Saturday, September 1, 2018

बुडत्या जहाजावरचे उंदिर

Image result for ashutosh khetan

मुझे चाहिये स्वराज, अशी घोषणा देत लोकपालाला वार्‍यावर सोडलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांची सत्तेत बसलेली टोळी, यांची भामटेगिरी चव्हाट्यावर येत चालली आहे. आधी सर्व राजकीय पक्ष भ्रष्ट असल्याचा दावा करीत भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत उतरलेले केजरीवाल, नंतर स्वत:च राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात आले. दिल्लीचे मुख्यमंत्रीही होऊन गेले. पण अशा भामटेगिरीला फ़सणारी जनता लौकरच त्या भामट्यांची विल्हेवाटही लावून टाकत असते. केजरीवाल टोळीला हळूहळू त्याचा अनुभव येऊ लागलेला आहे. म्हणून तर त्यांचे एक एक सहकारी त्यांना सोडून गेलेले आहेत आणि महापालिकांच्या मतदानात दिल्लीकर जनतेनेही या टोळीला जमिनदोस्त करून टाकलेले आहे. बहुधा त्यामुळेच तिथे लूटमारीतला हिस्सा मिळवायला पक्षात आलेले एक एक लफ़ंगे पक्षाला रामराम ठोकून काढता पाय घेऊ लागले आहेत. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून त्यापैकी दोघांनी पक्षाचा राजिनामा दिला. ते मुळचे भामटे पत्रकार म्हणूनच प्रसिद्ध होते. जेव्हा मागल्या लोकसभेपुर्वी त्यांना आपापल्या संस्थेतून डच्चू मिळाला, तेव्हा त्यांनी उदात्त मुखवटा चढवून मोदींच्या नावे शिव्याशाप देत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. आशुतोष यांना वाहिनीचे संपादकपद सोडावे लागले होते आणि आशिष खेतान यांनाही तशीच दिवाळखोरी राजकारणात घेऊन आलेली होती. केजरीवालना असले भंगार हवेच असते. आधीच्या सहकार्‍यांना डच्चू देण्यासाठी त्यांना भाडोत्री सुपारीबाज हवे असतात. म्हणूनच त्यांनी खेतान आशुतोषचा वापर करून घेतला. मात्र या भामट्यांना वाटलेले होते, तितका केजरीवाल बावळट नव्हता. त्याने पांढरी टोपी यांच्या डोक्यावर घालून यांना मस्तपैकी उल्लू बनवले आणि नंतर अडगळीत फ़ेकून दिले होते. आता त्यांनी पक्षाचे राजिनामे देत आपण अजून पक्षात महत्वाचे असल्याचे नाटक चालविले आहे.

लोकसभा निवडणूका लढवण्याची केजरीवाल तयारी करीत होते, तेव्हा त्यांना आपल्याला शिरजोर होऊ शकणार्‍या सहकार्‍यांचा काटा काढायचा होता. म्हणून कविवर्य कुमार विश्वास यांना थेट अमेठीला पाठवून देण्यात आले. राहुल गांधी यांच्यासमोर उभे केल्याने विश्वास सुखावले होते. पण अमेठीला पोहोचल्यावर त्यांना आपण कुठल्या उकिरड्यात येऊन पडलो, त्याची जाणिव झाली. पण पुढेमागे राज्यसभेतील जागा आयती मिळेल, अशा आशेवर त्यांनी पक्षात टिकाव धरला होता. पुढे दिल्ली विधानसभेच्या मध्यावधीपर्यंत केजरीवालना ते नाटक टिकवून धरावेच लागले. दरम्यान त्यांनी शाझिया इल्मी वा योगेंद्र यादव, विश्वास अशा बावळटांना दिल्लीबाहेर निवडणूकांसाठी पाठवून बाजूला केलेले होते. ते लक्षात आल्यावर हे लोक हळुहळू बाजूला झाले. तर त्यांचा काटा काढण्यासाठी केजरीवालांनी आशुतोष व आशिष खेतान यांचा उपयोग करून घेतला होता. पुढे राज्यसभेच्या तीन जागा भरण्याची वेळ आली, तेव्हा या शहाण्यांना आपली ‘जागा’ लक्षात आली. दोन बडे व्यापारी पैसेवाले शोधून केजरीवालांनी त्यांना राज्यसभा बहाल केली आणि विश्वास, खेतान व आशुतोष यांचा धीर सुटला. पण लगेच पक्ष सोडल्यास स्वार्थ दिसेल, म्हणून त्यांना गप्प बसावे लागले होते. आता काही महिने उलटून गेल्यावर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांना खुप काही गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. आशुतोष यांनी आपल्याला आम आदमी पक्षाने आयुष्यात प्रथमच जातीचा वापर करायला भाग पाडल्याचा साक्षात्कार, साडेचार वर्षे उलटून गेल्यावर झाला आहे. त्यांचे खरे आडनाव गुप्ता असून ते वैश्य समाजाचे आहेत. पण व्यवहारात त्यांनी कधी आपली जात वा समाज उघड होऊ दिलेला नव्हता. लोकसभेचे उमेदवार असताना मात्र त्यांचे नव आशुतोष गुप्ता असल्याचे सर्वत्र झळकवण्यात आले.

प्रचाराच्या काळात अनेकांनी आशुतोष आपल्या जातीचा उपयोग करण्यासाठीच गुप्ता हे नाव झळकवत असल्याचा गाजावाजा केला होता. पण तेव्हाच समोर येऊन आपल्या आडनावाच्या जाहिरातीला पक्ष जबाबदार असल्याचे आशुतोष यांनी सांगितले नाही की पुढली चार वर्षे सांगितले नाही. आता त्यांना हा प्रसंग आठवलेला आहे. कारण त्यांचीच एक जुनी सहकारी व आपनेता आतिषी मार्लेना हिने आपले नाव बदलून आतिषी सिंग, असे लावायला सुरूवात केलेली आहे. आपले मार्लेना आडनाव ख्रिश्चन वाटल्याने गोंधळ उडतो, म्हणून आपण ते वगळले असल्याचा खुलासा या विदुषीने केलेला आहे. पण सिंग नाव लावण्यामागचे अगत्य मात्र स्पष्ट केलेले नाही, पुढल्या लोकसभा निवडणूकीत आपतर्फ़े आतिषी यांना दिल्लीतून उमेदवार करण्यात आलेले आहे. त्याची ही पुर्वतयारी आहे. त्यात मार्लेना हे नाव असल्यास मते कमी होण्याची भिती असल्याने सिंग हे नाव पुढे करण्यात आलेले आहे. त्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि जुने संपादक राजकारणी आशुतोष यांना आपल्यालाही मुद्दाम पक्षाने गुप्ता हे नाव मतांसाठी वापरायला लावल्याचा पश्चात्ताप झालेला आहे. २३ वर्षाच्या पत्रकारितेत आपण कधी जातीचे नाव लावले नाही. पण निवडणूकीत पक्षाने सक्ती केल्याने ते नाव लावणे भाग पडल्याचा खुलासा आशुतोष यांनी आता केला आहे. म्हणजे जोवर त्याचा लाभ होण्याची शक्यता होती, तोपर्यंत या गृहस्थांनाही राजकारणातला जातीचा वापर योग्य वाटला होता. पण उपयोग झाला नाही, तेव्हाची ही पश्चात बुद्धी आहे. एकूण ही मंडळी मुरब्बी राजकारण्यांपेक्षा किती बदमाश आहेत, त्याचेच हे दाखले आहेत. इतरांना सरसकट जातीयवादी म्हणून हिणवायचे आणि आपण मात्र बेछूटपणे जातीचा आधार घेऊन राजकारण करायचे, हा पुरोगामी खाक्या होऊन गेलेला आहे. आतिषी वा आशुतोष हे त्याचेच नमूने आहेत.

यातली बदमाशी समजून घेतली पाहिजे. साडेचार वर्षे हे गुपित आशुतोषने कशाला दडपून ठेवलेले होते? आजच बोलण्याची गरज काय? वाहिनीचा संपादक असताना यांनी लोकपाल वा नंतर आम आदमी पक्षाची फ़ुकटात वा विकत प्रसिद्धी करून दिलेली होती. त्याची किंमत त्यांना नोकरी गेल्यावर राजकारणात वसुल करायची होती. पण यांच्यापेक्षा केजरीवाल बिलंदर निघाले आणि वाटाण्याच्या अक्षता लावून यांना घरी पाठवण्यात आलेले आहे. पण उद्या आपलीही अशीच शिकार होणार हे अभ्यासू संपादक पत्रकार आशुतोषला कळायला इतका उशीर कशाला लागला? प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव यांच्यासारख्यांचा बळी जात असताना, टाळ्या पिटणार्‍यात आशुतोष वा खेतान पुढे नव्हते काय? किंबहूना त्या दोघांचा काटा काढण्यासाठी केजरीवाल आपला उपयोग करून घेत असल्याचे समजण्यासाठी फ़ार मोठी अक्कल आवश्यक नाही. पण राज्यसभेत वर्णी लागण्याच्या आशाळभूतपणाने त्या पापात असे पत्रकार पुढारी सहभागी झाले. आता आपलाच बळी जाऊ लागल्यावर त्यांना पक्ष व राजकारण नकोसे झालेले आहे. आशिष खेतानही त्याला अपवाद नाही. त्यांनीही गेल्या आठवड्यात पक्षाचा राजिनामा देऊन वकिली करण्याची घोषणा केलेली होती. पण त्याला आठवडा उलटण्यापुर्वी त्यांनी कॉग्रेस प्रवेशाची तयारी केल्याच्याही बातम्या आल्या. कदाचित उद्या आशुतोषही कॉग्रेसनेते झालेले आपल्याला बघायला मिळू शकेल. मुळातच त्यांचा भाजपावर रोष आहे. पुरोगामी असल्याने इतर कुठल्याही पक्षात त्यांनी जायला काहीही हरकत नाही. मात्र राजकारणी नेते पत्रकारांना बाजारू वेश्या म्हणून मजेसाठी वापरतात आणि घरी जायची वेळ आली मग लाथ मारून मोकळे होतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. कारण प्रसिद्धी देण्याची कुवत असेपर्यंतच त्यांचा राजकारण्यांना उपयोग असतो. नाहीतर मजा मारून निरूपयोगी झालेला तो कंडोम असतो.

असे लोक बुडत्या जहाजावरचे उंदिर असतात आणि केजरीवालसह सर्व राजकीय पक्षांना त्यांची चांगलीच ओळख असते. म्हणूनच त्यांचा खुबीने वापर करून घेण्याच्या पलिकडे राजकारणी त्यांना फ़ारसे जवळ करीत नाहीत. आशुतोष वा खेतान यांना भाजपाविरोध वा मोदींची बदनामी करण्यात कॉग्रेसने यथेच्छ वापरून घेतले होते. पुढे त्यांचा उपयोग राहिला नव्हता. कारण त्यांना माध्यमातूनही डच्चू मिळाला होता. केजरीवालना आपले जुने सहकारी संपवण्यासाठी हत्यार हवे होते. आज हे लोक ना घरका ना घाटका अशा स्थितीत पोहोचले आहेत. पत्रकाराने आपल्या मर्यादा ओलांडू नयेत आणि कार्यकर्ता नेता असल्यासारख्या उचापती करू नयेत. इतकाच यात धडा सामावलेला आहे. पण बहुतेक आजच्या पिढीतल्या अनेक शहाण्यांना त्याचे भान उरलेले नाही. म्हणून आपली छाप पत्रकारितेवर सोडण्यापुर्वीच अनेक पत्रकार व संपादक इतिहासजमा होत चालले आहेत. तात्पुरती त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळते आणि नंतर त्यांची कोणाला दादफ़िर्याद रहात नाही. धड त्यांना चळवळ राजकारण करता येत नाही, की पत्रकारितेचा मुखवटाही संभाळता येत नाही. सांगता येत नाही आणि सहन होत नाही, अशी लज्जस्पद अवस्था होऊन जाते. तरूण तेजपाल, खेतान, आशुतोष, बरखा दत्त ही मोजकी नावे आहेत. एका बाजूला सामान्य लोक त्यांच्याविषयी तिटकार्‍याने बोलू लागले आहेत आणि ज्यांच्यासाठी ही हमाली केली, त्यांना किंमत वाटेनाशी झाली आहे. असे लोक कुणाच्याच कामाचे नसतात की कुणाशी वा कामाशी प्रामाणिक राहू शकत नाहीत. दिवाळीतल्या फ़टाक्यासारखे त्यांचे अस्तित्व क्षणभंगूरच असते. म्हणूनच कोणी खेतान वा आशुतोषसाठी अश्रू ढाळले नाहीत. ना राजकारणात वा पत्रकारितेमध्ये. आजही अशा दोन दगडावर पाय ठेवून लुडबुड करणार्‍यांसाठी हा इशारा वा धडा असतो.

9 comments:

  1. भाऊ या लोकांवर ही वेळ येणार हे भाकीत तुम्ही एक वर्षापूर्वीच वर्तवलेले होते.

    ReplyDelete
  2. फारच भारी.
    आशुतोष = खेतान = केजरीवालचे कंडोम

    ReplyDelete
  3. भाउ एकदम खरय तुमच यांना परत पत्रकारीतेचे दपवाजे पन बंद होतात बरखा नुसती तडपतेय tv वरयेण्यासाठी youtube वरती तस बोलुन दाखवते राजदीप तसा गुंड त्याने india today वर कोपरा मिळवलाय पन वागळेवेगैरे फुशारकी मारत होतेकी राजदीपमुळ बाहेर पडलो त्यांची सोय राजदीपन कुठ लावलीय? तो काय सागरीका बरखा आता twitter पत्रकारीता करतात पन तिथे लोक उत्तरपन देतात शिव्याच जास्त सहन होत नाही आणि मोदीद्वेश पन सहन होत नाही मला तर वाटतय ते वेडेच होतील सुरुवात तर झालीय twit वरुन कळतच तेबघुन लोक अजुन वाइट बोलतात

    ReplyDelete
  4. कांगरेस पत्रकार स्वताचा अजेंडा चालवण्याासाठी वापरत होती आडुन पन शहा यांना विचारलकी १८००लोकांची भरती whatsapp साठी का केलीय तर ते म्हनाले ते कार्यकर्तेच आहे त्यांना लिहीन्याची आवड आहे चांगल लिहीतात म्हनुन ते काम दिलय असा रोकडा व्यव्हार आहे ते लपवत नाहीत कांगरेस उगीच आव आणते बेकार झालेले कार्यकतेच आहेत पक्षाचे सत्ता नाही म्हनुन काम नाही republictv नाहीका दिवसभर एकच बातमी दाखवत असते इतर वाहिन्यासारखा आव आनत नाही जे तिच काम आहे तेच ती टोकदारपने करते ज्यांना बघायच ते बघतातच त्यांना जे ऐकायचय ते ती जाहीरात पन न दाखवता ऐकवते इतकी एकतर्फी असुन जर रेटींग जास्त असेल तर ती जे दाखवते ते लोक बघतात त्यामुळ अॅंकरनी उगीच दोन डगरीवर पाय ठेवु नये सारा मामला सत्ता आणि पैसा असतो

    ReplyDelete
  5. Jaya bacchan gave 20 carod to akhilesh for rajyasabha seat and some share he gave to floating MLAs of parties so they voted for her not for BSPs ambedkar.who is mahagathbandhan candidate and had number n ideological better he could do in RS than jaya bacchan who's hobby to go there.but money works same with Gupta's of AAP

    ReplyDelete
  6. भाऊ असेच एक सुमार पत्रकार संपादक आहेत. त्यांच्यावर ही प्रकाश टाका

    ReplyDelete
  7. आज न उद्या कुमार केतकरांवरही हीच पाळी येणार आहे, किंबहुना यायलाच पाहिजे.

    ReplyDelete
  8. भाजपा आणि काँग्रेस ने आप ला चांगले चेक मेत केले जेंव्हा त्याने दिल्ली ची लढत एक तर्फी केली...जर तेंव्हा आप विरोधी पक्षात असते तर २०१९ ला भाजपा ला चांगलीच डोकेदुखी झाली असती आणि ती पंजाब आणि दिल्ली पुरता मर्यादित राहिले नसते...बुद्धिबळात कधी कधी महत्व मोहऱ्यांचे बळी द्यावा लागतो...भाजपा ने दूरदृष्टी ठेऊन दिल्ली चा दिला...आणि आप ने स्वतः चे अस्तित्व साठी स्वकियांचा

    ReplyDelete