Tuesday, June 5, 2018

भृणहत्येचे कथानक

Image result for abp majha vishesh

गेल्या आठवड्यात दोनतीनदा एबीपी वाहिनीच्या चर्चेत सहभागी होण्याचा प्रसंग आला. वास्तविक मागल्या तीन वर्षात वाहिन्यांच्या चर्चेत जायचे मी सातत्याने टाळत आलेलो आहे. कारण नुसत्याच उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात आणि काही गंभीर चर्चा तिथे होत नाही. विविध पक्षांचे प्रवक्ते बोलावून त्यांना एकमेकांच्या उरावर बसवणे, हा वाहिन्यांवरील चर्चेचा खेळ होऊन बसला आहे. त्यात पुन्हा इकडची वा तिकडची बाजू घेणार्‍या पत्रकारांनाच सहभागी करून घेतले जात असते. परिणामी गडगडाट खुप होतो, पण प्रेक्षक म्हणून तो गोंधळ बघणार्‍यांच्या हाती काही लागण्यासारखे बोलले जात नाही. त्यालाच वैतागून मी अशा चर्चांपासून दुर रहायचे ठरवले होते. पण आग्रहाखातर एखाद्यावेळी जावे, म्हणून अशा चर्चेत सहभागी झालो. विषय होता, कर्नाटकातील आघाडीचे यश किंवा भाजपाचे फ़सलेले राजकारण. विषय कुठलाही असो, चर्चा बघणार्‍या ऐकणार्‍याला त्यातून काही बोध मिळावा, अशी किमान माझी अपेक्षा आहे. पण अशा कार्यक्रमात चर्चा कसली होती? तर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शपथविधी आणि त्यात सहभागी झालेले पंधरावीस पक्षाचे दुबळे नेते. त्यांनी एकमेकात हात गुंफ़ून उंचावले, तर विविध वाहिन्यांना विरोधी एकजुटीचे डोहाळे लागले होते. मी मागल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळच्या राजकीय घडामोडी बघितल्या व अनुभवल्या आहेत. सहाजिकच असे हात उंचावणार्‍यांची नियत मला पक्की ठाऊक आहे. म्हणूनच मला त्यांच्या एकजुटीविषयी कसलीही आस्था नाही की अपेक्षा नाही. पण पत्रकारिता किंवा माध्यमात नव्याने आलेल्यांना जगात पहिलाच काही चमत्कार वाटला, तर माझा त्याविषयी आक्षेपही नाही. आपल्यालाच सत्य गवसले असल्याच्या थाटात चालणारा खुळेपणा, माझ्या गळ्यात घालण्याचा प्रयास मला आवडत नाही. मग तिथे झाले काय?

मी माझी मते स्पष्ट मांडल्यावर चर्चेचा नियोजक प्रसन्ना जोशी याने माझ्यावर अतिशय खुळेपणाने काही गर्हणिय आरोप केले. नव्याने आघाडी निर्माण होत असेल तर त्या अर्भकाच्या नरडीला नख लावण्याचा करंटेपणा कशाला? इतका नतद्रष्टपणा कशाला? वगैरे शेलक्या भाषेत त्याने मला खडसावण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याच्या पिढीची पत्रकारिता अशीच उथळ असल्याने, आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. पण त्याच्यावर उलटा ओरडून कल्लोळ माजवण्याची उर्जा माझ्यापाशी नव्हती म्हणून मी पुढल्या टप्प्यात मला बोलण्याची संधी येईपर्यंत प्रतिक्षा केली. जेव्हा ती संधी मिळाली, तेव्हा मात्र उत्तर देऊन घेतले. कारणही स्पष्ट होते. प्रसन्ना किंवा तत्सम पिढीच्या पत्रकारांना महाविद्यालयातील प्रशिक्षण व पुस्तकांनी पत्रकारिता शिकवली आहे. प्रत्यक्ष घटनांचे आकलन करून त्याचे विश्लेषण करण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे आपण काय बोलत आहोत आणि त्या शब्दांचा अर्थ काय होतो, त्याचाही त्यांना थांगपत्ता नसतो. सहाजिकच लंबेचौडे शब्द फ़ेकले, मग त्यांना आपण परखड निर्भीड वगैरे झाल्याचे वांझोटे समाधान मिळत असते. उदाहरणार्थ मी आघाडीच्या राजकारणाविषयी अनास्था दाखवली, तर त्यामुळेच आता उद्या विरोधकांची आघाडी मोडून पडणार असल्याच्या सुतकात जाण्याची प्रसन्नाला काहीही गरज नव्हती. माझ्यासारखा निवृत्त पत्रकार व ब्लॉगर विरोधात गेला म्हणून आघाड्या मोडत नसतात किंवा कुणा संपादक पत्रकाराच्या आशीर्वादाने कुठला पक्ष जिंकणार नसतो. पण अशा नुसत्या कल्पनेने अर्भकाची गर्भातच भृणहत्या वगैरे बोलण्यापर्यंत मजल मारणार्‍यांना भॄणहत्या म्हणजे तरी नेमके काय, ते ठाऊक आहे काय? नसेल तर बोलण्यापुर्वी समजून घेण्याचे तरी सौजन्य असायला नको काय? भृणहत्या वा अर्भकाची हत्या कोणी येणाराजाणारा परका करत असतो काय?

अवांच्छित अर्भकाची हत्या कोणी भलतासलता करू शकत नाही. त्या गर्भाची माता किंवा तिच्या कुटुंबातले लोकच अशा हत्या करीत असतात. अन्य कोणी त्यामध्ये सहभागी होत असेल, तर तो निव्वळ त्यातला मदतनीस असतो. त्यात त्याचा कुठला व्यक्तीगत हेतू असू शकत नाही. मातेला वा कुटुंबातल्याच लोकांना नको झालेले मूल म्हणून असे गर्भपात वा भृणहत्या होत असतात. सहाजिकच त्यातला कपाळकरंटेपणा वा नतद्रष्टता असेल, तर ती आप्तस्वकीयांची असते. नरडीला नख लावणारे त्या अर्भकाचे आप्तस्वकीय वा जन्मदातेच असतात. मग आजच्या गर्भात असलेल्या विरोधी एकजुटीची हत्या त्यांच्यापासून मैलोगणती दुर रहाणारा कोणी भाऊ वा अन्य पत्रकार, त्याच्या नरडीला नख कसे लावू शकतो? तसे करणे फ़क्त त्यात सहभागी असलेल्यांनाच शक्य आहे आणि आजवर तेच होत आलेले आहे. प्रसन्ना जोशी वा त्याच्या पिढीचे अनेक निर्भीड पत्रकार आईच्या गर्भातही नव्हते, किंवा तशी शक्यता असण्यासाठी त्यांच्या मातापित्यांचे विवाहही झालेले नव्हते; अशा काळात आघाडीचे राजकारण भारतात सुरू झाले. त्यातले एक म्होरके असलेले रिपब्लिकन चळवळीचे दांडगे पुढारी दादासाहेब गायकवाड तेव्हाच म्हणाले होते, आघाडी म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. १९५५ सालात जन्माला आलेली देशातली पहिली सर्वपक्षीय आघाडी म्हणजे महाराष्ट्रातली संयुक्त महाराष्ट्र समिती होय. त्यात हिंदूसभेपासून कम्युनिस्टांपर्यंत सर्व बिगरकॉग्रेस पक्ष सामील झाले होते आणि तिला सुरूंग लावण्यात पुढाकार घेतला होता, ते प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते. थोडक्यात नरडीला नख लावणारे कोण होते? तर समितीतल्या दोन मोठ्या पक्षापैकी एक असलेले समाजवादी. कुमारस्वामी त्या पक्षाचे आजचे वंशज आहेत. तिथून ही भृणहत्या सुरू झाली आणि त्या परंपरेचे राखणदार कायम समाजवादी परिवारातले राहिलेले आहेत.

या नव्या पिढीच्या पत्रकारांना सोयीचा इतिहास व भुगोल शिकवला गेला असल्याने पुस्तकांपुर्वी जग नव्हते असाच त्यांचा समज आहे. मग त्यांना समिती का मोडली गेली ते तरी कशाला ठाऊक असणार? कम्युनिस्ट समितीवर कब्जा करीत असल्याने बेचैन झालेल्या समाजवाद्यांनी त्या आघाडीच्या नरडीला नख लावले आणि त्याचे कारण होते दूर युररोपातील हंगेरी नामक देशाचा पंतप्रधान इंम्रे नाज! सोवियत गटातील हंगेरीने त्या कम्युनिस्ट गोटातून बाहेर पडून लोकशाही देश होण्याचा निर्णय घेतला. सोवियत फ़ौजांनी त्या देशात घुसखोरी करून इम्रे नाज याचा मुडदा पाडला. त्यातून लोकशाहीचा मुडदा पाडणार्‍या कम्युनिस्टांचा निषेध करणारा प्रस्ताव समाजवादी गटाने मुंबई महापालिकेत आणला आणि समिती नावाची आघाडी मारली गेली. आघाडीच्या गळ्याला नख लावण्यासाठी असे परदेशातील राजकीय हत्याकांड वा कारण पुरेसे ठरत असेल, तर पुढल्या काळात डझनावारी आघाड्या व मोर्चे कशाला मारले गेले, त्याची कारणे देण्याची गरज नाही. प्रत्येकवेळी अशा दिवाळखोरांनीच त्या आघाड्या उत्साहात उभ्या केल्या आणि गर्भधारणा झाली, मग त्या अर्भकाचे गर्भपात करून घेतलेले आहेत. जनता पक्ष असो किंवा सतत एकत्र येऊन दुभंगत राहिलेले समाजवादी पक्ष असोत. त्यांच्या नरडीला नख लावण्याचे पाप त्यांनीच केलेले आहे. त्यांनीच प्रेमाची नाटके रंगवून अनौरस संततीची गर्भधारणा करण्याचे पाप केलेले होते. पण गर्भधारणा, गर्भ, अर्भक वा नरडीला नख असले शब्द नेमके संदर्भासह ठाऊक नसलेल्यांना हे कोणी कसे समजावायचे? मिळाला शब्द की दे ठोकून, असला खळखळाट करण्याची पत्रकारिता आजकाल सोकावली आहे. तर त्यापासून दूर रहाणे म्हणून मला शहाणपणा़चे वाटते. अशा शहाण्यांच्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा अडाण्यांच्या गावात किती सुखाने जगता येते ना?

41 comments:

  1. भाऊ त्या नतदृष्टाने हे वाचायला हवे.उथळ पात्रकरिता करणाऱ्या शहाण्यांना संदर्भ लक्षात घेण्यासाठी तुम्ही एक पुस्तक का लिहीत नाही? तुम्ही स्वतः एक ज्ञानकोश आहात पुस्तक लिहिण्याचा विचार नक्की करा भाऊ.आम्हाला खूप लाभ होईल अपल्या या अनमोल अनुभवाचा.

    ReplyDelete
  2. जबरदस्त भाऊ !! त्यादिवशी मी live चर्चा पहिली कारण News चॅनल बदलताना तुम्ही दिसलात तर मी म्हटलं इतक्या दिवसांनी भाऊ म्हणून पाहिलं तर जोशीं वेगळ्याच सुरात तो तुम्हाला बोलत होता मला वाईट वाटलं मात्र तुम्ही नंतर योग्य प्रतिउत्तर द्याल ही अपेक्षा होती आणि झालं तसेच 😊

    ReplyDelete
  3. ह्या अप्रसन्ना मुळे माझ्या सकट कित्येकानी ABP माझा बघयाचे सोडुन दिले, हा अॅकर थोडा राजकीय प्रवक्ता अशा थाटात वागतो !

    ReplyDelete
  4. हे अॅकर कमी राजकीय प्रवक्ता जास्त वाटतात !

    ReplyDelete
  5. प्रसन्न जोशी सगळं आपल्यालाच कळत अशा समजूतीत असतात व भाजपाला संपविण्याचा विडा उचलला आहे अस तावातावाने बोलत असतात.

    ReplyDelete
  6. प्रसन्न जोशी म्हणजे ' वट वट वागळेंचा ...............जरा सौम्य अवतारच ' म्हणायला हरकत नाही. त्याच कार्यक्रमात ' वानखेडे ' नावाच्या पत्रकारांनी सुरुवातीला परखड प्रतिक्रिया दिली होती. सुनामी आल्यावर वाहत येणाऱ्या ओंडक्यावर मुंगूस , साप आणि असेच अनेक प्राणिमात्र सर्वजण लटकून बसतात. तोच हा कर्नाटकातील प्रकार होता असे ते म्हणाले. म्हणजे लगेचच ' महायुती ' ............आणि काय अन काय .......!! मुंगेरीलालांचे ' स्वप्नसोहळे ' सुरूच....!! अर्ध्या हळकुंडाने ' पूर्ण ( काविळीतल्या रुग्णासारखी ) पिवळी झालेली युतीतील सदस्य !!........सगळा आनंदीआनंद '

    ReplyDelete
  7. भाऊ,प्रसन्न जोशी पक्का कम्युनिस्ट विचारांचा आहे आणि अश्या उथळ पाण्याला खळखळाट फार आहे.
    तुम्ही तो सोदाहरण दाखवला.

    ReplyDelete
  8. प्रसन्न जोशी इतका महामूर्ख पत्रकार गेल्या अनेक वर्षांत मी पाहिला नाही

    ReplyDelete
  9. Bhau kashala jata aslya faltu charcha na, tithe tyana have tech bolave lagte. Marathi news channels hopeless aahet mi tar kevha ch pahane band kelay. Hindi madhe India tv ani z news thode bare.

    ReplyDelete
  10. भाऊ अचूक शब्दात प्रसन्न जोशी आणि तत्सम लोका बद्दल लिहिलेत। हे तथाकथित पुरोगामी पत्रकार हे विसरून जातात की ते एका पक्षाची बाजू घेऊन बोलत असतात आणि ज्या समाजात राहतात त्याच्या विरोधी बोलत असतात। कुठे कर्नाटक त्यातले या प्रसन्ना ला काय कळते पण पुस्तकी पत्रकारिता उफाळून येते। आणि मुख्य म्हणजे आपण अतिशहाने आहोत ही भूमिका। हे लोक बब्रुवाहणाची अवलाद असल्या सारखे करतात।
    सखा पाटील मरो नांही तर तुका घाटा वरच्या भटा चे तेरावे पक्के या म्हणी प्रमाणे हे तथाकथित पत्रकार द्वेषाची पोळी भाजत असतात। दोन राजकिय पक्ष विरोधी असले तरी काही नेते किंवा कार्यकर्ते शत्रू नसतात पण हे पत्रकार त्यांना अगदी पिढीचे दुष्मन असल्या सारखे दाखवतात।
    चीड येते हे सगळे बघून। मी जुन्या पिढीत संघाचे काम करणारे अनेक लोक सुयोग्य काँग्रेस नेत्याला मत देणारे पाहिलेत। चॅनेल वाले मात्र संघ आणि कॉंग्रेस म्हणजे मांजर कुत्रा असे बोलतात।

    ReplyDelete
  11. तुमच्या या लेखाने प्रसन्ना जोशीचं नाही माहीत पण आम्ही वाचक मात्र अती प्रसन्न झालो..

    ReplyDelete
  12. "भाऊसाहेबांची बखर" उद्बोधक.भाऊ, तुम्हला सलाम.

    ReplyDelete
  13. सदर चर्चा कोठे पहायला मिळेल का ? (मी हल्ली न्यूज चँनेलसुद्धा पहायचे सोडले आहे.)

    ReplyDelete
    Replies
    1. Here is the link: https://youtu.be/dja9uKCaEls

      Delete
  14. ह्या चर्चेची Link मिळेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.youtube.com/watch?v=dja9uKCaEls

      Delete
    2. https://youtu.be/dja9uKCaEls

      Delete
  15. नवीन पत्रकारांचा व्यासंग बघून हसावे की रडावे हेच कळत नाही!!!

    ReplyDelete
  16. भाउ प्रसन्ना अतिशय मुजोर आणि उद्धट आहे मी तुमची संघ कार्यक्रमात प्रणवदा हीचर्चा पाहिली तो तु्मच्यावर सारखे टोमणे मारत होता पुढे बसलेल्या गेस्ट नी काही भुमिका घेणे सहज असते अॅंकर ने अशी टोकाची भुमिका घेउन स्वताचे करीयर संपवलेले अॅंकर (पत्रकार नाहीत ते )भारतात खुप आहेत आम्ही प्रसन्नाला सहन करतो ते तुमचे विश्लेषन एेकन्यासाठी तिथे नसाल तर ब्लाॅग आहेच.

    ReplyDelete
  17. फारच छान. Like option required.

    ReplyDelete
  18. भाऊ आपण केलेली मिमासा उत्कृष्ट पण आपण नाव न घेता चिमटा काढला असता तर उत्तम अनुल्लेखाने मारावे अशी म्हण आहे पण त्याचे नाव घेतल्याने आपल्या १-२ लाख वाचक वर्गापर्यंत उगाच या कोंबड्या चे नाव गेले, ही त्याची प्रसिद्धच आहे. कारण ही जातच मूळ शेपट्या सारखी वाकडी ती वाकडीच

    ReplyDelete
  19. very well said. Particularly this Prasanna Joshi is self declared tycoon of marathi news media. Do not allow others to speak or let them speak only what he wants to listen.

    ReplyDelete
  20. ALL THE NEWS CHANNELS ARE PAID AND WORKING FOR SOME ONE HENCE WE SHOULD NOT EXPECT FROM ANY OF THESE CHANNEL “CHARCHA” SHRI BHAU REFRAIN FROM ATTENDING SUCH PROGRAMMES THAT IS THE BEST

    ReplyDelete
  21. भाऊसाहेब सलाम...

    ReplyDelete
  22. Kevhach he sagle channel band kelet lahan,tya murka la aakal nahiye bhau

    ReplyDelete
  23. I wish to change the channel once I see prasanna there

    ReplyDelete
  24. क्या बात है भाऊ शत शत प्रणाम !!!!

    ReplyDelete
  25. नितीन वागळे नंतर स्वतःला सर्व काही समजते अश्या आवात जोशींची पत्रकारिता आहे .

    ReplyDelete
  26. Bhau agdi manatal bollat. He prasanna joshi navache mahashay nehmi kuthalyatari eka pakshachi supari ghetalyasarkhe charcha karat astat, charcha kasali te fakt apale ghode damatat astat, virodhi vichar mandnaryacha apaman karayacha ani sahishnutevar bhashan thokayach ha tyancha khakya. Tyanchya mule me ABP maza pahane sodun dile ani tumhihi tithe jau naye ase mala vatate karan tithe nikhal charcha hot nahi. Asale suparibaj patrakar pahilyavar tyana lokshahicha chautha stambh mhanatana jibh nakkich adakhalel.

    ReplyDelete
  27. पण खरे सांगू का भाऊ या प्रसन्न जोशी ची तुम्ही ब्लॉग मधल्या एखाद्या लेखामध्ये दखल घ्यावी इतक्या देखील योग्यतेचा तो मनुष्य नाही .तुमच्या अनुभवा पुढे या माणसाची कुठेच पोच नाही

    ReplyDelete
  28. भाऊ सदाबहार लेखणी आणि वाणी तुमची

    ReplyDelete
  29. प्रसन्ना जोशी हा बिन पेनाचा पत्रकार आहे. आणि त्याच्या अज्ञानाचे दर्शन तो रोज करत असतो. माझा तर म्हणणं आहे भाऊ तुम्ही रोज वाहिनीवर यावे आणि असल्या फालतू पत्रकारितेचे वाभाडे काढावेत.

    ReplyDelete
  30. अप्रतिम.....खूपच मिरच्या लागल्या असतील प्रसन्न जोशीला...👌👌

    ReplyDelete
  31. कोणत्या दिवशी तारखेला झाली ही चर्चा

    ReplyDelete
  32. एक नंबर लेख!! भाऊ पुस्तक लिहा ह्या लेखांचं.

    ReplyDelete
  33. कशाला दुखवताय भाऊ त्याला...प्रसन्न सुध्दा त्या विश्वंभर चौधरी सोबत राजकीय आघाडी उघडून‌ राजकारणातला आसाराम व्हायची स्वप्ने पाहतोय..हा लेख लिहून‌ तुम्ही त्याला भ्रुणहत्येसाठी भाग पाडलतं..तुमचचं चुकलं

    ReplyDelete
  34. हा प्रसन्न जोशी म्हणजे खूळचट मनूष्य आहे.
    प्रत्येक चर्चेत सर्वद्यानी असल्या सारखा मत प्रदर्शीत करतो याच शिक्षण काय झालय कोणा माहित पण अर्थ ,सामाजीक, राजकरण देशातील , परदेशातील सर्व बाबींन वर द्यानी असल्या सारखा बोलतो. बोलवलेल्या पाहूण्याचे एखाद्या विषयावरिल मत जाणून घ्.ाााय! बोलवलेल आहे कि त्या पाहूण्याचे प्रसन्न जोशी कडून प्रबोधन करण्यासाठि बोलवले आहे तेच कळत नाहित.

    कूठले बदाम खातो काहि कळत नाहि हा

    ReplyDelete
  35. Arey...Haa Tar Joshyanchaa APRASANNA! Aprateem kaa unghadnee. Ek mhan aathavlee -"Untachya budkhyachaa mukaa ghyaylaa gela kee tondarvar shenach padnaar." Prasanna Joshyane te Howsene limpun ghetlen hey tyachya NIRBUDHH PANAACHE satya swaroop.

    ReplyDelete