Sunday, September 16, 2018

माफ़ीचा साक्षिदार, की उलटलेला साक्षिदार?

Image result for chidambaram raghuram rajan

रिझर्व्ह बॅन्केचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आता पुन्हा अमेरिकेत जाऊन कुठल्या तरी विद्यापीठात अर्थशास्त्राचे धडे भावी पिढ्यांना शिकवू लागलेले आहेत. दोन वर्षापुर्वी ते भारताच्या रिझर्व्ह बॅन्केचे गव्हर्नर होते. म्हणजेच भारतातील एकूण बॅन्क व्यवसायावर देखरेख ठेवणारे प्रमुख रखवालदार होते. नेमक्या त्याच काळात प्रचंड बुडवेगिरी झाली आणि एकाहून नामवंत बॅन्कांची राजरोस लूट झालेली आहे. मात्र ती चोरी उघडकीस येण्यापुर्वी देशात सत्तांतर झाले आणि अशा चोरीचा अंदाजही यायला आणखी वर्षभराचा काळ जावा लागला होता. तेव्हाच सरकारने तात्काळ अशा चोरी दरोडेखोरीचा गवगवा केला असता, तर कदाचित अनेक बॅन्का एव्हाना दिवाळखोरीत गेल्या असत्या आणि बुडीत कर्जवाटपामुळे करोडो लोक देशोधडीला लागले असते. पण मोदी सरकारने सावधपणे त्याविषयी पावले उचलली. म्हणून कित्येक बॅन्का तग धरून आहेत. अनेक कर्जबुडव्यांना देशातून पोबारा करावा लागलेला आहे. या सर्वांचे साक्षिदार तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री चिदंबरम आणि रघुराम राजन होते. मात्र यापैकी कोणीही कधी उघडपणे आपल्या नजरेसमोर व साक्षीने होत असलेल्या त्या दरोडेखोरीला पायबंद घातला नाही, की साधी बोंब ठोकली नाही. उलट कमीअधिक प्रकाराने त्याला हातभार लावला, किवा काणाडोळा केला होता. त्याची पहिली कबुली आता रघुराम राजन यांनी दिलेली आहे आणि तसे करताना त्यांनी त्यांच्याच एकाहून एक बुद्धीमान समर्थकांना पुरते तोंडघशी पाडून टाकलेले आहे. देशातल्या अनेक बॅन्कांच्या थकीत व बुडीत कर्जाला तेव्हाचे युपीए सरकार व त्याचेच धोरण कारणीभूत असल्याचे लेखी पत्र त्यांनी भारतीय संसदेच्या अर्थविषयक समितीला पाठवलेले आहे. आता त्यावरून गदारोळ होणे स्वाभाविक आहे. पण त्यातला तपशील व खर्‍या चोरांचे चेहरे लपवले जात आहेत, त्याचे काय?

विजय मल्ल्या, नीरव मोदी वा मेहुल चोक्सी अशा लोकांच्या नावाने व्यवहार झालेले असल्याने दिसायला ते कागदोपत्री गुन्हेगार व दरोडेखोर नक्कीच आहेत. पण अशा दरोड्यांना आतून सहकार्य मिळाल्याशिवाय पिस्तुल बंदुकीशिवाय असे दरोडे यशस्वी होऊ शकत नाहीत. मग जे कोणी अशा दरोड्यांना मदत करतात वा डोळ्यासमोर लूट होऊ देतात, ते खरे डाकू असतात. मल्ला, चोक्सी वगैरे या प्रतिष्ठीत पांढरपेशांनी लावलेले मुखवटे असतात. रघुराम राजन यांनी जे पत्र पाठवले आहे, त्यातला काही तपशील भयंकर खळबळजनक आहे आणि त्यांनीच या मुखवट्याच्या मागचे चेहरे समोर आणायचा प्रयत्न केला आहे. त्या पत्रात राजन एका ठिकाणी म्हणतात, त्या काळामध्ये म्हणजे युपीएचे राज्य असताना एका कंपनीच्या संस्थापकाने मला सांगितले होते, की चेकबुक दाखवून बॅन्का म्हणायच्या किती कोटी रुपयांची रक्कम लिहू तेवढे सांगा. याचा अर्थ असा, की कुठल्याही तारणाशिवाय आणि कुठल्याही कागदपत्राशिवाय बॅन्का कुणालाही करोडो रुपयांची खिरापत वाटायला धावत सुटलेल्या होत्या. ते कर्ज परत वसुल होईल काय? त्यात गुंतवली जाणारी कर्जाची रक्कम सुरक्षित आहे काय? कर्ज घेणारा वा मागणारा खरोखरच उद्योगासाठी कर्ज मागतो आहे काय? असेल तर त्याच्यापाशी नेमकी कुठली कुवत वा क्षमता आहे? यापैकी कसल्याची गोष्टीची विचारणा व छाननी केल्याशिवायच बेछूट कर्ज दिले जात होते. असेच रघुरामना सांगायचे आहे ना? हे खुद्द रिझर्व्ह बॅन्केचा तात्कालीन गव्हर्नर सांगत असेल, तर अर्थशास्त्री पंतप्रधान मनमोहन सिंग व अर्थशास्त्री चिदंबरम यांनी काय लयलुट चालवली होती, त्याचीच साक्ष मिळते. अर्थात यादी तिथेच थांबत नाही. नोबेलविजेते अमर्त्य सेन त्यालाच महान अर्थकारणाचे शिफ़ारसपत्रही देऊन टाकत असतात. असल्या खरकट्यावर पंगती उठवणारे ‘अर्थभ्रांत’ जाणकार शिघ्रलेख लिहून आरत्या ओवाळत होते ना?

आपल्या डोळ्यासमोर मोठ्या भारतीय बॅन्का दरोडेखोरांना उघड्या करून दिलेल्या होत्या, असे रघुराम राजन सांगत आहेत. सामान्य शेतकरी वा व्यावसायिक छोटामोठा काही धंदा करायचा म्हणून अशा बॅन्कात कर्ज वा उचल मागायला जातो. तेव्हा त्याच्याकडून रहात्या घरापासून शेतजमिनीपर्यंतची कागदपत्रे किंवा पत्नीचे दागदागिने गहाण म्हणून घेतले जातात. मग अशाच बॅन्का त्या बुडव्या दरोडेखोरांना करोडो अब्जावधी रुपयांची कर्जे कशाच्या आधारावर देत होत्या? त्या देत असतील तर रिझर्व्ह बॅन्केचा गव्हर्नर काय झोपा काढत होता? की त्याला नोकरी टिकवायची असेल तर तिकडे काणाडोळा करायची सक्ती कार्ती चिदंबरमच्या पिताश्रींनी केलेली होती? कोण अशा छाननी वा चौकश्यांचा गळा दाबून बसलेला होता? कोणी मनमोहन सिंग यांच्या आर्थिक व बॅन्कींगच्या ज्ञानाचा गळा घोटून त्याच्या गळ्यात पट्टा बांधला होता?  एका सामान्य बुद्धीच्या पंतप्रधानाला ज्या गोष्टी साध्या डोळ्यांनी बघता आल्या व रोखण्याची पावले उचलावी असे वाटले, तेच काम या अर्थशास्त्री म्हणवल्या जाणत्‍या दिग्गजांच्या कुशाग्र बुद्धीला कशाला करता आले नाही? बेशरमपणाची कमाल म्हणजे तेच लोक आता मल्ल्या वा नीरव कसे पळून जाऊ शकले, असे उलट्या तोंडाने विचारत आहेत. सामान्य माणसालाही आपल्या चुक वा गुन्ह्याची थोडीफ़ार शरम असते. पण चिदंबरम, मनमोहन सिंग वा तत्सम लोकांचा बेशरमपणा सगळ्या मर्यादा ओलांडून गेलेला असावा. अन्यथा त्यांनी एनपीए किंवा नोटाबंदीवर इतकी झोड उठवून कांगावा केला नसता? आपल्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाच्या वेळी लोकसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलेले होते, तुमच्या युपीए सरकारने केलेली पापे व लूटमार अब्जावधीच्या घरातली आहे आणि ती चव्हाट्यावर आणल्याशिवाय रहाणार नाही. आज रघुराम राजन त्याचीच साक्ष देत आहेत. प्रश्न इतकाच, की हा उलटलेला साक्षिदार आहे की माफ़ीचा साक्षिदार आहे?

साक्षिदाराचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक असतो सामान्य साक्षिदार. तो घटनेचा साक्षिदार असतो आणि न्यायालयात येऊन जे बघितले वा समजले, त्याचीच ग्वाही देत असतो. पण आणखी दोन महत्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी झालेला साथीदार. तो आपल्याला शिक्षेतून माफ़ी मिळावी म्हणून गुन्ह्याचा तपशील सांगून आपला गुन्हाही कबुल करत असतो आणि साथीदारांना गुंतवून देत असतो. दुसरा प्रकार उलटलेल्या साक्षिदाराचा असतो. तो आधी एका गोष्टीची कबुली वा साक्ष देतो आणि प्रत्यक्ष न्यायालयात उभा राहिला, मग उलटेच बोलू लागतो. रघुराम राजन पहिल्या प्रकारातले साक्षिदार वाटत नाहीत. कारण ज्या विषयावर ते मतप्रदर्शन करीत आहेत किंवा साक्ष देत आहेत, त्यापासून अलिप्त रहाण्याचा विषय त्यांच्या बाबतीत येत नाही. देशातील बॅन्क व्यवसायालाला शिस्त लावणे व त्यातल्या व्यवहारांवर देखरेख ठेवणे; हेच त्यांचे काम होते. त्यात ते तोकडे पडलेले आहेत आणि त्याची कारणे त्यांनी सांगायला हवीत. आपल्या डोळ्यासमोर दरोडे घातले जात होते आणि लूट चालली होती, असे म्हणून रखवालदाराची सुटका होऊ शकत नाही. कारण ते होऊ नये म्हणून तर त्याची नेमणूक झालेली असते. पण अशी नेमणूक करणारा उच्चाधिकारीच डोळे वटारून चोरी करायला प्राधान्य प्रोत्साहन देत असेल, तर रखवालदाराची नामुष्की होत असते. आपल्या डोळ्यासमोर लूट झाली असे राजन म्हणत असतील, तर आपल्यावर डोळे कोणी वटारलेले होते, तेही सांगायला हवे. कारण कुठल्याही बॅन्केचा व्यवस्थापक आपल्यावरच उद्या आळ येऊ शकणारी इतकी मोठी लूट होऊ देणार नाही, की त्यात ‘उतावळेपणाने’ सहभागीही होणार नाही. त्याला अर्थमंत्री, पंतप्रधान वा त्यांच्यावरही डोळे वटारू शकणारा कोणी तरी असणार ना? राजन यांनी यापैकी कोणाचे नाव घेतलेले नाही.

आज राफ़ायल वा अन्य बाबतीत रोज उठून मोदींकडे हिशोब मागणार्‍यांना आपल्या अशा लूटमारीच्या गोष्टीवर पांघरूण घालायचे असते. म्हणून मग उठसुट कांगावा करावा लागत असतो. मल्ल्या वा नीरव मोदीला अशी लूटमार करू दिली, त्यांनी त्यांचे सरकार असताना कधी या भामट्यांना दिल्या जाणार्‍या करोडो रुपयांच्या कर्जे वा उचलीविषयी साधा हस्तक्षेप कशाला केलेला नव्हता? कारण हिस्सा मिळत असतो तोवर भागिदार हस्तक्षेप करीत नाही. मल्ल्या वा नीरव पळाला, कारण त्यांना वेळीच धरले नाही हा आक्षेप आहे. तो किती फ़सवा असू शकतो? कार्ति चिदंबरम वा खुद्द चिदंबरम यांच्यावर कारवाई सुरू झाल्यापासून त्यांना कोणी अजून हात लावू शकले आहे काय? त्यात कायदेशीर अडथळे आणणार्‍यांना मल्ल्या का निसटू शकला, ते कळत नसते काय? कायदा मोडणार्‍याला कायद्याची भिती वा पर्वा नसते. पण त्याच कायद्यान्वये काम करणार्‍याला मात्र कायदा मोडून कारवाई करण्याची मुभा नसते. ज्या कारणास्तव आज कार्ति चिदंबरमना आत टाकता येत नाही, त्याच कारणामुळे मल्ल्या नीरव पळून जाऊ शकत असतात. आपल्या विरोधातील हालचालीचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला. अपरात्री त्यांना कोणी घरात घुसून अटक करू शकत नसतो, हे कायद्याचे पांगळेपण असते. म्हणून नक्षलींना हात लावण्यापुर्वी इतक्या उचापती कराव्या लागलेल्या आहेत. रस्त्यावरचे भणंग गणंग चोर भुरटे पकडणे सोपे असते. पांढरपेशा गुन्हेगारांसाठी एकाहून एक नामवंत कायदेपंडितांची फ़ौज कायम सज्ज असते ना? त्या अडथळ्यांची शर्यत जिंकताना अंमलदारांची नेहमी दमछाक होत असते. ‘मशाल’ चित्रपटात अमरीश पुरी या गुन्हेगार डॉनला दिलीपकुमार म्हणतो, ‘तू फ़डतूस निर्बुद्ध गुंड आहेस. माझ्यासारखा बुद्धीमान गुन्हेगारीत उतरला, तर तुला पळता भूई थोडी होईल;. युपीए सरकारने तशा पांढरपेशा गुन्हेगारांची फ़ौज उभी करून दाखवली ना?

रघुराम राजन यांना संसदीय समितीने पत्र पाठवले त्याचे उत्तर त्यांनी दिलेले आहे. त्यातला एक खुलासा अधिक महत्वाचा आहे. राजन त्यात म्हणतात, ‘२००६ ते २००८ या कालखंडात आर्थिक वाढ वेगाने चालली होती आणि अशाच वेळी बॅन्कांकडून अधिक गफ़लती होतात. कारण त्या वाढीच्या दरावर आधारीत बॅन्का कर्जवाटप करतात किंवा त्यावरून भविष्यातील वाढीचे अंदाज बांधत असतात. या काळातील आर्थिक वाढ ही आधीच्या पायाभूत सुविधा उभारणी व उर्जा प्रकल्पांच्या यशस्वी वाटचालीमुळे होऊ शकलेली होती. कारण ते प्रकल्प ठरल्या मुदतीमध्ये आणि अपेक्षित खर्चात पुर्ण झालेले होते.’ ह्याचा नेमका अर्थ काय? २००४ मध्ये हाती घेतलेले पायाभूत प्रकल्प इतक्या वेगाने पुर्ण झालेले नाहीत, तर त्याच्याही आधी घेतलेले प्रकल्प पुर्णत्वास गेलेल्या योजना होत्या. त्या योजना २००४ पुर्वीच्या म्हणजेच वाजपेयी काळातील योजना असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणजे युपीए सरकारच्या आरंभकाळात वाजपेयी काळात्तील हाती घेतलेल्या विकास योजना व पायाभूत सुविधांचे फ़ायदे मिळू लागले. त्या प्रकल्पांच्या यशाने जी संपत्ती निर्माण होऊ लागली, तिची मनसोक्त उधाळपट्टी करण्याला मनमोहन अर्थशास्त्र म्ह्टले गेले ना? मुद्दा असा आहे, की वाजपेयी सरकारच्या मेहनतीचे लाभ मनमोहन सरकारने घेतले आणि त्यात वाढ करण्यापेक्षा तेच धुळीला मिळवण्यात धन्यता मानली. बदल्यात इथल्या पुरोगामी तमाशाने देशाचेच दिवाळे वाजवून टाकले. डाकू लुटेर्‍यांना देशाचा खजिना खुला करून दिला. पण तेच सत्य लपवण्यासाठी अशा बुडवेगिरीला ‘एनपीए’ असे साळसुद नाव देण्यात आले. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येईपर्यंत अशा बुडवेगिरीची रक्कम पन्नास लाख कोटीच्या घरात जाऊन पोहोचली होती आणि अशा बुडव्यांना अधिक कर्जे रोखण्यातून दिवाळखोरीचा खरा आकडा समोर येऊ शकला. तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या.

मोदी सरकारने रघुराम राजन यांना मुदतवाढ दिली नाही म्हणजे देशाची अर्थव्यवस्थाच बुडवून टाकली; म्हणून आक्रोश करणार्‍यांची संख्या कमी नव्हती. नोटाबंदी करून काय साधले, म्हणून आजही प्रश्न विचारले जातात. पण २००४ मध्ये चलनातील ३५ टक्के नोटा पाचशे हजाराच्या होत्या. त्या २०१४ पर्यंत ८५ टक्के इतक्या अर्थशास्त्र्यांनी का वाढवत नेल्या? त्याविषयी आळीमिळी गुपचिळी असते. त्यातून करोडो रुपयांचे काळेधन तयार झाले आणि बॅन्कांपाशी चलनही उरले नाही. ते परत यावे म्ह्णून तर नोटाबंदीचा उपाय योजावा लागला. रोख चलनातला व्यवहार थांबवून सगळे चलन हिशोबी व्यवहारात आणले गेल्याने अनेक छुपे धंदे बंद पडले आणि करवसुलीला हातभार लागला. पण त्यापेक्षाही मोठी बाब म्ह्णजे बहुतांश चलन पुन्हा बॅन्केत आले आणि राजन, चिदंबरम व मनमोहन यांनी बुडवलेली अर्थव्यवस्था निदान घुसमटून मृत्यू होण्यापासून बचावली. मल्ल्या नीरव अशा लोकांना नाक मुठीत धरून पळ काढावा लागला. अर्थशास्त्राची जाण नसलेला पंतप्रधान सत्तेवर आला नसता, तर एव्हाना भारताचा व्हेनेन्झुएला किंवा सिरीया अफ़गाणिस्तान पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. सामान्य बुद्धीच्या भारतीय मतदार जनतेने अर्थशास्त्र्यांपासून देशाला वाचवले, त्याचीच कबुली आता रघुराम राजन यांनी दिली आहे. किंबहूना त्यांनीच तथाकथित अर्थशास्त्री व अर्थविषयक जाणकारांचे थोबाड आपल्या या सविस्तर पत्राने फ़ोडले आहे. देशाला व अर्थकारणाला बुडवण्यालाच संजीवनी ठरवणार्‍या भामट्यांना चव्हाट्यावर आणताना रघुराम राजन आपली कातडी बचावण्यासाठी इतके खरेखुरे बोलत आहेत, की त्यांच्याच साक्षी काढून मोदी सरकारला दिवाळखोर ठरवणार्‍या जाणाकारांचा साक्षिदार त्यांच्यावरच उलटलेला आहे? त्याचे उत्तर भविष्यकाळच देणार आहे. कारण आता तर कुठे खर्‍या कथेला सुरूवात होते आहे.

21 comments:

  1. नोट बंदी जाहीर करताना सांगितलेली कारणे आणि आत्ताची दिली जाणारी कारणे यात फरक आहे. टाका सगळ्यांना जेल मध्ये, कोण अडवतो आहे सरकारला तेच कळत नाही!!!!! साठ वर्षे भ्रष्टाचार झाला पण सरकार बदलल्या वर कोणालाच शिक्षा नाही, असे का बरे? पाच वर्षे पुरेशी नाही काय कारवाई सुरू करायला?

    ReplyDelete
    Replies
    1. होय, पाच वर्षे पुरेशी नाहीत.आपली न्याय व्यवस्था कालापव्यय आणि दिरंगाई करणारी नसती तर सोनिया,राहुल,चिदंबर,अहमद पटेल आणि इतर अनेक आज जेल के सलाखोंके पीछे होते।इतक्या वर्षात एक लालु जेलमध्ये गेलाय तर तो सुद्धा न्यायालयाच्या मेहरबानीने जेलबाहेरच जास्त रहातो, संजय दत्त सवलत मिळवतो, मल्यासाठी सोईची कोठडी तयार केली जाते.या सर्वांना जेलमध्ये जाण्यापासुन वाचवण्यासाठी मोदींशिवायचे सरकार यावे यासाठीच आकांडतांडव चालु आहे.घाण बरीच आहे.साफसफाई करण्यासाठी वेळ बराच लागणार आहे आणि किमान दोन टर्म्स मोदीच पाहिजेत.

      Delete
    2. ६० वर्षे भ्रष्ट कॉंग्रेसने राज्यकारभार करून ठिकठिकाणी आपले पित्ते बसवुन ठेवलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या बड्या धेंडांवर कारवाई करून त्यांना लगेच ४ वर्षांत जेल मधे टाकणे आजीबात सोपे नाही. सध्याच्या सरकारच्या हाती आलेल्या एका जरी पुराव्याची कुणकुण लागली तरी तो पुरावा नष्ट करणे किंवा कमकुवत करण्यासाठी अजुन खोटे पुरावे निर्माण करणे, आरोपींना सावध करणे, न्यायालयातच राहून आरोपींना मदत करणे असले प्रकार घडतील (कार्ति चिदंबरमच्या बाबतीत हे घडलेलं आहे). त्यामुळे तुम्हाला वाटतंय ते इतकं सोप्पं नाहीये. देशाला कोणतेही नुकसान न पुरवता आणि आरोपींना पळवाट न सापडूदेता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची (त्यांची सर्व बाजुंनी कोंडी केली की ते घोड चुका करतीलच) पेशन्स ठेवून वाट बघणे आणि आपले विधायक काम न बोलता एकीकडे चालू ठेवणे हेच योग्य आहे जे मोदी करत आहेत.

      Delete
  2. डॉ.स्वामी तेंव्हा ही डॉ.राजन विरूद्ध बोलत होते. खरे गुन्हेगार माजी अर्थमंत्री त्याचे मिंधे असलेले अर्थ मंत्रालयातील,सीबिआय, एन आय अॆ मधील वरिष्ठांनमधील वरिष्ठ अधिकारी, जितके जबाबदार आहेत, तितकेच पंतप्रधान व त्याच्या कार्यालयातीलही वरिष्ठ अधिकारी ही जबाबदारी टाळू शकणार नाहीत.
    डॉ राजन ही, त्यांनी केलेली डोळेझाक, याची कबुली द्यायला हवी.
    बहुदा २०१९ ला मोदी सरकार परत सत्तेत आले, तर बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्तींना ह्टदयवह्रदयविकाच्या धक्क्याचे त्रास सुरू होतील. माफीच्या साक्षिदारात बरेचसे माजी बॅंक अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर ही धैर्य दाखवत सामिल होतील, अशी आशा ठेवूया .
    खरे म्हणजे २००८ साली आर बी आय ने आणलेली बिल्डर लॉबींना वाचवण्यासाठी योजना ही तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे सर्व धनाढ्य मंडळी निर्धास्त झाली. कर्ज न फेडता त्याची पुनर्बांधणी ची मागणी करत राहता येते, हा राजमार्ग मिळाला.ती मालिका वाढतच गेली.
    मी आमच्या बॅंकींग वर्तुळात, तेंव्हाही लक्षात आलेल्या कर्ज परतफेड करण्यात सुरू असलेली चालढकल, पाहता, येणाऱ्या कठीण परिस्थितीचे भाकीत केले होते.
    मी आर बी आय तसेच ICAI, New Delhi, यांना ही पतत्रपाठविले. पाठपुरावा करून ही उपयोग झाला नाही.असो
    डॉ राजन यांनी केले ल्या २००८ च्या जागतिक मंदीचे भाकीत ,जगभर गाजले. असो.
    इथे आमच्या सारख्या माजी बॅंकर्सकडे सरसकट दुर्लक्ष केले गेले.
    ंंंंंंंंंसंजीव भोकरीकर, माजी बॅंक अधिकारी व सध्या बॅंक लेखा परिक्षक सल्लागार.

    ReplyDelete
  3. Bhau, ka maahit ka pan mala "अर्थशास्त्राची जाण नसलेला पंतप्रधान सत्तेवर आला नसता, तर एव्हाना भारताचा व्हेनेन्झुएला किंवा सिरीया अफ़गाणिस्तान पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता." hi khup atishayokti waatli

    ReplyDelete
  4. भाऊ,अतिशय मुद्देसूद लेख.ग्रेट

    ReplyDelete
  5. या काळातील आर्थिक वाढ ही आधीच्या पायाभूत सुविधा उभारणी व उर्जा प्रकल्पांच्या यशस्वी वाटचालीमुळे होऊ शकलेली होती. कारण ते प्रकल्प ठरल्या मुदतीमध्ये आणि अपेक्षित खर्चात पुर्ण झालेले होते.’ ह्याचा नेमका अर्थ काय? २००४ मध्ये हाती घेतलेले पायाभूत प्रकल्प इतक्या वेगाने पुर्ण झालेले नाहीत, तर त्याच्याही आधी घेतलेले प्रकल्प पुर्णत्वास गेलेल्या योजना होत्या. त्या योजना २००४ पुर्वीच्या म्हणजेच वाजपेयी काळातील योजना असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणजे युपीए सरकारच्या आरंभकाळात वाजपेयी काळात्तील हाती घेतलेल्या विकास योजना व पायाभूत सुविधांचे फ़ायदे मिळू लागले. त्या प्रकल्पांच्या यशाने जी संपत्ती निर्माण होऊ लागली, तिची मनसोक्त उधाळपट्टी करण्याला मनमोहन अर्थशास्त्र म्ह्टले गेले ना? मुद्दा असा आहे, की वाजपेयी सरकारच्या मेहनतीचे लाभ मनमोहन सरकारने घेतले आणि त्यात वाढ करण्यापेक्षा तेच धुळीला मिळवण्यात धन्यता मानली.

    I remember having read one comment in New Indian Express Cochin in November 2013 which was as follows.

    'What NDA sowed, UPA1 reaped and what UPA1 sowed, UPA2 is reaping.'

    ReplyDelete
  6. Jagata pahara che youtube channel kadhave.
    Yat lekh audio (vachun).
    Tya sandrbhat photo kartune video uplode karave.

    Jay hind.

    ReplyDelete
  7. Aaj chi pidhi madhe vachanya peksha aekane (lestion) pahane (watching) jast aahe.

    ReplyDelete
  8. भाऊ........नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम लेख !! ............. असे ऐकण्यात येतेय कि या रघुरामाला आता सरकारच्या एका चौकशीला सामोरे जावे लागणार असून त्या चौकशीत ते पुरेपूर अडकणार आहेत. त्यामुळेच या रघुरामाला आता कंठ फुटला आहे. नाहीतर आत्तापर्यंत येता जाता मोदी सरकारवर ' दुगाण्या ' झाडणारे आता स्वतःच्या अंगावर शेकतेय म्हणल्यावर बावचळले नसल्यास नवलच..!! अर्थात इथले ' फुरोगामी ' त्यांच्या मदतीला येतीलच. याना वाचविण्यासाठी आकांडतांडव करतील यात शंका नाही. इथली अर्थव्यवस्था बुडवून या देशाचे रशियासारखे ' विघटन ' करण्यासाठी उत्सुक असलेली हि मंडळी आहेत.

    ReplyDelete
  9. चपखल मतमांडणी! अनेक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  10. एक ऊत्तम अभ्यासपूर्ण लेख.

    ReplyDelete
  11. मनमोहन सिंह स्वच्छ आणि प्रमाणिक पंतप्रधान आहेत हा एक सर्वांच्या माथी मारलेला 'पुरोगामी' विचार आहे आणि भाजप पण त्यांची री ओढते. समोर चोरी चालू असताना डोळे मिटून घेणाऱ्या पोलिस अधिकारयाला जर आपण प्रमाणिक म्हणत नसू तर मग मनमोहन सिंह ना वेगळा न्याय का?

    ReplyDelete
  12. नाकातोंडात पाणी शिरायला लागले की माकड आपल्या पिलाला पायाखाली घेऊन पाण्याबाहेर पडायला पहाते,

    त्याप्रमाणे राजन स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार .त्यांत मोठे मासे नक्की अडकणार.

    हा अंक चांगलाच रंगणार.

    भाऊ तुम्ही अपडेट देत रहालच.

    ReplyDelete
  13. भाऊ सध्या चाललेली रुपयाची घसरगुंडी चिदंबरम व कंपनी निर्मित आहे असे ऐकतो. ह्याला संदर्भ sunday guardian मध्ये काही महिन्यापूर्वी आलेल्या लेखाचा आहेका? चीदाम्बारामचा पैसा आता बाहेर येऊ लागलेला आहे का? आपले विश्लेषण वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  14. Awesome explanation. Got all the answers.

    ReplyDelete
  15. भाऊ एकदम सही क्या जबरदस्त लिखा है. मान गये आपको
    *कहानी बैं

    अंग्रेजी में एक कहावत है कि
    यदि
    किसी को मारना है तो पहले बदनाम करो और फिर मार दो।

    बिना बदनाम किये मारोगे,
    लोग कहेंगे बेक़सूर मार दिया।

    अरबों के लोन माफ़ कर दिए...
    और कहते हैं बैंक घाटे में है।

    शाखायें 4 गुना और स्टाफ आधा कर दिया...
    और कहते हैं कर्मचारी काम नहीं करते।

    शाखाओं में साॅफ्टवेअर, काॅम्प्युटर और एटीएम पर घटिया हार्डवेयर खरीद कर लगा दिया...
    और कहते हैं कर्मचारी देखभाल/ सेवा नहीं देते।

    काम किया ठेकेदार ने
    कमिशन खाया बड़े अधिकारीयों ने
    बडी बडी छोटी मोटी साॅफ्टवेअर मॅनेजमेंट कंपनीया फायनान्स मिनिस्टर, आरबिआय अधिकारी को मिलकर नया नया किमती/ कमर तोडने वाले साॅफ्टवेअर लेनेकी रिआॅर्गन्झाईंग करनेकी जबरदस्ती की बँको को.

    अनव्हाएबल/ डुबने वाले लोन देने की जबरदस्ती की एजीएम डिजीएम जीएम ने की RMME RMSE RM BM जैसे बँक आधिकारी पर पैसा डुबा बँकका आम लोगों का.. प्रमोशन मिला AGM DGM GM को ..
    Accountability और NPA मे स फसे कर्मचारी ब्रांच के
    NPA राईट ऑफ होते गये डुबा बँक
    प्रमोशन लेते गये DGM GM CGM Directors..
    लोन खराब हुआ तो इमेज और
    इंक्रीमेंट बंद बैंककर्मी का l

    बरसों से पटकथा लिखी जा रही है. हमे बदनाम करने की,
    ताकि *मारने* में आसानी हो जाये. मोदीजी के नेतृत्वने ये सब बंद किया और बचाया देश को.

    ReplyDelete
  16. भाऊ धन्यवाद सडेतोड

    ReplyDelete
  17. चुतमारीचे बँक ऑफ इंडियावाले मुद्रा लोन देत नाहीयेत कारण NPA सुरू आहे... मला मुद्रासाठी जवळजवळ ३५% रक्कम आधी भरायला सांगितली... मग बाकीचे लोक मोदींवर घसरणार... दळीद्री बँकवाले... द्या अजून मेहुल, निरवचा कोणी आजापणजा असला तर त्याला पण द्या... आयघाले बँकवाले...

    ReplyDelete