Friday, April 19, 2019

गळचेपी कोणी कोणाची केलीय?

i am naxal karnad के लिए इमेज परिणाम

गेल्या आठवड्यात योगेश परळे यांच्या ‘रीझन’ नावाच्या पोर्टलसाठी माझी एक राजकीय मुलाखत घेण्याचे रेकॉर्डींग पुण्यात चालू होते. त्यात विश्रांतीसाठी थांबलो नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांचा फ़ोन आला. वास्तविक त्यांचा माझा परिचय नाही की कधी भेटलेलो नाही. पण त्यांनीच ओळख करून दिली आणि माझा मोबाईल नंबर त्यांना शोधून मिळवावा लागल्याचेही सांगितले. निमीत्त होते, माझ्या एका अशाच व्हिडीओचे. अक्षय बिक्कड नावाच्या तरूणाचे ‘द पोस्टमन’ नामक युट्युब चॅनेल आहे. त्यासाठी त्याने माझी छोटीशी मुलाखत सहाशे कलावंतांच्या एका संयुक्त पत्रकाविषयी घेतली होती. देशातल्या या नाट्य चित्रपट इत्यादी क्षेत्रातील कलावंतांनी मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीत मत देऊ नका किंवा पराभूत करा; म्हणून काढलेले ते संयुक्त पत्रक, वाहिन्या व माध्यमातून खुप चर्चेचा विषय झाले. त्याच निमीत्ताने ही मुलाखत अक्षयने घेतली आणि युट्युबवर टाकलेली होती. ती व्हायरल झाली. हे व्हायरल म्हणजे काय, ते मला अजून न उमजलेले रहस्य आहे. पण अधिकाधिक बघितले गेले किंवा चर्चिले जाणार्‍या चित्रण क्लिपला व्हायरल म्हणतात, असा माझा समज आहे. असो. त्यात मी सरसकट त्या पत्रकावर सह्या करणार्‍यांची अभिजन बदमाशांची टोळी अशी संभावना केल्याने विजय केंकरे विचलीत झाले होते. कारण त्यांचीही त्यावर सही आहे. आपण बदमाश कसे, असा त्यांचा सवाल होता. त्याला उत्तर देताना मी स्पष्ट केले, की अविष्कार स्वातंत्र्याविषयी हे कलाकार इतकेच संवेदनशील असतील, तर त्यांनी पंतप्रधान मोदी वा त्यांच्या सरकारच्या काल्पनिक गळचेपीपेक्षा आधी प्रत्यक्षात गळचेपी झालेल्या विषयावर निषेधाचा सूर लावला पाहिजे होता. तसा तो लावला नसेल, तर हे ताजे पत्रक निव्वळ भंपकपणा व बदमाशी आहे, असा माझा आरोप आहे. तर त्यांनी आधीच्याही विषयावर निषेधाचे पत्रक काढल्याचा खुलासा केला आणि मी थक्कच झालो. हे आधीचे प्रकरण कुठले?

१५ फ़ेब्रुवारी २०१९ रोजी बंगालमध्ये तिथल्या भाषेत ‘भविष्योतेर भूत’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या दोन दिवसातच बंगालच्या पोलिसांनी थिएटर मालकांना धमक्या देऊन व ‘वरचे आदेश’ असल्याचे सांगून त्या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. एका वदंतेनुसार त्या चित्रपटात तिथल्या मुख्यमंत्री ममता बानर्जी त्यांच्यावर उपहास व टिका असल्याची चर्चा होती. सरकार व पोलिस त्यांचेच असल्याने त्यांनी ही गुंडगिरी केल्याचा निषेध याच सहाशे कलावंतांनी अगत्याने करायला हवा. मोदींच्या काल्पनिक गळचेपी सरकार बरोबरच खर्‍याखुर्‍या गळचेपीचाही निषेध व्हावा, इतकीच माझी अपेक्षा होती. पण माझ्या तरी वाचनात मागल्या दोन महिन्यात असे कुठले कलावंतांचे ममताच्या निषेधाचे पत्रक प्रसिद्ध झालेले नव्हते. म्हणूनच मी या कलावंतांना पक्षपाती ठरवित बदमाशांची टोळी म्हटलेले आहे. कारण त्यांच्या पत्रकबाजी व निषेधातला पक्षपात आजवर कधीही लपून राहिलेला नाही. आपल्य डाव्या विचारसरणीसाठी त्यांनी मोदी वा भाजपाच्या विरोधात दंड थोपटून इभे रहाण्याचा त्यांनाही पुर्ण अधिकार आहे. पण त्यांनी राजकीय कार्यकर्ता वा सामान्य नागरीक म्हणून मैदानात आले पाहिजे. कलावंत वा अभिजन असला मुखवटा लावण्याचे कारण नाही. कारण ही मुठभर माणसे म्हणजे एकूण भारतीय कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्र अजिबात नसते. पण त्यांना तसा मुखवटा चढवून त्यामागे आपला डाव्या राजकारणाचा चेहरा लपवायचा असतो. आजवर अनेक राजकीय पक्षांनी व डाव्यांनीही अविष्कार स्वातंत्र्याची जगभर व भारतातही गळचेपी केलेली आहे. त्यामुळे कलावंत म्हणून ह्या मुठभरांनी निषेधाचे सुर लावण्याची मुळातच गरज नव्हती. राजकीय विरोध म्हणून खुलेआम मैदानात यायला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण बदमाशी तेव्हा होते, जेव्हा तुम्ही आपल्या गुंडांना पाठीशी घालून इतरांच्या गुंडगिरीचा निषेध करता. मला तितकेच समोर आणायचे होते. पण ते सत्य अनेकांना झोंबले.

पण तेही बजूला ठेवू. आपण विजय केंकरे यांचा दावा तपासून बघुया. त्यांच्या म्हणण्यानुसार बंगालमधील चित्रपटाचे प्रदर्शन गुंडगिरी व पोलिसांचा बडगा उगारून बंद पाडण्यात आले, त्याचाही ह्याच सहाशे किंवा त्यातल्या बहुतांश कलावंतांनी पत्रक काढून निषेध आधीच केलेला आहे. ते खरे असेल; तर तो निषेध माझ्या वाचण्यात वा बघण्यात कशाला आलेला नाही? मी त्या फ़ोननंतर अनेकांकडे अगदी पत्रकार मित्रांकडे चौकशी केली. तर कुणालाही ममताचा निषेध करणार्‍या कलाकारी पत्रकाविषयी काडीमात्र माहिती नव्हती. कुठल्या वाहिनीवर बातमी नाही की चर्चा झाली नाही. कुठल्या वर्तमानपत्रात बातमी नाही ,की अग्रलेख वगैरे आला नाही. मग विजय केंकरे म्हणतात, ते ममताच्या निषेधाचे ह्या अभिजन कलाकारांचे पत्रक गेले कुठे? केंकरे खोटे बोलतात, असे मी अजिबात मानत नाही. त्यांनी सही केली असेल तर निदान त्यापैकी काही कलावंतांनी ममताचा निषेध करणारे पत्रक नक्की निघालेले व माध्यमकडे पाठवलेले असणार. पण मुद्दा मोदी वा ममतांच्या निषेधाचा नसून, अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आहे. सह्या करणार्‍या कलावंतांच्या मताची गळचेपी ममतांनी केलेली नाही, की मोदींनी केलेली नाही. मोदीविरोधी पत्रक ठळकपणे प्रसिद्ध झाले आणि वाहिन्यांवरही त्याची भरघोस प्रसिद्धी झाली. फ़क्त तशी कुठलीही प्रसिद्धी ममताच्या निषेधाला त्याच वाहिन्या व वर्तमानपत्रांनी दिलेली नाही. तर त्याला ममता किंवा मोदींना जबाबदार धरता येणार नाही. ती गळचेपी संबंधित वाहिन्यांचे व्यवस्थापन, संपादक व पत्रकारांनीच केलेली आहे. म्हणून मुद्दा आहे, तो माध्यमांनी कलावंत स्वातंत्र्याचा व मताच्या केलेल्या गळचेपीचा आहे. हे कलावंत खरोखरच आपल्या स्वातंत्र्याविषयी तितकेच संवेदनाशील असतील, तर माध्यमांनी आपल्याच केलेल्या गळचेपीविषयी तितकेच प्रक्षुब्ध व्हायला नकोत का? झाले का?

मोदींच्या विरोधाला वारेमाप प्रसिद्धी आणि ममताच्या निषेधाला कचर्‍याची टोपली दाखवली गेली असेल; तर कलावंतांच्या मताची माध्यमांनी गळचेपी केलेली आहे ना? मग नंतर मोदी विरोधातले पत्रक काढून त्यावर सह्या करण्याच्या आधी; या संवेदनाशील कलावंतांनी आपली सर्जनशीलता दाखवून, अशा मुजोर हुकूमशहा फ़ॅसिस्ट संपादक पत्रकारांच्याच निषेधाचे पत्रक तातडीने काढायला हवे होते. अर्थात तेही कोणा संपादक पत्रकाराने नक्कीच छापले नसते. पण नंतर त्याच पत्रकारांना जेव्हा मोदी निषेधाचे पत्रक हवे होते, तेव्हा या अभिजन कलावंतांना एक अट माध्यमांना घालत आली असती. आधी आमच्या ममता व माध्यमांची हुकूमशाही यांचा निषेध करणारे पत्रक प्रसिद्ध करा, मगच मोदींच्या निषेधाचे पत्रक तुम्हाला प्रसिद्धीला मिळू शकेल. पण तसेही झालेले नाही. आपली व्यक्तीगत गळचेपी व मुस्कटदाबी निमूट सहन करून या कलावतांनी मोदींना मत देऊ नका; असले आवाहन करणारे पत्रक माध्यमांना दिले. त्याचा अर्थ तेही तितकेच बदमाश भामटे असतात, जितके माध्यमातले भुरटे मोदींच्या विरोधात उर बडवित असतात. कारण त्यांना आपल्या वा कुठल्याही अविष्कार स्वातंत्र्य वा गळचेपीशी काडीमात्र कर्तव्य नसते. त्यांच्यासह माध्यमांना व तत्सम पत्रकारांना मोदींच्या निषेधाचे वा विरोधासाठी निमीत्त हवे असते. ते निमीत्त खरेही असायची गरज नसते. खोटेही आरोप वा निमीत्त पुरेसे असते. पडत्या फ़ळाची आज्ञा म्हणतात, तसे हे भुरटे मोदींना शिव्याशाप द्यायला उतावळे असतात. तसे नसते तर माझ्याशी फ़ोनवर संवाद साधताना केंकरेनी मला ममता विरोधातल्या निषेध पत्रकाला प्रसिद्धी मिळाल्याचा दाखला दिला असता. आताही वेळ गेलेली नाही. ह्या गाजलेल्या पत्रकावर सह्या केलेल्या कोणीही कुठल्या माध्यमात त्यांचे ‘भविष्योतेर भूत’ प्रकरणातले निषेध पत्रक मोदीपुर्वी प्रसिद्ध झाले वा वाहिनीवर झळकले, त्याचा दाखला द्यायला हरकत नाही. किंवा ज्यांनी त्याला प्रसिद्धी देण्याची टाळाटाळ केली, त्यांचाही निषेध केल्याचा पुरावा जरूर द्यावा. अभिजनांना ‘बदमाश’ संबोधल्याची माफ़ी मागायला, मी प्रतिक्षेत बसलो आहे.

29 comments:

  1. Agdi parkhad va sadetod bollat bhau

    ReplyDelete
  2. हू किल्ड खरेखुरे

    ReplyDelete
  3. ह्या लोकांना मोदींबद्दल काहीही सिद्ध करायची गरज नसते. ह्यांना बदमाश म्हणाले की मात्र स्पष्टीकरण हवे. वा रे वा कलावंत म्हणे.

    ReplyDelete
  4. भाऊ राज ठाकरे सुद्धा आता काँग्रेस आणि पाकिस्तानच्या पंक्ति मध्ये बसून बा बद्दल शंका पसरवत आहेत. कृपया याबद्दल आपले मत मांडावे.

    ReplyDelete
  5. वा भाऊ, मस्त तासली आहे। बदमाशी करूच परन्तु आम्हाला बदमाश म्हणायचे नाही, छान न्याय।

    ReplyDelete
  6. नेम अचूक बसलाय भाऊ

    ReplyDelete
  7. भ्रामक विश्वात मग्न असलेली, कल्पनांचा खेळ करणारी, रोज नवे मुखवटे धारण करणारी, वास्तवापासून सदैव अपरिचीत असणारी आणि केवळ प्रसिद्धी वर निर्वाह करणारी ही अभिजन कलाकार मंडळी वास्तविक जीवनात किती दोलायमान स्थितीत असतात हे जगाला ठाऊक आहे. ज्यांना आयुष्याचा पट प्रसिद्धी वरच मांडावा लागतो आणि करियर पाण्यावरील बुडबुड्या सारखं वाटतं ते आतून सदैव असुरक्षिततेच्या भितीने ग्रासलेले असतात. मग अशावेळी त्यांना आपण राजकारणा पासून अलीप्त राहून कलोपासनेचा वसा चालवावा असे का वाटत नाही? माझ्या मते ह्याचं उत्तर म्हणजे पुरस्कार प्राप्तीची महत्त्वाकांक्षा हेच आहे. आणि मोदी सरकारने हा रतीब बंद केलाय.

    ReplyDelete
    Replies
    1. मोदी किती दिवस पुरणार.मग पुन्हा रडगाणे सुरू.

      Delete
  8. हे कलावंत काही अल्प स्वार्थासाठी ईमान विकणारे वाटतात. नाहीतर कोणीतरी कागद पुढे केला की आंधळेपणी न वाचता न समजून घेता समोरच्या माणसाकडे बघून " आंगठा " लावत असावेत.
    कदाचित येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरूषो भवेत या जातीचे असावेत.

    केंकरे महोदय आपण यात कुठे बसता ? की आणखी एखादी "जात" आहे ?

    (अशांकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम)

    ReplyDelete
  9. वाह भाऊ ... लाजवाब!!!अर्थात नेहमीप्रमाणेच... तुमचा कोणताही ब्लॉग लाजवाब व वस्तुनिष्ठच असतो !!!

    ReplyDelete
  10. भाऊंनी आपला बहुमूल्य वेळ खर्चुन या भुरट्या कलाकारांबाबत लिहावे एवढी त्यांची लायकी नाही. पुढारी व माध्यमे त्यांना निरोध सारखे वापरून फेकून देतात. पण आपला वापर होतोय हेही या मूर्खांना समजत नाही.

    ReplyDelete
  11. सूर्यावर थुंकल्याची बातमी होते. पण काजव्यावर थुंकल्याची बातमी होत नाही. आता यातील सूर्य कोण आणि काजवा कोण , हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मी काजव्यावर थुंकलो , असे म्हटले तर त्याचा पुरावा कोणी मागत नाही. पण सूर्यावर थुंकल्याचा पुरावा द्यावा ही लागत नाही. तो तुमच्या तोंडावर दिसतोच ! श्री. केंकरे यांच्या खुलाशाचे असे ही विश्लेषण होउ शकते.

    ReplyDelete
  12. भाऊ .............तुम्ही या केंकरेला मस्त ' सापटीत ' पकडला आहे. ममता बैनर्जीच्या विरुद्ध काढलेले तथाकथित पत्रक हे लोक आता यापुढे बनवायला घेतील असेल असे वाटते. जर पूर्वी बनविले असेल तर स्वतःच्या घरी ' ड्रॉवर ' मध्ये ठेवले असेल. तुम्ही लेखाच्या शेवटी लिहिलेली अट एकदम ' झकास ' / मार्मिक !! हे अभिजन बदमाश तुम्हाला परत फोन करतील असे वाटत नाही. हा केंकरे शिवाजी पार्कात राहणारा..तेथील लोकांवर फुशारक्या मारत असेल की त्याने कसा तुम्हाला फोन करून जाब विचारला म्हणून. पण हा लेख वाचून तो ताळ्यावर येईल असे वाटते.

    ReplyDelete
  13. मग तुम्ही प्रतिक्षा करत बसा ....
    तुम्हाला देखील माहिती आहे, केंकरे येणार नाही....

    ReplyDelete
  14. सुपर भाउ.पोस्टमन मधील विडीओचा हाच परीणाम हवा होता.तो विडीओ खरच अभिजन वर्गाची बदमाशी दाखवनारा आहे.बंगाली चित्रपटाचे पत्रक सोडा तो विषयच कुणाला माहित नाही तुम्ही इथ सांगितल तेव्हा कळाल.

    ReplyDelete
  15. वाह! सणसणीत टोला,टोला भाऊ,तुम्हीच हे करू शकता.

    ReplyDelete
  16. ह्या असल्यांचा अन् त्या सर्वांच्या तीर्थरूपांचा उठता बसता पार्श्वभागावर लाथा घालत अस्सल गावरान शिव्यांनी उध्दार करायला पाहिजे...सत्ताधारी पक्षाने मागच्या सरकारप्रमाणे सवलतींच रतीब बंद केलय हे ह्या बाजारबसव्यांचं खरं दुखणं आहे....भाऊ बरं केलत या मराठी भामट्याला ब्लॉगच्या माध्यमातुन उघडं केलं.

    ReplyDelete
  17. मोदी द्वेषाची काविळ इतकी झालीये कि प्रत्येक बाबतीत भगवा रंग दिसतो. हे मात्र खरे कि उच्चभ्रू वस्तीत तळातुन आलेला पंतप्रधान सामावला जाणं नाही.

    ReplyDelete
  18. चांगलं झोडपले अभिजन वर्गाला.
    त्यांची बुद्धी चांगल्या कामासाठी वापरावी ही ईश्वर चरणी प्रार्थना.
    भाऊ , चांगले हणालात पायातील कडून.
    आपल्या विचारला आणि लेखनास सलाम

    ReplyDelete
  19. Viral mhanje... वाऱ्यासारखी एखादी गोष्ट पसरणे... वाऱ्यावर पसरणारी ती व्हायरल...

    ReplyDelete
  20. भाऊ, तुमचं एकदम बरोबर आहे. काही दिवस वाट पाहून उत्तर न आल्यास पुन्हा एक झणझणीत लेख टाका. आम्ही सर्व वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  21. अभिजनांना ‘बदमाश’ संबोधल्याची माफ़ी मागायला, मी प्रतिक्षेत बसलो आहे..व्वा भाऊ..

    ReplyDelete
  22. भाउ, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा कचाट्यात पकडलं आहे तूम्ही.
    पण हे भामटे नाही समोर येणार. तूम्हाला फोन केल्याचा केंकरेंना पश्चाताप होत असेल. आता बसतील फटीत अडकलेली शेपटी सोडवत.

    ReplyDelete
  23. ह्या केंकरेंची मुलाखत आली आहे TOI मध्ये. त्यात म्हणतात की मोदींनी 15 लाखाचे खोटे आश्वासन दिले म्हणून ते चिडले आहेत मोदींवर. स्वतःच वाचा:
    https://m.timesofindia.com/city/mumbai/netas-have-lost-the-plot-level-of-discourse-shockingly-low/articleshow/68786381.cms

    ReplyDelete