Saturday, April 6, 2019

अडवाणींचा अवमान?



लालकृष्ण अडवाणी यांचे भारतीय जनता पक्षाची स्थापना व संगोपन यात असलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही. पण आपल्या त्या कारकिर्दीत ज्यांचा हातभार लागला, त्यांनाही त्याचे श्रेय देण्याची वेळ आली, तेव्हा अडवाणींनी तो मोठेपणा किती दाखवला, असाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. आज अडवाणींना खड्यासारखे बाजूला करण्यात आले, अशी टिकेची झोड उठली आहे. पण त्यांनीही नरेंद्र मोदी या आपल्याच शिष्याला किती सन्मानाची वागणूक दिली होती? त्याचाही हिशोब कधी बघायचा किंवा नाही? रथयात्रेपासून अडवाणी देशातले एक ख्यातनाम व्यक्तीमत्व झाले. त्यावेळी किंवा नंतरच्या काळात त्यांच्या रथयात्रेचे सारथी म्हणून नरेंद्र मोदी यांची जगाला ओळख होत गेली. पुढे मोदींना गुजराथचे मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी प्रचारक कार्यकर्ता अशी असलेली आपली प्रतिमा पुसून टाकत उत्तम प्रशासक व राजकारणी असे आपले व्यक्तीमत्व तयार केले. त्यांच्याच कृपेमुळे अडवाणी सलग गांधीनगर येथून संसदेत पोहोचू शकले, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचे श्रेय मोदींना देण्य़ाचे औदार्य अडवाणींनी कधी दाखवले होते काय? सहा वर्षापुर्वी गोव्यात पक्षाचे महाअधिवेशन भरले असताना, प्रथम मोदींच्या नावाचा गाजावाजा सुरू झाला. तेव्हा अडवाणी कमालीचे विचलीत झाले होते. दोन लोकसभा निवडणूका त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गमावल्या असतानाही, त्यांनाच २०१४ सालात आणखी एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी हवी होती. ती नाकारली जाण्याचे संकेत त्यांना गोव्यात मिळाले होते आणि त्यांनी तिथून तडकाफ़डकी दिल्ली गाठली. थोडक्यात आपला मोदींना विरोध असल्याचे त्यांनी अजिबात लपवले नाही. तरी तेव्हा मोदींना नेता केलेले नव्हते तर फ़क्त प्रचारप्रमुख नेमलेले होते आणि तरीही अडवाणी बेचैन झाले होते. तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे. यावेळी लोकसभेची उमेदवारी नाकारली जाणे, त्याचीच फ़लश्रुती आहे. त्यावर ब्लॉग लिहून भाष्य करण्याने अडवाणींनी स्वत:ला अधिकच हास्यास्पद करून घेतलेले आहे.

सर्वप्रथम देश आणि त्यानंतर पक्ष व शेवटी व्यक्तीगत आकांक्षा; असा मंत्र अडवाणी यांनी त्यातून दिलेला आहे. त्यात मोदींचे नाव कुठेही नसले, तरी त्यांचा सगळा रोख मोदींवर आहे, याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. पण ती स्थिती स्वत:वर अडवाणींनीच आणलेली नाही काय? वडिलधार्‍याने बापासारखा मोठेपणा घेतला, तरच मुलेही त्याला तितका मान देतात. बाप कधी मुलांच्या स्पर्धेत नसतो. पुढली पिढी किंवा शिष्यवर्ग वयात आला आणि पन्नाशीच्या पार झाला असताना; त्यांच्या वाटेत अडून बसण्यात कुठला मोठेपणा असू शकतो? पण अडवाणी अडवूनच बसले नाहीत, तर त्यांनी लहान मुलांना साजेसे रुसवेफ़ुगवेही केलेले होते. गोव्यातून दिल्लीला निघून आलेल्या अडवाणींनी नंतर पक्षातून सर्व पदांचे राजिनामे देऊन मोदींना सर्वात पहिला अपशकून केला. त्याचा उपयोग झाला नाही, तेव्हा एका समारंभात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोदी वाकले असताना अडवाणींनी त्यांच्याकडे मंचावर असतानाही पाठ फ़िरवली होती. हे सगळे कशासाठी चालले होते? याला वडीलधारेपणा म्हणता येईल काय? नंतर मोदींचा प्रचार सुरू झाला आणि तेव्हाचे तिकीटवाटप सुरू झाले, तेव्हाही अडवाणींनी केलेला खेळ विसरून चालणार नाही. ऐन तिकीटवाटप चालू असताना त्यांनी गांधीनगरपेक्षा मध्यप्रदेशातून उभे रहाण्याचा हट्ट धरला होता. त्यातून त्यांना सुचवायचे होते, की मोदी उभे करून पाडण्याची दगाबाजी करतील. त्यावेळी मोठेपणा कोणी दाखवला होता? मोदींनी अडवाणींना हव्या त्या जागी उभे रहाण्याची संधी दिली व जागेची निवड करायचा सुचवले होते. हा निव्वळ बालीशपणा होता. ह्या थराला जाणारा माणूस पुढल्या पिढीने आपला मान सन्मान राखण्याची अपेक्षा कशी करू शकतो? निकालानंतर व भाजपाला एकहाती बहूमत मिळाल्यावरही पाऊणशे वयमान उलटलेल्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्णय झाला आणि अडवाणींनी अशा वर्गाला हाताशी धरून खुप गडबडी केल्याच.

मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा, अरूण शौरी अशांना हाताशी धरून अडवाणी काय करीत होते? २०१५ सालात म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर वर्षभराने इंदिरा गांधींच्या आणीबाणीची चाळीशी आली. तेव्हा आताही देशात आणिबाणीसारखे वातावरण असल्याची मुलाखत देण्याचा उद्योग कोणी केला होता? त्याला शिष्याची पाठ थोपटणे म्हणतात, की त्याला अपशकून घडवणे म्हणतात? अशा रितीने अडवाणी वागत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवणे मोदींना कोणी अपरिहार्य करून ठेवले असेल? स्वबळावर भाजपाचा किंवा अन्य कोणी बिगरकॉग्रेसी नेता आजपर्यंत लोकसभेत बहूमत जिंकून आलेला नव्हता. मोदींनी ते कर्तृत्व गाजवले असेल, तर शिष्य म्हणून त्याची पाठ थोपटून त्याला प्रोत्साहन देण्यातून जगाला अडवाणींचा मोठेपणा दिसला असता. पण अडवाणी मोठ्यासारखे कधी वागले नाहीत, तर लहान मुलांसारखे खुसपटे काढून मोदींशी डाव खेळत बसले. मग शिष्याकडूनच पेचात पकडले जाण्याची नामुष्की त्यांच्या वाट्याला येत गेली. आताही आपल्याला नव्वदी पार केल्याने उमेदवारी मिळू शकणार नाही, हे ओळखून त्यांनी स्वत:च आधी माघार जाहिर करायला हवी होती. त्यातच मोठेपणा दिसला असता. पण अपमानित होण्याची हौस याही वयात कशी फ़िटलेली नाही, याचे नवल वाटते. गावस्करने निवृत्ती पत्करली, तेव्हा तो चांगला खेळत होता आणि अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर त्यालाही उत्तर देताना सुनील म्हणाला होता, ‘जात कशाला नाही’ असे लोकांनी म्हणेपर्यंत अंत बघू नये. हे गावस्करला चाळीशीपुर्वी समजले आणि अडवाणींन नव्वदीच्या पार गेल्यावरही कळलेले नसेल तर मोठेपणा कशात शोधायचा? वयामध्ये की बुद्धीमध्ये? इतके झाल्यावरही प्रसिद्धी वा चर्चेत रहाण्याची हौस किती असावी? अन्यथा आता ब्लॉग लिहून पक्षाविषयी तत्वज्ञान सांगण्याचे काही प्रयोजन नव्हते.

पक्षाची व देशाची इतकी थोरवी अडवाणींना आज समजली का? कारण १९९९ सालात त्यांनी उपपंतप्रधान व गृहमंत्री होण्यासाठी पक्ष व संघटना वार्‍यावर सोडून दिलेली होती. सगळेच नेते सत्तेत सामील झाले आणि भाजपाचे संघटनात्मक काम करायला कोणी नावाजलेला नेता शिल्लक राहिलेला नव्हता. बंगारू लक्ष्मण किंवा व्यंकय्या नायडू अशी बिनचेहर्‍याची माणसे अध्यक्ष बनवली गेली आणि हळुहळू पक्ष संघटना विस्काळीत होऊन गेली. त्यावेळी अडवाणींसारख्या गृहमंत्र्याची देशाला गरज नव्हती. त्यपेक्षा अधिक गरज त्यांच्या सारख्या संघटक नेत्याची पक्षाला गरज होती. सत्तेचा व्यक्तीगत मोह अडवाणी टाळू शकले असते, तर २००४ सालात नवख्या सोनियाजी भाजपाला धुळ चारून सत्तेपर्यंत पोहोचु शकल्या नसत्या. पण अडवाणींना तेव्हा देश व पक्षापेक्षाही व्यक्तीगत महत्वकांक्षा मोलाची वाटली आणि त्यांनी पक्ष वार्‍यावर सोडून मंत्रीपदाला प्राधान्य दिलेले होते. त्यातून भाजपाची जी घसरण झाली, त्यातून भाजपाला बाहेर काढण्याचे काम मोदी करू शकले तर त्यांच्याशी सहकार्य करायचे सोपे कर्तव्यही अडवाणी पार पाडू शकले नाहीत. मोदींना नेतृत्व मिळाल्यापासून आजपर्यंत पक्षाच्या कल्याणापेक्षा अडवाणी आपल्या व्यक्तीगत हेतूनेच काहीतरी करीत राहिलेले नाहीत काय? मोदींना शह देताना आपल्याच पक्षाला हानी पोहोचवणारी वक्तव्ये किंवा कृती कसल्या मोठेपणाची साक्ष असतात? ब्लॉगमधून राष्ट्र प्रथम आणि
पक्ष दुसर्रा असे मंत्र सांगणार्‍या अडवाणींना १९९९ सालात पक्षाचे स्थान दुय्यम वाटले आणि आज मोदींनी सावरलेल्या पक्षाला मात्र ते मंत्र सांगत आहेत. आपल्यालाच हास्यास्पद ठरवून घेण्याची ही हौस थक्क करून सोडणारी आहे. शरद पवार आणि अडवाणी स्वत:ला इतके केविलवाणे करून घेण्यासाठी का प्रयत्नशील असतात, हे खरे तर एक राजकीय कोडेच आहे. त्यांची आता कींव येऊ लागली आहे. कालाय तस्मै नम: हे त्यांना कधी कळायचे?

21 comments:

  1. खरच अडवाणींना राष्ट्रपती का केले नाही ते आता कळतेय.जर ते झाले असते तर रोज ममता,मायावती,सोनियापासुन सर्वांनी त्याच्याकडे पायर्या झिजवुन मोदींच्या तक्रारी केल्या असत्या.अडवानी पन रोज मोदींना जाहीर शिकवत बसले असते आणि ते फार विचित्र त्रासदायक झाल असत.ब्लाॅगवरुन कळतयच ते.

    ReplyDelete
  2. भाऊ इतके स्पष्ट आणि कुणीही लिहू शकणार नाही. मस्त. राम नाईकानी आदर्श घालून देऊन आदर कमावला. पण याना ते जमल नाही. वयस्कर बाजूला झाल्याशिवाय तरुण येणार कसे आणि संघटना तारुण्याने सळसळणार कशी? हे साधे तत्व समजत नाही याना. लिहून घ्या २०२४ ची निवडणूक जिंकून २०२५ ला मोदी हाही आदर्श घालून देतील. कारण ते खरेखुरे कर्मयोगी निर्मोही संन्यासी आहेत.
    श्याम मराठे

    ReplyDelete
  3. एके काळच उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःची किंमत इतकी का कमी करुन घेत ??
    नववदीन पार केली तरी हाव / मत्सर कमी होत नाहीत ??

    ReplyDelete
  4. सहमत.
    हे इतके परखडपणे कुणीतरी मांडायला हवेच होते.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. आज पहील्यांदा कुणी याविषयावर मूद्देसूद व परखड भाष्य केले.त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार भाऊ!

    ReplyDelete
  6. आस होऊ नये पण समजा अडवाणी आता expire झाले तर मोदी त्यांचा उपयोग करून घेतील का स्वार्थासाठी जसा वाजपेयीचा केला तसा ।

    ReplyDelete
  7. नियम हा आहे की वय वर्षे 75 नंतर सक्रिय राजकारण नको. त्यानुसारच हे सगळे चालले आहे.

    ReplyDelete
  8. मी तुमच्या मताशी १०० % सहमत आहे. राहूल गांधींनी " अडवानींना जोडे मारून खाली ढकलले " असे वक्तव्य केलेले आहे. तेंव्हा राहूल गांधींच्या त्या वक्तव्यावर तुम्ही लिहावे अशी मना पासून विनंती.

    ReplyDelete
  9. नेहमीप्रमाणेच मा. नरेंद्र मोदी यांची बाजू आपण कौशल्याने .हिरीरीने मांडली आहे .भाजपचे विरोधक आणि विशेषतः राहुल याना अडवाणींचा आलेला पुळका मतलबी आणि स्वार्थप्रेरित आहे ..सध्या तरी मा. मोदींना इतक्या स्पष्टपणे याबाबत बोलणे शक्य नाही त्यामुळे आपण बिनतोडपणे त्यांची काय बाजू असेल ते समजून व पत्रकाराला अत्यावश्यक असणाऱ्या इतिहासाच्या संदर्भ चौकटीत बसवून नीटसपणे लिहिले आहे . एवढे सगळे मान्य केल्यानंतरही दोन्ही बाजूच्या व्यक्तींनी यापेक्षाही चांगल्या सुसंस्कृतणे वागणे अशक्य नव्हते हे सत्य शिल्लक राहतेच . With charity towards all and malice towards none हे अब्राहाम लिंकनचे इतिहासात अमर झालेले शब्द आठवतात आणि ज्या भारतीय संस्कृतीचा उद्घोष आपण करतो त्यानुसार वागणे किती कठीण जाते ते कळते . जिंकल्यानंतर जेत्याने पराभूत झालेल्या स्वकियांशी कसे वागावे याचा लिंकनने घालून दिलेला आदर्श अधिक भारतीय आहे असे मला वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. ho.. malahi vatate ki yogya to man deun tyanna request karun bajula vhayla sangitale aste tar itki charcha jhali nasti..

      Delete
    2. Te tasaach sangitlela asnar.. pan lekhaat ullekh aalaay taashya vagnukichya mansane te changlya mansane ghenyachi shakyata kiti?

      Delete
  10. अत्यंत परखड विवेचन!

    ReplyDelete
  11. अगदी आमच्या मनातले बोललात भाऊ. तुम्ही जे बोलता ते अगदी जनमानसाची नाडी पकडूनच बोलता. फरक इतकाच आहे की आम्हाला ते शब्दात व्यक्तच करता येत नाही जी अद्भुत देणगी आपल्याला लाभलेली आहे

    ReplyDelete
  12. Best analysis of the leader of the Margadarshak Mandal of BJP. It's a pity that Advani ji has stooped down to petty bickering. It's unbecoming of a man of his stature. He should have held his head high and be proud of his progeny. But alas, Bharat has been cursed with good rulers having to bite the dust because of backstabbing and internal enemies.

    ReplyDelete
  13. भाऊ
    तुम्ही एवढे जळजळीत सत्य अधोरेखित केले आहे की खुद्द अडवाणी आणि पवार सुद्धा हा ब्लॉग वाचायचे धाडस करणार नाही त

    ReplyDelete
  14. अगदी योग्य समाचार भाऊ

    ReplyDelete
  15. अगदी योग्य समाचार भाऊ

    ReplyDelete
  16. आणि लोकांना प्रश्न पडतो हल्लीचे तरुण म्हाताऱ्यांचा सन्मान का करत नाहीत? ही पक्षा पक्षातील, घरा घरातील कहाणी आहे.

    ReplyDelete
  17. अत्यंत परखड व वैचारिक टिप्पणी. ज्या दिवशी कोणीही माणूस स्वतला इतरांपेक्षा फार मोठा व कर्तृत्ववान समजतो व अशी घमेंड त्याला येते त्या क्षणी तो सर्वात खुजा ठरतो हा इतिहास आहे. पण असा विचार फार कमी व्यक्तींना कळतो. जे खरे निष्काम कर्मयोगी आहेत त्यांनाच कळतो. राजकारणात माझ्या माहितीत एस.एम जोशी, डांगे, जयप्रकाश नारायण,सर्व संघ संचालकांना तो कळला व ते स्वतःहून दूर झाले. काँग्रेस मधे इंदिरा गांधींना कामराज योजना आणून दूर करावे लागले. तर इतर नेहरू व गांधींना काळाने ते शिकवले. हाच विचार व नियम मोदी व शहा ना पण योग्य वेळी उमजो.

    ReplyDelete
  18. महेश लोणेApril 9, 2019 at 10:18 AM

    मूद्देसूद व परखड लेख

    ReplyDelete
  19. उत्तम रचना परखड लेख.

    ReplyDelete