Monday, July 22, 2019

आधुनिक घटोत्कच

Image result for rahul moods

१९ मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या सातव्या फ़ेरीचे मतदान संपले आणि त्याच संध्याकाळी बहुतांश वृत्तवाहिन्यांनी आपले एक्झीट पोल जाहिर केले. त्यानुसार कॉग्रेस पक्षाला किंवा गठबंधन म्हणून विरोधी पक्षांना सत्तेपर्यंत पोहोचण्य़ाची सर्व शक्यता संपून गेलेली होती. पण अशा चाचण्या घेणार्‍यांनाही भाजपा किंवा मोदी पुन्हा एकदा बहूमत संपादन करणार नाहीत, असेच वाटत होते. एकदोन अपवाद वगळता बहुतेकांना फ़ार तर एनडीए आघाडी बहूमताच्या जवळपास जाईल, असेही वाटत होते. पण चार दिवसांनी मतमोजणी सुरू झाली आणि निकाल लागण्यापर्यंत सर्वांनाच तोंडात बोट घालण्य़ाची वेळ आलेली होती. असे एकाहून एक मोठे अभ्यासक व चाचणीकर्ते कशामुळे फ़सलेले होते? त्यांच्यावर चकीत व्हायची पाळी कशाला आलेली होती? त्याचे उत्तर निकालानंतर दिल्लीतल्या अशा दिग्गज अभ्यासक संपादकांच्या एका जाहिर चर्चेत मिळाले. चार दशकाहून अधिक काळ दिल्लीतले राजकारण जवळून अभ्यासलेले शेखर गुप्ता यांनी त्याचे उत्तर स्पष्ट शब्दात आणि प्रामाणिकपणे दिलेले होते. ज्यांना म्हणून सत्य बघायचे नसते व नव्हते, अशाच तथाकथित राजकीय अभ्यासकांचा हा परिसंवाद होता आणि त्यांना नरेंद्र मोदी पराभूत होताना बघायची मोठी हौस होती. त्यामुळे आलेले निकाल त्यांना चकीत करून गेले. पण तरीही ज्यांना आपल्या भ्रमिष्टावस्थेतून बाहेर पडायचीच भिती वाटते, अशा लोकांचा हा मेळावा होता. सहाजिकच त्यांना राहुल गांधी कॉग्रेसला आणि तिच्यासोबत पुरोगामी पक्षांनाही बुडवित व नामशेष करीत आहेत, हे बघायची हिंमत नव्हती. सहाजिकच त्यांनाच अशा निकालांनी थक्क करून सोडलेले होते. पण झाले ते जाणवत असूनही बघायची शक्ती त्यांच्यात उरलेली नव्हती. मग येऊ घातलेले संकट वा विनाश त्यांना कसा उलगडावा? त्याचा सुगावा त्यांना कसा लागावा? त्यांना राहुलच्या अक्राळविक्राळ रुप धारण करण्यातला घटोत्कच कसा दिसावा?

त्या कार्यक्रमात बोलताना शेखर गुप्ता प्रामाणिकपणे म्हणाले, की मोदींविषयीचे आकर्षण व त्यांची लोकप्रियता आम्हाला दिसत होती. पण आम्हाला मोदींची लोकप्रियता बघायची नव्हती, की मतदारांना असलेले मोदींचे कौतुक ऐकायचे नव्हते. मोदींच्या विविध योजनांचे लोकांना मिळालेले फ़ायदे घरोघरी फ़िरून माहिती घेताना दिसतही होते. पण तिकडे काणाडोळा करून आम्ही कोणाला कुठले लाभ मिळालेले नाहीत किंवा कोण कसे वंचित राहिले, त्याचाच शोध घेत चाललो होतो. सहाजिकच आम्हाला कोण भाजपाला मत देणार नाही, तितकेच कळत होते. पण मोदींना मत देणार्‍या अफ़ाट लोकसंख्येकडे आम्ही साफ़ दुर्लक्षच केलेले होते. इतकी प्रामाणिक कबुली अजून अनेक पुरोगामी पत्रकारांना देता आलेली नाही. पण त्यातून एक मुद्दा लक्षात येऊ शकतो. मागल्या दीडदोन वर्षात मोदी विरोधात माध्यमांनी उघडलेली आघाडी, किंवा तथाकथित विचारवंत बुद्धीमंतांनी चालविलेली मोहिम, तद्दन भ्रामक कल्पनेचा विलास होता. त्यात तथ्यांश शून्यही नव्हता. मग निकाल यापेक्षा वेगळे कसे लागले असते? इथपर्यंतही ठिक असते. तो भ्रमनिरास सुसह्य तरी असतो. पण आपण ज्याला विजेता म्हणून गाजवित असतो, तोच साफ़ तोंडघशी पडला, मग अंदाज काढणार्‍यांची पुरती नाचक्की होऊन जाते आणि बहुतांश बुद्धीमंत, अभ्यासकांची तशीच हास्यास्पद अवस्था होऊन गेली. कारण शुद्ध मुर्खपणा करणार्‍या राहुलना याच लोकांनी योद्धा वा लढवय्या म्हणून पेश केलेले होते. खुद्द राहुल गांधीही त्याच भ्रमाच्या भोपळ्यावर बसून टुणूक टुणूक उड्या मारीत फ़िरत होते. आपणच कॉग्रेस पक्षाचे दिवाळे वाजवित आहोत, याचा थांगपत्ता निकालापर्यंत राहुलना लागलेला नव्हता आणि अशा बोगस संपादक अभ्यासकांनी फ़ुगवलेल्या फ़ुग्यासारखे राहुल फ़ुगत गेलेले होते. त्याला निकालाची टाचणी लागण्याच अवकाश होता. तो फ़ुगा फ़ुटला.

मुद्दा असा आहे, की राहुलच्या अशा अक्राळविक्राळ होण्यातून कुठले नुकसान संभवते, त्याचा अभ्यास व्हायला हवा होता. कॉग्रेस पक्षालाच नव्हेतर त्यांच्या मागेमागे फ़रफ़टणार्‍या अन्य लहानमोठ्या पक्षांना त्यातून पत्रकार सावध करू शकले असते. पण अशा पत्रकारांनी व प्रचारकांनी अन्य पक्षांची दिशाभूल करण्यात मोठा पुढाकार घेतला आणि त्यात राहुलनी पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष करून टाकलेला आहे. असे होऊ शकते, हे देशातल्या कुठल्याही स्ंपादक वा राजकीय अभ्यासकाला समजलेच नाही, हे मी तरी मान्य करणार नाही. माझ्यासारख्या एका निवृत्त सामान्य पत्रकाराला राहुलचे हे रुप भयभीत करणारे वाटलेले होते आणि बघता आलेले होते. म्हणूनच कुणाही सामान्य बुद्धीच्या पत्रकाराला किंवा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यालाही ते सहज दिसू शकणारे होते. पण सवाल दिसण्याचा व बघण्याचा असतो. आसपासच्या जगात घडणार्‍या जितक्या गोष्टी तुमच्या नजरेच्या टप्प्यात असतात, तितक्या तुम्हाला इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला त्या दिसतातच. पण दिसल्या म्हणून तुम्ही बघितल्याच असे अजिबात होत नाही. दिसणे व बघणे या दोन स्वतंत्र प्रक्रीया आहेत. डोळे सर्व काही दाखवतात. पण बघणे मेंदूच्या हाती असते आणि मेंदू अतिशय निवडक गोष्टी बघत असतो. ज्यांना समोर असलेलेही बघायचे नसते, त्यांना दिसले तरी त्यातून मिळणारे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात. पण त्यानुसार प्रतिक्रीया उमटत नाही. शेखर गुप्ता तेच सत्य कबुल करीत आहेत. त्यांना दिसत असले तरी बघायचे नव्हते. म्हणजेच त्यांच्या बुद्धीने आपलाच मेंदू असा बधीर करून ठेवलेला होता, की त्याला मोदी सरकारने केलेले चांगले उपयुक्त काम बघायची मोकळीक नव्हती. समजून घ्यायची मुभा नव्हती. नेमकी त्याची उलटी बाजू म्हणजे मोदी विरोधात असलेली कुठलीही अफ़वाही सत्य मानायची त्यांच्या बुद्धीवर त्यांनीच् सक्ती केलेली होती ना? मग घटोत्कच दिसायचा कसा?

राहुल गांधी जे काही मागले दीड वर्षे करीत होते, ती रणनिती वा डावपेचही नव्हते. तो निव्वळ खुळेपणा किवा बालीश प्रकार होता. तर त्यातला बालीशपणा बघायला अन्य कोणी अशा बुद्धीमंतांना विरोध केलेला नव्हता, अडथळा आणलेला नव्हता. पण राहुल मोदींची खिल्ली उडवतोय, किंवा त्यांना शिव्याशाप देतोय, म्हणूनच असे लोक सुखावलेले असतील, तर त्यांना येऊ घातलेले दुष्परिणाम कसे दिसू शकत होते? जे बघायचेच नाही, ते दिसून तरी काय उपयोग होता? त्यापेक्षा मग नसलेल्या गोष्टी बघितल्या जात होत्या आणि नसलेले त्यातले आशय शोधून त्याचे कौतुक चाललेले होते. संसदेत राहुलनी मोदींना जाऊन मिठी मारणे, किंवा कुठल्याही भक्कम पुराव्याशिवाय राफ़ायलच्या भ्रष्टाचारावरून काहूर माजवणे, फ़क्त एकट्या राहुलचा मुर्खपणा होता काय? राफ़ायल आणि बोफ़ोर्समध्ये जमिन अस्मानाचा फ़रक असताना त्या पोरकटपणाला टाळ्या वाजवून राहुलना ते विमान उडवायला प्रोत्साहन देणारे तथाकथित बुद्धीमंतच नव्हते काय? त्यातून प्रसिद्धीझोतात राहुलला ठेवून त्याच्यात घटोत्कच संचारण्याचे पाप कोणाचे होते? पराचा कावळा असे आपल्या मराठी भाषेत म्हटले जाते. पण असा कावळा करायलाही राहुलपाशी निदान पर म्हणजे पीस तरी असायला हवे ना? पण बुद्धीवादी युक्तीवाद त्याहीपलिकडे जाऊन खुळेपणाचा कहर करीत होता, कावळा आहे म्हणजे निदान पीस असेलच ना? राहुल इतका आरोप करतात, म्हणजे काहीतरी असणारच ना? हे खुळेपणच राहुलसहीत पुरोगामी पक्ष व विचारवंतांना घेऊन बुडालेले आहे. ज्यांनी राहुलला इतका अक्राळविक्राळ् करण्यासाठी काबाडकष्ट घेतले, त्यांचाच या आधुनिक घटोत्कचाने कपाळमोक्ष घडवून आणलेला आहे. आजवर जी लढाई राजकीय पक्षांपुरती मर्यादित होती, ती बुद्धीवादी प्रांतापर्यंत येऊन त्यांचाही राहुलच्या कर्तबगारीने विध्वंस होऊन गेलेला आहे.

ज्या बौद्धिक पुरोगामी पायावर आजपर्यंत या लोकांनी संघ वा भाजपाशी दोन हात केले होते, तो पायाच मागल्या लोकसभा निवडणूकीने उध्वस्त करून टाकला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात विविध पुरोगामी पक्ष उदयास आले. चळवळी आकारास आल्या. त्यांचा जनक जो वैचारिक वर्ग होता, त्याने कधी मैदानात येऊन राजकीय संघर्ष केला नव्हता. वेळोवेळी अशा वर्गाने आपल्या वैचारिक प्रेरणेतून राजकीय आंदोलनांना चालना दिलेली होती. मग ते आणिबाणीच्या काळातील आंदोलन असेल, मंडलचा संघर्ष असेल, विविध चळवळी व त्यानुसार आकाराला आलेल्या संघटना असतील. त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात कधी उडी घेतली नव्हती. त्यामुळे जनता पार्टी, लोकपाल आंदोलन अशा चळवळी पक्ष उदयास येऊन संपले, तरी वैचारिक पाया शाबुत असायचा. म्हणूणच नंतर पुन्हा नव्या रुपाने नव्या नावाने तशा चळवळी उदयास येत होत्या. यावेळी अशा वैचारिक वर्गाने राजकारण करताना आपल्यालाच उध्वस्त करून घेतले आहे. त्यांनी राहुल गांधी नामक चुकीच्या घोड्यावर आपली सर्व प्रतिष्ठा व पत पणाला लावून, दिवाळखोर होण्यापर्यंत मजल मारली आहे. ह्या लोकसभेतील मोदींचा विजय निर्विवाद नाही, तितका बुद्धीवादी वर्गाचा पराभव निर्विवाद आहे. कारण या वर्गाने मागल्या लोकसभा निवडणूकीत आपली सर्व अब्रु व विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनीच् राहुल गांधींचा् घटोत्कच उभा केला व त्याला अक्राळविक्राळ रुप दिले. पण तो आपल्यावरच कोसळला तर आपल्यालाच नामशेष व्हायची वेळ येईल; याचे भान राखले नव्हते. म्हणूनच आता अशा लोकांना विरोधी पक्षच नामोहरम होऊन गेल्यास लोकशाहीचे काय, अशी भ्रांत पडली आहे. मात्र आपले अवतारकार्य संपवून आधुनिक घटोत्कच अध्यक्षपद सोडून बाजूला झाला आहे. तर बिचारे त्याचे जनक मात्र त्याच्यात पुन्हा संजिवनी कशी फ़ुंकावी, म्हणून रडकुंडीला आलेले आहेत.

(आगामी ‘घटोत्कच’ या पुस्तकाची प्रस्तावना)

16 comments:

  1. मला वाटते की पप्पुला घटोत्कच म्हणणे बरोबर नाही. घटोत्कच हा पांडवांच्या म्हणजे सत्याच्या बाजूने लढत होता. पप्पू असतायाच्या बाजूने.

    ReplyDelete
  2. अप्रतिम भाऊ अप्रतिम

    ReplyDelete
  3. घटोत्कच भीमाचा हिडिंबा राक्षसी पासून झालेला मुलगा होता. त्याने महाभारताच्या युद्धात पांडवांच्या बाजूने प्रचंड पराक्रम केला आणि कर्णाने अर्जुनासाठी ठेवलेले अमोघ अस्त्र स्वतःच्या अंगावर घेऊन अर्जुनाला जीवदान दिले. राहुल नावाच्या मूर्खा साठी घटोत्कच याची उपमा वापरणे, पूर्णपणे चुकीचे आहे आणि घटोत्कचावर घनघोर अन्याय करणारे आहे. कृपया यावर विचार करावा.

    ReplyDelete
  4. भाउ, मागे तुम्ही कुमार केतकर यांचा त्यांच्या 'मोदींना सत्तेवर आणण्याचे जागतिक षड्यंत्र' याचा उपहासिक उल्लेख केला होता म्हणून मी देखील थोड़ा भीतिनेच लिहितोय. पण खरच एकूणच मीडिया, डावे आणि सुधारवादी यांचे कोणतेही षडयंत्र नव्हते असे तुम्हाला वाटते काय? माला तरी यात भ्रष्ट आणि ज्याना या देशबद्दल प्रेमच नाही अशा लोकांचा हा टाकलेला डाव नव्हता काय? निश्चितच भविष्यात आपली पापांना तोंड फुटु नए, शिक्षा होउ नए म्हणून कां होईना पण हा त्यांचा डाव होता असे मला वाटते.

    ReplyDelete
  5. भाऊ, उत्कृष्ट विवेचन. आगामी पुस्तक वाचायला आवडेलच. पण एक विनंती बऱ्याच मोदी समर्थाकान विशेषतः कट्टटर हिंदूत्ववादी समर्थकांना सध्या मोदी अल्पसंख्यांकाना ज्या सवलती जाहीर करताहेत उदा. शिष्यवृत्ती, त्या आवडलेल्या नाहीत, त्याना असा संशय आहे की, मोदी महात्मा गांधी होण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी या अल्पसंख्याक लोकांना विशेष सवलती देण्याविषयी एकदा तुमचे मत सांगा. आम्हाला तर मोदींच्या विषयी अजिबात संशय नाही. पण तरीही आपले मत महत्त्वाचे.

    ReplyDelete
  6. व्वा भाऊ वा!. मला वाटते की तथाकथीत पुरोगामी लोकांची सर्व रसद मोदींनी बंद केल्यामुळे हे पुरोगामी बुद्ध्याच राहुलला मोठे करत असावेत. जर आलाच राहुल निवडून तर करावी मजा मागच्या दहा वर्षांसारखी अशी रणनिती असावी.

    ReplyDelete
  7. 'पुन्हा मोदीच का?' या पुस्तकाची पुनरावृत्ती नसल्यास 'घटोत्कच' वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  8. Very correct. Court gesters around Rahul Gandhi have destroyed Congress. Sonia and Rahul deserve the same fate as they are" Rome Burns while Nero fiddles" !

    ReplyDelete
  9. फार योग्य. राहूल दोघांविरुध्द लढत होते1)मोदी व 2)पप्पूच्या, म्हणजे स्वतःच्या कारवाया

    ReplyDelete
  10. Yes I agree with you and I will say that election was based on hate of Modiji by opponents

    ReplyDelete
  11. Bhau, please don't insult Ghatotkach. Rahul Gandhi is no way close to this iconic figure. Perhaps Duryodhan and Dusshasan may be a close match.

    ReplyDelete
  12. Bhauni ekda Mahabharat vachayala have ase prakarshane vatate. Aajkalchya ghadamodibaddal aamhala pan maahiti aahe, pan bhau Mahabharat vachach.

    ReplyDelete