Friday, November 22, 2019

सिंह आला, पण गड गेला



अखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे. शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांची आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा अट्टाहास पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण राजकारणात तात्पुरते लाभ बघून टिकता येत नाही. तर दिर्घकालीन राजकारणाचा विचार करावा लागत असतो. ज्यांनी तो केला नाही, त्यांचे काय झाले, त्याच्या नोंदी इतिहासात जागोजागी सापडतात. कारण जशी एका बाजूला समिकरणे तयार होतात, तशीच दुसर्‍याही बाजूला समिकरणे आकार घेत असतात. ती कोणती व कशी असतील, त्याची चिंता पहिल्या बाजूलाही करावी लागत असते. अखेरच्या क्षणी शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांची जी बैठक मातोश्री येथे झाली, त्यात उद्धव ठाकरे यांनी बहुधा त्याचीच कबुली दिलेली आहे. त्या बैठकीनंतर सेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी वाहिन्यांशी बोलताना उद्धव यांच्या भाषणाचा गोषवारा दिला. त्यानुसार उद्धव यांनी आपली व्यथाच आपल्या आमदारांसमोर व्यक्त केली. ‘देवेंद्र फ़डणवीस वगळता आपल्याला मोदी वा शहांचा एकही फ़ोन आला नाही’, असे यावेळी सांगण्याची गरज काय होती? यातली व्यथा कुठली? तर अजूनही युतीमध्येच रहायची इच्छाच व्यक्त होत नाही काय? त्याचा आशय इतकाच आहे, की आपल्याला भाजपाने कडेलोटावर आणून उभे केले; म्हणून ही टोकाची भूमिका घ्यायची वेळ आली. कदाचित दिल्लीतून शहा मोदींनी आपल्याशी संपर्क साधला असता, तर काही तडजोड निघू शकली असती. पण मोदी शहांनी तसा प्रयत्नही केला नाही, आपल्याला समजावण्यासाठीही संपर्क साधण्याचा प्रयास झाला नाही. असेच उद्धव ठाकरे यांना सुचवायचे आहे. आपल्याच पक्षाच्या आमदारांसमोर हे सांगण्याची गरज काय असावी? तर सेनेतले काही आमदार वा नेते युतीच्या पलिकडे जायला राजी नसावेत, असा त्याचा व्यवहारी अर्थ आहे. आपल्या सहकार्‍यांच्या मनातील चलबिचल संपवण्याचा हेतू त्यातून स्पष्ट होतो.

इतक्या टोकाला आल्यानंतर पुन्हा युतीत रहाण्याची इच्छा वा अपेक्षा कशाला असावी? तर अशा टोकाला जाण्याचे भविष्यातले परिणाम उद्धवनाही समजतात. कारण राज्यपालांसमोर निवडून आलेल्या आमदारांचे मूल्य असले, तरी त्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून देणार्‍या मतदाराची मर्जी व भावना दिर्घकालीन राजकारणात अधिक महत्वाच्या असतात. तो मतदार युती मोडली किंवा कॉग्रेस राष्ट्रवादी सोबत सेना गेली म्हणून नाराज झाल्याचे पडसाद भावी मतदानात उमटू शकतात. तर त्याच्या शंकेचे निरसन म्हणून केलेले हे विधान आहे. आपण खुप प्रतिक्षा व प्रयत्न केले. पण शहा मोदींनाच युती टिकवायची नव्हती, असा मुद्दा आपल्या पाठीराखे व मतदाराकडे घेऊन जाण्याचा हेतू त्यात दडलेला आहे. पण त्याच विधानाचा आणखी एक अर्थ असाही निघतो, की शिवसेनेला दोन्ही कॉग्रेसच्या सोबत जाणे जितके सोपे दाखवले जात आहे, तितके सहज साध्य झालेले नाही. त्याची कारणेही बघितली तर दिसू शकतात. यापुर्वी शहा किंवा मोदी यांना ‘सामना’ उठसुट धमक्या देत असे. अमूक हवे तर मातोश्रीवर यावे लागेल. जागावाटपाचा तोडगा वा राष्ट्रपती निवडणूकीत पाठींबा हवा, तर मातोश्रीच्या पायरीवर डोके टेकायचे इशारे दिले जायचे. हे इशारे अर्थातच मातोश्री हे शिवसेनेचे स्थानमहात्म्य होते. नव्या राजकीय समिकरणात मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी मातोश्रीची महत्ता संपुष्टात आणली गेली आहे. आजवर भाजपाचे मोठे नेते तिथे उद्धवना भेटायला समजवायला यायचे. पण गुरूवारी शरद पवार दिल्लीहून मुंबईला परतले. नंतर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख पवारांना भेटायला मातोश्रीच्या बाहेर पडले, सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले. विमानतळावरून सिल्व्हर ओकला जाताना पवारही कलानगर वांद्रा येथे वळण घेऊन मातोश्रीवर थांबू शकले असते. पण तसे झाले नाही. मातोश्रीवरून उद्धवना सिल्व्हर ओककडे प्रस्थान ठेवावे लागले. ही वेदना माध्यमांना दिसली नसेल व उमजली नसेल, पण पक्षप्रमुखांना बोचलेली असणार ना?

उद्धव ठाकरे यांच्या आमदारांसमोर बोललेल्या त्या एका विधानामध्ये अनेक व्यथा गुंतलेल्या आहेत. आपल्या आग्रहाखातर देशाचे सर्वोच्च नेतेही मातोश्रीवर धाव घेत होते. देशाचा पंतप्रधान वा गृहमंत्रीही मातोश्रीवर फ़ोन करून सल्लामसलत करीत असे. आज ते अधिकार आपण गमावले आहेत. गेल्या खेपेस फ़डणवीस यांच्या शपथविधीला गैरहजर रहाण्याचा निर्णय उद्धवनी घेतला होता. पण सत्तेत सहभाग नसतानाही दिल्लीहून शहांचा फ़ोन आला आणि उद्धव वानखेडे स्टेडीयमला उपस्थित राहिले होते. पुढेही वेळोवेळी शहा मातोश्रीवर आले किंवा त्यांनी स्वत: मातोश्रीशी संपर्क साधला होता. नुसत्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करायला शहा मातोश्रीवर आलेले होते. आज मुख्यमंत्रीपद मिळवताना शरद पवार किंवा सोनियांसह कोणी मोठा कॉग्रेस नेता मातोश्रीकडे फ़िरकलेलाही नाही. उलट पक्षप्रमुखांनाच इतरांच्या दारात वेळीअवेळी जावे लागत आहे. त्याच्या वेदना कॅमेरे लावून बसलेल्यांना टिपता आलेले नाहीत. येणारही नाहीत. मग त्या कॅमेराने टिपलेल्या दृष्यांवर भाष्य करीत बसलेल्यांना त्यामधल्या वेदना कळा कशा उमजाव्यात? ती वेदना आमदारांच्या बैठकीत व्यक्त झालेली आहे. देवेंद्र वगळता मोदी शहांचा फ़ोनही आला नाही. असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा फ़ोन आला तर चित्र वेगळे दिसले असते; असाच अर्थ निघतो ना? किंबहूना निदान ते भाजपाचे नेते शिव्याशाप खाऊनही मातोश्रीचा काही मानसन्मान राखत होते. कॉग्रेस राष्ट्रवादी मातोश्रीकडे ढुंकूनही बघायला राजी नाहीत, ही वेदना त्यातून समोर आलेली नाही का? नुसता पाठींबा देण्यासाठी सोनियांनी घेतलेले आढेवेढे किंवा शरद पवारांनी त्यांच्या दाराशी येण्यास भाग पाडण्याचा सल कदाचित आमदारांना सुद्धा समजणार नाही. तर पत्रकारांना त्यातले दुखणे कसे कळावे? अशा प्रसंगी मातोश्री हे राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू असायचा. त्याची जागा आता सिल्व्हर ओकने घेतली. याकडे कोणा राजकीय अभ्यासकाचे लक्षही गेले नसेल, तर उद्धवरावांच्या त्या विधानाचे विश्लेषण कसे होईल?

योगायोग असा, की सध्या हिंदीत येऊ घातलेला मराठी इतिहासावरील एक चित्रपट गाजतोय. ‘तानाजी’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. त्यावरून वाद निर्माण झाल्याने तिकडे निर्माता अभिनेता अजय देवगण चिंतेत आहे. शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले देण्याचे वेड आहे. त्यातला तानाजी मालुसरे हा इतिहास प्रेरणादायी आहे. कोंढाणा काबीज करताना तानाजी धारातिर्थी पडतो आणि किल्ला जिंकल्यावर महाराजांची प्रतिक्रीया काय होती? ‘गड आला पण सिंह गेला.’ विद्यमान राजकारणात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अशी आता खात्री सर्वांनाच पटलेली आहे. म्हणजे सिंह विजयी झाल्याचा दावा नक्कीच करता येईल. पण दरम्यान मातोश्री नावाचा गड सोनिया व पवारांनी जणू खालसाच करून टाकला ना? कारण आजवर कुणालाही ‘मातोश्रीवर या’ अशी ताकिद देणारेच आपली सेवा मागल्या महिउनाभरात सिल्व्हर ओकच्या दारी रुजू करून सेनेलाही तिथपर्यंत घेऊन आलेत. गुरूवारी रात्री अवेळी पक्षप्रमुखांनी युवासेना प्रमुखांसह सिल्व्हर ओकला धाव घेण्याच्या पाठोपाठ शुक्रवारी आपल्याच आमदारांशी हितगुज करताना बोललेले विधान म्हणूनही ‘ऐतिहासिक’ आहे. आजही उद्धवना खंत आहे, ती मातोश्रीवर मोदी व शहांनी साधा फ़ोन न केल्याची. पण व्यथा तितकीच आहे, की सोनिया वा पवार आपण होऊन मातोश्रीशी संपर्कही साधत नसल्याची? मुख्यमंत्री शिवसेनेचा करताना आपण काय गमावून बसलोय, त्याची ही वेदना असावी काय? अर्थात अशा गोष्टींचा खुलासा कधी नेते करीत नसतात आणि त्यांचा अर्थ वा आशय शोधावा लागत असतो. इतिहासातील नुसती वाक्ये किंवा घटना सांगून विषय निकालात निघत नसतो. त्यातला आशय घेऊन वाटचाल करता आली, तरच नवा इतिहास घडत असतो. म्हणूनच नजिकच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री, मातोश्री वा खुद्द उद्धव ठाकरे यांच्या घटनाक्रमाकडे बारीक लक्ष ठेवले; तरच आधुनिक इतिहासाचे वेगवेगळे पदर उलगडू शकतील. पण याक्षणी तरी शिवसेनेचा सिंह आला, पण गड गेला हे मान्य करावे लागेल.

52 comments:

  1. कर्तुत्वापेक्षा जास्त मानसन्मान मिळाला की अजीर्ण होते. उध्दवरावसाहेबांना मिळत असलेला सन्मान पचवण्याइतकी त्यांची स्वताची कुवत दिसली नाही गेल्या काळात.

    ReplyDelete
    Replies
    1. लाचार सेना

      Delete
    2. Bhau aaj pahilyanda tumcha lekh chukicha vatala ha jaydeep gawale cha shabd ahe ki udhav thakre khup chanksh ahet motoshree var yeun swatacha swarth sadhanaryana udhav thakare ni olakhale ahe ani mhanun ata swata baher nighale

      Delete
  2. खरे आहे भाऊ....
    गड गेलाय, रुबाब गेलाय, आणि मुख्य म्हणजे अभिमानाला ठेच लागली आहे.
    आमदारांना धाकात ठेवणं कठीण जाणार आहे.
    जनता टिंगलच करणार आहे....समर्थकांना बचाव करणे अवघड होऊन बसलं आहे...
    एकंदरीत नुकसानच आहे....
    घरातील भांडण रस्त्यावर आणल्याची किंमत मोजावी लागेल..


    ReplyDelete
  3. आजही वेळ गेली नाही, भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन शिवसेना परिस्थिती सावरू शकते.

    ReplyDelete
  4. भाऊ, अगदी खरे आहे. गड द्रुष्टीपथात आलाय पण सिंह आधीच गेलाय. फुटण्याच्या विचारात असणाऱ्या आमदारांची समजूत काढण्यासाठीच हे बोलणे होते हे नक्कीच. मोदी शहा यांच्याकडून ही अपेक्षा करताना, उद्धव हे विसरला की, पवार आणि सोनिया यांच्या तुला पाया पडावे लागले आणि यापुढे सतत पायाशी लोळण घ्यावी लागणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री हा पवार आणि सोनियाच्या हातातील कठपुतळी असेल. एक गुंगा पंतप्रधान पाहिला आता मुख्यमंत्री बघावा लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. This is Very correct observation and prediction.

      Delete
  5. Swabhiman japanyasathi sattela lath maranari Balasahebanchi Shivsena kuthe ani Sattesathi lachar aajchi Shivsena kuthe.......

    ReplyDelete
  6. श्री भाऊ आमच्या सारख्याचा भ्रम निरास झाला तो कायमचा

    ReplyDelete
  7. खरचं नेमके निरीक्षण आणि विश्लेषण.

    ReplyDelete
  8. अचूक विश्लेषण .. शिवसेना अशाने लवकरच रसातळाला जाईल. लोकांना जे काही चालले आहे ते दिसते आहेच. पुढील निवडूण होईल तेव्हा लोक नक्कीच सेनेस मत देताना विचार करतील. सेनेचा आनंद क्षणिक रहाणार आहे.

    ReplyDelete
  9. वडिलांची सांगे किर्ती तो एक मूर्ख...... श्री समर्थ रामदास!! भाऊ त्यांच्या वडिलांची किर्ती आहे पण स्व कर्तृत्वाचा अभाव आहे. युती म्हणून जनादेश असताना काँग्रेस सोबत जाणे हा विश्र्वासघतकी निर्णय आहे ......पुढील काळात मतपेटीतून कळेलच .... पण तोपर्यंत उशीर झाला असेल.

    ReplyDelete
  10. भाऊ , यांना १० जनपथ वर जायची वेळ आणू नये एवढेच वाटते आणि आता तेवढेच बाकी आहे.

    ReplyDelete
  11. Ek no Bhau. Khup mast explain kela ahe.

    ReplyDelete
  12. पण मोदी शहा़नी फोन का केला नाही हे एक कोडेच आहे.

    ReplyDelete
  13. Congress rashtrwadi barober gel ki Raju sheeti sarkha result bhogava lagto.

    ReplyDelete
  14. "मातोश्रीवर या" असा वाक्यप्रयोग मराठी चित्रपटात रुढ असलेल्या "बाई तुम्ही वाड्यावर या" अशा प्रकारचा आहे. आधी बाळासाहेबांच्या वयोमानामूळे आणि प्रकृतीमूळे सुरू झालेली रुढी ही भाजपच्याच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी नियमात रुपांतरीत केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी ती मोडीत काढली.

    ReplyDelete
  15. शिवसेना चुकीचं वागत आहे..

    ReplyDelete
  16. भाऊ, खरे तर महाराष्ट्रात राहणार्‍या सर्व प्रांतातील लोकांच्या हिंदुत्वाचा शिवसेनेने सांभाळलेला गड(जो 1993 मधील भूमिकेने मजबूत झाला होता)शिवसेनेने स्वतःच्या उतावळेपणाने गमावणे हे अधिक मोठे नुकसान आहे.महाराष्ट्रातील कॉङ्ग्रेसला संजीवनी देण्याचे पितृद्रोही 'चमत्कारीक'कर्तृत्व काम मात्र उद्धव यांच्या नावावर जमा झाले.

    ReplyDelete
  17. Dear Bhau
    It is really sad and painful to watch successors of Late Shivesena Pramukh running from pillar to post for getting CMship of Maharashtra. Is it Start of End for SS?

    ReplyDelete
  18. अख्खी शिवसेना शरद पवारांनी टेकओव्हर केली आहे, आता ती विकाससेना झाली आहे, व्यवस्थापन पवार आणि कंपनीकडे गेलं आहे.

    ReplyDelete
  19. उलट विचार केला तर बरेच होत आहे .. ....पुढच्या वेळी NCP , काँग्रेस, आणि शिवसेना पूर्ण बुडणार हे नक्की ..... कारण सामन्य मतदाराने ss + BJP किंवा ncp + काँग्रेस या विचारसरणीला मते दिली होती ...पण ss + cnp + काँग्रेस नि तर वाट लावली आहे युती करून ...पुढल्या वेळी या मते मागायला मग बघा काय होते ते

    ReplyDelete
  20. भाऊ अटलजी अडवाणी यांच्या पासून ते राजनाथसिंह, नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्यापर्यंत गेल्या तीस वर्षात भाजपच्या सर्व अध्यक्षांनी मातोश्रीवर भेट दिली आहे, प्रमोद महाजन युती झाल्यापासून ते त्यांचा दुर्दैवी मृत्यू होइपर्यंत दरवर्षी बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मातोश्रीवर येत असत, भाजपचे सर्वच नेतृत्व हे रा.स्व.संघातून आले असल्याने ही सर्व मंडळी ही अतिशय सुसंस्कृत पणे आपल्या मित्रपक्षांशी वागतात, मात्र कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते,सामना आणि प्रत्यक्ष पत्रकार परिषदांमधून संजय राऊत भाजपवर कमरेखाली वार करत असताना भाजपने ते सत्तेसाठी निर्लज्ज पणे सहन करावे आणि सत्तेची भीक मागण्याकरिता मोदी आणि शहा यांनी मातोश्रीवर फोन करावा ही गोष्ट कदाचित उद्धव ठाकरे यांनी गृहीत धरली असावी पण त्यांची ही अपेक्षा अमित शहा यांनी या वेळी फोल ठरवली आहे,मोदी शहा यांचे सोडा पण अनेक वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर काम केलेल्या नितीन गडकरी या अगदी घरातील नेत्याने या काळात मुंबईत येऊन देखील उद्धव ठाकरे यांना साधा फोन देखील केला नाही, संजय राऊत यांच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरे यांनी हे सगळे व्यक्तिगत संबंध उध्वस्त केले आहेत उद्या अगदी भले मुख्यमंत्री पद मिळाले तरी सगळे जुने मित्र मात्र तुटले आहेत, भाऊ आपला हा ब्लॉग अतिशय मार्मिक आहे.

    ReplyDelete
  21. मी 2014 मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये व्यक्त केले होते. संजय राऊत हा शिवसेने मध्ये पवारांनी पेरलेला माणूस आहे आणि हा शिवसेना संपवणार. आज हे सत्य समोर आले. इथून पुढे शिवसेना संपली. उद्धट ने स्वतः च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. याचा फायदा राज उठवेल काय आणि तसें संकेत नाशिकच्या महापौर पदावरून दिसत आहेत.शेवटी संजय राऊत शकुनी मामा निघाला. यात संजय राऊत जिंकला पण उद्धव बेचिराख झाला.आता फक्त रक्षा विसर्जन बाकी आहे.

    ReplyDelete
  22. भाजप की काळाची गरज आहे. ते नंतर येतीलही.
    पण एक मात्र खरं,
    इथून पुढे एक वेळ राष्ट्रवादीला मत देऊ पण इथून पुढे सेने ला मत नाही.

    ReplyDelete
  23. भाऊराव,

    जेव्हा उद्धव वा आदित्य पैकी कोणी ठाकरे सत्तास्थानी बसणार हे ठरलं तेव्हाच मातोश्रीगडाची किंमत संपुष्टात आली. आज फक्त त्याची उजळणी होतेय इतकंच.

    बाकी, कमीपणा म्हणाल तर शिवाजीने ही वेळोवेळी घेतला आहे. याच कारणामुळे लोकं शिवाजीला फक्त शहाजीचा मुलगा मानायचे. म्हणूनंच त्याने वेदोक्त विधिवत राज्याभिषेक करवून घेतला. त्यामुळे शिवाजीला लोकं शिवाजीमहाराज म्हणून ओळखू लागले. आता उद्धवची लायकी काय महाराजांइतकी आहे का, असा खोचक प्रश्न इथे अभिप्रेत नाही. भले त्याची लायकी असेल वा नसेल, पण आज मराठी अस्मिता म्हणून जे काही शिल्लक आहे तिचा प्रतिनिधी म्हणून तो उभा आहे. सुरुवातीपासनं शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून घेतलेली भूमिका ठामपणे शेवटपर्यंत तडीस नेण्याची धम्मक दाखवली.

    अशीच धम्मक त्याने राज्य चालवतांनाही दाखवावी. मातोश्रीगडाची प्रतिष्ठा पुनर्प्रस्थापित करायचा तो एकमेव मार्ग उरला आहे.

    उद्धव यांना राज्य चालवायला शुभेच्छा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  24. शिवसेना क्षणिक फायद्यासाठी दीर्घकालीन राजकारण काडीमोड करत आहे

    ReplyDelete
  25. शिवसेना खुप मोठी घोडचूक करत आहे.

    ReplyDelete
  26. भाऊ प्रतिस्पर्धी काय करणार आहे याचे आकलन राजकारणात महत्त्वाचे असते, गेली 5 वर्षे अमित शहा यांची बदनामी माध्यमे करत आहेत, ते सत्तापिपासू आहेत, कोणत्याही थराला जाऊन सत्ता स्थापन करतात अशी गोवा, मणिपूर किंवा जम्मू काश्मीर अशी उदाहरणे दिली जातात पण या दीड शहाण्या माध्यमातून बोलणाऱ्या पत्रकारांना प्रत्येक राज्यात गणिते वेगळी असतात याचे भान नाही, आणि म्हणूनच अमित शहा हे फडणवीस यांना अल्पमताचे सरकार करायला लावतील आणि एकदा का सरकार स्थापन केले की फडणवीस हे पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेसमोर लाचारी करतील असे आडाखे उद्धव यांचे सल्लागार संजय राऊत आणि त्यांचे महागुरू आधुनिक चाणक्य शरद पवार यांचे होते, म्हणजे महाराष्ट्रात अटलजींच्या 13 दिवसाच्या सरकार सारखी किंवा मागच्या वर्षी कर्नाटक मधल्या येडीयु रिअप्पा यांच्या सारखी स्थिती झाली असती, पण सरकार झाले नाही तरी चालेल या वेळी मात्र सेनेच्या समोर झुकायचे नाही अशी भूमिका अमित शहा घेतील अशी मात्र कोणाचीही अपेक्षा नव्हती आणि संजय राऊत यांच्या सल्ल्याने चालणाऱ्या उद्धव ठाकरे यांची मोठी फसगत इथेच झाली आहे,पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह धरला आहे पण उद्धव त्याला तयार नाहीत अशा बातम्या आता येत आहेत, एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांच्या हाताखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते काम करणे अवघड आहे, म्हणजे आपण म्हटले आहे तसे सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सहज पाठिंबा देतील हे गणित चुकले आहे, आता एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबायवर सरकार चालवायचे आणि दुसरीकडे केंद्रात अतिशय भक्कम अशा मोदी शहा यांच्याशी जुळवून घेत महाराष्ट्रा सारख्या राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळायचे अशी अतिशय अवघड कसरत उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे आणि त्यात जर अपयश आले तर मात्र सेनेच्या अस्तित्वावर प्रशचिन्ह लागणार आहे

    ReplyDelete
  27. गड ही गेला नि सिंह ही गेला!!!

    ReplyDelete
  28. आज...
    गड पण गेला आणि सिंह पण गेला...

    ReplyDelete
  29. आजच्या भाजप-ब्रिगेडी शपथविधी नंतर सेनेची पत गेली आणि बोका पण गेला!

    ReplyDelete
  30. भाऊ, तुमचा एक परिच्छेद तंतोतंत खरा ठरला!

    ReplyDelete
  31. bhau, prakaran badalale aaj... Devendraji CM zale... tumcha lekh wachayala aatur aahot

    ReplyDelete
  32. नमस्कार, भाऊ!
    खरे म्हणजे या लेखाच्या खाली हे लिहिणे अप्रस्तुत आहे. तुम्ही यू ट्यूब वर अजित पवार सांगा कुणाचे अश्या शीर्षकाचे विश्लेषण केले होते. इथे तो लेख नाही म्हणून या लेखाच्या खाली हे लिहीत आहे. आज तुमचे अनुमान अचूक सिध्द झाले. तुम्हाला साष्टांग दंडवत, भाऊ!

    ReplyDelete
  33. भाऊ, तुमचे एक युट्युबवर मत ऐकलं होतं 'अजितदादा सांगा कुणाचे?' हे तुमचे निरीक्षण तंतोतंत खरे ठरलं!����

    ReplyDelete
  34. ट्विस्ट इन द टेल किंवा कथेच्या शेवटी अनपेक्षित कलाटणी देण्याचे कथेतील तंत्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत आज म्हणजे न कर्त्याचा वार म्हटल्या गेलेल्या शनिवारी  महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाले . 'हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी 'ही ओळ वाहिन्यांवरील चर्चा ऐकताना आठवली.फडणवीस यांनी दिल्लीश्वरांच्या मदतीने ' मी पुन्हा येईन' हे शब्द खरे ' करून दाखवले '.शिवसेना आणि विशेषतः संजय राऊत यांची इतके दिवस चाललेली वक्तव्ये फोल ठरली.' बोलणे फोल झाले , डोलणे वाया गेले ' हे जुन्या काळात लो.टिळक यानी आपल्या अग्रलेखाला दिलेले शीर्षक कित्येकांनी ऐकले असेल .उठल्या बसल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मुत्सद्देगिरीत कमी पडले हेच खरे ! त्या मानाने सोनिया गांधी आणि त्यांचा पक्ष सावधपणे आपला आब राखून राहिले हे मान्य करावे लागेल.

    ReplyDelete
  35. भाऊ आज सकाळी ज्या नाट्यमय घडामोडी घाडल्या व देवेन्द्र फढणविसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व अजीत दादांनी उपमुख्यमंत्रि पदाची शपथ घेऊन सर्वांना सुखद (?) धक्का दिला. आता संजय राऊत व शिवसेनेचे भवितव्य काय व शिवसेना मनसेच्या वाटेने जाणार का? कृपया यावर आपले अभ्यासपूर्ण विचार व विवेचन
    लवकरच व्यक्त करावेत.नमस्कार .

    ReplyDelete
  36. भाऊ तुमचे शब्द खरे ठरले.अजित दादा नक्की कोणाचे

    ReplyDelete
  37. अखेरीस महाराष्ट्रात नवे समिकरण जुळलेले आहे.

    जशी एका बाजूला समिकरणे तयार होतात, तशीच दुसर्‍याही बाजूला समिकरणे आकार घेत असतात. ती कोणती व कशी असतील, त्याची चिंता पहिल्या बाजूलाही करावी लागत असते.

    भाऊ,
    तुम्ही काल लिहिलेली वाक्ये लगेच आजच खरी ठरली.

    ReplyDelete
  38. नाही हो, आज सकाळी 'गड आला, पण वाघ गेला'

    ReplyDelete
  39. भाऊ आजच्या नाट्यमय घडामोडीवर तुमची प्रीतिक्रिया वाचायला आवडेल

    ReplyDelete
  40. Aaj tar gadahi gelay Ani sinhahi.. Uddhav thakare fadnavisancha ekahi phone ghet navhate tari modi shahanni phone karava ashi apeksha ka? Ki Tyanna bhiti hoti ki bolni jhali tar te punha jalyat adaktil mhanun tyanni samna madhun dabav anaycha prayatna kela pan te fasle

    ReplyDelete
  41. भाऊच्या पुढच्या लेखाचे शिर्र्शक "तेलही गेले तुपही गेले आणि हाती धुपाटणे आले" असे असेल

    ReplyDelete
  42. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील एक तरी व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा खरोखर व्यक्त केली होती का? त्यांची तशी इच्छा होती का?

    तसे असते तर त्यांनी मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्याऐवजी ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले असते. त्यावेळेला तसे करणे सहज शक्य होते. पण त्यांनी तसे केले नाही.

    त्यावेळेस त्यांनी 'ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतेही मंत्रीपद/महामंडळाचे अध्यक्षपद घेणार नाही. फक्त पक्षकार्य करतील' असे जाहीर केले होते.

    आता उद्धव ठाकरे यांना असे वाटले की ही पूर्वीची परंपरा बदलली पाहिजे. तर ते असा विचार करू शकतात आणि अंमलात आणू शकतात. पण कोणतीही तशी कल्पना न देता कोणाशीही युती करणे हा एक भ्याडपणाचे लक्षण आहे. निवडणूक लढवताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर यथेच्छ टीका करायची आणि नंतर त्यांच्याशी आघाडी करायची ही कृती निवडून आलेले आमदार, पक्ष कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावंत मतदार यांच्या गळी निश्चित उतरणार नाही.

    ReplyDelete
  43. Voter mhanun aamhi khush zalo. Phadanvis CM zale.

    ReplyDelete
  44. सर्व पक्षांनी जनतेला धोका दिला. भाजप विरोधी पक्ष जाहला असता तरी चालले असते, पण हि अशी युती आणि गुपचूप शपथ विधी हा जनतेशी केलेला धोका आहे.

    ReplyDelete
  45. आतां तर गड पण गेला व सिंह पण गेला.

    ReplyDelete
  46. शेवटी BJP चा खरा चेहरा उघड झालाच पण मोदीजी ना हि बदनाम केले bhrastawadi sobat युती करून
    आता जेलर आणि कैदी सत्ता चालवणाऱ् । आता कुठे गेले BJP che RSS संस्कार आणि हिंदुत्व?

    ReplyDelete
  47. हा लढा प्रादेशिक पक्ष विरुध्द राष्ट्रीय पक्ष असा आहे. राष्ट्रवादी काँगेस आणि भारतीय काँग्रेस ह्यांच्यामध्ये अशा प्रकारचा संघर्ष होता.
    शिवसेनेची कोंडी होत होती. भाजपा ती कोंडी करत होता. शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. भाजपाशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.
    भारतात लोकशाही टिकवायची असेल तर मजबूत प्रादेशिक पक्ष असणे जरुरीचे आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होणे जरुरीचे आहे.
    प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष ह्या वादामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझा राष्ट्रीय पक्षाला पाठींबा असेल. विधानसभेच्या निवडणुकीसाठी माझा प्रादेशिक पक्षाला पाठींबा असेल.

    ReplyDelete