Wednesday, August 12, 2020

सुशांतने कोणाची झोप उडवलीय?

 

Consensus on Uddhav Thackeray to lead new govt in Maha: Pawar ...

सुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. कारण त्यात ठामपणे सीबीआय चौकशीची मागणी पहिल्या दिवसापासून सुरू झालेली होती आणि तितक्याच ठामपणे सरकारने त्याचा साफ़ इन्कार केलेला आहे. जसजसे दिवस जात आहेत, तशी मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घेण्याच्या मागणीचा पाठींबा वाढत असून; त्याचे राजकीय परिणामही दिसू लागले आहेत. अचानक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र त्यात उतरले आहेत. लोकसभेत पराभूत झालेले पार्थ पवार यांनी अज्ञातवासातून बाहेर येऊन प्रथमच एक राजकीय मागणी केली आणि ती नेमकी सुशांतच्या तपासाचे काम सीबीआयकडे देण्याची असावी, याला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. कारण त्यांनी वक्तव्य करून वा जाहिर भाषणातून अशी मागणी केलेली नाही. त्यांनी तसे रितसर पत्रच राज्याच्या गृहमंत्र्यांना सादर केलेले आहे. त्याचा अर्थ त्यांनी त्यासाठीचा कायदेशीर पुरावा ठरू शकणारा दस्तावेजच निर्माण केलेला आहे. त्याच प्रकरणाला चुड लावणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या विविध आरोपात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा केलेला प्रयासही विसरता कामा नये. तरच त्यातले राजकारण उलगडू शकेल. कारण पर्यावरण मंत्री मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत आणि पार्थ पवार उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. मग सुशांतच्या मृत्यूच्या आडून राज्यातल्या महाआघाडी सरकारमधले कुरघोडीचे राजकारण रंगलेले आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. ही थोडी पार्श्वभूमी समजून घेतली तर राजकारणाचे धागेदोरे शोधता येऊ शकतील.


शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात भाग घेताना राज्याचे मुख्यमम्त्री घराबाहेर पडत नाहीत, रस्त्यावर दिसत नाहीत. फ़क्त टेलिव्हिजनवर दिसतात, असे चिमटे काढलेले आहेत. पण आदल्याच दिवशी मुख्यमंत्री थेट पुण्याला गेलेले होते. ते पुण्यात कोणत्या कार्यक्रमाला गेले, त्याचा खुलासा फ़ारसा झालेला नाही. अधिकार्‍यांच्या बैठका झाल्या. पण उद्धवरावांच्याच आग्रहाला ग्राह्य धरायचे तर अशा बैठका व्हिडीओ कॉन्फ़रन्सद्वारेही होऊ शकतात. अयोध्येतील भूमीपूजन त्या पद्धतीने होण्याचा मुद्दा मांडणार्‍या मुख्यमंत्र्यांना अचानक पुण्यात जाण्याचे कारण काय असेल? की उपमुख्यमंत्री पुण्यातच ठाण मांडून बसलेत आणि मुंबईत यायलाच राजी नाहीत, म्हणून स्वत: उद्धवराव पुण्याला पोहोचले? तसे असेल तर त्यामागे काही तातडीचे काम असू शकेल. ते काम व्हिडीओ माध्यमातून होऊ शकणारे नसावे. कारण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यावर अनेक उपकरणे बोलाचाली वा संवाद परस्पर चित्रीत करून घेऊ शकतात. काही विषय तसेच असल्याने पुण्याला व्यक्तीगत जाण्याची निकड भासलेली असावी काय? अजितदादांना प्रत्यक्ष भेटून काही सांगावे, असे वाटल्याने तंत्रज्ञानाचा आग्रह विसरून मुख्यमंत्री पुण्याला पोहोचले होते काय? अनेक प्रश्न आहेत व त्यांची उत्तरे शोधुनही मिळत नाहीत. मात्र दुसरीकडे दिवसेदिवस सुशांतच्या शंकास्पद मृत्यूचे गुढ आहे, त्यापेक्षा त्याच्या पोलिस तपासाचे गुढ अधिक रहस्यमय होत चालले आहे. पोलिस जितका तपास करत आहेत, त्यातून कुठलाही उलगडा होण्यापेक्षा अधिकच रहस्ये व प्रश्न समोर येत आहेत. कारण महिना उलटून गेल्यावर आता विविध नेते व पक्ष त्यात उडी घेऊ लागले आहेत आणि जिथे ही घटना घडली, त्या राज्याचे कारभारी मात्र त्याची झाकपाक करून घेण्यात गर्क दिसतात.


तब्बल एक महिना उलटून गेल्यावर सुशांतच्या कुटुंबियांनी चक्क बिहारची राजधानी पातण्यात त्याची गर्लफ़्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात फ़ौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदलेला आहे आणि एकूणच मुंबईतील तपासाला वेगळे वळण लागून गेले. आधी मुंबईचे पोलिस खर्‍या संबंधितांना चौकशीला बोलवित नाहीत असा आरोप होता. त्यामध्ये करण जोहर इत्यादी नावे होती. चाळीसहून अधिक लोकांची चौकशी वा जबानी झाल्यावर आता पाटण्याच्या त्या फ़ौजदारी तक्रारीने धमाल उडवून दिलेली आहे. त्यात आरोपी ठरवण्यात आलेल्या रिया चक्रवर्ती हिने आरंभी तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केलेली होती. आता तिनेही भूमिका बदलली असून तपास मुंबईचे पोलिसच योग्य करती्ल, असे तिचे म्हणणे आहे. किंबहूना त्यासाठी तिने सुप्रिम कोर्टात धाव घेतलेली आहे. मग असा प्रश्न पडतो की आरंभीच्या काळात तिने सीबीआयची मागणी कशाला केलेली होती? हे तिचे बदलणे शंकास्पद नाही का? जोवर मुंबई तपासात तिच्याकडून कुठली जबानी घेतली गेली नाही, तोपर्यंत रियाला सीबीआयचा तपास विश्वासार्ह वाटत होता. पण कुटुंबियांनी तीच मागणी केल्यावर रियाने पवित्रा बदलण्याचे कारण काय? अगोदर तिचा मुंबई पोलिसांवर विश्वास कशाला नव्हता? की तिला मुंबई पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर रियामध्ये बदल झाला आहे? असा कुठला विश्वास तिला मुंबई पोलिसांनी दिला आहे? अशा प्रश्नांची उत्तरे कुठे मिळत नाहीत. सर्व लोक सुशांतला न्याय मिळावा असा आग्रह धरतात. पण प्रत्येकाचा न्याय वेगवेगाळा असण्याची शक्यता अधिक आहे. कारण सर्वांनाच न्यायापेक्षा तपासकामात जास्त रस आहे आणि त्यातही तपास कोण करणार, यालाही जास्त महत्व दिले जात आहे. थोडक्यात मृत्यू एकच असला तरी संबंधित प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार तपासकाम व्हावे असेच वाटते आहे. हा प्रकार चमत्कारीक नाही काय?


जेव्हा सत्यशोधनात इतके मतभेद असतात, तेव्हा प्रत्येकाचे सत्य वेगवेगळे असण्याची शक्यता वाढत जाते. असा प्रकार फ़क्त सुशांतचे निकटवर्तिय, कुटुंबिय किंवा चित्रसृष्टीपुरते मर्यादित नाहीत. राजकारणातही तसेच मतभेद आहेत. सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाला त्यात मुंबई पोलिस हवेत आणि दुसर्‍या पक्षाला सीबीआयकडे तपास सोपवावा असे वाटते आहे. प्रत्येकजण आपली कातडी बचावण्यासाठी झटतो आहे, की अन्य कुणाला तरी गुंतवण्यासाठी डावपेच खेळतो आहे? शुक्रवारी विरोधी पक्ष भाजपाच्या काही नेत्यांनी सीबीआयची मागणी केली आणि काहीजणांनी तर तरूण मंत्री त्यात गुरफ़टला आहे, असेही आरोप केलेले आहेत. त्यामुळे एकूण प्रकरणाला अजब वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याहीपेक्षा एक वेगळी बाजू अशा मृत्यूला आहे. इतरवेळी कुठल्याही राजकीय सामाजिक विषयावर आपली बहूमोल मते व्यक्त करायला पुढे सरसावणार्‍या चित्रपटसॄष्टीची सुशांतच्या बाबतीत दातखिळी बसली आहे. गुजरातच्या दंगलीपासून अखलाखच्या सामुहिक हत्येपर्यंत कुठल्याही बाबतीत आपली अक्कल पाजळायला सरसावणारे जावेद अख्तर, मुकेश भट्ट इत्यादी एकाहून एक प्रतिभावंत मौन धारण करून गायब झालेले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील एका गंभीर घटनेविषयी सार्वत्रिक चर्चा रंगलेली असताना त्यांचेही मौन चकीत करून सोडणारे आहे. अन्यथा संबंध नसतानाही अशी मंडळी जगासाठी चिंताक्रांत झालेली आपल्याला बघायला मिळत असतात. आपली प्रतिष्ठा व पुरस्कारही फ़ेकून द्यायला धावत सुटत असतात. पण सुशांत प्रकरणात मात्र त्यांची वाचा बसलेली आहे. याचा अर्थच कुठेतरी मोठे दहशतीचे वातावरण नक्की आहे. प्रत्येकाचे हातपाय वा शेपूट कुठे ना कुठे अडकलेले असणार. अगदी माध्यमातही नेहमी आक्रमक असणारे यावेळी तोंड संभाळून बोलताना दिसावेत, ही नवलाईची गोष्ट आहे.


इथे माहाराष्ट्राच्या राजकारणाचा संबंध कुठे येतो? अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात वास्तविक सीबीआयकडे तपासाचे काम गेले असते तर राज्याच्या व मुंबईच्या पोलिसांना दिलासा मिळू शकला असता. कारण निदान त्यांच्यामागे सतत कॅमेरा घेऊन धावणार्‍यांचा ससेमिरा तरी टळला असता. पण जितक्या आवेशात राज्याचे गृहमंत्री वा सरकार त्याला ठामपणे नकार देत आहेत, तेही शंकास्पद आहे. समजा केंद्राकडे तपासाचे काम गेल्याने राज्यातील सरकारचे अवमूल्यन अजिबात होत नाही. अनेकदा राज्येच डोक्याला ताप नको म्हणून केंद्राकडे वा सीबीआयकडे प्रकरणे सोपवित असतात. काही प्रसंगी संबंधितांना समाधानी करण्यासाठी न्यायालयेही राज्याकडून तपासकाम सीबीआयकडे सोपवीत असतात. पण जेव्हा आपणच तपास करण्याचा अट्टाहास राज्याकडून होतो, तेव्हा काहीतरी गडबड असल्याचा संशय वाढत जातो. विविध चिटफ़ंड प्रकरणात बंगालच्याच पोलिसांचा तपास संशयास्पद ठरला, तेव्हा ते काम सुप्रिम कोर्टाने सीबीआयकडे सोपवलेले होते. जितका तपास झाला होता, त्याचे दस्तावेज सोपवायचीही कोलकाता पोलिसांनी टाळाटाळ केलेली होती. फ़ार कशाला ती चौकशी करायला सीबीआयचे अधिकारी पोहोचले, तर ममतांनी त्यांनाच अटक करण्यापर्यंत मजल मारली होती. कारण त्यात मनता बानर्जी व त्यांच्या पक्षाच्याच अनेक सहकार्‍यांचे हात गुंतले असल्याचे पुरावे समोर येत चालले होते. तिथे ममतांनी जसा कडाडून सीबीआयला विरोध केला, त्यापेक्षा महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांचा तपास सोडण्याला असलेला नकार वेगळा आहे काय? जे सुशांत प्रकरणात आहे, तेच पालघरच्या तपासातही झालेले आहे. दोन्ही बाबतीत कोर्टापर्यंत सीबीआयची मागणी गेलेली आहे आणि त्यात राज्य सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळेच सुशांतच्या मृत्यू संदर्भाने होत असलेले आरोप व त्यावर सरकारचा पवित्रा गोंधळात टाकणारा आहे.


इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कंगनाने आरंभ केलेल्या दोषारोपामध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचे नाव घेतलेले होते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रानेच सीबीआयची मागणी केलेली आहे. याचा परस्पर संबंध जोडल्यास कुठेतरी महाविकास आघाडीत अंतर्गत कुरबुरी व कुरघोडीचे राजकारण सुरू झालेले आहे. ते पारनेर व सिन्नरच्या नगरसेवकांना फ़ोडण्यापुरता विषय नसून काही संकेत दिले जात आहेत. ऐंशी तासांच्या सरकारनंतर अजितदादा काय म्हणाले होते? योग्य वेळ आल्यावरच त्याचा खुलासा करीन. मात्र त्यांनी अजून तरी त्याविषयात खुलासा केलेला नाही आणि देवेंद्र फ़डणवीस तर त्यावर मोकळेपणाने आपल्या मुलाखतीत बोलून गेलेले आहेत. दादांची योग्य वेळ जवळ येत चालली आहे काय? त्यासाठी कुठले निमीत्त शोधले जाते आहे काय? लोकसभेत आपल्या पुत्राचा पुत्राचा झालेला पराभव दादांनी सहज पचवलेला आहे काय? की त्याची खदखद मनात अजूनही शिल्लक उरलेली आहे? कारण पवार कुटूंबातील पार्थ पवार ही पहिली व्यक्ती आहे, जिने सार्वत्रिक निवडणुकीत पराभव पत्करला आहे. त्याचे वैषम्य संपलेले असेल? की आता त्याचा एकूण हिशोब करण्याचाही प्रयास आहे? सुशांतचा शंकास्पद मृत्यू हे त्यासाठीचे निमीत्त होऊ शकेल काय? त्यात कंगनाने थेट कुणाचे नाव घेणे, मग पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांना पत्र देणे आणि त्याच दरम्यान सुशांतच्या कुटुंबाने पाटण्यात वेगळा झिरो एफ़ आय आर दाखल करणे ह्या सर्व वेगवेगळ्या घटना आहेत काय? की पटकथेनुसार चाललेले नाटक आहे? सगळ्या जगाचे लक्ष राजस्थानात वेधलेले असताना महाराष्ट्रात काही हालचाली सुरू आहेत काय? त्याची सुत्रे एकाचवेळी दिल्ली, पाटणा व पुणे येथून हलवली जात असावीत काय? सुशांतच्या मृत्यूचे कथानक जितके गुढ आहे, तितकेच त्याच्या आधाराने इथे मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे काही प्रकार बुचकळ्यात टाकणारे आहेत ना?


28 comments:

 1. हिमनगाचे तरी १/१० भाग असलेले टोक सर्वांना दिसते. ह्या प्रकरणात दररोज नवनवीन बातम्या बाहेर येत आहेत,म्हणून गोंधळाचे वातावरण वाढत चालले आहे

  ReplyDelete
 2. भाऊ, जाऊदेत हे तिघाडी आपल्या मरणानेच मरणार आहेत, फक्त कधी एवढाच प्रश्न. प्रत्येक गोष्टीत भाजपावर खापर फोडायचे तरी बंद होईल.

  ReplyDelete
 3. उध्दव ठाकरे साहेब पुण्यात येणे, हा फक्त कोरोना sati आहे असा मला पण नाही वाटत.

  ReplyDelete
 4. मला वाटतं, "मुंबई पोलीसांनी हे प्रकरण नीट हाताळले असते आणि सरकारने तपास करू दिला असता तर सीबीआय आणावी लागली नसती." या प्रकरणात संशयकल्लोळ वाढला आहे.

  ReplyDelete
 5. भाऊसाहेब नेहमीप्रमाणेच चपखल.शेवटी एकच सांगता येईल "जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ."

  ReplyDelete
 6. महाराष्ट्र सरकारने आधीच हे प्रकरण सीबीआय कडे द्यायला हवा होता, आता उशीर केल्यामुळे महाराष्ट्र सरकारमुळे पोलिस यंत्रणेवर उगाचच संशय घेतला जातोय,या सरकार सोबत पोलिसांची पण बदनामी होतेय...

  ReplyDelete
 7. पार्थ पवारला आज अपरिपक्व म्हणणाऱ्या आजोबांनी त्याला लोकसभेचे तिकीट दिले होते. सत्य कदाचीतच बाहेर येईल.. पण राजकारणी ह्या घटनेचा आपला स्वार्थ साधण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेणार यामध्ये शंका नाही.

  ReplyDelete
 8. या देशात आता सर्वसामान्य नीतिमत्ता,सचोटी व धेय्य वाद हा संपुष्टात आला आहे. अखंड भारतात रोज किती गुन्हे मॅनेज केले जात असतील देवका ठाउक. ईथ न्याय उरला नाही हेच खर. मयताच्या टाळू वरिल लोणी खाण्याचे प्रकार करोनात सरास आपण बघतोच आहोत

  ReplyDelete
 9. भाऊ, आजच पवार साहेबांनी पार्थ पवार ला दम दिला आहे.

  ReplyDelete
 10. बहुदा इथे यातील 'नगांचे ' एक शतांश ' वा ' एक सहश्रांश' टोकच दिसतंय ! झाकल्या गेलेल्यांचे दर्शन कालांतराने होईल.

  ReplyDelete
 11. इतके फाटे आहेत या प्रकरणात की कोणाचा कोणाला मेळ दिसत नाही .. सर तुम्ही याचं विश्लेषण इतक्या सहज आणि अभ्यासपूर्ण मांडलंय की आता बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावता येतोय

  ReplyDelete
 12. भाऊ मुंबई पोलिस उपायुक्तांच्या बदल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. सुशांत सिंग ची आत्महत्या 14 जूनला झाली. राष्ट्रवादीला मोक्याच्या जागेवर आपली माणसं हवी म्हणून ह्या बदल्या झाल्या का?
  भाऊ ह्या बदल्या आणि हे दोन आत्महत्या यांचा काही संबंध आहे का?
  आपलं याकडे लक्ष वेधलं गेलं आहे का ह्यात काही बातमी आहे का?

  ReplyDelete
 13. फोटोग्राफी च्या छंदातून सुंदर सुंदर किल्ले दर्शन ज्यांनी घडवले त्यांना आपल्यालाच बालेकिल्ला पण लढवावा लागेल ह्याची सुतराम कल्पना नसेल.
  सूर्य झाकोळला गेला असताना जन्मभूमि चा राम आणि जन्माष्टमी चा कृष्ण दिसणार कसा. तर काय -- असो असो

  ReplyDelete
 14. kup chan mandala ahe sarv vishya

  ReplyDelete
 15. Parthcha parabhav aani rohitcha vijay yaat faqt aajoba factor nahiy. Rohit has built his constituency unlike newbee parth. But Pawar ajit is unhappy Bcoz of defeat. Now in suicide issue, foxes r trying to find loose thread to get on power desk. Ultimately Thakareys will b winner in this. I hope press will write on that time also.

  ReplyDelete
 16. दूर-दूर भाजप गोटात, राजभवनात आणि दिल्ली दरबारात नजर लावून बसलेल्या "संजय" ला म्हणा किंवा सिंहासन मिळाल्याने सत्तेच्या धुंदीत मस्त होऊन, संजय ऐकवेल फक्त त्याच गोष्टी ऐकत बसलेल्या "धृतराष्ट्रा" ला म्हणा; आपल्या जवळपास, आपल्याच नाकाखाली चिरंजीव "दुर्योधन" काय करतात याकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला. परीणामी आता त्या दोघांकडे, दुर्योधनाचे पाप झाकण्या व्यतिरिक्त इतर कुठे लक्ष द्यायला वेळ उरला नाही.

  ReplyDelete
 17. शिवसेनेची एक पध्दत आहे. त्यांच्यावर कुणी आरोप केल्यास त्या आरोपांना उत्तर देऊन निराकरण करण्याऐवजी आरोप करणारांवरच अनेक आरोप करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याची ते मोहीम चालवतात.
  केणी प्रकरण आठवून पहा. त्यावेळी केणी कुटुंबाची किती बदनामी करण्यात आली.यावेळी देखील तसेच होणार.

  ReplyDelete
 18. पवार कुंटूब पारथ स्टंट करून सुशांत केस चे लश विचलीत करू पाहतीय का?

  ReplyDelete
 19. नमस्कार भाऊ,

  आजचा प्रतिपक्ष चा कवडीची किंमत हा व्हिडिओ फार भारी! कवडीची किंमत काढता काढता बऱ्याच गोष्टींवर तुम्ही भारी प्रकाश टाकलात! केवळ बौद्धिक दारिद्र्य जवळ असलेल्या कुबेर केतकर प्रभृति मंडळींना असा investigative journalism स्पेलिंग पुरता तरी ठाऊक आहे काय? की फक्त reputed publication ची लाचार चाकरी कशी करावी एवढेच समजते? असो!

  - पुष्कराज पोफळीकर

  ReplyDelete
 20. आदित्य ठाकरे हे रिया चक्रवर्ती दासी वाटेल अशा 56 पोरी रोज फिरवू शकतील आणि सुशांतच्या श्रीमंतीची आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीच्या फार तर 1% असावी तर असल्या फालतू किंमतीत आदित्य ठाकरे कशावर डोळा ठेवतील का???

  ReplyDelete

 21. Your YouTube video today:

  https://youtu.be/2AuaMJ0ob9s

  Bhau, I respect you, and your articles. But this video are you suggesting that Udhav Rao's CM post is more important than justice for Sushant, the Sadus who got lynched in Palgarh and Exposing the beurocrat who helped the fraud and thief Wadwan to go to Mahabaleshwar ?

  Are you suggesting that the whistle blower be found and silenced ?

  Please explain Bhau, I thought you were for justice.

  I am not sure.

  ven657@gmail.com
  9518703494.

  आपला YouTube व्हिडिओ आजः

  https://youtu.be/2AuaMJ0ob9s

  भाऊ, मी तुमचा आणि तुमच्या लेखांचा आदर करतो. पण, सुशांतला न्यायापेक्षा उधव राव यांचे मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे अहे काय ? पालगडमध्ये हत्यारोगाचा बळी ठरलेल्या सदू आणि wadwan ला मदत करणारे ब्युरोक्रॅटचा पर्दाफाश करणाऱ्यांना.

  शिटी वाजवणारा शोधून गप्प बसवावा असे आपण सुचवित आहात का?

  कृपया भाऊ समजावून सांगा, मला वाटले की तुम्ही न्यायासाठी आहात.

  मला आता खात्री नाही.

  ven657@gmail.com
  9518703494.

  ReplyDelete

 22. Your YouTube video today:

  https://youtu.be/2AuaMJ0ob9s

  Bhau, I respect you, and your articles. But this video are you suggesting that Udhav Rao's CM post is more important than justice for Sushant, the Sadus who got lynched in Palgarh and Exposing the beurocrat who helped the fraud and thief Wadwan to go to Mahabaleshwar ?

  Are you suggesting that the whistle blower be found and silenced ?

  Please explain Bhau, I thought you were for justice.

  I am not sure.

  ven657@gmail.com
  9518703494.

  आपला YouTube व्हिडिओ आजः

  https://youtu.be/2AuaMJ0ob9s

  भाऊ, मी तुमचा आणि तुमच्या लेखांचा आदर करतो. पण, सुशांतला न्यायापेक्षा उधव राव यांचे मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे अहे काय ? पालगडमध्ये हत्यारोगाचा बळी ठरलेल्या सदू आणि wadwan ला मदत करणारे ब्युरोक्रॅटचा पर्दाफाश करणाऱ्यांना.

  शिटी वाजवणारा शोधून गप्प बसवावा असे आपण सुचवित आहात का?

  कृपया भाऊ समजावून सांगा, मला वाटले की तुम्ही न्यायासाठी आहात.

  मला आता खात्री नाही.

  ven657@gmail.com
  9518703494.

  ReplyDelete
 23. राजकारणातील भयानक साठमारी समजण्यासाठी आधी मुरब्बी माणसाच्या हाताखाली उमेदवारी करणे गरजेचे असते.वडिलोपार्जीत प्रचंड इस्टेट मिळाली तरी ती राखून वाढविण्यासाठी कारभार स्वतः समजून घेतला नाही तर आजूबाजूचे चाणाक्ष लोक सगळेच लुबाडून त्या ऐतखाऊ वारसाला देशोधडीला लावतात...तरूणपणी मंत्रीपद मिळाले तर जबाबदारीने वागावे हे समजून न घेता पेज थ्री पार्ट्यांना गेले की दुसरे काय होणार? असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ... इथे..इज्जतीशी गाठ!

  ReplyDelete
 24. भाऊ तुमचा वीडियो पाहीला "उद्धवराव घरभेदी शोधा" या नावाचा. पण मला असे म्हणायचे आहे की जे हे सरकार लपवण्याच्या प्रयत्न करते आहे त्याला तो घरभेदी जनते पर्यंत पाठवते आहे. म्हणजे हे सरकार काहीतरी लपवत आहे हे नक्की. अश्या नालायक विश्वासघातकी ठाकरे सरकारला किती दिवस जनतेने सहन करायचे.अपल्या कर्माने मरणार हे सरकार. मी जाता जाता एवढंच सांगतो की 'विश्वासघात आणी उद्धव ठाकरेची जात एकच'अन ह्याचे चटके सगळा महाराष्ट्र भोगतोय.

  ReplyDelete
 25. Dear Bhau & Swatitai, I just watched your 1st video in "Duniya Jhukati Hai...." series. I found it interesting as it gives the global view of matters affecting my day to day life. One humble suggestion to Swatitai, please look at the camera all time when you talk. When you talk looking at Bhau , it disconnects you from the viewer. Looking forward to your next video in the series.

  Regards

  Anonymous

  ReplyDelete
 26. Dear Bhau & Swatitai, I just watched the 2nd episode of Duniya Jhukati Hai..... It was a fantastic discussion. Swatitai has a wealth of knowledge. A humble suggestion, if you can throw some more light on then personalities like Pr. Nixon, Dr. Henry Kissinger, Jimmy Carter, PM Menachem Begin, Pr. Breznev etc. How these people had a good or bad role and effect on then world politics.

  Regards

  ReplyDelete
 27. माझे असे स्पष्ट मत आहे की पार्थ चे मोफत ब्रँडिंग दादा आणि काकाजोबा भाजप समर्थकांकडून करून घेत आहेत. भाजप समर्थकांना उत्तमरीत्या वापरून घेत आहेत. पार्थ च्या ट्विट्स कडे दुर्लक्ष्य करणारे भाजप समर्थक सध्या पार्थ चे ब्रँड अँबासाडर बनलेले आहेत. त्याचे नाव सर्वदूर नेट आहेत.

  ReplyDelete