Saturday, May 9, 2020

देशाला धोका कोणापासून?

The Place of Abraham Lincoln in History - The Atlantic

सध्या पाकव्याप्त काश्मिरची भूमी भारत कधी परत घेणार, असा एक विचार अनेकांच्या मनात घोळतो आहे आणि त्याचवेळी भारतीय काश्मिरात होणार्‍या घातपात व जिहादी हिंसाचाराने अनेकांना व्यथीत केले आहे. सहाजिकच आपण असे हतबल का आणि अमेरिका वा इस्त्रायल यासारखे देश इतके स्वयंभू कशाला, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचे कारण सोपे आहे. उपरोक्त दोन्ही देश खरेच स्वयंभू आहेत आणि त्यांना राष्ट्रप्रेम व राष्ट्रवाद ही निरूपयोगी बाब वाटत नाही. उलट भारतात आता तेच दोन शब्द हास्यास्पद मानण्याला बुद्धीवाद समजले जाते. त्यापैकी इस्रायल तर इवला देश असून त्याला चहूबाजूंनी शत्रू देशांनीच घेरलेले आहे आणि कायम युद्धस्थितीतच जगावे लागलेले आहे. पण भारताप्रमाणे त्याला कोणी स्वातंत्र्य आंदण दिलेले नाही. खरोखरीचे रक्त सांडूनच देशाची स्थापना करावी लागलेली आहे. मागली सात दशके सातत्याने रक्त सांडूनच त्याचे अस्तित्व टिकवावे लागले आहे. त्याच्या तुलनेत भारताची भूमी खंडप्राय व लोकसंख्या अफ़ाट असली, तरी देशासाठी व अस्तित्वाला आवश्यक असलेला अभिमान ही गोष्ट आपण काहीसे विसरून गेलो आहोत. पॅलेस्टाईन व हिंदूस्तान यांची दोनतीन वर्षाच्या फ़रकाने फ़ाळणी झाली आणि ब्रिटीश दोन्हीकडून सत्ता सोडून गेले. त्याचे परिणाम हिंदूस्तानला जसे भोगावे लागले, तसेच पॅलेस्टाईनलाही भोगावे लागले. कारण दोन्हीकडे फ़ाळणीचा वरवंटा सारखाच फ़िरलेला होता. हिंदूस्तानची फ़ाळणी निदान दाखवायला अधिकृत होती. पण पॅलेस्टाईनची फ़ाळणी अरब आणि ज्य़ु यांच्या तुंबळ लढाईने झाली आणि आजही अनेक अरब देशांनी इस्रायलचे अस्तित्व मान्य केलेले नाही. आपण शस्त्रबळाने इस्रायल नामशेष करू, अशी त्यांची भूमिका होती आणि अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे देश समाज व राष्ट्र म्हणून टिकून रहायचे, तर कायम युद्धसज्ज रहाणे ह्यालाच इस्त्रायलचा कारभार असे मानले जाते. परिणामी हल्ला झाला किंवा नुसती तशी शक्यता वाटली; तरी इस्रायलच्या फ़ौजा थेट शेजारी अरब देशांवर हल्ले करून त्यांना नामोहरम करीत असतात. उलट तशीच परिस्थिती असून भारत मात्र शेजारी पाकिस्तान ह्या विभक्त देशाकडून होणार्‍या हल्ल्यांना फ़क्त उत्तर देतो किंवा त्यावरून वाताघाटी करीत असतो. हा भयंकर फ़रक आहे व त्याची किंमत सैनिकांचे नागरिकांचे रक्त सांडून मोजावी लागत असते. मग भारत इस्रायलप्रमाणे आधीच हल्ला करून पाकला नामोहरम कशाला करीत नाही? मागल्या दोनतीन पिढ्यातील भारतीयांना सतावणारा असा हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर इतिहासापेक्षाही भारतीय भूमिकेत व राजकीय विचारधारेत सामावलेले आहे.

तब्बल १८२ वर्षापुर्वी म्हणजे १८३८ साली अब्राहम लिन्कन यांनी इलिनॉय राज्यातील स्प्रिंगफ़िल्ड येथील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना अमेरिकेचा शेवट कुठल्या आव्हानातून होऊ शकेल, यावर केलेले भाष्य प्रसिद्ध आहे. ते नंतरच्या काळात अमेरिकेचे अध्यक्षही झाले. कदाचित आजच्या उदारमतवादी अमेरिकनांनाही ते आठवत नसावे. अन्यथा तो जगातला महाशक्ती म्हणून गणला जाणारा देश कोरोनाने इतका हतबुद्ध झालेला दिसला नसता, किंवा चीनला नुसत्या पोकळ धमक्या देतांना बघायला मिळाला नसता. त्यापेक्षा भारताची परिस्थिती अजिबात वेगळी नाही. कारण कोणालाच लिन्कन यांच्या शब्दांचे स्मरण राहिलेले नाही, किंवा त्यातला स्वतंत्र राष्ट्रांना दिलेल्या उपदेशातला आशय लक्षात राहिलेला नाही. लिन्कन म्हणाले होते, ‘अमेरिकेला कुठून धोका संभवतो? युरोप, आफ़्रिका व आशियाच्या सर्व सेना एकत्रित होऊन नेपोलियन बोनापार्ट सारख्या कर्तबगार सेनापतीच्या नेतृत्वाखाली चाल करीत आल्या. त्यांच्या पाठीशी पृथ्वीतलावरची सर्व साधनसामग्री असली आणि त्यांनी अटलांटीक महासागर ओलांडला; तरी त्यांना हजारो वर्षे लढूनही ओहायो नदीतले घोटभर पाणीही पिता येणार नाही. कारण आपण स्वातंत्र्यप्रेमी स्वयंभू समाज व राष्ट्र आहोत. मग आपल्यावर तशी पाळी कधी व कुठून येऊ शकते? आपला पराभव किंवा विनाश आपल्यालाच ओढवून आणावा लागेल. आपला शत्रू आपल्यातूनच जन्मावा लागेल. स्वतंत्र माणसांच्या समाजाचा विनाश त्याच्यापैकीच लोक घडवून आणत असतात. त्यांना बाहेरचा कोणी कधी संपवू शकत नाही, त्यांचा पराभव करू शकत नाही.’ हे शब्द लिन्कन यांनी नवजात राष्ट्रातल्या अमेरिकनांसाठी बोलले असले तरी ते कुठल्याही स्वतंत्र समाज व राष्ट्रासाठी तंतोतंत लागू होतात आणि आजची हतबल अमेरिका त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. कारण इतकी परावलंबी अमेरिका तिथल्याच उदारमतवादी अमेरिकन राजकीय नेत्यांनी व धोरणांनी बनवलेली आहे. भारताची परिस्थिती वेगळी कशी असेल?

आपल्याला प्रश्न पडतो, इवला इस्रायल पाच बलदंड अरब राष्ट्रांना पुरून उरतो आणि एकदा आवेशात आला, मग त्यांना नामोहरम करूनच थांबतो. इस्रायली हल्ले इतके भेदक असतात, की पुढली दोनचार वर्षे तो शेजारी अरब देश पुन्हा कुरापत काढण्याची हिंमतही करीत नाही. मग भारत पाकव्याप्त काश्मिरात पाकला अशा धडा कशाला शिकवू शकत नाही? भारतापाशी इस्रायलच्या शंभर पटीने अधिक सेनादल वा शक्तीशाली अस्त्रे शस्त्रे आहेत. मग दुबळा पाक भारताला वाकुल्या कशाला दाखवू शकतो? त्याचे उत्तर अलिकडेच राहूल गांधींच्या वागण्यातून मिळालेले आहे. राहुल गांधी कॉग्रेसचे एक ज्येष्ठ नेता आहेत. देशात पन्नास वर्षाहून अधिक काळ कारभार केलेल्या पक्षाचे ते सर्वोच्च नेता आहेत. पण त्यांनीच काश्मिरच्या फ़ुटीरवादाचे जाहिर समर्थन चालविले आहे. कालपरवा पुलवामा हंदवारा येथे चकमकी झाल्या आणि त्यात काही भारतीय सैनिक अधिकारी हुतात्मा झाले. त्यांना साधी श्रद्धांजली वहायला राहुलना सवड मिळाली नाही. पण त्याच काश्मिरात ३७० कलम हटवल्यामुळे नागरिकांना कसे हलाखीचे गुलामीचे जीवन जगावे लागते, त्याचे कौतुक मात्र राहुल करू शकतात. तशा आशयाची छायाचित्रे व पुस्तक पाकिस्तानच्या पुढाकाराने प्रकाशित झाले आहे. त्यालाच पुलित्झर पारितोषिक मिळाल्यावर राहूलनी अगत्याने त्यांची पाठ थोपटलेली आहे. थोडक्यात ज्यांनी भारतासाठी व काश्मिरसाठी रक्त सांडले त्यांच्याविषयी तुच्छता आणि जे राजरोस गद्दारीची भूमिका हिरीरीने मांडतात, त्यांचा गुणगौरव भारतात इतक्या उजळमाथ्याने होऊ शकतो. हे खरे दुखणे आहे, त्याचे उत्तर वा त्यावरचा उपाय सेनादल वा शस्त्रास्त्रांमध्ये नाही. ते दुखणे इथल्या धोरण, राजकारणात सामावलेले असून आजवरच्या कारभारातून हे भारतीय पराभूत मानसिकतेमध्ये प्रस्थापित झालेले आहे. दुखणे पाकिस्तानात नसून लिन्कन म्हणतात, तसे भारतीय बुद्धीमध्ये रुजलेले व जोपासले गेलेले आहे. उपाय इथे व त्यावर करणे आवश्यक आहे.

काश्मिरात कालपरवा चकमकीत मारला गेलेला रियाझ नायकू याच्या गद्दारीचे उदात्तीकरण आपले संपादक व अभ्यासक माध्यमे करतात. तसे करताना राष्ट्रवादाला उन्माद ठरवले जाते आणि त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना मारली जात असते. पाकच्या जिहादी हिंसाचाराविषयीचा तीव्र संताप बोथट होऊन गेला आहे आणि आपोआप सेनादलाचे मनोबल खच्ची करण्यात आलेले आहे. इथे काश्मिरातील जनतेला आपल्याच अशा बुद्धीवादी लोकांनी भारताच्या विरोधात उभे केले आहे आणि पाकिस्तान त्याचा फ़ायदा उठवित असतो. त्यांचा बंदोबस्त करायला गेलेल्या सैनिक वा जवानांच्या बाजूने इथला कायदा वा न्यायालयेही उभी रहात नाहीत. मग शस्त्रे व साधने हातात असून उपयोग काय? सेनेच्या शस्त्रास्त्रे व सैनिकाच्या हातातील हत्याराला कायद्याचे समर्थन धार देत असते आणि उदारमतवाद नावाच्या आपल्यातल्याच मुठभरांनी ती धार बोथट करून टाकलेली आहे. इस्रायलमध्ये ते होऊ शकलेले नाही. म्हणून त्यांची एक कोटीहून कमी असलेली लोकसंख्या वा काही लाखांपुरती मर्यादित सेनाही शेजारी अरब देशांना भारी पडू शकते. तिथला कोणी शहाणा वा बुद्धीमान नेता बालाकोट हवाईहल्ला व सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत नाही. इस्रायलची ताकद त्याच्या ठाम भूमिकेत सामावलेली आहे. भारतापाशी अधिक मोठी संख्या व ताकद नक्की आहे. पण तिचे शत्रू समोर सीमेपार नसून इथेच आपल्यात वसलेले वा मिसळलेले आहेत. उजळमाथ्याने भारताच्या पाठीत वार करीत आहेत आणि तरीही प्रतिष्ठीत म्हणून जगू शकतात. इस्रायलमध्ये असे काही होण्याची शक्यता आहे काय? म्हणून लिन्कन समजून घ्यावा लागतो. कुठल्याही राष्ट्राचा वा समाजाचा शेवट शत्रू करीत नसतो. त्यांच्यातले जयचंद वा घरभेदीच विनाश ओढवून आणत असतात. ते ओळखण्याची वा त्यांना निदान जाब विचारण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे. बाकीचे काम जीवाची पर्वा नसलेले सैनिक करीतच असतात.


22 comments:

  1. भाऊ खरंच आहे.बेगडी पुरोगामी व सेक्युलर देशाला अडचणीत आहेत.पाकड्यांच्या बरोबर त्यांचाही बंदोबस्त करायला हवा

    ReplyDelete
  2. https://marathiroaster.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1

    ReplyDelete
  3. भाऊ
    सर्वांच्या मनातले बोललात.नुसताच‌ POK नाही बलुचिस्तानहि स्वतंत्र करावा लागेल.पण ती वेळ अजुन आलेली नाही असं माझं मत आहे.भारत अजुन आर्थिक व सामरिक दॄष्ट्या बलवान होणे गरजेचे आहे. पण ती वेळ नजिकच्या काळात येणार हे नक्की.

    ReplyDelete
  4. जळजळीत सत्य. भारताला स्वातन्त्र्य आंदण दिलेले नाही असेच म्हणायचे आहे ना? जरा संभ्रम निर्माण झाला.

    ReplyDelete
  5. भाऊ, नेहमीप्रमाणेच छान लेख..!
    आपला हिंदुस्थान हा खंडप्राय देश असल्याने इथे राजकीय पक्षांची संख्याही भरपूर आहे. पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर त्याचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी नेहमीच इतर पक्षांपेक्षा वेगळी भूमिका घ्यायला लागते. मग ती भूमिका पक्षाच्या मूलभूत तत्वांशी तडजोड करणारी, प्रसंगी देशविरोधी असली तरीही तिचेच उदात्तीकरण करणे ह्या पक्षांना महत्वाचे वाटते. आपण कुठल्या पक्षाशी चुकून सहमत असल्याचं दाखवलं तर जणू काही त्या पक्षांची गुलामगिरी करावी लागेल अशीच भीती ह्यांना वाटते. कधीकधी त्यांची अडमुठी आणि विरोधाला विरोध करण्याची भूमिका पाहिली तर हसू येते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष. खरं म्हणजे ह्यांनी आपल्या पक्षाची ध्येयं-धोरणं लिहिलेली पानं कुठं हरवली असतील तर ती शोधून पुन्हा एकदा उजळणी करावी, म्हणजे मग त्यांनाच एकांतात बसून नक्कीच लाज वाटेल. कदाचित ते माहीत असूनसुध्दा गंभीर चेहरा करून देशाची चिंता असल्याचा दांभिकपणा करण्याइतपत हे लोक ढोंगी आहेत. त्यामुळेच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सीमेपारच्या शत्रूंशी लढायला आपले सैनिक नक्कीच समर्थ आहेत पण हे वाघाचं कातडं पांघरलेले लबाड लांडगे नेस्तनाबूत करण्यासाठी मोदींसारखा खंबिर, निर्णयक्षमता असलेला नेताच आपल्याला पुढील काही वर्षांत तारून नेऊ शकतो. सामान्य नागरिक म्हणून आपण त्यांच्या चुका जरूर दाखवल्या पाहिजेत पण निवडणुकीवेळी त्यांना जोरदार पाठींबा दर्शवून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

    ReplyDelete
  6. Res Bhau
    Well Said....
    There are many ways to percolate patriotism and nationalism into minds of Indians. Social Media can play significant role in installing these aspects or things for a nation having thousands of thousand years traditions.

    We can't depend on vested media that's more of print media.they have their agenda.

    We must continue to inform all that helps to build our nation stronger and sustainable. It should come from all communities ....

    We together can initiate a platform for more and more patriotism and nationalism other than through education system. Can we do...?

    Regards
    Vinod Shetti

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे यात मुख्यत्वे आपल्या समाजाने पुढाकार घेऊन काही गोष्टी जागेवर आणायला हव्यात पण आपला समाज आता जागा होतोय. जगात एकमेव देश इस्रायल आहे की जिथे जर युद्ध सुरु झाले तर बाहेरच्या देशातील इस्रायली लोक आपल्या देशात परत येण्यासाठी काय वाटेल ते करतात. त्यांचा त्या वेळी फक्त एकच विचार असतो की युद्धामध्ये मला काही मदत करता येईल का? उलट आपल्या इथे जर तशी वेळ आली तर आपले बुद्धीवादी देशाला उपदेश करतील की कशाला युद्ध करताय.याचं मुख्य कारण इथली शिक्षण पद्धती आहे असे मला वाटते कारण ज्या वयात आपल्याला देशप्रेम शिकवायला हवे त्या वयात आपण ते शिकवत नाही.

    ReplyDelete
  8. खूपच छान विश्र्लेषण

    ReplyDelete
  9. मग भारत इस्रायलप्रमाणे आधीच हल्ला करून पाकला नामोहरम कशाला करीत नाही? खरंच ह्या प्रश्नाचं उत्तर या लेखाद्वारे समजण्यास मदत झालं. धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  10. तुम्हाला काय वाटतं, ह्या सर्व महाराष्ट्रातील महाघाडीत सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने करून घेतला की नाही? कारण २ सीट विधानपरिषदेत, १ जास्तची जागा राज्यसभेत, सर्व महत्वाची खाती कॅबिनेट मधली. आणि तरी आता विधानपरिषद मधील बिनविरोध निवडूनकी साठी पुढाकार घ्यायचा सेना आणि काँग्रेसने. तुमचं मत काय ह्यावर?

    ReplyDelete
  11. तुम्हाला काय वाटतं, ह्या सर्व महाराष्ट्रातील महाघाडीत सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने करून घेतला की नाही? कारण २ सीट विधानपरिषदेत, १ जास्तची जागा राज्यसभेत, सर्व महत्वाची खाती कॅबिनेट मधली. आणि तरी आता विधानपरिषद मधील बिनविरोध निवडूनकी साठी पुढाकार घ्यायचा सेना आणि काँग्रेसने. तुमचं मत काय ह्यावर?

    ReplyDelete
  12. हेच तर मूळ आहे. पण शिकलेले लोक भकले आहेत.
    गाढवाला घोड केले आहे आणि घोड्याला गाढव...
    सत्या चा कणखर पणा काय असतो हे समजण्यासाठी
    काळानुसार शिवाजी-संभाजी रक्त गट संतज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज हया समाजमनाचा असणं
    काळाची गरज आहे...एक मावळा..

    ReplyDelete
  13. या सगळ्या प्रकारास मतांचे व सोईचे राजकारण जबाबदार आहे.

    ReplyDelete
  14. भाऊ, बरेच वर्षे मनाला आणि बुद्धीला त्रास देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण सडेतोडपणे दिले आहे. हे तथाकथित बुद्धिवादी, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, विचारवंत वगेरे वगेरे सगळे एकच आहेत. मोदींच्या प्रत्येक शब्दाला, क्रुतीला विरोध करणारे हेच असतात हे वेळोवेळी दिसून येते आहे. राष्ट्रवाद यांना उन्माद वाटतो, पाकिस्तानवर कारवाई यांना निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन किंवा अपयश झाकण्यासाठी केलेले कार्य वाटते. पण एवढी वर्षे पाकिस्तान अतिरेक्यांच्या मार्फत भारताचे सैनिकी, मालमत्ता, सामान्य जनता नुकसान करत आहे त्याचे यांना काहीच वाटत नाही. मुळात या घरभेद्याना प्रथम जरब बसेल असे ठेचायला पाहिजे आणि ते काही वर्षानी भारतीय सामान्य माणूसच करेल हे नक्की.
    राहूल गांधी हा चक्क गांजेकस असावा, कारण तो काय बोलतो, याचे त्याला भान नसते व ज्ञानाच्या बाबतीत त्याची पाटी नक्की कोरी आहेच, त्यामुळे त्याच्याकडे आणि पर्यायाने त्याचे झिलकरी यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. राहूल आणि त्याच्या चमच्याना देशातील जनतेने जागा दाखवून दिलीच आहे.

    ReplyDelete
  15. भाऊ, सोगा, रागा किंवा प्रीवा यांच्या भूमिका सोडून द्या. पण 125 वर्ष अस्तित्व असलेल्या पक्षांमधील एकही माई का लाल भारताच्या बाजूने बोलत नाही आणि बोलला तर शिस्तभंगाची कारवाई .
    देशप्रेम कोठेच दिसत नाही त्यांच्यात .

    ReplyDelete
  16. १) छान मूलभूत विचारांचा लेख. राष्ट्राला डावलून आलेला लिबरल डावा वाद हा देशाला घातक आहे.पण हे शतकाचे दुखणे आहे. २)निराश न होता, त्यावर मात करताना मोदी आदर्श ठरू शकतात. पण भाजप ,संघालाही मोदी समजत नाहीत.३) कुठेतरी याला कारण राज्य घटनेतील न्यायतत्वे आहेत असे वाटते. शेअरिंग

    ReplyDelete
  17. या सगळ्याचे मूळ नेहरू राजवटीत आहे.शांतीदूत म्हणवून मिळवायचा हव्यास असलेल्या नेहरूंना आपण देशाला खड्ड्यात घालतोय हे समजून घेण्याची इच्छा नव्हती.पाकीस्तानी टोळ्यांनी हल्ला केल्यामुळे नाईलाजाने त्यांना सरदार पटेलांच्या सैन्य उभारणीच्या कामाला मान्यता देणे भाग पडले.पण या कबुतरे उडवणाऱ्या काश्मिरी पंडिताने तरीही सैन्याच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे फंड दिले नाहीत.कृष्ण मेननसारख्या गद्दारावर विसंबून चिनी चालींकडे काणाडोळा केला तरीही भारतीय सैन्याने अपुऱ्या साधनांनी पराक्रमाची शर्थ केली.पण नेफाच्या थंडीत कुडकुडत जुन्या फालतू रायफलने चीनच्या अत्याधुनिक साधनांसमोर दारूण पराभव पचवावा लागला.स्वतःला हुशार समजणारा वेळोवेळी चीनच्या घातक हालचाली निदर्शनास आणून देणाऱ्या जनरल थोरातांवर खापर फोडून मोकळा झाला!
    इंदिरा गांधींच्या सत्तेच्या राजकारणात कम्युनिस्टांनी परत पद्धतशीरपणे डोकं वर काढलं.इतिहासाची महाभयंकर तोडमोड करणारे साळसूद बुद्धीजीवी म्हणून मिरवून लागले.संपादक,परदेशी वाऱ्या व चंगीभंगीपणा सरकारी खर्चाने करून तृप्त होऊन खोटेनाटे भुंकू लागले. NGO च्या गोंडस नावाखाली परदेशी फंडाचा 'चीट' फंड करून ढेकर देत असलेल्या थोड्याफार शिस्तीचा, योजनांचा बट्ट्याबोळ करण्यात धन्यता मानू लागले.याने मौनी बाबांच्या राज्यात भीषण रूप धारण केले.
    भारतीय मतदारांनी याला चाप लावला.मोदींच्या आगमन झाले आणि या तथाकथित संपादक,स-माज कार्यकर्ते, खोटारडे इतिहासकार, बुद्धी(गहाण टाकलेले)जीव दगड लागलेल्या कुत्र्या प्रमाणे केकाटू लागले आहेत! आता ही मंडळी मोदी द्वेष करणारच... भाऊ, मला आशा आहे तुम्ही लिहिलेल्या परिस्थितीत मोदी शहा जोडी बदल घडवून आणतील.




    ReplyDelete
  18. सत्ता मिळविण्यासाठी एक तंत्र नक्की झाले आहे. दोन समाजाना लढवीत ठेवायचे यात पूर्वी काँग्रेस यशस्वी होत होते आता भाजप महत्त्व सत्तेला आहे .हे देशाभिमान वैगरे जनते साठी सत्ताधारी फक्त सत्ता कशी मिळवायची
    आणि टिकवायची या वरच करीत चिंतन असतात.

    ReplyDelete