Thursday, April 5, 2018

कायरांची शायरी

Image result for shahid afridi

कोण तो पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ़्रिदी याला झोडपून काढायला अनेकजण पुढे सरसावलेले आहेत. त्याने म्हणे भारतीय काश्मिरात चालू असलेल्या सैनिकी कारवाईच्या विरोधात राष्ट्रसंघाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केल्याने हे भारतीय महात्मे खवळून उठलेले आहेत. कर्णधार विराट कोहलीपासून जावेद अख्तरपर्यंत अनेकांचे देशप्रेम उफ़ाळून आलेले आहे. अर्थात त्याची सुरूवात क्रिकेटपटू गौतम गंभीरपासून झाली आणि तो इतरांसारखा मोसमी देशभक्त नाही. प्रत्येकवेळी भारतीय सैनिक शहीद झाला, तेव्हा गंभीरने आवाज उठवलेला आहे आणि पुढाकार घेऊन अनेक सैनिकांच्या मुलांच्या भवितव्याची जबाबदारीही उचललेली आहे. पण बाकीच्या महानुभावांपैकी कितीजण यापुर्वी अशा पद्धतीने पाकच्या जिहादी हिंसेच्या विरोधात बोलायला पुढे आलेले होते? म्हणूनच कपीलदेवची प्रतिक्रीया योग्य वाटते. आफ़्रिदी कोण लागून गेलाय, की प्रत्येकाने उठून त्याचा निषेध करायला पुढे यावे? इतके महत्व देण्याइतका आफ़्रिदी मोठा नाही. आपण अकारण त्याच्या विधानाचा गवगवा करून त्याला मोठा करतोय, अशी कपीलची प्रतिक्रीया योग्य आहे. कारण परक्या आफ़्रिदीपेक्षाही आपल्याच देशात इथले अन्न खाऊन आपल्याच मातृभूमीशी गद्दारी करणार्‍यांना असे महानुभाव कधी दोन शब्द उच्चारून हटकत नाहीत. उलट कोणी बोललाच तर त्याला कला व राजकारण यांची गल्लत करू नका, असले शहाणपण मात्र शिकवायला या लोकांचा पुढाकार असतो. जावेद अख्तर यांनी यापुर्वी कुणाचे समर्थन केले आहे? भारतीय जवान सैनिकांच्या समर्थनासाठी ते कधी बाहेर पडलेले आहेत? मग आज अचानक त्यांना भारतीय सेनेचा पुळका कशाला आलेला आहे? आफ़्रिदीला शहाणपण शिकवण्यापेक्षा त्यांच्यासारख्यांनी जरा आपल्याच अंतरंगात डोकावून बघावे. मग तिथे दडी मारून बसलेला आफ़्रिदी अधिक घातक असल्याचे त्यांच्या लक्षात येईल.

आफ़्रिदी जे काही बोलला आहे वा त्याचा गुरू असलेल्या इमरान खानने यापुर्वी तशीच मुक्ताफ़ळे उधळलेली आहेत. त्याला कधी जावेद अख्तर यांनी जाब विचारला होता काय? जावेद अख्तर ज्यांच्यात उठबस करतात, ते बहुतेक लोक आफ़्रिदीचीच भाषा नित्यनेमाने बोलत असतात आणि त्यांचा कान अख्तर यांनी कधी पकडलेला नाही. हा वाद नवाही नाही. जोवर काश्मिरात भारतीय जवान पाकिस्तानी घातपातामुळे मारले जात आहेत, तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये अशी जाहिर भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मागल्या तीन दशकापासून मांडत आलेले होते. कधी पुढे येऊन अख्तर वा अन्य तत्सम शहाण्यांनी त्यांचे समर्थन केले होते. उलट ठाकरे खेळात वा कलाक्षेत्रात राजकारण आणतात, म्हणून त्यांच्यावर आग पाखडणारे हेच भारतीय होते. त्यात कोणी पाकचा आफ़्रिदी नव्हता. अख्तरही त्यापैकीच एक सदस्य आहेत. विषय कला वा खेळाचा नसून पाकिस्तानी मानसिकतेचा होता. पाकिस्तानी खेळाडू इथे वा अन्यत्र कुठे येऊन आपली राजकीय भूमिकाच पुढे रेटाणार असतील, तर तो संघ वा त्यातील कोणाकडे खेळाडू वा कलावंत म्हणून बघता येत नाही. माधव गोठस्कर या क्रिकेट पंचाने त्याविषयी पाकचे पाखंड उघडे पाडलेले होते. भारतीय दौर्‍यावर आलेला पाकिस्तानी संघ काश्मिरात कुठलाही सामना खेळायला राजी नसतो, कारण काश्मिर हा भारताचा प्रदेश नसल्याचा त्याचा दावा असतो. ही खेळातली भूमिका नसून राजकीय भूमिका आहे व होती. मग त्यांच्याशी कुठलाही सामना खेळण्यात खिलाडूवृत्ती कशी असू शकते? खेळाडू वा संघ खेळातही राजकारण करणार असेल, तर त्याला किकेट मानता येत नाही. त्याच्या वागण्याला कलेचा बुरखा चढवून पळवाट काढता येणार नाही. जावेद अख्तर वा अनेक पुरोगामी शहाणे नेमके तेच काम आजवर करत राहिलेले आहेत. कधी जावेद अख्तर यांनी त्यांचा कान पकडला होता काय?

आफ़्रिदी इथे येऊन कुणा भारतीय जवानाला गोळ्या घालत नाही. पण जे कोणी तशा गोळ्या घालतात वा त्यांच्या समर्थनासाठी भारतीय सैनिकांवर दगडफ़ेक करतात, त्यांच्या मदतीला कधी आफ़्रिदी आला नाही की इमरान खान आला नाही. ती गद्दारी भारतात बसलेल्या राजकीय नेत्यांपासून विविध क्षेत्रातल्या पुरोगाम्यांनी केलेली आहे. आफ़्रीदी त्यांच्याच भूमिकेत आज उभा आहे. मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन भारतीय पंतप्रधानाला हटवण्याची जाहिर मागणी करतो, तेव्हा अख्तर मियांनी कधी चार शब्द उच्चारले होते काय? भारतीय जवानांवर दगड फ़ेकले जातात आणि त्यांच्या लष्करी कारवाईत व्यत्यय आणला जातो. त्या गद्दारांच्या भेटीगाठीला जे कोणी मुखंड जातात, त्यांच्या निषेधाचे दोन शब्द अख्तर यांना सुचलेले आहेत काय? आपल्या घरातल्या झुरळांना मारायची हिंमत नसलेल्यांनी पाकिस्तानातल्या कुणा लांडग्याला वा कोल्ह्याला धमकवण्यात अर्थ नसतो. पाक कलाकारांना चित्रपटात घेऊ नये म्हणून मनसेने व राज ठाकरेंनी आवाज उठवला, तेव्हा अशा लोकांचा विवेक व अंतरात्मा झोपा काढत नव्हता काय? कितीजण तेव्हा राजच्या पाठीशी उभे राहिलेले होते? सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकच्या माजी मंत्र्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मुंबईत कार्यक्रम योजला, त्यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याची हिंमत शिवसैनिकांनी दाखवली. त्यांच्या पाठीशी यापैकी कितीजण उभे राहिले होते? नसतील तर आज त्यांनी आफ़्रिदीला इशारे देण्याची गरज नाही. तो पाकचा कुत्राच आहे आणि भारताच्या विरोधात भुंकत रहाणे, त्याचे जन्मजात कर्तव्य आहे. मुद्दा त्याच्या भुंकण्याचा नसून भारतात राहूनही आपल्या देशाशी इमान न राखणार्‍या श्वानांचा आहे. ते आपल्याच देशावर, आप्तस्वकीयांवर भुंकतात व चावायला झेप घेतात, त्यांच्या पेकाटात लाथ घालण्याचा विषय आहे. उगाच मोसमी देशप्रेमी दुकान थाटण्याची गरज नाही.

भारताला वा भारताच्या काश्मिरला आफ़्रिदी वा इमरान खान यांच्यासारख्यांचा अजिबात धोका नाही. त्यांची जी कुत्री इथे येत्तात वा घुसतात, त्यांना ठार मारायला आपले जवान सज्ज आहेत आणि त्यात शहीद व्हायलाही मागेपुढे बघत नाहीत. पण ते शहीद होत असताना त्यांच्यावरच भुंकणारी इथली कुत्री आहेत, त्यांचा बंदोबस्त होण्याला अगत्य आहे. भारतीय सरसेनापतीला ‘गलीका गुंडा’ संबोधणार्‍या संदीप दिक्षीत या कॉग्रेसी नेत्याला वेळच्या वेळी थप्पड मारण्यात पुरूषार्थ असतो. हुर्रीयतच्या गळ्यात गळे घालून भारतीय जवानांची निंदानालस्ती हसतखेळत ऐकून घेणार्‍या मणिशंकर अय्यरला कंबरेत लाथ घालण्याचा मुहूर्त मोलाचा असतो. जवानांचा जीव धोक्यात असताना हिंमतीने पुढे जाऊन एका दगडफ़ेक्याला जीपवर बांधून सफ़ल कारवाई करणार्‍या मेजर गोगोईला गुन्हेगार ठरवू बघणार्‍यांना चार शब्द ऐकवण्याची वेळ महत्वाची असते. तेव्हा ज्यांची दातखिळी बसलेली असते, त्यांनी आफ़्रिदीवर शेरबाजी करण्याची काहीही गरज नाही. त्याला ढोंग म्हणतात. भारत तेरे टुकडे होगे अशा घोषणा देणार्‍यांच्या थोबाडीत हाणायला पुढे येणे अगत्याचे असते. नेहरू विद्यापीठात जुने रणगाडे ठेवण्यास विरोध करणार्‍यांना कानफ़टीत मारताना हजर असणे आवश्यक असते. तेव्हा आपापल्या बिळात दडी मारून बसणार्‍यांना आज बोलण्याचा अधिकार नसतो आणि त्याची गरजही नसते. कारण आफ़्रिदीसारखी भुंकणारी कुत्री अशा मोसमी देसभक्तांना घाबरत नसतात, की दाद देत नसतात. त्यांना समजणारी भाषा बोलाणारा सरसेनापती आज देशाला लाभलेला आहे आणि योग्य भाषेत तो शब्दांनी व शस्त्रांनीही त्यांना उत्तरे देत असतो. किंबहूना त्यामुळेच ही पाकची जातीवंत कुत्री केकाटू लागलेली आहेत. त्यांच्या भुंकण्याचा रोख जावेद अख्तर वा तत्सम भंपकांच्या दिशेने नसून बंदुका रोखून उभ्या असलेल्या जवान व लष्करप्रमुखांच्या दिशेने आहे. कायरांच्या शायरीकडे नाही.

10 comments:

  1. भाऊ अप्रतिम,आधी आपल्या देशात असलेल्या गु खाऊ डुकरांना ठोकले पाहिजे, ह्या सगळ्या हरामखोर लोकांना देशाच, देशातील लोकांची काही घेणे देणे पडलेले नाही. स्वतः च्या मौजमजा करण्या साठी ह्यांनी देशाच्या पुढच्या पिढीला नरकात ढकलायची पण तयारी ठेवलीय

    ReplyDelete
  2. Well said bhau...

    ReplyDelete
  3. U tube war pak media baghital ki kalat kiti bhikari,pashuwar ani faltu desh ahe. Pan ithale purogami lokana ka yewdha pulka yeto tech kalat nahi.pak sarkhya vishari kidyala marayla sena pureshi ahe.bakichyani ugich pak LA moth karu naye.ani ek modini pakchya arthik Nadya pan band kelyat tywar etha koni bolat nahi pan pakla mihiti ahe.June made to desh black list wa diwalkhor honar ahe karan 90bil loan 10 pidhya gelya tari tyana fedta year nahi

    ReplyDelete
  4. भाऊ एकदम भारी कोल्हापुरी स्टाईल ने जावेद आख्तर या सफेद डाकुची पिस काढलीत ते फार छान झाले.
    या माणसाला काँग्रेस ने नेहमीच पुढे करून आपली रणनीती आखली आहे. हाच माणूस मोठ्या साळसूद पणे जेव्हा जेव्हा कोणी काँग्रेस विरोधी ऊभा रहातो तेव्हा तेव्हा हा माणुस जणुकाही आपणच विद्वान म्म्हणुन प्रश्न विचारुन मोठा विद्वान असल्याचे दाखवून काड्या लावत असतो.
    ह्या माणसाला मोठा यासाठी च केल गेलं नाहीतर याचे तळा गाळातुन वर येऊन सामाजिक योगदान काय? यानेच ज्यावेळी केजरीवाल ने चळवळीतुन पक्ष ऊभा करतोय असा देखावा ऊभा केला तेव्हा केजीवालना प्रश्न विचारुन जणुकाही केजरीवाल हा मसिहा आहे असे चित्र ऊभे केले. व सामान्य माणसाच्या मनात केजरीवाल विषयी साॅफ्ट काॅरनर भावना ऊभी केली. यामागे केजलीवाल या तीसर्या शक्ती मुळे अनेक मते डिव्हाइड होऊन काँग्रेस आघाडी परत सत्तेवर येईल असे प्रयत्न केले. परंतु मोदींनच्या झांझावाता पुढे या चालीचा टीकाव लागला नाही हे देशाचे सुदैव. नाहीतर एक दोन वर्षे असे आघाडी सरकार व नंतर परत काँग्रेस सत्तेवर असा माष्टर प्लॅन तयार होता म्हणजे देश कधी ही भरुन न निघणार्या खड्यात गेला असता.
    काँग्रेसने असे अनेक साप पाळुन मोठे अजगर केले मणीशंकर कुमार केतकर ही त्यातीलच एक.
    सामान्य माणसाला हे सर्व समजायला अनेक दशके लागली. व आजुन काही सामान्य माणसांच्या लक्षात हे आले आहे. अनेक बेफिकीर व अशिक्षीत नागरिकांच्या विचार शक्ती बाहेरील चाली खेळत सत्तेवर राहून घराणे शाही लादली.
    अशीच लक्तर काढणे आवश्यक आहे. धन्यवाद.
    एकेएस

    ReplyDelete
  5. पाक मीडिया बघा तो देश आर्थिक बरबाद होत आहे हिंदुस्थान ने आणि विशेषतः मोदी ट्रम्प यांनी अशी काहि चपराक मारली आहे पाकडे आता जगात एकटे पडलेत। आणि म्हणून इथले इमान नसलेल्या लोकांना आता देशप्रेम आठवत आहे। कारण त्यांच्या हाती आता देशभक्ती दाखवण्या शिवाय काही उपाय नाहीं

    ReplyDelete
  6. पाक लवकरच संपलेले दिसेल

    ReplyDelete
  7. You must not forget that Javed Akhtar opposed opposition to Vande Mataram by Owaisi in the Parliament.

    ReplyDelete
    Replies
    1. You must not forget that few yrs ago Shabana Azmi attended Pak Independence day

      Delete
  8. भाऊ, शाहिद हा शब्द वापरला जाऊ नये त्या ऐवजी हुतात्मा योग्य ठरेल

    ReplyDelete