Sunday, December 1, 2019

दोन रिमोटचे एक सरकार

हा लेख लिहायला बसलो असताना नव्या सरकारच्या शपथविधीला चोविस तास बाकी होते. अशावेळी वृत्तवाहिन्यांवर एक बातमी झळकली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले, अशीच बातमी आहे. याचा अर्थ नव्याने स्थापन होणार्‍या तीन पक्षांच्या सरकारचा बोलविता धनी कोण आहे, त्याची स्पष्ट कल्पना येऊ शकते. यापुर्वी १९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिमानाने सांगायचे, की राज्यातील युती सरकारचा रिमोट कट्रोल आपल्या हातात आहे. थोडक्यात मातोश्री या स्थानावरून राज्याची सुत्रे हलवली जातात, असेच त्यांना म्हणायचे होते. भले राज्यात युतीचे म्हणजे शिवसेना व भाजपाचे संयुक्त सरकार होते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होता. पण बाळासाहेबांना विचारल्याशिवाय राज्याची सुत्रे हलत नव्हती. आता वीस वर्षांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो आहे आणि तो मुख्यमंत्रीच खुद्द मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी वास्तव्य करणारा आहे. पण मुख्यमंत्र्याचा वा सरकारचा रिमोट कंट्रोल मात्र मातोश्रीच्या हाती उरलेला नाही. इतकाच त्या ताज्या बातमीचा अर्थ आहे. किंबहूना आजपर्यंत बाळासाहेबांच्या गैरहजेरीत पक्षाची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती आणि मागल्या सहा वर्षात त्यांनी समर्थपणे पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. भाजपाशी भांडण करून असेल किंवा जुळवून घेत असेल, पण पक्षाच्या नेतृत्वावर उद्धव यांनी मांड ठोकलेली होती. ती तशीच आता त्यांच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या संयुक्त सरकारच्या बाबतीत कायम रहाणार आहे काय? असती तर त्यांच्याच नावावर भावी मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुख्य सचिवांनी आधी मातोश्रीवर धाव घेतली असती. पण तसे घडलेले नाही आणि ती येऊ घातलेल्या भविष्याची चाहूल आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री सत्तेत बसवताना उद्धव किंवा सेनेला कोणती किंमत मोजावी लागली, त्याची ही चाहुल आहे.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री हे ऐकायला शिवसेनेच्या कार्यकर्ते व सैनिकांना भारावून टाकणारे वाक्य आहे. पण त्यासाठीची किंमत किती व कोणती आहे? त्या़चे उत्तर अजून कोणाच्या मनातही आलेले नाही. त्यावर कोणी चर्चाही केलेली नाही. त्याचे पहिले उत्तर तीन पक्षांच्या सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी व बोलणी सुरू झाली, तेव्हाच मिळालेले होते. पण ते ऐकायला व समजून घ्यायला वेळ कोणाला होता? दिल्लीला सोनिया गांधींची भेट घेऊन किंवा त्यांना संयुक्त सरकारसाठी मनवून शरद पवार माघारी परतले; तेव्हाच त्याचे उत्तर मिळालेले होते. पवार अर्थातच दिल्लीहून मुंबईला पोहोचले ते विमानाने. ते विमान जिथे उतरते, तिथून पवारांच्या घरी सिल्व्हर ओक बंगल्यावर जाण्याचा मार्ग वांद्रे पुर्व येथून जातो. तिथे कलानगर जंक्शन आहे. त्या जंक्शनला डाव्या हाताला गाडी वळवली, मग हाकेच्या अंतरावर मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. तर उजवीकडे वळले की सागर सेतूच्या मार्गाने दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओकला जाता येते. पण पवार त्या रात्री डावीकडे वळले नाहीत. उजवीकडे वळून थेट आपल्या निवासस्थानी निघून गेले. अवेळ होती आणि पवार मुंबईला परतल्याचे कळताच शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीवरून आपल्या सुपुत्रासह बाहेर पडले आणि तात्काळ सिल्व्हर ओकला पोहोचले. तिथे उशिरापर्यंत त्यांची पवारांशी बोलणी झाली. तिथून मातोश्रीचे महात्म्य संपुष्टात आले व सिल्व्हर ओकचे महात्म्य सुरू झाले. गुरूवारच्या शपथविधीच्या तयारीसाठी वा भविष्यातल्या सरकारची दिशा धोरण ठरवण्यासाठी बुधवारी  राज्याचे मुख्य सचिव भावी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याकडे गेले नाहीत. त्यांनी वांद्रा येथे जाण्यापेक्षा सिल्व्हर ओकचा जवळचा पत्ता शोधला आणि शरद पवार यांच्याशी सल्लामसलत केली. गेल्या महिनाभरात म्हणजे शिवसेनेचाच मुख्यमंत्री आणायचा अट्टाहास झाल्यापासून मातोश्रीची महत्ता क्रमाक्रमाने कशी घटत चालली आहे, त्याचा हा पुरावा आहे. पण लक्षात कोण घेतो?

आजपर्यंत बाळासाहेबांना कधी कोणाला असे सांगण्याची वेळ आली नाही, की अमूकतमूक कारणासाठी मातोश्रीवर यावे लागेल. गेल्या पाचसहा वर्षात ही भाषा जोरात चालू होती आणि अमित शहा वा नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत तर मातोश्रीवर येण्याची अट कायमस्वरूपी असायची. पण आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असताना, खुद्द पक्षप्रमुखांसह कोणालाही मातोश्रीची महत्ता वाटेनाशी झालेली आहे. तेच मातोश्री विसरून सिल्व्हर ओकच्या अखंड वार्‍या करू लागलेले असतील, तर बाकी शिवसैनिकांची काय बिशाद आहे? गंमत बघा, १२ तारखेला राष्ट्रपती राजवट लागल्यावर मातोश्री हा विषय गुलदस्त्यात गेला आहे. त्यानंतर एकदाच उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात मातोश्रीचा उल्लेख आला. आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली असताना तो उल्लेख झाला. तिथे म्हणे काही आमदारांनी नेत्यांनी भाजपासोबत जाण्याचा विषय पुन्हा काढला होता, त्याबाबतीत बोलताना उद्धव म्हणाले, निकाल लागल्यापासून देवेंद्र वगळता मोदी व अमित शहा यापैकी कोणाचा एकदाही मातोश्रीवर फ़ोन आला नाही किंवा संपर्क झाला नाही. पण हे सांगताना अन्य ज्या नव्या मित्रांना शिवसेना जोडून घेते आहे, त्यापैकी कितीजणांनी मातोश्रीशी संपर्क केला, त्याबाबतीत मौन होते. सोनिया गांधी,अहमद पटेल वा शरद पवार किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी मातोश्रीशी नवे संयुक्त सरकार स्थापण्यासाठी संपर्क केला होता? निदान ज्या बातम्या दिसतात, त्यावरून आजकाल मातोश्रीचे निवासीच अन्य पक्ष व नेत्यांच्या घरी धाव घेत असतात. पवारांची दिल्लीवारी होताच पक्षप्रमुखांचे सिल्व्हर ओकला धाव घेणे त्यापैकीच एक आहे. म्हणून नवे मुख्यमंत्री व शिवसेना यांच्या वाटचालीत मातोश्रीचे स्थान आता नेमके काय? असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. ही नुसती मातोश्रीची महत्ता नाही. तिथून पक्ष व सत्ता असेल त्यावर चालणारा रिमोट, यांच्याही महत्तेचा विषय त्यात येत असतो. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि त्याचा रिमोट अन्यत्र?

आता नुसती सुरूवात झालेली आहे. शरद पवार या युतीचे शिल्पकार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या हुकूमतीखाली हे सरकार चालण्याची अपेक्षा असेल, तर त्यात गैर काहीच नाही. पण ते नुसतेच ज्येष्ठ नेता नाहीत. दिर्घकाळ मंत्री मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांना प्रशासनाचे अनेक बारकावे माहिती आहेत आणि म्हणूनच त्यांचा रिमोट म्हणजे बाळासाहेबांचा नाही. मुख्यमंत्र्याला जितके प्रशासनातले कळणार नाही, तितक्या खाचाखोचा पवारांना अवगत आहेत. सहाजिकच कुठल्याही फ़ाईल्स वा कागदपत्रे काय दर्जाची वा महत्वाची आहेत, त्याचा आवाका पवाराना अधिक असेल. त्यामुळे पवारांना टाळून शिवसेनेचा मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घेऊ शकणार नाही आणि कुठलाही मंत्री सुद्धा पवारांना बाजूला ठेवून आपल्या मनाने कारभार करू शकणार नाही. एकीकडे पवार दैनंदिन कारभारात लक्ष घालणारे वरीष्ठ आहेत आणि दुसरीकडे दिल्लीत बसलेल्या सोनिया गांधी आहेत. त्यांच्याही पक्षाचा पाठींबा व सहभाग या सरकारमध्ये असल्याने त्यांनाही त्यात हस्तक्षेप करण्याची मुभा द्यावी लागणार आहे. अर्थात सोनिया कधीही थेट कारभारात हस्तक्षेप करीत नाहीत. त्या आपल्या अधिकाराच्या रिमोटने चालणारे अहमद पटेल नावाचे रिमोट अशा बाबतीत कामाला लावतात. म्हणजे रिमोटच्या रिमोटमार्फ़त त्यांचे आदेश पाळावे लागणार आहेत. दिल्लीत पोहोचल्यावर १० जनपथ येथे नित्यनेमाने हजेरी लावावी लागणार आहे. कुमारस्वामी यांनी त्याच संदर्भातले आपले अनुभव वेळोवेळी माध्यमांना वा सभेतील श्रोत्यांना सांगून ठेवलेले आहेत. आपल्याला कॉग्रेसने मुख्यमंत्री नव्हेतर चपराशी बनवून ठेवले आहे, असे कुमारस्वामी यांनी स्वत:चेच वर्णन बखरीत करून ठेवलेले आहे. त्यापेक्षा उत्तम शब्दातली कॉग्रेस पाठींब्याची व्याख्या अन्य कोणी आजवर केलेली नाही. त्यामुळे आगामी काळातील शिवसेनेचा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख अशा दोन भूमिकातील उद्धव ठाकरे यांना बघणे कौतुकास्पद असेल.

अर्थात दिल्लीच्या रिमोटची आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. त्या रिमोटवर काम करण्याचा दांडगा अनुभव मनमोहन सिंग यांच्या खात्यात जमा आहे. त्यांनी नुसता सोनियांचा रिमोट अनुभवलेला नाही. तर राहुल गांधी यांचाही अनुभव त्यांनी घेतला आहे. एकदा तर राहुलनी मनमोहन सरकारने जारी केलेला अध्यादेशही फ़ाडून टाकला होता. त्यामुळे अमेरिकेतही मनमोहन सिंग यांच्यावर नामुष्की आलेली होती. पण त्यातूनही ते निभावून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सल्लाही उपयुक्त ठरू शकेल. शिवाय योग्य मार्गदर्शनही मिळू शकेल. कोळसा खाणीच्या चौकशीमध्ये आपल्या कार्यालयात कोण कुठल्या फ़ायली मागवतो आणि काय ढवळाढवळ करतो, तेही ठाऊक नसल्याची कबुली त्यांना न्यायालयात द्यायची वेळ आलेली होती. आता सिल्व्हर ओकवर मुख्य सचिव पोहोचले, म्हणजे प्रत्यक्ष कारभारी कोंण असणार, ते स्पष्ट झालेले आहे, मुद्दा इतकाच, की सह्या तुमच्या असतील. पण निर्णय कोणाचे असतील, ते तुम्हालाही समजू शकणार नाही. अर्थात त्यामुळे विचलीत होण्याचे कारण नाही. आपला मुख्यमंत्री आणण्याची महत्वाकांक्षा पुर्ण करताना; असेल ती किंमत मोजायची तयारी ठेवायलाच हवी ना? शिवसेनेने ती तयारी केलेली आहे, मग इतरांनी नाके मुरडण्यात काय अर्थ आहे? शिवसेनेचा मुख्यमंत्री हे उद्दीष्ट आहे. त्याचे अधिकार किती वा त्याच्यावर रिमोट कंट्रोल कोणाचा; असले प्रश्न विचारण्याची गरजच काय? मातोश्रीची महत्ता काय? पुर्वपुण्याईचे महत्व कशाला उरते? थोडक्यात शिवसेनेच्या या नव्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देणे योग्य ठरेल. कारण जेव्हा आपल्या हातात काही उपाय नसतो, तेव्हा शुभेच्छा व सदिच्छा इतकेच आपण कोणाला देऊ शकत असतो. मातोश्रीने घडवलेला इतिहास जगाने बघितला आहे. मातोश्रीची महत्ता इतिहासजमा केली जाताना बघणे वेदनादायक आहे इतकेच.

26 comments:

  1. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे उद्धव ठाकरेना प्रशासनाचा काही अनुभव नसल्यामुळे ते काकाचा सल्ला घेतील मग काका त्याचा प्रसिद्ध पुर्ण कर्जमाफीचा फॉर्म्युला काढून शेतकरी सोडून सर्व मंत्र्यांपासून सर्व कार्यकर्त्या पर्यंत सर्व निधी वाट्ला जाईल.तसेच आधीच्या सरकारच्या सर्व चांगल्या योजना बंद करुन भ्रष्टाचाराच्या नविन नविन योजना काकाच्या साल्याने आखल्या जातील.त्यात काकांचा खुप अनुभव आहे व ते पाच वर्षे उपाशी आहेत व त्यात अडकले तर बळीचा बकरा तर मुख्यमंत्रीच असेल.

    ReplyDelete
  2. भाऊ पक्ष संघटना बांधण्यात हयात घालवलेल्या मोदी आणि अमित शहा यांनी हेच ठरवले असावे जे आपण म्हटले आहे, कारण गेल्या पाच वर्षात सत्तेत बसलेल्या सेनेने स्वतःच्या पक्षाचा विस्तार करायचा सोडून सामना मधून स्वतः सहभागी असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारवर अत्यंत गलिच्छ शब्दात टीका केली आहे, त्यामुळे आता या दबावापुढे झुकायचे नाही भले काही काळ सत्तेच्या बाहेर राहावे लागले तरी चालेल अशीच या वेळी अमित शहा यांची या वेळी भूमिका होती सुडाने पेटलेल्या सेना नेतृत्वाला हे लक्षात आले नाही जेंव्हा केव्हा हे लक्षात येईल तेंव्हा मात्र सर्व काही हातातून निघून गेलेले असेल

    ReplyDelete
    Replies
    1. Nagpur: NCP chief Sharad Pawar said the direct benefit trans ..




      Read more at:
      http://timesofindia.indiatimes.com/articleshow/72077526.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cpps
      t

      suruvaat zaali suddha

      Delete
  3. याला म्हणतात कपाळ करंटे

    ReplyDelete
  4. पण राऊत अजुन सामना मधून चढ्या आवाजात सल्ले देऊ करत आहेत फडणवीस यांना, या माणसाची मग्रुरी कधी संपायची.. वात आणला आहे याने.. आता तर वाटतं की कधी समोर दिसला तर झोडपले पाहिजे

    ReplyDelete
  5. bhau
    तुमच्यातल्या जुन्या आणि आजच्या सेना समर्थकांची वेदना परीणामकारक मांडलित पण राउतां सारखे सल्लागार आणि कारभारी असताना वेगळे काय होणार?

    यासाठि एक म्हण आहे "लाखाचे बारा हजार करणे".
    पण या पोरकटपणाची किंमत सगळा महाराष्ट्र विनाकारण मोजतोय. शेवटि हिशेबाची वेळ येईलच आणि तो अचुक होईल.

    मात्र पोरकटपणाला राजकारण समजणारे फार काहि गमावतिल आणि ते हि कायमचे.

    ReplyDelete
  6. भाऊ, विद्यमान मुख्यमंत्र्यांचे योग्य विश्लेषण.

    ReplyDelete
  7. खरच वेदनादायक आहे. एका निर्णयामुळे राजकारण जबरदस्त फिरले. सामान्य जनतेला सुद्धा या सगळ्याचा फार मानसिक त्रास झाला. अनिश्चितता आणि फसवणूक झाल्याच्या भावनेने.

    ReplyDelete
  8. सैनिकांचे स्वप्न सत्यात उतरल्या प्रीत्यर्थ सोयिस्कर धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्यांच्या भाऊगर्दीतलेच एक मराठी दैनिक "माघार" चा एक विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीच्या कणा कवितेची या अंकातील ही 2019 आवृत्ती

    "ओळख नका सांगू जुनी" विनवित ऐसे आला कोणी
    कपड्यांवरती गुलाल, उसन्या अवसानाची वाणी
    बस म्हणलेलं ऐकेचना, बोलला थयथय नाचून
    कैकेयीगत जुनी वचने, शपथा दाखवी वाचून
    निष्ठा धुतल्या, आग विझवली, इभ्रत मातीत घातली
    प्रसाद म्हणून घड्याळाहातची देशी थोडी घेतली
    संसार मोडून मैत्रिणींसोबत सर लिव्ह इन थाटतो आहे
    कालची माझीच थुंकी सारी स्वतः होऊन चाटतो आहे
    जोड्याकडे हात जाताच लगबगीने धडपडला
    "चार हाणा पण साहेब म्हणा", लाचारीने पुटपुटला
    मान झुकलीय, शेपुट घातलंय, स्वतःच मोडलाय कणा
    काणाडोळा करून फक्त "विजय असो" म्हणा

    ReplyDelete
  9. भाऊ युती आघाडी हा विषय कायमस्वरूपी टिकला तर दोन्ही पक्षांना नुकसानीचा असतो, जी सेना भाजप युती दीर्घकाळ टिकली त्यामुळे आज भाजपचे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात अस्तिव संपले आहे, तर आताच्या निवडणुकीत पुण्यासारख्या शहरात सेनेच्या वाट्याला एकही जागा आली नाही, अशा स्थितीत शिवसेना दोन पक्षांच्या युतीतून तीन पक्षांच्या आघाडीत गेली आहे म्हणजे यांची आघाडी टिकली तर सेनेला वाटणीत किती जागा लढवायला मिळणार हा प्रश्न आहे म्हणजेच एकेकाळी भाजपसोबत 170 जागा लढवत असलेल्या सेनेला त्यांचे नवे मित्र जेमतेम 80 ते 90 जागा कशाबशा देऊ शकतात आणि सेनेचा हा नवा घरोबा मधेच मोडला तर गावागावात शिवसेनेसाठी खस्ता खाणारे कार्यकर्ते कोणत्या तोंडाने परत लोकांसमोर जाणार आहेत? याउलट भाजप सेनेच्या जोखडातून मोकळा झाला आहे, म्हणजेच आता दोनदा शंभर पार केलेला भाजप 288 मतदारसंघात तयारी करू शकतो अमित शहा नावाचा संघटक अशा संधीचा फायदा घेतल्याशिवाय राहील का?

    ReplyDelete
  10. नमस्कार भाऊ,

    यू ट्यूब वरील 'राजकारणाचे 20 -20' या विश्लेषणा मधे तुम्ही असे म्हणालात की झारखंड मध्ये anti incumbency चा भाजप ला धोका आहे. परंतु मे महिन्यात तुम्ही anti incumbency या कल्पनेवर टीका केली होती. Anti incumbency या विषयावर तुमचे काय विचार आहेत हे कृपया एकदा सविस्तर मांडावे. राजकारणात या गोष्टीचा किती प्रभाव असतो, ती खरोखरच असू शकते का यावर सविस्तर लिहावे. तुमच्या कडून खूप शिकायला मिळते म्हणून ही विनंती.

    पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete

  11. कुठे नेऊन ठेवली शिवसेना माझी? असा प्रश्न विचारण्यासाठी वेळ आज शिवसेनेवर आणि पर्यायाने बाळासाहेबांवर प्रेम करणार्या मराठी माणसावर आली आहे. सत्ता-सुंदरींच्या कुंकवाचे धनी उध्दव ठाकरे असले तरी वागवणारे धनी वेगळेच असे दुर्देवी परिस्थिती महाराष्ट्रात उभारून आलेली दिसते. उध्दवना ही स्थिती समजत नसेल असे म्हणणे अतिशयोक्ती होईल मग तरिही असा निर्णय का बरे घेतला असावा? इथे कसली मजबूरी होती की सत्तेचा मोहच एवढा भारी होता? चांगली मंत्रिपदे मिळावी म्हणून ताणत असतिल असेच पहिल्यांदा वाटत होते पण राऊतांच्या बेताल वक्तव्यांनी परतीचा मार्गच अचानक बंद करून टाकला का? की भाजपाच्या वागणुकीत कुठे ह्या मनोभंगाची बिजे रूजली?
    या मुद्द्यावर लिहा ना भाऊ.

    ReplyDelete
  12. खूपच परखड लिहिता भाऊ ,चिंचवडला तुमचे व्याख्यान आहे ,वाट बघतोय

    ReplyDelete
  13. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात ते काही खोटं नाही.

    ReplyDelete
  14. मातोश्रीने घडवलेला इतिहास जगाने बघितला आहे. मातोश्रीची महत्ता इतिहासजमा केली जाताना बघणे वेदनादायक आहे इतकेच.
    खरंच वेदनादायी...

    ReplyDelete
  15. विदारक भविष्य सेनेचे आपल्या सगळ्यांनाच दिसत होते पण 'वतना'च्या मागे लागलेले स्वार्थी लोक सल्लागार म्हणून आजूबाजूला घेऊन त्यांच्या बोंडल्याने दूध पिणाऱ्यांचे हे असे गळ्यात दोर बांधलेले माकड होताना पाहून अतिशय वाईट वाटतेय.. थोरले छत्रपती गेल्यावर संभाजीराजांना दुफळीने घेरले.. फितुरीने घात केला..पण ते निधड्या छातीने संकटांना सामोरे गेले किर्तीरुपाने उरले.. पण येथे चुकीचे सल्लागार जवळ केल्याने दोन मदाऱ्यांच्या हातातील दोरावर नाचायची वेळ आली आहे!

    ReplyDelete
  16. If Mr. Amit Shah had promised to Mr. Uddhav Thakre the CM post for 2.5 years then why he didn't fight elections. Was he expecting that Mr. Aditya would be made CM?

    ReplyDelete
  17. भाऊ सही विश्लेषण व आपण सांगितलेले भाकित लगेचच सत्य म्हणुन प्रत्यक्षात येत आहे.. आरे कारशेड आंदोलनातील सो काॅल्ड पर्यावरण वादी (आठवा नर्मदा व एनराॅन बंद करणारी मेधा पाटकर) यांच्या विरोधी भाजप सरकार ने घातलेले खटले मागे घेतले आहेत.. तसेच अर्बन नक्षलवादी यांचे पुर्ण झालेले ईन्हेस्टीगेशन परत करण्यासाठी तयारी चालु झाली आहे.. या मागील रिमोट कंट्रोल कोण आहेत. हे सहज समजले असेल..
    यावरून भाऊ घाटकोपर केस मध्ये बाॅम्ब ब्लास्ट मध्ये ज्या पोलिस व आधिकारीनी अतिरेकी/ व साथ देणारे या संशया खाली काही समाज कंटकाना अटक केले होते पण धर्माचे नावाखाली अशा कर्तव्यदक्ष पोलिस दलाला गुन्हेगार ठरवले व न्यायालयाने सस्पेंड केले.. यामागे याच दोन काँग्रेसचे राजकारण होते.. अशामुळे कारवाई करणार्या पोलिस आधिकारी चे खच्चीकरण झाले.. व अतिरेकी कारवायांना खतपाणी घातले गेले.. व संशयीत म्हणुन कारवाई करणाराचे खच्चीकरण झाले ...
    आता पांच वर्षानी पुन्हा दोन्ही काँग्रेस सत्तेवर आल्यावर हे चालू झाले..
    भाऊ प्रसन्न जोशी, खांडेकर, राजदिप सरदेसाई, प्रसुन वाजपेयी यांना हे सोनिया गांधी शरद पवार या दोन रिमोट ना हे ठणकावून विचाण्याची हिम्मत आहे का? व काय गिळुन(?) हे गप्प बसतात व बसवले जातात.. असा लोकशाही चा चौथा खांब पुर्ण उध्वस्त केल्यावर मतदार कसे चांगले सरकार निर्विवाद पण बहुमत देत निवडुन देणार की एकदा भिजला म्हणुन पक्षाचे उमेदवार निवडुन देणार व त्याला लपवण्यासाठी वेस्टन म्हणुन भाजपला अहंकार झाला होता म्हणुन लोकांनी धडा शिकवला...
    यावर भाजप प्रवक्त्याने चॅनल वर एका बाजुने खडे बोल बोलत या चॅनल वाल्यांना विचारले पाहिजे की गेल्या पाच वर्षे कसे अतिरेकी हल्ले थांबले.. कसा भ्रष्टाचार थांबला कशी फेक नावाखाली वाटली जाणारी दिड लाख करोडची सबसीडी वाचवली गेली ही सबसिडी आता पर्यंत कैक वर्षे कसे शासकीय आधीकारी व सत्ताधारी पक्ष कसा वाटुन खात होता ... आता कसे हे थांबले होते... आता परत हे रिमोट वाले शिवसेना मुख्यमंत्री च्या हातानी हे करुन कायमचे हात कलम करणार का?(यामुळे युती परत होऊच शकत नाही अशी तरतुद करत) व पुढे यामुळे सत्तेवर अशा देशद्रोही काँग्रेस सत्तेवर मांड ठोकणार का? व मिडियावाले व भ्रष्टाचारी सत्ताधारी पक्ष यांची भागिदारी अशीच दशकानु दशके चालत परत देशाला खाईत घेऊन जाणार

    ReplyDelete
  18. भाऊ , सेनेची ही अति घाई नडणार अस वाटते आहे, पवार साहेब 5 वर्षे राहून देतील का या पदावर हा खरा प्रश्न आहे.

    ReplyDelete
  19. सुनिल जाधवDecember 3, 2019 at 7:14 PM

    भाऊ, सेनेला 5 वर्षे या पदावर राहून देतील का हे दोन्ही काँग्रेस वाले हा खरा प्रश्न आहे.आत्ता पर्यंत दुसऱ्याच्या रिमोट ने वागायची पध्दत नाही ना सेनेत स्वतः रिमोट चालवत होते आता मात्र मुश्कील होईल.

    ReplyDelete
  20. सुनिल जाधवDecember 5, 2019 at 6:03 AM

    भाऊ, अगदी बरोबर, सेनेची अवस्था वाईट होईल असं वाटत

    ReplyDelete
  21. फार लवकर असे म्हणने कि उद्धव ठाकरे पावरांच्या वळचलनीला लागले हे चूक ठरु शकते । he जे सर्वकाही इथे लिहले आहे हे त्यांनाही कळत नसेल काय? मला waatte उद्धव हुशार आहेत त्यांना नक्कीच मार्ग काढता येइल फक्तं हे सरकार 5 वर्षे टिकले पाहिजे । जर् असे झाले तर् शिवसेना पुन्हा स्वबळावर nivdnuka ladhavoon सत्तेत येऊ शकते

    ReplyDelete