Saturday, November 11, 2017

समर्था घरीचे पंतप्रधान

 manmohan vadra के लिए चित्र परिणाम

तुमच्या सहकार्याशिवाय किंवा संमतीशिवाय तुम्हाला कोणी अपमानित करू शकत नाही, असे म्हटले जाते. चटकन विचित्र वाटणारी ही उक्ती आहे. पण कधीकधी अशी उक्ती खरी ठरवुन देणारे काही प्रसंग अनुभवाला येत असतात. माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांनी अलिकडेच एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ‘आघाडीची वर्षे’ असे त्या पुस्तकाचे शीर्षक असून, त्याच्या प्रकाशनाचे अनेक कार्यक्रम झाले. त्यापैकीच एका कार्यक्रमात बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही दिलखुलासपणे प्रणबदाच्या एका दाव्याला दुजोरा दिला. २००४ सालात देशात सत्तांतर घडले आणि सोनिया गांधी पंतप्रधान होणार अशी चिन्हे होती. पक्षाकडे बहूमत नव्हते. तरॊ भाजपाला सत्तेपासून दूर राखण्याचा राजकीय अजेंडा बनवणार्‍यांनी सोनियांना पंतप्रधान पदासाठी निवडले होते. पण त्यांच्या परदेशी जन्मा्चा इतका गाजावाजा करण्यात आला, की सोनियांचे धैर्य गळाले आणि ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. सहाजिकच त्यांच्या जागी अन्य कुणा कॉग्रेस नेत्याची पंतप्रधानपदी वर्णी लागणार, अशीच सर्वांची खात्री होती. त्याला प्रणबदा वा मनमोहन अपवाद नव्हते. त्या दोघांपैकी प्रणबदांना राजकारणाचा व प्रशासनाचा चांगलाच अनुभव होता. त्यामुळे त्यांचीच निवड होणार, असे अनेकांना वाटणे गैर नव्हते आणि तेही योग्यच होते. खुद्द मनमोहन सिंग यांनीच प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्याची कबुली दिली. किंबहूना आपल्यापेक्षाही प्रणब मुखर्जी त्या अधिकाराच्या लायक होते, असे सांगताना आपण त्या योग्यतेचे नव्हतो, याचीच कबुली मनमोहन सिंग यांनी दिलेली आहे. मात्र लायकी नसतानाही ते पद व अधिकार त्यांनी दहा वर्षे बिनदिक्कत उपभोगला. सवाल इतकाच, की अशा व्यक्तीपाशी गुणवत्तेची कितीही प्रमाणपत्रे असली तरी त्याला गुणवत्तेचा सन्मान करणे तरी कळते काय, असा प्रश्न उरतो. किंबहूना त्याच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा तरी बाळगता येईल काय, असा प्रश्न पडतो.

भारतासारख्या खंडप्राय देशाला नेतॄत्व किंवा ते देताना सरकार चालवणारा सर्वोच्च गुणवत्तेचा व लायकीचा असावा, असेही ज्यांना वाटले नाही, त्या व्यक्तीला अवघे जग मनमोहन सिंग म्हणून ओळखते. सातत्याने त्यांच्या गुणवत्तेचे व बुद्धीमत्तेचे दाखले दिले जात असतात. पण ती बुद्धी वापरण्याची कसोटीची वेळ आली, तेव्हा त्यांनी चक्क तिकडे पाठ फ़िरवून देशाचे नुकसान केलेले आहे. आपल्यापेक्षाही प्रणबदा पंतप्रधानपदाला लायक होते, असे सांगण्यामागे आपली नालायकी वा अपात्रताच कबुल केली जात असते. किंबहूना अशा अपात्र व्यक्तीला पंतप्रधानपदी निवडण्य़ात सोनियांची चुक झाली होती, असेही मनमोहन कबुल करीत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की हे गृहस्थ त्याच चुकीचे निर्णय घेणार्‍या व्यक्तीचे नेतृत्व मान्य करून, देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले होते. पुढल्या दहा वर्षात त्यांनी कारभार केला. त्यातून त्यांची खरी गुणवत्ता वा पात्रता काय होती, हे कोर्टाला व खटल्यांनाच सिद्ध करायची नामुष्की आली. या गृहस्थांच्या नजरेसमोर देशाची राजरोस लूट होत राहिली. पण या माणसाने तिकडे वळूनही बघायचे नाकारले होते. जे दिसत होते, त्या लूटमारीकडे डोळेझाक करणे, हीच तर मनमोहन सिंग यांच्यातली मोठी गुणवत्ता सोनियांनी आधीपासून ताडलेली होती. किंबहूना प्रण्बदा मुखर्जी यांच्यापाशी तीच पात्रता वा गुणवत्ता नव्हती. म्हणून त्यांना सोनियांनी खड्यासारखे बाजूला सारले होते आणि त्यांच्याऐवजी मनमोहन यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवले होते. अप्रत्यक्षपणे हे माजी पंतप्रधान आपल्या पापाचीच कबुली देत आहेत. आपल्या हातून पापकर्मे करून घेण्य़ास आपण राजरोस हातभार लावला. त्यासाठीच आपली निवड झाली होती, अशीही कबुली त्यात दडलेली आहे. आजवर हे अनेक विरोधकांनी व टिकाकारांनी उघडपणे बोलून झालेले आहे. त्या समारंभात त्या गृहस्थांनी त्याची स्वमुखाने कबुली दिली इतकेच!

आजही कोणी मनमोहन सिंग यांच्यावर व्यक्तीगतरित्या पापाचा वा लूटमारीचा आरोप करू शकत नाही. पण त्यांच्या कारकिर्दीत राजरोस सरकारी तिजोरी व देशाच्या साधनसंपत्तीची लूट झाली. याचाही कोणी इन्कार करू शकत नाही. सोनियांनी सन्मान म्हणून वा अधिकार म्हणून मनमोहन यांना पंतप्रधानपदी बसवलेले नव्हते. तर कळसुत्री बाहुल्याप्रमाणे नाचवले जाईल तसे नाचण्याची अगतिकता, ही मनमोहन यांची खरी गुणवत्ता सोनियांना ठाऊक होती. प्रणबदा मुखर्जी यांच्यासारखा बुद्धीमान व स्वयंभू नेता त़सा कठपुतळीप्रमाणे वापरता आला नसता, म्हणूनच सोनियांनी त्यांना नाकारले होते. आपल्या पुस्तकात त्याविषयी प्रणबदांनी कुठे नाराजी व्यक्त केलेली नाही. कारण बहुधा आपली प्रतिष्ठा नकारातून सोनियांनी राखली, असेच त्यांचेही मत असावे. एक मोठे अधिकारपद नाकारले जाण्यातही सन्मान असू शकतो, याचीही साक्ष प्रणबदांनी या गोष्टीतून कथन केलेली आहे. त्याचे उलटे टोक आहेत मनमोहन. त्यांना आपल्या अपमानाचीही किंचीत खंत नाही. त्याची जाहिरपणे कबुली देण्याचीही लाज वाटलेली नाही. इंदिराजींनी अर्थमंत्रीपद काढून घेतले, म्हणून मंत्रीमंडळाचा राजिनामा देणारे मोरारजी देसाई याच कॉग्रेसमध्ये होते. राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणात अवसानघातकी भूमिका घेतल्याने मंत्रीपदाचा राजिनामा देणारे आरीफ़ महंमद खान याच कॉग्रेस पक्षात होते. आज त्या पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, त्याचा दाखला म्हणून मनमोहन यांचे उदाहरण जगासमोर आहे. तिथे साधा मंत्री वा कार्यकर्ता सोडा, पंतप्रधानपदालाही काही किंमत दर्जा राहिलेला नाही. समर्था घरीचे श्वान रहाण्यात धन्यता मानणार्‍यांनाच तिथे जगा असू शकते. ज्यांच्यापाशी कर्तृत्व आहे वा स्वयंभू गुणवत्ता व आत्मविश्वास आहे, त्यांना कॉग्रेस पक्षात काही स्थान असू शकत नाही, याची ही कबुली आहे.

कालपरवा राहुल गांधी यांनी आपले ट्वीटर खाते कोण चालवतो, किंवा त्यात कोण मतप्रदर्शन करीत असतो, त्याचा खुलासा केल्याचा खुप गाजावाजा झाला होता. त्यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याचे एक चित्रण टाकलेले होते. तो त्यांच्या इच्छे बरहुकूम हालचाली करतो आणि कसरती करतो. तोच आपला सोशल मीडियातील प्रवक्ता असल्याची ही कबुली आणि मनमोहन सिंग यांनी आपल्याला मिळालेल्या पंतप्रधानपदासाठीच्या गुणवत्तेचा केलेला खुलासा स्पष्ट आहे. अर्थातच तेवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. ज्यांना तसे वागता येत नसेल त्यांना कसे हाकलून लावले जाते, त्याचीही डझनावारी उदाहरणे आहेत. दिल्लीच्या महापालिका मतदानापुर्वी बरखा सिंग वा अन्य कॉग्रेसनेते पक्षातून बाहेर पडले. कारण राहुल वा सोनियांनी त्यांना भेटायचेही नाकारल्याची तक्रार होती. तीन वर्षापुर्वी माजीमंत्री जयंती नटराजन यांनीही अशीच तक्रार केली होती आणि आसाम निवडणूकीपुर्वी पक्ष सोडून भाजपात गेलेल्या हेमंत विश्वशर्मा यानीही तोच अनुभव सांगितला होता. आसाममध्ये कॉग्रेस पक्षाचा दारूण पराभव कसा झाला, त्याची माहिती द्यायला विश्वशर्मा राहुलच्या घरी गेले होते. कार्यकर्ते आपल्या समस्या मांडत असताना राहुल कुत्र्याला बिस्कीटे खिलवत रमलेले होते. त्यालाच अपमान समजून विश्वशर्मा यांनी पक्ष सोडला आणि अशा पक्षनेतॄत्वाला धडा शिकवण्यासाठी ते भाजपात गेले. त्यांच्याच प्रयत्नांनी आसामामध्ये कॉग्रेसचा पुरता धुव्वा उडाला. एका राज्यातला कॉग्रेसमंत्री किंवा केंद्रातली एक राज्यमंत्री यांनी आपला स्वाभिमान वा सन्मान राखण्याची जितकी हिंमत दाखवली, ती मनमोहन यांच्यापाशी कधीही नव्हती. कुठल्याही अवहेलना व अपमानाला ते कायम सज्ज होते आणि तीच या गृहस्थांची समर्था घरीची सर्वात मोठी गुणवत्ता ठरलेली होती. त्याची कबुली देतानाही त्यांना तिळमात्र खंत वाटलेली नाही. कुणा भारतीयाला अशा पंतप्रधानाविषयी कशाला कौतुक असावे?

अर्थात ही गोष्ट मनमोहन वा दिल्लीतल्या कोणा नेत्यापुरतीच नाही. सोनिया वा राहुल यांना कधीच गुणवत्तेचे कौतुक नव्हते. किंबहूना त्यांना अशा पात्र व गुणवान लोकांचा कायमचा तिटकारा होता. म्हणून तर त्यांनी सभोवती नसलेल्या शेपट्या हलवणार्‍या निष्ठावंतांचा कळप गोळा करून ठेवला होता व आहे. जेव्हा कसोटीची वेळ आली, तेव्हा अशा प्रत्येक निष्ठावानाने शेपूट घालून पळ काढला, हा ताजा इतिहास आहे. लोकसभेत पराभव होणार हे चित्र साफ़ झाल्यावर चिदंबरम वा मनिष तिवारी अशा खंद्या निष्ठावंतांनी मैदानातून पळ उगाच काढला नाही. आज असेच लोक पक्षश्रेष्ठी म्हणून मिरवत असतात आणि त्यांच्या तशा गुणवत्तेवर कुठल्याही निवडणूकीला सामोरे जाण्याची हिंमत कॉग्रेस पक्ष गमावून बसला आहे. अशा मनमोहन सिंग यांनी विद्यापीठांची प्रमाणपत्रे व गौरवपत्रे दाखवून कितीही भाषणे ठोकली म्हणून या देशाची सामान्य जनता त्यांच्याकडे ढुंकून बघत नाही. पण आपली प्रतिष्ठा व अधिकार मर्यादा ओळखून राजकारण केलेल्या निवृत्त राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना सोनियांच्या पक्षातले असूनही देशभर मान्यता लाभलेली आहे. कारण त्यांनी मोठ्या सत्तापदासाठी आपल्या बुद्धीला गुंडाळून इमानदारीची शेपूट हलवण्यात धन्यता मानली नाही. मिस्टर मनमोहन, त्याला ‘गुणवत्ता’ म्हणतात. कागदोपत्री मनमोहन यांची देशाचे दहा वर्षे राहिलेले पंतप्रधान अशी नोंद नक्कीच होईल. पण लोक मात्र त्यांना भारताचे नव्हेतर समर्थाघरीचे पंतप्रधान म्हणूनच ओळखतील. कारण आजचे वर्तमान चांगलेच नोंदले जात असते आणि त्याचे विविध पैलूही नोंदले जातात. की उतारवयात आपल्या चुकांची कबुली देण्यासाठी मनमोहन यांनी अशी विधाने केली असतील? कारण कुठलेही असो, इतिहास त्यांना माफ़ करणार नाही. भविष्यही त्यांना दयामाया दाखवणार नाही. कारण अधिकाराच्या सोबत आलेल्या जबाबदारीशी त्यांनी दगाबाजी केली आहे.

16 comments:

  1. भाऊ... फारच कडक लिहिलंय..हे जसंच्या तसं इंग्लिश किंवा हिंदी मध्ये भाषांतर करून देशभरात पसरलं पाहिजे..!
    कोणी करेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Mobile madhe yeto option. Jya madhe purna blog English madhe translate hoto.

      Delete
  2. ज्याच्यावर मर्यादित टीका होईल असं नो नॉनसेन्स व्यक्तिमत्व निवडण्यात सोनियाबाई यशस्वी झाल्या. म.मों.नीही आपला वापर करून दिला. स्वतःचे पद राखून स्वाभिमानाचे शिरकाण करणारा राजकीय नेता मनमोहन यांच्या रूपाने देशाला मिळाला. नोटबंदीच्या काळातही हे कळसूत्री बाहुले मायलेकांनी यथेच्छ वापरले.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Manamohan Singh becoming India's PM might had been a tragedy for us as a nation. But more scary thought is what if RG becomes our PM. We as a nation do not have strong democratic parties who elect their leader in a transparent manner. To me that is bigger issue today than Manmohan Singh will be pardoned or not for his deeds or lack of it. BJP is little better compared to Congress but when it comes to having truely democratic intra party system, they also need to do more to make it transparent to the nation and its citizens as to how they elect their leader. Once that is done by our political parties, youngsters of this country will openly dream and aspire for the top position of country. Look at the America! How consistently they are giving dynamic leaders to their country and to the world.

    To be fair with the BJP, I would say they at least have an institution like RSS keeping them sane and on their toes. You may like or hate them, the fact is that RSS is the only institution on pan India scale who cares about this nation passionately and their members are serving the nation without getting a penny out of it.

    But from the political paties and their intra party transparent democratic system perspective we as a nation has a lot more to do.

    Hemant Tilekar
    (Some typos are corrected. Previous comment is deleted. Moderator - Request to publish this corrected comment.)

    ReplyDelete
  5. Bhau Apratim blog ahe. Ek khant , hya blog che jar English translation milale tar English knowing Pseudo Sickularist lokann paryant pochu shakel. Tumchi sarva blog English madhye upalabda zale pahije hi tumchya pashi prarthana.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Kriya yogi,
      Just right click on this page and select 'Translate in English'. This precise writing is available in english then..!

      Delete
  6. Ha blog sarva desh Bhar pasarla pahije ani vividh bhashan kadhun, hi ek taltalichi vinanti Bhau. Dhanyawad

    ReplyDelete
  7. गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे |
    जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा ||

    स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर


    ReplyDelete
  8. नेहमीप्रमाणेच परखड भाऊ !

    ReplyDelete
  9. Since Indara Gandhi took over it has been like this only you have to know "CHATUGIRI", when I was young my grandmother use to say "HANJI" karu nakos this is 100 % true in Congress then where the question comes of sustaining, if congress wants to come back they need to have leader like joytirdatya Scindia who has the capacity to make upside down this congress party some thing like Devendra Phadanvis proved "DARK HORSE"

    ReplyDelete
  10. भाऊराव,

    बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल या पाकिस्तानी हस्तक असलेल्या बदनाम बँकेस भारतात परवाना देण्याचं पाप मनमोहन सिंगांच्या डोक्यावर आहे. यांस टेररिस्ट फायनान्सिंग म्हणतात. गांधी परिवार मनमोहन सिंगांना यावरून सतत ब्लॅकमेल करंत आलेला आहे. मनमोहनसिंगांना तोंड दाखवायला जागा नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  11. लेखक कमालीचा परखड आणि अभ्यासक आहेच, पण त्याहीपेक्षा "to read between the lines (प्रत्येक वाक्यातील योग्य मतितार्थ) जाणणारा आहे, हे निर्विवाद

    ReplyDelete
  12. Right click and select 'Translate in english'. I wanted to paste english translation in the reply, but at most 4,096 characters it can accept in reply or comment.
    Indeed the blog is PRICELESS, Dhanyavad Bhau..!

    ReplyDelete
  13. भाऊ, प्रणवदानी पुस्तक छापले आणि म्हणावा तसा हादरा बसला नाही काँग्रेसमध्ये. कारण अनेक मनमोहन सिंग आहेत काँग्रेसमध्ये. 84पूर्वीचा काँग्रेस पक्ष आणि नंतरचा काँग्रेस पक्ष, फारच फरक आहे नेत्यामध्ये आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये. पायलट,शिंदे यांच्या जाण्याने व शरद पवार सारखा विचार करणारा नेता नसल्याने काँग्रेसचे हे हाल झाले आहेत असे मला वाटते. आता बघू शहजादा काय प्रकाश पाडतो. चांगल्या विचाराचे नेते त्याला आवडत नाहीत, इतर जे आहेत ते उंदीर आहेत, जहाज बुडण्याची वाट बघत आहेत.

    ReplyDelete