Saturday, November 11, 2017

अटेनबरोचा ‘गांधी’ आणि भन्साळीची ‘पद्मावती’ (उत्तरार्ध)

padmavati के लिए चित्र परिणाम

पद्मिनी तरी एक इतिहासातले खरे पात्र आहे, तिची वर्णने कुठे नोंदीत वा काव्यात आलेली आहेत. पण निधर्मवाद वा पुरोगामीत्व अशा संकल्पना निव्वळ काल्पनिक आहेत. त्या वास्तवात आल्यात वा एखादा समाज त्यानुसार जगतो आहे, याचा कोणी दाखला देऊ शकत नाही. समता बंधूता अशाही कल्पना कुठल्या युगात समाजात व्यवहारात आल्याचा दाखला देता येणार नाही. म्हणूनच त्या कल्पनाही धर्म, देव वा ईश्वर, स्वर्ग-नरक इतक्याच असंभवनीय आहेत. पण त्या कल्पना म्हणजेच बुद्धी वा शहाणपणा अशी ठाम समजूत असलेल्यांनी, अशा भ्रामक गोष्टी्चा युक्तीवादातून मांडलेला बचाव, कुठल्याही श्रद्धाळू व्यक्तीपेक्षा भिन्न नसतो. अशा भ्रामक गोष्टी वा कल्पनांसाठी हे बुद्धीमान लोक तितक्याच आवेशात अंगावर येतात, जितक्या आवेशात आज राजपूत एका चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले दिसतील. मात्र दोन गोष्टीत एक फ़रक आहे, तो विरोधाभासाचा. यातला एक गट अधिक सहनशील व सहिष्णू आहे, तर दुसरा पुर्णपणे असंहिष्णू आहे. उदाहरणार्थ कुठल्या राजपूत सेना वा हिंदूत्ववादी संघटनेने अशा लोकांच्या भ्रामक संकल्पनेसाठीच्या श्रद्धेला आव्हान दिलेले दिसणार नाही. या देशात समता बंधूता कधी होती? सिव्हील सोसायटी म्हणतात, तितकी सभ्यता कधी होती? राजरोस बलात्कार, गुन्हेगारी व हिंसेचे थैमान अधूनमधून कुठेतरी होत असते आणि तशीच जगातल्या कुठल्याही देशाची स्थिती आहे. पण ते सत्य नाकारून आपल्या भ्रामक सिव्हील सोसायटी वा नागरी सभ्यतेचा गुणगौरव करणारे अंधश्रद्ध नसतात काय? तेही नसलेल्या गोष्टीचे आरती भजन करण्यात कायम गर्क असतात. पण राजपूत संघटना वा कुठल्या संघटनेने अशा बुद्धीमंतांच्या चाळ्यांना कायद्याने बंदी घालण्याची मागणी केलेली नाही. मग त्यांना संयमी व सहिष्णू नाहीतर काय म्हणायचे? कारण ते आपल्या श्रद्धा जपत जोपासत असतात आणि इतरांच्या श्रद्धेला बंदी घालण्याचा अट्टाहास करीत नाहीत. पण दुसरीकडे आपल्या श्रद्धा घट्ट पकडून बसलेले पुरोगामी मात्र, अखंड दुसर्‍यांच्या श्रद्धेची हिंसा व अपमान करण्यात पुढे असतात. किंबहूना त्यांनी अशा इतरांच्या श्रद्धा व भावनांची पायमल्ली, हीच आपली श्रद्धा बनवलेली आहे. म्हणूनच असे लोक अगत्याने व हिरीरीने पद्मिनीच्या विकृतीकरणाच्या समर्थनाला पुढे आलेले दिसतील. पण जेव्हा सलमान रश्दी वा तस्लिमा नसरीन अशाच स्वरूपात इस्लामविषयी ‘सर्जनशीलता’ वा कल्पनाविलासाचे चित्रण करू लागतात, तेव्हा या तमाम निधर्मवादी लोकांची बोबडी वळलेली असते. त्यातून मग दुर्गापूजा वा तिच्या विसर्जन सोहळ्यावर प्रतिबंध लावण्यापर्यंत ही निधर्मी अंधाश्रद्धा घसरते आणि त्याचवेळी मोहरमच्या मिरवणूकीला अधिक सुविधा देण्यापर्यंत मजल जाते. त्यातून काय सिद्ध होते? 

असे तथाकथित शहाणे हे बुद्धीमान वा बुद्धीप्रामाण्य मानणारे अजिबात नसतात. त्यांना इतर सामान्य लोकांच्या जगण्यात न्युनगंड जोपासून, आपली कुशाग्र बुद्धी सिद्ध करण्याचा हव्यास असतो. ते तर्क नीट लढवू शकत नाहीत की विज्ञानवादीही नसतात. विवेकवादी तर अजिबात नसतात. कुठल्याही अंधश्रद्ध व्यक्तीपेक्षाही अधिक खुनशी व आततायी असतात. आपण म्हणू तेच खरे, इथे येऊन त्यांची बुद्धी संपत असते. आपल्यातले दोष लपवून इतरेजनांना अपमानित करण्यात त्यांना आपला सन्मान शोधावा लागत असतो. ते सतत अन्यायाची तक्रार करताना दिसतील. वास्तवात त्यांनाच न्युनगंडाने पछाडलेले असते. पण आपल्या न्युनगडाला झाकून ठेवण्यासाठी ते सतत अहंगंडाचे प्रदर्शन मांडत असतात. त्यांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे समाजात जी लोकप्रिय प्रतिके असतात वा सामान्य जीवनातील जगण्याचे आधार बनलेल्या प्रतिमा असतात, त्यांचे विकृतीकरण करणे, हा अशा मुठभरांचा छंद असतो. तुम्ही सामान्य लोक ज्याला कशाला पूजनीय म्हणत असाल, त्याची विटंबना करून ते तुमच्या मनात न्युनगंड जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसतील. पद्मिनीची गोष्ट सोडुन द्या. दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी व गौरी लंकेश ही अलिकडली प्रतिके किंवा व्यक्तीमत्वे आहेत. त्यांच्याविषयी अशाच प्रकारे कोणी ‘सर्जनशील’ कल्पनाविलास करणारे लिखाण केले वा भाष्य केल्यास कोणत्या प्रतिक्रीया उमटतील? तेव्हा यापैकी किती लोक लेखक वा कलावंताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनाला पुढे येतील? दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला परदेशी मदत मिळाली, त्याचे हिशोब कित्येक वर्षे दिलेले नाहीत. म्हणून अर्थखात्याला त्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे लागलेले आहे. त्याविषयी यापैकी किती बुद्धीमंत लोकांनी दाभोळकर वारसांना जाब विचारलेला आहे? गौरी लंकेश यांच्या नक्षलवादी संबंधाविषयी किती चर्चा या लोकांनी केलेल्या आहेत. त्या विषयाला नुसता कोणी हात घातला, तरी तुम्ही मृताविषयी काय बोलत आहात, म्हणून जाब कोण विचारतो? म्हणजे यांची जी दैवते असतात व त्यांच्याविषयी जे भ्रामक चित्र उभे केलेले असते, त्याविषयी वास्तविक चर्चाही वर्ज्य असली पाहिजे. इतकी कडेकोट अंधश्रद्धा जोपासलेली असते. पण राजपूतांनी आपल्या शेकडो वर्षे जुन्या प्रभावशाली इतिहासाचे विडंबन कला म्हणून निमूट स्विकारले पाहिजे. हा विरोधाभास बघितला, मग त्यातला राजकीय सुप्त हेतू उघड होतो आणि त्याचा राजकीय लाभ उठवित आपली तुंबडी भरणारे भन्साळीसारखे भुरटे पुढे येत असतात. ते कला, इतिहास व श्रद्धांचा चुथडा करून टाकत असतात. 

आमची पिढी, म्हणजे स्वातंत्र्याचा उदय झाल्यावर जन्माला आलेल्यांची, १९५०-६० च्या दशकातील भारतीयांची पिढी कशावर पोसली गेली होती? दोनवेळ पोटाला पुर्ण अन्न मिळण्याची मारामार होती. अवघे आयुष्य जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या शर्यतीमध्ये संपुन जात होते. तेव्हा ते कष्ट समस्या व प्रश्न आम्ही कुठल्या बळावर झेलले होते? त्या विपरीत जगण्याला सामोरे जात, आम्ही पुढल्या पिढीला सुखवस्तु बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. ते कुठल्या उर्जेवर शक्य झाले? जो इतिहास आज विटाळला जातोय, त्याच श्रद्धा व समजूतीच्या पायाने चालत आजचा भारत इथवर येऊन पोहोचला आहे. आम्ही शाळेत असताना प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिनी कुठली गाणी व गौरव ऐकत, हा देश इथवर आणलाय? प्रतिकुल परिस्थितीशी झुंजत देशाला इथवर आणायची हिंमत आमच्या पिढीला कोणी दिली? भन्साळीची कला वा स्वप्नविलासाने नव्हेतर प्रदिप नावाचा गायक कवी आणि सत्येन बोस यांच्यासारख्या दिग्दर्शकाने सादर केलेल्या ‘जागृती’ चित्रपटाने तशी हिंमत दिली होती. ‘आवो बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदूस्तानकी’ अशा गाण्यातून मुले तरूण व भारतीयांमधला पुरूषार्थ जागवण्याचे काम कलाकारांनीच केलेले होते. त्यांनी ड्रीमसिन उभे करून प्रेमकथा सांगितल्या नाहीत. तर इतिहासाच्या भक्कम पायावर वर्तमानाला आकार देण्याची उर्जा निर्माण केली. त्यातून आमच्या भारतीय पिढीला समजलेली पद्मिनी कोण होती? अभिमानी भारतीय स्त्री होती. ‘कुद पडी थी यहा हजारो पद्मिनीया अंगारोसे’ अशी तिची ओळख होती. ‘याद करो कुर्बानी’ हे लताच्या तोंडी गायलेले काव्य ऐकून नेहरूंच्याच डोळ्यात पाणी आलेले होते आणि आज त्यांच्याच पणतू देशाचे तुकडे करण्याला ‘आझादी’ म्हणून गौरवित करीत आहेत. यातून फ़रक लक्षात येईल. अटेनबरोचा ‘गांधी’ आणि भन्साळीची ‘पद्मावती’ यात कलाकृती कोणाला म्हणावे आणि विकृती कुठे आहे, ते लक्षात येऊ शकेल. अर्थात प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. 

खरेच मित्रांनो घटना एक़च असते आणि बघणार्‍यांना तिचे वेगवेगळे अर्थ लागू शकतात. बलात्कार होणार्‍या मुलीच्या वेदना प्रत्येकाला कळतातच असे नाही. बलात्कार करणार्‍याचा दृष्टीकोन भिन्न असणारच ना? त्याला तर बलात्कारातून सुख व आनंद मिळालेला असतो. त्याला मुलीच्या वेदना यातना कशा समजाव्यात? आजचा हिंदूस्तान किती बदलून गेला आहे ना? त्याला अभिमानाची लाज वा्टू लागलेली आहे. अपमानातला सन्मान आपल्याला शिकवला जात आहे. त्यासाठी दृष्टीकोन बदला असा आग्रह आहे. ज्या गांधीने हत्याराशिवाय केवळ अभिमानावर उभे राहून लढा दिला, त्या देशात राष्ट्राभिमान, गौरवास्पद इतिहास मागासलेपणाचे लक्षण बनवण्यात आलेले आहे. दोन पिढ्यांपुर्वी सर्वस्व पणाला लावून मिळालेले स्वातंत्र्य व सार्वभौमता ही मालमत्ता समजले, मग तिची उधळपट्टी अपरिहार्य नाही काय? आपले कष्ट कुठे लागलेत या कमाईसाठी? ती जुगारात उधळली गेली तर काय मोठे? ज्या पद्मिनीने बलात्कार नाकारण्यासाठी जोहार केला, तिलाच बलात्काराच्या हेतूने आलेल्या नरपशूशी प्रणय करताना दाखवण्याइतकी आपली कला प्रगल्भ झाली आहे मित्रांनो. आणखी दोन पिढ्यांनी अजमल कसाब मुंबईत हजारो लोकांना मोक्ष देण्यासाठी़च अवतरला होता, असे वाचावे किंवा बघावे लागले तर भारतीय संस्कृती किती प्रगल्भ झालेली असेल ना? अफ़जल गुरूने लोकशाही नावाच्या संसदीय गुलामीतून समाज व देशाला मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करल्याच्याही कथा आपल्या पुढल्या पिढ्या बघू शकतील. आज ते़च कवि प्रदीप असते तर त्यांनी काय काव्य लिहीले असते?

देखो ये तस्वीरे अपने बेशरमी अपमान की
इस मिट्टीचे बचके रहो, यहा भरती बेईमान की

(समाप्त)

13 comments:

  1. आमच्या मनातील भावना फारच प्रभावी पणे मांडल्यात भाऊ.आपली लेखणी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

    ReplyDelete
  2. Excellent I am spell bound.. wonderful analysis and clear words.. Hats of to your writing..

    ReplyDelete
  3. चित्रपट काल्पनिक असल्याचा ढोल वाजवला जातोय, चित्रपट काल्पनिक आहे तर त्यातील पात्रे ऐतिहासिक नावासह का आहेत??

    ReplyDelete
  4. भन्साळी सारख्यांना जबरदस्त तडाखा बसला म्हणजे चित्रपट सृष्टीतील भडवे व वारांगना असले काही करायचे थांबतील. केंद्रीय मंत्री साक्षी महाराज म्हंटले त्यात काहीच चुकीचे नाहीं.

    ReplyDelete
  5. यथायोग्य लिखाण भाऊ .

    ReplyDelete
  6. भाऊ जबरदस्त... एकदम सही.. क्या मारा है...
    सिनेमा या तरुण पिढीवर अत्यंत महत्वाचे संस्कार करत असतात..
    आपले याबद्दल ची उदाहरणे एकदम चपखल आहेत व काळाच्या परिसावर परखलेली आहेत..
    आपण उल्लेख केलेल्या पुढची पिढीतील काहींनी मनोज कुमार चे शेवट शेवटचे काही चित्रपट व अमिताभ चे अँग्री यंग मॅनचे चित्रपट यामुळे एका बाजुने देशप्रेम व दुसर्या बाजुने अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत कशी फाईट द्यायची व पुरुर्षार्थ गाजवायचा अन्याया विरुध्द लढा द्यायचा हे शिकवले.. हे 1987 पर्यंत चालले.. पुढे अमिर खानच्या कयामतसे कयामत पासुन देशासाठी नाही तर आपल्या प्रियसी साठी कसा जिव द्यायचा हे शिकवले.. संस्कार केले.. पुढे पुढे ते आणखीनच वाढत गेले..
    काय विचीत्र आहे बघा हाच अमिर आता सत्यमेव जयते म्हणत / शेतात बंधारे घालण्याचे शिकवतोय.. जणु याला गेल्या 20 आणि युपीए च्या 10 वर्षांत ही बुद्धी का झाली नाही? का फडणीस सरकारचे यातील प्रयत्नांना कमी करण्यासाठी कुणी सुपारी दिली आहे सामान्यांना समजत नाही... मिडियावाले याला कव्हरेज देतात... किती घट्ट आणि दुरगामी विचार करून रणनीती आखली जाते आहे नाही.. या गोष्टी दिसायला सरळ दिसतात परंतु याची शंका ना देशवासियांना (लाॅजवासियांना) येते ना बुद्धीवंत पुरोगामी ना येते...
    तसेच मागील पीढी खुशाल राजकारण्यांवर देश सोपऊन अपला स्वार्थ, कुटुंब, दिलीप कुमार, राजकपुर, लता, पुलं, वपु, भिमसेनजी, बालगंधर्व, सुधिर फडके यांच्यात नुसतीच मश्गुल राहिली.. नाही तर राजकारण म्हणजे गजकर्ण हे बोलुन देशाचे वाटोळे होऊ दिले.. आज हि ठणठणीत प्रक्रुतीचे रिटायर्ड तरुण मस्त बेफिकिरीने फिरतात तर नातवंडं साभाळत टिव्ही सिरियल मॅच बघत देशाटन करत फिरतात.. यांचा कसा देश सेवे साठी देशातील अशिक्षीत जनतेच्या पुढील पिढीवर संस्कार करण्यासाठी, नागरि /खेड्यातील समाजासाठी उपयोग ( कम्पलसरी करुन) घेता येईल.. व हे अमिर अमिताभ लता, साठे, इत्यादी च्या मदतीने करता येईल का? यातील ठणठणीत सिनियर सिटिझनना विविध कस्नसेशन फायदे देण्या पुर्वी नियमित (फ्रिलान्सिंग) काही सामाजिक देशकार्य करणे कम्पलसरी करणे आवश्यक आहे..
    भाऊ आपल्या लेखातील अनेक वाक्ये अनेक सामाजिक, देशाच्या व कुटुंबाच्या समस्यांची उकल व ऊपाय करणारी असतात.. अशा वाक्यांचा एक अल्बम केला तर तो निश्र्चीतच एक दिपस्तंभ होईल... धन्यवाद
    एकेएस

    ReplyDelete
  7. भाऊ त्या भन्साळीने असेच विकृत चित्रीकरण बाजीराव पेशवेंचे केले होते पण दुर्दैवाने महाराष्ट्रात काहीच प्रतिक्रिया उमटली नाही, त्यामूळे त्याची हिम्मत वाढली आणि त्याने ह्या वेळेस मोठा घास घेतला, पण हा पंगा त्याच्या अंगलट येणार असे दिसते.

    ReplyDelete
    Replies
    1. As Peshwa is Brahmin and hence ..

      Delete
    2. हो ना महाराष्ट्र "पुरोगामी" आणि पेशवा ब्राह्मण !
      विरोध दाबायला दोन कारणे पुरेशी
      ...अंगलट आला तर बरेच होईल

      Delete
  8. BhanSali should direct similar movie such movie about his father , fore fathers, fore fore fathers. Hope he will have daring to see that movie with ordinary people in any ordinary theatre.

    ReplyDelete
  9. भाऊ असाच एक लेख (दशक्रिया) वरती पण अपेक्षित आहे

    ReplyDelete
  10. या अशा big budget चित्रपटांचा खर्च कुणाच्या जीवावर होतो हा सध्या माझ्या कुतूहलाचा विषय बनतो आहे भाऊ.. नक्कीच केवळ 'सृजन'शक्ती यामागे नाही एवढं तरी कळायला लागलं आहे हा trend बघून..!!

    ReplyDelete