Wednesday, February 19, 2020

इंदुरीकरांच्या ‘पुराणातली वांगी’

Image result for इंदुरीकर महाराज

काही वर्षापुर्वी बहुधा टिव्हीवर किंवा इंटरनेटच्या कुठल्या दुव्यामुळे एक हसवणारी क्लिप बघायला गेलेली होती. त्यात एक इवलीशी तीनचार वर्षाची मुलगी आहे आणि ती आपल्या आई किंवा मावशीच्या सोनोग्राफ़ीच्या तपासणीला हजर होती. ती गर्भवती म्हणते, गर्भात आहे तो मुलगा आहे. त्या मुलीला ती महिला ते समजावते. पडद्यावर दिसते आहे, ते बाळ माझ्या पोटात आहे. तर ती चिमुकली थक्क होऊन विचारते, तू बाळाला खाल्लेस? बहुधा लहान मुलांचे बोबडे बोल वा बालीशपणाच्या कुठल्या कार्यक्रमाच्या निमीत्ताने असे व्हिडीओ दाखवले जाण्याची ती अमेरिकन टिव्हीवरची मालिका असावी. नशीब ते चित्रण कुणा घरातल्यानेच केलेले होते आणि त्यात कुठल्याही बाजूने भारतीय माध्यमांचा वा वाहिन्यांचा सहभाग नव्हता. अन्यथा किती हलकल्लोळ माजला असता, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. कारण असे काही बोलणारी चिमुकली बालिका आहे आणि तिच्या जीवनानुभवानुसार तिची प्रतिक्रीया आलेली आहे, याचे भान कुणाला राहिले असते? आईनेच अर्भकाला गिळले अशा हेडलाईनी झळकल्या असत्या. कुठलेही शब्द कोण, केव्हा आणि कुठल्या परिस्थितीत उच्चारतो, त्यानुसार त्यातला आशय शोधायचा असतो, इतकेही भान आजकाल उरलेले नाही. म्हणून तर इंदुरीकर महाराज किंवा अन्य कुठल्याही बाबतीत भलतेसलते अर्थ शोधून गदारोळ माजवण्याला पत्रकारिता म्हणायची वेळ आलेली आहे. अन्यथा इंदुरीकर महाराजांच्या शब्दांचा गवगवा झाला नसता, किंवा त्याचा आधार घेऊन कुणा अतिशहाण्याने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यापर्यंत झेप घेतली नसती. आपल्याकडे ‘पुराणातली वांगी’ असा एक शब्दप्रयोग वा उक्ती आहे. त्याचाही बहुधा अशा पत्रकार किंवा शहाण्यांना थांगपत्ता नसावा. तितका असता तरी हा पोरखेळ माध्यमातून झाला नसता. त्यावरून उलटसुलट आरोप प्रत्यारोपाचे नाटक रंगवले गेले नसते.

पुराणातली वांगी म्हणजे तरी काय? तर एक किर्तनकार आपल्या किर्तनातून वांग्याविषयी प्रवचन करतात आणि वांगे हे आहारात असले तरी ते वातुळ असल्याने कमी खावे किंवा टाळावे; असा उपदेश करतात. सहाजिकच ज्या यजमानांकडे किर्तनकारांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते तिथेच त्यांची गोची होते. किर्तनापुर्वीच भोजनाचा बेत शिजलेला असल्याने त्यात गृहीणीने वांग्याची भजी केलेली असतात. ती खुप चविष्ट असतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मग पंगत बसते तेव्हा किर्तन ऐकून आलेल्या गृहीणीने पाहुण्या किर्तनकारांच्या ताटातच फ़क्त वांग्याची भजी वाढलेली नसतात. हा पंक्तीप्रपंच कशाला असा सवाल बुवाच करतात. तेव्हा गृहीणी उत्तरते, तुम्हीच तर वांगी वातुळ असल्याने खायचे नाही म्हणून किर्तनात सांगितले. म्हणून तुम्हाला वाढायचे टाळले. त्यावर बुवांचे उत्तर चतुर होते. बुवा म्हणाले, अहो यजमानिणबाई, वातुळ वांगी हे खरे आहे, पण ती पुराणातली वांगी होत. आपण स्वैपाकात वापरतो, ती वातुळ नसतात. त्यामुळे किर्तन विसरा आणि मलाही वांग्याची भजी वाढा. मलाही ती खमंग भजी आवडतात. अशी गोष्ट आहे. पण मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम बहुधा इंग्रजीतुन शिकवला जात असतो, त्यामुळे त्यात पुराणातली वांगी शिकवली जात नसतील, तर आजच्या नव्या पिढीतल्या पत्रकारांना वा त्यांच्या संपादकांना तरी कशी उमजावी? सहाजिकच त्यांनी किर्तनकारालाच गुन्हेगार ठरवण्यासाठी किर्तनकाराचा वांग्याची भजी खात असल्याचा सज्जड पुरावा गोळा केला आणि दुसर्‍या शहाण्यांनी इंदुरीकरांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली. एकुण बुद्धीजिवी शहाणे किती पोरकट झालेत त्याचा नमूना म्हणून अशा घटनाक्रमाकडे बघता येईल. जे काही इंदुरीकर वा आणखी कोणी असे बोलतात, तेव्हा त्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. किंबहूना त्याचे कुठले तरी परिणाम दिसल्याशिवाय फ़ौजदारी गुन्हा होत नसतो, इतके तरी भान राखायचे की नाही? तथाकथित माओवादी नक्षलवादी व शरद पवार यांच्यात काही फ़रक असतो की नाही?

भीमा कोरेगाव आणि त्यात आरोपी ठरवलेले माओवादी यांच्यात एक साम्य आहे आणि त्याचाच आधार घेऊन आजकाल शरद पवार खुप मोठे युक्तीवाद करीत असतात. त्या तथाकथित कवि साहित्यिक वा बुद्धीमंतांच्या घरी धाडी घातल्यावरजे पुरावे समोर आलेत, त्यावर एल्गार परिषदेच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्या साहित्यामध्ये वा पुराव्यामध्ये नक्षली पुस्तके वा अन्य काही लिखाणाचा समावेश आहे. पण पुरावा म्हणून पोलिसांनी तितकेच कागदपत्र समोर आणलेले नाहीत. त्यात अनेक धागेदोरे आहेत. या मंडळींनी एकमेकांना पाठवलेल्या इमेल वा अन्य दस्तावेजांचा त्यात समावेश आहे. त्या दस्तावेजांत नक्षली लिखाणातून प्रेरणा घेऊन हिंसक कारवाया करायचा डाव असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. म्हणून तर त्यांच्या अटकेविषयी कोर्टानेही कौल दिला आहे आणि जामिन नाकारण्यापर्यंत प्रकरण गेलेले आहे. पण तसेच लिखाण वा पुस्तके पवारांच्या घरात असल्याचे खुद्द पवारांनी सांगितलेले असतानाही पोलिसांनी पवारांवर आरोप केले नाहीत, की गुन्हा दाखल केला नाही. मग हा भेदभाव आहे काय? मुद्दा नुसत्या पुस्तकांचा नाही, हे पवारांनाही पक्के ठाऊक आहे. त्यानुसार कृती करण्याचा आहे. त्याचे पुरावे आवश्यक असतात. म्हणून पवार सुटतात आणि बाकी संशयितांवर गुन्हे दाखल होतात. त्यापेक्षा पुराणातली वांगी वेगळी नसतात. प्रवचन वा किर्तनात कोणी काय सांगितले? किंवा एखाद्या चित्रपट वा नाटकात कुठल्या जादूटोण्याचा विषय आला, म्हणून गुन्हा सिद्ध होत नसतो. दाखल करणेही मुर्खपणा असतो. खरोखरच त्यानुसार कोणी कृती करायला गेला, तर गुन्हा होण्याची शक्यता निर्माण होत असते आणि पोलिसाना त्याची दखल घ्यावॊ लागत असते. ती शक्यता ज्यांच्या बाबतीत सापडली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि पवारांच्या घरातल्या नक्षली पुस्तकांची पोलिसांनी दखलही घेतलेली नाही.

कारण स्पष्ट आहे, पोलिसांच्या लेखी शरद पवार आणि इंदुरीकर महाराज यांची वक्तव्ये सारखीच आहेत. त्यातून कुठले दुष्परिणाम संभवत नसतील, तर त्यांचा उहापोह करण्यात अजिबात अर्थ नसतो. कारण पोलिसांचा तरी तसाच अनुभव आहे. म्हणून तर भीमा कोरेगाव प्रकरणानंतर पवारांनी कितीही गोंगाट केला, म्हणून पुणे पोलिस त्याची दखल घ्यायला पुढे आले नाहीत. असाच गोंगाट त्यांनी मालेगाव स्फ़ोटाच्या चौकशीच्या वेळी केलेला होता. तिथेही पोलिसांनी चुका केल्याचा आक्षेप घेऊन आपल्या गृहमंत्र्याच्या मार्फ़त पवारांनी चौकशी पथकाचे प्रमुख बदलले. रघुवंशी यांच्या जागी करकरे यांना आणले. मुळात पकडलेले आरोपी निर्दोष ठरवून त्यात कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना गोवण्यात आले. आठ वर्षे ते दोघे तुरूंगात खितपत पडले. त्या कालखंडात पवार यांनी एकदा तरी मालेगाव तपासाच्या प्रगती वा निष्कर्षावर भाष्य केले होते काय? साधी विचारपूस केली होती का? अजिबात नाही. म्हणजेच चौकशीची मागणी हा निव्वळ कोणा तरी निरपराधाला गोवून सतावण्याचा डाव झालेला आहे. त्याचा कधी उहापोह माध्यमांनी केला आहे काय? सततच्या निवडणुकीत त्यावरून हिंदू दहशतवादाच्या वल्गना करण्यात आल्या. पण त्यांचीच सत्ता २००८ पासून २०१४ पर्यंत असताना कधी त्या तपासाचा शेवट होऊन खटला भरला जाण्यासाठी आग्रह धरला नाही. कधी मागे वळून बघितले नाही. मग इंदुरीकरांच्या सम विषमची कथा आणि पवारांच्या संशयकल्लोळ नाटकाची कथा कितीशी भिन्न आहे? इंदूरीकरांकडे वैज्ञानिक पुरावे मागत असतात, त्यांनी कधी पवारांकडे मालेगाव किंवा भीमा कोरेगावसाठी पुरावे मागितले होते काय? नसतील पुरावे तर नुसती अंधश्रद्धा पसरवली म्हणून पोलिसात तक्रार दिली आहे काय? दिशाभूल ही सुद्धा अंधश्रद्धाच असते. पण इथे मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. पवार म्हणतील ते ब्रह्मवाक्य असते आणि इंदुरीकर बोलले मग अंधश्रद्धा ठरवली जात असते. याला विषमता म्हणतात ना?

सम विषम वरून आणखी एक गंमत आठवली. काही वर्षापुर्वी नेमकी अशीच एक थिअरी पुरोगामी शिरोमणी अरविंद केजरीवाल यांनीही सांगितलेली होती. दिल्लीतील प्रदुषण व वाहतुक कोंडीवरचा उपाय म्हणून त्यांनी सम-विषम गाडी क्रमांका् व तारखेचा खेळ केलेला होता. ज्यांच्या गाडीचे नंबर सम असतील त्यांनीच एका दिवशी गाड्या चालवाव्या आणि विषम नंबरच्या गाड्या त्या दिवशी घरीच ठेवाव्या. त्यातून दिल्लीची वाहतुक कोंडी संपुष्टात आणायचा खेळ झाला होता. अजून ते प्रदुषण वा ती कोंडी संपली आहे काय? नसेल तर केजरीवाल सुद्धा इंदुरीकरांच्या इतकेच अंधश्रद्धा लोकांच्या गळी मारत नव्हते का? इंदुरीकर नुसता सल्ला देत आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री असत्याने त्यांनी सम किंवा विषम हा कायदा करून लोकांवर सक्ती केली होती. त्यातून दिल्लीकर नागरिकांचे खुप हालही झाले होते. मग त्यांच्या विरोधात कोणी तक्रार कशाला करायला गेला नाही? तर केजरीवाल पुरोगामी आहेत. म्हणजेच श्रद्धा वा अंधश्रद्धा कुठल्या बाजूची असते, त्यानुसार गुन्हा ठरत असते. ह्यातले तारतम्य निदान पत्रकार माध्यमांना हवे इतकीच लोकांची अपेक्षा असते. पण तिथे एकूणच आनंद आहे. कुठेही कोणीही कसलाही बेताल आरोप केल्यावर तुटून पडायचे; हा आता माध्यमांचा खेळ होऊन बसला आहे. त्या क्लिपमधले बाळ आपल्या बालबुद्धीने गर्भवती महिलेला ‘तु बाळ खाल्लेस’ असा सवाल करते; त्यापेक्षा आजच्या माध्यमातील दिवाळखोरीचे स्वरूप वेगळे उरलेले नाही. त्यांना पुराणातली वांगी व खरीखुरी खायची वांगी, यातलाही फ़रक समजेनासा झाल्याचा हा परिणाम आहे. अन्यथा इंदुरीकरांच्या त्या किरकोळ विधानावरून इतका हलकल्लोळ कशाला झाला असता? म्हणून तर दिवसेदिवस बहुतांश माध्यमे वाहिन्या वा वर्तमानपत्रे यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. मालकांनी डोळे वटारताच अग्रलेखही मागे घेण्यापर्यंत पत्रकारिता शरणागत होऊन गेली आहे.

27 comments:

 1. 😆 "पुरोगामी शिरोमणी केजरीवाल" 😆😆😆😆
  भाऊ फार भारी लिहिता तुम्ही.

  - पुष्कराज पोफळीकर

  ReplyDelete
 2. भाऊ, माध्यमे आणि पवार दोघेही आमच्याकडील भागातील बोलीप्रमाणे भयाकलेले (बहकलेले) आहेत. आमच्यासारखे सामान्य लोक आता यांना पुरेपूर ओळखून आहेत. भाऊ, आपल्याविरोधात पवारांच्या अनुयायानी तक्रार केली धमकी दिली पण पवारांनी त्याला कोठेही विरोध केलेला नाही यातच पवारांचे भयाकलेपण लक्षात येते.

  ReplyDelete
 3. भाऊ, तुम्ही जाणत्या राजाच्या हात धुवून मागे लागलेले दिसता. व्वा ! लगे राहो.

  ReplyDelete
 4. भाऊ साहेब,
  पुराणातली "वानगी" पुराणात असा हा शब्दप्रयोग आहे. वांगी नव्हे.
  "वानगी" म्हणजे दाखला वा प्रुफ असा हा शब्द आहे. त्याचा वांग्याच्या भाजीशी वा भज्यांशी काहीही संबंध नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. Ha arth bahutekana mahit nahi. Ha arth patanara aahe. Dhanyavad !

   Delete
 5. Bhau..pawarana ved laglay

  ReplyDelete
 6. पुराणातली "वानगी" पुराणात असा हा शब्दप्रयोग आहे.
  वानगी म्हणजे दाखला वा प्रुफ असा हा शब्द आहे. त्याचा वांग्याच्या भाजीशी वा भज्यांशी काहीही संबंध नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. उदाहरण आहे समजूनघ्या संशय कल्लोळ करू नका

   Delete
 7. CAA हा कायदा मागासवर्गीयांच्या विरोधात आहे,असे धादांत खोटे बोलून पवार हे CAA बाबत गैरसमज पसरवतात,तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात मशीद ट्रस्टचा कोठेही उल्लेख नसताना सरकारने मशीद ट्रस्ट कां निर्माण केला नाही असे बोलून पवार जाणूनबुजून भ्रम निर्माण करतात.

  हा माणूस कधी पंतप्रधान झाला नाही यासाठी देवाचे खरच आभार...
  नाहीतर 5 वर्षात याने संपूर्ण देशाचा सत्यानाश केला असता आणि स्वतः सुंता करून देशाचा सुलतान झाला असता...

  शरद पवार हे जातीयवादी राजकारणामुळे कधीच महान होऊ शकले नाहीत आणि होणारही नाहीत..
  एका म्हणी प्रमाणे "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ते ईश्वर"

  ते त्यांच्या सवयीप्रमाणे खोटे बोलतच राहतात, जास्त वाईट हे आहे की त्यांना या वर कुणीच प्रश्न विचारत नाही, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवा हे कोणत्याही मराठी पत्रकाराची हिम्मत होत नाही विचारायची, त्यांच्यासाठी काकांनी म्हटले म्हणजे ब्रह्मवाक्य आहे!

  असे धादांत खोटे बोलण्याची सवय असल्यामुळे आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचे कौशल्य असल्यामुळेच ते पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर ही आहे तिथेच राहिले आहेत ...
  स्वबळावर सरकार आणता येत नाही ..
  कोणाला तरी खेटल्याशिवाय सरकार मधे घुसता येत नाही ...
  पंतप्रधान पद तर फार दूरची गोष्ट !

  ReplyDelete
 8. Indurikar maharaj is a new target of rshtravadi ani purogami because the statement that came from Warkari Sampraday about Pawar has hurt him personally and politically. Sharad Pawar is helpless about warkari sampraday because it is mix of all communities in maharashtra and not specifically Bramhin community. So he can not make any statement about it. He speaks anything about Ramdas Swami because most of his followers are Bramhins. But he does not dare to speak bad about Dnyaneshwar maharaj or Eknath Maharaj because warkari will show him his real place. So now he is targeting Indurikar maharaj now. Indurikar maharaj is very intelligent and learned man. If he is charged politically and goes against Pawar, his party will be wiped out one day. Te chukichya mansachya nadi lagatahet. tyanni aatta mothepana dakhavun mafi magitali pan he tevhadhyavarach thambnar nahi.

  ReplyDelete
 9. Thanks

  https://youtu.be/Sewo2HCtkYY


  Link as per your article

  ReplyDelete
 10. पुराणातील वानगी (म्हणजे पुराणातील उदाहरण) आणि पुरणातील वांगी असाही एक प्रचलित अर्थ आहे.

  ReplyDelete
 11. नेहमीप्रमाणे खूप चांगला आणि माहितीपूर्ण लेख.
  म्हणीबद्दल फक्त एक जास्तीची माहिती सांगायची आहे.
  ती म्हण 'पुराणातील वांगी पुराणात' अशी नसून 'पुराणातील वानगी पुराणात' अशी असावी.
  'वानगी' या शब्दाचा अपभ्रंश होऊन 'वांगी' झाला असावा.
  'वानगी' या शब्दाचा अर्थ 'नमुना', 'उदाहरण' असा आहे.
  त्याप्रमाणे ती म्हण 'पुराणातील उदाहरण पुराणात' अशी असावी.

  https://www.shabdkosh.com/dictionary/marathi-english/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-meaning-in-english

  ReplyDelete
 12. भाऊ, अगदी बरोबर विश्लेषण केलेत. आजकालच्या पत्रकारांचे, न्युज अँकरचे एक तर मराठी फारच कच्चं असलं पाहिजे किंवा चार-चौघांना वाटतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं मत मांडलं की मगच लोक न्युज पाहतात असा तरी समज झालेला दिसतोय. खरं म्हणजे ह्या लोकांची प्रगल्भता तपासून पाहण्याची वेळ आली आहे. महिलांवर अत्याचार न होण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय ह्या तथाकथित शहाण्यांनी केल्याचं ऐकिवात नाही. पण प्रसिद्धीचा मोह सुटेल तर खर ना..? दुसरी गंमत म्हणजे कालच सिंधुताई सपकाळही म्हटल्या की "ते पोर (इंदुरीकर महाराज) चुकून काहीतरी बोललं असेल पण त्याने बऱ्याचजणांची व्यसनमुक्ती केली हे काय कमी आहे का..? थोडं चुकलं असेल तर सगळ्यांनी, माध्यमांनी एवढं पण त्याचा बाऊ करता कामा नये. चुकलं तर त्यानेही माफी मागावी अन विषय संपवावा". ह्यामध्ये त्यांनी माध्यमांनाही सुनावलं. पण एखाद्याने वेडा बनून पेढा खायचेच ठरवलं तर त्याला कोण काय करणार. माध्यमांनी ब्रेकिंग न्युज मध्ये दाखवलं की सिंधुताईंनी पण इंदुरीकर महाराजांना माफी मागायला सांगितली. अशी ही खुळचट माध्यम..!!!

  ReplyDelete
 13. राममंदिरासाठी सरकार ट्रस्ट स्थापन करते मग मशिदी साठी का नाही ?
  शरद पवार

  या प्रश्नापेक्षा पवार साहेबांना खालीलपैकी एखादा प्रश्न पडला असता तर आतापर्यंत केव्हाच पंतप्रधान झाले असते !

  हज यात्रेसाठी सरकार सबसिडी देते , मग पंढरपूरच्या वारी साठी का नाही ?

  मंदिरांचे उत्पन्न सरकार जमा होते
  मग चर्च आणि मशिदींचे का नाही ?

  हिंदूंना एक लग्न दोन मुले बंधनकारक .मुसलमानांना का नाही ?

  हिंदूंसाठी भारतीय कायदा . मग मुसलमान साठी का नाही ?

  लक्षद्वीप ईशान्य भारत केरळ बंगाल येथे हिंदू अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांचे फायदे नाहीत . मग हेच मुसलमानांच्या बाबतीत का नाही ?

  सर्व मशिदीच्या मुल्ला मौलवींना सरकारतर्फे भरघोस पगार आणि पेन्शन मग मंदिरातील पुजाऱ्यांना का नाही ?

  परकीय आक्रमकांनी आपल्या शहरांची बदललेली नावे आजही कायम मग मुळ नावे पुन्हा देणे का नाही ?

  परकीय आक्रमकांनी भारतात उध्वस्त केलेल्या लाखो मंदिरांपैकी फक्त एकाच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारचे प्रयत्न मग बाकीच्या मंदिरांसाठी का नाही ?

  महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्याने आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन आणि पूजन करण्याची प्रथा असताना केवळ बारामतीचेच मुख्यमंत्री तिथे कधी गेलेले का नाहीत ?

  दरवर्षी न चुकता इफ्तार पार्ट्या करणारे जाणते ख्वाजे दहीहंडी किंवा तिळगुळ वाटप किंवा फराळ वाटप करताना का दिसत नाहीत ?

  प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून हज हाऊस उभे करणाऱ्या साहेबांनी एकाही जिल्ह्यामध्ये वारकरी भवन का उभे केले नाही ?

  यलगार परिषदेला उपस्थित नसलेल्या लोकांवर कारवाईचा साहेब निषेध करतात मग भिमाकोरेगावाला उपस्थित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कशासाठी ?

  भारताच्या लाखो लोकांना ठार करणाऱ्या पाकिस्तान वर साहेबांचे अतोनात प्रेम आहे मग देशासाठी प्राण आणि सर्वस्व देणार्‍या ब्राह्मण समाजावर का नाही ?

  अटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या मराठा समाजाचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि संभाजी महाराज असताना साहेब सतत शाहू-फुले-आंबेडकर यांचा जयजयकार का करतात ?

  कसं आहे साहेब , जनता आता शहाणी झालेली आहे . ज्योती विझण्यापूर्वी फडफड करते . त्याप्रमाणे तुम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिलेला असताना कुटाणे करून आपण सरकार बनविलेले आहे . तर ते जनतेने बहुमताने निवडून दिलेले सरकार आहे अशा भ्रमात राहून बाष्कळ बडबड बंद करावी .
  नाहीतर उरलेसुरले अस्तित्व सुद्धा पुढच्या निवडणुकीत संपून जाईल .
  या देशात मुसलमान बहुसंख्य नक्कीच होणार आहेत परंतु त्याला अजून बरीच वर्षे आहेत .
  आधीच तसले डावपेच खेळून स्वतःचे अस्तित्व संपवू नका .

  ही निष्ठा बुद्धिमत्ता आणि चातुर्य जर हिँदूंच्या उद्धारासाठी लावले असते तर आज पर्यंत सलग पाच वेळा पंतप्रधान झाला असतात .

  एक वारकरी-धारकरी

  ReplyDelete
  Replies
  1. Well said, jor ka tamacha. Pan ya sharadyala tamacha marun hi laj vatat nahi. Kaha gaya wo sardar....jisane is kutte ko ek jad dw thi

   Delete
  2. कारण हिंदू अजूनही समाज म्हणून एकवटलेला नाही आणि भविष्यकाळात ही एकवटणार नाही हे कण्हत्या राजाला माहिती आहे,
   आजही हिंदू आपल्या जातीशी एकवटला नाही धर्माशी कधी एकवटणार ? ? ?

   Delete
 14. भाऊ मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे, पण ह्या वेळी नाही, हे केवळ एक वाक्य किंवा एक कीर्तन अस नाही, पुरुषप्रधान संस्कृतीला महाराज कायमच अधोरेखित करत आले. दुसर अस की कुठलही अभ्यास न करता ते बऱ्याचदा आकडे ठोकून देतात, त्यांचा उद्देश वाईट नसतो पण ऐकणारे तस उचलतात आणि म्हणूनच त्यांनी बोलताना जास्त काळजी घ्यायला हवी...

  खूप घरांमध्ये चांगल्या सूना चांगले मुलगे असतातच की, पण महाराज म्हणतात त्यावरून आम्ही मुलगे आणि सूना सगळे एक जात नालायक.

  हे कुठ तरी थांबायला तरी

  ReplyDelete
 15. खुप सुंदर

  ReplyDelete
 16. भाऊंच्या लेखावर कॉमेंट च्या नावाखाली शी करून जाणारे भुरटे पण इथे आहेत ,, लेखातील किरकोळ बाबीवर बुद्धिभेद करून भाऊ पण दुसरे इंदुरीकर असल्याचे सिद्ध करू लागतात

  ReplyDelete
 17. हे पुरोगामी षडयंत्र आहे

  ReplyDelete
 18. भाऊ खूप छान. कागे रहो.

  ReplyDelete
 19. या ढोंगी पुरोगाम्यांना व त्यांच्या या पीत पत्रकारिता वाल्याना आता आपण सुजाण नागरिक बंधूभगिनीनी च बहिष्कार टाकून निष्प्रभ केले पाहिजे।।

  ReplyDelete