर्धा झाली, तेव्हाची एक घटना आठवते सचिन तुला? तू त्याच स्पर्धेत सहभागी व्हायला गेला होतास आणि अकस्मात इथे तुझ्या जन्मदात्या रमेश तेंडूलकरांचे आकस्मिक निधन झाले. अवघा देश तेव्हा हळहळला होता. स्पर्धा बाजूला ठेवून सचिन तुही पित्याच्या अंत्यदर्शन व अंत्यविधीसाठी मायदेशी परतला होतास. अश्रूपुर्ण डोळ्यांनी माघारी आलेल्या तुला टिव्हीच्या पडद्यावर बघताना करोडो भारतीयांचे डोळेही पाणावलेले होते. त्याहीपेक्षा त्यानंतर पुन्हा लगेच स्पर्धेत भाग घ्यायला व भारताच्या वतीने खेळातली लढाई करायला निघालेल्या लढवय्यासारख्या तुला बघूनही, अनेक भारतीयांचा ऊर भरून आला होता. तेव्हा तू हवाई दलाचा कोणी प्रतिनिधी नव्हतास किंवा तो गणवेशही अंगावर चढवलेला नव्हतास. पण प्रत्येक भारतीयाला तो सचिन योद्धाच वाटला होता. आज तू क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस आणि आजवर देशासाठी खुप खेळलेला आहेस. आज तुझ्याकडून खेळाची अपेक्षा कोणी करीत नाही. पण अशी कसोटीची वेळ येते, तेव्हा धारातिर्थी पडलेल्यांसाठी तितक्याच आवेगाने डोळ्यात अश्रू आणण्याची अपेक्षा लोकांनी केलेली असते रे! तो अंगावर शोभेसाठी जो गणवेश चढवतोस ना? तो परिधान करणारा सैनिक आपल्या सोबत्याचा मृत्यू झाल्यावरही माघार घेत नाही, की नुकसानाचा विचार करत नाही. तर पुढेच सरसावत असतो. दोन गुण जातील वा कुठली हानी होईल ,याची फ़िकीर करीत नसतो. कारण ती कसोटीची वेळ असते. ते भान हरभजन, लक्ष्मण वा गांगुलीने दाखवले. त्यांनी कधी हवाईदल वा सेनादलाचा गणवेशही अंगावर चढवलेला नाही. पण हा क्षण देशाच्या इज्जतीचा व प्रतिष्ठेचा आहे, याचे भान त्यांना आहे आणि तुला नाही. हे बघून मनाला यातना झाल्या. म्हणून प्रिय असा शब्द तुझ्या नावाच्या अलिकडे लिहायची हिंमतही झाली नाही.

अंगावऱचा गणवेश विसरला़स सचिन, पण कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करतानाचा पहिला अनुभवही विसरून गेलास? आठवते तुला, तेव्हा सोळा सतरा वर्षाचा सचिन पाकिस्तानच्या भूमीवर आणि स्टेडियमवर होता आणि चहूकडून कोवळा पोर म्हणून तुझी खिल्ली उडवली जात होती. अब्दुल कादिर किंवा अशा़च कुणा पाक बोलरच्या भेदक फ़ेकीने तुझे नाक रक्तबंबाळ झालेले होते. सहकार्‍यांनी व खेळपट्टीवर आलेल्या डॉक्टरने तुला तात्पुरता निवृत्त होऊन तंबूत जायला सांगितले होते. पण सल्ला झुगारून तू तिथे पाय रोवून उभा राहिलास. त्याच पाकिस्तानच्या गोलंदाजीला फ़ोडून काढत आपले भारतीयत्व पाकच्या गर्जणार्‍या जमावाला दाखवून दिलेले होतेस. तीस वर्षे होतील, त्या प्रसंगाला आता. प्रत्येक भारतीयाच्या मनावर तो प्रसंग जसाच्या तसा कोरला गेला. तो त्या कसोटीच्या प्रसंगी तूच दाखवलेल्या धैर्यामुळे. आज तुलाच तो प्रसंग आठवलेला नाही? तेव्हा तू तसाच रक्तबंबाळ होऊन माघारी आला असतास आणि तर विश्रांती घेऊन नंतर खुप चांगली फ़लंदाजी करू शकला असतास. पण तू तिथेच थांबलास आणि पुढल्याच चेंडूवर सणसणित फ़टका मारून पाकिस्तानी आक्रमणाला तिथेच चोख उत्तर दिले होतेस. तेव्हा तुला मलमपट्टी वा अन्य काही ‘गुण’कारी औषधांची गरज वाटली नव्हती. कोट्यवधी भारतीयांचा योद्धा म्हणून तू पुढेच गेलास. कित्येक लाख भारतीय जवानांना तेव्हा तू त्यांच्यातलाच एक लढवय्या वाटला होतास. त्यासाठीच तुझ्यावर अवघा भारत प्रेम करू लागला. त्या पहिल्या डावात तू केलेल्या धावा किंवा एकूण २३ वर्षात काढलेली शंभर शतके कोणी मोजली नाहीत. त्या हजारो धावा किंवा त्यातले गुण हिशोबात धरले जात नाहीत. त्या पहिल्या डावाच्या कसोटीच्या प्रसंगी ती तू ठाम उभा राहिलास ना सचिन, तो सचिन आज कुठेतरी हरवल्याचे दु:ख आहे. भारतरत्न किंवा तशा़च कुठल्या पुरस्काराची किंमत मोजतोयस कारे?

युपीएच्या दुसर्‍या कारकिर्दीत मनमोहन सरकारच्या अब्रुचे दिवाळे वाजलेले होते. त्यांची राजकारणातील आणि भारतीय जनमानसातील पत संपलेली होती. तेव्हा तुला राज्यसभा देऊन गहाण टाकला गेला. मग तुला भारतरत्न देण्यासाठी नियमात बदल करून सोनिया-राहूलनी तुला अधिक सन्मानित केले. त्याची किंमत मोजलीस कारे आज सचिन? नसेल तर तुला आजच पाकिस्तानला दोन गुण आंदण देण्याचा युक्तीवाद कुठून सुचला? त्यासाठी चार दिवस कशाला जावे लागले? देशाची अब्रु किंवा प्रतिष्ठा स्वाभिमान विश्वचषक स्पर्धेच्या दोन गुणात सामावलेला असतो कारे? स्पर्धा होतात संपतात. शिल्लक उरते ती माणसाची व समाजाची ओळख. ती ओळख गुणांच्या गणिताने होत नाही, तर आपल्या स्वाभिमानाच्या मोजपट्टीने होत असते. श्रीनगर वादग्रस्त काश्मिरचा हिस्सा आहे, म्हणून तिथे दौर्‍यावरचा पाकिस्तानी संघ सामना खेळायचा नाकारतो. म्हणून त्या देशाच्या जनतेला ते योद्धे वाटतात. तूही पाकिस्तानच्या विरोधातले षटकार हाणलेस वा शतके ठोकलीस, तेव्हा सीमेवरच्या जवानांना तूच योद्धा वाटला होतास. भीषण थंडी वा प्रतिकुल वातावरणात असह्य जीवन जगताना त्यांना तूच मोठा लढवय्या वाटलास. त्यांच्या मनातून आज सचिन तू नक्कीच उतरला असशील. ज्या घरात शहीद झाला आहे, शहीदांचे आप्तस्वकीय असतील; त्यांना तर तुला ओळखणेही कठीण होऊन जाईल. आज पैसेवाले पत्रकार किंवा माध्यमातले बुद्धीमंत तुझी पाठही थोपटतील. पण ज्यांनी आपल्या फ़ाटक्या खिशातले चार पैसे खर्चून तुझ्या शतकासाठी फ़टाके वाजवले, त्यांना ती उधळपट्टी वाटण्याची नामुष्की आणलीस रे सचिन! अनेक शतके विक्रम आणि हजारो धावांवरून तीनचार शब्दात बोळा फ़िरवलास सचिन. तुला प्रिय तरी कसे म्हणावे? तूच तुझी ओळख विसरला असशील, तर आम्ही आमचा लाडका सचिन कुठे शोधायचा?

67 comments:

  1. कमावलेलं सर्व गमावलं. दैव देतं अन् कर्म नेतं.

    ReplyDelete
  2. होय त्याने भारतरत्न,खासदारकीची किंंमत मोजलीय.आपणच मुर्ख ठरलो.विराट पण तसाच आहे त्यालाही पाक बद्दल एक शब्द विरोध करण जड जात.प्रश्न विचारन्याला भांडण करतो तो.

    ReplyDelete
  3. Bhau
    Hats off !! Great courage you shown by writing this article. Else everyone is just playing Safe.

    This is the same man whom Congress has sent in Rajya sabha as MP. So you mean allot when you say "कुणाच्या कसल्या उपकाराची ओशाळवाणी परतफ़ेड करतो आहेस?"

    We unnecessarily given allot respect & love to these people but they have nothing to do with country & sentiments of people. Actually they don't deserve what they have been given by this country. This man is BharatRatna & he has nothing to do with the nation what a misfortune.

    Get back his title Bharatratna & the Rank given by Air Force.

    ReplyDelete
    Replies
    1. Really hats off. Some one has dared to speak against demigod.

      Delete
  4. Bhau dolyat Pani able. Ha lekh jar sachinne vachla tar tya kshni tumhala phone Karun mafi magel

    ReplyDelete
  5. भाऊ खरच महा भयंकर आहे.नाही नाही म्हणता या हल्ल्याच गलीच्लछ राजकारण सुरू झालय.हे तथाकथित पुरोगामी वाले अत्यंत खालच्या पातळीवर बोलत आहेत. मी आज संध्याकाळी पाचवाजता आणि नऊ वाजता विविध वाहिन्यावरील चर्चा ऐकल्या.त्या भाजपच्या प्रवक्त्याला अक्षरशः सगळ्यानी घेरल होत.तो कांगावा, खोटेपणा असह्य झाल तेंव्हा सरळ टिव्ही बंद केला.निवडणूक होईपर्यंत कायकाय ऐकावे आणि पहावे लागेल?

    ReplyDelete
  6. जास्त डोक्यावर घेतला लोकांनी....
    बाळासाहेब असायला हवे होते आज...झापला असता...

    ReplyDelete
  7. आपण विचार करू समजा आपल्या घरातलीत एखाद्या व्यक्तीचं अपघाती निघन झालं; अपघाती बरं का, खून नाही; आणि आपल्याला त्या करता जबाबदार व्यक्ती माहिती आहे. त्या व्यक्ती वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासारखी परिस्थिती आहे. दुःखद निधना नंतर थोड्या काळाने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून जर त्यांच्या घरातील सांस्कृतिक समारंभाचं किंवा पूजेचं आपल्याला निमंत्रण आलं तर आपण जाऊ का हो? नाही ना, कारण का तर दुःखाची तीव्रता खूप असेल, त्यामुळे आपण सहजा सहजी क्षमा करणार नाही दोषी व्यक्तीला. आज जे लोकं पाकिस्तान बरोबर कुठलेही, सांस्कृतिक का असेना, संबंध ठेवायला तयार आहेत ना, त्यांना पुलवामातल्या गेलेल्या जवानांच्या खुनाचं खरं दुःख झालेलंच नाहीये. बाकी निषेध वगैरे ह्या फक्त तोंडच्याच गप्पा आहेत. आपलं घरचं कोणी तरी गेल्या इतकं दुःख ज्यांना होईल त्यांचा सांस्कृतिक किंवा क्रीडाविषयक अदान प्रदान (पाक बरोबर) ह्या थोतांडावर विश्वास असूच शकत नाही.

    ReplyDelete
  8. भाऊ तूम्ही परखड लिहेले. मला तुमचा अभिमान वाटतो की तुमच्या सारखे पत्रकार देवाला देखील सुनवायला कमी करत नाही.

    ReplyDelete
  9. अगदी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात भाऊ.

    ReplyDelete
  10. आज 2 गुण तुला भारतीय सैनिक व ज्या कोटयावधि लोकांनी तुला डोक्यावर घेतलं त्यांच्या पेक्षा जास्त वाटू लागले....आज 2 गुणसाठी खेळा मम्हणाला आणि उद्या पाकिस्तानी क्रिकेट रसिकांसाठी खेळा म्हणेल

    ReplyDelete
  11. तो सुनील गावस्कर ही याच पठडीतला. .....याना शरम नावाची काही गोष्टच नाही. दरवेळेला ' खेळ आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून जप करावयाचा ' आणि पाकड्यांबरोबर क्रिकेट खेळायचे. या दोघांचे स्वतःचे जवळचे कोणी ' पुलवामात ' गेले असते तरी हे असेच ' निर्लज्जपणे ' खेळायला गेले असते का ? अवघड आहे देशाचं.......!! शेवटी क्रिकेटर झाला म्हणून काय झाले .............पाय मातीचेच. !!

    ReplyDelete
  12. अफलातून. अस्मादिक पुन्हा म्हणतात की स्वातंत्र्य फुकटात मिळाले की असे संस्कार बाहेर पडतात. २२ जून १८९७ चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला ते आता कुठे आहेत त्यांचे नाव माहीत नसणे हीच आजकालची सहजता आहे. पण असे विक्रमवीर भानामातीच्या चरणी जावून आशीर्वाद घेवून आले की समाजाला अक्कल शिकवतात.

    ReplyDelete
  13. Far Uttam likhaan aani yogya mandani, Jai Hind Jai Maharashtra

    ReplyDelete
  14. भारतरत्न मिळाल्यामुळे डोक्यात हवा गेली असेच म्हणावेसे वाटते. सिद्धू ची लागण झाली असावी.

    ReplyDelete
  15. उगाच भावनिक होऊन लिहिलेला लेख आहे. तुमचे इतर लेख खूप आवडतात आणि तुमच्याबद्दल त्यामुळे आदर आहे. मात्र हा लेख अजिबात आवडला नाही. देशप्रेमाची तुमची जी कसोटी आहे ती सर्वांचीच असायला पाहिजे असे नाही. जोपर्यंत एक देश म्हणून आपण पाकिस्तानशी सगळे संबंध (त्यातही प्रथम राजनैतिक) तोडत नाही तोपर्यंत असले फुटकळ क्रीडा सामने न खेळण्यात काय हशील आहे? आधी सरकारने राजनैतिक पातळीवरील संबंध तोडावे.
    तसेच सध्या गरज आहे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करून त्यांच्या कडून आपल्याला हवे ते करून घेण्याची. क्रिकेट सामना न झेलून ते साध्य होणार आहे का?
    पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे, पण जे खेळा म्हणत आहेत त्यांचीही देशप्रेमाची काही भूमिका आहे, भले ती तुमच्या पेक्षा वेगळी असेल. पण त्या माणसाला असे घालून पाडून करण्याची गरज नाही. तुमच्या भूमिकेची आम्हाला पण कीव येते पण म्हणून काही आम्ही तुमच्या वर असभ्य पणे प्रहार करणार नाही. आता केला तसं विरोध करू. तुम्ही सचिनच्या बाबतीत जास्तच ताणले आहे हे खेदाने नमूद करावे लागते.

    ReplyDelete
    Replies
    1. मला ही असेच वाटते..we are not at state of war with Pakistan.. denying visas to players, trying to arm twist ICC ..are just stupid...
      एक वाक्य वाचले होते.. मला तुमचे विचार पटत नाहीत पण तुमच्या मत मंआडणयाचे स्वातंत्र तुम्हाला मिळेल आणी या साठी मी प्राण पणाने लढेन.. फक्त विरोधाला विरोध हे बरोबर नाही....

      Delete
    2. ज्यांना मोदीप्रेमाने पछाडले आहे,त्यांनी मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ब्लाॅग लिहणे यात कांहीही गैर नाही.

      Delete
    3. There is freedom of speech ! Therefore, comments of Mr

      Delete
  16. देशापुढे काही नाहीच.. तसंही या सचिन व गावसकर सारख्या नालायक आणि पक्क्या धंदे वाईक लोकांना कसला देश प्रेम ?

    ReplyDelete
  17. मला असं वाटतं की हा पाकिस्तान चा शेवटचा विश्वचषक असेल, हे त्याला आधीच माहीत झाले असेल air force chya practice sathi kelyanantar! Military cha plan tayar zale asel! So tyala may b n.a. watat asel ki shewatch cricket madhe pan harwav?

    ReplyDelete
  18. त्याला इतकी अक्कल असती तर तो खान्ग्रेसी खासदार झाला असता का ? स्वत:चे अवमूल्यन केले आहे त्याने.

    ReplyDelete
  19. देशाच्या अस्मितेपेक्षा दोन गुण आणि विश्वचषक महत्वाचा कधी पासून झाला सचिन ? अरे, देशच टिकली नाही तर कुठला खेळ आणि कुठला चषक ! सचिन आता एक काम कर, तुला दिलेला ग्रुप केप्टनचा दर्जा आदि भारतकत्न पुरस्कार सविनय परत कर, उगाच त्या पदव्यांचा अपमान नको व्हायला !

    ReplyDelete
  20. सचिन हा कधीच देशभक्त नव्हता। तो फक्त स्वार्थी होता। चुकून जर कुणाला त्यांच्यातली देशभक्ती दिसली असेल तर त्याच्या इतका मूर्ख कुणी नाही। कारण आजपर्यंत तरी मला ह्या मूर्खाने देशासाठी काही केले असेल असे दिसले नाही।

    ReplyDelete
  21. भाऊ, आपल्या भावना संजू शकतो, पण मला नाही वाटत सचिन आणि गावस्कर काहीही चुकीचं बोलले, ICC पाक ला बॅन नाही करणार, त्यामुळे आपण न खेळून पाक चा फायदा आणि आपलंच नुकसान करणार, आणि एक वेळ लीग मॅच सोडली तरी knockout match कशी सोडता येईल? आणि तोच नियम लावला तर ऑलिम्पिक/कॉमनवेल्थ आणि इतर वर्ल्ड tournament ला आपले खेळाडू मूकतील, यात आपलाच तोटा आहे :(

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर आहे आपले मत.

      Delete
    2. पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळनं आणि जागतिक स्पर्धेमध्ये समोर येणार्यसंघाबरोबर खेळणे या दॊन्ही गोष्टी भिन्न आहेत.पाकिस्तान बरोबर द्विराष्ट्रीयसंबंध- क्रीडा /क्रिकेट किंवा इतर कोणतेही संबंध असू नयेत.पण जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत जरूर खेळावे.ओलंपिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत अापल्याबरोबर पाकिस्तानचा स्पर्धक असेल तर भारतीय खेळाडूने बाहेर पडावे? पाकिस्तानी पहिलवानाबरोबर कुस्ती पडली तर सोडून द्यावी का?

      Delete
    3. देशापेक्षा कुठलाच खेळ आणि कुठल्याच प्लॅटफॉर्मवर ऑलिम्पिक असो की Commonwealth, महत्त्वाचा नाही. पाकिस्तान. नेआपल्यावर हल्ला केला आणि आपण त्यांच्यावर सर्व स्तरावरून बहिष्कार घातला असेच झाले पाहिजे. Wolrdcip मध्ये खेलिन आणि दुसरीकडे खेळणार नाही अशी dutappibbhukima नकोच.

      Delete
  22. भाऊ
    अप्रतिम लेख
    सचिनच्या straight drive सारखाच खणखणीत

    ReplyDelete
  23. भाऊ
    अप्रतिम लेख
    सचिनच्या straight drive सारखाच खणखणीत

    ReplyDelete
  24. आज मला लाज वाटतेय अशा माणसाला भारतरत्न मिलते आणि विर सावरकर यांना नाही. आपले विचार खुपच योग्य .

    ReplyDelete
    Replies
    1. Sir sawarkarana swatantravir mhantat. That is far better than bharatratna sawarkar.

      Delete
  25. सामान्य जनतेच्या भावना व्यक्त केल्यात भाऊ👏

    ReplyDelete
  26. भाऊ, भारतरत्नात भयंकर भ्रष्टाचार आहे. करोडो रुपयांचा खेळ, त्यात हजारो कंपन्यांची जाहिरात, जाहिराती साठी लागणारा भारतरत्न माणूस हे सर्व त्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारत रत्न दिले गेले त्यांचे कर्तृत्व काय कमी होते. त्यांना त्यांच्या हयातीत तो का दिला गेला नाही? भारत रत्नाची शान किती वाढली असती. पण या नालायकांनी बाबासाहेबाना त्यांच्या हयातीत दिला नाही. सावरकर, मोहमद रफी याना पण हयातीत तर नाहीच पण अजून सुद्धा दिलागेला नाही तो नियम बदलून सचिन ला दिला गेला एवढ्या लहान वयात ते सुद्धा तो अशा टीम मधून देशासाठी खेळला ज्या टीमचे पिताश्री उर्फ (BCCI) आम्ही स्वायत्त आहोत म्हणून न्यायालयात सांगते. बाकी जनता आता तरी शहाणी होईल अशी आशा करूया नाहीतर देव आहेच.

    ReplyDelete
  27. Terribly wrong projecting some one. Your defination of patriotism is very limited.
    Worst thing is people supporting your blame on legend. The man who infact inhibited the patriotism in generations for more than 24 years. Thing about it. It was quite India movement that brought India together. After that for next 40 years there was no one thing for which India became so United. Indians became Indians when it came to cricket. They liked the cricket as some one have them reason.

    ReplyDelete
  28. एकदम सत्य.

    ReplyDelete
  29. Well india is such a powerful nation also in cricket why cant we try and impose complete ban on pakistan from ICC? Remember Africans were banned till recently? Having said this sachin could have been more sensible in his comments for sure.

    ReplyDelete
  30. मलाही सचिनचे मत पटते..
    विश्वचषक आणि ऑलिम्पिक सोडल्यास इतरत्र कोठेही भारताने पाकशी खेळू नये.
    पण या मानाच्या स्पर्धामध्ये पाकची संपूर्ण नाचक्की करावी.

    ReplyDelete
  31. हा भावनिक लेख आहे हे आशिष यांचं मत पटलं. एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा म्हंटल्यावर त्या स्पर्धेचे नियम आपल्यावर बंधनकारक आहेत. उद्या नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेस देशविरोधी आहे म्हणून काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवणार नाही तर ते कसं चालेल. आपण पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट काय इतरही खेळ खेळात नाहीयोत आणि ते योग्यच आहे पण जागतिक स्पर्धा आणि राजकारण यांची गल्लत करून चालणार नाही. जर आपण पाकिस्तान विरुद्ध खेळलो नाही आणि ते दोन गुण घेऊन पाकिस्तान परत आपल्यासमोर सेमी फायनल ला आला तर मग match सोडून परत यायचं का? बहिष्कार टाकायचा तर पुर्ण स्पर्धेवर टाकावा ICC सांगावं एकतर पाकिस्तान किंवा भारत तरच पाकिस्तानला खरा दणका बसेल.

    ReplyDelete
  32. कीर्तिश धामारीकर इंदूर

    भाऊ खरे म्हंटले न की सचिन महा गर्विष्ठ, अहंकारी आधी पासूनच होता अन आहे. तो लाख प्रतिभावान असला तरी धन लोभीच आहे. त्यांनी अपुल्या मराठी किवां मराठी भाषा व संस्कृती साठी ही कधी दो शब्द किंवा दोन धेले दिले नाही नाही अपुल्या महाराष्ट्रास काही परत फेड दिले. ते तर आपणच बावले की आमुचा सचिन, आमुची लता,आशा,उषा, माधुरी,गावसकर, वगेरे वगैरे... ह्यांना समाजा नी देशांनी अगदी दोक्या वर मिरविले पण हे निष्ठुर धन लोळूप गर्विष्ठ अहंकारी काही म्हणजे कामाचे नाही "न लीपने के न पोटने के नाही छाबणें के...
    हे तर कमवून बसले जमवून बसले पण जमिनीवर कधीच न बसले..




    कीर्तिश धामारीकर
    सह सचिव मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदूर
    ०९८२७३१३६५९

    ReplyDelete
  33. भाऊ, गल्लत होतेय. सचिन, सुनिल बाजूला राहू देत, पण पाकिस्तानशी न खेळुन आपण आपल्या विश्वचषकाच्या मोहिमेत विघ्न का आणायचे. तो पाकचा संघ मनातून आनंदी होत असेल. कारण सुंठे वाचुन खोकला गेला. कारण प्रत्येक विश्वचषकात आपण पाकला चारीमुंडया चीत केलंय. करायचेच असेल तर संपूर्ण विश्वचषकावर बहिष्कार घाला. ICC ला त्यातून मोठे नुकसान होईल जे त्यांना झेपणार नाही. मग आपण पाकवर बहिष्कार घाला तर आम्ही भाग घेवू ही मागणी लावून धरु शकतो.

    ReplyDelete
  34. सचिन तु फक्त स्वत:ची व्यावसायिक हितसंबंध लक्षात घेतली.
    पण देशाचा नागरिक म्हणून तुझी कर्तव्य विसरलास

    ReplyDelete
  35. सचिन खूप स्वार्थी आहे

    ReplyDelete
  36. कारलं तुपात तळलं,साखरेत घोळलं तरी ते कडू ते कडुचं....पैशाबरोबर शैक्षणिक पातळी सुध्दा महत्वाची आहे हे ह्या अर्धशिक्षीत बांडगुळ सच्या वरून अधोरेखित झालं...स्वत:ची नाही निदान कॉंग्रेसच्या लाचारपणातुन‌ मिळालेल्या सर्वोच्च सन्मानाची तरी लाज ठेवायला पाहिजे होती..

    ReplyDelete
  37. भाऊराव,

    माझं मत थोडं वेगळं आहे. सचिनला आपल्याला मिळणाऱ्या दोन गुणांची काळजी पडलेली नाही. ते गुण पाकिस्तानला मिळायला नकोत अशी त्याची भूमिका आहे. जी मला उचित वाटते. तसंही पाहता पाकिस्तान भारताशी क्रिकेटचा सामना खेळतो तो जिहादी वृत्तीने. मग भारतीय खेळाडूंनाही त्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावंसं वाटणारंच ना? आपल्या खेळाडूंना जर ही संधी मिळंत असेल तर ती का सोडावी, असाही विचार असू शकतो सचिनच्या वक्तव्यामागे. त्याचं वक्तव्य इथे आहे : https://twitter.com/sachin_rt/status/1098918651841830912

    मी त्यास संशयाचा फायदा देऊ इच्छितो. मात्र हे बंधन बाकी कोणावरही नाही.

    आला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  38. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  39. कुठल्या उपकाराची ओशाळवाणी परतफेड करतोय त्याचं त्याला माहीत.. लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम..

    ReplyDelete
  40. कुठल्या उपकाराची ओशाळवाणी परतफेड करतोय त्याचं त्याला माहीत.. लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम..

    ReplyDelete
  41. सचिन तू देशाचा,शाहीदांचा,तुला देव मानणाऱ्या चा तरी विचार करावयाचा होतास।कमावलं तेवढ गमावलं।

    ReplyDelete
  42. सचिन तेंडुलकर हा कधीच देशा करता जगला नाही,खेळला नाही. तो जगला तर प्रायोजक कंपनीनं साठी आणि खेळला तर पैश्या ठायी.अहंकारी आणि गर्विष्ठ सचिन ज्यांनी कधी ही माय भाषा आणि देश भाषा म्हणजे मराठी आणि हिंदी ला प्राधान्य दिले नाही देशाचे मान पायदळी तुडवले.जेव्हा ही तोंड उघडले परदेशी भाषेत. जेव्हा की देशाच्या लोकांनी त्यांना डोक्यावर मिरावले आणि अकुत धन इस्बाब कमावला, मान,इज्जत,दिली आणि दिली भारत रत्न. पण ह्या नखरेल जादूगार नी कधी तोंड भरून दोन शब्द देखील प्रेमाचे बोलून परतफेड केली नाही. काय दिले या भारत रत्न सचिन ,लता,!आशा,!उषा ,माधुरी !,गावसकर,!!!सारख्या नामवंत व्यक्ती ननी महाराष्ट्राला किंवा राष्ट्राला !!! अहो कधी समाजाला कोणत्याही गर्जे च्या वेळी तर धन दिले नाहि उलट कार्यक्रमाला यायचे सुद्धा पैसे घेतात एअर फेअर सकट. भाऊ साहेब अगदी बरोबर.. चाल दो लेखणी in नमक हराम लोगो के विरुद्ध.



    कीर्तिश धामारीकर
    सहसचिव
    मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदूर
    ०९८२७३१३६५९

    ReplyDelete
  43. भाऊ, परखड लिहिलं आहे तुम्ही, पण उगाचच अंजारून गोंजारून कशाला? तीव्र शब्दांत फटकवायला हवे होते त्याला... ग्रुप कॅप्टन आणि भारतरत्न, ह्या दोन्ही सन्मानांचा अपमान केला आहे सचिन तेंडुलकर ह्याने.

    ReplyDelete
  44. अतिशय आवश्यक होतं असं लिहणे (फटकवणे).भाऊ खूप सुंदर लेख...

    ReplyDelete
  45. ॥ हरि ॐ ॥

    नौदलाने सचिनला दिलेला सन्मान काढून घ्यावा हेच उत्तम...

    ReplyDelete
  46. कोण हि ICC . तर एक युरोपमधील संस्था ..
    त्या संस्थेचे काम आहे कि क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करणे . त्यातुन त्या संस्थेला भरघोस उत्पन्न मिळते.
    हिंदुस्थान पाकिस्तान सामना म्हणजे बोनस. सट्टेबाजी, मॅच फ़िक्सिन्ग ह्या सगळ्यांना पूर्ण सूट
    हे सगळे जे चाललंय ते स्पॉन्सरशिप चे अधिकार अगोदरच विकले गेले आहेत आणि प्रत्येकाचे हितसंबंध गुंतले आहेत म्हणून.
    सचिनचे पैसे लागले आहेत का ते तपासून बघावे लागेल पण सध्या यूट्यूबवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे .. कोब्रापोस्ट ... मला तो प्रकार वाटतो.

    ReplyDelete
  47. There is nothing special in the cricket world cup. It comes every four years. But our braves will never come back

    ReplyDelete
  48. Failed to rise to the occasion!!! Everybody don't get the opportunity to be at border but out morale support and concern boost their morale and make them courageous to stand firm on their feet for the safety and security of nation!!!

    ReplyDelete
  49. Is the so called "World" Cup played by some 11-12 nations,that important? Two points are that important? Isn't it a well known fact that BCCI is not answerable to the people of India and it is affiliated to the ICC? Why so much of hype for the ICC World Cup?
    The reason is mostly financial!

    ReplyDelete
  50. Bhau,
    I am a fan of yours and agree with most of what you say.
    However, you should have someone edit your writing for mistakes in "shudhalekhan". There are just too many.
    And if you do want to use a Sabskrit phrase, please watch your Grammar.
    Our beloved Sanskrit is very particular about "linga and vachana" of noun and adjective. Either say Kathaa and ramyaa or Kathaa ramyaah with a silent ah on the bahuwachan of Kathaa before ra of ramyaah of the bahuwachan of ramyaa. A mixup is not allowed.
    Apart from these, you are great and keep it up.

    ReplyDelete