Thursday, March 21, 2019

कहीपे निगाहे कहीपे निशाना?

raj thackeray के लिए इमेज परिणाम

तेरा वर्षापुर्वी राज ठाकरे यांनी अकस्मात शिवसेना सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा मोठी खळबळ माजलेली होती. त्या दरम्यान माझी त्यांची भेट झाली होती. मार्मिकचा कार्यकारी संपादक म्हणून मी काम करताना हा तरूण नव्याने व्यंगचित्रे रेखाटू लागला होता, म्हणून चांगली ओळख होती. तो राजकीय नेता नंतरच्या काळात झाला. पण आजही आम्ही मनमोकळे बोलू शकतो. सहाजिकच शिवसेना सोडल्यावर पुढे काय, अशी माध्यमातून चर्चा चालली होती आणि त्याच संदर्भात राजची मुलाखत मिळावी, म्हणून अनेक पत्रकार प्रयत्न करीत होते. एका साप्ताहिकाच्या संपादकांनी मलाही गळ घातली आणि त्यांच्यासोबत मी राजना भेटायला गेलो होतो. तेव्हा इतरांना बाजूला ठेवून राजने मनातले मला सांगितले आणि मुलाखतीचा विषय सोडून मी माघारी फ़िरलो होतो. आजही त्यांचे शब्द आठवतात. पत्रकारांना सनसनाटी बातम्या देण्यासाठी मी शिवसेना सोडलेली नाही, किंवा पुढल्या काळातले काहीही बातम्यांचा मालमसाला म्हणून करणार नाही. जे काही करेन ते जगजाहिर असेल. म्हणूनच आता त्याविषयी बोलणे योग्य नाही, असेच राजनी मला सांगितले होते. मलाही पटलेले होते. हल्ली राजकारण माध्यमातून इतके खेळले जाते की अनेक पक्ष वा नेत्यांचे राजकारण माध्यमातूनच चालत असते. सहाजिकच पत्रकारिता हा राजकारणाचा एक आखाडा होऊन गेला आहे. पण ज्यांना भविष्यातले दुरगामी राजकारण करायचे असते, त्यांनी दाखवायचे दात आणि खायचे दात यातला फ़रक राखलाच पाहिजे. त्यांच्या उक्तीकृतीचा अन्वय लावण्याच्या मर्यादेत पत्रकारितेने राहिले पाहिजे, असेच माझे मत आहे. म्हणूनच मी मागले काही दिवस राज ठाकरे यांच्या हालचाली व वक्तव्यांकडे गंभीरपणे बघतो आहे. त्यातल्या अनेक गोष्टी इतरांप्रमाणेच मलाही खुप अनाकलनीय वाटतात. पण तेवढ्यासाठी या तरूण मराठी नेत्याला मी मुर्ख वा धुर्त ठरवून मोकळा होणार नाही. त्यांचे नेमके काय चालले आहे?

गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज ठाकरे यांनी अकस्मात मोदी विरोधाचा झेंडा कशाला खांद्यावर घेतला? पारंपारिक भाजपाविरोधी पक्षापेक्षाही कडव्या भाषेत राज ठाकरे कशाला बोलत असतात? वरकरणी बघितले तर राजवर होणारी टिका पटणारी आहे. मध्यंतरी दोन वर्षापुर्वी पवार राज ठाकरे दोस्तीची सुरूवात झाली. पुण्यातल्या एका भव्य कार्यक्रमात राजनी शरद पवार यांची जाहिर मुलाखत घेतली आणि ती अनेक वाहिन्यांनी थेट प्रक्षेपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवली होती. त्यानंतर हळुहळू दोघांमधल्या ‘आस्थेचे’ विविध पैलू समोर येत गेले. मनसेच्या आरंभ काळात सुचक शब्दात राजवर टिका करणारे पवारही अकस्मात खुप बदलून गेले आहेत. त्यांची आपुलकी लपून राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व मनसे जवळ येणार, अशाही बातम्या होत्या. मग कॉग्रेसला मनसे नको असल्याच्याही बातम्या आल्या आणि अखेरीस राजनी १९ मार्चला मुंबईत आपल्या अनुयायांची सभा घेऊन लोकसभा लढवणार नसल्याची घोषणा करून टाकली. तसे बघायला गेल्यास दोन वर्षापुर्वीही त्यांनी घरगुती कारणासाठी महापालिका निवडणूका उपचार म्हणून लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणूकांकडे पाठ फ़िरवण्यात फ़ारशी मोठी बाब बघण्याचे कारण नाही. पण उमेदवार उभे न करणे, ही एक गोष्ट आहे आणि निवडणूकीपासून अलिप्त रहाणे, ही वेगळी गोष्ट आहे. राज यांनी लढणार नाही म्हटले, याचा अर्थ पक्षातर्फ़े उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते आणि त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष निवडणूकीकडे पाठ फ़िरवलेली नाही. ते लढतीमध्ये नक्की आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत, ते त्यांनी सांगायची गरज नाही. पण ते कोणाच्या विरोधात आहेत, त्याचा स्पष्ट खुलासा वा घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये काही सुचक राजकारण सामावले आहे काय?

तसे बघायला गेल्यास भाजपाचे मित्रपक्ष सोडले तर बहुतांश राजकीय पक्ष मोदी-शहा व भाजपाच्या विरोधात मागल्या वर्षभरापासूनच दंड थोपटून उभे आहेत. आघाड्या व जागावाटप करून भाजपाला पराभूत करण्याचे मोठमोठे मनसुबे प्रत्येकाने जाहिर केलेले होते व आजही करत आहेत. पण मोदी-शहांच्या पराभवासाठी आपल्या पदराला खार लावून घ्यायला त्यापैकी कोणीही तयार नाही. आघाडी करताना आपल्यालाच जास्तीतजास्त जागा मागण्यावरून बहुतेक राज्यातल्या व पक्षांच्या आघाड्या बारगळल्या आहेत. जिथे विजयाची हमी नाही, अशा जागांसाठीही आज त्या पक्षांमध्ये हाणामार्‍या चालू आहेत. अशावेळी राज ठाकरे हा एकमेव नेता व त्याचा मनसे हा एकमेव पक्ष असा आहे, ज्याने कुठलीही जागा मागण्यापेक्षा निरपेक्ष वृत्ती्ने भाजपाला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही तर भाजपाचा उमेदवार पाडण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशातील हा एकच नेता खराखुरा मोदी-शहांचा कट्टर विरोधक असल्याचे कोणालाही मान्य करावे लागेल. सर्वांनी एकत्र येऊन मोदी-शहांना पराभूत करावे, असे त्यांचे आवाहन जुने आहे. पण ते साधले नाहीतर आपल्या परीने विरुद्ध काम करण्याची त्यांची तयारी पक्षस्वार्थ म्हणून चुकीची वाटू शकते. आपल्याला वरकरणी चुक वाटणारी अशी कृती खरोखर चुकीचीच असते का? पक्षाला कुठला लाभ नसलेल्या कृती वा भूमिकेतून काहीच साधत नसते का? असेच राजकारण करायचे तर लोकशाहीत पक्ष असून उपयोग काय? राजची ही भूमिका चुकीची ठरवणार्‍यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १९८० सालच्या निर्णयाचेही असेच वाटले असते. तेव्हाही त्यांनी लागोपाठच्या पराभवानंतर असाच चमत्कारीक निर्णय घेतला घेतला होता आणि तेव्हा त्यांच्यावर कॉग्रेसची बटीक असा आरोप करणारे आज कॉग्रेस वाचवण्यात गर्क असतात.

आणिबाणी, जनता पक्ष, त्यानंतरचे अराजक यांनी भारतीय राजकारण पुरते गढूळ झालेले होते आणि त्या राष्ट्रीय राजकारणात शिवसेना हा तोपर्यंत मुंबई परिसरातच असलेला पक्ष भरडला गेला होता. मुंबईतूनही शिवसेनेचे नामोनिशाण पुसले जाते की काय, अशी स्थिती आलेली होती. अशा काळात १९८० साली विधानसभेचे मतदान आलेले होते आणि बाळासाहेबांनी उमेदवार उभे करण्यापेक्षा बॅ. अंतुले यांच्या नेतृत्वाखालच्या कॉग्रेस पक्षाल्का बिनशर्त पाठींबा देऊन टाकला होता. शिवसैनिकही त्यांच्या कार्यक्षेत्रात कॉग्रेसच्या समर्थनाला गेलेले होते. बदल्यात विधान परिषदेतील दोन आमदार द्यावेत, अशी तडजोड झालेली होती. सर्वच राजकीय विश्लेषक विरोधकांना ती बाळासाहेबांची घोडचुक वाटली होती. पण त्यानंतर अवघ्या ५ वर्षात १९८५ साली शिवसेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेची सत्ता संपादन केली आणि आणखी पा़च वर्षात मुंबईपुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्रातला खराखुरा विरोधी पक्ष होऊन गेला. १९८० सालात मुंबईतही विधानसभा लढवण्याचे टाळलेली शिवसेना, १९९० सालात राज्यात कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान झालेले होते. राज ठाकरे यांनी आज अचानक निवडणूका न लढवता मोदी-शहांना पराभूत करण्याचा घेतलेला पवित्रा, म्हणूनच तडकाफ़डकी चुकीचा वा मुर्खपणाचा ठरवणे मला तरी योग्य वाटत नाही. अजून त्यामागचे तर्कशास्त्र राजनी स्पष्ट केलेले नाही, किंवा त्याला पुढल्या काळात कुठले वळण लागणार; त्याचाही अंदाज बांधता येत नाही. राजकारणावर भाष्य करणारे व विरंगुळ्याच्या गप्पा छाटणारे आणि प्रत्यक्षात राजकारणात जगणार्‍यांचे निकष वेगवेगळे असतात. पराभवात किंवा माघारीतही अनेकदा डावपेच सामावलेले असतात. आपण ते बघू शकत नाही, म्हणून त्याला मुर्खपणा वा चुकीचे ठरवणे मला योग्य वाटत नाही. राज ठाकरे ‘मनसे’ मोदी-शहांच्या विरोधातल्या इतक्या आवेशात कुठले राजकीय डावपेच असतील? नजिकच्या काळात त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणे मला योग्य वाटते. अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. आज राजच्या या आवेशाकडे बघून असेही वाटते,

कहीपे निगाहे कहीपे निशाना

91 comments:

  1. केवळ, आपला पक्ष वाढवणे हेच एक ध्येय कसे असू शकते? लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवते. केवळ स्वार्थासाठी कट्टर विरोध करणे हे देशहिताच्या विरोधात आहे. ह्याला संधीसाधू सोडून काहीही म्हणू शकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. भाजपा विरोध म्हणजे देश विरोधी कृत्य अस कस काय म्हणू शकता? भाऊसारखे अनुभवी पत्रकार पण राज यांच्या निर्णयावर जपून भाष्य करतात यातच सर्व आले।

      Delete
    2. परंतु भाऊ राज व बाळासाहेब यांच्यामध्ये बराच फरक आहे. शिवाय समोर मोदींसारखा राजकारणी असल्याने ८०-९० चे राजकारणाची पुनावृत्ती होईल असं वाटत नाही.

      Delete
    3. 80 90 च राजकारण फक्त सभांवर अवलबुन होतं पण आता तस नाही, तेव्हाची जनता एखाद्या पक्षाला धरून राहिली की वर्षनुवर्षं त्यालाच मतदान करणारी होती पण आता प्रचार आणि प्रसार माध्यमे बदलली आहेत।

      Delete
  2. बाळासाहेबांची जागा मोकळी आहे, उद्धवना त्यांच्या जोड्यात पाय घालणे जमलेले नाही. राजना जमेल की नाही ते बघावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. Toooch joooda tumchya tondaaat pahila maruun ghyaaaa

      Delete
    2. ही कॉमेंट लिहिण्याआधी बाळा थोडासा मराठीचा अभ्यास केला असतास ना तर बरे झाले असते म्हणजे आनंद राजाध्यक्ष काय म्हणत आहेत ते समजले असते.....

      Delete
  3. ' न धरी शस्त्र करी मी , गोष्टी सांगेन युक्तीच्या चार " या श्रीकृष्णाच्या तोंडी कवीने घातलेल्या उद्गारा प्रमाणे राज या निवडणुकीत मतदार आणि मोदीविरोधक याना जाहीरपणे गोष्टी सांगणार असे म्हणता येईल .पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे पुलवामा व बालाकोट याबाबत राज यांनी या अगोदरच्या सभेत उपस्थित केलेले प्रश्न अनुल्लेखाने बाजूला पडतील असे मोदीभक्तांना वाटत असावे . पंतप्रधान किंवा पक्षाध्यक्ष यांनी उत्तर न देणे साहजिक आहे . पण मोदींची हिरीरीने बाजू मांडणाऱ्या इतरांनी राज यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवे . न दिल्यास काही मतांची किंमत भाजपला नक्की मोजावी लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य बोललात

      Delete
    2. nemake ithech bhaunche arakhade chukale asavet. modinchya rajakaranala virodh kela asata tar samaju shakalo asato. Pan raj ni pulavama ani balakot var sanshay ghene he desh hitachya virodhat ahe. Jevadhi rajakiy samaj balasahebana hoti tevadhi raj na asel asa mala tari vatat nahi.je lok samajatayat ki balakot ani surgical strike chya samarthnaat modi bhakti ahe tar tee ghod chook ahe. Modini lokanchya deshbaktila saad ghataliy tyala milalela pratisad ahe to. modi he chitr rangavanyat purn pane yashasvi zalet ki te desh hitache nirnay gheu shakatat. military strike ha deshabhimanacha nirnay hota. mhanun to lokana avadala. jar to nirnay ghetala nasata tar lokani modinchya tondat shen ghatala asat.

      Delete
  4. Nothing has been happened with raj for last five years by which he has his view by 180 angles , I think it is the only reason due to which he has suffered lot and that is demoneytization.

    ReplyDelete
  5. भाऊ आपला अभ्यास खुप खोल आहे हे परत परत आपल्या लेखातुन दिसते.. हे मोठे मार्ग दर्शक असते पण.
    पहा यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी च्या नेत्यांना मोदींचे पाय धुवून पाणी प्या म्हणालेले हे भाषण जरूर एका*
    आणि जेव्हा मोदी आहेत तो पर्यंत काहीच मालिदा मिळणार नाही व सकळी 10 वाजे पर्यंत झोपुन पण चालणार नाही..
    अविरत जनते साठी निस्वार्थ मालिदा न कमावता कार्य करावे लागेल.. (नाशिक मध्ये एक हाती सत्ता असताना अशिच आळशी पणा मुळे लोकांचा अपेक्षा भंग झाला आणि पाय ऊतारा करावा लागला ..) शिवाजी जन्माला यावा पण आपल्या घरात नको.. अशी अधुनीक काळातील महाराष्ट्ररियन वृत्ती ..
    आता डिपाॅझीट पण जप्त होऊन नाचक्की होईल म्हणुन चिर्अगर्ल प्रमाणे मोदी विरोधी भाषण देणार ..
    चंन्द्राबाबु नायडु पण असेच भाजपला सोडून गेले यात दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे यातील खायचे दाताला जर काही काम नसेल तर ऊपाशी मरण्याची पाळी येते..
    तिच गत आहे कारण पक्ष संघटना चालवायला काही तरी सत्ता हातात असायला लागते तरच कार्यकर्ता पाठीशी ऊभा रहातो.. पक्षाचे कार्यकर्ते पण सामान्य बरेच प्रमाणात शिक्षित तरुण मुले पण होती आहेत.. पण आता धिर सुटत चालला आहे..
    भाऊ तुमच्या अभ्यासात हे पण पाहिले आहे की जेव्हा मनसे आली तेव्हा पासुन ते अगदी 2014 पर्यंत राज ठाकरेंचे टारगेट राष्ट्रवादी काँग्रेस होती .. ऑगस्ट 2012 मध्ये जेव्हा सिएसटी वर हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्री काँग्रेसचे व गृहमंत्री राष्ट्रवादी चे होते पण राज ठाकरेंचा रोष केवळ गृहमंत्री वर होता पण मुख्यमंत्री बद्दल चकार शब्द नाही काढला.. हि आळीमीळी गुप चिळी काँग्रेस बाबतीत का होती याची चर्चा अनेक सामान्य माणसे करत होते.. आण्णा हाजारे जसे काँग्रेसने भुंकण्यासाठी सोडल्या प्रमाणे भाजप सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत करत होते तसेच राज ठाकरेंचा पवित्रा होता.. तो का याची चर्चा पण आवश्यक आहे.
    AKS

    ReplyDelete
    Replies
    1. नाशिक मधे बीजेपी ने काय दिवे लावले ते सांगा आमच काने तारी दिसते काय आहे ते
      पहारा
      वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.

      Delete
    2. हे बरे आहे भाजपला कोणी विचारले काय केले ते सांगा तर ते म्हणतात कॉंग्रेसने काय केले आणि नाशिकमध्ये मनसेला कोणी विचारले काय केले तर ते म्हणतात भाजपने काय केले.

      Delete
    3. oh so now Raj start his day at 10 am? good Modiji( demonitization) atlest made his day start from 12 noon to 10 am - so next 5 yrs of Modiji - one can expect his day start from 10 am to 7 am ????

      Delete
  6. राज ठाकरे या माणसाची बुद्धी ही पहिल्यापासूनच अस्थिर राहिलेली आहे. टोकाचा अहंकार गर्विष्ठपणा आणि स्वतःवरील अतिआत्मविश्वास या दुर्गुणांमुळे राज ठाकरे झटपट प्रसिद्ध तर झाला परंतु त्याच्या कानामध्ये यशाची हवा फार लवकर शिरली. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीला खरोखरीच साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. भुजबळ काय राणे काय किंवा हा राज काय यांचे पाय पाळण्यातचं त्यांनी ओळखले आणि त्यांची सरळ उचलबांगडी करून टाकली कारण त्यांच्यासाठी संघटना सर्वप्रथम होती नातीगोती फार नंतर... भाऊ मला वैयक्तिक असे वाटते की मोदींच्या द्वेशाचे एकमेव कारण हे नोटाबंदी हेच आहे कारण हा राज ठाकरे चे दोन नंबरचे धंदे आता सगळ्यांना माहिती झालेले आहेत. शरद पवारांना असे दगडाखाली हात असलेली माणसे हवीच असतात त्यांचा वापर करून ते नेहमीच आपले राजकारण करत आलेले आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. खरे आहे. हा नोटबन्दीचा परीनाम आहे.

      Delete
  7. भाऊ
    यात राज ठाकरे हे काँग्रेसचे हार्दिक पटेल व आण्णा हजारे याप्रमाणे भुसुरुंग आहेत की डिप अॅसेट हे काळच सांगेल..

    ReplyDelete
  8. भाऊ, बाळासाहेब एक चांगले संघटक होते, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसे 1980 मध्ये होती।
    राज ठाकरे ह्यांचे तसे नाही त्यामुळे ही हतबल अवस्था वाटते।
    ह्या माणासाने भ्रमनिरास केला।

    ReplyDelete
    Replies
    1. बाळासाहेब कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम करत असत. त्यांच्या बोलण्यात उर्मटपणा जाणवत नसे

      Delete
  9. गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज ठाकरे यांनी अकस्मात मोदी विरोधाचा झेंडा कशाला खांद्यावर घेतला? याचे कारण नोटाबंदी तर नाही ना?

    ReplyDelete
  10. भाऊ ..पण ज्या शब्दात राज ठाकरे टीका करतात ते चुकीचे आहे ....दिशाभूल करणारे आणी आपल्या सैन्यावर शंका घेणारे आहे ..मोदी आणी शहांचा द्वेष या थराला जावुन करण्यासाठी काही सबळ कारण तर हवे ...नोटबंदीत यांना प्रचंड नुकसान झालेल दिसतय ...अजून विशेष म्हणजे ज्या टिकेबद्दल तुम्ही इतर नेत्यांना झोडपतात त्याच टिकेबद्दल तुम्ही राज ठाकरे बद्दल काहीच बोलत नाहीये ...

    ReplyDelete
    Replies
    1. सैन्यावर शंका घेणार आहे असं कसं काय म्हणू शकता, सैन्याने मृतांचा अधिकृत आकडा सांगितला नाही। मृतांचा आकडा सांगतोय कोण तर घरी झोपलेले मंडळी, ज्यांनी प्रत्यक्षात हल्ला केला त्यांना माहिती नाही तर मग घरी झोपलेल्याना स्वप्नात दिसले काय? संशय सेनेवर नाही तर खोटी आकडेवारी सांगणाऱ्या राजकारण्यांवर आहे। आजूनपण त्या घटनेचा अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही। राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपाचा एकपण उमेदवार उत्तर देऊ शकत नाही।जो आकडा सांगण्यात येतोय तो खरच असेल तर ठाकरेंच्या प्रश्नांना बगल दिली नसती। आपले मा मु अस बोलतात जस नळावर भांडणार्या बायका भांडत असतात। पण प्रश्नाचं उत्तर देणार नाहीत।

      Delete
    2. अधिकृत आकडा कोणी सांगणं अपेक्षित आहे आणि कसा? ती काय क्रिकेटची मॅच आहे का?

      Delete
  11. मी मनसे ची चाहती असल्याने मलाही गेले काही दिवस हे पटत नव्हते पण अजून एक गोष्ट पटत नाहीये ती म्हणजे कुणाला फायदा होतोय हे बघू नका पण मोदी शहांना मत देऊ नका हे काय गौडबंगाल आहे ते कळत नाहीये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा फायदा शिवसेना भाजप आणि मनसे यांनी होऊन नाही द्यायला पाहिजे,.. आणि सेना तर बाजप बरोबर आहे मग राज च्या म्हणणे आहे म्हणून राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला मत द्यायचे. हे तर पाटणारच नाहीये. राज च गणित थोडं चुकतं आहे.

    ReplyDelete
  12. भाऊ, या विरोधात राज ठाकरे यांचा आर्थिक फायदा असू शकतो. त्यांची इच्छा मोदी विरोधातली स्पेस घेण्याची असली तरी या राजकारणात फायदा होईल असे वाटत नाही

    ReplyDelete
  13. राज ठाकरे यांचे मोदी-शहांना हरवण्यासाठी घेतलेला पवित्रा योग्य असेल वा नसाल. पण त्यात स्वतःचे अस्तित्व राज ठाकरे राखू शकतील का?

    ReplyDelete
  14. मुळात राज ठाकरे भाजपा च्या विरोधात कधीपासून गेले? कारण का गेले असे विचारले तर सांगाल राजकारणात कोणी कोणाचे कायमचे मित्र व शत्रू नाही जनतेच्या मनात यांची प्रतिमा मांडवली वाले अशी आहे नोटांबंदीनंतर हे गृहस्थ बिथरले ज्यांना नाशकाची पालिका चालवता आली नाही ते राज्य चालवायला द्या अशी मागणी करतात अश्यानी कोणी सत्ता देते का? सत्ता मिळवावी लागते आणि व्यवस्थित राबवावी लागते यांनी मराठी माणसाचा मोठा भ्रमनिरास केला

    ReplyDelete
  15. Bhau tumchi kejqriwal vishyichi YouTube varchi mulakhat pahili. V ata ha lekh vachla. Suruvatila vatat hote vachava ki Nako Karan ha manus maharashtrachya rajkarnat adkhalpatra zalela ahe.taripan to tumcha lekh mhanun vachla. Kejqriwal v Raj ya doghanche paper Sarkhe Astana tumhi kejqriwal Yana 0 marks v Raj Yana chakka 50%marks dilele ahet. Lokach te kart ani apla to....
    Pan thik ahe
    Loksabha nivdnuk n ladhnyacha nirnay mhanje thoda shahanpana dakhavnyasarkhe ahe. Raj thakare yani tase Karun apli rajkiy ijjat vachavli as mi mhanen. Nahi tar kejqriwal sarkhe Bina maybapasarkhe firave lagle aste. Na ghar ke na ghat ke. Ya mansach ek dukhan ahe ha manus eka standvar nahi yane satat apale stand badalale ahet.suruvatla up biharicha virodh ata up bihariche melave. Suruvatila modi mhanje Dev ani ata modila shivya. Ani ata tar baramatiche shishyatva patkarle ahe. Tyamule ata Sharad Kaka Yana kuthlya patalat newun thewtil te tumhala mahit ahe. Karan tumhala mahit ahe Sharad kakancha dhurtpana.
    Purvi Raj thakare yanche bhashan mat nahi kiman eikave Tari vatayche pan ata amhi ya mansache bhashan chalu aslyavar amhi chanel badalto. Nako vatato ha khotardepana. Modila shivya deun ya mansane far murkhpana kela ahe. Tyamule Yana rajkiy Adnyatwasat kiman 10 te 15 varsh Tari jave lagel.

    ReplyDelete
  16. लेख अजिबात पटला नाही. पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे स्वतः गुजरातचा दौरा करुन , मोदींचे काम बघून न मागता मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान म्हणून मोदींचे काम, काम करण्याची शैली, स्वच्छ कारभार यात काहीही बदल झालेला नाही. मात्र अचानक हे स्वरराज ठाकरे विरुद्ध राग आळवू लागलेत, ही शुद्ध बदमाशी आहे.
    पुलवामा हल्यातले बळी राजकीय होते,असं म्हणत त्यांनी सरळ हा हल्ला मोदींनी घडवला असं सूचित केले आहे.
    अजित डोवाल यांच्यावर उघड संशय व्यक्त केला आहे.
    मोदींच्या हेतूविषयी भाष्य केले आहे.
    कारवान चा दाखला देणे, हवाई दलाने बॉम्ब टाकले, मात्र त्यांना जागा मुद्दाम चुकीची सांगितली असली मूर्ख विधाने केली आहेत .

    ही सगळी विधाने राहुल गांधी यांनी केली तेव्हा आपणच त्यांची चिरफाड केली आहे. राहुल यांची डोवाल यांच्या पायाशी बसण्याची लायकी नाही,असं म्हंटलं आहे, मग राज ठाकरेच्या या विधानांच्या तुमच्या लेखात उल्लेखही नाही? किमान राहुल आणि केजरीवाल त्यांच्या विरोधी भूमिकेवर ठाम आहेत, याचे काय?

    ReplyDelete
  17. शेवटी कर्तृत्व कोणाला आयतं मिळत नसतं , महाशय ..

    ReplyDelete
  18. शिवाय गेल्या 12 वर्षात राज ठाकरे यांची मनसे पक्ष म्हणून काहीही काम करु शकलेला नाही. एक महापालिका देखील चालवण्याची योग्यता नसलेला हा उन्मादी नेता केवळ सगळ्यांवर वाईट भाषेत टीका करतो, माझ्यासाठी अरविंद केजरीवाल देखील राज पेक्षा चांगले नेता आहेत, त्यांनी तरी दिल्लीत अनेक चांगली कामे केलीत. मात्र केवळ मारहाण आणि गुंडगिरी करणाऱ्या मनसेच्या अधोगती विषयी देखील आपल्या लेखात काहीही भाष्य नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. राज ठाकरे यांच व्यक्तिमत्व समजायला सामान्य बना, कुणा एका पक्षाचे समर्थक असाल तर त्यांच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला विरोधच दिसेल, पण तेच तुम्ही निःपक्षपाती विचार केलात तर त्यांचा हेतू स्पष्ट होईल

      Delete
  19. आपल्या मताशी सहमत आहे राजकारण मध्ये भावनिक पेक्षा मुसद्दी व दूरदृष्टीने निर्णय घ्यावी लागतात.श्री राज ठाकरेंनी घेतला आहे आत्ता वेळ सांगेल यांचा फायदा होईल का तोटा....तोपर्यंत काही तरी हालचाल करत आहेत यात समाधान आहे पूर्वीपेक्षा.....

    ReplyDelete
  20. राज हे आळशी आहेत. कष्ट करायची त्यांची तयारी नाही. राजकारणात काही कन्स्ट्रक्टिव्ह करणे आपल्याला झेपणारे नाही, याची त्यांना स्वत:ला खात्री पटली आहे. एक-एक करत सारे प्रमुख नेते पक्षातून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत आपले उपद्रवमूल्य टिकवून ठेवणे, एवढाच उद्देश राज ठाकरे यांच्यासमोर आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपने आपली उपेक्षा केली, अशी भावना राज यांची झाली असावी. यातून द्वेषबुद्धी वाढीस लागली असावी. द्वेषबुद्धीने मेंदूचा ताबा घेतला की तर्काला सोडचिट्टी द्यावी लागते. त्यानुसार राज हे वागत आहेत. तेव्हा त्यांच्या वागण्यामागे काही तर्कशास्त्र नसावे, असे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. भाजप नेत्यांनी स्वतःचे कपडे सांभाळा म्हणावं आता, चैत्रप्रतिपदेला वस्त्रहरणास सुरवात होणार आहे

      Delete
  21. भाऊ अतिशय मार्मिक विशलेषण. राष्ट्रवादीला पाठिंबा ही एक खेली आहे. विधानसभेला देखील राज यांनी माघार घेतली किंवा 5-10 जागांवर तोड़ केली तर आश्चर्य वाटायला नको. खरे लक्ष्य मुंबई महानगर पालिका आहे, तिथे शिवसेना भाजपा ला टक्कर द्यायला राष्ट्रवादी ची साथ हवी. दुसरे राष्ट्रवादी मध्ये शरद पवारां नंतर राज एवढा चतुर व चांगला वक्ता नाही. तसेच शिवसेनेचे ज्या पध्दती ने आत्महत्ये कडे वाटचाल करणारे राजकारण चालू आहे ते पहाता सैनिकांनी जर मनसेची वाट धरली तर नवल नाही.. काहीतरी शिजतय हे नक्की.

    ReplyDelete
  22. राज ठाकरे यांची बाळासाहेबाशी तुलना होऊ शकत नाही. राज ठाकरे ना सहकारी टिकवून ठेवू शकले ना कार्यकर्ते. त्यांचा घटता जनाधार पहाता ते यापुढे फार काय करू शकतील असे वाटत नाही.

    ReplyDelete
  23. भाऊ नेहमी प्रमाणे जबरदस्त विश्लेषण. .. पण मला वाटत संपत चाललेली काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे मतदार आपल्या पक्षाकडे वळवुन पुढील राजकारणात जोरदार मुंसडी मारण्याच्या दुरद्रुष्टीने उचलेले पाऊल आहे. .

    ReplyDelete
  24. राजने आता परत महानगरपालीके पासून सुरूवात करावी. तोपर्यंत पैसेसुध्दा जमतील.

    ReplyDelete
  25. The speech was comparing Pawar and Modi throughout...which gives clear indication of change of stance....

    ReplyDelete
  26. seems to biased. How can questioning terrorist attack can be politicized. there is no difference all fikilurs and MNS.

    ReplyDelete
  27. मोदींच्य राजकारणावर भाऊंची मते मान्य करणारा वाचक राज वरील भाष्य का मान्य करीत नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. सही पकडे है.

      Delete
    2. अंध समर्थक आल्यावर अजून काय अपेक्षा ठेवायच्या

      Delete
  28. >>> पण त्यानंतर अवघ्या ५ वर्षात १९८५ साली शिवसेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेची सत्ता संपादन केली आणि आणखी पा़च वर्षात मुंबईपुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्रातला खराखुरा विरोधी पक्ष होऊन गेला.>>>

    भाऊ,

    भाजपशी १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी सेनेला मुंबई-ठाण्याच्या बाहेर अजिबात ओळख नव्हती. सेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर लोकांना समजली ती केवळ भाजपमुळे. सेनेने १९८५ पर्यंत मुंबई-ठाण्याच्या बाहेर जाण्याचा, विधानसभा व लोकसभा निवडणुक लढविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला होता.परंतु १९८५ मध्ये मुंबईत विधानसभेची १ जागा जिंकण्यापलिकडे सेनेला यश मिळाले नव्हते. याउलट १९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपने अवघ्या दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते. १९८५ मध्ये सुद्धा भाजपचे १६ आमदार होते.

    भाजपच्या खांद्यावर बसून शिवसेना १९८९ नंतर मुंबई-ठाण्याच्या बाहेर ओळखीची झाली. भाजपने २०१४ मध्ये युती तोडल्यानंतर सेना पुन्हा एकदा मुंबई-ठाण्याच्या भागातील महापालिका पातळीचा पक्ष झाला आहे.

    जर आता सेनेची भाजपबरोबर युती झाली नसती तर २०१९ मध्ये सेना मनसेसारखीच संपली असती.

    ReplyDelete
    Replies
    1. सेना संपली नसती पण भाजपा मुंबई ठाण्यातून हद्दपार झाली असती, म्हणूनच मातोश्रीचे उंबरठे झिजवले

      Delete
  29. भाऊ तुम्ही ह्या लेखात चुकलात.. आझाद मैदानात 11 August 2012 रोजी Rakhine riots and Assam riots चा निषेध करण्यासाठी मुंबईतील रझा एकेडेमी च्या
    नावाखाली जात्यंधानी दंगा केला. त्या दंग्यात 45 पोलीस
    गंभीर जखमी झाले.. महिला पोलिसांचा विनयभंग केला
    गेला. त्यानंतर एका पोलिसाने राज ना सगळ्या प्रोटोकॉल तोडून गुलाबाचं फुल दिलेलं.. त्या पोलिसाला राज
    मध्ये तगडा केअर टेकर दिसला.. काय केलं राज न? काहीही
    नाही.. किंगफिशर चा स्टाफ माल्य्यां न पगार
    द्यावा म्हणून राजच्या पायावर लोळला.. काय केलं राज न? काहीही नाही.. राज न कधीच काहीही केलं नाही.. फेकंफेक केली.. सॉरी भाउ.. राज बाबत 100% नाहीत 500% चुकलात..







































    ReplyDelete
  30. राज कडून अनाठायी, अवास्तव अपेक्षा करता आहात. तेवढी त्याची कुवत नाही. आता समाजाच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. जुनी तंत्र चालणार नाहीत.
    फक्त राजकारणाचा धंदा करता येईल

    ReplyDelete
  31. स्वतःचा पक्ष वाढवा ना त्यांना मत देऊ नका ज्यांना मत द्या म्हणतायेत ते संत आहेत का?पक्ष असा वाढेल अस वाटत नाही.मोदी शाह पूर्णपणे निवडणूक व निवडून येणे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आहेत.डर ज्यांच्या जवळ गेलेत ते कधी धोका देतील ते सांगता येत नाही कारण इतिहास तसा आहे.

    ReplyDelete
  32. निकालानंतर भाजपला दोन-चार जागा कमी पडल्यास शरद पवार आधी पुढे होऊन पाठिंबा देतील, तेव्हा राज ठाकरे स्वतःचे तोंड आरशात पाहू शकतील का? महाराष्ट्रातल्या निकालानंतर शिवसेना विरोधात बसली असताना मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच बहुमत सिद्ध करू शकले हे विसरू नये.

    ReplyDelete
  33. सध्याला हिंदूंकडे आपला धर्म व देश वाचवण्यासाठी मोदींशिवाय दूसरा कोणता पर्याय आहे ? त्यामुळे मोदीविरोध हा सामान्य लोकांच्या दृष्टीने हिंदूविरोध व राष्ट्रद्रोहीपणा ठरणार.

    ReplyDelete
  34. The last sentence of Bhau is very intriguing - कहीपे निगाहे कहीपे निशाना.

    MNS voters are "swing votes" and by not fielding any candidates in the Loksabha elections he has given a free hand to MNS supports to vote as per their conscience. Many MNS supports do not see any logic in Raj opposing Modi and hence even he is confident that a large majority of his supporters will vote for BJP/SS. While he barks at Modi everyday, by not fielding candidates he has ensured that many MNS votes will go to BJP/SS. Raj indeed is an interesting politician.

    ReplyDelete
  35. भाऊ, तूम्ही त्यांना झुकतं माप दिले आहे ... नुसते भाषणे ठोकून काही होत नाही, पक्ष संघटना पाहिजे ..

    ReplyDelete
  36. Raj has secured at least three MLA with this approach. Hadapsar,Nashik,Thane and Vani.
    He is trying to occupy space of main opposition.Shivsena was trying to get that position.

    But it good to see that RT is thinking in different directions. Previosly all his actions were reactions yo Shivsena

    ReplyDelete
  37. भाऊ, सत्ताधारी पक्षाला विरोध करणे हा इतर पक्षाचा अधिकार आहे तसाच राज यांचाही आहे पण योग्य पर्याय उभा करून मग विरोध करणे ही नैतिक राजकारणात अपेक्षित कृती असावी ही जनतेची अपेक्षा असते

    ReplyDelete
  38. भाऊ काका,ये बात कुछ हजम नहीं हुवी. पर्वाच्याच लेखात तुम्ही म्हणत होतात कि धार्जिण्या प्रवृत्तींना मतदाराने धडा शिकवावा . आणि ऐन सर्जिकल स्ट्राईक च्या धामधुमीत पाकिस्तान च्या हातात आयते कोलीत देणाऱ्या राज ठाकरेंची आपण भलामण करत आहेत? हे काही पटलं नाही बुवा...

    ReplyDelete
  39. राज ठाकरे यांना आपल्या पक्षाचे सभासद ज्या पक्षात जावे असे वाटत असेल, त्या पक्षाशी त्यांनी युती/आघाडी करावी.

    ReplyDelete
  40. Balasaheb never compromised on the issues related to the national security. One cannot put Balasaheb and Raj Thakeray into the same basket, latter is an arrogant politician and the puppet of Sharad Pawar. Sharad Pawar, after 2009 assembly election, said that MNS would be beg factor in the 2014 election. It turned out to be entirely wrong. Sharad Pawar is assisting Raj's peaceful demise.
    Raj Thakeray can draw inspiration from YSR congress chief Jaganmohan Reddy who single handedly put itself as credible alternative after a decade long struggle.

    ReplyDelete
  41. I think Raj have same words like other oppositions. They dont have any proof for their accusation.

    ReplyDelete
  42. Notabandi che jakhmi aani Shahid pushkal aahet.

    ReplyDelete
  43. फावल्या वेळेत राजकारण करणारा माणूस आहे, कोणी दाखल सुद्धा घेऊ नये.

    ReplyDelete
  44. भाऊ तुम्हाला राज ठाकरेंविषयी प्रथमपासूनच सॉफ्ट कॉर्नर आहे . आणि त्यामुळेच सेना नेतृत्वावर कायमच टिकेचा सूर ठेवत आलात .
    पण जनता असं काही मानत नसते . येत्या काळात आपला भ्रमनिरास होईल हे नक्कीच .

    ReplyDelete
  45. भाऊ, जरी तुम्ही म्हणता तसं एकाबाजूनं योग्य आहे, तरीही केवळ लोकांमधे मनसेची चर्चा रहावी यासाठी हा स्टंट केला जातोय हे सरळ दिसतंय..

    खरंतर राजची अडचण समजू शकते. मुळात मनसेची मतपेढी ही भाजप / शिवसेनेचेच मतदार आहेत. काँग्रेस / राष्ट्रवादीचे नाहीत. पहिल्यांदा शिवसेनेला झटका देतांना राजनं हेच सिद्ध केलेलं होतं. आत्ताही मोदीविरोध दिसत असला तरी शिवसेनेला अपशकून करण्याची खेळी करून पुन्हा रालोआतील जागेसाठी प्रयत्न करावेत असंही राजकारण असू शकेल.

    मागल्या निवडणुकांच्या वेळेस त्यांना रालोआ मध्ये प्रवेश हवा होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केलेत त्यासाठी, पण शिवसेनेनं केलेल्या ठाम विरोधामुळे राज रालोआत येऊ शकले नाहीत. ते झालं असतं तर... पण जाऊं देत .. अगा जे घडलेलेच नाही त्यावर विचार करत बसण्यात काय हशील? अर्थात् हे कधी होऊच शकणार नाही असं मी म्हणत नाही. राजकारणात कुणीच काही गृहित धरू नये म्हणतात ते बरोबरच आहे.

    वर अनेक जण म्हणताहेत तसं राज बरंच काही करू शकले असतेत..
    पण जर ५ मुख्य पक्ष राज्यात असलेत आणि ४ जण युती करून लढत असतअसतील, पाचव्याला युती न करता आणि तळागाळापासून काम न करता पुरेशी मतं गोळा करणं अशक्य आहे. हेच राजचं झालेलं आहे. अगदी तळागाळापासून काम न केल्यानं, त्यांना असलेलं अ‍ॅडव्हांटेज त्यांनी घालवलेलं आहे आणि ते भरून काढायला त्यांना / त्यांच्या पक्षाला भरपूर मेहनत घेणं भाग आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शेर को लंबी छलांग लगाने से पेहले 2 कदम पिछे जाना जरुरी है।

      Delete
  46. मला वाटते वाचकांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेण्यासाठी हा लेख लिहिला आहे.
    ;)

    ReplyDelete
  47. लोकसभे ची माघार ही विधानसभे साठी केलेल्या वाटाघाटी असू शकतात. कारण मनसे मुले लोकसभे साठी आघाडीला उत्तर भारतात तोटा होई शकतो. पण विधानसभे साठी थोडा तरी फायदा होऊ शकतो....

    ReplyDelete
  48. 100 % सहमत,
    अतिशय चपखल वर्णन वर्णन केले आहे राजचे,
    खऱ्या अर्थाने वस्त्रहरण (थोडक्यात कपडेच काढले) केले

    ReplyDelete
  49. भाऊ माफ करा,
    आज चा ब्लॉग खरोखरच निस्पृह नव्हता,

    स्वराज ला आव्हाड पावले की काय
    सीमाप्रश्नावर त्याने महाराष्ट्रातील जनतेवर नकारात्मक भूमिका घेऊन त्याने मीठ च चोळले पद्धतशीर
    डोवालांवर सुद्धा नाहक च,सी ग्रेड ची टिका केली त्याने

    ReplyDelete
  50. दर्शन वसंत कोळीMarch 22, 2019 at 7:20 PM

    भाऊ, एक तर खूप वाचक प्रेमींकडून तुम्हाला वारंवार विनंती केल्यावर खूपशा प्रतिक्षेनंतर राज ठाकरेंवरचा आपला लेख ब्लाॅग वर एकदाचा आला खरा पण भाऊ लेखाने निराशा केली. फार हातचं राखून लेख लिहिलात तुम्ही.फारच मुलाहिजा राखल्याचे दिसते. जबरदस्त चिरफाड अपेक्षित असताना फुसका बार ठरला. त्यापेक्षा थोडे थांबलोअसतो व लोकसभेच्या निकालानंतर राज ठाकरेची शेवटची प्रतिक्रिया आल्यानंतर एकदाचा पंचनामा व दिशा दशा मांडली असती तरी चालले असते असे राहून राहून वाटते. क्षमा असावी आपल्यावर नाराज झाल्याबद्दल.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ एक अभ्यासू लेखक पत्रकार आहेत, आपल्या प्रतिक्रिया या राज यांच्या बद्दल आपला पक्ष काय म्हणतो, किंवा आपण काय म्हणतो किंवा आपल्या पक्षाचे समर्थक काय म्हणतात यांच्यावरच येत असतात, परंतु एखाद्या व्यक्तीची पारख करायची झाल्यास त्रयस्थ पद्धतीने करावी तरच आपल्या प्रतिक्रियेला खरा न्याय मिळेल। मेंढरा प्रमाणे एकामागून मान खाली घालून चालत राहिला तर काय परिणाम होतात हे सांगायची गरज नाही

      Delete
  51. छान लेख राजने सुवर्णसंधी घालवली

    ReplyDelete
  52. Speaking about Doval was very unfortunate and don't know what he wanted to achieve by going at such a low level

    ReplyDelete
  53. "कहीपे निगाहे कहीपे निशाना?" हा काही या काळातील अर्जुन नाही चला दुसरा बाण आना!!

    लेख छान होता,एक नवीन पॉईंट ऑफ व्हियू कळला!��

    हा बाण हुकला भाऊ!! राज जी भाषा वापरतायत ती हीन दर्जाची होतेय, त्यांना अजूनही वेळ आहे स्वतःचे खेळ खेळायची फक्त फासे त्यांनी टाकावे बारामती कडून टाकून घेऊ नये म्हणजे मिळवलं!

    ReplyDelete
    Replies
    1. 2014 सलाचे फासे वडनगर वरून पाठवले होते अस म्हणायचं का?

      Delete
  54. Number of comments on this article proves the popularity of Shri.Raj Thakare.

    ReplyDelete
    Replies
    1. yes it does.. people admired him initially.. and they felt sad about him. However, if you see above comments more closely, people are quite angry with the way he has drafted his speeches..! So, that way, one may say the popularity has declined.. isn't it? ;-)

      Delete
  55. After reading long awaiting Editoral Block on Raj Saheb - comments & replies, Bhau you are Neutral Journalist

    ReplyDelete
  56. With due respect, राज ठाकरेंशी असलेले खाजगी संबंध जपत हा लेख लिहिलेला वाटतोय भाऊ... हा पहिलाच लेख आहे तुमचा जो पटत नाहीये. आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठे दिशाहीन राजकारणी दोनच. ऱाज ठाकरे आणि राणे.

    ReplyDelete
    Replies
    1. राज ठाकरे यांची तुलना फिनिक्स पक्षाशी करायला हरकत नाही कारण हा नेता हार माणण्यातला नाही, सध्यातरी तस वाटतंय, कारण हा एकच नेता आहे जो बहुमतातल्या सरकार मधल्या नेत्याला घाम आणायची हिम्मत राखतो। स्वतःची आणि पक्षाची साध्य परिस्थिती पाहता स्वतःला घाम आला पाहिजे होता परंतु तस नाही, उलट ज्याच्यावर शरसंधान साधेल त्याला पळता भुई थोडी करून सोडणारा एकमेव नेता। मराठी रक्ताचा उत्कृष्ट नमुना।

      Delete
    2. अगदी बरोबर फक्त फिनिक्स मध्ये आणि यांच्यामध्ये एकच फरक आहे ..फिनिक्स राखेतून भरारी मारून बाहेर येतो ...आणि हा कायमचा राखेत पडून राहतो ...वरती जे याचा बरोबर आहेत त्यांना पण राखेत घालतो ..... जय महाराष्ट्र्र

      Delete
  57. कसला आलाय मोठा राजकारणी ..नोटबंदी मुळे सगळा काळा पैसा गेलाय ...म्हणून हि चरफड .... अगदीच बालिश आहे हा खरतर

    ReplyDelete
  58. I think Raj is playing double game. He knows people will not follow him if he doubts about defence forces and Ajit Doval, that too in such a bad language. So people will vote against his point of view. That way he will help BJP. He is also helping them to consolidate the votes against Pawar. He is not influencing voters infact he is motivating them to vote for Modi.
    At the same time he as a leader is sacrificing for Sharad Pawar and will deal with him for vidhansabha which he can not directly do with BJP due to alliance with Shivsena.
    I won't be surprised if Raj Thakre will be member of next government of BJP, Shivsena Yuti.
    Pawar is already a lost leader. He is struggling to survive. His struggle will end after the following Vidhansabha election. If Rashtravadi collapses, people against BJP will look for another leader which will be Raj Thakre. And just like what Pawar does, he will play against BJP and will join the government after the elections.

    ReplyDelete