Thursday, March 19, 2020

राहुल गांधी होऊ नका

Image result for rahul gandhi

दहा दिवसांपुर्वीची गोष्ट असेल. कुठल्या तरी वाहिनीवर कोरोना व्हायरसविषयी चर्चा होती आणि त्यात डॉ. प्रताप रेड्डी सहभागी झालेले होते. देशातील अपोलो नामक खाजगी विविधोपयोगी इस्पितळांची साखळी उभारणारे म्हणून रेड्डी यांची ओळख आहे. ते म्हणाले, भारत सरकारने उत्तम काम चालविले आहे आणि आपण प्रत्येकाने त्यात आपला भाग जबाबदारीने उचलला पाहिजे. पण त्यांच्या आरोग्यविषयक वक्तव्यापेक्षाही त्यांचे समाजहिताचे प्रबोधन अधिक प्रभावी होते. कोरोना सारख्या संकटाने जे आव्हान उभे केले आहे, त्यावेळी परिस्थितीचे आकलन कसे करावे, त्याचे मार्गदर्शनच त्यांनी त्या विधानातून केलेले आहे. रेड्डी म्हणाले, ‘तुम्ही अशा संकटकाळात समाधान किंवा उपायाचे भागिदार नसाल, तर तुम्ही समस्येचे साथीदार असता.’ कोरोना किंवा तत्सम प्राणघातक सांसर्गिक आजाराशी दोन हात करीत असताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकजुटीने लढणे अगत्याचे असते. त्यात नसत्या शंका उपस्थित करून काम करणार्‍यांच्या व्यग्रतेमध्ये बाधा आणणेही घातक असते. शिवाय तुम्ही नुसती शंका काढत असता. पण त्यावरचा उत्तम उपाय तुमच्यापाशी नसतो. पण जो काही अपुरा उपाय योजायचे काम चालू असते, त्यात व्यत्यय आणुन तुम्ही संकटात भर घालत असता. कोरोनाच्या फ़ैलावाने नेमकी तशी स्थिती निर्माण केलेली आहे. कारण या विषाणूची ओळख अजून वैद्यक शास्त्राला झालेली नाही, किंवा त्याच्यावरचा योग्य उपायही सापडलेला नाही. पण तो सापडण्यापर्यंत बाधित वा बाधा न झालेल्यांना सुरक्षित राखण्याची पराकाष्टा, हा सुद्धा उपायच असतो. निदान योग्य उपाय सापडण्यापर्यंत लोकांना मृत्यूच्या जबड्यातून वाचवणे व जीवंत राखणे अगत्याचे असते. ते काम चालू असताना त्याच्या अपुरेपणाविषयी बोलणे म्हणजे पर्यायाने बाधा पसरण्याला हातभार लावणेच असते. ह्या वस्तुस्थितीला म्हणूनच महत्व आहे.

राहुल गांधी यांनी नेमकी उलटी भूमिका घेतली आहे. कोरोना म्हणजे काय व त्याची व्याप्ती किती, याचा नरेंद्र मोदींना थांगपत्ता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी एका पत्रकाराने त्यांना विचारले, मग योग्य पावले कुठली ती सांगा. तर राहुल गांधी उत्तरले, ते मला ठाऊक नाही. कारण मी त्या विषयातला जाणकार नाही. एकूण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ इतकाच, की मी काही करणार नाही. मला त्यातले काही कळतही नाही. पण सरकारने जे काही उपाय चालविले आहेत, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. असले काहीबाही बोलून राहुल गांधी काय साध्य करीत असतात? तर लोकांच्या मनात निव्वळ शंका निर्माण करीत असतात. जेव्हा अशा शंका निर्माण केल्या जातात, तेव्हा लोकांचा धीर सुटत असतो आणि बेताल झालेली गर्दी वा लोक बेछूट वागून संकटाला मुद्दाम आमंत्रण दिल्यासारखे वागू लागतात. काही वर्षापुर्वी मुंबईच्या परेल-एल्फ़ीस्टन स्थानकांना जोडणार्‍या पादचारी पुलावर प्रचंड वर्दळ होती आणि अकस्मात पाऊस सुरू झाला. तेव्हा पायर्‍या उतरणारी गर्दी जिथल्या तिथे थांबली आणि पुलावरून येणारी गर्दी वाढत गेली. त्यात कोणीतरी पुटपुटले, की पादचारी पुल कोसळतो आहे. ते ऐकून शेकडो लोक भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. त्यामुळे जी चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये २३ लोकांना हकनाक बळी गेलेला होता. त्यांना कुठल्या अपघाताने मारलेले नव्हते. तर एका नाकर्त्या व्यक्तीच्या फ़ालतू शंकेने पळापळ होण्याची परिस्थिती निर्माण केली आणि गर्दीने आपल्यापैकीच २३ लोकांचा बळी घेतला होता. कोरोनाची कहाणी त्यापेक्षा वेगळी मानता येणार नाही. अजून त्या विषाणू वा रोगबाधेची नेमकी लक्षणे वा परिणामही ठाऊक झालेले नाहीत. त्याची व्याप्ती वा फ़ैलाव यांचाही अभ्यास होऊ शकलेला नाही. उपचार ही दुरची गोष्ट आहे. जगभरातले वैद्यकशास्त्र त्याबाबतीत चाचपडते आहे. अशावेळी अफ़वा हा सर्वात भीषण प्राणघातक विषाणू होत असतो. मग सवाल असतो, की सहकार्य कोणाशी करावे? अफ़वांशी की उपायांशी?

रेड्डी आपल्याला तेच बहूमोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. सरकार किंवा डॉक्टर्स शास्त्रज्ञही अजून विषाणू रोगाची माहिती जमवित आहेत. अशा वेळी बाधा झालेल्यांना शक्य तितके सुरक्षित रहायला मदत करणे व त्यासाठी प्रवृत्त करणे; हा प्राधान्याचा विषय असतो. उपायच नाही म्हणून मृत्यूची भिती घालणे म्हणजे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण करण्याला हातभार लावणे असते. राहुल गांधी त्यापेक्षा काय वेगळे करीत आहेत? उपाय त्यांना ठाऊक नाही. मग जो उपाय होतो आहे, तो चुकीचा असल्याचे त्यांना कसे कळलेले आहे? तर त्यांना फ़क्त लोकांना भयभीत करायचे आहे. त्यातून लोक मरतील वा मरणाला आमंत्रण देतील, याचीही त्यांना फ़िकीर नाही. समस्येचे उपाय ठाऊक नसताना असे वागणे, म्हणजे समस्येचे भागिदार होणे असते. दुर्दैवाने आपल्या देशात असे एकटेच राहुल गांधी नाहीत. शेकड्यांनी अतिशहाणे मोकाट आहेत आणि आपल्यापाशी नसलेल्या अकलेचे नित्य प्रदर्शन करण्यातून संकटाला हातभार लावत असतात. त्यामुळेच कोरोनावरला उपाय भले आपल्याला ठाऊक नसला, तर बिघडत नाही. एकवेळ कोरोनाचा संसर्गही हाताळता येईल. पण अशा प्राणघातक बेजबाबदार लोकांचा संसर्ग अधिक विघातक असतो. कुठल्याशा चित्रपटात सलमानखानचा खास डायलॉग आहे. तुम मुझपर एक मेहरबानी करो, की कोई मेहरबानी मत करो. राहुल गांधी वा तत्सम लोकांना तेच सांगितले पाहिजे. तुम्ही आपले अगाध ज्ञान आपल्यासाठी जपून ठेवा. त्याचा प्रादुर्भाव होऊ देऊ नका, तरी भारतीय जनतेवर खुप मोठे उपकार होऊ शकतील. बाधा होऊन मुठभर माणसांचा बळी जाऊ शकतो. पण अफ़वा त्याच्या अनेकपटीने निरोगी लोकांचा बळी घेऊ शकत असते. मुद्दा इतकाच, की आपल्याला उपायांचे भागिदार होता येत नसेल तर निदान संकटाचा वा विषाणूचा साथीदार होऊ नका. त्यातूनही कोरोनाला रोखण्यासाठी तुम्ही मोठे अमूल्य योगदान देऊ शकाल. कारण या आजारावरचे उपाय मिळण्यापर्यंत आपण जीवंत रहाणे अगत्याचे आहे. याक्षणी तोच उपाय आहे.

Image may contain: 1 person, text

15 comments:

  1. कॅज्युअली घ्यायची सवय आहे भारतीय लोकांना. अजूनही मोठी लग्ने चालू आहेत, येदीयुरप्पासारखे मुख्यमंत्रीही तीथे दिसतात.

    ReplyDelete
  2. भाऊ, हा राहूल गांधी म्हणजे आपल्या कोकणात देवाला सोडलेला बोकड असतोना तसा आहे. देवाचा बोकड कशातही तोंड घालतो पण लोक त्याला काही बोलत नाहीत कारण त्यांना माहीत असते की लवकरच हा देवाच्या नावाने बळी दिला जाणार आहे आणि एक दिवस लोक एकत्र येऊन समारंभपूर्वक त्याला बळी देतात. सध्या हा राजकीय बोकड मोकाट सुटलेला आहे व दिसेल त्या क्षेत्रात लायकी नसताना माहिती नसताना तोंड घालतोय, एक दिवस लोक त्याचा समारंभपूर्वक बळी देतीलच.

    ReplyDelete

  3. मोदींनी बांधलेले पुतळे बंद झाले नेहरूंनी बांधलेली हॉस्पिटल उघडी आहेत #कोरोना आशा पोस्ट फिरत आहेत त्याला काय उत्तर द्ययचे

    ReplyDelete
    Replies
    1. श्री नरेन्द्र मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद देश में करीब 157 नए मेडिकल कॉलेजों की शुरुआत हुई है।

      अटल बिहारी वाजपेयी जी ने देश में 6 नए एम्स बनाए थे। आज देश में कुल 22 एम्स स्थापित करने का काम चल रहा है।

      हमारा लक्ष्य है कि हर राज्य में 1 एम्स स्थापित हो: श्री @AmitShah https://t.co/HUjpOEatZ1पिछले 6 साल में देश में लगभग 29,000 एमबीबीएस की और 17,000 पीजी की सीटें बढ़ाई गई हैं।

      आने वाले वर्षों में 10,000 और पीजी सीटें बढ़ने का अनुमान है।

      जो इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाने का काम किया जा रहा है, उसका उद्देश्य है कि हर गांव में एक स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध हो सके: श्री @AmitShah https://t.co/QY28ZNFXqP

      Delete
  4. Very correct sir, 22/03/2020 ya diwshi Janata Carfue la support karu ya, aani sewa karmacharyanna thanks dewu ya.

    ReplyDelete
  5. राहुल गांधी आता केवळ हास्यास्पदहि राहिलेला नाही. हे character आता इरिटेटिंग झाले आहे. हा मंदबुद्धी आता मिरगीचाही (hysterics) शिकार झाला आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ आपला ब्लॉग लाखो लोक वाचतात त्यामुळे मोदींनी आज जे आवाहन केले आहे त्याबद्दल एक सविस्तर लेख लिहावा ही नम्र प्रार्थना

    ReplyDelete
  7. राहुल गांधी का कोई भविष्य नही है।

    ReplyDelete
  8. Those who are the partners of problem, be neglected. We are with our pm and his style of working.

    ReplyDelete
  9. क्वारंटांइन हां एक उपाय वाटतो आहे.

    ReplyDelete
  10. Pappu che bolne aata Congress dekhil mnawar the Nahi.

    ReplyDelete
  11. His comment doesn't deserve any attention. He hardly thinks before passing comments on such serious issue. Just ignore him and be with Modiji @this crucial moment

    ReplyDelete
  12. भाऊंचा "राहूल गांधी होऊ नका" हा लेख वेळेवर वाचला होता पण एका प्रमुख वृत्तसमूहाच्या आजच्या (२५ मार्चच्या) वर्तमानपत्रातील एक अग्रलेख वाचल्यावर परत भाऊंची आठवण झाली. गप्पांचे कार्यक्रम आयोजित करून त्यात रत्ना पाठक किंवा त्यांच्या कळपातील ठराविक लोकांना आमंत्रित करून मंथन आणि प्रबोधन करण्याचा डांगोरा पिटण्याचा या संपादकांनी वसाच घेतला आहे. आजच्या अग्रलेखातले "विचार" मांडण्यापूर्वी त्यांनी भाऊंचा वरील लेख वाचला असता तर त्यांचेच भले झाले असते.

    ReplyDelete
  13. तुम्हा सेक्युलर लोकांना मोदी काही दुसरे काम करतात हे दिसत नसत की तस तुम्ही झोपल्याच सोंग घेतल आहे हे तुम्हालाच माहिती

    ReplyDelete