Monday, December 17, 2018

ये शिंदे कौन होता है?

kejriwal sleeping at rail bhawan के लिए इमेज परिणाम

हे शीर्षक वाचून काही आठवते का? नेमके हे कोणाचे शब्द आहेत? कधी बोललेले आहेत? का बोललेले आहेत? नेमके सांगायचे तर हे शब्द चार वर्षे अकरा महिन्यापुर्वी उच्चारले गेलेले आहेत. राजधानी दिल्लीच्या रेलभवन या शासकीय कार्यालयाच्या समोर रस्ता अडवून बसलेल्या एका जमावाच्या समोर बोलताना उच्चारले गेलेले आहेत आणि ते कोणा ऐर्‍यागैर्‍याने बोललेले शब्द नाहीत. तर दिल्ली या नगर राज्याच्या मुख्यमंत्र्याने बोललेले शब्द आहेत. त्याचे नाव आहे अरविंद केजरीवाल. तेव्हा औटघटकेसाठी कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झालेल्या केजरीवाल यांनी चक्क एका मागणीसाठी रस्त्यावर धरणे धरले होते आणि कुडकुडत्या थंडीत तिथेच मुक्काम ठोकलेला होता. खिडकी एक्स्टेन्शन या भागात घाड घालण्यासाठी त्यांच्या सहकार्‍याने आग्रह धरला आणि त्याला नकार देणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना बडतर्फ़ करण्यासाठी केजरीवाल आग्रह धरून तिथे धरण्याला बसलेले होते. आपल्या आमदार मंत्री व अन्य पाठीराख्यांना घेऊन त्यांनी तिथे ठाण मांडलेले होते. तारीख २० जानेवारी २०१४ होती आणि नजिकच्या राजपथावर प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाची तयारी चालू होती. यासाठी तो परिसर सुरक्षित केला होता. सहाजिकच धरणी सत्याग्रहाला प्रतिबंध होता आणि म्हणूनच सत्याग्रह आवरला नाही तर पोलिस कारवाई करावी लागेल, असा इशारा गृहमंत्र्याने दिलेला होता. त्याचे नाव होते सुशिलकुमार शिंदे. त्यांच्या अधिकाराला आव्हान देताना केजरीवाल यांनी हे शब्द उच्चारले होते. शुक्रवारी सुप्रिम कोर्टाच्या राफ़ायल याचिकेवरील निकालानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन जी घोषणाबाजी केली, तेव्हा केजरीवाल यांचे शब्द आठवले. आपल्या धरण्यावर प्रतिबंध घालण्याच्या भूमिकेवर केजरीवाल म्हणाले होते, ये शिंदे कौन होता है? आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे आणि आपल्याला प्रतिबंध लावणारा शिंदे कोण? राफ़ायल निकालानंतर राहुल यांची भाषा थोडीतरी वेगळी आहे काय?

मागल्या काही दिवस महिन्यांपासून भारतातील संपादक, पत्रकार, बुद्धीमंत व विरोधक एक टुमणे लावून बसलेले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी देशातील एक एक लोकशाही संस्था मोडीत काढली वा त्यांचे अधिकार झुगारून लावले. असा एक सरसकट आरोप हे लोक नियमित करीत असतात. तो खरा मानायचा तर सुप्रिम कोर्ट ही बहुधा लोकशाहीतील पायाभूत संस्था नसावी. कारण त्याच न्यायासनाने दिलेल्या निकालाला राहुल गांधी पायदळी तुडवित आहेत. निवडणूक आयोग ही सुद्धा बहुधा लोकशाहीला पाया नसलेली संस्था असावी. कारण तिचीही पायमल्ली कॉग्रेस व राहुल गांधी नित्यनेमाने करीत असतात. संसद ही देखील लोकशाहीचा पाया नसावी. कारण मागल्या पाच वर्षात कुठले तरी निमीत्त शोधून राहुल गांधींच्या कॉग्रेसने संसदेचे कामकाज चालू दिलेले नाही. मात्र यापैकी कुठल्याही संस्था वा संघटनेच्या कामकाजावर मोदींनी शंका घेतलेली नाही, की तिच्या आदेश निकालाची अवज्ञा केलेली नाही. सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधीशांमध्ये बेबनाव झाला, तेव्हा सरकारने त्यात हस्तक्षेप केला नाही आणि तो न्यायपालिकेचा अंतर्गत मामला असल्याची भूमिका घेतलेली होती. मोदींनी कधीही निवडणूक आयोगाच्या कुठल्या निर्णयावर शंका घेतली नाही, की त्याला आव्हानही दिलेले नाही. मोदींनी कधी संसदेच्या कामकाजात अडथळा आणलेला नाही. उलट संसद चालू द्यावी असे आवाहन नेहमी केलेले आहे. मग कोण संसदीय लोकशाहीच्या संस्थांचा पाया खणून काढतो आहे? शुक्रवारी सुप्रिम कोर्टाने राफ़ायल व्यवहारात कुठलाही गैरप्रकार घडला नसल्याचा निर्वाळा देत चौकशीची मागणी करणार्‍या याचिका फ़ेटाळून लावल्या. त्याचा अवमान कोणी केला? राहुलनी त्याहीनंतर ‘चौकीदार चोर’ असल्याचे पत्रकार परिषदेत ठणकावून सांगणे, केजरीवाल यांच्या शब्दांची आठवण करून देणारे नाही काय?

केजरीवाल म्हणाले होते, ये शिंदे कौन होता है? त्याला आम्हाला रोखण्याचा अधिकारच काय? राहुल म्हणतात, कोर्टाने कुणाला क्लीन चीट देण्याशी काही मतलब नाही. चौकीदार चोर है म्हणजे आहे. मग कोर्टाने काहीही म्हणो. यात कोण लोकशाहीचा पाया असलेल्या संस्था व त्यांच्या निर्णयांना पायदळी तुडवतो आहे? मोदींनी तर असे काही केल्याचा कुठला पुरावा कोणी देऊ शकलेला नाही. आरोप मात्र नित्यनेमाने होत असतात. अर्थात आरोप मोदींसाठी नवे नाहीत. याच्याही आधी कुठल्या सहारा कंपनीच्या कुठल्या चिटोर्‍यावर मोदींचे नाव असल्याने त्यांना काही कोटी रुपये कंपनीने लाच दिल्याचा आरोप राहुलनी केला होता. तोच लोकसभेत केला तर देशात भूकंप होईल, असे पत्रकारांना बजावले होते. तोही आरोप घेऊन प्रशांत भूषण सुप्रिम कोर्टात गेलेले होते आणि कोर्टाने त्याची चौकशी करण्याला साफ़ नकार दिलेला होता. त्यानंतर निदान राहुल थंडावले होते. त्यांनी त्या निकालावर भाष्य केलेले नव्हते. आज त्यांनी केजरीवालच्या भाषेत ‘ये सुप्रिम कोर्ट कौन होता है’ असे शब्द वापरलेले नाहीत. पण पत्रकार परिषदेत आवेशपुर्ण आवाजात उच्चारलेले शब्द; त्याच आशयाचे होते. त्यामुळे केजरीवाल यांचा पाच वर्षे जुना प्रसंग आठवला. अर्थात केजरीवालना त्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यावर स्वार होऊन त्यांनी नंतर लौकरच मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला व थेट पंतप्रधान पदावर आरुढ होण्यासाठी झेप घेतलेली होती. ते कुठवर जाऊन पोहोचले, तो इतिहास खुप जुना झालेला नाही. पाच वर्षांनी तेच जुने नाटक आता नव्या लोकसभेपुर्वी नव्या कलाकारांच्या संचात सुरू झालेले दिसते आहे. कालपरवा विरोधकांची एक बैठक झालेली होती आणि त्यात केजरीवालही उपस्थित होते. त्यांच्याकडून राहुलनी ही जुनी संहिता घेऊन त्याच नाटकाचा नवा प्रयोग बसवलेला असावा. अन्यथा पत्रकार परिषदेत कॉग्रेसचा कोणी अध्यक्ष इतक्या आवेशात बोलल्याचा इतिहास नाही.

अर्थात याला नाटक म्हणावे की कुठल्याही वाहिनीवरची मालिका समजावे; हा आपापला विषय आहे. केजरीवाल यांनी साधारण २०१३ च्या आरंभापासून म्हणजे लोकसभा निवडणुका लागण्याच्या वर्षभर आधी एकामागुन एक आरोपांची आतषबाजी करीत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेली होती. तेव्हाच्या आरोपावर खटले भरले गेले आणि तीनचार वर्षानंतर केजरीवाल यांनी अलिकडेच साधारण महिनाभर असे खटले निकालात काढण्यासाठी सगळ्याच फ़िर्यादींची निमूट माफ़ी मागून टाकली आहे. डझनावारी माफ़ीनामे लिहून देताना आपल्याला कसलीही माहिती नव्हती वा आपली दिशाभूल करण्यात आल्याचा बचाव मांडलेला होता. योगायोग असा की नेमक्या त्याच मुहूर्तावर म्हणजे सहा महिन्यापुर्वी राहुल गांधींनी केजरीवाल यांच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. केजरीवाल जसे तावातावाने बेछूट आरोप करीत होते, तशाच आवेशात आजकाल राहुल बेधडक कसलेही आरोप मोदींवर करीत असतात. त्यावर कोणी खुलासा मागितला वा तपशील मागितला, की केजरीवाल प्रमाणेच उठून चालते होतात. शुक्रवारच्या त्यांच्या आवेशाकडे बघून पत्रकारही थक्क झाले होते. काही पत्रकारांना ते बघून रहावले नाही. त्यांना हसताना बघून राहुल कमालीचे विचलीत झाले होते. म्हणून असेल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि आवेशपुर्ण भाषेत घोषणाबाजी केली. त्यामुळे एकप्रकारे २०१४ च्या लोकसभेची पुनरावृत्ती आतापासून सुरू झाली म्हणावी का? म्हणजे आता पाच महिने बेछूट आरोप होत जाणार आणि अखेरीस त्यातली हवा केजरीवाल यांच्यासारखीच निघून जाणार. मुद्दा इतकाच, की अनुभवातून कोणी शिकत नाही आणि मोदी विरोधक तर कधीच शिकण्याची शक्यता नाही. बहुधा हीच आता नरेंद्र मोदी यांची शक्ती व ताकद होऊन बसलेली आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक कुठल्या दिशेने जाणार त्याची चाहूल राहुलच्या घोषणाबाजीतून लागलेली आहे.

19 comments:

 1. मागे अमित शहा यांनी २०१४ च्या विजयानंतर एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की काँग्रेसला ते निवडणूक का हरत आहेत तेच अजून माहिती नाही. ....खरंच ' काप गेले तरी भोकं राहिली आहेत.' ..... खालसा संस्थानाचे हे ' खालसा ' संस्थानिक आहेत. यांच्याकडे स्वतःचा काही कार्यक्रम नाही. संपूर्ण भिस्त आहे ती हे सरकार काय चुका करते किंवा ' अँटी इन्काबंसी ' याची वाट बघत बसलेत बापुडे...........त्यांनी पूर्वी पोसलेले पत्रकार ही ' सहपानाचा सहजानंद ' थांबल्याने त्रस्त आहेत. कोणाचे काय नि कोणाचे काय !!!

  ReplyDelete
 2. मला तर खुप राग आला.पण मुद्दा हातातुन गेल्याची चीड दिसत होती.

  ReplyDelete
 3. भाऊ काका, तुम्ही म्हणता तितके हे लोक मला मूर्ख वाटत नाहीत. त्यांना नक्की विजयाची खात्री आहे कारण,

  १. मतदार इतके मूर्ख आणि बिनडोक आहेत कि त्यांच्या भरवश्यावरच हे असले चाळे चालू आहेत. तसे नसते तर मध्यप्रदेशात लोक काँग्रेस च्या मागे गेले नसते. सगळ्यात मूळ प्रॉब्लेम असा आहे कि हिंदू हे कधीच समाज म्हणून मतदान करत नाहीत पेट्रोल , कांद्याचे भाव असले मुद्दे, किंवा जातीयवादी मुद्दे त्यांना महत्वाचे असतात. मग ते पाकिस्तान सरकार देत असेल तर हे त्यांना सुद्धा मतदान करतील अशी साधारण मानसिकता बहुसंख्य हिंदू मतदारांची आहे. त्या उलट मोदींनी खूप प्रामाणिक स्वच्छ आणि खरोखर लोकशाही ला साजेसा कारभार करूनसुद्धा मुस्लिम किंवा ख्रिश्चान लोक हे केवळ काँग्रेस आणि इतर पुरोगामी बांडगुळांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून भाजपाला हिंदुत्ववादी धर्मांध ठरवून एकगठ्ठा विरोधात मतदान करतात . जे कि पुन्हा एकदा लोकसभेसाठी बघायला मिळेल असे मला वाटते. काँग्रेस ने ७० वर्षात पोसलेला जातीयवाद, धर्मांधपणा त्यांना अजूनही पुरतोय ह्यातच मतदारांचा मूर्खपणा समजून यावा.
  २. दुसरा मुद्दा मोदींनी देशासाठी जागतिक पातळीवर जे अविश्वसनीय काम केले आहे त्याची कुठल्याही हिंदू मतदाराला काहीही पडलेली नाही. खुद्द महाराष्ट्रात ब्राह्मण माणूस मुख्यमंत्री केला म्हणून भाजप ला मत देणार नाही असले वागणारे कमी नाहीत. तो मुख्यमंत्री खरोखरच प्रामाणिक असूनसुद्धा लोकांना तो फक्त त्याच्या जातीमुळे नकोय. (अश्याच जात्यंध लोकांना पुरोगामी म्हणायची पद्धत आपल्या देशात निर्माण केली ती पण ह्याच बाजारबुणग्यांनी)
  ३. तिसरा मुद्दा, मोदीने आणलेली कडक शिस्त कुणालाही नकोय. गेल्या ७० वर्षात काँग्रेस केलं हा वादाचा मुद्दा असेल पण एक गोष्ट त्यांनी करून ठेवली ती म्हणजे लोकांना कष्ट न करता फुकट खायची सवय लावून ठेवली . त्यामुळे जे सरकार आरक्षण,अनुदान ,कर्जमाफी सारखे मलिदा देईल ते निवडून देतील लोक. लोकांना कष्टाला योग्य फळ मिळवून देणारा प्रामाणिक नेता नकोय. फुकट खायची सोया लावणारा नेता हवाय. कडक शिस्तप्रिय शिक्षक कुणाला हवा असतो?आपल्या देशात तर नाहीच नाही . त्यामुळे भाजप काही पुन्हा सत्तेत येणार नाही. किमान मोदी असेपर्यंत तर नक्कीच नाही
  ४. मोदी,शहा कितीपण मेहनत करोत एक कर्जमाफीचं ,आरक्षणाचं किंवा अनुदानाचं नुसतं आश्वासन सगळ्यावर पाणी फिरवून पुन्हा काँग्रेसला सत्तेत आणायला पुरेसं आहे. आणि मोदींनी घडी बसवली आहे ती ह्याच बाजारबुणग्यांना खैराती वाटायला कामी येणार आहे . वर परत भाजप आणि मोदींच्या नावाने गळे काढायला मोकळे.

  ReplyDelete
  Replies
  1. मलाही हेच म्हणावयाचे आहे.

   Delete
 4. अहो भाऊ,राहुल बाबा इंदिराजींचाच नातू आहे,इंदिराजींनी तरी कोर्टाला कुठे जुमानले होते ?

  ReplyDelete
 5. Totally one sided press conference hoti. एकही उलट प्रश्र्न नाही. पाठ केलेलं बोलला आणि पळाला

  ReplyDelete
 6. bhau Rahul gandhi ekdam kejriwal yanchya rastyane jat ahet. Jantela congressche khare rup dakhavat ahet. smt Indira gandhi yaani ghatatma sanstha kasha modit kadnyacha atonat prayatna kelela hota. te amcya navin pidhene anubhavle navte. parantu rahul he tyache pratyakshik karun dakhwat ahet. parantu janta ata shahani zaleli ahe he tyana mahit nahi. kiti virodhabhas ahe je swatala Gandhiwadi mhanawtat nemke tech Gandhiwad modit kadhtayat, ani je lok Gandhivadache virodhak manle jatat nemke tech Gandhimargane jatana disat ahe. mala mahit nahi, modipurvi sansdechya payrivar mastak theun madhe pravesh kelela dusra koni neta asel. Rahul Gandhi swatala Supreme Courtapekha varchi ghatnatmak sanstha mantat. naval nahi te gandhi gharanyache yuvraj ahet. ani ata tar jantene tyanchya netratwawar shikkamortab kelele ahe. pan he changale hotey 2019 chya drashtikonatun

  ReplyDelete
 7. भाऊ, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे.

  ReplyDelete
 8. Bhau
  ya pranyanwar ka Lekhni zijawata? Leave them. Ignorance is best remedy for them.

  Expecting article from you on Sajjankumars conviction by high court. Role of Kamalnath in 84 Roit. But you seems very much interested in people like Kumar ketkar (His own family must have not giving him the attention you give to him). They are spoiled eggs & only dirt will come out of them. So Please don't waste your time on such non valuable people.

  You have much to give to us & we always look for that. Please think over it.

  Your regular reader.

  ReplyDelete
 9. Totally one sided press conference hoti rahul gandhichi. एकही उलट प्रश्र्न नाही. पाठ केलेलं बोलला आणि पळाला

  ReplyDelete
 10. राहुलचा आवेश म्हणजे फुसका बार च ठरणार बहुधा।

  ReplyDelete
 11. But the fact is they had been successful in the past. Kejriwal became CM of Delhi, why no body refused to accept his apology and asked to continue the court cases. In the past as you have pointed out that Congress was successful to dislodge Atalji by false accusations of coffins scandal etc. Even I would say that Pakistan had been successful after 1971 to keep troubling India and we have not able to do anything than to keep responding. No permanent solution in so many years.

  ReplyDelete
 12. Bhau, I follow your blogs closely. I comment on your blogs but my comments do not get published. It looks like my comments are being blocked. Anyways, I will still keep commenting. I support Modiji & want to see him lead our country at least for one more term. I like your blogs & respect your political views. However, I don't know why but I feel you are of late a bit disconnected from reality. I personally feel that country will repeat 2004 mandate. Look at the way Congress has managed to ride on BJP's anti-incumbency. 2014 was a different ball game for Modiji. He rode on strong anti-incumbency wave against Congress & presented a vision. Now he has to fight anti-incumbency. In 2014, people voted for "VIKAS". But Congress has managed to bring the narrative back to caste, religion. Caste leaders were created by Congress during Gujarat elections. Congress' deep assets & sympathizers managed to divide Hindus in Maharashtra by creating Koregaon-Bhima. During Karnataka elections, Congress tried to create a new religion "Lingayat" out of Hinduism. And many such things. "Chowkidaar Chor hai" is resonating with Congress supporters. Many people know that Rahul Gandhi is not at all suitable to lead the country or hold any office. But Congress has managed to change that perception. We all know that he has no thoughts of his own & he reads & says whatever he is asked to read & say. Still he has managed to win back Congress' loyal supporters. For me, 2004 is in the making. Congress will again bear the fruits of development done by Modiji. Just like UPA-I did. UPA-I's success was mostly due to Atalji efforts during NDA's term.

  ReplyDelete
 13. In the past few months Rahul Gandhi has accused Modi of giving Anil Ambani's group Rs. 30000 crores via Rafale deal. He has also called Modi a thief. These are very serious matters. Therefore I am surprised that neither Ambani nor Modi has sued Rahul Gandhi and since this is not done I feel along with many others that there may be something in Rahul Gandhi's accusations.

  ReplyDelete
 14. भाऊ उत्तर प्रदेशात अखिलेश मायावती आणि अजितसिंग यांनी उत्तर प्रदेशात गठबधन केले असून त्यात काँग्रेसला अमेठी आणि राईबरेली या दोन जागा सोडल्या आहेत असे आज tv चॅनेलवर दाखवत आहेत म्हणजेच या जोकर नेत्याबरोबर जाऊन उपयोग नाही हे या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना लक्षात आलेले दिसतेय

  ReplyDelete
 15. भाऊ, 3 दिवस झाले. तुमचा नवीन ब्लॉग नाही आला. आम्ही आतुरतेने वाट बघतोय.

  ReplyDelete
 16. Bhau, I don't agree with HB, though 2014 may not repeat but still Modiji will manage to get 2nd term. U know better, as I feel there is lot of difference bet'n 2004 n 2019. There r crorers of young voters who don't vote blindly, and r media savy, which help them to know reality n to form their own openion.
  About Rafale, better the matter shd have been nipped in bud,don't understand what was govt's handicap. U may b knowing better.

  ReplyDelete
 17. एक बातमी आलेली आहे मणिपूर मध्ये एका पत्रकाराला पंतप्रधानांच्या वर टीका केली म्हणून दंड झाला. नेमकी टीका काय केली त्याचा कोणत्याही बातमीत उल्लेख नाही. केवळ टीका केली या कारणासाठी कोर्टाने दंड ठोठावला नसावा. टीका करण्याचा अधिकार लोकशाहीत असलाच पाहिजे व पंतप्रधानांवर टीका होऊ शकते. पंतप्रधान च्या वर काहीतरी अशोभनीय वक्तव्य केलेले असावे असे वाटते. पंतप्रधानपदाचा सन्मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे. टीका करण्याचा अधिकार असला तरी पंतप्रधान या पदाला अवमान कारक काहीही आणि कुणीही करता कामा नये. या पत्रकाराने नेमकी काय टीका केली हे कुणीही सांगू शकत असेल तर जरुर सांगावे.

  ReplyDelete