Sunday, November 19, 2017

राहुल पंतप्रधानांचा OTHER करतात

rahul manmohan के लिए चित्र परिणाम

अमेरिकेहून माघारी आल्यापासून कॉग्रेसचे उपाध्यक्ष कमालीचे फ़ॉर्मात आलेले आहेत. बाकी काही नाही तरी त्यांनी आपली पप्पू ही प्रतिमा पुसली जावी, यासाठी कष्ट घ्यायला आरंभ केला आहे. त्याची सुरूवात त्यांनी सोशल मीडियातून छोटे पण अर्थपुर्ण संदेश टाकून केला आहे. असे संदेश मग गावभर फ़िरवण्याची सुविधा त्या माध्यमात काही कंपन्या करून देत असतात. त्याचा योग्य वापर करून राहुल गांधी आजकाल ‘व्हायरल’ झाले आहेत. म्हणजे त्यांचा प्रत्येक संदेश वा मतप्रदर्शन व्हायरल होत असल्याच्या बातम्याही नित्यनेमने येऊ लागल्या आहेत. अर्थातच अशा व्हायरल बातम्या वा संदेशांची मिमांसा होण्याचे काही कारण नसते. सहाजिकच आपण कसे सभ्य व सुलक्षणी आहोत आणि मोदी कसे असंस्कृत रानटी आहेत, ते सांगण्याची संधी राहुलनी साधली तर गैर नाही. अशा आरोप वा चिखलफ़ेकीसाठी माध्यमातला एक वर्ग कायम भुकेलेला असतो. त्यामुळे या व्हायरल होण्याला वेगही येतो. तर अलिकडे राहुलनी आपण मोदींवर टिका करतो, पण त्यांच्या पंतप्रधान पदाचा आदरही करतो, असा एक संदेश पाठवला होता आणि तोही व्हायरल झाला. यात आदर हा शब्द राहुलनी कोणत्या भाषेतून वापरला, असा काही सामान्य बुद्धीच्या लोकांना प्रश्न पडलेला आहे. कारण हिंदी मराठीत आदर हा सन्मान या अर्थाने वापाला जाणारा शब्द आहे. तर इंग्रजीत आदर म्हणजे इतर कोणी सोम्यागोम्या असाही अर्थ होतो. राहुल इंग्रजीतला OTHER म्हणत असावेत काय? कारण मोदी पंतप्रधान झाल्यापासून वा मुख्यमंत्री असताना त्यांचा कॉग्रेसने किती आदर केला हे सर्वांना ठाऊकच आहे. पण मोदी बाजूला ठेवून त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राहुल किती OTHER करायचे, त्याचेही व्हायरल बातम्या देणार्‍यांना विस्मरण कसे झाले?

२०१३ सालात संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेला गेलेले होते. त्यापुर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक अध्यादेश तयार केला होता आणि तो राष्ट्रपतींच्या सहीसाठी रवाना केलेला होता. त्यावरून मोठी खळबळ माजलेली होती. लालूप्रसाद व तत्सम कोर्टात दोषी ठरून शिक्षा झालेल्यांचे अपील बाजूला ठेवून, त्यांची निवड रद्द करावी, असा सुप्रिम कोर्टाने निकाल दिलेला होता. तो गुंडाळून अशा दोषपात्र लोकप्रतिनिधींची निवड कायम राखण्यासाठी तो अध्यादेश होता. सहाजिकच त्यावरून उलटसुलट प्रतिक्रीया उमटत होत्या. त्याविषयीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कॉग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी एक पत्रकार परिषद योजली होती आणि त्यात अध्यादेशाचे समर्थन माकन करीत असताना राहुल तिथे पोहोचले. मग त्यांनी पत्रकारांशी काही मिनीटे एकतर्फ़ी संवाद साधला. त्यात तो अध्यादेश म्हणजे शुद्ध मुर्खपणा असून तो फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे सांगून टाकले. याला पंतप्रधान व त्यांच्या एकूण मंत्रीमंडळाचा OTHER करणे म्हणतात. तसा तो आदर राहुलनी इतक्या जाहिरपणे केला, की अमेरिकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जागतिक नेत्यांमध्ये तोंड वर करून चालण्याचीच चोरी झालेली होती. त्यांनी तशी तक्रार फ़ोन करून सोनियांच्या कानी घातली होती. इकडे राष्ट्रपती प्रणबदांनी त्या अध्यादेशावर सही करण्याऐवजी तो तसाच बाजूला सारून ठेवला. अखेरीस मनमोहन माघारी परतले, तेव्हा त्यांनीही निमूट तो अध्यादेश रद्द केला. याला म्हणतात पंतप्रधान पदाचा OTHER करणे. पंतप्रधान असो किंवा अन्य कोणी गल्लीतला नगरसेवक, राहुलना फ़रक पडत नाही. स्वत:ला सोडल्यास ते बाकीच्यांना ‘इतर कोणीतरी’ म्हणजे OTHER करत असतात. मनमोहन त्याला अपवाद नव्हते. योगायोगाने ते पंतप्रधान पदावर बसलेले होते.

राहुल गांधी यांनी आपल्या पित्याचा इतका केलेला OTHER बघून मनमोहन सिंग यांची कन्या कमालीची विचलीत झाली होती आणि तिला आपल्या पित्याने असा OTHER होण्यापेक्षा सत्तापदाचा राजिनामा द्यावा असे वाटलेले होते. कधीकाळी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेल्या संजय बारू यांनी जाहिरपणे तसे ट्वीटरवर लिहीले होते आणि मनमोहन कन्येने त्याला दुजोरा दिलेला होता. असाच कुणाचा OTHER केला जात असेल, तर त्यापेक्षा अपमान बरा म्हणायची वेळ येणार ना? म्हणून मनमोहन यांनी अमेरिकेतून फ़ोन करून सोनियांचे अशा आदरातिथ्यासाठी आभार मानले होते. यामुळे अमेरिकेत मनमोहन यांचा किती सन्मान वाढलेला असेल? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही तेव्हा तिथेच होते आणि पत्रकारांनी अनौपचारीक गप्पा मारताना त्यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख पाणवठ्यावरची रडवेली बाई म्हणून केलेला होता. मात्र तिथे हजर असलेल्या कुणा भारतीय पत्रकाराने नाराजी व्यक्त केली नाही, की त्याची बातमीही प्रसिद्ध होऊ दिली नाही. व्हायरल होणे तर दूरची गोष्ट झाली. अर्थात तेव्हा व्हायरल हा शब्द मराठी वा भारतीय पत्रकारितेत रुढ झालेला नव्हता. पण पुढे लोकसभेच्या निवडणूका लागल्या आणि तेव्हा प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी तो किस्सा जाहिरपणे कथन केला. तेव्हा त्याच्या बातम्या गाजल्या. आजच्या भाषेत नवाज शरीफ़ यांनी नावाजलेल्या पंतप्रधानांचा OTHER व्हायरल झाला होता. त्यात मोदींनी भारतीय पत्रकाराचे नाव सांगितले नव्हते. पण तरीही आपण त्या नवाज गप्पांमध्ये सहभागी नव्हतो, असा खुलासा बरखा दत्त या महिला पत्रकाराने तडकाफ़डकी केलेला होता. म्हणूनच आता राहुल पंतप्रधानांचा आदर करतात म्हणत असतील, तर त्यातला OTHER समजून घेण्याची गरज आहे. पण बातम्या व्हायरल झाल्या जी बुद्धीही चक्रावून जाते ना? म्हणून राहुन गेले असेल.

मुद्दा राहुलनी कुणाचा आदर वा OTHER करावा असा नसून, माध्यमांच्या व्हायरल होण्याचा आहे. यापैकी कोणाला या शब्दांचे अर्थही उमजेनासे झालेले आहेत, ही बाब लक्षणिय आहे. त्यापैकी मोदींनी पंतप्रधानांचा कोणता अवमान केला वा अनादर केला, त्याचा खुलासा विचारणे आवश्यक नाही काय? जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडून भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांची टवाळी झाली, त्याचा जाब विचारण्याची हिंमत कुठल्या पत्रकाराने केली नव्हती. तेव्हा त्याचा जाब माध्यमांना विचारण्याचे धाडस मोदींनी केले. याला मनमोहन नावाच्या पंतप्रधानाचा अवमान म्हणावे काय? ती बातमी झाकूनपाकून ठेवण्याला सन्मान म्हणायचे काय? नसेल तर कुठल्याच माध्यमाने त्याचा कुठे उल्लेख कशाला केला नव्हता? मोदींना ही खबर लागली, म्हणजे असे काही घडलेले होते आणि तिथे भारतीय पत्रकार उपस्थित होता. नवाज शरीफ़ असे काही बोलले तेव्हा आपण तिथे हजर नव्हतो, असा खुलासा बरखा दत्त करते, म्हणजे शरीफ़ यांनी मनमोहन यांची टवाळी केल्याचे तिलाही ठाऊक होते याचीच ग्वाही दिली जाते. पण त्याच्या विरोधात साधा निषेध वा नाराजी व्यक्त करण्याचे कष्टही कोणी घेतले नव्हते. त्याला वाचा फ़ोडण्यातून मोदींनी पंतप्रधान पदी असलेल्या मनमोहन यांचा अपमान केला, असे राहुलना म्हणायचे असेल तर त्यांच्या बुद्धीचे कौतुकच करायला हवे ना? त्याहीपेक्षा त्याविषयी मौन धारण केलेल्या भारतीय माध्यमांचेही गुणगान करायला हवे. राहुल उशिरा व्हायरल झाले. त्यापुर्वीच भारतीय पत्रकार व माध्यमे किती सैरभैर सॉरी, व्हायरल झालेली आहेत, त्याचीच ही साक्ष म्हणायला हवी. असो, अशा लोकांकडून आदर मिळवण्यापेक्षा त्यांचे शिव्याशाप अधिक अभिमानास्पद असू शकतात. म्हणूनच असावे, देशातल्या जनतेने मोदी यांना पंतप्रधान पदावर नेवून बसवले असावे. जनतेलाच आपल्या पंतप्रधानाला OTHER केलेले बघवले नसावे कदाचित!

8 comments:

  1. भाऊ जर राहुल गांधी खरंच पप्पू आहे. जो पर्यंत हा पप्पू आहे तो पर्यंत मोदींना अभय आहे तर मग भक्त पप्पूवर तुटून का पडतात? दुर्लक्षित का नाही करत?

    ReplyDelete
  2. मनमोहन पंतप्रधान असताना मनमोहन तसेच सोनिया यांच्या बद्दल अत्यंत अभद्र मजकूर असणारे जोक्स , इमेजेस व्हायरल होत असत. यामागे बीजेपीची आयटी सेल टीम नव्हती असे कुणी ठामपणे म्हणू शकत नाही. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर सोशल मीडियावर तुफान हल्ला झाला आहे आता मोदींवर कुणी टीका केली तर भक्तलोक/ भाजप नेते पण पंतप्रधान पदाचा मान राखला जावा वगैरे बोलबच्चन देत असतात.
    बाकी भ्रष्ट नेत्यांबद्दलचा तो अध्यादेश बरोबर होता कि चूक? यावर पण बोलायला हवे. तो अध्यादेश आला नाही हे बरेच झाले.

    ReplyDelete
  3. Aho bhau tumchyasarkhyane itke shabda kharchi paadave yatach Rahul Gandhi yancha mahtva lakshat yeta tyamule tumchyasarkhe badve jitka lihtil titka tyanchyach faydyachay ho, tyamule tumhala shubhecha

    ReplyDelete
    Replies
    1. सत्तेवर नसल्याने काँग्रेस च्या दलालांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे दशकानुदशके खुर्चीच्या ऊबेची लागलेली सवय आता खुर्ची सत्ता गेल्याने व्यसनाधीन माणसा प्रमाणे किती वेडेपीसे करते याचे हे उदाहरण आहे.
      राजेशाही प्रमाणे पिढ्यांपिढ्या भारताची गादी चालवायची सवय व गांधी गांधी करत त्यांच्या नावावर सत्ता मिळवायची व हांजी हांजी करत चपला उचलायच्या हीच जमात तुमच्या सारख्यांनी निर्माण केली..
      येवढा दम पप्पु मध्ये होता तर एखादे तरी कार्य करुन दाखवून जनतेकडे मतांची भिक मागायची. पण ती पण लायकी नाही.
      मुक्या बाहुला सत्तेवर बसवुन पडद्या आडुन स्वतः सत्ता चालवायची ही सवय लागली.
      मोदीनी परत लोकसभेत 2019 ला सत्ता मिळाली तर आत्मघात करण्याशिवाय गत्यंतर ऊबेवर जगणार्यांना राहणार नाही.

      Delete
  4. आता राहुल स्वतःच पक्षाध्यक्ष होणार असल्याने त्यांना परत कोणा काँग्रेस नेत्यांचा 'OTHER'करावा लागणार नाही हे नक्की

    ReplyDelete
  5. ज्यांनी आयुष्यभर गाँधीनच्या नावाने भड़वेगीरी केली, त्यांच्या कडून याच्या व्यतिरिक्त काय अपेक्षा करणार?

    ReplyDelete
    Replies
    1. गांधीच्या नावाने भडवेगिरीची गरजच नाही. उपजत असलेला मूर्खपणा त्यांना लयास घेऊन जाण्यास समर्थ आहे.

      Delete