Saturday, July 25, 2020

भूमीपूजनातले प्राधान्य

Ram Mandir: Sharad Pawar Takes A Dig At PM Modi, Asks Centre To ...

श्रीराम जन्मभूमी असलेल्या जागी नवे भव्य मंदिर उभे रहायचे आहे आणि रीतसर सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसारच त्याची उभारणी व्हायची आहे. आता तिथे पंतप्रधानांनी जावे किंवा नाही, असा वाद उकरून काढण्यात आलेला आहे. अर्थातच त्यात वादाचे काहीही कारण नाही. पण जमेल तिथे फ़क्त अपशकून करण्याची वृत्ती असलेल्यांना कायम असे वाद हवेहवेसे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुरोगामी सेक्युलर देशाच्या पंतप्रधानाने भूमीपुजनाला जाणे अयोग्य असल्याचा नवा सिद्धांत पुढे आलेला आहे. घटना सेक्युलर असली म्हणून पंतप्रधान सेक्युलर नसतो, इतकेच या लोकांच्या लक्षात येत नाही. किंबहूना त्यांच्या लक्षात काहीच येत नाही किंवा आलेले असूनही मानायचे नसते. म्हणून असे वाद उकरून काढले जातात. वास्तवात अन्य प्रसंगी देशाच्या अगदी हिंदू पंतप्रधानाने अयोध्येत भूमीपुजनासाठी जाणे टाळावे हा युक्तीवाद मानताही आला असता. पण मोदी हा अपवाद आहे. ते नुसते देशाचे पंतप्रधान नाहीत, तर सेक्युलर अडथळा ओलांडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांना लागोपाठ दुसर्‍यांदा त्या पदावर लोकांनी बसवले आहे आणि त्या मतदाराचा सन्मान राखण्यासाठी मोदींनी अयोध्येला जाणे अगत्याचे आहे. त्यातले औचित्य वेगळेच आहे. अयोध्येत रामजन्मभूमी असल्याचा दावा करणार्‍या पक्षाचे हे पंतप्रधान आहेत आणि त्याच कारणास्तव ज्या पक्षाला सतत सत्तेपासून दुर ठेवून वाळीत टाकले गेले, त्याच पक्षाला सत्तेपर्यंत मोदी घेऊन गेलेले आहेत. तेव्हा त्यांना पंतप्रधानपदी बसवणार्‍या मतदाराची इच्छा अपेक्षा अतिशय मोलाची व निर्णायक ठरत असते. ह्या मतदाराने नुसते मोदींना निवडून पंतप्रधानपदी बसवलेले नाही, त्याने मोठ्या उत्साहात देशातल्या तमाम सेक्युलर व पुरोगामी आग्रहांना नाकारण्याची इच्छा आपल्या मतातून व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच भले मोदींना तिथे जायची इच्छा असो किंवा नसो, कोट्यवधी मतदाराची ती इच्छा आहे आणि त्याचा पंतप्रधानाने पुर्णत: सन्मान केला पाहिजे.

२०१३ पासून म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींना भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पेश केले, तेव्हापासून ह्या नेत्याने एकदाही मंदिरासाठी मते मागितलेली नाहीत, किंवा त्याचा प्रचारात वापरही केलेला नाही. पण अयोध्येच्या मंदिराला व रामजन्मभूमीच्या सत्याला नाकारणार्‍या प्रत्येकाच्या विरोधात मोदींनी जबरदस्त आघाडी उघडलेली होती. किंबहूना देशात जे पुरोगामी सेक्युलर विचारांचे थोतांड मोकाट झालेले होते, त्याचा नक्षा उतरवण्याचे खास आवाहनही मोदी सातत्याने करीत होते. त्यांनी कॉग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती आणि मतदाराने त्यांना उत्स्फ़ुर्त प्रतिसाद दिला. त्यातून कॉग्रेस सत्ताभ्रष्ट झाली. तेवढेच नाही, जो कोणी सेक्युलर पाखंडी भाषा बोलणारा होता, त्याला नामोहरम करण्याचा चंग बांधूनच मतदाराने २०१४ रोजी मोदींना कौल दिलेला होता. पण पंतप्रधान मोदींनी कधीही जाहिर भाषणातून मंदिराचा आग्रह धरला नव्हता. ती जनतेची अपेक्षा त्यांनी गृहीतच धरली होती. मोदींचे लक्ष्य सेक्युलर भंपकबाजी संपवणे असे होते आणि त्यासाठीच तर मतदाराने २०१९ सालात त्यांना अधिकची मते व अधिकच्या जागा देऊन भक्कम सत्ता बहाल केलेली आहे. त्यातून तमाम सेक्युलर नाटककारांचा नक्षा उतरवणे, ही अपेक्षाच पुन्हा व्यक्त झाली. मग अशा सेक्युलर लोकांची मागणी पायदळी तुडवून अयोध्येला जाणे ही पंतप्रधानांची जबाबदारी बनत नाही काय? एकवेळ स्वत:च पंतप्रधानांनी त्यासाठी नकार दिला असता किंवा कोणा नामवंत धर्माचार्यांच्या हस्ते भूमीपुजन करण्याचा आग्रह धरला असता, तर गोष्ट वेगळी होती. लोकांना ते मान्यही झाले असते. पण आता अनेक पुरोगाम्यांनी मोदींच्या अयोध्या भेटीला कडाडून विरोध केला असताना मात्र पंतप्रधानांनी तिथे जाणे अगत्याचे झालेले आहे. कारण जिथे शक्य असेल तिथे व संधी असेल तिथे; सेक्युलर पाखंडाचे निर्दालन करण्याचे कर्तव्यच मतदाराने मोदींवर सोपवलेले आहे ना? योगायोगाने शरद पवारांनी त्याची आवश्यकता पटवून दिली म्हणायची.

शरद पवार यांनी हा विषय आताच कशाला काढावा? हा आणखी एक मुद्दा आहे. तर त्याचाही खुलासा देण्याखेरीज पर्याय नाही. २०१९ ची निवडणूक संपण्यापर्यंत सुप्रिम कोर्टाने जन्मभूमीचा विषय सुनावणीला घेऊच नये, म्हणून आग्रह धरला गेला होता. तो आग्रह कुणा हिंदूत्ववादी गटाने धरलेला नव्हता. सेक्युलर पक्ष आणि त्यांचे वकील यांनी तो अट्टाहास केलेला होता. त्यालाही कोर्टाने मान्यता दिली आणि २०१९ च्या लोकसभा निकालानंतर ही सुनावणी झाली. तेव्हा कोर्टानेच मंदिराच्या बाजूने निकाल दिलेला असल्याने त्यालाच सेक्युलर न्यायनिवाडा म्हणणे भाग आहे. सहाजिकच तो न्याय अंमलात आणण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर आहे. त्यात कोरोना आडवा कशाला आला? ही सुनावणी खुप पुर्वीच होऊन विषय काही वर्षे आधी निकालात निघाला असता, तर कोरोनाच्या काळात भूमीपूजन करण्याची गरजही भासली नसती. त्यामुळे आज कोरोना असताना तसा मुहूर्त निघाला असेल तर त्यालाही पुन्हा सेक्युलर शहाणेच कारणीभूत झालेले आहेत. त्यामुळे पवारांना प्राधान्य चुकले असे वाटत असेल तर त्यांनी कपील सिब्बल वा धवन अशा वकीलांचा कान पकडला पाहिजे. कारण त्यांनी सुनावणीत वारंवार इतके अपशकून केले नसते, तर २०१७-१८ मध्येच सुनावणी होऊन बहुधा एव्हाना मंदिर उभारणीचे काम निम्मेहून जास्त पार पडले असते. त्यासाठी कोरोनाच्या काळातील मुहूर्त साधण्याची वेळ मोदींवर आली नसती. त्यामुळे प्राधान्य चुकलेले असेल तर ते सेक्युलर बुद्धीमंतांचे व नेत्यांचे चुकलेले आहे. ते चुकत असताना त्यांना पवारांनी चार शब्द ऐकवले असते, तर आज अशा संकटकाळात भूमीपूजनाचा मुहूर्त साधावा लागलाच नसता. पण पवारांना अजून त्यांच्याच राजकारणातले व पुरोगामीत्वातले प्राधान्य निश्चीत करता आलेले नाही. म्हणून योग्य वेळी गप्प बसले आणि अयोग्य वेळी ते मोदींना शहाणपण शिकवित आहेत.

प्राधान्याचे विषय अनेक असतात. आपल्या निवडणूक प्रचारात मोदींनी प्राधान्याचा क्रम जाहिरपणे सांगितलेला होता. पहले शौचालय, बाद देवालय; असे मोदी सांगत होते. तर त्यांच्या प्राधान्यामागे पवार येऊन उभे राहिले असते तर? पहिले मंदिर फ़िर सरकार असल्या गर्जना करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्याशी सत्तेसाठी हातमिळवणी करणारे पवार आज प्राधान्यक्रम शिकवतात, त्याचे म्हणूनच नवल वाटते. कारण त्यांनीच मुख्यमंत्री बनवलेले उद्धव ठाकरे कोरोना दार ठोठावत असताना महाराष्ट्रातील आरोग्य सेवा भक्कम करण्यापेक्षा अयोध्येला नवस फ़ेडायला गेलेले होते. तेव्हाही पवारांना आपला प्राधान्यक्रम आठवलेला कोणाच्या ऐकीवात नाही. अर्थात पवारांकडून प्राधान्यक्रम शिकण्याइतके देशाचे पंतप्रधान दुधखुळे नाहीत व नसतात. अन्यथा युपीएच्या सरकारचे भागिदार असताना तेव्हाच्या पंतप्रधानांनी पवारांना इतके दुर्लक्षित ठेवले नसते. महाराष्ट्रातले शेतकरी अतिवृष्टीने बुडालेले व दिवाळखोर झाले असतानाही पवारांना भीमा कोरेगावच्या आरोपींची चिंता ग्रासत होती. त्याला प्राधान्यक्रम म्हणतात काय? कोरोना येत-जात असतात. जगाचे व्यवहार थांबत नसतात. पंतप्रधानाच्या भूमीपूजनाला जाण्याने कोरोना विरोधात चालू असलेल्या लढाईमध्ये खंड पडत नसतो. पण त्याला अपशकून करण्याने आपली विघ्नसंतोषी मानसिकता समोरे येत असते. अन्यथा पंढरीची वारी रोखण्यात आली असताना आपल्याच आश्रयाने सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी पंढरपूरात जाऊन पुजेचा मान मिळवण्यात प्राधान्य नसल्याचे सुनावले असते. असो, मुद्दा अयोध्येतला आहे आणि तो मोदींसाठी प्राधान्याचा विषय होता व आहे. त्यांना मतदाराने पवारांच्या प्राधान्यासाठी पंतप्रधान बनवलेले नाही. किंबहूना आजवरच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांना बदलण्यासाठीच मोदी पंतप्रधान झाले आहेत आणि मतदाराने त्यांना प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. त्यात सेक्युलर लोकांच्या नाकावर टिच्चून अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन समाविष्ट असल्याचे अशा लोकांच्या जितके लौकर लक्षात येईल, तितके त्यांचे राजकीय पुनर्वसन त्वरेने होऊ शकेल.

21 comments:

  1. Correct sir 🙏🌹👍✅💯☑️✍️🙂

    ReplyDelete
  2. सर्वसमावेशकतेचा प्रयत्न केलेल्या अडवणींची फरफट मोदींनी पाहिलेली आहे त्यामुळे हा मोका मोदी नक्कीच सोडणार नाहीत

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्हाला सलाम. वस्तुनिष्ठ विश्लेषण

    ReplyDelete
  4. भाऊ, परखड विश्लेषण. पवारांचा सध्या राहूल गांधी झालाय. पुरोगामी आणि सेक्युलर व्हायच्या नादात त्यांना योग्य वाटेल ते बडबडत आहेत पण सामान्य हिंदू मतदार यासगळ्या भंपकपणाला कंटाळून गेलेय हे २०१४ आणि २०१९ ला देशात आणि महाराष्ट्रात मार खाऊन झाल्यावरसुद्धा यांच्या लक्षात येत नाही. ही लक्षणे राहूल गांधीच्यात पण आहेत मग त्याच्यात आणि यांच्यात फरक काय? सामनाला मुलाखत देताना फडणवीसांवर टिका करत होते, मी परत येईन याची चेष्टा करत होते पण त्यांनी या कोरोनाच्या काळात हिंमतीने सगळ्या महाराष्ट्रभर फिरुन आरोग्यव्यवस्थेतल्या त्रुटी दाखवत होते आणि उपयुक्त सुचना पण करत होते त्याचा आढावा घेतला असता किंवा त्याला मुद्देसूद प्रतित्युर दिले असते तर चांगले झाले असते. किंवा महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावं लागेल हे सांगितले असते तर लोकांनी ते मान्य केले असते पण यांचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे भाजपाला आणि मोंदीना विरोध आणि तो कोणत्याही विषयावर. श्रीराम मंदीर म्हटले की मळमळत होतेच पण आता एकदम उलटीच झाली.

    ReplyDelete
  5. शेवटी *पुनर्वसनाचा* मारलेला जोडा अप्रतीम........
    😂😂😂👌👌👌

    ReplyDelete
  6. एकदम योग्य विचार मांडले आम्ही याकरतच मोदींना निवडले आहे

    ReplyDelete
  7. Turkey madhe museum ch rupantar masjid madhe kele. President ne kuran pathan kele. Jithe Hindu bahu sankhet aahet tithe PM ne silanyas karavach. He KHOTYA 'janaata rajala' kase kalel ?

    ReplyDelete
  8. अतिशय साधक बाधक व सुंदर विवेचन केले आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. Double standards. निष्कारण वादाचे मुद्दे उकरून काढायचे आणि लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायचे. मोदींच्या भूमीपूजनाला जाण्याने कोरोना जाणार नाहीच आहे, पण तो मुख्यमंत्र्याच्या / सोलापूर पालकमंत्र्याच्या पंढरपुरला जाण्याने ही जाणार नव्हता, सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न असतो तो श्रद्धधेचा, जनमताचा आदर करण्याचा. फक्त तो मोदींनी केला की यांचा पोटशूळ उठतो.

    ReplyDelete
  10. भाऊ.. एक सूचना आहे. तुम्ही आजोबांची गोष्ट नावाचे वेगळे चॅनल सुरू करा. प्रतीपक्ष हे राजकीय चॅनल आहे त्यात भेसळ करू नका.

    ReplyDelete
  11. छान चपकार भाऊ

    ReplyDelete
  12. Problem is for last 50 years career Mr.Pawar and all secular people are not in position to do any historical work.Mr.Modi has started fulfilling promise of Ram Mandir,3 Talak,370 J&K .Even after 1000 of years this historic moves Mr.Modies name will be there.Whether som body likes or not Mr.Modi should visit on 5 th Aug.to Ram Temple.

    ReplyDelete
  13. Dear Bhau,
    A very thank for Pratipaksha channel. Though my comment is irrelevant to above post but want to request a topic for Pratipaksha. We all are interested in knowing how print media works,
    what are income sources for print media, who influence media publication, does journalist compose articles just based on his/her analysis or editor change the article as per his personal agenda.
    How media owner influence news content to spread his personal biases? How third-party payment influence journalist & editor, it’s a private sector corruption. Are there ethics, journalist need to sign for professional license?
    Opportunities for shroud journalist after print media.
    Clues
    1. Kuber’s journey from Dombivali to Worli.
    2. Telgi’s friend gotya.
    3. Journalist to MP Ketkar.
    Don’t be surprised by my request but, the origin of many crooked things are media. Due to lack of morality in Journalist it’s spreading anarchy in society. Private sector corruption is the upcoming flash point.

    Thanks.

    ReplyDelete
  14. सेक्युलरांना अतीशय परखड आणि खणखणित इशारा!धन्यवाद साहेब .

    ReplyDelete
  15. Ekdum Kadak. Kayam tumche salle lokani ekave ase ka vatate yaana. Modi ni kay karave, kuthe jaave he zar Pawar saangnaar tar mag Modi nee Udhav Thakre nahit.

    ReplyDelete
  16. टकाटक ! लै खास !!!

    ReplyDelete
  17. शरद पवार हिंदू विरोधी आहेत यावरून स्पष्ट होत आहे

    ReplyDelete
  18. Dear Bhau,
    If BJP had accepted Shivsena’s offer of 50/50, were there be Sena+BJP govt? Do you really think CM seat was the cause of issue?
    The real cause of break was NOTABANDI, due to notebandi , sena lost cash. Does sena raising fund through electoral bond?
    I don’t think they have empire like Pawar kaka to fund party. After article 370 revocation, what was the mystery of Shivsena’s poster in Pakistan?
    Did anyone broker deal with sena for future alliance? So whatever efforts BJP makes, don’t think they will join BJP. Corona has given the
    golden opportunity of corruption & that’s why MH cases are going up not due to govt inaction.
    The biggest beneficiary from NOTEBANDI was Pawar kaka. He was very happy, refer hist 1st reaction.
    Waiting for your analysis on Partipaksha.
    Thanks

    ReplyDelete
  19. शरद पवार हे हिंदू विरोधी आहेत यावरून सिद्ध होते

    ReplyDelete
  20. खरं तर जनतेने प्राधान्याने बाजूला सारलेले असतांना ह्या अडगळीतील मंडळींना पुन: राजकारण करीत प्राधान्यक्रम बदलण्याची संधी एकाच्या उतावळ्या मानसिकतेमुळॆ मिळाली, पण ही गोष्ट लक्षात घेवून मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून जततेची नाराजगी दूर करण्याची शक्यता असतांना, पुन: कालबाह्य राजकारण करण्याचा उपद्व्याप करणे ह्याचा स्पष्ट अर्थ धडा शिकायचाच नाहीय्ये ! आपण म्हणाल्या प्रमाणे, चाळीस चर्षानीही एकाच वर्गात शिकत रहाण्याचे रेकॉर्ड अभाधित राखण्याचा चंग बांधणार्‍यांकडून काय अपेक्षा करू शकणार ?

    ReplyDelete