Tuesday, April 14, 2020

कोरोना बरा, राजकारण प्राणघातक

Restive migrants lose patience, stage protest

मंगळवारी पहिल्या २१ दिवसीय लॉकडाय़ऊनची मुदत संपण्यापुर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत त्याची मुदत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे निदान महाराष्ट्रात तरी नागरिकांना तात्काळ आपल्या घरातून किंवा रहात्या जागेवरून अन्यत्र मुक्काम हलवण्याची कुठलीही मोकळीक दिली जाणार नाही; हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले होते. त्याचा अर्थ इथल्या विरोधी पक्षाला म्हणजे नेमक्या शब्दात भाजपावाल्यांना कळला नाही, तर समजू शकते. पण जे लोक सत्ताधारी आघाडीत सहभागी झालेले आहेत, त्यांना आपल्याच मुख्यमंत्र्याचे आवाहन वा घोषणा समजली नसेल, हे अजिबात मान्य करता येणार नाही. उलट अशा सत्ताधारी गोटातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व नेते मिळून आपल्याच मुख्यमंत्र्याचे आवाहन सामान्य नागरिकाला समजावे व त्याचे पालन व्हावे, यासाठी झटले पाहिजेत. पण त्याच लोकांनी त्या आवाहनाला हरताळ फ़ासावा, अशी घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. अकस्मात दुपारी चार वाजल्यानंतर बांद्रा येथील दुरपल्ल्याच्या रेल गाड्या सुटणार्‍या टर्मिनसजवळ लोकांचा जमाव एकत्र येण्यास सुरूवात झाली. ही गर्दी कशी व कशाला एकत्र येते आहे, त्याचा पोलिसांना सुगावा लागण्यापुर्वीच तो जमाव कित्येक हजारापर्यंत वाढला. त्याने राज्य सरकारचे नाक कापले गेलेले आहे. कारण देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात असून, त्यातले ६०-७० टक्के रुग्ण एकट्या मुंबईच्या परिसरात आहेत. सहाजिकच सर्वात जास्त सोशल डिस्टंसिंग मुंबईत पाळले गेले पाहिजे आणि कर्फ़्युचे अतिशय काटेकोर पालन इथेच झाले पाहिजे. पण तिथेच त्या सुरक्षेला हरताळ फ़ासला गेला आणि त्यासाठी ज्यांनी पुढाकार घेऊन चिथावणी दिली, ते सत्ताधारी आघाडीतलेच कोणी नेते आहेत. त्यापैकी एकाला अटक झालेली आहे आणि त्याचा सोशल माध्यमातील व्हिडीओही समोर आलेला आहे. मग असा प्रश्न पडतो, की कोणी जाणिवपुर्वक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी प्रयत्न करतो आहे का?

मुख्यमंत्र्यांनी शनिवारीच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे मंगळवारी कोणा परप्रांतिय मजूर वा तत्सम लोकांसाठी मुंबईतून कुठलीही रेल्वे वा अन्य वाहतुकीची सोय होऊ शकत नाही, यात शंका उरलेली नव्हती. अगदी केंद्र सरकार वा मोदींनी देशव्यापी कर्फ़्यु उठवण्याची घोषणा केली तरी महाराष्ट्रात त्यानुसार सुट मिळण्याची शक्यता अजिबात नव्हती. थोडक्यात मोदींनी ३ मेपर्यंत कर्फ़्युचा विस्तार करून उद्धव ठाकरे यांच्याच आवाहनावर शिक्कामोर्तब केलेले होते. मग इतके हजारो लोक बांद्रा टर्मिनसपाशी एकत्र येण्याचे कारणच काय होते? कोणीतरी जाणिवपुर्वक त्यांची दिशाभूल केली होती, किंवा त्यासाठी चिथावणी दिलेली होती. आता त्याचे नाव व चेहरा समोर आला असून विनय दुबे असे त्याचे नाव आहे. त्याने व्हिडीओ टाकून उत्तर भारतीय मजुरांसाठी विशेष रेल्वेगाडी सुटणार आहे अशी माहिती दिली होती. त्यासाठी त्यानेच ४० बसेस तयार ठेवल्याचे त्यात कथन होते. म्हणून आता त्याला अटक झाली आहे. तो महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांची एक संस्था चालवतो व त्याचा थेट राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी संबंध असल्याचेही निष्पन्न झालेले आहे. सहाजिकच त्यामागे हा माणूस आहे यात शंका नाही. कारण त्याचे धागेदोरे सापडले नसते तर त्याला तात्काळ नवी मुंबईतून अटक झाली नसती. पण ज्या पक्षाचा सत्ताधारी आघाडीत समावेश आहे आणि गृहमंत्रालयही त्याच पक्षाकडे आहे, त्यांच्याच पाठीराख्याने असे कृत्य कशाला करावे? मुख्यमंत्री जनतेला आवाहन करतात वा आदेश देतात, ते राष्ट्रवादीचे मंत्री, अनुयायी वा नेत्यांना लागू होत नाहीत काय? की राज्यामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि बाकी मंत्री आपापली सरकारे चालवित आहेत? नसेल तर गृहखात्याच्या अंतर्गत इतका बेशिस्तीचा प्रकार नित्यनेमाने कशाला चालू आहे? त्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या बंगल्यावर कुणा तरूणाला पोलिस उचलून आणतात व बेदम मारहाण होते. त्याच पक्षाचे गृहमंत्री असताना त्यांचेच गृहसचिव फ़रारी वाधवान कुटुंबाला नोकर चाकरांचा ताफ़ा घेऊन मुंबई ते महाबळेश्वर प्रवासाची राजेशाही सोय करतात. ह्या घटना घातपातापेक्षा वेगळ्या म्हणता येतील का?

आता असा युक्तीवाद केला जातो, की २१ दिवस संपत असल्याने लॉकडाऊन संपणार आणि पुर्ववत गाड्या रेल्वे सुरू होणार, म्हणून हे लोक रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. मग त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आवाहनाशी कर्तव्य नाही काय? ते लॉकडाऊनला कंटाळले किंवा त्यांना कर्फ़्यु विस्ताराने भयभीत केले, असा दावा असेल तर शनिवारी विस्ताराची घोषणा झाली, तेव्हा त्यांची भिती कुठे होती? की राज्यातल्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेची त्यापैकी कोणाला किंमत नाही, दादफ़िर्याद नव्हती? की त्याना राज्याचा कारभारही दिल्लीहून मोदी चालवतात असे वाटते? नेमका काय प्रकार आहे? एक मंत्री व मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे म्हणतात, केंद्राने स्थलांतरीतांची स्वतंत्र विशेष गाड्या सोडून व्यवस्था लावायला हवी होती. मग हा प्रकार झाला नसता. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, की त्यांच्या पित्यावर विश्वास ठेवायचा? की पितापुत्रामध्येही सुसंवाद नाही? कारण पित्याचा आदेश लागू असताना मुंबईतून केंद्राने वा रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या तरी इथला परप्रांतीय मजूर कर्फ़्युमध्ये रेल्वे स्थानकात पोहोचणार कसा? राज्यातले पोलिस पंतप्रधानाचे ऐकत नसतात, तर आपल्याच पित्याचे आदेश मानतात, इतकेही या पुत्र मंत्र्याला ठाऊक नाही काय? मग त्याने केंद्रावर दोषारोप करण्याचे कारण काय? त्याला आपल्याच कोणा मित्रपक्षाच्या नेत्याने हा घातपात केल्याचेही कळत नाही काय? मुख्यमंत्री म्हणतात कोणी अफ़वेचे पिल्लू सोडुन दिले आणि स्थानकापाशी गर्दी लोटली. अशी अफ़वा सामान्य लोकांपर्यंत वेगाने पोहोचली आणि पोलिसांना वा राज्य गुप्तचर विभागाला त्याचा थांगपत्ता नसावा, ह्याला गृहखात्याचा उत्तम कारभार म्हणावे काय? मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यात काही बातचितही होत नाही काय? की सत्तेत सहभागी झालेले मित्रपक्ष इतक्या संकट काळातही एकमेकांवर कुरघोडी करण्यात रमलेले आहेत? लोकांच्या जीवाशी खेळून राजकारण चालले आहे, की उद्धव यांना घातपात करण्याचे राजकीय डाव अलिप्त बसून कोणी खेळतो आहे?

खरे तर जगावर संकट आलेले आहे आणि भारतात त्याला पुरेसा पायबंद घातला गेला असताना, कुठून तरी त्यात दगाफ़टका व्हावा असा पद्धतशीर प्रयत्न चालू असल्याचे लपून रहात नाही. तबलिगी जमातच्या माध्यमातून तसा प्रयत्न झाला आणि त्यातून परिस्थिती सावरली जात असतानाच मुंबई देशातला सर्वात मोठा कोरोनाग्रस्त विभाग झालेला आहे. बाधितांपासून मृतांपर्यंत प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र असताना इथेच अशा घटना शंकेला जागा देतात. प्रामुख्याने मुंबईला कोरोनाचे विळखाच घातला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे सर्वतोपरी झुंज देत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा देखील कॅमेरासमोर न येता प्रशासनाचा भार उचलत आहेत. उलट कामापेक्षाही बोजा झालेले अनेक मंत्री व नेते उचापती करताना आपल्याच राज्यसत्तेला अडथळे उभे करीत आहेत. म्हणूनच मग यामागे कारस्थान असल्याची शंका येते. कारण उद्धव ठाकरे यांच्या कामात भाजपा किंवा अन्य कुणा विरोधी नेत्याने व्यत्यय आणलेला दिसलेला नाही. पण सत्तेत सहभागी झालेला मित्रपक्ष व त्याचेच काही महाभाग भलत्या गोष्टी करून सगळे प्रयास निष्फ़ळ होण्यासाठी झटताना दिसतात. स्थलांतरीतांना आपल्या घरी पाठवण्याची मागणी तशीच आहे. लॉकडाऊनचा हेतूच मुळात प्रवासातून कोरोनाचा फ़ैलाव रोखण्यासाठी असेल, तर कुठल्याही मार्गाने मुंबईतील मजूर वा अन्य लोकांना बिहार उत्तरप्रदेशला पाठवण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी तद्दन मुर्खपणाची असते. कारण विशेष गाडी म्हणजे २१ दिवसात ज्या मुठभरांना लागण झालीय, त्यांना अन्य लोकांच्या सोबत कोंडून कोरोनाचा फ़ैलाव पसरवण्याचीच विशेष योजना होते ना? इतकेही आदित्य ठाकरे वा अन्य तत्सम नेत्यांना उमजत नसेल, तर त्यांना उच्चपदी कशाला बसवले आहे? गृहमंत्री अनिल देशमुख तर नुसते बोलतात. पण निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी अजून दाखवलेली नाही. अन्यथा त्यांच्याच पक्षाच्या नेते अनुयायांकडून असे प्रमाद कशाला घडले असते?

एक गोष्ट स्वच्छ आहे. अननुभवी असूनही उद्धव ठाकरे समर्थपणे व काळजीपुर्वक परिस्थितीला सामोरे जात आहेत. प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना त्यांनी चालविलेले काम उल्लेखनीय आहे. पण ज्यांना सहकारी म्हणून त्यांनी निवडलेले आहे, असे अनुभवी नेते मंत्री मात्र डोकेदुखी बनलेले आहेत. कुठल्याही नेत्याची कसोटी त्याने संकटकाळात पार पाडलेल्या कर्तबगारीतून सिद्ध होत असते. नरेंद्र मोदी अननुभवी मुख्यमंत्री असताना गुजरात दंगलीने पेटला होता आणि तेव्हाही पक्षांतर्गत व विरोधातील लोकांनी त्यांना ग्रासलेले होते. पण त्यातून मोदींनी ठामपणाने निर्णय घेतले आणि प्रसंगी स्वपक्षासह विरोधी पक्षाच्याही अनेकांना कठोरपणे वागवले. म्हणून त्यांची उत्तम प्रशासक म्हणून ओळख निर्माण झाली. त्यामुळेच देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत त्यांना मजल मारता आली. राज्याबाहेरही त्यांची प्रशासक म्हणून ख्याती पसरली. काहीशी तशीच आज उद्धव ठाकरे यांची स्थिती आहे आणि तशीच संधीही आहे. प्रतिकुल परिस्थितीतून जाणारे सर्वात वैशिष्ट्यपुर्ण नेतृत्व म्हणून उद्धवरावाची प्रतिमा उजळू शकणार आहे. पण त्यासाठी त्यांना मुंबई व त्याच्याभोवतीचा परिसर कठोरपणे हाताळावा लागाणार आहे. ते काम पोलिस वा विद्यमान गृहमंत्र्यांकडून होण्याची शक्यता नाही. पण त्याला नाईलाज समजण्याचे कारण नाही. त्यावरचा उत्तम पर्याय म्हणजे कर्फ़्यु व लॉकडाऊन ठामपणे काटेकोर अंमलात आणण्यासाठी एक यंत्रणा मुख्यमंत्री वापरू शकतात. त्याला लष्कर म्हणतात. मोदींनी गुजरातची दंगल आटोक्यात आणताना स्थानिक प्रशासन तोकडे पडू लागल्यावर वेगने लष्कराला आमंत्रित केले. म्हणून अहमदाबाद, गांधीनगर या शहरात हिंसाचार आटोपण्यात यश आले होते. मुंबई, ठाणे व पालघर हा भाग दिवसेदिवस संवेदनाशील होऊ लागला आहे. त्याला आवर घालण्याचा हाच एकमेव पर्याय असून, तसे केल्यास झपाट्याने स्थिती आटोक्यात आणली जाईल.

लष्कराला पाचारण करण्याचा एक मोठा फ़ायदा म्हणजे स्थानिक पातळीवर आपल्या वशिलेबाजीने उचालती करू शकणार्‍यांना झटपट चाप लावला जाऊ शकतो आणि त्याचीच गरज आहे. कारण सत्ताधारी पक्षातलेच काही आगावू नेते व कार्यकर्ते प्रशासनात हस्तक्षेप करीत आहेत. अधिकार लष्कराकडे गेले म्हणजे ती ढवळाढवळ लगेच थांबू शकते आणि निदान मोठ्या प्रमाणात अशा उचापतींना लगाम लावला जाऊ शकेल. वाधवान कुटुंबाचा प्रताप होऊ शकणार नाही वा विनय दुबे यासारखे मित्रपक्षातले कोणी नसती उठाठेव करण्याला पायबंद घातला जाईल. अर्थात उद्धवरावांना तितकी हिंमत दाखवावी लागेल. पण त्याचे परिणाम व लाभ बघता तितके कठोर पाऊल त्यांनी वेळीच उचलले पाहिजे. कारण आजच महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे कोरोनाबाधीत राज्य बनले आहे आणि त्यातही बहुतांश बाधा व फ़ैलाव मुंबई परिसरापुरता मर्यादित आहे. लष्कराच्या ठाम शिस्तीत या महानगराला आणले, तर त्याचा फ़ैलाव उर्वरीत महाराष्ट्रात होऊ शकणार नाही. म्हणजेच मर्यादित भूप्रदेश लष्कराच्या शासनाकडे देऊन फ़ार मोठा परिणाम साधला जाऊ शकतो. पण त्यातले यश उद्धव ठाकरे यांच्या खात्यात जमा होईल. कारण इतके मोठे पाऊल उचलण्याचे धाडस करणारा नेता, जनतेला धीर देणारा व विश्वास वाढवणारा असतो. ते धाडस मुख्यमंत्री करणार काय, हा प्रश्न आहे आणि मंगळवारच्या प्रकारानंतर ते पाऊल आवश्यक झाले आहे. खेरीज आता महिनाभराच्या अखंड कष्टांनी व जबाबदारीने पोलिस व स्थानिक यंत्रणा थकलेली शिणलेली आहे. उलट नव्याने आलेल्या लष्करी तुकड्यांपाशी ताजातवाना जवान आहे. त्याच्या गणवेशाचा धाक पोलिसांपेक्षाही अधिक आहे. त्याचा मानसिक प्रभाव नैसर्गिक असतो आणि कर्फ़्यूचा कठोर अंमलच यानंतरची स्थिती संभाळू शकेल, ही वस्तुस्थिती आहे. बघू, मुख्यमंत्री तितके धाडस करतात का? कारण कोरोनापेक्षाही आता मुंबईकराला भ्रष्ट राजकारणाची भिती वाटू लागली आहे.


26 comments:

  1. हिंदीत एक म्हण आहे "लाथोंके भूत..." मुंबई - पुण्यासारख्या शहरी शहणपणाला लष्करी खाक्या दाखविल्याशिवाय शिस्त लागणार नाही हे नक्किच! पण माननीय मुख्यमंत्री साहेब असे निर्णय घेऊन स्वतःचे पद राखू शकतील का??

    ReplyDelete
  2. परखड आणि योग्य विश्लेषण. नेहेमीप्राणेच.

    ReplyDelete
  3. भाऊ, कालच्या वांन्द्रे येथील प्रकारामागे तो कोणीतरी दुबे नावाचा तरुण आहे व तो उत्तर भारतीय मजूर संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याचे फेसबूकवर 18 तारखेला CSTM ला गावाला जायला मिळत नाही म्हणून आंदोलन करायला जमा असा व्हिडीओ प्रसारीत होतो. हा माणूस सरळसरळ राज्य सरकार व केंद्र सरकार यांना आव्हान देताना दिसतो, तरीही हा वांद्रे स्टेशन जवळ तीन हजार माणसे जमवे पर्यंत पोलिसांना पत्ता लागत नाही. हाकेच्या अंतरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री सुपुत्र रहातात तरीही ही ढिलाई? काही ठरावीक धर्मीयांना सैल सोडल्याचे हे परिणाम आहेत. हे परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी स्टेशनवर निघतात पण सामानाची साधी पिशवी पण जवळ नसते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर पाच मिनिटांत सर्वजण आपल्या घरी पळून जातात, याचा अर्थ हे तथाकथित उत्तर भारतीय मजूर वान्द्रे स्टेशनच्या आसपासच रहातात असा आहे का? उत्तर भारतात जाणाऱ्या जवळजवळ सर्व गाड्या CSTM आणि कुर्ला येथून सुटतात मग तेथे कोणतेच मजूर गर्दी करत नाहीत हे कसेकाय? याचा अर्थ मजुरांच्या नावाखाली कोणत्या तरी वेगळ्याच लोकांची गर्दी जमवली गेली गोंधळ घालण्यासाठी हे नक्कीच. त्यात आदूबाळाने 24 तासासाठी रेल्वे चालू करुन गावी जाणारांची सोय केंद्र सरकारने करायला हवी अशी टिवटिव केली, म्हणजे याचाच अर्थ वडील मुख्यमंत्री आहेत व त्यांचा वचक मुलावर नाही, मग सोबती पक्षांवर कसा राहील?
    भाऊ हे जर असेच चालत राहिले तर मुंबईची इटली व्हायला वेळ लागणार नाही. याची जाणीव उचापतीखोर मंत्री व कार्यकर्ते यांना जेवढी लवकर होईल तेव्हडे चांगले.

    ReplyDelete
    Replies
    1. धनंजय टाकले यांचा मुद्दा योग्य आहे
      भाऊसाहेब आपले विश्लेषण वाचून आपले चाहते पण तयार झाले आहेत
      धन्यवाद

      Delete
    2. आणि अगदी त्याच वेळी मुंब्रयात ५०० -६०० जणांचा जमाव जमतो हे सुद्धा महत्वाचे

      Delete
    3. काहितरी गोम आहे मला आणखीही काही सांगायचंय

      Delete
  4. आपण लिहिल्याप्रमाणे लष्करास पाचारण करणे हा योग्य उपाय आहे

    ReplyDelete
  5. हा प्रकार बांद्रा पश्चिम येथे झाला
    बांद्रा टर्मिनस पूर्वेला साधारण 2km अंतरावर आहे

    ReplyDelete
  6. भाऊ .....लेख नेहमीप्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण !! बांद्र्यामध्ये ज्या ठिकाणी हे लोक जमले होते त्या गर्दीतील एकाहि व्यक्तीकडे प्रवासाचे सामान न्हवते असे सांगतात. तसेच हे सर्व लोक बांद्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर न जमता स्टेशनजवळील खेरवाडीमधील मशिदीबाहेर जमले होते. सर्वच संशयास्पद. कालच तुम्ही एका लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे ' खणता राजा ' जो वाधवान प्रकरणानंतर ' आयसोलेशन ' मध्ये गेला होता.............तो अचानक आयसोलेशनमधून बाहेर आल्याचे दिसले. त्यांचा एक फॉरमॅट ठरलेला आहे. त्यांनी सरकारचे समर्थन करावयाचे आणि त्यांच्याच पक्षाच्या काहींनी सरकारविरोधात हालचाली करावयाच्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे परदेशातून अशा हालचालींसाठी ' निधी ' येत असल्याचे सांगतात. मुख्यमंत्रांच्या युवराजांकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे जरा जास्तच झाले. ' लष्कराला मुंबईत बोलावण्याचे ' धाडस ' मुख्यमंत्री दाखवणार का ?

    ReplyDelete
  7. पूर्ण पणे सहमत....👍👍

    ReplyDelete
  8. छान विश्लेशन. अलीकडे ठाकरेंचे कौतुक जास्तच करताय, ते मात्र पटत नाही.

    ReplyDelete
  9. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे संशयित व बळी असावेत हे आपल्या सर्वांसाठी व सरकार साठी आत्म परीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. सर्व डाॕक्टर,परिचारीका,आरोग्य खात्यातील समस्त कर्मचारी व अनेक सेवाभावी संस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत व या सर्वांना मानाचा मुजरा. जेव्हा राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करायला कोरोनाचे अरीष्ट संपूर्ण देशावर असताना देखिल जराही विचार करत नाहीत व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळतात तेव्हा तळपायाची आगा मस्तकात जाते.अशोक चव्हाणाः सारखे नेते जाहीर रीत्या साःगातात की आम्ही मुस्लिम समाजा साठी सत्तेशमध्ये आलो व जाणता राजाला तबलिगे जमात चा सारखा उल्लेख केलेला आवडत नाही यात सर्व काहो आले. हा विकास दुबे लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करतो किंवा अमिताभ गुप्ता सारखा आधिकारी वाधवान कुटुंबियांना महाबळेश्स्ववरला जायला स्वतःच्या बुद्धिने वा आधिकारात असे चक्रावाणारे व कोरोना युद्धाला मातीमोल करणारे निर्णय घेतील असे वाटत नाही.या मागील बोलवता धनि कुणी वेगळाच असावा असे वाटते. आपले यावर भाष्य व मत एकण्या साठी वाट बघतो.

    ReplyDelete
  10. मजुरांच्या नावाने वेगळीच माणसे असतील तर राज्याचा मुख्य म्हणून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना काँबिंग ऑपरेशन का करायला सांगितले नाही. त्यात, राज्याचा पप्पू, त्यांच्यासाठी खास ट्रेन सोडायला सांगून, कोणतीही तपासणी न करता, कोणत्या राज्यात आजार फैलवण्यास उत्सुक आहे. सगळ्याच गोष्टी चीड आणणाऱ्या आहेत. ठाकरेंनी, जनतेला मूर्ख बनवून सत्ता मिळवून पत घालवली आता तर लाजही कोळून प्यालेत. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे आरामात टिकणार.

    ReplyDelete
  11. एबीपी माझाच्या अतिशहाण्या राहूल कुलकर्णी या प्रपोगंडा वाल्या बातमीवाच्याने उत्तर भारतीय मजुरांसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याची शक्यता "विश्वसनीय"सूत्रांच्या हवाल्याने रेटून सांगितली होती .या बेजबाबदार माणसावरही कारवाई हवी.

    ReplyDelete
  12. हया दुबे आणि तबलीगीत काही फरक नाही. दोघांना आपला अजेंडा चालवायचा आहे.

    ReplyDelete
  13. योग्य लेख. जे मतीवाडीचे कंपूशाहीचे सत्ताकारण आयुष्यभर करतात, तेच असलेल्या हीन गोष्टी करु शकतात.त्यांना देशभक्ती, आरोग्य, मानवता माहीतच नाही. बिचाऱ्या गरीबांकडे लक्ष दिले पाहिजे. लेखाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  14. होय, येथे लष्करी जवानच आणायला हवेत व यांना वठणीवर आणायला पाहून।

    ReplyDelete
  15. According to a news central government was denied permission to send military forces in Maharashtra.

    ReplyDelete
  16. Grameen marathi madhe ek mhan ahe
    Yeskarala Patil kela ani sarya gavacha iskot zala...
    Uddhav Sahebanchya mantri mandalat asech zale ahe.

    ReplyDelete
  17. वांद्रे इथे झालेल्या घटनेबद्दल तथाकथित पत्रकार देत असलेल्या बातम्या आणि विरोधी पक्षावर केले जाणारे आरोप बघता ही फक्त आणि फक्त राज्यपालांवर राजकीय दबाव टाकून सरकारची एक विशिष्ट मागणी पुर्ण करून घेण्याची खेळी असल्याचे दिसते आहे...

    ReplyDelete
  18. खरं तर या पूर्वीच मुंबई , पुणे , नाशिक ही मोठी शहर आर्मी कडे द्यायला हवी होती . हा आजार चालू होऊन जवळ जवळ 1 महिना झालाय स्थानिक पोलीस , डॉक्टर , पॅरा मेडिकल स्टाफ सगळे कमालीचे थकलेले आहेत .
    आर्मी कडे मेडिकल स्टाफ आहे सगळ्या गोष्टींचा विचार करता हे बेस्ट सोल्युशन आहे . पण हे सरकार काही करेल असे वाटत नाही . आत्ता सत्ता महत्वाची नाही कठोर अंमलबजावणी करण्यासाठी जे काही लागेल ते करायला हवं . सगळं मंत्रिमंडळ याच कामी लागायला हवं . पण हे गुंतलेत राजकारणात दुर्दैव आपलं .

    ReplyDelete
  19. "अननुभवी असूनही उद्धव ठाकरे समर्थपणे व काळजीपुर्वक परिस्थितीला सामोरे जात आहेत. प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना त्यांनी चालविलेले काम उल्लेखनीय आहे."
    हे म्हणजे नेमके काय भाऊ? समाज माध्यमांवर बॉलिवूडचे कुख्यात नामवंत देखील अशीच स्तुतीसुमने उद्धवरावांवर उधळताना दिसतात. जर प्रत्यक्षात परिस्थिती आटोक्यात आणत नसतील तर नेमके असे कोणते उल्लेखनीय काम करत आहेत मुख्यमंत्री?

    ReplyDelete
  20. बाळराजे तोंड बंद ठेवा....टिवटिव करू नका..संजू काकांच्या शिकवणीला जाऊ नका.. तुमच्या पिताश्रींच्या मेहनतीवर बोळा फिरवला जाईल असे उद्योग करू नका..
    काही लोक तुम्हाला महाराष्ट्र्राचा पप्पू बनवण्यासाठी खटपटीत आहेत.. सावधान!

    ReplyDelete
  21. याबाबत एबीपी माझाच्या राहूल कुलकर्णी या पत्रकारावर झालेली कारवाई आपणांस योग्य वाटते का ? आदरणीय भाऊ कृपया यावरही लिहा .
    धन्यवाद
    प्रशांत केतकर

    ReplyDelete