Tuesday, November 14, 2017

छुना ना छुनाना

dirty picture के लिए चित्र परिणाम

कुणी जवान आपल्या छातीकडे रोखून बघत होता, अशी तक्रार विद्या बालन या अभिनेत्रीने केली आहे. पण त्यात तिला आक्षेपार्ह काय वाटले, त्याचा खुलासा मात्र तिने केलेला नाही. तो इतक्यासाठी आवश्यक आहे, की विद्याचे चित्रपट काहीशी तशीच प्रतिमा निर्माण करणारे आहेत. प्रामुख्याने ‘डर्टी पिक्चर’ नावाच्या चित्रपटात तिने तशी भूमिका ‘वठवलेली’ होती. सिल्क स्मिता नावाची एक नर्तिका अभिनेत्री दाक्षिणात्य रुपेरी पडद्यावर दिर्घकाळ गाजलेली आहे. कुठल्याही चित्रपटात तिला अंगप्रदर्शन करण्यासाठीच घेतले जात असे आणि तिने कधी आढेवेढे घेतले नाहीत. सहाजिकच गल्ला जमवण्यासाठी एक काळ सिल्क स्मिता ही प्रत्येक दाक्षिणात्य चित्रपटातली आवश्यक बाब बनून गेलेली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना या नर्तिकेने आत्महत्या करून इहलोकीची यात्रा संपवली होती. मग तिच्या आयुष्यात कुठले दु;ख वा पोकळी भरून राहिली होती, त्याचीही खुप चर्चा झालेली होती. सहाजिकच तिच्या रहस्यमय प्रेमजीवन वा प्रणय जीवनावर कथा रंगवण्याचे कुठल्या दिग्दर्शकाच्या मनात आले, तर नवल नाही. मात्र हा चित्रपट हिंदीत तयार झाला आणि स्मिताची तशी नायिका म्हणून भूमिका विद्या बालन हिने साकारली. सहाजिकच त्यामध्ये तिला तितके उत्तान नाच व अभिनय करावा लागणे भाग होते. पण ‘कथेसाठी आवश्यक’ असा अभिनय करताना आपण प्रेक्षक म्हणून जमणार्‍या गर्दीसमोर अंगप्रदर्शन करीत आहोत, हे विद्याला कळत नव्हते असे कोणाला म्हणायचे आहे काय? किंबहूना अशा अंगप्रदर्शन व कथानकातून स्त्रीला कामुक वस्तु म्हणूनच पेश केलेले असते आणि तिच्याकडे लंपट लोकांच्या हावर्‍या नजरा वळाव्यात हीच प्रमुख अपेक्षा असते. ती भले लेखक दिग्दर्शकाची अपेक्षा असेल. पण विद्याने ती पुर्ण केल्यावर इतर कोणाला दोष देण्याची गरज काय?

तुम्ही अगत्याने जे दाखवता वा बघायसाठीच पेश करता, त्याकडे कोणी दुर्लक्ष करील तर कोणी रोखून बारकाईने बघणारच. तसा कोणी तुमच्या घरात वा शयनगृहात डोकावत नसतो. तुम्हीच प्रदर्शन मांडलेले असते आणि त्यासाठी किंमतही वसुल केलेली असते. मग अशी मंडळी अभिनेते वा कलावंत म्हणून प्रसिद्धी पावतात. लोकही मग त्यांच्याकडे पडद्यावरची प्रतिमा म्हणूनच बघत असतात. त्यांना सामान्य माणसे म्हणून जगायची मुभा रहात नाही. तो वनवास गृहीत धरूनच अशा चमचमत्या जगात झेप घेणे भाग असते. असे कोणी नावाजलेले कलावंत वा अभिनेते अभिनेत्री सार्वजनिक स्थळी वा कार्यक्रमात सहभागी व्हायला जातात, तेव्हा सर्वांची नजर नेमकी त्यांच्यावरच रोखलेली असणार ना? किंबहूना जमणार्‍या गर्दीसमोर त्यांना बुद्धीमंत वा संन्याशी म्हणून कोणी पेश करत नसत्तो. तर प्रेक्षणिय वस्तु म्हणूनच पेश केले जात असते. कुठल्या सैनिकी कार्यक्रमात विद्याला असे आमंत्रण दिलेले असेल, तर त्यात तिला सामान्य स्त्री म्हणून बोलावलेले नसते. चित्रपट पडद्यावर केवळ भासमात्र म्हणून बघितलेली सुंदरी हाडामासाची बघायला मिळणार, असेच त्या गर्दीमागचे आकर्षण असते. मग त्यापैकी कोणी तुमच्याकडे रोखून बघत असेल, तर त्यात विकृती शोधण्याचा सोवळेपणा कशाला? अशा परिस्थितीला आपण कायम सज्ज राहिले पाहिजे. कारण अशा विखारी हावर्‍या नजरांना आपणच कामातून आमंत्रित केलेले असते. शिवाय असे पुरूष केवळ सैन्यात असतात वा विद्याकडेच तसे बघतात, असे म्हणायची गरज नाही. सर्वत्र तोच मामला असतो आणि प्रामुख्याने फ़ॅशन वा चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रियांना उपभोग्य वस्तु म्हणूनच पेश केले जात असते. पुरूषांच्या तशा नजरेची त्यातून शेतीच चाललेली असते. मग बिचार्‍या एका सैनिकावर असा आरोप करण्यात कुठला शहाणपणा आला?

विद्या ही कुणी दुधखुळी मुलगी नाही. आजच्या जगात आसपास घडणार्‍या गोष्टींविषयी तिला पुरती जाण आहे. देशातल्या सार्वजनिक जीवन वा कुठल्याही क्षेत्रात मोठे मान्यवर प्रतिष्ठीतही स्त्रियांच्याकडे कुठल्या नजरेने बघत असतात, त्याच्या विविध बातम्या नित्यनेमाने येत असतात. कुठल्याही कचेरीत वा सार्वजनिक ठिकाणी असे आंबटशोकी लोक असतातच. पण प्रसंग ओढवला, तर त्यापैकी कोणी आपले प्राण पणाला लावून लढायला पुढे येत नसतो. मात्र भारतीय लष्करातले वा कुठल्याही सैन्यातले जवान तसे समर्पण करायला कायम सज्ज असतात. त्यासाठी घरदार कुटुंब संसार सोडून कष्टप्रद जीवन जगत असतात. त्यांच्या आयुष्यात कुठलाही विरंगुळा नसतो वा आप्तस्वकीयांची ममताही त्यांच्या वाट्याला येत नसते. अक्षरश: अमानुष जीवन ते कंठत असतात. त्यांनी शुद्ध पवित्र व सोवळ्या नजरेनेच जग बघण्याचा आग्रह अतिरेकी नाही काय? ज्या व्यवहारी संसारसुखाला ते कित्येक महिने वर्षे वंचित राहिलेले असतात वा समाजासाठी वंचित रहात असतात, त्यांच्या भावना इच्छांची कदर कोणी करायची? त्या मारून वा दाबून जगता येईल काय? ते सामान्य घरातले तरूण वा पुरूष असतात. आपल्या शारीरीक भुकेपोटी वखाखलेलेही असू शकतात. पण म्हणून पहिली संधी मिळाली तर कुठल्या स्त्रीचा विनयभंग करतील वा त्यांच्यावर अत्याचार करतील असेही नसतात. जेव्हा त्यांना कडव्या शिस्तीतून थोडा मोकळा श्वास घेता येतो वा मनमानी करण्याची सवलत मिळते, तेव्हा अशा भावना प्रवृत्ती उफ़ाळून येत असतात. वाळवंटात मृगजळ शोधावे, तशा त्यांच्या नजरा भिरभिरू लागतात. अशावेळी त्यांना ‘डर्टी पिक्चर’ खूणावत असतो. चिथावण्या देत असतो. आणि तसे चित्रपट सेनादलाने निर्माण केलेले नसतात. तेही पाप विद्या वा तत्सम कलावंतांचेच असते. मग बोट सैनिकाकडे कशाला दाखवायचे?

सैनिक तरी बिचारा दिर्घकाळ आपल्या भावना इच्छा मारून वैराण ओसाड परिसरात जीव पणाला लावून पहारा द्यायला उभा ठाकलेला असतो. पण विद्या बालन ज्या क्षेत्रात वावरते, तिथे तर असे वखवखलेले एकांतात जगणारे ‘उपाशी’ लोक नसतात ना? लेखक कलावंत दिग्दर्शक अशी बिरूदावली मिरवणारे ते नामवंत लोक रोजच्या रोज घरी जातात आणि संसारातही गढलेले असतात. त्यांना आयुष्यात कशालाही वंचित रहावे लागलेले नसते. पण तेही लोक पहिली संधी मिळाली तर अभिनेत्री वा मुलींशी कसे वागतात? कालपरवाच जगभर त्याचा गवगवा झालेला आहे. जगातल्या कुठल्याही अशा कलाक्षेत्रा्तील स्त्रियांच्या लाचारी अगतिकतेचा लाभ उठवत लैंगिक शोषण झालेल्या किती कहाण्या बाहेर आलेल्या आहेत? त्यापैकी काहीच विद्याने ऐकलेले नाही काय? सैनिकाची एक हावरी नजर तिला बोचरी वाटली. मग ज्या चित्रसृष्टीत ती नेहमी जगते, तिथे काय सोवळ्या पवित्र साधूसंतांच्या नजरांना ती सामोरी जात असते काय? अहोरात्र अशा वखवखलेल्या नजरांच्या गोतावळ्यात हसतमुख राहून आदरातिथ्य करणार्‍या या अभिनेत्रीने, केवळ एका सैनिकाचा अपमान केलेला नाही, तर एकूण भारतीय सेनेलाच अपमानित केले आहे. भारतीय सैनिक काश्मिरात बलात्कार करतात असा बेछूट आरोप करणारा कन्हैयाकुमार आणि विद्या बालन यांच्यात काय फ़रक राहिला? कशाला या लोकांना डोक्यावर घेऊन नाचायचे? कसली यांची बुद्धी आणि किती त्यांची प्रगल्भता? ज्यांना खडतर आयुष्यातील वास्तवाचे भान नसते वा त्यातून उमटणार्‍या प्रतिक्रीया समजू शकत नाहीत, ते मानवी मन काय समजून घेणार वा ते अभिनित तरी कसे करणार? डर्टी पिक्चरमध्ये उत्तान नृत्य करताना चितारलेले आपलेच गीत ‘छुना ना छुनाना’ विद्याने आठवून बघितले असते वा समजून घेतले असते, तर तिला असली मुक्ताफ़ळे उधळण्याची दुर्बुद्धी झाली नसती.
 

5 comments:

  1. Absolutely agree with you Bhau!!
    Nowadays it s been customary for most of these Bollywood stars to get into some controversy especially just before the release of their new movie.
    Vidya Balan has also done the same thing since her new movie "Tumhari Sulu"is about to be released.

    This only shows their cheap mentality and greed to get the publicity at any cost!

    ReplyDelete
  2. Sir, she described the incident happened when she was in college days.

    ReplyDelete
  3. अहो भाऊ
    ह्यांचा धंदाच आहे
    Movie प्रदर्शन वेळेस काहीतरी नखरे करा!

    ReplyDelete
  4. They should be professional and
    shoud act maturedly and should ignore such things as usually they do in their professional life.

    ReplyDelete
  5. Our society many times behaves like "me nahi tyatli kadi lava aatali". Looking at Ms Vidya Balan like that is not a big deal in many other societies around world whose civilisation can be traced back to thousands of years. Where I live women aspire to have figure like Ms Balan. And since they cannot have it because of natural limitations, they do padding to look like that. If someone from opposite gender takes a note nice looking person then it is a matter of pride for her.

    Your may have a valid argument that why blame jawan when someone is flaunting her assets so openly. But to me it is more about we humans being true to our natural needs and accept it with a grace.

    ReplyDelete