Saturday, December 22, 2018

पाच वर्षातला जैसेथे अजेंडा

kejriwal cartoon के लिए इमेज परिणाम

गुन्हेगारांची एक ठराविक कार्यशैली असते. त्यावरून सराईत गुन्हेगार पकडणे पोलिसांना सोपे जात असते. त्या कार्यशैलीला मोडस ऑपरेन्डी म्हणतात. कारण सवयीचे गुन्हेगार सहसा आपली शैली बदलायला राजी नसतात. अनेकदा त्यांचा सवयीवर इतका भरवसा असतो, की ते सवयीच्या आहारी जातात आणि पकडले जात असतात. अशीच एक पद्धत दिशाभूल करण्याची असते. म्हणजे सत्य दडपण्यासाठी भ्रम उभा केला जातो. ही शैली एका ठराविक काळानंतर लोकांना इतकी ठाऊक होते, की अशा कुठल्याही भ्रामक गोष्टी लोकांच्या चटकन लक्षात येऊ लागतात. त्यामुळे असे गुन्हेगार तोंडघशी पडत असतात. आताही पाच विधानसभा निवडणूकांचा निकाल लागल्यानंतरच्या बातम्या आणि माध्यमांचा सूर बघितला; मग पाच वर्षे जुन्या घटनाक्रमाची आठवण झाली. त्यातली मोडस ऑपरेन्डी नजरेस आली. वाटमारी करणारे भुरटे हमरस्त्यावर दगड वगैरे टाकून डायव्हर्शनचा फ़लक लावतात आणि वहानाना आडमार्गाला जायला भाग पाडतात. मग तिथे त्यांना लुटतात, पण ही गुन्हेशैली आता सर्वपरिचित झाली आहे आणि अशा फ़लकामुळे बेसावध वाहनचालक आंधळेपणाने कुठल्या अनोळखी रस्त्याकडे वा गल्लीत वळत नाहीत. थांबून चौकशी तपास करतात. निदान किती वाहने वळतात, त्याची दखल घेऊन सावध होतात. माध्यमात दबा धरून बसलेल्या पुरोगाम्यांचा हा एक खेळ असतो. म्हणूनच पाच राज्यातील विधानसभा निकालात सर्वाधिक सुचक असलेला तेलंगणाचा निकाल दडपून, अन्य तीन राज्यातील निकालांचा व परिणामांचा डंका पिटण्याची स्पर्धा चालली आहे. तेलंगणाने दाखवलेली राजकीय दिशा झाकण्याचा आटापिटा चालला आहे. हेच पाच वर्षापुर्वी झाले नव्हते का? तेव्हा तीन राज्ये भाजपाने जिंकून लोकसभेचा कल स्पष्ट केला होता. पण कौतुक कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्री झालेला केजरीवालांचे चालले होते ना? यालाच म्हणतात भुरटेगिरी.

२०१३ च्या डिसेंबरमध्येही पाच राज्याच्या निवडणूका झाल्या होत्या आणि भयंकर मोठे बहूमत भाजपाने तीन राज्यात मिळवले होते. पण दिल्ली नगरराज्यात भाजपा बहूमताला हुकला होता. तर त्याला रोखण्यासाठी कॉग्रेसने नवख्या आम आदमी पक्षाला बाहेरून पाठींबा दिला आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाले. तर त्यांचा शपथविधी व अन्य सोपस्कार दाखवताना वाहिन्यांनी वा माध्यमांनी राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगडच्या सरकार स्थापनेला किती महत्व दिले होते? चर्चा फ़क्त दिल्लीच्या विधानसभेची होती आणि तीन राज्यातल्या भाजपाच्या प्रचंड विजयाला बातम्यांनी झाकोळून टाकण्याचा आटापिटा झाला होता. त्यावर वाचक वा वाहिन्यांच्या प्रेक्षकांसह मतदाराने काडीमात्र विश्वास ठेवला नाही. पण केजरीवाल मात्र त्याच्या आहारी गेले आणि मुख्यमंत्रीपदावर लाथ मारून पंतप्रधान होण्याच्या आखाड्यात उतरले होते. लोकांनी मतदानातून त्यांना शुद्धीवर आणले. मात्र माध्यमांना शुद्ध यायल वेळ लागतो. आपण लोकमत घडवतो वा बदलतो अशी मस्ती चढली; मग असले पोरखेळ सुरू होत असतात. आताचे निकालही त्याला अपवाद नाहीत. कारण महागठबंधन वा मोदी विरोधातली विविध पक्षांचे एकजुट, कुठल्या दिशेने मतदानाचे निकाल घेऊन जाणार आहेत, त्याची चुणूक तेलंगणाने दाखवली आहे. माध्यमांचा आटापीटा तेच सत्य झाकण्यासाठी चालला आहे. यातून पुरोगामी पत्रकार माध्यमांना नेमके काय लपवायचे असते? तर महागठबंधन नावाचा जो भ्रम उभा केला आहे, तेच मोदींना खरे आव्हान असल्याचे चित्र उभे करायचे आहे. पण वास्तवात नेमक्या अशा महागठबंधनाचा प्रयोग मतदार साफ़ नाकारतो, याचीच साक्ष ताज्या निकालातून मिळालेली आहे. ती सांगायची म्हणजे आपलाच भ्रामक देखावा उध्वस्त करायचा ना? त्यापेक्षा तेलंगणातील चंद्रशेखर राव यांचे अपुर्व यश झाकोळून टाका आणि त्यासाठी कॉग्रेसच्या राजस्थान मध्यप्रदेशातील हुकलेल्या बहूमताचे ढोल पिटा.

अर्थात त्याचा जनमानसावर फ़ारसा परिणाम होत नाही. कारण सामान्य मणूस बुद्धीवादी नसतो. म्हणूनच पाच वर्षापुर्वी नरेंद्र मोदींच्या समोर माध्यमांनी कॉग्रेसपेक्षा मोठे आव्हान केजरीवाल यांच्या रुपाने उभे केले होते आणि तेच खरे भासवण्यासाठी राजस्थान, छत्तीसगड वा मध्यप्रदेशातील कॉग्रेसचा लज्जास्पद पराभव झाकण्यासाठी आटापीटा केला होता. आजही तेव्हाची वर्तमानपत्रे किंवा अन्य माध्यमातील बातम्यांचे स्वरूप तपासून बघता येईल. यातून अखेरीस माध्यमांची विश्वासार्हता पुर्ण लयास गेली होती आणि त्यावर म्हणूनच समाज माध्यमे भारी पडलेली होती. म्हणून असेल समाज माध्यमातून मुख्य प्रवाहातील पुरोगामीत्वाला उघडे पाडणार्‍यांना ट्रोल असे हेटाळणीयुक्त नाव देण्यात आले. त्यानेही काही साधले नाही. म्हणून त्या मोदीलाटेने ज्यांना अडगळीत फ़ेकून दिले, अशा अनेक मान्यवर संपादक पत्रकारांनी वाहिन्या वा छपाई माध्यमातून बाजूला होऊन, डिजीटल माध्यमाचा आडोसा घेतला आहे. त्यांनी विविध पोर्टल. वेबसाईट अशा माध्यमातून सोशल माध्यमांना आपल्या कब्जात आणायचा घाट घातला आहे. त्यासाठी मोदी विरोधातले राजकारणी व पक्षांच्या मदतीने सोशल माध्यमातील गट उभे केले आहेत. पण त्यांना एक विसर पडलेला आहे, की सोशल माध्यमांची विश्वासार्हता सत्यापुरतीच होती आणि लपवलेली सत्ये समोर आणण्यामुळेच त्यांचा जनमानसावर प्रभाव होता. अशा गटबाजीने त्याच्यावरचाही विश्वास हल्लीच्या काळात रसातळाला गेला आहे. २०१३-१४ च्या काळात सार्वजनिक जीवनात सोशल माध्यमांचा जो प्रभाव प्डत होता, त्याचा मागमूस आज उरलेला नाही. मग ते माध्यम भाजपावाल्यांनी वापरो किंवा भाजपा विरोधकांनी आपल्या कब्जात घेतलेले असो. एक मात्र आजही खरे आहे. मुख्य माध्यमातून लपवलेल्या बातम्या व माहिती समोर येत असेल त्याचा समाज माध्यता प्रभाव आहे. तर प्रचारकी थाटाच्या माहितीला ओहोटी लागलेली आहे.

एखाद्या माध्यम वा साधनाची उपयुक्तता वा अपायकारकता ती वापरणार्‍या व्यक्तीवर असलंबून असते. सोशल वा मुख्यप्रवाहातील माध्यमांची गोष्ट वेगळी नसते. ते माध्यम तुम्ही कसे वापरता यावरच त्याची विश्वासार्हता अवलंबून असते. राफ़ायलचा काडीमात्र पुरावा कोणी अजून समोर आणू शकलेला नाही. पण माध्यमातून वा अन्य मार्गाने त्याच्यावर जितका गदारोळ चालला आहे, त्याच्या तुलनेत ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी दलाली घेणारा अटकेत असूनची चर्चा झाकलेली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी घराण्याने केलेली लुटमार रोखण्यासाठी कोर्टाने फ़र्मान काढलेले असतानाही, गाजावाजा राफ़ायलच्या अंबानीला न मिळालेल्या पैशासंबंधी होतो.  मग लोक कोणावर विश्वास ठेवणार? कारण ऑगस्टा वा नॅशनल हेराल्डवर चर्चा नसली, तरी बातम्या लोकांपर्यंत झिरपत असतात. सोशल माध्यमातून पोहोचत असतात आणि बुद्धीमंतापाशी नसलेले तारतम्य सामान्य जनतेपाशी असते. म्हणून पा़च वर्षापुर्वी केजरीवालना जनतेने जमिनदोस्त केले आणि त्यांच्या समवेतच अशा भुरटेगिरी करणार्‍या माध्यमांना झोपवले होते. पण जित्याची खोड म्हणतात, तेच खरे असते. इतकी नाचक्की झाली म्हणून असे लोक आजही सुधारलेले नाहीत. म्हणून त्यांना मध्यप्रदेश राजस्थानचे गुणगान करताना तेलंगणात महाकुटमीचा उडालेला धुव्वा लपवण्याचा मोह टाळता आलेला नाही. मात्र त्यामुळे आगामी लोकसभेत मतदान कसे होईल व त्यात महागठबंधनाचा विचका कसा होईल, त्याचा संकेत तेलंगणाने दिलेला आहे. पण ते साम्य किंवा ती चाहूल मे महिन्यात लोकसभेसाठीच्या मतांची मोजणी होईल, तेव्हा वाहिन्या व माध्यमांना लागणार आहे. तोपर्यंत कमलनाथ, गेहलोट वा पायलट व शिंदे यांच्यासह राहुल गांधींना दिग्विजयासाठी निघालेला योद्धा म्हणून पेश करण्य़ात कुठे व्यत्यय येणार नाही. कारण ती मोडस ऑपरेन्डी आहे ना?

15 comments:

  1. भाऊ....
    तुम्ही youtube वर यायलाच पाहिजे....
    लोकांना हे पण कळायलाच पाहिजे...

    रोहित, पुणे

    ReplyDelete
  2. एकदम अचुक नेमकी परीस्थिती मांडलात भाउ.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    मोदी चलाख माणूस आहे. अगदी गुजरात विधानसभा निवडणुकीपासून आपल्या विरोधात पप्पू हाच चेहरा असावा याचा प्रयास चालवला आहे. आता तर महागठबंधन स्वत:च्या कर्माने मरतंय याचा मोदीशहांना मनातनं आनंदंच होत असणार. २०१४ चा खेळ मागील पानावरून पुढे चालू आहे.

    अखेरच्या टप्प्यात महागठबंधनवाले पप्पूस नेता मानायला तयार व्हायची सुतराम शक्यता नाही. मोदी ४००+ मारताहेत या वेळेस.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करतो आपले लिखाण जर आम्ही वाचत नसतो तर या सर्व गोष्टी आम्हाला खरोखरीच कधीच कळले नसते आणि आम्हीसुद्धा बऱ्यापैकी या मोडस ऑपरेंडी तेच शिकार म्हणून वावरलो असतो तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत भाऊ असेच लिहीत रहा दिवसाला पाच ते दहा लेख लिहिले तरी आम्ही वाचू

    ReplyDelete
  5. Bhau
    Perfect. I have no doubt that in 2019 Loksabha, BJP will again get majority at their own. In Mp n Rajstan also it was a tough fight. Bjp was ruling party. In MP they were ruling since last 3 terms. Also what cong havent done to win there, Still cong couldnt get firm majority n Bjp have lost 10-12 Seats by a margin of less than 1000 votes.

    But if anyone dont want to see reality then its their problem.
    Rather let them fool themselves. Once 2019 results get declared these ppl going to do a great drama. Waiting for that.

    Bjp can get more seats than what they got in 2014.

    ReplyDelete
  6. भाऊ 2004 मध्ये वाजपेयी सरकार पडले त्या पाठीमागे गुजरात दंग्यांवरून या मीडिया चॅनेल्सनी केलेली प्रचंड बदनामी हे कारण होते त्यानंतर नरभक्षक वाघाला जशी मानवी रक्ताची चटक लागते तशी या मीडियाला देशाच्या सत्तेच्या वर्तुळात हस्तक्षेप करायची चटक लागली नीरा राडिया टेप्स वरून हे उघड झाले 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मध्ये चाललेल्या कमांडो कारवाईचे प्रसारण करून ही चॅनेल्स पाकिस्तानच्या isi ला मदत करत होती 2002 नंतर चॅनेल्सनी केलेल्या बदनामीला पुरून उरलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मग मात्र या लोकांची उपासमार सुरू झाली पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यात सरकारी खर्चाने जायची या चॅनेलवाल्यानचे फुकटखाऊ धंदे बंद झाले दिल्लीतल्या सत्ता वर्तुळातला यांचा माज उतरवण्यात आला त्यामुळे पिसाळलेल्या या लोकांनी गोरक्षक mob lynching अशा मुद्यांवरून सरकारची बदनामी सुरू केली राहुल गांधींना पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी हे लोक उतावीळ झाले आहेत म्हणून तेलंगणात झालेला काँग्रेस आणि चंद्राबाबूंचा पराभव दाबून टाकण्यात आला पण भाऊ आपण म्हणता तशी चॅनेल्सची विश्वासहर्ता संपली आहे यांनी मोदींची कितीही बदनामी केली तरी जनता यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे

    ReplyDelete
  7. They can't run the business without showing any competition whether it's true or false.

    ReplyDelete
  8. भाऊ,तुमचा मुद्दा बिनतोड आहे,मला ही नवल वाटत होतं की तेलंगणा मधल्या पराभवाचा कोणीच कसा उल्लेख करत नाही.वास्तविक तिथे रावांनी काँग्रेस ला धूळ चारली आहे.
    मला एक कळत नाही इतक्या मोठ्या संख्येने माध्यम (प्रिंट व डिजिटल) असा खोटे पणा का व कुणाच्या इशाऱ्यावर करतात? त्यांचा बोलविता धनी पैशाने खूप तगडा असला पाहिजे किंवा दुसरे काय कारण असेल?
    वस्तुस्थिती समोर मांडणारे "भाऊ" कितो भाषांत आहेत?

    ReplyDelete
  9. खर आहे भाऊ तुमचं पटतय, पण तीन राज्यात भाजपाची झालेली पिछेहाट हे नाकारता न येणारे वास्तव आहे. मोदी सरकार ने उत्तम नसेल तरी चांगला कारभार केलेला असूनही मतदार फिरला. हे कसं झालं?
    राजस्थानात जनमत वसुंधरा राजेंच्या विरोधात आहे हे दिसत असतांना नवा चेहरा का दिला गेला नाही?
    मध्य प्रदेश ठिक आहे तिथे निसटती हार आहे पण छत्तिसगढ मधले गणीत नक्की कुठे चुकले?
    या बद्दल आपले काय विश्लेषण आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. कारण राजस्थान मध्ये तसेही दार 5 वर्षांनी सत्ता परिवर्तन होण्याची खूप मोठी शक्यता होती

      आता पराभवानंतर वसुंधरा राजे ह्या पिढल्या वेळेस आपोआपच नेत्या नसतील

      तिकडचे लोक म्हणतच होते की "राणी तेरी खैर नही, मोदी तुझसे बैर नही"

      Delete
  10. गामा पैलवान जी,
    मोदी जरी परत यायची शक्यता असली तरी ४०० + मुळीच नाही , आत्ता आहेत त्या सीटस सुध्दा ( ५० + / -) ची शक्यता आहे कारण आपले प्रेस व इतर बुध्दीवन,रफायल , ८४ ची दंगल या बाबत कोर्टा चे निर्णय २ महिने आधि आले असते तर ??
    अशा अनेक बाबी लोकसभे च्या वेळ आडव्या येणार

    ReplyDelete
  11. The best comment of your on political situation I like it very much Bhau write on thanks

    ReplyDelete