Thursday, November 28, 2019

नाट्य, पटकथा आणि राजकारण



गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक धक्कादायक वळणे घेतलेली आहेत. त्यामध्ये युती मोडून दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांसोबत गेलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकांनी बघितले. तसेच अकस्मात काकांना व राष्ट्रवादीला बगल देऊन भाजपाच्या गोटात गेलेले अजितदादा पवारही लोकांनी बघितले आहेत. भाजपा व अजितदादांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ८० तासांचे सरकार आपण बघितले आणि बहूमत सिद्ध करण्याचा विवाद सुप्रिम कोर्टात गेलेलाही आपण अनुभवला आहे. राज्यात अपुर्व अशा अतिवृष्टी व पावसाने धुमाकुळ घालून शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवलेले असताना, हा राजकीय खेळ चालू होता. त्यावर जनतेला काय वाटते याची कोणालाही फ़िकीर नसल्याचेही आपल्याला बघायला मिळालेले आहे. त्यामुळे लोककल्याणकारी सरकार वा लोकशाहीच्या पुस्तकी कल्पना बाजुला ठेवून, आपल्याला अशा घटनाक्रमाकडे बघणे आवश्यक आहे. एकप्रकारचा कुरघोडीचा खेळ आपण बघितला आहे. पण त्यातले अनेक वळसे कंगोरे समजून घेतले तरी लक्षातही येत नाहीत, इतकी त्यात जटील गुंतागुंत आहे. बातमीदारी वा कॅमेरा सर्व गोष्टी टिपून घेत असला, तरी त्यातून सर्व आशय आपल्यापर्यंत पोहोचतो असे नाही. यातली सर्वात धक्कादायक बाब अशी, की अजितदादांनी दगाफ़टका केलेला असूनही तोंडघशी पडलेल्या देवेंद्र फ़डणवीस वा भाजपा यांनी पवार मंडळींवर कुठलाही दोषारोप केलेला नाही. ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्युज आहे. पण त्याची फ़ारशी कुठे चर्चा उहापोह झालेला नाही. मग शंका येते, की काहीतरी वेगळ्या हेतूने हे अल्पायुषी सरकार बनवण्यात आले आणि हेतू संपताच मोडूनही टाकण्यात आले. बाळासाहेब ठाकरे युती वा आघाडी म्हणजे गाजराची पुंगी असे म्हणायचे. ही तशीच पुंगी होती काय? वाजवायची तितकी वाजवून झाल्यावर मोडून खाल्ली गेली आहे का? असेल तर ती पुंगी बनवणारे कोण व त्यांनी त्यातून काय साधले आहे?

शनिवारी सकाळी सर्वांना थक्क करणारा प्रसंग वाहिन्यांवरून प्रक्षेपित होत होता. आदल्या रात्री म्हणजे शुक्रवारी कॉग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार अशी बातमी पक्की झालेली होती. सकाळी घरोघर आलेल्या वृत्तपत्रामध्ये तशीच हेडलाईन होती. पण हाती पडलेले वर्तमानपत्र आणि वाहिन्यांवर झळकणारी बातमी; यात जमिन अस्मानाचा फ़रक होता. कारण शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेते अजितदादा पवार, भाजपाच्या देवेंद्र फ़डणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते. अर्थात त्यानंतर त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांचे भवितव्य आणि कल्याण यासाठी भाजपा व राष्ट्रवादी यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले असल्याची ग्वाही दिलेली होती. त्याच्याही पुढे जाऊन पाच वर्षे हे सरकार स्थीर चालेल, अशीही ग्वाही दिलेली होती. पण त्याविषयी खुद्द भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षाचे समर्थक अनुयायी देखील साशंक होते. सामान्य जनतेला तर यापैकी कशाचेही सोयरसुतक नसते. त्यामुळे माध्यमे व सोशल मीडियात धुमाकुळ चालला होता. मग फ़डणवीस, अजितदादा व अन्य पक्षातले लोक काय म्हणतात, त्यांचे आरोप प्रत्यारोप अशा बातम्यांचा पूर आला. रविवारी अशा सरकारला सुप्रिम कोर्टात आव्हानही दिले गेले. मंगळवारी सकाळी तिथे बहूमताविषयी निकाल आल्यावर अजितदादा यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. पाठोपाठ दोन तासात मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनीही आपल्या पदाचा राजिनामा देऊन विषय संपवून टाकला. हा सगळा घटनाक्रम होता, की घडवून आणलेले नाट्य होते? असेल तर त्याची पटकथा व संहिता कोणी लिहीलेली होती? त्यातून प्रत्येक पक्षाने नेमके काय साधले? कारण जसा घटनाक्रम दिसतो वा दाखवला जातो, तितकाच त्यातला आशय नाही. त्यात तर्काला वा बुद्धीना पटणार नाहीत, अशा अनेक जागा व गोष्टी आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले दोन पक्षनेते एकत्र आले, म्हणून चटकन राज्यपाल इतक्या घाईगर्दीने त्यांचा शपथविधी उरकायला दुधखुळे गृहस्थ नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या दोन नेत्यांसह राज्यपालांना असे काही घाईगर्दीने करायची मोकळीक राष्ट्रपती राजवटीने शिल्लक ठेवलेली नव्हती. म्हणजेच त्यात केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रपती अशा लोकांनी एकदिलाने काम करण्याची गरज होती. त्यांनी अवेळी ही कामे उरकली आणि भल्या सकाळी देवेंद्र व अजितदादा यांच्या शपथविधीचा मार्ग प्रशस्त केला. म्हणूनच ह्या सगळ्या घटनाक्रमाला राजकीय साहसकथाही मानता येत नाही. त्यामागे काही मोठी कथा किंवा महानाट्य दडलेले आहे. कारण हे सरकार दिर्घकाळ चालवण्यासाठी नसावेच. काही ठराविक गोष्टी राज्यपाल करू शकत नसतात आणि लोकनियुक्त सरकारच निर्णय घेऊ शकत असते. म्हणून मग अल्पजिवी का होईना; पण घटनात्मक शपथ घेतलेला मुख्यमंत्री आवश्यक होता. जोपर्यंत आपला म्हणजे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी पक्षाला व दिल्लीश्वरांना खात्री होती, तोपर्यंत इतकी घाईगर्दी झालेली नव्हती. तीन पक्षांचे सरकार जमणारच नाही, या आशेवर भाजपा बसलेला होता. थकूनभागून शिवसेना माघारी येईल आणि आपलेच सरकार पुन्हा मुख्यमंत्र्यासह येणार, अशी अपेक्षा होती. पण शुक्रवारी तिन्ही पक्षांचे नेहरू सेन्टरच्या बैठकीत एकमत झाले व त्यात उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सेना प्रवक्त्याने त्याला दुजोरा दिल्याच्या बातम्या माध्यमातून झळकू लागल्या. तिथे घटनाक्रमाने एकदम चमत्कारीक वळण घेतले. भाजपाचा आपलेच सरकार येणार हा ए प्लान होता. जेव्हा तोच कोसळताना दिसला, तेव्हा तात्काळ बी प्लान कार्यरत झाला. ज्याची सुत्रे दिल्लीश्वर हलवित होते. म्हणून राष्ट्रपती भवन, पंतप्रधान, गृहमंत्री एकाच वेगाने कामाला लागले. राज्यपाल व देवेंद्र यांच्यासहीत राष्ट्रवादीचे गटनेतेही बाकी गोष्टी बाजूला ठेवून त्याच कामाला हजर झाले.

वेगवान घडामोडींचा कालक्रम तपासण्यासारखा आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची पहिली बातमी आली. त्यानंतर अवघ्या बारा तासात देवेंद्र यांचा शपथविधीही उरकला गेलेला होता. बातम्यांमध्ये ‘रात्रीच खेळ चाले’ असल्या शेलक्या भाषेत त्यावर टिप्पणी झाली. पण त्यामागची कथा वा नाट्य शोधण्याचाही विचार झाला नाही. जणु हे सरकार राष्ट्रवादीतले आमदार फ़ोडण्यासाठीच रचले गेले आहे, असे मानून बोलघेवडे बाजार सुरू झाला. ऑपरेशन कमल असली बाष्कळ भाषा सर्वत्र ऐकायला मिळू लागली. पण सुत्रे व चक्रे इतक्या वेगाने कोण व कशाला फ़िरवतो आहे, त्याची शंकाही कोणाच्या मनात आली नाही. किंबहूना ह्या नाट्याचे जे कोणी सुत्रधार होते, त्यांना जनतेपर्यंत जे चित्र पाठवायचे होते, त्यात माध्यमांना यथासांग वापरले गेले. भाजपाची वा देवेंद्र यांची सत्तालालसा रंगवण्याची घाई प्रत्येकाला इतकी झालेली होती, की घटनाक्रमातील खाचाखोचाही बघायची इच्छा कोणाला नव्हती. ऑपरेशन कमल ज्याला म्हणतात, त्यामध्ये अन्य पक्षातून कोणाला फ़ोडलेले असेल, तर अशा नेत्याला त्याच्या मुळ पक्षातून आलेल्या कुणा दुताशी संपर्कही साधू दिला जात नाही. कर्नाटक विधानसभेतील नेते आमदार मुंबईला पळवून आणलेले असताना त्यांना भेटायचा आटापिटा इथल्या कॉग्रेसजनांनी केला होता. तिथले ज्येष्ठ मंत्री शिवकुमार आले तर त्यांचेही गाठोडे वळून मुंबई पोलिसांनी त्यांना विमानतळावर नेवून टाकलेले होते. पण या ऑपरेशन कमल मध्ये अजितदादा आपल्याच घरी बसलेले होते आणि त्यांना भेटायला एकामागून एक राष्ट्रवादी नेते व शिष्टमंडळांची रीघ लागलेली होती. कोणी पोलिस वा भाजपा नेता येणार्‍याला रोखत नव्हता. किती चमत्कारीक आहे ना? त्याहीपेक्षा गंमत म्हणजे तिकडे कोणी भाजपावाला फ़िरकतही नव्हता. पळवलेल्या नेत्यांना वा आमदारांना इतकी सुट दिली जाते काय? पण हे बघितले तर दिसू व समजू शकते. बघायचेच नसेल तर?

कुठल्याही चित्रपट, नाटक वा कथाकादंबरीत आपल्याला हवी तशी कथा सरकत नसते. किंबहूना आपल्या तर्कानुसार वा विवेकबुद्धीनुसार कथा पुढे जात नाही. त्यात अनेक वळणे आडवळणे येत असतात. त्यातली पात्रेही आपल्याला पटतील अशी वागत नसतात. जो कोणी लेखक असतो, त्याला हवी तशी पात्रे व त्यांच्या हालचाली, तो आपल्यासमोर पेश करीत असतो. आपल्या मनात प्रत्येक पात्र वा प्रसंगातून कोणती प्रतिक्रीया उमटावी, हे त्याने आधी ठरवलेले असते आणि त्यानुसारच लेखक पात्रे व प्रसंग लिहीत असतो. अशा कथेमध्ये जे आपण बघू नये ते शिताफ़ीने दडवलेले असते, किंवा अंधुक धुसर करून टाकलेले असते. परिणामी लेखक दिग्दर्शकाला अपेक्षित असते, तितकेच आपण पाहू शकतो. त्याच्या पलिकडले बघता येत नाही. चुकून आपल्या नजरेत काही गोष्टी आल्या वा खटकल्या; तरी त्याचा कुठलाही खुलासा आपल्याला मिळणार नसतो, इथेही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शनिवारी सकाळी अकस्मात हा शपथविधी झाला आणि भाजपाने त्यात पुढाकार घेतला, याविषयी शंका घेता येत नाही. त्यात अजितदादांवर देवेंद्र व भाजपाने विश्वास ठेवून पुढल्या हालचाली केल्या असे दिसते. किंबहूना इतके होऊन भाजपाचे नाक कापले गेलेले आहे. त्याचे एकमेव कारण भाजपाने अजितदादांवर विश्वास ठेवणे असेच दिसते आहे. त्यामुळे अजितदादांनी भाजपा व देवेंद्रना तोंडघशी पाडले, हे साफ़ कुणालाही दिसू शकते. पण त्यानंतर लगेच पत्रकार परिषदेत बोलताना फ़डणवीसांनी चुकूनही अजितदादांवर दोषारोप केलेला नाही. त्यांनी दगाफ़टका केल्याचा आरोपही केलेला नाही. ताज्या घटनेत ज्याने दगा दिला, त्यावर अगत्याने मौन पाळणारे फ़डणवीस; त्याच पत्रकार परिषदेत एक महिना आधीपासून शिवसेना व उद्धव ठाकरे कसे दगा देत गेले, त्यावर तितक्याच अगत्याने दोषारोपण करतात ना? यातला विरोधाभास कोणाच्याच लक्षात येऊ नये?

आता अपघात वा घातपात झाला आहे आणि त्यात दुखापत झालेली व्यक्ती त्या संदर्भात जबाबदार असलेल्यावर कुठलाही आरोप करीत नाही? पण महिनाभर आधी झालेल्या कुठल्या भांडणाला जबाबदार असलेल्यांवर दोषारोप करते, ही विचित्र गोष्ट नाही काय? उद्धव ठाकरे वा शिवसेना यांच्या असहकारामुळे युतीचे सरकार बनू शकलेले नाही. त्यामुळे असे सरकार बनून माघार घेतल्याने कोसळण्याची नामुष्की भाजपाच्या वाट्याला आलेली नाही. ती नामुष्की अजितदादांनी तीन दिवसाच्या सहवासात दिलेली आहे. पण त्याविषयी भाजपाचे व फ़डणवीस यांचे पुर्णपणे मौन आहे. मग त्याला दगाफ़टका म्हणायचे की विचित्र सहकार्य म्हणायचे? दादांच्या बाबतीत फ़डणवीस व भाजपाची प्रतिक्रीया ही उपकृत झालो, अशीच नाही काय? मग असा प्रश्न पडतो, की अजितदादांनी दोनतीन दिवसांसाठी भाजपाच्या सोबत येऊन कोसळणारे सरकार स्थापण्यामध्ये केलेली मदत, हे उपकार कशासाठी असू शकतात? याला जोडून आणखी एक प्रश्न आहे. शपथविधी झाल्यानंतर अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नेमके काय सरकारी काम केले? ते आपल्या भावाच्या वा नंतर दोन दिवस आपल्याच घरी बसून होते. मधल्या काळात एक दिवस त्यांनी विधानभवनाच्या परिसराला भेट देऊन यशवंतरावांच्या स्मृतीदिनाच्या सरकारी सोहळ्यात भाग घेतला. पण रस्ता ओलांडल्यावर असलेले मंत्रालय वा सरकारी कार्यालयात जाण्याची तसदी त्यांनी अजिबात घेतली नाही. शपथविधी उरकल्यानंतर फ़डणवीस मात्र अखंड कार्यरत होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्विकारला आणि अनेक विषय निकालातही काढले. पण अजितदादा पदभार स्विकारायलाही मंत्रालयाकडे फ़िरकले नाहीत. मग त्यांनी शपथविधी कशाला उरकला होता? निव्वळ देखावा पार पाडण्यासाठी ते औपचारिकरित्या तिथे हजेरी लावायला गेले होते काय? दोन दिवसासाठी भाजपाचा मुख्यमंत्री अधिकृतपणे काम करील, त्याच्या अधिकाराला अधिकृत ठरण्यासाठीच्या सरकार स्थापनेतील अजितदादांचे पात्र हे निव्वळ नेपथ्यरचनेचा भाग होते काय?

पुर्वीच्या काळात सरकारमध्ये बिनखात्याचे मंत्री असाही एक प्रकार असायचा. म्हणजे एखाद्या मंत्र्याकडून खाते काढून घेतले जायचे व पुढले काही खाते मिळण्यापर्यंत त्याला मंत्री म्हणूनही राखले जायचे. किंवा अन्य कुठलाही विषय त्याच्याकडे सोपवला जायचा. अशा मंत्र्याला बिनखात्याचा मंत्री संबोधले जायचे. त्या ८० तासात अजितदादांनी त्यापेक्षा कोणती वेगळी भूमिका स्विकारली? निरर्थक मंत्रीपद वा अधिकारपद घेऊन त्यांनी मिळवले काय? काहीकाळ गद्दारीचा शिक्का व पाठीराखे वा अनभिज्ञ कार्यकर्त्यांचे शिव्याशाप? राजिनाम्यानंतर वा सरकार कोसळल्याचे वृत्त आल्यानंतर काही तासातच अजितदादा काकांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर निवांत पोहोचले. जणु मधल्या तीन दिवसात काही घडलेलेच नाही अशा थाटात काकांनी पुतण्याचे स्वागत केले. बुधवारी भगिनी सुप्रियानेही विधानभवनात थोरल्या दादाला अशी गळाभेट दिली, की मधल्या दोनचार दिवसाचा सूर्यही उगवलेला नसावा. अर्थात सुर्य उगवला होता आणि मावळलाही होता. पण हे आधुनिक महानाट्य लिहीणार्‍या वा त्याचे सादरीकरण करणार्‍यांना सुर्य उगवलेला दाखवायचा नव्हता. दिसला तरी बघू द्यायचा नव्हता. मंचावर वा पडद्यावर घडणारे नाटक आपण बघत होतो. पण पडद्यामागून सुत्रे हलवणार्‍यांचा चेहराही आपल्याला दिसलेला नाही. आपली गोष्ट सोडा. आपण घरात बसून वर्तमानपत्र वाचतो किंवा टिव्हीवरच्या बातम्या बघतो. त्यासाठी कॅमेरा घेऊन धावणार्‍यांनाही मधल्या चार दिवसात उगवलेला सूर्य बघता आला नाही. कारण त्यांना रात्रीच खेळ चाले मालिकेतली भुताटकी भयभीत करीत असते. त्यातले विरोधाभास बघायची भिती वाटते. घटनाक्रमातले वळसे आडोसे दिसत नाहीत. खरे तर माध्यमांना, संपादकांना किंवा भाष्यकारांनाही कोणीतरी जे दाखवतो तितकेच बघायची हिंमत आहे. त्यापलिकडले बघणे वा त्यावर बोलण्याचीही भिती वाटत असते. अन्यथा अजितदादांविषयीचे देवेंद्रचे मौन वा धाकट्या पवारांचे बिनखात्याचे मंत्री असणे, नक्की खटकले असते. त्यांनी आपल्याला समजावले असते ना?

54 comments:

  1. बुलेट ट्रेन चा जपानी कर्ज निधी परत केंद्राकड़े वर्ग केला फड़णविसांनी आणि राजिनामा दिला. हा बुलेट ट्रेनचा कर्जाचा डोंगर शेतकरी कर्जमाफी च्या नावाखाली नविन कड़बोळे सरकारने गड़प केला असता.

    ReplyDelete
  2. पण या सर्वांचा अर्थ काय भाऊ

    ReplyDelete
  3. Inside story about yesterday's events (not from Whatsapp Uni, but some friends in high places):
    Around Monday, SS/NCP/INC announced that they'll run a farm loan waiver scheme upon coming to power. Sonia wanted this scheme as one of her top-priority CMP items
    This loan waiver scheme will redirect funds from the Mumbai-Ahmedabad HSR project
    The special purpose vehicle implementing the HSR project was recently flush with central funds that are under the control of a MH state government-owned entity
    Essentially, hard-earned tax money from the centre meant for an interstate project would be spent on Sonia's project (enriching Congress)
    The HSR project was one of Modi's tier-1 pet-projects / prestige projects
    Modi was very angry. More angry than than after Pulwama. Possibly the angriest since 2014. He threw a major tantrum in front of Amit Shah
    Sharad Pawar was told "appear before Modi on Wednesday or your entire family will be arrested before nightfall." He ran to Delhi
    Modi told Pawar "give me government in MH, or there will be dire consequences" (he then presented his leverage to Pawar, which spooked him to no end)
    Pawar told him he can have the government, but he doesn't want to destroy NCP, and doesn't want sudden changes to the alliance, else INC will never trust him in the future
    Pawar then told Modi that he will ask Ajit to break away enough MLAs from his party to satisfy anti-defection law, so Amit Shah could cobble up the rest from independents and Shiv Sena renegades, and cross 145 on the floor of the Assembly. The "unauthorized" drama since yesterday is part of Sharad Pawar's deception
    What will happen next:
    As a contingency plan, Centre has ordered Maharashtra-based SPVs in control of central funds to redirect funds back to the centre. There is a massive transfer of capital that's taking place / has taken place
    Maharashtra exchequer will be drained to bare-minimum levels, just so any farm-waiver scheme will be literally impossible to implement. PSBs have been ordered not to sanction any loans to the MH government without seeing an improvement in the state's books
    SC will order a floor test to take place on Tuesday-Wednesday
    Fadnavis will fail the test, government will fall, NCP-ShS-INC will form a government in the days to folllow.
    The new government will find that it has barely any money to pay salaries, let alone run social welfare schemes
    Amit Shah will repeat Karnataka, and this government will fall in the next 3 or so months; with BJP returning to power
    If it looks like NCP-ShS-INC has dug in and the government won't fall, then Amit Shah will gerrymander separate Vidarbha and Marathwada states in the next Parl session. Vidarbha will see a BJP consolidation; and Marathwada statehood will throw key Congress leaders out of residual Maharashtra.

    - TarunRaju from DFI

    ReplyDelete
    Replies
    1. I don’t understand: why could Fadnavis not do this earlier itself, after the elections while he was the serving CM? Did he assume that the CM post was in his pocket? That was overconfidence but frankly I don’t think he is that stupid.

      Does this not point at a bit of bad planning on his part?

      This question potentially brings down this whole theory.

      In any case, proof of the pudding is in eating it. Therefore, in days to come, we shall see if the new government can scramble up funds from anywhere for this purpose. That will be a proof to the above theory.

      Delete
    2. Most likely BJP/Fadnavis thought that they would be able to convince SS to form a government with Fadanvis as the CM. I read that he couldn't transfer funds after he resigned as the CM, and had to be sworn in before he could touch them. Most likely Ajit Pawar, Sharad Pawar, Modi/Shah/Fadanvis knew the agenda and were making it work without making it seem they're working together. I'm not sure if INC bought this plan/argument - these politicians aren't stupid. Other possibility is that the "funds" was the only reason that was "leaked" but the reality might be that Fadanvis might have transferred some evidence to the central government that will help them keep the scams in check going forward. Who knows...

      Delete
  4. अचूक निरीक्षण आणि योग्य विश्लेषण

    ReplyDelete
  5. दीड दिवसाचा गणपती , स्वतःचे हाताने करवून  घेऊन , पटकन मुख्यमंत्री बनून, स्वतःचा इतका  कचरा कोण करून घेईल. हि माणसे मूर्ख नाहीत , काहीतरी मोठी गेम झाली असणार. कोणता फंड केंद्र सरकार कडे वर्ग केला. २४  तासात . पवार, मोदी, शहा किती आतून एक आहेत  हे  समजेल  दादा, आणि देवेंद्र लिंबू टिंबू आहेत. रिकामी तिजोरी, कर्जाचा डोंगर ( होताच) तोच  ठेवला आहे मागे. १९४७  साली ब्रिटिशांनी असेच चंद्रमौळी घर नेहरूंचे हाती दिले होते.  करा राज्य. हा विचार ऐकला, कोणी तज्ञ खरे सांगेल का का फक्त राष्ट्रपती राजवट येन केन प्रकारें उठवायची होती. 

    ReplyDelete
    Replies
    1. If Pawar Modi Shah are working in unison then which one of the following is true?
      — Pawar has cleaned up his act
      — Modi Shah are as corrupt as Pawar
      — Pawar is Sonia’s frenemy but in reality BJP’s B team (and why would he be that if he cannot continue his activities unchecked?)
      — BJP SS have truly broken up and Pawar is the new friend. But if this were the case then why would so many NCP folks feel the urge to defect to BJP?

      Delete
  6. काही राहून गेलेली महत्वाची कामे उरकण्यासाठी दादांनी सहकार्य केले ?

    ReplyDelete
  7. भाऊ सगळा घटना प्रसंग आकलना पलीकडे आहे , थोडे विस्तृत सांगू शकाल का ?

    ReplyDelete
  8. देवेंद्र यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री व ८० तास मुख्यमंत्री या दोन टप्प्यांमध्ये काम केले,८० तास मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात नक्की काय काम केलं हे गुलदस्त्यातच आहे. महाराष्ट्राचे निधी वळवण्यात आले का? घर जळत असेल तर माणूस पहिल्यांदा सोनेनाणे घेवून बाहेर पडतो.मुख्यमंत्री नक्की काय घेऊन बाहेर पडले.

    ReplyDelete
  9. देवेंद्र यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री व ८० तास मुख्यमंत्री या दोन टप्प्यांमध्ये काम केले,८० तास मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात नक्की काय काम केलं हे गुलदस्त्यातच आहे. महाराष्ट्राचे निधी वळवण्यात आले का? घर जळत असेल तर माणूस पहिल्यांदा सोनेनाणे घेवून बाहेर पडतो.मुख्यमंत्री नक्की काय घेऊन बाहेर पडले.

    ReplyDelete
  10. Rajani Rath
    Folks...Maharashtra was not a miscalculation or mistake as we think. It was a planned and calculated decision. Why ? Read this.

    There are huge funds in Maharashtra government accounts, deposited as part of funds for Bullet train. Centre, Maharashtra and Gujarat control these funds. Sonia wanted to divert these funds for Farmer loan waiver though Japan wouldn't have agreed. But Japan cannot stop Maharashtra CM if he wants to go ahead. That would abort the Bullet train project. It will help Congress to siphon off funds in the name of waivers.

    Fadnavis was care taker CM till 22 and he could not have transferred the money to central funds. So he struck a deal with Ajit Pawar (Shah Modi gameplan) and produced letters of support of 159 MLAs through party chiefs. That's why the emergency swearing in. He has transferred almost all the money to central funds, making it impossible for new government to touch the funds.

    He have resigned now but they have prevented the Congress from poaching into Bullet train project. Sonia's insistence in her CMP was Farmer's loan waivers (the easiest way to scam, like they did in Karnataka and MP) and stop Modi's dream project of Bullet train.

    So it was for a cause. Ajit Pawar didn't know all this and thought he can become Deputy CM. In these 3 days, Fadnavis has finished the designated job. Now the Triplets can screw themselves......

    ---Anil Mehta---

    ReplyDelete
  11. भाऊ भुजबळ यांनी 1991।मध्ये शिवसेना।सोडून।काँग्रेसमध्ये प्रवेश केला।तेव्हा त्याना रात्रीची।शपथ दिली होती का? अशा

    ReplyDelete
  12. Bhau, you have aroused the interest further on this thrilling, mysterious chain of Maharashtra politics that had taken place few days ago. Do you mean that something fishy unexpected, has been cooked and being concealed from us. What could be that ? Can you hint us?

    ReplyDelete
  13. अल्पकाळ सरकार का ही शंका मनात आली तुमचा लेख वाचल्यावर खात्री झाली की काहीतरी घडलय. पण काय ते समजत नाहीये.

    ReplyDelete
  14. खरे तर माध्यमांना, संपादकांना किंवा भाष्यकारांनाही कोणीतरी जे दाखवतो तितकेच बघायची हिंमत आहे. त्यापलिकडले बघणे वा त्यावर बोलण्याचीही भिती वाटत असते. अन्यथा अजितदादांविषयीचे देवेंद्रचे मौन वा धाकट्या पवारांचे बिनखात्याचे मंत्री असणे, नक्की खटकले असते. त्यांनी आपल्याला समजावले असते ना?
    मग तुम्ही समजून सांगायचं न

    ReplyDelete
  15. आजच्या सोनिया गांधी यांच्या वक्तव्यशी याचा संबंध असावा असे वाटते.

    ReplyDelete
  16. नेमका हाच प्रश्न काही दिवसापासुन सतावत होता पण कारण असेही असू शकते की सिंचन व इतर घोटाळ्याच्या फाईल्स ज्या आता नष्ट होवू शकतात त्या या तिन दिवसात त्याचा निपटारा केला आसू शकतो.त्यामूळे जरी सरकार नसले तरी ईडी व सी बी आय मार्फत सरकार वर वचक ठेवू शकता येईल किंव्हा मुंबई गुजरात बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जो आता नविन सरकार बंद करुन तो निधी इतरत्र वापर करतील या भितीने त्या निधीचा योग्य विल्हेवाट तर लावली नसेल का? असो या नविन आघाडीत आत्ताच पदावरुन बिघाडी सुरु झाली आहे व हे सर्व आपण किती दिवस पाहत बसायचे हाच प्रश्न आहे.

    ReplyDelete
  17. भाऊ, माझे तर डोकेच चालत नाही. दादासारखा बदल भरवश्याच्या माणसाला घेऊन शपथविधी अचानक उरकला. नंतर हॉटेलमध्ये तीनचाकी शपथविधी उरकला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पाठोपाठ दोघानीही राजिनामा दिला, पैकी दादानी कारण पण दिले नाही व फडणवीसांनी दोषारोप फक्त शिवसेनेवर केला. मधल्या ८० तासात शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची मदत ५००० + कोटीची मदत जाहीर केली. बस.. पण मग फडणवीसांनी आणि भाजपाने हा आततायीपणा का केला? काही महत्वाची कामे मार्गी लावली का की जी येणारे सरकार फिरवू शकणार नाही? की अजून काही? भाऊ, आपल्याला काही खुलासा होतोय का?

    ReplyDelete
  18. Bhau tumhi kahi prakash taka na?

    ReplyDelete
  19. मला पण हेच खठकल की दादा लगेच मागर का गेतली
    बीजेपी core meeting झाली नतर. कारण दादा BJP meeting होते

    ReplyDelete
  20. Kahitarich kay bhau? Evdhe upatsumbh dhande karun tond kaal karanypeksha ss la dyayach hot 2.5 yrs CM post. Aani pahili 2.5 warsh aapalyakad theun je ky 3 diwasat kele te karayach hot. BJP IT cell is working overnight to justify midnight theft on maharashtra (the banana republic? )

    ReplyDelete
  21. भाऊ महाराष्ट्रातील माध्यमातील पत्रकारांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, आज समाज माध्यमातून लोकं यांना उघड उघड शिव्या घालत आहेत, जो कोणी संघ भाजपचा द्वेष करेल त्याची उघड उघड बाजू घ्यायची हा यांचा धंदा झाला आहे, भाऊ अशीच स्थिती काही वर्षांपूर्वी हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पत्रकारांची झाली होती, मोदी द्वेष हाच एककलमी कार्यक्रम या मंडळींचा झाला होता, अशा वेळी अर्णब गोस्वामी नावाचा एक पत्रकार उभा राहिला, टाइम्स नाऊ मधली नोकरी सोडून रिपब्लिक नावाचे चॅनेल या अर्णब गोस्वामी याने काढले आणि मोदी विद्वेषाच्या विखारी प्रचाराला कंटाळलेल्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद या नवीन चॅनलला मिळाला आणि आधीच्या प्रस्थापित चॅनेल्सचे अक्षरशः दिवाळे निघाले, आज या हिंदी इंग्रजी माध्यमातून मोदी द्वेष पूर्ण पणे गायब झाला आहे, आजच्या घडीला मराठी चॅनेल्स अक्षरशः किळसवाणी झाली आहेत, मात्र रिपब्लिक सारखा एखादा पर्याय पुढे येईल तेव्हा मात्र यांची पळता भुई थोडी होईल.

    ReplyDelete
  22. पण उपमुख्यमंत्री करण्याची काय गरज होती?

    ReplyDelete
  23. भाऊराव,

    एकंदरीत उद्धवाचं अजब सरकार बन(व)लंय ते काका पवारांना पैसा खायला मिळावा म्हणून. एकदा का निवडणुकीपुरता पैसा गाठीशी लागला की उद्धवांचं सरकार कोसळेल. अशा वेळेस काका पवारांचे पर्याय काय असतील त्याची माझ्या मते यादी अशी असेल :

    १. सुप्रियाताई सोबत पुरेसे आमदार घेऊन परत एकदा भाजपच्या दिशेने उड्डाण करतील. मग मुलायम सिंगांनी जशी आपल्या पोराकडे म्हणजे अखिलेशकडे पक्षाची सत्ता सोपवली तसं काहीसं नाटक घडवून थोरले पवार सुप्रियाताईंना वारस बनवतील. (कदाचित अजितदादाही वारस बनू शकतात.) मुलायमसिंगांचं नाटक इथे आहे : http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_75.html

    २.१ किंवा काका शिवसेना फोडतील. त्यासाठी ३८ आमदार हवेत. इतके गोळा करणं कठीण आहे. पण अशक्य नाही. अर्थात फुटलेले आमदार भाजपवासी होतील.
    २.२ किंवा सेनेचे फुटलेले आमदार राष्ट्रवादीवासी होतील. अशावेळेस लगेच राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा घोषित करेल.

    ३.१ किंवा मग काका सरळ काँग्रेसचे ४४ पैकी ३० आमदार फोडून त्यांना भाजपवासी करतील. मग भाजपकडे १३५ आमदार होतील. उरलेले १०-१२ अपक्ष सहज मिळू शकतात.
    ३.२ किंवा मग काका सरळ काँग्रेसचे ४४ पैकी ३० आमदार फोडून त्यांना आपल्याकडे खेचतील. मग राष्ट्रवादीकडे ८४ आमदार होतील. अशावेळेस लगेच राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा घोषित करेल.

    ४.१ किंवा काका भाजप फोडतील. हा सर्वात खतरनाक पर्याय आहे. जर भाजपला येत्या काही विधानसभा निवडणुकींत मार खावा लागला ( बिहार? ) तर काकांचं धार्ष्ट्य बळावेल. फुटलेले ७० आमदार अर्थात राष्ट्रवादीत. हा जवळजवळ अशक्य आकडा आहे.
    ४.२ किंवा काका भाजपचे फक्त ३० एक आमदार फोडून त्यांना अपात्र ठरवतील. हा बऱ्यापैकी शक्य आकडा आहे. मात्र यासोबत मध्यावधी घोषित झाल्या पाहिजेत. अन्यथा हा पर्याय निरर्थक आहे.

    पहिल्या ३ पर्यायांत फुटलेले आमदार भाजपवासी झाले तरी फडणवीस परत मुख्यमंत्री व्हायला काकांचा विरोध असेल. बहुतेक काका गुंगी गुडिया म्हणून पंकजा मुंडेंचं नाव सुचवतील.

    हे सगळं घडंत असतांना उद्धव काय करतील, हा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी मध्यावधी निवडणुका घेऊन सेनेने स्वबळावर २८८ जागा लढवणे हाही एक पर्याय आहे. मात्र सध्यातरी आपले ५६ आमदार सांभाळणे हीच मोठी कसरत आहे. उद्धव यांची खरी परीक्षा आता सुरु होते आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  24. भाऊ आपण वर फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या मुख्यमंत्री होण्याचा जो विषय केला आहे त्या संदर्भात समाज माध्यमातून अनेक पोस्ट फिरत आहेत, त्यात मध्यवर्ती असा आशय आला आहे की केंद्र सरकारने बुलेट ट्रेन आणि मेट्रो करिता जो निधी राज्य सरकारच्या खात्यात वर्ग केला होता तो देवेंद्र फडणवीस यांनी परत जसाच्या तसा केंद्र सरकारकडे परत पाठवून दिला आणि त्यासाठी हे तीन दिवसाचे मुख्यमंत्री पद वापरले गेले अर्थात यातले खरे किती हे समजायला मार्ग नाही मात्र आपण वरती जो उल्लेख केला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा यांच्या संदर्भात एक अवाक्षर देखील काढले नाही आता या मागे काय असावे याचे आकलन होण्या साठी फुटक्या कवडी इतकी देखील अक्कल या माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांना नाही, कदाचित त्यामुळे देखील उदय निरगुडकर यांच्या सारखी निःपक्षपाती व्यक्तीने या चॅनेल्सना राम राम ठोकला असावा

    ReplyDelete
  25. At your classic best...namaste Bhau....am Your Gr8 Fan

    ReplyDelete
  26. Bhau,
    Tumhcya pudhil lekha madhye apan Ha khel nakki Kay zala, Kuni kela asawa hyabaddal amhala sangawe.
    Ha sagla Sharad Pawarancha plan hota ka?
    Mukhya mahnje hyatun Sharad Pawaranni nakki Kay sadhale??

    Dhanyawaad

    ReplyDelete
  27. You all know what Hanuman Ji did when he went to Lanka, The same was done by @Dev_Fadnavis in last 80 hrs as CM

    Rest time will tell

    Jai Shri Ram

    ReplyDelete
  28. विश्लेषण उत्तम पण हे सर्व नाट्य कशासाठी केले यावर तुमचे मत काय? की यात नक्कीच काही तरी वेगळे आहे हे शपथविधी चे सकाळी घेणे य मागे नक्कीच मोठे कारण आहे

    ReplyDelete
  29. भाऊ मग तुम्ही च या मागे असलेले महानाट्य सांगा

    ReplyDelete
  30. काहीतरी मोठं दडलंय यात... अधीर झालेल्या उद्धव यांच्या बाबत काहीतरी करण्याबाबत चा डाव वाटतो... राजकीय गोष्टी बद्दल आहे हे... त्यात आधीच हे सरकार मूळ नक्षत्रावर जन्मले आहे.उद्धवरावांच्या सेनेच्या मुळावर नाही आले म्हणजे मिळवले.

    ReplyDelete
  31. शपत विधी आणि राजीनामा यामागचे कारण खाते वाटपाच्या वेळेस कळेल?

    ReplyDelete
  32. भाऊ, आपल्या लेखात तथ्य नक्कीच जरूर आहे. पण ते कुठले विषय फडणवीस सरकारने निकालात काढले आणि काय केले त्यावर जरा विवेचन केल्यास हा गुंतागुंतीचा खेळ समजायला मदत होईल. एक बातमी दिसली ती म्हणजे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही पॅकेज दिले. पण केवळ एवढेच करून भाजप गप्प बसली असेल असे वाटत नाही - किंबहुना ह्यासाठी केवळ फडणवीसांनी चपळाईने हालचाली केल्या असतील असेही वाटत नाही.

    आणखी, अजितदादांवरचे नऊ सिंचन गुन्हे माघारी घेतले अशीही एक बातमी होती पण नंतर त्यावर प्रतिक्रिया झाली की ते गुन्हे मुळात अजित दादांच्या नावावर नव्हतेच. तरीही ह्यासाठी अजितदादा घाईघाईने उपमुख्यमंत्री बनले असतील हे समजू शकतो पण फडणवीसांना त्यांना मुक्ती द्यायची इतकी घाई का हे कळायला मार्ग नाही. ह्याशिवाय हे गुन्हे उद्धव यांचे सरकारही सहजासहजी मागे घेऊ शकते त्यामुळे ह्यासाठी अजितदादांनी इतका मोठा पक्षबदल केला असेल असे वाटत नाही.

    थोडक्यात, असे काय निर्णय घेतले की ज्याचा दूरगामी परिणाम पुढच्या राजकारणावर होईल? आघाडी सरकारच्या खुर्चीखाली विस्तव तर नाही ना पेटवून ठेवला?

    दुसरे म्हणजे, अजितदादांची पक्षप्रमुख म्हणून हकालपट्टी. आता पुन्हा त्यांची नियुक्ती कधी आणि कशी होते ते बघायला पाहिजे.

    तिसरे, अजितदादा हा आलटून-पालटून बदल करणारा मोहरा, हे ह्यातून सिद्ध झाले आहे. आता फक्त हे ते स्वतः करताहेत की काकाजींच्या इशाऱ्यावर चालते आहे हेच पाहायचे. काकाजींच्या इशाऱ्यावर असते तर काकांना इतका खर्च करून आमदारांना हॉटेलमध्ये वगैरे डांबून ठेवण्याचे कारण नव्हते. ह्याचा अर्थ, अजितदादांच्या हातात अशी काही चावी आहे ज्याचा वापर करून ते सगळ्यांनाच नाचवताहेत.

    ता. क. उद्धवांनी खुर्ची पकडल्या पकडल्या पहिले काय केले असेल तर रायगडाचा जीर्णोद्धार. जरा त्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे काही केले असते तर चालले असते. रायगड हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे ह्यात वाद नाही पण स्वतः छत्रपतींनीही पुराने बेजार झालेल्या जनतेकडे दुर्लक्ष करून आपल्या वाड्याचा जीर्णोद्धार केला असता का?

    ReplyDelete
  33. भाऊ ह्या घटनेचा एक नवा पैलू समोर आणलात. व्वा व्वा. ह्याबद्दल विचारच आला नाही.

    ReplyDelete
  34. भाऊ हे जे काही तुम्ही लिहिलंय ते फार गंभीर आहे.
    तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की? थोडं स्पष्टपणे मांडावे.

    ReplyDelete
  35. Bhau,
    Very good analyses.
    Can you please respond, as which one of following hypothesis is more likely to be true?

    1. Sharad Pawar planted Ajit Pawar, to bring down BJP's credibility, as BJP had taken a high road earlier.
    2. Ajit Pawar, overestimated himself, went with BJP. BJP too overestimated his prowess and fell on face. So whatever happened, was an accident and miscalculation.
    3. As suggested by you, "someone" planned this out (BJP+NCP may be), and coming months/years will show the effect of this game.

    Awaiting your response!

    ReplyDelete
    Replies
    1. दीड शहान्या मराठीत बोलायची लाज वाटते का की मराठीतच विचार करतो तु?

      Delete
    2. I think 3rd option...

      Delete
  36. जे काही म्हणायचे आहे ते नेमकेपणाने लेखात मांडायला हवे. आडून आडून बोलत काहीतरी खास गुपित आपल्याला माहिती आहे अशा थाटात फक्त धुरळा उठवून दिला आहे. टीव्ही आणि तत्सम माध्यमांना नुसत्या शिव्या घालून काय साधणार आहे. जी व्यक्तिपूजा आणि अतिरिक्त नाट्य तुम्ही ब्लॉग वर रंगवता तीच tv वर असते. तुमच्याकडून तथ्यावर आधारित लेखांची अपेक्षा आहे. ह्या टीकेचा आपण विचार करावा.

    ReplyDelete
  37. दोन दिवस विडिओ येईल म्हणून शोधत होते,,,

    ReplyDelete
  38. नक्की म्हणायचं के आहे ते सांगितलंच नाही

    ReplyDelete
  39. In direct effect of BJP's growing strength.Effort to servive.All heterogeneous phylosofy can not move long,since individual ambition to grow more will dissolve it soon.

    ReplyDelete
  40. भाऊ, मी टीव्ही पाहणं च सोडलाय. तुमचे लेख वाचतो फक्त.

    ReplyDelete
  41. Chaan assessment aahe Bhau ....
    Tumhi mhanta tasa doubt baryach lokanna aala asnaaar ....
    Aabhaari aahe

    ReplyDelete
  42. अजून एक गोष्ट, शरद पवार पण भाजप विरोधात बोलत नाही आहेत

    ReplyDelete
  43. भाऊ अजून एक गोष्ट म्हणजे न्यायालयाने देखील या 4 दिवसात वेलकाढूपणाची भूमिका घेतली.
    कर्नाटकात हेच दुसऱ्या दिवशी निकाल येऊन सरकार पडले देखील होते.

    ReplyDelete
  44. भाऊकाका वंदन तुम्हाला

    ReplyDelete
  45. पण अजित पवारच का?

    ReplyDelete