Monday, April 16, 2018

सत्याचा असीम आनंद

aseemanand acquitted के लिए इमेज परिणाम

कुठलाही खोटानाटा आरोप लावायचा. याच्या आधारे माध्यमातून गदारोळ माजवायचा. त्याचा खुलासा समोर येऊ द्यायचा नाही. सत्य समोर आणायचा कोणी प्रयत्न केला, तरी तो आवाज दडपून टाकायचा. मग ज्यांच्यावर आरोप केलेत, त्यांच्या अटकेसाठी धुमाकुळ घालायचा. त्यातून पुन्हा हिंदू असल्याची लाज वाटायचे नाटक सुरू करायचे आणि न्यायासाठी लढाई असल्याचा आव आणायचा. ही गेल्या दोन दशकात गुन्हेगारी मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. पण प्रत्येकवेळी ही गुन्हेशैली न्यायाच्या कसोटीवर तोंडघशी पडलेली आहे. हेच मालेगाव स्फ़ोटात झाले. तेच अजमेर खटल्यात झाले आणि आता मक्का मशीद खटल्यात झालेले आहे. त्यात निरपराधी पकडायचे आणि सरकारी तपास यंत्रणांना गुन्हेगारी पद्धतीने कामाला जुंपून खोटे खटले भरायचे. त्याची सुनावणी लांबवत राजकारण खेळायचे, ही पद्धत आता पुर्णपणे उघडी पडली आहे. त्याची सुरूवात गुजरातच्या दंगलीपासून झाली आणि आता ती पुरती नाकाम झाल्यावरही त्याचेच नवनवे प्रयोग चालू असतात. कालपरवा कठुआच्या बलात्कार प्रकरणात त्याचा नवा चेहरा समोर आला. ती घटना खोटी नसली तरी त्यात कुठल्याही पुराव्याशिवाय संपुर्ण हिंदू समाजाला लाज वाटण्यासाठी जे दबावतंत्र वापरले गेले, त्याला पुरोगामी मोडस ऑपरेन्डी म्हणतात. म्हणूनच कठुआ असो किंवा उन्नावची घटना असो, त्यातले सत्य भलतेच काही निघण्याची आता खात्री वाटू लागलेली आहे. मक्का मशिद स्फ़ोटाच्या खटल्यात असीमानंद वा अन्य आरोपी पुर्णतया निर्दोष सुटले. कारण त्यांच्या विरोधात कुठला पुरावा नाही. मग ११ वर्षे त्यांच्या विरोधात पांडित्यपुर्ण बकवास करणार्‍यांना कुठली लाज वाटली आहे काय? कशाला वाटेल? पहिल्या क्षणापासून आपण खोटेपणा करतोय याची खात्री ज्यांना असते, त्यांना लाजलज्जा कधीच नसते. पण त्यांचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी असीमानंद वा कर्नल पुरोहितांना मात्र अग्निदिव्य करावे लागत असते.

भारतीय अध्यात्म, धर्मशास्त्र वा पुराणकथा बघितल्या तर त्यातून तोच बोध मिळतो. त्यात सत्यशील वा सत्यवादी असतात, त्यांनाच कायम आपल्या खरेपणाच्या सत्वपरिक्षा द्याव्या लागलेल्या आहेत. खोटारडे मात्र प्रत्येक युगात व समाजात उजळमाथ्याने आपला खोटेपणा मिरवत राहिलेले आहेत. आजच्या युगात त्या जमातीला पुरोगामी संबोधले जाते. पुराणात त्यांना मायावी राक्षस वगैरे संबोधने होती. असीमानंद यांच्या छळ करून मिळवलेल्या कबुलीजबाबावर हा सगळा तमाशा अवलंबून होता. यात काहीही नवे नाही. गुजरात दंगलीला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचीच फ़ुस होती व त्यांनीच ती दंगल घडवून आणल्याच्या आरोपाचा आधार काय होता? तर गोध्रा घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली. तिथे गोध्रा घटनेची प्रतिक्रीया उमटेल आणि त्यात हिंदूंना आपला राग व्यक्त करण्याची मोकळीक द्यावी, असे पोलिसांना म्हणे मोदींनी आदेश दिलेले होते. तिथे हजर असल्याचे सांगत संजीव भट या अधिकार्‍याने हा गौप्यस्फ़ोट केला होता. तो धडधडीत खोटे बोलत असल्याचे बारा वर्षांनी सुप्रिम कोर्टातच सिद्ध झाले. पण तेवढ्या विधानावर बारा वर्षे देशातच नव्हेतर जगभर मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आलेले होते. बारा वर्षे एका निरपराध माणसाला गुन्हेगार ठरवून बदनाम केल्याची यापैकी एकाला तरी लाज वाटली होती काय? कशाला वाटेल? ज्यांचा धर्मच खोटे बोलण्यात सामावलेला आहे, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करता येईल? जयपूरच्या पक्ष अधिवेशनात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बेछूट खोटे बोलत संघाच्या शाखेवर घातपाती प्रशिक्षण दिल्याचे ठासून सांगतात, त्यांच्याकडून किमान सत्याची कोणी अपेक्षा करावी? पण अशा लोकांच्या हाती सत्ता गेली, मग निरपराध पुरोहित वा असीमानंद यांना अग्निपरिक्षेला सामोरे जावे लागत असते.

गुजरातमध्ये खोटेपणा सुरू झाला आणि पुरोगामीत्व मिरवण्यासाठी माध्यमातलेही दिवटे त्यामागे भरकटत गेले. म्हणून आज पत्रकारितेने आपली जनमानसातील प्रतिष्ठा गमावली आहे. गुजरातनंतर पुरोगामी कॉग्रेसला दिल्लीतली सत्ता मिळाली आणि तमाम पुरोगाम्यांना हिंदू समाजाला अपराध भावनेत गुंडाळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यातून मग हिंदू दहशतवादाचे भुत निर्माण करण्यात आले. त्यासाठी मालेगावच्या स्फ़ोटाचे खापर पुरोहित व साध्वी यांच्या माथी मारण्यात आले. त्यांच्यावर मोक्का लावता गेला आणि सुनावणीशिवाय त्यांना गजाआड डांबून ठेवण्यासाठी मग कुठल्याही घातपात व स्फ़ोटात त्यांची नावे गोवण्याचा सपाटा सुरू झाला. त्यात समझोता एक्सप्रेस, अजमेर, मक्का मशीद अशा कुठल्याही प्रकरणात पुराव्याशिवाय त्यांची नावे गोवली गेली. सोमवारी जो निकाल आला, तोही तसाच खटला आहे. त्यात कुठलाही पुरावा नाही की कोणी साक्षीदार नाही. हाणूनमारून कोणाच्याही खोट्या जबान्या घेण्यात आल्या आणि त्यांनी कोर्टात त्याच साक्षी देण्यास नकार दिला. अशा खोटेपणाची केंद्रीय गृहखात्याकडून सुरूवात झाल्याची, तात्कालीन गृह मंत्रालयातील मणि नावाच्या अधिकार्‍याने ग्वाही दिलेली आहे. त्याला पुरक कागदपत्रेही समोर आणली गेली आहे. न्यायालयीन यंत्रणेचा वापर करून हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याचे मोठे कारस्थान युपीए कारकिर्दीत राबवले गेले. त्याचीच लक्तरे आता चव्हाट्यावर येत आहेत. असीमानंद यांचाच कबुलीजबाब हा त्यांच्या विरोधातला सर्वात भक्कम पुरावा होता. याखेरीज काहीच नसेल, तर खटला चालतो कशाला आणि इतकी वर्षे लांबतोच कशाला? तर त्यातून हिंदूंच्या मनात अपराधगंड निर्माण करायचा खरा डाव! आताही कठुआच्या घटनेनंतर हिंदू असल्याची लाज वाटण्याचे नाटक रंगवण्याचा उद्योग झालाच ना? तोच आता उघडा पडला आहे.

अलिकडे लोया प्रकरण असेच गाजवले गेले. त्यात कसलेही पुरावे नाहीत. संभाजी भिडे वा कोरेगाव भीमा घ्या. तिथेही पुराव्याची बोंब आणि भिडे गुरूजींना अटक करा हा आग्रह आहे. त्यासाठी आंदोलन पुकारले जाते. आपण बेछूट आरोप करायचे आणि कसल्याही पुराव्याशिवाय अटकेच्या मागण्या करायच्या. अटक झालेल्यांना मग तारखा लांबवून आत सडवायचे, ही पुरोगामी कार्यशैली आहे. भिडेंना अटक करण्यापेक्षा असीमानंद वा पुरोहित यांच्या खटल्याचा वेगाने निकाल लावण्याची मागणी का झाली नाही? अशा मागण्या अटकेसाठी असतात. न्यायाची मागणी कुठेच होताना दिसणार नाही. हातात फ़लक न्यायाच्या मागणीचे असतात. पण हट्ट अटकेसाठी होत असतो. अटक झाल्यावर पुढे काय? पुढे काहीच नाही. पुरोहित प्रकरणात जामिन देताना सुप्रिम कोर्ट म्हणाले, कुठल्या तरी जमातीला खुश करण्यासाठी अन्य कुठल्या निरपराधाला दिर्घकाळ तुरूंगात डांबून ठेवण्याला मान्यता देता येणार नाही. या एका वाक्यातून हिंदू दहशतवादाचे पितळ पुर्णपणे उघडे पडलेले आहे. खटल्याशिवायच हिंदू नामवंतांना, संघटकांना व धार्मिक नेत्यांना तुरूंगात डांबण्याचे कारस्थान म्हणजे, ही तथाकथित ‘न्यायाची लढाई’ असे समिकरण झालेले आहे. कठुआ प्रकरणातही वकील वा भाजपा नेत्यांनी संपुर्ण तपास व चौकशीची मागणी केलेली होती. त्यांच्यावर बलात्काराचे समर्थन केल्याचा खोटा आरोप लावण्यात आला. गदारोळ करायचा आणि न्यायाचाच बळी घ्यायचा, ही पुरोगामी गुन्हेशैली हिंदूंना धर्मवादी व धर्माच्या नावाखाली एकत्र येण्यास भाग पाडत चालली आहे. पुढल्या वर्षी लोकसभा मतदानात केवळ हिंदू नेता वा पक्ष म्हणून भाजपाला मोठे यश मिळाले, तर त्याचे मोठे श्रेय अशा पुरोगाम्यांना असेल. कारण त्यांनी क्रमाक्रमाने हिंदू तटस्थतेला सुरूग लावण्याचा कहर केला आहे. असीमानंद यांच्या निर्दोष सुटकेने कठुआ प्रकरणातली हवाच घालवली आहे.

9 comments:

 1. यातल्या कोणत्याही महाभागास आयसीस च्या क्रौर्यामुळे मुसलमान असल्याची लाज वाटली नाही.कश्मिरी पंडितांची ससेहोलपट यांना विचलित करू शकली नाही.हिंसेपासून दूर राहणारा,अशी हिंदू शब्दांची सार्थ उकल आहे.पण राजकीय लाभासाठी त्याला सतत अपराधीभावनेने पछाडून ठेवण्यात कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे लक्षात येते.
  भाऊ, कधी कधी निराशा दाटून येते.प्रत्येकवेळी राष्ट्र भक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते.आयुष्य भ्रष्टाचारात बरबटलेले पुरोगामी म्हणवून घेत देशाचे तुकडे करणा-यांची तळी उचलून धरतात.
  घोर कलियुग! हंस दाना चुगायला महाग आहे आणि कौवे मोत्यांच्या राशीत लोळत आहेत.

  ReplyDelete
 2. कठुआ चे पण सत्य बाहेर येऊ लागलेय त्या मुलीचा खून झाला होता रेप नाही हा प्राथमिक अहवाल मेहबुबा मुफ्तीने दबाव आणला व रेप झाला आहे असा खोटा अहवाल सादर केला .तसेच ज्या देवळात मुलगी मिळाली ते खुला मंदिर होत आणि तिच्या अगावर जे कपडे होते त्यावर चिखल होता व त्या परिसरात पाऊस व तसे काही नव्हते .खरे कारण रोहिंग्या आहेत ती मुलगी ज्या मुस्लिम जमातीची आहे त्यांना रोहिंग्या त्रास देतायत व त्यांना ते नको आहेत पण पुरोगामी मेहबूबा ला ते हवे आहेत त्यासाठी त्यांना बचावले जात आहे . आणि एक जेव्हा पाकिस्तानी सेने १९९९ वेळी बॉर्डर पार करून अली होती तेवा याच गुराखी मुस्लिमणी भारत सरकारला कळवले होते कारण त्यांचा वावरच तिथे असतो ,त्याचा राग पण आहे मेहबूबा व इतरांना ,कारण सियाचीन भारताला मिळालं त्यांना ते नको होत. काँग्रेस काय मतांसाठी नेहरूंनी काश्मीर ची काय वाट लावली ते भोगतोच आहे आपण

  ReplyDelete
 3. what's app वर कालपासून जम्मूतील बालात्कारावर भरपूर पोस्ट आल्या. काहिच आश्चर्य वाटले नाही. कारण हे सर्व तर होणारच. मुळात आपण " गजवा ए हिंद " हि संकल्पना समजून घेतली नाही. https://www.youtube.com/watch?v=5OBRC3_Hi80 पुढे येते ती गोष्ट म्हणजे ढोंगी पुरोगामी लोकांची. हिंदूंना या लोकांनी इतिहास बदलून, मिडिया चा वापर करून बेहोष केले आहे. आपल्याला हे माहित नसते कि , पृथ्विराज चौहान पराभवानंतर आपले युद्ध चालू आहे ते अजूनही चालूच आहे. माझे व्यक्तिगत मत आहे कि," यात आपण काहीच करू शकत नाही. सर्व काही श्री भगवती म्हणजेच श्री जगदंबा करेल." पण त्यात भयंकर विनाश होईल हे निश्चित. हे युद्ध जिंकणे हे श्री मोदींच्या क्षमते पलीकडचे आहे. खूप धाडसी निर्णय, प्रचंड जनमत पाठीशी किंवा हुकुमशहा पद्धत वगैरे काहीतरी असलेला राज्यकर्ता च हि परिस्थिती पालटू शकतो. फाळणी च्या वेळेस श्री आंबेडकर व सावरकर तळमळून सांगत होते कि, लोकसंख्येची अदलाबदल केली पाहिजे. पण गांधी नेहरूंना सर्व जाती धर्माचे नेते होण्याचे डोहाळे लागले होते. असो आजचा भाउंचा लेखही वाचला पाहिजे असा आहे.

  ReplyDelete
 4. ..गता पहारा सुरु आहे.

  ReplyDelete
 5. १८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरातील मक्का मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ९ जण ठार झाले होते. हा स्फोट झाला तेव्हा पोलिसांचा संशय बांगलादेशी दहशतवादी संघटना ‘हुजी’वर होता. पण जेव्हा पोलिस खोलात गेले तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराने पछाडलेल्या काही जणांचा कट असल्याचे उघडकीस आले आणि देशभर हलकल्लोळ माजला. त्या वेळच्या यूपीए सरकारने ही घटना म्हणजे ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचा आरोप केला आणि या आरोपाने देशातील राजकीय वातावरण तप्त झाले. त्याअगोदर एक वर्ष मालेगावमध्ये, नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये आणि राजस्थानमधील अजमेर शरीफमध्ये बॉम्बस्फोट झाले होते.

  या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये एक समान सूत्र असल्याची खात्री पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला पटल्यानंतर स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, सुनील जोशी व काही अन्य जणांना देशभरातून अटक करण्यात आली. या सर्व आरोपींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचे दुवे सापडल्याने तर आणखी खळबळ उडाली होती. आजपर्यंत देशात हिंदू-मुस्लिम दंगली पेटाव्यात, देशात धार्मिक असंतोष उफाळावा या कुटिल उद्देशाने पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले केले जात होते. पण आता असे हल्ले करणाऱ्यांमध्ये देशातल्याच कट्टर हिंदुत्ववादी संघटना सामील असल्याचे चित्र उभे राहिल्याने सगळेच चक्रावून गेले. देशाला नक्षलवादाच्या समस्येशी दोन हात करताना नाकी नऊ येत असताना कट्टर धार्मिक हिंदू संघटनांचे हे आव्हान गंभीर होते. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामी असीमानंद यांनी दिल्लीतील तीसहजारी न्यायालयात मुस्लिमांच्या धार्मिक स्थळी स्फोट घडवून आणणे किंवा मुस्लिमबहुल भागात बॉम्बस्फोट घडवून आणून देशात दंगली पेटवण्याचा आमचा प्रयत्न होता, अशी कबुलीही दिली होती. त्यांनी आपला हात अजमेर शरीफ, समझौता एक्स्प्रेस, मक्का मशीद, मालेगाव बॉम्बस्फोटात असल्याचाही जबाब दिला . शिवाय जबाबात आरएसएसचे एक नेते इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा ठाकूर, संघप्रचारक सुनील जोशी या साथीदारांचेही नाव घेतले होते. स्वामी असीमानंद यांचा हा जबाबच एका अर्थाने या सगळ्या घटनांना वळण देणारा होता. या जबाबामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान भारताच्या विरोधात रान पेटवू लागला. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पाकिस्तानविरोधातील जी मोहीम सुरू होती त्यात अडथळे आले. नंतर या प्रकरणाला दुसरे वळण लागले ते आणखी एका निर्णयाने. याअगोदर सीबीआय मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा तपास करत होती. पण नंतर हा तपास त्यांच्याकडून काढून घेऊन तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला. या यंत्रणेने सीबीआयने गोळा केलेले पुरावे आपल्याकडे मागून घेतले, शिवाय स्वत:ही या प्रकरणाचा तपास केला होता. दरम्यानच्या काळात स्वामी असीमानंदनी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आपला जबाब फिरवला, त्यात अनेक साक्षीदार उलटल्याने हे प्रकरणच खिळखिळे झाले. आता सोमवारी स्वामी असीमानंद यांच्यासह पाच आरोपींची मक्का मशीद स्फोटातून पुराव्याअभावी सुटका झाली आहे. यापूर्वी स्वामी असीमानंद यांची अजमेर शरीफ बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका झाली होती व आता त्यांच्यावर फक्त समझौता एक्स्प्रेस प्रकरणाचे आरोप आहेत.

  मक्का मशीद प्रकरणाचा खटला ११ वर्षे न्यायालयात होता व आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याच्या कारणावरून सर्वच आरोपी निर्दोष सुटत असतील तर हा स्फोट कुणी केला व त्यामागे कोणत्या यंत्रणा आहेत, अशा खटल्यांवर कोणता राजकीय पक्ष, संस्था दबाव आणत आहे, सर्वच साक्षीदार कशामुळे फिरतात, केंद्रातले सरकार तपास यंत्रणांच्या कारभारात हस्तक्षेप करते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  वर उल्लेख केलेली सर्वच प्रकरणे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहेत. पोलिस यंत्रणा, न्याययंत्रणा, गुप्तहेर यंत्रणा सर्वच पातळ्यांवर निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले आहे. पोलिसांची तपास पद्धती व बड्या अधिकाऱ्यांचे सत्तेपुढे लीन होणे ही आता नवी बाब राहिलेली नाही. दहशतवादाचे राजकारण करणे, त्यावर निवडणुका जिंकणे हा राजकीय पक्षांचा उद्योग असला तरी पोलिस, न्यायव्यवस्थेचे ते काम नाही. पण या व्यवस्था राजकीय पक्षांच्या अजेंड्यात स्वत:ला सामील करून घेणाऱ्या दिसतात. या यंत्रणांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेली प्रकरणे, हायप्रोफाइल खटले शेवटपणे तडीस नेण्यात येणारे अपयश निश्चितच संतापजनक आहे. पोलिस सुधारणांचे कायदे आणून गुन्हेगारांना शिक्षा होईल हा दावा अपुरा आहे. मुळात पोलिसांनी सचोटीने, नि:पक्षपातीपणाने, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केले तर अनेक गोष्टी साध्य होतील व या देशात न्याय मिळतोय यावर सर्वांचा विश्वास बसेल.

  ReplyDelete
  Replies
  1. ज्याप्रमाणे साध्वींना मारहाण केली गेली त्याच प्रमाणे सर्वांनी असीमानंदांकडुन जबाब घेतला गेला होता.

   Delete
 6. I have sent just now in another mail editorial from divya marathi please reply

  ReplyDelete
 7. श्री भाऊ आज right angles च्या website वर श्री प्रकाश बाळ यांचा लेख वाचा माझा असा समज आहे की आपण अतिशय निष्पक्ष आणि निर्भीडपणे लेखन करताय माझी आपणास नम्र विनंती आहे कृपया ह्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन खर काय ते सर्वांसमोर आणावं

  ReplyDelete
  Replies
  1. महाशय तुम्ही जे काही म्हणताय पण इथे न्यायालयच म्हणत आहे कि पुराव्याशिवाय केवळ एका समाजाला खुश करण्यासाठी हे हिंदू दहशतवादाचे कुभांड रचण्यात आले आहे. केवळ कोणाचा मारून,हाणून घेतलेला जबाब हा पुरावा ठरत नाही. त्याला इतर पुरावे लागतात. आणि २०१४ पर्यंत तर कॉंग्रेस सत्तेत होती न? मग सहा वर्षे त्यांनी हे खटले का निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? उत्तर स्पष्ट आहे कि मुळात काही नव्हतेच. बरे हिंदू दहशतवाद म्हणून भौनी वर उल्लेख केलेली नवे वगळता पुढे काहीच दिसत नाही हे कसे? कि संपुआ सरकारने हिंदू दहशतवाद नावाचा राक्षस संपवला असे म्हणायचे आहे आपणास?

   Delete