Saturday, September 29, 2018

हारता नही तबतक

modi cartoon kureel के लिए इमेज परिणाम

साडेचार वर्षापुर्वी लोकसभेची निवडणूक ऐन भरात होती आणि जवळपास ६० टक्के मतदान उरकलेले होते. अशावेळी नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली होती, की प्रत्येक वृत्तवाहिनीला त्यांचू मुलाखत हवी होती आणि त्यांनी तर काही वर्षापासून वाहिन्यांशी व पत्रकारांशी अबोला धरलेला होता. सहाजिकच त्या लोकप्रियतेचा लाभ वृत्त्वाहिन्यांना आपल्या टीआरपीसाठी उठवता येत नव्हता. कितीही प्रयत्न करून मोदी कुणाही पत्रकाराशी बोलत नव्हते तर खास मुलाखतीचा विषयच येत नव्हता. पर्यायाने मोदींच्या जिथे कुठे जाहिरसभा असतील तिथले थेट प्रक्षेपण सलग दाखवून आपला प्रेक्षक टिकवण्य़ाची अगतिकता वाहिन्यांवर आलेली होती. अशा वेळी मग मोदींनी चतुराईने या अगतिकतेचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. त्यांनी ए एन आय नामक एका वृत्तसंस्थेला प्रदिर्घ मुलाखत दिली. त्या संस्थेची संपादिका ही कधी वाहिन्यांवर न दिसलेला चेहरा होता. पण वृत्तसंस्था सर्वच वाहिन्यांना बातम्या पुरवणारी असल्याने सर्वांनाच मुलाखत उपलब्ध झालेली होती आणि लाचार होऊन वेगवेगळ्या वेळी तशीच्या तशी दाखवावी लागली होती. त्यानंतर प्रत्येक वाहिनी मोदींच्या मागे खास मुलाखतीसाठी धावू लागलेली होती. तर मोदींनी त्याही हावरेपणाचा आपल्या डावपेचात खुबीने वापर करून घेतला. त्यांनी सर्वात कमी नावाजलेल्या वाहिन्यांना प्राथमिकता दिली आणि त्यातही मोठे नाव नसलेल्या पत्रकारालाच मुलाखत दिली. पण तीच सर्वात लोकप्रिय बाब असल्याने दाखवणे प्रत्येक वाहिनीच्या अगतिक संपादकांना भाग पडलेले होते. त्यामुळे नेहमी चमकणारे व आपलीच टिमकी वाजवणार्‍या तमाम पत्रकार संपादकांची पुरती नामुष्की होऊन गेली. काहीजण तर गयावया करण्यापर्यंत लाचार होऊन गेलेले होते. कोणाला तो काळ आठवतो काय?

राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, प्रणय रॉय, एनडीटीव्ही, टाईम्स नाऊ अशा वाहिन्यांची तारांबळ उडालेली होती. नाही म्हणायला टाईम्सच्या अर्णब गोस्वामीला मोदींनी मुलाखत दिली. तेवढाच एक मोठा चेहरा होता. लोकप्रिय व मोठ्या व्यक्तीची मुलाखत आपल्यालाच मिळते आणि आपणच त्यांना फ़ैलावर घेतो असे मिरवणार्‍यांचे मोदींनी अशा रितीने किती हाल करून टाकले होते? सागरिका घोष ही दिल्लीतली मोठी पत्रकार आणि राजदीपची पत्नी. तिने तर जाहिरपणे वाडगा हाती घेतला होता. ‘आता मतदानाचे दिवस संपत आलेत. काही फ़ेर्‍यांचेच मतदन उरलेय. निदान आता तरी मोठ्या नावाजलेल्या पत्रकारांना मुलाखती द्याना?’ असा जाहिर ट्वीट तिने केला होता. कारण त्यांची बोबडी मोदींच्या बहिष्कार व पाठ फ़िरवण्याने वळलेली होती. हा सगळा इतिहास इतक्यासाठी सांगितला की मुलाखती देऊन तरी काय फ़ायदा असतो? बाकीच्य जगाला काही कळेल तरी. पण मुलाखत घेणार्‍याला कधी समोरचा बोलतो, त्याचा अर्थ उमजतो काय? मला आठवते, एबीपी नेटवर्कच्या सगळ्या संपादकांना मिळून मोदींनी संयुक्त मुलाखत दिलेली होती आणि त्यात ‘माझा’चे संपादक राजू खांडेकर यांचाही समावेश होता. त्यावेळी राजुने अतिशय महत्वाचा प्रश्न मोदींना विचारलेला होता आणि त्याचे स्पष्ट उत्तर मोदींनी दिलेले होते. प्रश्न असा होता, की दिर्घकाळ मोदींवर आरोपांची बरसात झालेली आहे. टिकेची अखंड झोड उठलेली आहे. ही टिका कुठवर आणि कितपत होईल असा मोदींचा अंदाज होता? काही क्षण विचारात पडल्यासारखे करून मोदी उत्तरले होते, ‘मोदी जबतक हारता नही, तबतक’. आजही ते उत्तर तितकेच ताजे आहे. समयोचित आहे, कुठल्याही आधाराशिवाय मागल्या सोळा वर्षात मोदींवर आरोप होत राहिले आहेत आणि आरंभी थोडा प्रतिवाद त्यांनीही करून बघितला होता. पण नंतर त्यांनी पत्रकारांचा नाद सोडून दिला.

लोकसभेपुर्वी गुजरात विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही राजदीपने एका नेटवर्कचा संपादक म्हणून मोदींची खास मुलाखत वा प्रचारफ़ेरी चित्रित करण्याचा २०१२ च्या अखेरीस केविलवाणा प्रयत्न केला होता. ज्या बसने मोदी प्रचार करीत फ़िरत होते, त्यात घुसलेल्या राजदीपला मोदींनी जवळपास बसायल जागाही दिलेली नव्हती, तर हा इसम मोदींच्या पायाशी बसून संवाद साधण्याची लाचारी करीत होता. त्याच्या एखाद्या प्रश्नाला उत्तर देऊन किंवा टोलवाटोलवी करीत मोदी रस्त्यावरच्या जमावाला अभिवादन करीत असल्याची दृष्ये राजदीपने खास आपली बातमी म्हणून प्रक्षेपित केलेली होती. ह्या अगतिकतेचे कारण काय? मोदींनी तरी पत्रकारांना इतकी हलकी वागणूक कशाला द्यावी? तर पत्रकार त्यांच्याशी अजेंडा घेऊन विरोधात उभे राहिलेले होते. आपल्यावर ज्यांना फ़क्त टिका व आरोप करायचे आहेत, त्यांना उत्तरे देत वा खुलासे करत बसलो, तर आयुष्य संपून जाईल. शक्य असलेली कामेही करू शकणार नाही, हे ओळखून मोदींनी पत्रकारांकडे २००४ नंतर पाठ फ़िरवली. त्यातून अशी स्थिती उदभवलेली आहे. पत्रकारांना मोदींचे चार शब्द हवे आहेत. पण मोदी त्यांच्याशी संवादही करायला तयार नाहीत आणि प्रत्येकाला पंतप्रधान आपल्याशीच बोलतो असा भाव तर खायचा आहे. पण ती बाब महत्वाची नसून आपण राजकारण प्रतिकुल परिस्थितीतही कसे करू शकलो वा करणार याचे उत्तर मोदींनी एबीपी माझाच्या त्या मुलाखतीत दिलेले होते. आज राजू खांडेकरांनाही ते आठवत नसेल. त्यांनी आपल्या जुन्या ठेवणीतल्या अशा टेप्स काढून बघितल्या तर तो ठेवा त्यांना सापडी शकेल. तो ठेवा इतक्यासाठी म्हणायचा, की पंतप्रधानकीची कारकिर्द कशी चालवणार आणि आपले विरोधक किती टोकाला जातील याचा आवाका मोदींनी त्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. आज राफ़ायल व विविध आरोप होत असताना नेमक्या त्या मुलाखतीची आठवण झाली.

मोदींच्या जागी दुसरा तिसरा कोणी असता, तर गडबडून गेला असता. सगळा मीडिया विरोधात उभा ठाकणे व आरोपांची आतषबाजी हा अनुभव मोदींसाठी नवा नाही. त्याची सवय त्यांना २००२ पासून लागलेली आहे. अगदी स्वयंसेवी संस्थांचे मुखवटे लावलेले व पत्रकारितेचे चेहरे घेऊन विरोधी राजकारण करणार्‍यांनी या राजकारणी नेत्याला अग्निदिव्यातून जायला लावलेले आहे. त्यातून मोदी तावून सुलाखुण बाहेर पडलेले आहेत. त्यामुळेच कितीही भयंकर आरोप झाले वा चिखलफ़ेक झाली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सामान्य जनतेचा विश्वास हे़च असल्याच मोदी शिकलेले आहेत. दंगल सोडाच, कुठल्या तरूण महिलेचा पाठलाग व तिच्यावर पाळत ठेवल्याचा आरोपही झालेला होता. त्यासाठी महिला आयोगाने चौकशी करावी आणि पोलिस तपास व्हावा असेही बालंट आणले गेलेले होतेच ना? तीनदा सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या एस आय टीच्या दिव्यातून मोदींना जावे लागलेले नाही काय? त्या प्रत्येकवेळी यापेक्षा कमी आवेशात कोणी आरोप केलेले होते काय? घमेली व बादल्या भरून चिखलफ़ेक झालेली होती आणि आजच्या इतके पक्षातले समर्थक वा नेतेही मोदींच्या पाठीशी ठामपणे तेव्हा उभे राहिलेले नव्हते. पण त्यालाही तोंड देऊन हा नेता थेट देशातील जनतेचा विश्वास संपादन करून विजयी झालेला आहे. त्याऐवजी त्याने तेव्हाच्या प्रश्नांना उत्तरे व खुलासे देत कालापव्यय केला असता, तर २०१४ ची निवडणुक त्याला जिंकता आली असती काय? ज्यांना समजून घ्यायचे नाही वा उत्तरही नकोच असते, तर नुसती केलेल्या आरोपाची कबुली हवी असते, त्यांना कशानेही समाधानी करता येत नसते. त्यापेक्षा सामान्य जनतेला आपली बाजू समजावणे राजकारणात व लोकशाहीत निर्णायक असते. मोदींनी तेच रहस्य ओळखले आहे. म्हणूनच अशा भुरट्यांना झुगारून त्यांनी जनतेशी थेट संवाद ठेवला आहे.

पण मुद्दा असा की या राफ़ायल आरोपबाजीतून मोदींचे काय होईल? आरोपाची राळ उडवणार्‍यांना काय राजकीय लाभ होईल? तसा लाभ शक्य असता, तर मागल्या चार वर्षात प्रत्येक विधानसभा मोदींच्या नावावर जिंकल्या गेल्या नसत्या. दिल्ली व बिहारचा अपवाद केला तर बहुतेक जागी मोदी हे चलनी नाणे ठरले भाजपासाठी. तेव्हाही आरोपांची चिखलफ़ेक चालू होतीच ना? उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानात अखेरच्या टप्प्यात मोदींनी वाराणशीला तीन दिवस मुक्काम केला तर याच लोकांनी पराभवाने मोदी भयभीत अशा वावड्या उडवल्या होत्या ना? कोणाचे दात घशात गेले? कुठल्याही अतिरेकाला मर्यादा असतात. राहुल गांधीना भूकंप घडवण्यासाठी फ़क्त पंधरा मिनीटे लोकसभेत बोलायचे होते. तब्बल तासभर गडी बोलला आणि काय झाले? अधिक मतांनी विश्वास प्रस्ताव मंजूर झाला ना? हा प्रकार नित्याचाच होऊन गेला आहे. कुठलेही बिनबुडाचे आरोप होणार आणि त्याचे खुलासे मागायचे. उत्तर त्याला देता येते, ज्याला उत्तर खरे़च हवे आहे. ज्यांना नुसत्या वावड्या उडवायच्या असतात, त्यांना उत्तरे देण्यात आपला वेळ व उर्जा किती वाया घालवायची याचाही विवेक ठेवला नाही, तर सरकार चालवणे शक्य नाही. जो माणूस देशाची सर्व सत्ता हाती घेऊन बसला आहे, तो आपल्या भाऊ बहिणी कुटुंब वा कोणालाही साधे घरगुती लाभ मिळू देत नाही, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप करण्यातलॊ बौद्धिक दिवाळखोरी ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना शहाणे तरी कसे म्हणावे, हा खरा सवाल आहे. वाहिन्यांवर चर्चा करताना मुद्दे मांडताना यापैकी कोणाला त्याचे भान रहात नसेल म्हणून मोदी वा भाजपाचे काहीही नुकसान होणार नाही. पण पत्रकारांची उरलीसुरली विश्वासार्हता लयाला जाईल आणि कॉग्रेससारख्या पक्षाची दुर्दशा त्यातूनच झाली आहे. मोदींच्या यशाचे श्रेय म्हणून त्या व्यक्तीपेक्षा अशा दिवाळखोरांना अधिक आहे.

11 comments:

  1. रजत शर्मा यांना आप की अदालत मध्ये एक मुलाखत दिली होती.
    हा उल्लेख करायचा राहिलाय.
    बाकी या तथाकथित बुद्धिमान पत्रकारांना पंतप्रधान मुलाखत पण देणार नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. रजत शर्मा हे खूप चांगले पत्रकार आहेत

      Delete
  2. Superb Bhau kiti binchuk vishleshan kela ahe. Kharach tumchi vision and Modi nchi vision perspective pramana meet at infinite point. Hath jodun Dhanyawad

    ReplyDelete
  3. The article is published in one website firstpost tell the truth.its bitter but true.in that article said that bjp voter base votes on which subject to bjp that is stop Muslim appeasement, better control in gov,no anarchy,if modi distracted from these bjp voter will not vote me modi but none of these happened so why modi cares. And they go further if modi help ambani and took money from him bjp voter base is damn sure the money will used for party only not matter not modi personal gain and this is good for them its real mentality if modi voter no one even think abt it.

    ReplyDelete
  4. भाऊ याच विषयावर आजच्या मटा मध्ये जेष्ठ पत्रकार विजय साळुंके यांचा लेख आहे ,त्या लेखावर मी प्रतिक्रिया लिहिली आहे पण अजूनही ती प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली नाही.माझ्या बाबत असे बऱ्याच वेळेस होते .त्यामुळे हे लोक एकीकडे अघोषित आणीबाणी आहे अशी बोंब ठोकतात आणि दुसरीकडे सर्वसामान्य वाचकाला प्रश्न पण उपस्थित करू देत नाहीत.त्यामुळेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर वरचा विश्वास हळूहळू उडायला लागला आहे.

    ReplyDelete
  5. अखिलेश यादव ट्विटर फाॅलोअर ८७ लाख,राहुल गांधी ७७ लाख,अमित शहा १ कोटी,मोदी ४.५ कोटी ट्रम्प ५.५ कोटी पन लाइक्स रिट्विट अखिलेश,शहा,मोदी ५ ते १० हजार.लाइक्स रिट्विटस राहुल,ट्रम्प 20 ते ५० हजार.हे कस काय सगळियात कमी व जास्त फाॅलोअर ्सनारेना लाइक सेम?ट्रम्प महासत्त्चे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे ट्विट कुनाला आवडे न आवडो भन्नाट असतात पन राहुलच्या बाबतीत तस काही नसताना ट्रम्प ची बरेबरी कुछ तो गडबड है.

    ReplyDelete
  6. . जो माणूस देशाची सर्व सत्ता हाती घेऊन बसला आहे, तो आपल्या भाऊ बहिणी कुटुंब वा कोणालाही साधे घरगुती लाभ मिळू देत नाही, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप करण्यातलॊ बौद्धिक दिवाळखोरी ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना शहाणे तरी कसे म्हणावे, हा खरा सवाल आहे.....लाखमोलाचं‌ बोललात भाऊ

    ReplyDelete
  7. राष्ट्र निर्मितीसाठी मोदींना सत्तेवर आणणे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे.

    ReplyDelete
  8. One point I liked the most - Those who are only intetested in propoganda and allegations can not be convinced by explanations of the facts.The best examole being the Rafale case. Congress does not want to hear the explanation @ the Rafale but just want recite the same sentence-" Modiji gave 30,000 crore to Ambani in the Rafale deal."

    ReplyDelete