Friday, April 3, 2020

तमसो मा ज्योतिर्गमय

पणती वंशाची - मराठी कविता

लॉकडाऊनला नऊ दिवस पुर्ण झाले असताना आणि त्यातून कोट्यवधी लोक जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला एका व्हिडीओच्या माध्यमातून एक नवे आवाहन केले. येत्या रविवारी या कर्फ़्युला बारा दिवस पुर्ण होताना पुन्हा एकदा नव्याने हुरूप यावा, म्हणून नऊ मिनीटे काही करायला सांगितले आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर घरातले दिवे मालवावे आणि मेणबत्ती, कंदिल वा कुठलाही दिवा लावावा. बॅटरीचा झोत टाकावा असे आवाहन आहे. त्यातून काय होणार? अशा प्रश्नाने अनेक शंकासुरांना भेडसावून टाकलेले आहे. त्यांच्या लेखी हा कोरोनावरचा उपाय नाही आणि त्यापेक्षा आज गरीब संकटात आहेत, त्यांच्यासाठी काही करणे आवश्यक आहे. त्याकडे पंतप्रधानाने दुर्लक्ष केल्याचा मुख्य आक्षेप आहे. अर्थात मोदींनी अशा विविध गरजा अडचणी यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारे कामाला लावलेली आहेत. त्यामुळे आपल्या संदेशातून त्याचे विवरण देण्याची त्यांना काहीही गरज नाही. कारण जनतेला विविध लाभ आधीच मिळू लागले असून, विविध यंत्रणा त्यासाठी आपल्या विभागात कार्यरत झाल्या आहेत. मग त्याचा डंका पिटण्याचे काय गरज आहे? पण पुरोगामी शहाण्यांना मात्र फ़क्त अशाच गोष्टींचे पंतप्रधानाने राजकीय भाषण वा विविध लाभांच्या घोषणा करावे असे वाटते. त्यांचा अपेक्षाभंग मोदींनी केला तर नवल नाही.

या संदेशातून मोदींना थकलेल्या कंटाळलेल्या जनतेला हुरूप आणायचा होता किंवा आहे. सहाजिकच पुरोगामी शहाण्यांना काय वाटते त्याला मोदींच्या लेखी महत्व नाही. बाकी मोदींना पंतप्रधान असूनही काहीही आवडनिवड असू शकत नाही, ह्याविषयी असे लोक ठाम असतात. त्यामुळे त्यांच्या इच्छा मोदींनी पुर्ण केल्या नाहीत, मग त्यांना जनतेचा अपेक्षाभंग झाला असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून सामान्य जनता निराश होते असे अजिबात नाही. कारण हे शहाणे सामान्य जनता व तिच्या भावनेपासून मैलोगणती दुर असतात. सहाजिकच आपला अपेक्षाभंग म्हणजे़च जनतेचा अपेक्षाभंग अशी त्यांची कायमची समजूत होऊन बसलेली आहे. परिणामी मोदींनी रविवारी मेणबत्ती वा दिवे लावण्याचे आवाहन केले; तर असे लोक निराश होऊन बरळण्याला पर्याय नव्हता. अर्थात हा खुळेपणा नवा आहे असे मानायचे कारण नाही. त्यालाही एक मोठी परंपरा असून त्याचा गोषवारा प्रसिद्ध साहित्यिक नाटककार जयवंत दळवी यांनी दिवाळी अंकातल्या एका लेखातून मांडलेला होता. हा लेख किंवा त्यातला एक किस्सा अगत्याने सांगणे आवश्यक आहे. तो लेख १९८६-८७ साली केव्हा तरी प्रकाशित झाला होता. तो वाचला किंवा ऐकला तर आजच्या पुरोगामी शहाण्यांना अशा दिवे लावण्यात मुर्खपणा कशाला दिसतोय, त्याचा यथास्थित खुलासा होऊ शकेल. कारण तो किस्सा दळवी यांनी तरूण वयात राष्ट्र सेवा दलाची साथ का सोडली त्या संबधातला आहे.

मागल्या चारपाच वर्षापासून नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या स्वच्छता विचारांचा प्रचार प्रसार करीत आहेत. गांधीवादी म्हणून मिरवणार्‍यांनी त्या विचाराचा कधीही पाठपुरावा अलिकडल्या काळात केला नाही. कारण त्यांचा महात्मा केवळ नथुरामपुरता मर्यादित आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काही वर्षे तात्कालीन गांधी समर्थक आग्रहाने स्वच्छतेची मोहिम किंवा विचार पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचाच अनुभव दळवींना किळसवाणा वाटला होता. त्यात दळवी म्हणतात, आम्ही तरूण मुले दर रविवारी सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली गरीबांच्या वस्ती व चाळींमध्ये जाऊन साफ़सफ़ाईची मोहिम चालवायचो. तिथे माजलेला कचरा घाण साफ़ करायचो. अगदी कोणी कुठे विष्ठा वा शौच केलेले असले तरी साफ़ करायचो. सेनापती तर कुठेही विष्ठेचा मोठा गोळा दिसला मग धावतच जायचे आणि उचलायचे. त्यांचे ते कृत्य बघून किळस यायची. पण आदर्श असल्याने त्याबद्दल बोलायची हिंमत नव्हती. एका रविवारी सेवा दलाचा अन्य कार्यक्रम असल्याने आम्ही त्या ठरलेल्या वस्तीत जाऊ शकलेलो नव्हतो. पण पुढल्या रविवारी आम्ही तिथे पोहोचलो. तर तिथल्या रहिवाश्यांनी आम्हाला फ़ैलावर घेतले. मागल्या रविवारी कशाला आला नाहीत, म्हणून जाबही विचारला. आम्ही थक्क झालो. तर त्या रहिवाश्यांनी आम्हाला दम भरला. तुमची मुन्शिपाल्टीत जाऊन तक्रार करावी लागेल, अशी ताकीदही दिली. हा सगळा प्रकारच किळसवाणा झाला म्हणून दळवी त्यापासून दुर झाले.

आपला हा अनुभव त्यांनी सांगताना एक नव्हे असे खुळेपणाचे अर्धाडझन तरी किस्से सांगितले होते. त्यांना हा सगळा प्रकार नुसता खुळेपणाचा वाटला नाही तर किळसवाणा वाटलेला होता. त्याला विरोध करता येत नसेल तर त्यापासून दुर होण्यात त्यांना शहाणपणा वाटला. मुद्दा इतकाच, की सफ़ाईला येणारे कर्मचारी व सेवाभावी वृत्तीने सफ़ाईची आयुष्यातील महत्ता तुम्हाला शिकवायला येणारे सेवाव्रती; यातला फ़रकही तिथल्या रहिवाश्यांना असे प्रयोग शिकवू शकलेले नव्हते. पण त्यातला उदात्तपणा आजही कौतुकाने सांगणार्‍यांना रविवारी पंतप्रधान जी सोपी कृती सांगतात, ती हास्यास्पद वाटते आहे. आपली कृती फ़डतूस वा निरर्थक असली तरी चालेल, निरुपयोगी असायलाही हरकत नाही. ती आपल्या पूज्य व्यक्तीकडून आलेली असायला हवी, अशी या दिडशहाण्यांची अपेक्षा असते. उलट व्यवहारी शहाणपणाचेच धडे गिरवलेल्या मोदींना त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे केवळ अशक्य आहे. त्या अनुभवातून जयवंत दळवी काय शिकले? ज्या लोकांना आपल्या सेवेसाठी आलेल्या लोकांचे आभार मानण्याचीही लायकी नाही वा अक्कल नाही, त्यांना तसेच सडू द्यावे. आपल्या उदात्त कृतीची पावती मिळत नसेल तर त्याकडे पाठ फ़िरवावी. सेनापती बापट वा तात्कालीन सेवादल म्होरक्यांनी ज्या रहिवाश्यांची सेवा केली, त्यांना उपकार करणार्‍याचे आभार मानावेत इतकेही शहाणपण शिकवले नव्हते आणि नरेंद्र मोदी नेमकी तीच भावना समाजमनात रुजवित आहेत. त्यामुळे असे खुळे लोक दु:खीच होतील ना?

मुठभर लोकांनी मुंबईत गेटवे किंवा दिल्लीच्या इंडिया गेटपाशी मेणबत्त्या लावून मांडलेले प्रदर्शन त्यांना महान वाटते. पण त्याचाच देशव्यापी साक्षात्कार त्यांना हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे. कारण मेणबत्त्या वा तत्सम खुळेपणा त्यांचा विशेष अधिकार असतो ना? त्यांनाच अतिशय प्यारे असलेले दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकरांनीही अशीच अत्यंत हास्यास्पद मोहिम काही वर्षापुर्वी हाती घेतलेली होती. महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करीत नाही, म्हणून दाभोळकरांनी लहानमोठ्या शहरात वेगळी निदर्शने योजलेली होती. तिथे चौका चौकात जमून आपल्याच थोबाडीत मारून घ्यावे, असे त्या आंदोलनाचे स्वरूप होते. त्याला असे लोक महान शहाणपणा किंवा क्रांतीकारी चळवळ समजतात. इतक्या बौद्धिक अजीर्ण झालेल्या लोकांना नऊ मिनीटे कोट्यवधी लोकांनी निराशाग्रस्त कालखंडात आशेचा किरण ठरावा, अशा प्रतिकात्मक दिवे लावण्याच्या उपक्रमाची टिंगल टवाळी करण्यातच त्या उपक्रमाची महत्ता लपलेली आहे. कारण आता देशातली कोट्यवधी जनता अशा दिवाळखोर बुद्धीमंतांना घाबरू लागलेली आहे. त्यांच्या बुद्धीवर जमलेली काजळी दुर करण्यासाठीच तर मोदींनी नऊ मिनीटे मेणबत्ती वा कुठलाही दिवा पेटवण्याचे आवाहन केलेले आहे. ते नुसते परस्परांना हिंमत देण्यासाठीचे आवाहन नाही. देशात बुद्धीमान म्हणून मिरवणार्‍या शहाण्यांनी माजवलेला मुर्खपणाचा गडद अंधार दुर करण्यासाठीचा तेवढाच आशेचा किरण असल्याचे मोदींनाही जाणवलेले असावे. त्याचे अनुकरण नंतरच्या आठवड्याभरात जगातल्या अनेक देशात झाले, तर कोणी नवल मानण्याचे कारण नाही. कारण त्याची प्रेरणा सोपी सरळ आहे.

26 comments:

  1. अगदी बरोबर भाऊ, या सो कोल्ड पुरोगामी ताब्लिकी जमात वर एक शब्द बोलायला तयार नव्हते, अन आज उगवले लगेच दिवे लावून काय होणार असे म्हणत

    ReplyDelete
  2. छान लेख. उदाहरणासह विवेकी भूमिका मांडली आहे.शेवटी मोदी निवडलेले पंतप्रधान आहेत. जनतेला ते योग्य मार्गदर्शन करणारी.अति पुरोगामी नगरपालिका सुध्दा चालवत नाहीत. धन्यवाद

    ReplyDelete
  3. टाळ्या आणि थाळ्या वाजवणे एकवेळ निर्धोक होते,
    आता मेणबत्त्या, दिवे पेटवताना जवळपास काही ज्वलनशील पदार्थ वस्तू नाहीत, हात सॅनिटीझर ने धुतलेले नाहीत, तसेच वेळ अगदी ठरलेली असल्याने आणि लाईट नसल्याने चोऱ्या होणार नाहीत एवढी काळजी प्रत्येक व्यक्ती ने घेऊन हा गृहपाठ करायचा आहे.

    ReplyDelete
  4. Very much Agreed. Surely corona will not run by lighting candles or clapping but surely the morals of the people will be lifted by such events. And surely liberandus should not make fun of this as candle mrch their first step towards anything and everything. Well said

    ReplyDelete
  5. *अध्यात्माच्या दृष्टीने दिवा लावणे म्हणजे अवदसा आणि रोगांना घालवणे!*

    जेथे दिवा लागतो तेथील भूतपिशाच्च राक्षस आणि इतर निगेटिव्ह पावर्स आपोआप निघून जातात!

    त्यासाठी सकाळ-संध्याकाळ दिवा उदबत्ती आणि आरती करावी असे विधान आहे!

    ज्या ठिकाणी दिवा लागतो त्या ठिकाणचे आणि जिथपर्यंत प्रकाश जातो तिथपर्यंतचे विषाणू आणि अन्य जीव तसेच निगेटिव पावर्स नष्ट होतात!

    साध्या गोडेतेलाच्या दिव्या मुळे सुद्धा चमत्कारिक परिणाम हातात येतात!

    मोहरी म्हणजे सरसोच्या तेलाचा दिवा लावला असता वैरी नाश होतो!

    चांगल्या तुपाचा दिवला लावला असता लक्ष्मी प्राप्ति तसेच बलं आयुष्य बुद्धी सन्मार्ग कीर्ती इत्यादी सर्व काही प्राप्त होते!

    मातीची पणती लावली असता लक्ष्मी आणि नऊ प्रकारच्या जलदेवता म्हणजे माऊल्या उद्दीपित होऊन दीवा लावलेल्या ठिकाणी येतात व लावणार्‍याला वरदान देतात!

    तांबा, पितळ चांदी, सोने इत्यादी धातूंचे दिवे लावले असता त्यांचे लाभ अधिक प्रमाणात लावणाऱ्यांना मिळतात!

    काचेचे, स्फटिकाचे दिवे माता महालक्ष्मी, भगवान शिवशंकर यांना अतिशय आवडतात!

    स्मशानात लावलेली पणती तेथील अतृप्त आत्मे आणि पूर्वजांना अतिशय आवडते!

    वड, औदुंबर आणि पिंपळ वृक्षाखाली लावलेला दिवा बावन्न प्रकाराच्या देवतांना संतुष्ट करतो!

    सर्व समाजाने मिळून लावलेला दीपाचा संघात म्हणजे दीपमाला किंवा दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ सर्व देवतांना अत्यंत हितकारक आणि आवडणारी गोष्ट आहे! त्या ठिकाणी ते सतत वास करतात!

    ज्या ठिकाणी देवता वास करतात त्याठिकाणी रोगराई आणि निगेटिव पावर्स प्रमाद करू शकत नाहीत, त्यांना तेथून जावेच लागते.

    यासाठीच वर्षातून एकदा दीप-आवली म्हणजेच दिव्यांची ओळ तयार करण्याची प्रथा आहे!
    ज्याला आपण दीपावली असे म्हणतो! समस्त आसुरी शक्तीं विरुद्ध लढण्यासाठी हा एक मोठा अध्यात्मिक उपचार आहे!
    प्रेषक- डाँ कल्पना चोरडिया @वास्तुप्रगती वास्तुदोषमुक्ती
    9421822478

    ReplyDelete
  6. भाऊ... एक खंत आहे की, ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर जशी उजवी माध्यमे आहेत तशी मराठीत नाहीयेत..यूट्यूबवर पुरोगाम्याच्या अरेला कारे करणारे माहितपट दाखवणारे वाहीण्या आहेत. (पोस्टमन)..पण अनेक लोकापर्यत पोहचणयासाठी एखादं दृकश्याव्य प्रसार माध्यम असेल तर पुरोगामी विंचवाची नांगी ठेचता येईल. अन् अनेक लोकापर्यत पोहचता येईल. आपल्याला काय वाटते ते जरुर कळवा..

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनातले बोललात

      Delete
  7. संकटकाळात सर्व समाजाने एखादी सामूहिक कृती केली तर समाजातील काही घटक जे भयगंडाने पछाडले आहेत त्यांना मानसिक आधार मिळतो आपण एकटे नाही आहोत ह्या संकटकाळात हि भावना सुखदायी असते! इतका सोपा तर्क आहे दिवे लावण्यामागे.
    -krushna Deshmukh

    ReplyDelete
  8. भाऊ, अगदी योग्य शब्दात तथाकथित बुद्धीवाद्याना सुनावलत. मोदींनी परवा आवाहन केल्यावरच माझ्या मनात आलं की ही "गाढवं" त्याचा उहापोह करणार. काही जणांनी त्याला "इव्हेंट" म्हणून संबोधलं.
    नशीब, मोदींनी सांगितलं नाही की काही क्षण श्वासोच्छ्वास जोरजोरात करायचाय..! नाहीतर पुरोगाम्यांना तो हिंदू योग वाटला असता आणि विरोधाला विरोध म्हणून त्यांनी स्वतः चा श्वासच रोखून धरला असता..!!
    ह्या दीड-शहाण्यांना वाटतं की सरकारने दरवेळी येऊन "सध्या आम्ही ज्या वैधकीय सेवा पुरवल्यात. त्याची ही यादी आहे. इथून पुढचे आमचे हे-हे प्लॅन आहेत. आम्ही बरोबर केलं ना..? का काही चूक झाली आमच्याकडून..?" असं विनयपूर्वक ह्यांना विचारावं. जणू काही जनतेचेे प्रतिनिधी सरकार नसून हीच लोकं आहेत. कुठलंही कुशल नेतृत्व अश्या सगळ्याच गोष्टी आणि प्लॅन आधीच सर्वांसमोर मांडून निर्णय घेत नसतं. तर त्याची अमलबजावणी करून योग्य वेळीच ते सर्वांसमोर जाहीर करत. जग आणि W.H.O. सुद्धा जेव्हा भारताने योग्य वेळी घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचं स्वागत करते. तेव्हा सोनियाजी म्हणत होत्या की त्याची अमलबजावणी चुकीची झाली. १३0 कोटी जनतेला पूर्व सूचना देऊन मग अमलबजावणी करतोपर्यंत थांबायला "कोरोना" ला काय पुरोगाम्यांइतकी बुद्धी आहे काय..?
    परवा एम.आय.एम. चा एक नेता एका चर्चेमध्ये तात्याराव लहाने डॉक्टरांना "आपली मेडिकल सेवा किती तकलादू आहे. आणि ह्या लॉकडाऊन पिरियडचा सदुपयोग ही सेवा सुधारण्यात करण्यात यावा." असा सल्ला देत होता. पण सध्याच्या वैद्यकीय सेवा पुरवणा-यांबद्दल त्याला कौतुकाचे दोन शब्दही बोलता आले नाही. आपल्याच समाजाच्या लोकांकडून जेव्हा सेवा देणाऱ्यांचा अपमान केला जातो तेव्हा आपल्या लोकांना खडे बोल सुनावण्याचीसुद्धा ह्यांच्यात धमक नसते. किती पूर्वग्रहदूषित ह्यांच पुरोगामी तत्व ना..?

    ReplyDelete
  9. Pantpradhan Narendra Modi yaancjya pratyek upkramat 1 bhartiya mhanun sahabhagi howun, tyanchya prayatnanna saath dene aapke kartwya aahe. Modiji phakta Talya, thali, ghanta, wajwayla nahi sangat aahet, sarvangin prayatna chalu aahet Railway Coach hospital madhe convert karnyapasun, medical staff bharti, garibaana madat aase sarva prayatna government karte aahe. 🙏👍😔🕯️✅🙏

    ReplyDelete
  10. तुमच्या कामाला सलाम.....

    ReplyDelete
  11. वाईट झालेली आहे आणि आता तर त्यांचे राजकीय, सामाजिक अस्तित्व पणाला लागलेले आहे, धरता येइना,सोडता

    ReplyDelete
  12. सोडता येइना अशी बिकट अवस्था झाली आहे, म्हणून जळफळाट होत आहे, पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही

    ReplyDelete
  13. भारत पाकिस्तान बॉर्डर वर लावलेलं light lamp, sattellite imaging वरून अधोरेखित होतात
    भाऊ मला वाटत ,दिवा किंवा मेणबत्ती लावायचा उद्योग प्रतिकात्मक आहे पण घरातल्या light बंद करायचा उद्योग हा महत्त्वाचा उद्देश आहे त्यामुळे किती लोक प्रत्यक्षात follow करतात किती ताब्लिघी नाही करत , त्यामुळे कुठे मानव संसाधन जास्त ठेवावं लागेल याचाही अंदाज येईल

    ReplyDelete
  14. काही अति बुद्धिवादी लोक असे समजत आहेत की टाळी वाजवणे, दिवे लावणे हे सर्व corona घालवण्या साठी आहे. हे सर्व करायचे आहे ते corona विरुद्ध लढणाऱ्या आपल्या डॉक्टर, पोलीस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या बद्दल कृतज्ञा व्यक्त करण्या साठी. असे छोटे छोटे कार्यक्रम देऊन सर्व जनतेला यात सहभागी करून घेणाऱ्या पंतप्रधानांचे अभिननंदन.
    अनेक वर्षा पूर्वी दांडी येथे एका महात्म्याने मूठभर मीठ उचलण्याचा कार्यक्रम केला, जनतेला त्यात सहभागी करून घेतले आणि मस्तवाल इंग्रज शासन हादरले, हा इतिहास आहे, सामान्य जनतेला त्यांना जमेल असा कार्यक्रम देऊन लढ्यात सहभागी झाल्याची भावना या देशात झाली आणि पुढे इतिहास घडला. पण आंधळा मोदी विरोध हे समजून घेऊ शकत नाही.

    तेव्हा सर्व विज्ञानवादी बुद्धिवंतांनी यात सहभागी होऊ नये.

    दिवे लावण्याचे आम्ही आणि मोदी बघून घेउत
    🙏🏻धन्यवाद🙏🏻

    ReplyDelete
  15. पुरोगाम्यांचे मुख्य दुःख सर्वसामान्य जनता मोदींना साथ देते हे आहे.

    ReplyDelete
  16. थुंकण्यावर आनंद माणणार्यांना दिव्यावर शहाणपण कस दिसेल

    ReplyDelete
  17. "मुठभर लोकांनी मुंबईत गेटवे किंवा दिल्लीच्या इंडिया गेटपाशी मेणबत्त्या लावून मांडलेले प्रदर्शन त्यांना महान वाटते. पण त्याचाच देशव्यापी साक्षात्कार त्यांना हास्यास्पद वाटणे स्वाभाविक आहे." ही दोन वाक्ये ह्या लाथा झाडणारयांना पुरेशी आहेत.

    ReplyDelete
  18. तुम्हीच सांगता की स्वतःच्या धडा वर स्वतः चेच डोके पाहिजे. जर एखाद्याला ही कल्पना नाही आवडली तर लगेच तो पुरोगामी होत नाही. मला स्वतलाही ही कल्पना नाही आवडली पण मी BJP आणि मोदीजी चा समर्थक आहे पुरोगामी विचारांचा नाही. त्यामुळे हा लेख फारसा आवडला नाही.

    ReplyDelete
  19. "चले जाव" म्हणल्यावर जर इंग्रज गेले असतील.....

    तर दिवे लावल्यावर कोरोना नक्की जाणार !

    ������

    ReplyDelete
  20. I fully supporting this programme

    ReplyDelete
  21. भाऊ, अत्यंत परखड लेख. पुरोगाम्यांना तब्लिगी दिसले नाहीत पण मोदी लगेच दिसतात, गरिबांना 1लाख सत्तर हजार कोटी दिले. प्रत्येक वेळेस काहीतरी देण्यासाठी टिव्हिवर यायचे का? त्याशिवाय देशाच्या जनतेशी संवाद साधता येत नाही का? लॉकडाउन डिक्लेअर केल्यावर आपले कॉंग्रेसचे युवराज "या ऐवजी पँकेज डिक्लेअर करायला हवे होते" असं बरळले आणि कित्येक पुरोगाम्यांनी त्यांची तळी उचलली. (ट्रम्पनी लॉकडाउन ऐवजी आरोग्यव्यवस्था आणि पँकेजवर भर दिला आणि परिणामी 2500 बळी.) जसे काही पँकेज दिल्यावर कोरोना आपोआपच पळून जाणार होता. यांच्या मूर्खपणाची कीव करावी तेव्हढी थोडीच.

    ReplyDelete
  22. मी स्वत: एक वैद्यकीय सूक्ष्मजीवशात्रज्ञ आहे. श्वसनक्रियेला बाधक या अणूजीवाच्या साथीच्या सुरुवातीला जर मी म्हटले की कोरोना व्हायरस च्या साथीला आटोक्यात आणायला 3 आठवडे सर्व भारतीयांनी घरात राहावे. किती भारतीय घरात राहतील ? उत्तर आहे - कोणीच नाही. माझ्या सांगण्या वरून 137 कोटी भारतीय 21 दिवस घरी राहणार नाहीत. तिथे गरज आहे एका जननायकाची. आता जननायकाने म्हटले तरच जनता घरात राहील. पण त्यात विरोधकां च्या कारवायांमुळे किंवा इतर क्षुल्लक कारणाने विरोध झाला आणि 21 दिवसांच्या आधीच काही प्रमाणात जनतेचा विश्वास ढ़ळायला लागला तर ? त्यासाठीच टाळ्या वाजवून काम करणार्यांचे मनोबल टिकवणे जरुरी आहे. त्यासाठीच जनतेच्या सहभागाने 21 दिवस सर्व भारतीयांनी धैर्यशील राहाणे जरुरी आहे. म्हणुनच विजेचे दिवे बन्द करुन इतर दिवे, सर्व भारतीयांनी एकाच वेळेस लावणे जरुरी आहे. आपण एक आहोत, त्याने we can......we will...... ही भावना वाढीस लागेल.

    ReplyDelete
  23. ही असली संचारबंदी असते काय.?
    कशाला कर्फ्युला बदनाम करतात.?
    कायद्याचे अनुपालन करु शकत नसाल तर सत्ता सोडा.?
    राष्ट्रपती राजवट लावा. आणिबाणी लागु करा.
    काही ही करा पण १००% लाॅकडाऊन सफल करा.
    राज्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढतच चाललायं.
    मग आम्ही काही मुर्ख आहोत का दहा बारा दिवसा पासुन स्वतला घरात बंदिस्त करुन घ्यायला.?

    ReplyDelete