Monday, April 20, 2020

पालघरचा इशारा: समजणार्‍यांसाठी

Three men including two sadhus lynched to death in Maharashtra's ...

माझ्या ‘जागता पहारा’ या ब्लॉगवर अनेक लेखातून मी वारंवार झुंडीच्या मानसशास्त्राचे दाखले देत असतो व उहापोह करीत असतो. कारण कुठल्याही सजीव प्राण्यामध्ये जी उपजत बचावाची वा त्यातून उसळून येणार्‍या आक्रममतेची प्रवृत्ती असते; ती मुलत: पाशवी असते. तिच्या आहारी मानव समाज वा मानवी समुह गेले, तर त्यांना कायद्याच्या मर्यादेत राखणे अशक्य होऊन जात असते. म्हणूनच कायद्याचे राज्य टिकवायचे असेल वा परिणामकारक राखायचे असेल, तर मानवातील ही आदीम मानसिकता उफ़ाळून येणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. पण बहुधा राजकीय नेते वा मतलबी लोक आपले कुटील हेतू साध्य करण्यासाठी अशा पाशवी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे उद्योग करीत असतात. मात्र आपला मलतब साध्य झाला, मग त्या पशूला मोकाट सोडून पळून जात असतात. पालघरची घटना त्याचाच पुरावा आहे आणि देशाच्या विविध भागात कोरोना बाधितांना शोधून त्यांना इस्पितळात घेऊन जाण्यासाठी आलेल्या पथकावर होणारे हल्लेही त्याचेच परिणाम आहेत. ज्यांनी आधीच्या काही वर्षात आपल्या राजकीय हेतूने या पाशवी मानसिकतेला खतपाणी घातले, ते आता त्यानेच अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्यावर फ़रारी झालेत. आपापल्या सुरक्षित बिळात दडी मारून बसले आहेत. मात्र त्याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला व शासकीय व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. पण आपल्याला दिसत आहेत, ते दुष्परिणाम निव्वळ हिमनगाचे टोक मानले पाहिजे. कारण १३० कोटींच्या देशात अशा घटना व प्रसंग किरकोळ आहेत. पण ही मानसिकता वणव्यासारखी सर्वदुर पसरण्याची स्थिती सध्या देशात सर्वत्र आहे. सुटणार्‍या वार्‍याबरोबर वणवा कुठेही कसाही पसरत जातो. त्याला वाटेत काय येते त्याची पर्वा नसते किंवा जाण नसते. त्यापेक्षा ही झुंडीची मानसिकता किंचीतही वेगळी नसते. पालघरने दिलेला तोच गंभीर इशारा आहे.

मागल्या दोनचार वर्षापासून आपण सातत्याने कुठल्याही राज्यात वा जिल्ह्यात अशा जमावाच्या हिंसाचारातून झालेल्या हत्याकांड वा मारहाणीचे नको तितके राजकारण होताना बघितले आहे. दिल्लीनजिक दादरी नावाच्या गावामध्ये अखलाख नावाच्या एका मुस्लिमाची जमावाने गोमांस खाण्याचे निमीत्त शोधून हत्या केली होती. त्याचे नको तितके राजकीय भांडवल करून पुरस्कार वापसीचा तमाशा उभा करण्यात आला होता. त्यातून सत्ताधारी भाजपाला व हिंदूत्वाला बदनाम करण्याचा राजकीय हेतू साधला गेला. तिथेच हे प्रकरण थांबलेले नाही. मध्यंतरी पाक बांगलादेशातून परागंदा होऊन आलेल्या हिंदू बौद्ध वगैरे निर्वासितांना भारतात आश्रय देण्यासाठी नवा कायदा करण्यात आल्यावर तो इथल्या मुस्लिमांना परागंदा करण्यासाठीच खेळलेला डाव असल्याचे पसरवण्यात आले. त्याची दोनतीन महिने देशभर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटत राहिली. त्याला मुद्दाम राजकीय खतपाणी घालण्यात आले. म्हणून शाहीनबाग घडले आणि त्यांच्या आक्रमकतेने तबलिगी जमातीला प्रोत्साहन मिळाले. मुस्लिमातील सरकार विरोधी मानसिकतेला खतपाणी घातल्याचे परिणाम आता कोरोनाच्या निमीत्ताने विविध मुस्लिम वस्तीत बघायला मिळत आहेत. त्या झुंडी आधीच्या अपप्रचाराने निर्माण केलेल्या आहेत. थोडक्यात कायदा व शासनाच्या अधिकाराला झुगारण्यामागे जो भयगंड आहे, तो आक्रमक झाला आहे. पण जेव्हा असे सामुहिक कृत्य एका बाजूने होते, तेव्हा त्याचा प्रभाव दुसर्‍या बाजूवर होणे अपरिहार्य असते. कोरोनाच्या निमीत्ताने तबलिगी जमातवाल्यांनी जे प्रताप केलेले आहेत, त्यातून बहूसंख्य जनमानसात ‘कोरोना पसरवणारे’ अशी विकृत प्रतिमा निर्माण झालेली आहे. मग त्याच्या आहारी अधिकाधिक लोक जातात, तेव्हा मुस्लिमांकडे वा मुस्लिमबहूल भागाकडेही संशयाने बघणे सुरू होत असते. तो आजच्या परिस्थितीतला अक्राळविक्राळ धोका आहे. कारण देश लॉकडाऊनमध्ये आहे.

प्रदिर्घ लॉकडाऊनमुळे लोक आधीच कंटाळलेले असतात आणि रिकामे मन म्हणजे सैतानाची कार्यशाळाच होय असे मानले जाते. इतक्या कोट्यवधी लोकांच्या रिकाम्या मनात कुठलाही संशय, शंका वा अफ़वा आगडोंब पेटवू शकत असते. अशी मने व त्यातली अस्वस्थता कमालीची स्फ़ोटक व ज्वालाग्राही सामग्री असते. म्हणूनच समाजात ज्यांचे वजन आहे वा ज्यांचे शब्द प्रभावी असतात, त्यांनी एक एक शब्द अतिशय मोजूनमापून उच्चारण्याची गरज असते. नव्हे त्याला अन्य पर्यायही नसतो. कारण त्यांचा एक चुकीचा शब्दही आगी पेटवू शकतो. एका बाजूलाच अशी विध्वंसक मानसिकता असेल व ती मर्यादित स्वरूपाची असेल तर शासन व्यवस्था तिला लगाम लावण्यात यशस्वी होऊ शकते. पण दुसर्‍या बाजूनेही तसेच रौद्ररुप धारण केले तर कायदा व अन्य कुठल्याही व्यवस्था निरूपयोगी होऊन जातात. १३० कोटी लोकसंख्येला बंदुका रोखून वा रणगाडे मैदानात आणून लगाम लावणेही शक्य नसते. म्हणूनच तिला टाळ्या थाळ्या अशा प्रतिकात गुंतवून रोखायचे असते. तिला स्वयंप्रेरणेने नियंत्रित व्हायला भाग पाडायचे असते. उलट त्यात आणखी संशयाचे तेल ओतणारे समाजकंटक असतात. म्हणूनच कोरोनाचे निमीत्त करून मोदी सरकार मुस्लिमांची गळचेपी करीत आहे, असली विधाने अरुंधती रॉय किंवा तत्सम कोणी करीत असेल, तर तात्काळ त्यांची थोबाडे बंद केली पाहिजेत. त्यांचे शब्दही सामान्य लोकांपर्यंत जाऊ नयेत याची काळजी शासनाने आधी घेतली पाहिजे. अशा शब्दांनी मुस्लिम बिथरतातच. पण त्यांच्या कृतीने बहुसंख्य लोकही वेगळा विचार करू लागण्याची शक्यता वाढत असते. अशी विधाने वक्तव्ये दुजाभाव जोपासून सामाजिक शांतता व शिस्तीला चुड लावित असतात. पालघरने दिलेला तोच मोठा इशारा आहे. कारण पोलिसांनी उपस्थिती असूनही निव्वळ जमावाच्या मोठ्या संख्येसमोर पोलिस तोकडे पडले आहेत.

एकप्रकारे तबलिगी जमातने मुस्लिमांची मोठीच गोची करून टाकली आहे. कारण त्यांच्या त्या मेळाव्याने कोरोना पसरायला किती हातभार लागला, ते लपून राहिलेले नाही. म्हणूनच अशा नाकर्त्यांमुळे एकूण मुस्लिम समाजच बदनाम होत असल्याचे लक्षात येऊन बहुतेक धार्मिक नेत्यांनी तबलिगचा निषेध केला आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी अनेक मुस्लिम धर्मगुरू व संघटनांनीच केलेली आहे. कारण अशा अनुभवाचा मुस्लिमेतरांच्या मनावर किती विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याचे भान अशा मुस्लिम धर्मनेत्यांना आहे. पण मुस्लिम मतपेढीवर गुजराण करणार्‍यांना त्याचे भान नाही की पर्वा नाही. तबलिगींचे प्रताप आणि नंतर त्यांच्याच प्रभावाखाली असलेल्या काही लोकांनी विविध भागात केलेला उच्छाद; यामुळे एकूणच मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन शंकास्पद होणे भागच आहे. ते तात्काळ थांबवले गेले पाहिजे. कोरोनासाठी कार्यरत असलेल्या वैद्यक पथकावर होणारे हल्ले वस्तीपुरते नसतात. त्यातून कोरोना फ़ैलावला तर आपल्यापर्यंत येऊ शकतो, ही रास्त भिती आहे. म्हणूनच त्यालाच रोखून धरणारे हल्ले आसपासच्या नागरिकांना घाबरवणारे आहेत. त्या हल्ल्यांचा निष्ठूरपणे बंदोबस्त झाला नाही, तर मग ते काम करायला भयगंडाने पछाडलेला जमाव पुढाकार घेत असतो. शेतात वा घरादारात चोर्‍या होत असल्याच्या समजूतीने पालघरची घटना घडली, त्याची पुनरावृत्ती अन्य भयग्रस्त भागात होऊ शकते. त्याला आवर घालायला देशभर प्रत्येक वस्तीत गावात तितकी मोठी पोलिसांची संख्या उपलब्ध नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. सहाजिकच भयगंडाला खतपाणी घातले जाणार नाही वा चिथावण्या दिल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. ते पाप करणार्‍यांना काश्मिरी नेत्यांसारखे तात्काळ स्थानबद्ध केले पाहिजे. जनतेची वा कुठल्या समूहाची मने कलुषित करणार्‍यांच्या मुसक्या आधीच बांधल्या, तर जमाव दंगे हिंसाचाराला सुरूवात होण्यापूर्वीच पायबंद घातला जात असतो.

१३० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात सगळे मिळून फ़क्त दोनतीन कोटी सरकारी वा निमसरकारी कर्मचारी आहेत. त्यात कारकुनापासून पोलिस, सैनिक वा डॉक्टर सर्वांचा समावेश होतो. पण जमावाचा बंदोबस्त करू शकतील अशी संख्या अवघी एक कोटी असेल. म्हणजेच जिथे कुठे दिडदोनशेचा जमाव बेफ़ाम होऊन हिंसा करू लागेल, तिथे एकदोन पोलिस लाठी उगारून काहीही करू शकत नाहीत, हे सत्य गंभीरपणे समजून घ्यायला हवे. पालघरचे जे चित्रण माध्यमातून वा अन्य मार्गे आपल्यासमोर आलेले आहे, ते नेमके त्याकडे इशारा करणारेच आहे. प्रामुख्याने राज्यकर्ते वा अंमलदारांनी त्याकडे तितक्याच गांभिर्याने बघायची गरज आहे. पालघरची वा मुर्शिदाबाद मुरादाबादच्या घटना तुरळक आहेत. पण तशा मनस्थितीत अवघ्या देशाची लोकसंख्या आहे. लॉकडाऊनमधली कोट्यवधी जनता म्हणजे पिंजर्‍यात घुसमटलेला वाघ किंवा श्वापद आहे. त्याला चुचकारूनच हाताळणे आवश्यक आहे आणि सहाजिकच त्याला डिवचणारी कृती आवाज किंवा नुसते इशारेही भयावह परिणामांना दिलेले आमंत्रण असू शकते. म्हणूनच तसे काहीही बोलणारे किंवा कृती करणारे आधी बंदीस्त झाले पाहिजेत. देशात दहापंधरा जागी असे घडणे वेगळे आणि एकाच वेळी हजार बाराशे जागी घडणे विनाश असू शकतो. कुठल्याही समाज वा धर्मसमुहामध्ये कळपाची ती पाशवी मानसिकता कोंडल्या जीवनामुळे आधीच आलेली आहे. त्यामुळे त्याला सर्वाधिक धोका भयगंडाचा आहे. सामुहिक धोक्याची भिती अशा समूहांमध्ये पाशवी आक्रमकतेला चालना देत असते. नंतर पालघरसारख्या घटना आकार घेत असतात. त्यावरचा पहिला उपाय म्हणजेच या काळात कुठल्याही समाज समूहाला भयभीत व्हायला चिथावणी देणार्‍यांची तोंडे बोळा कोंबून बंद करणे, इतकाच असू शकतो. पालघरच्या अनुभवातून महाराष्ट्र सरकार व देशाच्या राज्यकर्त्यांनी इतका धडा घेतला, तरी झुंडीच्या तावडीतून देश वाचवता येऊ शकेल. कोरोनाशी दोन हात करायची सवड मिळू शकेल.

18 comments:

  1. पालघर मधील साधू संत यांच्या हत्येला जबाबदार.
    १. न्यायपालिका - लोकांचा विश्वास कमी झाला आहे. कारण जर चोर म्हणून पोलिसांनी पकडून नेलं तर जामीन मिळून बाहेर सुटून पुन्हा गुन्हे करतील. आपल्या देशात जे लोक बलात्कारी ला सुटका मिळावी म्हणून, फाशीच्या आदल्या दिवसापर्यंत सगळे डावपेच वापरतात, बॉम्ब स्फोटातील आरोपीला वाचवावे म्हणून न्यायालय सकाळी ३ ला उघडतात. संविधान स्थित न्यायव्यवस्थे ने फाशी दिलेल्या अफजल ची प्रशंसा केल्यावर,(जे एन यू) न्यायलयाने स्वतः चा अपमान न समजणे. इ. करणे आहेत.
    २. पोलिस - जर चोर असतील तर पोलिस त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देतील ही भीती.
    ३. भगवा आतंकवाद (काँग्रेस) हा शब्द वापरून भगव्या व लष्करातील लोकांवरील विश्वास कमी होणे.
    ४. काही ढोंगी बाबा लोकांनी भोंदूगिरी करून, भगव्या वस्त्र परिधान करून, या तेजस्वी रंगाचा अपमान केला.
    ५. माध्यमं - अखलाख या चोराला मारले तेव्हा त्याला जातीय रंग देणे. हरियाणा मध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या मारहाणनंतर त्याला जातीय रंग देणे. अश्या अनेक घटना मुळे आज ह्या घटनेला पण जातीय रंग देण्यात येईल.
    ६. राजकारणी - डहाणू तालुक्यातील सध्याचे आमदार  कम्युनिस्ट पक्षाच्या असून त्यांचा पक्ष हिंसा करण्यात १ नं आहे.(त्यांच्या वेब सईट वर दिले आहे) हे वेगळे सांगण्याची गरज नाही. (कदाचित या घटनेत नसेल परंतु शक्यता नाकारता येत नाही. या पक्षाचा इतिहास बघता.)

    एकंदरीत पाहता ह्या पुण्य पुरातन सनातन संस्कृती ची वाटचाल एका गृह युद्धाकडे होत आहे. भारतीय संविधान आधारित - न्यायव्यवस्था, नोकरशाही, संसदीय पालिका व भारतीय संस्कृती यावरील विश्वास कमी करण्यात भारत विरोधी परकीय लोक यशस्वी दिसत आहेत.

    परंतु आशा करूया की आपली ही संस्कृती जी इतके वर्ष  परकीय आक्रमणांना  टिकली ती या परिस्थिती शी दोन हात करून पुन्हा उभी राहील.

    मा भारती आपल्या सर्वाचे रक्षण करो.

    ReplyDelete
  2. मूळ घटनेचा तपशील काहीच kalalaa नाही, आणि काय झालं म्हणून साधू मृत्युमुखी पडले असावेत या बद्दल काही तर्क कळला नाही

    ReplyDelete
  3. नमस्कार पालघर ची घटना जेवढी साधी दिसते तेवढी साधी निश्चितच नाही, निश्चितच सत्तर वर्षाच्या म्हातार्‍याला ज्याला पाळता येत नाही, जो पोलिसाच्या मागे पुढे वाचण्यासाठी जात होता, तो पोलीस सुद्धा त्याला ढकलून लोकांच्या हवाली करतानाचे व्हिडिओ स्पष्ट पाहिले .
    पोलिस स्टेशनमधून चौकशी करून बाहेर आणताना त्याच्या ढुंगणावर लाथा मारतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे पाहता ठराविक समाज ठराविक समाजाला टार्गेट करून नुकसान करू पाहत असेल संपवू पाहत असेल असे जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    मन खूप भाजून निघाल आहे. यातून बाहेर पडणं इतक्या सहजतेने निश्चितच होणार नाही.

    ReplyDelete
  4. १००% सहमत आहे. अरुंधती रॉय सारख्यांना आता थेट (सवलत नसलेली!)जन्मठेप देण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  5. जे हत्याकांड झाले त्याचा मनापासून निषेध. पण मला पुढील प्रश्न पडले आहेत:
    १. लॉकडाऊन असताना हे साधू हिंडत का होते?
    २. गाडीत एक चालक व एक प्रवासी ह्यांच्यासाठी परवानगी असताना तीन माणसे गाडीत कशी काय होती?
    ३. ह्याच्या चौकशीची मागणी करणार्या सर्वांना वरील प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक करावे, म्हणजे राजकारण होणार नाही.
    परत सांगतो हत्येचा मनापासून निषेध.

    ReplyDelete
    Replies
    1. Mhanaje 100 lok phirat hote te chalata ka.... ani tr sadhu gujaratla tyanchya guru chya antyasanskarala jat hote ase aadhich spasta zalele aahe.

      Delete
    2. Wa
      Lock down madhe 110 lok baher kase
      Tyanchya Jabal weeapon kase
      Cummunist vichatsarni ani ati Shahane lok matra don sadhu baher kase he vicharna
      Ani kurhadicha danda gotas kal he khare karnar.
      Dhoka ithech ahe

      Delete
    3. सांधूचा मृत्यू झाला आहे. तुमचे प्रश्न असंवेदनशील व अर्थहीन आहेत. म्हणे चौकशीची मागणी करणारे उत्तरे द्या. नियम मोडणे आणि गुन्हा करणे यातील फरक लक्षात येईल तेव्हा तुम्हाला त्याचे उत्तर मिळालेले असेल.

      Delete
    4. चांगला तर्क आहे...या फंड़्यानुसार रस्त्यावर फिरणारे सगळे लोक दगड़ाने ठेचून मारले पाहिजेत... त्या साधूंपैकी एकाचे दिक्षागुरू सूरतला वारले होते व हे दोघेजण त्यिंच्या अंत्यसंस्काराला चालले होते. मुंबई अहमदाबाद हायवेला पोलिस अड़वतील म्हणून ड़्रायवरने गाड़ी नक्षलप्रभावित व ख्रिश्चन मिशनर्यांच्या एरियातून गुजरात सीमेकड़े न्यियचा प्रयत्न केला.

      Delete
  6. भाऊ हे प्रकरण तुम्हाला वाटते तेवढे सोपे नाही .
    मुळात चोर समजून मारहाण करण्यात आली हा युक्तिवाद फसवा आहे . कारण तसे जर असते तर पोलिसांच्या चार गाड्या कशासाठी फोडल्या जमावाने आणि पोलिसांवर देखील हल्ले का केले ? या प्रकारामध्ये चार पोलीस गंभीर जखमी आहेत असे कळते . भारतामध्ये अराजक माजविण्याचा साठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया मार्क्सवादी यांनी केलेला हा उघड आणि स्पष्ट खटाटोप आहे
    जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी बोलले आहेत ते मुख्य सूत्रधार खालीलपैकी आहेत.

    १. जयराम धाक भावर - सी पी आय एम कार्यकर्ता

    २. महेश सीताराम रावते - सी पी आय एम कार्यकर्ता

    ३. गणेश देवजी राव - सी पी आय एम कार्यकर्ता

    ४. रामदास रुपजी असारे - सी पी आय एम कार्यकर्ता

    ५. सुनील सोमाजी रावते - सी पी आय एम कार्यकर्ता

    ६. सीताराम चौधरी - राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती सदस्य.

    वरील आरोपींच्या विरोधात एफ आय आर फाडून ३० एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ, तुम्ही म्हणता ते पटले तरी टीव्ही वर जे काही दाखवले ते भयानक सत्य कसे विसरणार. आता हे पुढारी लोक या घटनेचा वैयक्तिक लाभासाठी वापर करणार, खतपाणी घालणार व परत आपण सद्य काळाच्या मागे परत जाणार. हुकूमशाहीमध्ये या गोष्टींना स्थान नाही.

    ReplyDelete
  8. कोरोनाची जागतिक साथ सुरु होवुन चार महिने झालेत. सर्वच देश त्यांना होणार्या अमाप नुकसानामुळे साहजिकच, चीनकडे एक बेजबाबदर देश म्हणुन आज बघतांना दिसतात. कुणी चीनला नुकसान भरपायी मागतोय तर कोणी चीनमधून आपले उद्योग ईतरत्र हलवण्याचा विचार करतोय. हे सर्व उद्योग कोरोनासाथीचा प्रसार कमी झाल्यावर, भारतात स्थानांतरित होण्याची दाट शक्यता आहे. आता जर भारतात अराजकता दिसली तरचे तसे होणार नाही. म्हणुन भारतातील वामपंथी नक्कीच चीनच्या दिग्दर्शनाखाली कार्य करण्यास त्यासाठी पुढे सरसावतील. भारताचे आकर्षण कमी करण्यास त्यामुळे देशात पालघरची पुनरावृत्ती वारंवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही असेच वाटते. अनेक उद्योग चीन मधुन भारतात येण्याची शक्यता आहे. जपान,अमेरीका आॕस्ट्रेलिया,फ्रान्स यांनी त्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत.विदेशी पैशांवर पोसलेले डाव्या विचार सरणीच्या बुद्धिवाद्यांनी वादग्रस्त मुक्ताफळे उधळायला सुरुवात केली आहे.अरुंधती राॕय (दिल्ली दंग्या नंतर आता जागी झाली) ही म्हणाली की कोरोना महामारी मुळे तबलीगे जमातीच्य लोकां विरुद्ध असलेल्या असंतोषाचा फायदा घेऊन मोदी अल्पसंख्यकांना जाणीव पूर्वक मरु देत आहे. ही अॕवार्ड वापसी गँग वाले आता कामाला लागले आहेत व भारताला अपयशी दाखवण्य करता सर्वस्व पणाला लावणार.आधी यांलोकांचा बंदोबस्त केला पाहिजे.

      Delete
  9. This incident is far too serious than it looks like.

    ReplyDelete
  10. भाऊ, शिवसेनेने खूप पैसे देऊन पीआर साठी माणसे पेरून ठेवली आहेत जी सोशल मेडिया वर कोणतेही भाजप च्या किंवा मोदींच्या सपोर्ट मध्ये पोस्ट येतात त्यात काही कुचकट आणि खोट्याही कंमेंट्स करतात आणि हळूहळू कंमेंट्स ने ती पोस्ट भरून जाते.
    महाराष्ट्राला पुरेसा निधी आणि जीएसटीचा हिस्सा मिळत नसल्याचे मेसेज सगळीकडे फिरवत आहेत. त्यात किती सत्य आहे?
    पीएम केयर्स आणि सी एम फंडावरून हे लोक सतत टीका करत असतात आणि फडणवीसला, मोदींना बदनाम करत असतात. यांचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे कारण ते भ्रम आणि नकारात्मकता पसरवत आहेत.
    उद्धव ठाकरे चे भाषण बघा, तो हे सांगतो कि हि वेळ राजकारण करण्याची नाही, मला राजकारण नाही करायचे पण या वाक्यांच्या आडून तो राजकारणच करत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत राहतो. साधूंबाबत तर त्याने धडधडीत खोटी वक्तव्ये केली. त्यात मुस्लिम नाहीत असे सांगताना त्यात ख्रिस्ती लोकांचा सहभाग आहे हे सांगण्याचे त्याने टाळले. केंद्रशासित प्रदेशात त्यांना घुसू न देता रात्रीच परत पाठवले. त्यांनी त्या साधूंना रात्रीचे तिथे थांबवून घेतले असते तर असे झालेच नसते असे म्हणत त्याने पुन्हा केंद्राकडे बोट दाखवले. यात शिवसेना सामील तर नाही ना?

    ReplyDelete