Saturday, April 7, 2018

पवार पंतप्रधान व्हावेत! ........पण‌‌ऽऽऽऽऽऽऽऽ

sharad pawar के लिए इमेज परिणाम

सध्या शरद पवारांनी तमाम मराठी राजकारण्यांना लाजविल अशा उत्साहात हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात त्यांनी अनेक कार्यक्रमांचा सपाटा लावलेला आहे आणि राष्ट्रीय पातळीवरही राजकीय संवाद साधला आहे. इतरही प्रांतातले व दिल्लीतले राजकीय नेते मोदींना पर्याय शोधत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी पवारांनाच पंतप्रधान पदाची ऑफ़र दिल्याचीही बातमी आली. त्यावरून अनेक उलटसुलट बातम्या प्रतिक्रीया आल्या आहेत. त्यातल्या सकारात्मक प्रतिक्रीया अर्थातच पवारांच्या समर्थकांच्या आहेत आणि हेटाळणीयुक्त नकारात्मक प्रतिक्रीया राजकीय विरोधकांच्या आहेत. पण त्या टवाळखोर प्रतिक्रीयांमध्येही एक गट असा आहे, जो पवार विरोधक नसून पवारांच्या चहाता आहे. पण त्यांच्या नाकर्तेपणाने त्यांच्यावर रागावलेला आहे. पवारांपेक्षाही अशा वर्गाची मोठी अपेक्षा होती आणि पवारांकडून ती पुर्ण होऊ शकली नाही, म्हणून रागावलेला असा तो वर्ग आहे. सहाजिकच असा अपेक्षाभंग झालेल्यांची प्रतिक्रीया तीव्र आणि तिखट असते. पण त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की त्यांच्या अपेक्षा पुर्ण होण्याची किंचीत शक्यता दिसली, तरी असे रागावलेले क्षणार्धात आपला राग गुंडाळून त्याच पवारांच्या मागे उभे ठामपणे उभे रहातील यात शंका नाही. आणि अशा लोकांची संख्या पवार समर्थकांपेक्षा मोठी आहे. म्हणूनच तशी कुठलीही शक्यता असेल वा समिकरण जुळणार असेल, तर शरद पवार यांनी त्यात विचारपुर्वक प्रयत्न करून पुढाकार घेतला पाहिजे. पण आपल्या समर्थक वर्गाला खुश करण्यासाठी ते प्रयत्न असता कामा नयेत, तर ज्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यांना मराठी माणूस पंतप्रधान झालेला बघायची अतीव इच्छा आहे आणि ती शक्यता केवळ पवारांच्याच बाबतीत शक्य आहे. पण त्या दिशेने प्रयत्न करताना एक गोष्ट ठामपणे निश्चीत करून वाटचाल झाली पाहिजे.

नेहमीच्या राजकारणातली पवारांची धरसोडवृत्ती वा तडजोडीला शरण जाण्याच्या स्वभावाला पवारांनी पहिला रामराम ठोकला पाहिजे. सोनियांची ऑफ़र आल्यानंतर खुद्द पवारांनी आपण त्या स्पर्धेत नसल्याचा खुलासा केलेला आहे. पण त्यांच्या असल्या राजकीय वक्तव्यावर त्यांचे आप्तस्वकीयही कधी विश्वास ठेवणार नाहीत. पवार जी धडपड आज करीत आहेत, ती गमावलेली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी असून, त्यांना भले राज्यात प्रतिसाद मिळत नसला, तरी देशाच्या विविध राज्याचे नेते त्यांच्याकडे अपेक्षेने बघत आहेत. त्याला या परप्रांतीय नेत्यांचे पवारप्रेम कारणीभूत नसून पवारांचा अनुभव, जाण व कुवत हे कारण आहे. मोदींच्या स्पर्धेत कोणी अन्य विरोधी नेता उतरू शकत असेल, तर तो फ़क्त शरद पवार हाच आहे. ही जाणिवच सर्व पक्षांना पवारांकडे बघायला भाग पाडते आहे. कारण त्याखेरीज दुसरा कोणी चेहराच विरोधकांपाशी नाही. ही देशातील इतर तमाम लहानसहान पक्षांची व नेत्यांची अपेक्षा आहे. त्यातून कॉग्रेससारख्या देशव्यापी मरगळलेल्या पक्षाचीही सुटका नाही. म्हणूनच आपली प्रतिमा, अनुभव आणि कुवत ही जमेची बाजू मनाशी पक्की करूनच पवारांनी पुढली पावले उचललॊ पाहिजेत. १९९६ सालात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी तमाम विरोधकांनी बहूमताचे गणित जमवले, पण त्यांच्यापाशी नेतॄत्व नव्हते. तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री ज्योतू बसू यांचे नाव पुढ आलेले होते. आज त्याच जागी शरद पवार हे एकमेव नाव विरोधकांच्या यादीत आहे. वय अनुभव आणि समज असलेला त्यांच्याखेरीज अन्य कोणी नेता नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉग्रेस किती खासदार लोकसभेत निवडून आणू शकते, ती बाब दुय्यम असून देशभरच्या बिगर भाजपा नेत्यांना एकत्र नांदवू शकेल असा नेता, ही पवारांची जमेची बाजू आहे. ती विचारात घेऊन पवार हालचाली करणार असतील, तर महाराष्ट्रातील चित्रही बदलून जाऊ शकते.

अनेकदा त्यांच्या हयातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब खुलेपणाने सांगायचे. शरदबाबू पंतप्रधान होणार असतील, तर त्यांना माझा पाठींबाच राहिल. ती गंमत नव्हती. तर ते सत्य बोलत होते. पंतप्रधान पदावर दावा करू शकेल आणि तिथपर्यंत मजल मारू शकेल, असा एकमेव नेता राज्यात होता व आहे, त्याचे नाव शरद पवार. मराठी माणसाला पंतप्रधान होताना बघण्यासाठी बाळासाहेब आपले राजकीय हेवेदावे बाजूला टाकायला तयार होते, तर सामान्य मराठी माणूस त्यांच्यापेक्षा वेगळा विचार करूच शकत नाही. ही प्रत्येक भाषिक राज्यातील जनतेची मनिषा असते. ही अस्मिताच मोदींनाही उपयोगी ठरलेली आहे. ५६ टक्के मते व सर्वच्यासर्व लोकसभेच्या जागा गुजरातने मोदींना दिल्या. महाराष्ट्र त्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. मात्र नुसता पंतप्रधान असून चालत नाही. त्याचा दबदबाही तितकाच असला पाहिजे. मनमोहन पंतप्रधान झाले म्हणून त्यांच्यामागे पंजाब उभा राहिला नाही, की देवेगौडांच्या मागे कर्नाटकही एकदिलाने उभा राहिला नव्हता. पण गुजरात मोदींच्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकला. त्याच कारणास्तव महाराष्ट्रही पुर्ण शक्तीनिशी पवारांच्या मागे उभा राहू शकतो. त्याच दिशेने पवारांना प्रयास करावे लागतील. मोदी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यानंतर त्यांच्याच इशार्‍यावर व संमतीने त्यांचा पक्ष व एनडीएची आघाडी चाललेली होती. नेत्याची अवज्ञा कोणी करत नव्हता व उरलेल्या नेत्यांमधली भांडणे व विवाद मोदींच्या हस्तक्षेपाने संपुष्टात येत होते. पवारांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व घ्यायचे असेल, तर त्यांच्याकडे तितके निर्णायक अधिकार आघाडीतील बाकीच्या पक्ष व नेत्यांनी दिले पाहिजेत आणि पवारांच्या शब्दाचा मानही राखला पाहिजे. ही अट घालून व इतरांना ती स्विकारायला लावूनच पवारांनी त्या आखाड्यात उतरले पाहिजे. ते अशक्य अजिबात नाही. कारण योग्य नेता ही इतरांची गरज असून पवारांची लाचारी नाही.

मोदींच्या गुजरातमधील यशाचे रहस्य त्यांच्याही आधी शरद पवार यांना उमजले होते आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलेले होते. त्यांना आज ते आठवत नसेल. तर पवारांनी आठदहा वर्षापुर्वी शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीचा तो भाग हुडकून पुन्हा ऐकावा. एनडीटीव्ही या वाहिनीच्या वॉक द टॉक या कार्यक्रमात पवार म्हणाले होते, शेजारी राज्याकडे बघा. तिथला मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी धडपडतो आहे आणि अवघी गुजराती जनता त्याच्यामागे ठामपणे उभी राहिली आहे. नेत्याच्या पाठीशी जनता कशी वा का उभी रहाते, त्याची जाण पवारांना आहे. म्हणूनच आपल्या पक्षाचे चारसहा खासदार नसतील, तर पंतप्रधान पदाची स्वप्ने बघण्यात अर्थ नाही, हे पवारांचे विधान पटणारे नाही. विषय परिस्थिती व राजकीय समिकरणाचा असतो. आज मोदींना पराभूत करण्यासाठी सगळेच विरोधी पक्ष उतावळे झाले आहेत आणि त्यांच्यापाशी नेतृत्वाचा दुष्काळ आहे. तो फ़क्त शरद पवार संपवू शकतात. पण पवारांना आघाडीत घेताना व पवारांनी अशा आघाडीत जाताना, संख्याबळाचे गणित मांडून चालणार नाही. कारण पवारांच्या पक्षाचे खासदार किती निवडून येतील, ती बाब दुय्यम असून आघाडीचे गणित बहूमतापर्यंत पोहोचत असेल, तर निवडून आलेल्यांना कोण समर्थपणे हाताळू शकेल, ही बाब निर्णायक आहे. ममतांपासून राहुलपर्यंत ते कोणालाही साधणारे काम नाही. पण पवार अशी आघाडी लिलया चालवू शकतात, याविषयी त्यांच्या शत्रूंच्याही मनात शंका नाही. सहाजिकच आपल्या पक्ष वा संख्याबळापेक्षाची पवारांनी आपल्या कुवत व अनुभवाची बोली आघाडीत जाताना लावली पाहिजे. एकदा त्यात त्यांना यश मिळाले व बाकीच्या देशभरच्या विरोधी व प्रादेशिक पक्षांनी त्यांचे निर्विवाद नेतृत्व पत्करले, तर अवघा महाराष्ट्रही पवारांच्या मागे ठामपणे उभा राहू शकतो. मराठी माणूस तितका उदार व समजदार नक्कीच आहे.

बहुतेक पुरोगामी व प्रादेशिक पक्षांना आज मोदी-शहा या जोडीच्या भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळेच चंद्रशेखर राव यांच्यापासून ममतापर्यंत आणि डाव्यांपासून द्रमुक व अनेक कॉग्रेस नेत्यांपर्यंत, प्रत्येकाला मोदींना पराभूत करण्याचे डोहाळे लागलेले आहेत. त्यांच्यापाशी आपापल्या प्रांतामध्ये संख्याबळ व मतांचा पाठींबा आहे. परंतु कोणाकडेही देशव्यापी नेतृत्व करण्याच्या कुवतीचा चेहरा नाही की नेता नाही. ही त्या सर्वांची अगतिकता आहे. त्यांना देशाची सुत्रे मोदींकडे असल्याची भिती नाही, तर प्रत्येक राज्यात हातपाय पसरत चाललेल्या भाजपाने चिंतेत टाकलेले आहे. सहाजिकच आपापले राज्यातील अस्तित्व टिकवण्याची कसरत प्रत्येकाला करावी लागते आहे. सहाजिकच त्यांच्यापैकी कोणापाशीही देशाचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा व इच्छाशक्तीचा अभाव आहे. उलट राज्यापेक्षा केंद्रात आपला प्रभाव असावा ही महत्वाकांक्षा असलेला विरोधातील एकमेव नेता शरद पवार हेच आहेत. पण ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते चुकीच्या दिशेने चालू आहे. ममतांनी दिल्लीत येऊन अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या व तिसर्‍या आघाडीची चा़चपणी केली. त्या सोनियांनाही भेटल्या. यातून काहीही निष्पन्न होणारे नाही. कारण अशा विस्कळीत व नेतृत्वहीन विरोधी आघाडीला कुठल्याही राज्यातला मतदार प्रतिसाद देण्याची बिलकुल शक्यता नाही. लोकसभा निवडताना भारतीय जनतेला ठाम व भक्कम पर्याय हवा असतो. दिल्लीत जमलेल्या विविध पक्षाच्या नेत्यांपाशी तसा चेहरा नाही, की लोक त्यांच्याकडे देशाचा नेता म्हणून कधी बघू शकलेले नाहीत. आपापल्या व्यक्तीगत अहंकार वा प्रादेशिक अस्मितेचा बळी ठरलेले असे हे सर्व लोक आहेत. फ़क्त पवार हाच त्यातला एकमेव अपवाद आहे. मात्र असा नेता देवेगौडा वा मनमोहन असूनही चालणार नाही. याचा अर्थ लोकांना बुजगावणे वा कठपुतळी होऊन कारभार हाकणारा पंतप्रधान नको असतो. असे का?

ज्या पद्धतीने २००९ सालात लोकांनी पुन्हा युपीएला कौल दिला आणि त्याच समिकरणाला २०१४ मध्ये संपवले, ते त्याचे उत्तर आहे. सोनियांच्या तालावर नाचणारा पंतप्रधान देशाला नको असला तरी त्याला शह देऊ शकणारे समिकरण २००९ साली लालकृष्ण अडवाणी जुळवू शकले नाहीत. ते आशाळभूतपणे नाकर्त्या मनमोहनना जनता पाडणार म्हणून प्रतिक्षा करीत बसले होते. उलट त्यांच्यावर नाराज असलेल्यांना गोळा करण्याचा पुढाकार मोदींनी २०१३ साली घेतला आणि पुढला सर्व इतिहास आपल्यासमोर आहे. आज सोनियांपाशी तितका अधिकार उरलेला नाही आणि त्यांना देश व कॉग्रेसपेक्षा आपला वारसा राहुलकडे देण्याखेरीज कशाचीही फ़िकीर नाही. ही विरोधकांची लाचारी झालेली आहे. तमाम विरोधकांनाही याची जाणिव आहे, की कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली म्हणजे राहुलच्या नेतृत्वाखाली २०१९ सालची लढाई व्हायची. तर कॉग्रेसचा जिर्णोद्धार अशक्य आहेच. पण मोदींना पर्याय म्हणून राहुल समोर केला, तर त्याच्या पाठीशी उभे रहाणार्‍या पक्षांची प्रादेशिक प्रतिष्ठाही लयाला गेल्याखेरीज रहाणार नाही. थोडक्यात मोदींचा पराभव दुरची गोष्ट होईल आणि आघाडीत आलेल्यांना आपापले राज्यातील वर्चस्व गमवावे लागेल. म्हणूनच या तमाम मोदी विरोधी पक्षांना कुठले तरी विश्वासार्ह, देशाला मान्य होईल असे नेतृत्व हवे आहे. त्या पात्रतेत पवार सोडून अन्य कोणीही नेता मोजता येत नाही. यामुळे मोदींना पराभूत करणे शक्य होईलच अशी कोणी हमी देऊ शकत नाही. पण राहुलच्या नेतृत्वाखाली गेल्यास मोदींचा विजय दिग्विजय होऊ शकतो. त्याला रोखणे पवारांच्या नेतृत्वाने नक्की शक्य होईल. हे त्या सर्वांना कळते आहे. पण आपण ते शिवधनुष्य पेलायला तयार असल्याचे पवारांना ठामपणे सांगता आले पाहिजे आणि नुसते सांगूनही भागणार नाही, तर आपल्या अटीवर नेतृत्व स्विकारण्याची भाषाही पवारांनी खंबीरपणे बोलली पाहिजे.

सोनियांच्या इशार्‍यावर नाचणारे शरद पवार किंवा ममताच्या रुसण्याचे गळपटणारे पवार कोणाला आवडणार नाहीत. ते देशाला भावणार नाहीत की महाराष्ट्राला रुचणार नाहीत. आपल्या कुवत व पात्रतेचा आत्मविश्वास दाखवू शकणारे व तशी पावले टाकू शकणारे शरद पवार पुढल्या दोनचार महिन्यात जगाला दिसले, तर देशातल्या एकूण़ मोदीमुक्त राजकारणाला मोठा वेग येऊ शकेल. त्यातून मोदींनाही जिंकण्यासाठी आटापिटा करावा लागेल. नुसत्याच विरोधी प्रचाराने वा आरोपांच्या गदारोळाने लोकसभेच्या लढतीमध्ये पंतप्रधानाला पराभूत करता येत नाही. ज्याने आठ सार्वत्रिक निवडणूकांनंतर प्रथमच एकपक्षीय बहूमताचा विक्रम केला आहे, त्याला तर असे सहज पराभूत करणे, ह्या दुबळ्या विस्कळीत विरोधकांना शक्यच नाही. त्यांचा हा दुबळेपणा त्यांना पटवून आणि आपल्या हाती एकमुखी नेतृत्व देण्याचे मानायला भाग पाडूनच, पवार या स्पर्धेत उतरू शकतात. आजवर जी आमदार वा खासदारांची संख्या जुळवण्याच्या कसरती केल्या त्याकडे पाठ फ़िरवून पवारांना प्रथमच आपल्या गुणवत्ता व प्रतिभेच्या आश्रयाने ही शर्यत करावी लागेल. त्याला इतर पक्ष तयार नसतील, तर पवारांनी त्यातून अंग काढून घ्यावे आणि काही काळ विरोधकांची थोडी घुसमट होऊ द्यावी. शरदबाबूंनी इतके केले आणि आजवरच्या धसमुसळेपणा सोडून खर्‍याखुर्‍या स्ट्रॉंग मराठा असण्याची साक्ष कृतीतून दिली, तर अवघा महाराष्ट्रही त्यांच्यामागे तितक्याच विश्वासाने उभा राहिल. हा पवारांच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षेपुरता विषय नसून देशाच्या राजकीय परिस्थितीने निर्माण केलेल्या अपुर्व संधीचा मामला आहे. तेव्हा त्यांनी जरूर पुढाकार घ्यावा. पण मोदींना तोडीस तोड मित्रपक्षांना आपल्या इशार्‍यावर वागवण्याची अट घालूनच पुढे जावे. पवार पंतप्रधान व्हावेतच. पण मनमोहन वा देवेगौडा यांच्यासारखे नको, तर खंबीर मोदींसारखे व्हावेत. ही मराठी माणसाची सुप्त इच्छा आहे.

44 comments:

  1. Bhau sarv thikey pan pawaranche way tabbet sath denaray Kay? Attach kiti adhar lagto tyana.ani the zalech PM tar tewadhi dhawpal karu shaknar ahet ka? Part PM na foreign tour pan have lagta ani atachya yugat tar jastach karan non desh kunacha mitra nahi

    ReplyDelete
  2. Bhau,

    Vachun Mothi Gammat Vatali, He Tumhi Jari Lihilele Asale Tari Tumhala Te Kharokhar Patale Aahe Ka.

    2014 Che Modi Aani 2018 Che Modi Yaat Barach Farak Aahe, 2014 La Tyana Keval Eka Tapacha RajyaStariya Prtyaksha Rajakarnacha / RajyaKarbharacha Anubhav Hota Aani Aata Geli 4 Varshe Rashtriya Rajkarnacha Va AantarRashtriya Patlivarcha Karbharacha Anubhav Barech Kahi Shikavun Gela Aahe Manajech Te Ek Anubhavi Khiladi Aahet He Visarun Kase Chalel.

    2014 La BJP Che PantaPradhanPadache Umedvar Ghoshit Zalyavar Tyana 'Akhand Media, Virodhi Paksha, SwaPakshatale Virodhak, Purogami Va Patalyantri NGO Chya Aadun Pardeshi Shakti' Yanchyakadun Zalela Jabardast Virodh Pachvun Va Tya Saglyana Ulathe Padun Ha Paththa Pantapradhan Zalela Aahe Tyala Dhul Chrane He Ek AtiPrachand Kaam Aahe Te Aaj Kivva 2019 Madhye Tari Shakya Disat Nahi, Karan Te TavunSulakhun Nighalele Tayaar Rajkarni Aahet He Tar Anekda Sidhdha Zaley.

    Modinchi Jamechi Mothi Baju Mhanaje Tyanchi Swachha Pratima, Yacha Abhav Sampoorna Virodhi Paksha Netyanmadhe Disatoy, Ektari Naav Suchate Ka ?? Bahutek Sagale BhrashtacharGrast Kivva Ghotalebaj Vatatat He Sarvasamanya Matadar Dolya-Aad Karu Shakat Nahi.

    2019 La Asha Parishitit RSS Sarakhi Sanghatana Hatavar Hat Thevun Gappa Basel Ka ?? He Sambhavat Nahi Jodila BJP Che Swatache Kedar Aahech He Aajvar Anekda Siddha Zale Aahe.

    Keval Sarva Virodhakana Ek Neta Milala Manun Deshatale Matadar Ekjut Houn ModiVirodhi Matdan Kartil Ase Modine Kkay Tya Matdaranche Ghode Marale Aahe ?? Je Marale Aahe Te Tya Bhrashta Ghotalebajanche. He sarva Tya Bahusankhya Tarun Matdarala Changalech Kalate Aahe, DeshPatlivar Modina Paryay Mhanun Ha Tarun Matdar Kona Rajyastariya Netyala Sahan Kartil ?? Aaj Modi Jari Rajyatun Aalele Asale Tari Tyani Swatala Siddha Kelele Aahe He Koni Nakaru Shakate Kaay.

    2019 Chya Nivadnukit Matdar 'MAYA, MAMTA, LALOO, RAHUL, AKHILESH, CHANDRABABU NAIDU, SHARAD YADAV, P. CHIDAMBARAM, MANMOHAN SINGH ETC.ETC.' Yanchyakade Pahun MODINA Parat Gujratla Pathvtil He Ek Swapnach Mhanata Yeil.

    ReplyDelete
  3. भाऊ, पवार जर पंतप्रधान होणार असतील तर केवळ मराठी माणूस पंतप्रधान झाला यावर सुख मानून बसावे लागेल, कारण पवारांनी सत्तेत असताना महाराष्ट्राची काय परवड केली हे इतिहास जाणतो. मराठा - अमराठा - ब्राह्मण इत्यादी जातिभेदांवर आधारित राजकारण पवारांनी सुरु केले आणि आपण आता त्याची फळे भोगतोय. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाची पवारांची "पेशवाई" आल्याबद्दलची कॉमेंट उबग आणणारी होती. पवार आपल्या खासगी आयुष्यात भलेही कितीही सुधारकी असोत, त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण काळाच्या मागे नेऊन बसवले. अश्या नेत्यांपेक्षा मोदी कधीही परवडले.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ खरच कधी तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बघा मग समजेल की आता पर्यंत महाराष्ट्राचे काय झाले आहे आज पर्यंत. उगाच सगळे विरोध करतात म्हणून करू नये

      Delete
  4. भाऊ, चित्र तर खूप छान रंगवलंय फक्त शरदजींचा आजवरचा इतीहास त्याला साथ देत नाही. शिवाय त्यांचे कडून ज्या अपेक्षा आपण बाळगलेल्या आहेत त्याला ते विश्वासार्ह ठरतील ह्याची खात्री स्वत: शरदजी तरी देतील की नाही ह्याबाबत शंका आहेत. तसेच ज्यांच्या विश्वासावर हा डोलारा उभा करायचा ते तरी कुठे विश्वासार्ह आहेत ? एक शक्यता म्हणून तूर्त हा विषय चघळता नक्की येईल !

    ReplyDelete
    Replies
    1. आहो परक्या वर विश्वास ठेवून महाराष्ट्र लुटून देत आहातच की एखादा आपल्या माणसावर Vविश्वास ठेवा

      Delete
  5. भाऊ अत्यंत सही विश्लेष व तात्विक दृष्टीने सही मांडणी.
    हेच भारतीय जनतेकडुन अपेक्षित आहे आणि भारतीय लोकशाहीच्या ईतिहासात हेच घडलं आहे व घडत राहव असे निश्र्चीत वाटत आहे.
    मोदी शहा अत्यंत धोरणी व अस्वस्थ वृत्तीचे नाहीत. अत्यंत विचार पुर्वक हे प्लॅन तयार करुन आमलात आणतात. त्याच बरोबर आपण आपले निकटवर्तीय कधी धोक्यात आणणार नाहीत हि पण काळजी घेतात.
    काही टोळकी हे संघी म्हणुन हिणवताना दिसतात. व यातुन मोदी भक्त अशी हेटाळणी करताना दिसतात. परंतु याच लोकांनी कधी 50-55 वर्षे एकहाती राज्य एका कुटुंबाच्या हातात राहिला तेव्हा या पक्षाचे पाठीराखे कधी अंध व लाचार आहेत असे कधी वाटले नाही. की असे पुरस्कृत पुरोगामी अनुदानीत टोळीने लिहले बोलले नाही किंवा असा प्रचार करून या पडद्या आड राज्य करणार्यांना भ्रष्टाचारी, दलालशाही, गर्विष्ठ व सुमार नेतृत्व अशी टिका केली नाही व थोडीफार झाली तरी ती प्रसार माध्यमांनाच पुरस्कृत व विकत घेऊन दाबुन टाकली. तसेच जनतेला पण आधु करुन अशिक्षीत आळशी असंस्कृत व अनुदानित करुन अशा पिढ्यांना आपले अंध अनुयायी बनवुन सत्ता बेसुमार उपभोगली. परंतु देश व नागरिक अशेच गटांगळ्या खात राहिलेत. त्यातच भारतीय नेहमीच मटणाच्या दुकानातील बोकडा प्रमाणे खुशाल चेंडु बनुन रहातो व कधी तरी जेव्हा अन्याय अराजकाचा कडेलोट होतो तेव्हा जागा होतो व पुर्वी एखाद दोन पिढ्यांनी झुंज दिली परत येत रे माझ्या मागल्या प्रमाणे घोडे बेचके सो गया हेच आता पिढी साठी न होता 2-4.5 वर्षांत (सरळ पुर्ण बहुमत असताना सुद्धा पुर्ण 5 वर्षे राज्य करु शकले नाही. त्यातच उन्हाळा सुट्टीत शिक्षित विलासी नागरिक मतदान सोडून मौज करत असताना लोकसभा निवडणूका जणु जाणीवपूर्वक आणुन ठेवल्या. मोदी शहांचा झांझावात मुळे 2014 ला हे यश मिळाले हे देशाचे सुदैवच. परंतु आज प्रमाणे देशात काही प्रमाणात अराजक माजवुन मोदी सरकार कसे निक्कम्मे आहे हेच पुरोगामी, विदेशी व काँग्रेस पुरस्कृत मिडियावाले दाखवत आहेत. व हे सर्व मिडियावाले (एडीटर कामगार) भारतीयच आहेत. अशिक्षीत जनतेचे आपल्या प्रमाणे प्रबोधन करताना हे मिडियावाले कधीच दिसत नाहीत व दिसणार पण नाहीत. हिच कुर्हाडीचा दांडा गोतास काळ मानसिकता भारतीयांची आहे. त्यामुळे भातात सलग दोन निवडणूका कधीही काँग्रेस इतर पक्षाने आघाडीने जिंकल्या नाहीत. व काँग्रेस शिवाय भारताला पर्याय नाही असेच चित्र ऊभे केले.
    जर सलग दोन वेळा भाजप सारखा पक्ष लोकसभा जिंकला तर एका बाजुने गेल्या पाच वर्षांत अननुभवा मुळे /परिस्थिती नुसार झालेल्या चुका सुधारुन धोरणाचे सातत्य राखुन या सुजलाम सुफलाम खंडप्राय देशात काही प्रमाणात कायाकायापालट होऊ शकतो.
    एकेएस

    ReplyDelete
  6. Bhau ekdam barobar

    ReplyDelete
  7. भाऊ जबरदस्त
    जरी खते लाईट लोड शेडिंग कमी करुन शेत तळी निर्माण करुन कांदा डाळ या सारख्या जिवना आवश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवून. इम्पोर्ट ची तुरंत योजना तयार ठेवून मोठ्या व्यापरी बारमीत धेंडावर नियंत्रणात ठेवले आहे मग मराठा मोर्चा काढण्या शिवाय काही करु शकले नसले तरी आंबेडकरीना पेटवलेच.
    मोदी सरकारने शेती क्षेत्रा कडे जेव्हडे पाहिजे तेव्हडे लक्ष दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. हे काही प्रमाणात मोदी जवळ जमलेल्या किंवा (काही वेळा वाटते मुद्दामुन जमवलेली गोतावळ व मोदींची एकाधिकारशाही) मंडळी ची ही चुक आहे.
    1.शेती क्षेत्रात प्रचंड मागासले पणा आहे पाणी विज गोदामे, 2.कोल्ड स्टोअरेज बाजारपेठ ही सुविधा देऊन अच्छे दिन आणता आले असते व याचे रिझल्ट यायला थोडा ऊशीर लागतो म्म्हणुन सुरुवात लवकर करणे आवश्यक असते.
    3. छोट्या सहकारी सोसायटीज शेतकरीवर्गाला कमी व्याज दरात कर्ज देत होत्या त्या व सहकारी कारखाने परत काँग्रेस च्या राजकारणी घराण्या कडुन परत सहकारी तत्वावर आणण्याचा प्रयत्न करणे.
    4.तसेच एकदम 100 मेगा सिटी हे पण भारता सारख्या खेड्यातून रहाणार्या खंडप्राय देशाला व पैशांची कमतरता असणार्या देशाला 5 वर्षांत अशक्य आहे हे अननुभवा मुळे अशक्य झाले.
    या पेक्षा छोट्या व मध्यम शहरात व मोठ्या खेड्यात जवळ पडीक जमिनीवर नागरि सुविधा देऊन थोड्या निधी मध्ये सुबत्ता आणता येऊ शकते.
    5.तसेच शहरात पाणी व पब्लिक ट्रासपोर्ट, नवीन उपनगरे बनवुन त्यात CIDCO दोन दशके पुर्वी करायची त्याप्रमाणे को आॅपरेटीव्ह सोसायट्या ना प्लाॅट द्यायचे तसेच 500 फ्लॅटचे प्रोजेक्ट बनवुन Low income groups ना द्यायचे या सारख्या योजना राबऊन बिल्डर लाॅबीवर किंमती रिझनेबल ठेवायचा दबाव कायम रहायचा. परंतु विलासराव व सुशीलकुमार शिंदे या जोडीने हे थांबवले.
    6.तसेच यात काही प्लाट डेली बाजार प्लाॅट तयार करुन रोजगार निर्माण तर होतीलच पण सामान्य नागरिकांची सुविधा पण होइल.

    7.माॅल ना ज्या किंमतीत माल कारखाने, व मोठे डिलर देतात त्या किंमतीत किंवा थोड्या जास्त किमतीत माल छोट्या व्यापार्याना देण्याचे आवाहन करुन छोट्या व्यापार्यांना त्यांच्या असोसिएशन गावा गावात आहेत अच्छे दिन आणुन सामान्य माणसाला पण राहत देऊ शकतात.
    ह्या सारख्या योजना परत राबऊन अछेदीन परत आणता आले असते. पण ऊच्च वर्गीय सत्तेवर गेले की उच्च वर्गीयांचे टोळकेच बाजूला जमते व बेसीक चा विसर पडतो.
    8.प्लॅस्टीक बंदी चा अतिरेक हा पण उच्चशिक्षित व वर्णीयाचे नाकात बोलुन अती सामान्य नागरिकांच्या व्यापारी वर्गाचे रोजचे जिवन जगताना नाकात दम आणण्याचे आतीरेक निर्णय बाटगे ज्याप्रमाणे जास्त कट्टर असतात याचे एक उदाहरण आहे.
    8.स्टेशन बस स्टॅन्ड सरकारी कार्यालयात सार्वजनिक ठीकाणी मोठ्या प्रमाणात फॅन (नविन सिएसटी मध्ये लावलेत त्याचे छोटे माॅडेल) लाऊन अती सामान्यना अच्छे पल आणु शकते.
    परंतु ह्यासाठी भाषणांच्या स्टेज वरुन खाली उतरुन काम करणै करुन घेणे आवश्यक आहे.
    नाहीतर परत एकदा यावेळी 10 नाही -15 वर्षांसाठी देश भ्रष्टाचारी आराजकात लोटला जाईल.
    Aks

    ReplyDelete
  8. पवारसाहेब हे फारतर उत्कृष्ट वस्ताद आहेत.पैलवानासाठी लागणारी ताकद त्यांच्यात नाही. पंतप्रधानपद त्याच्यासाठी म्हतारपणी केलेली अप्सरासाधना होय.

    ReplyDelete
    Replies
    1. नेमकी उपमा "म्हातारपणीची अप्सरासाधना"

      भाऊ, मराठी माणसासाठी महाराष्ट्र पवारांना मत देईल हे आताशा कठीण वाटते. हं पुढेजाऊन कधी फडनवीसांना ही संधी आली तर तसा विचार होईलही. अनेकांच्या प्रतिसादात कमालीची नकारात्मक आहे आणि आपण तरीही खूप सकारात्मक पणे विषय मांडला आहे. अभिनंदन

      Delete
  9. ज्या माणसाने सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्दयावरुन वेगळा पक्ष काढून नंतर त्यांच्याच बरोबर युती करून सत्ता उपभोगली आणि फक्त आपल्या मतदारसंघाचाच विकास केला अशा माणसाला पंतप्रधानपद मिळावे ही अपेक्षा किंवा इच्छा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस नक्कीच करणार नाही.

    ReplyDelete
  10. BHAU AAJ PARYANT MODI/BJP SARKAAR LA DILELI AASHVASANE POORNA KARATAA AALI NAHEET MHANUN TEECH AASHVASANE AAPAN KASHI POORNA KARANAAR AAHOT TYACHA KAAHEE VICHAR OOHAAPOH VIVECHANAAT DISAT NAAHEE. SAMAJAA PAWAR PM ZALET TAR GUJJAR/MARATHA AARAKSHANAACHE KAAY KARANAAR? AANDHRA LA VISHESH DARJAA MILNAAR KAAY? ROHINGYA MUSALMAANAANCHE BANGAAL MADHYE PUNARVASAN KARNAAR KAAY? SHETKARI AATMAHATYAA AANI SHETIMAALAALAA RAAST BHAV KASAA DENAAR? RAAJYAACHYAA TIJOREET PAISA NASATAANAA RAAJYAACHE KARJ KASE UTARAVNAAR? YAA PRASHANAACHI UTTARE SAMAADHAANKARAK NASATTEEL TAR HE SARKAAR CHARANSINGAANCHYA MARGAANE JAAUN PUNHA MADHYAVADHI NIVADNUKAA GHYAVYA LAAGNAAR NAHEET YACHI KHATREE KON DENAAR:

    ReplyDelete
  11. पवारसाहेबांचे विचार जातीपुरते संकुचित आहेत तर ते कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत.

    ReplyDelete
  12. कमीत कमी माझी तरी इच्छा पवार पंतप्रधान होऊ नयेत अशीच आहे. फक्त मराठी माणसाने पंतप्रधान व्हावे म्हणून पवारांचं समर्थन करण्याचा मूर्खपणा मी करणार नाही.

    ReplyDelete
  13. जागतिक परिषदांमधे पवार भाषण करताना कसे वाटतील. एकतर काय बोलतात ते़ कळणार नाही. कश़ळले तरी जे बोलतात तेच करतील ह्याचा भरवसा आम्हालाच नागी तर अमेरिका, रशिया चीन ला कसा असेल.त्या पेक्षा मोदीच बरे.मराठी नसले तरी हिंदू द्वेषी नाहीत, पाताळयंत्री नाहीत, बेभरवशाचे नाहीत, काखेत दंगलखोर मलपवून ठेवत नाहीत, जातीजातीत फूट पाडत नाहीत. मोदीच बरे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर! अगदी नेमके मांडले आपण पवारांबद्दलचे मत.

      Delete
  14. भाऊ ही विरोधकांची एकजूट वगैरे सगळे ठीक आहे, पण पवार साहेब जनतेची विश्वासार्हता कशी मिळवणार ? आणि आजवरचा इतिहास पाहता ही गोष्ट अशक्य आहे.

    ReplyDelete
  15. This is day dreaming. Mamata , Mayawati will not allow party leader having less seats to become PM. NCP will maximum get 20 seats. In remote case it happens then Govt under Pawar will be unstable and will not last more than 1 year.

    ReplyDelete
  16. Harbaryacha zhadavar mast chadavlenahet Pawarana :)

    Pawar jar PM candidate hot astil tar MNS sobat Sena hi ek payavar ubhe hotil support karayla. So it will be BJP v/s Rest is MH.

    But aple Pawar sahebani ase dive lavaychi history karun thevli ahe ki khudd Congress cha lokanna hi samajnar nahi keva Pawar palun NDA la bin sharth pathimba dyayla.

    As for Pawar, he is content now to not see himself or his family go to jail. Basun rahtil in MH only , shevti MH milala khup zale.

    ReplyDelete
  17. आपण केलेली कारण मीमांसा अतिशय योग्य. पण जे देशात चालु आहे ते अत्यंत चूक आहे.आपण जे लिहिले आहे ते 100% सत्य पूर्णपणे सहमत.

    ReplyDelete
  18. इतका आटापिटा करून हा माणुस प्रधानमंत्री झाला तर काय होईल ? कशासाठी या माणसाला प्रधानमंत्री व्हायचे आहे ? पुतण्याला पाटबंधारे घोटाळ्यातून सोडवायला का ? का बेनामी जमीनी महाराष्ट्रभर घेतल्यात त्या पचवायला ? यांचा पक्ष म्हणजे प्रत्येक तालुक्यातील सगळ्यात मोठ्या श्रीमंत गुंडांचे टोळके आहे. त्यापेक्षा मनमोहनसिंग परवडले. हाय लेवल भ्रष्टाचार करतात. आपल्यापर्यंत डायरेक्ट परिणाम येत नाहीत. हा माणूस सर्वोच्च पदावर गेला तर याचा पुतण्या सर्व महाराष्ट्रात प्रत्येक घरातून हप्ते गोळा करू लागेल.

    ReplyDelete
  19. भाऊ माफ करा.. पण तुमचा हा लेख म्हणजे दारुडयाने दारू पिउन काहीही बड़बड़ करावी तसा वाटला...

    मनमोहन सारखे कठपुतली पंतप्रधान होते तोपर्यंत ह्या लेखला अर्थ होता.

    आज मोदींनी पंतप्रधान पदाचा आदर्श घालून दिला आहे त्यांच्या कड़े देशवासी आणि देशाच्या भल्यासाठी दूर दृष्टि आहे आणि त्याचे महत्व देशवासियांनाही कळू लागले आहे

    राहिला प्रश्न पवारांचा त्यांची ओळख धूर्त राजकारणी म्हणून पुरेशी आहे, ज्या माणसाने आपमतलबी आणि स्वार्थी राजकरनासाठी आपल्याच माणसाना लाथाळले, आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खात राहिला आणि तरीदेखिल महाराष्ट्राचे भले न करू शकलेला, वरुन प्रजेला मूर्ख समजून संविधान वाचवयला निघालेला या वयात देशासाठी काय करणार?
    शेवटी मराठी अस्मितेचाच प्रश्न असेल तर पुन्हा एक प्रतिभाताई म्हणून किती लोकं स्वीकार करणार?


    ReplyDelete
    Replies
    1. Modini tari as Kay Kelay confidently thapa marnya palikade. Virodhat hote tevhache statement katha Gst la virodh, FDI la virodh Swaminathan swikar rajyatale nete toll bandh karu ani atta kay.. milale thapa + Fadnvisancha abhyas ani turi

      Delete
    2. World bank, Ease of business ranking, mudra, jan-dhan, Atal pension, Crop insurance, raste, light.....
      Sagly thapach....

      Delete
  20. I thought of replying to this but took a look at comments given by others and decided not to. Nobody has approved the idea of SP being PM. It is out dated concept which nobody is willing to entertain in these days and time.

    Bhau - what is real motive of writing this blog? I know you would never give direct reply to this but hope may be one of your future blogs would give.

    Hemant

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही काहीसे तसेच वाटत आहे. या लेखाचा पवारसाहेबां बाबत एव्हढे कौतुक सांगण्याचा उद्देश वेगळाच वाटतो. पुढील काही लेखां मधून कदाचित त्याचा उहापोह/प्रचिती येणे शक्य असावे.

      Delete
    2. भाऊंना बहुतेक सगळ्या मराठी माणसांना घाबरवून गम्मत बघायची आहे. पूर्वी संरक्षण मंत्री असताना साहेबांच्या विमानातून wanted माफिया हिंडत होते. आता प्रधान मंत्री झाल्यावर काय काय होईल ? या विचारानेच अस्वस्थता येते.

      Delete
  21. This is the only article Bhau.. where I am not agree with you. Maharashtra will not stand behind Mr. Sharad Pawar. Marathi people know how is he.

    ReplyDelete
  22. पवार न लाभलेले पंतप्रधान राहण्यातच राज्याच आणि देशाच हीत आहे.

    ReplyDelete
  23. Bhau,why you are so soft to Sharad Pawar?
    He is regular politician
    Made nothing for Maharashtra
    Only forwarded his family in the politics
    No.
    Never
    He should be punished for his devide and rule politics
    Only Maratha politics and shahu fule Ambedkar for spice in politics

    ReplyDelete
  24. ममतांपासून राहुलपर्यंत ते कोणालाही साधणारे काम नाही. पण पवार अशी आघाडी लिलया चालवू शकतात, याविषयी त्यांच्या शत्रूंच्याही मनात शंका नाही....काय भाऊ चांगलेच शालजोडे उचललेत की आज...हे तर त्या बोट धरून राजकारणात आलेल्या गोष्टीसारखं झालं...खास सुळे बाईंसाठी सांत्वनपर पत्र म्हणून का नाही घोषित करत याला.....

    ReplyDelete
  25. tyanchi narad muni hich yogya jaga ahe.

    ReplyDelete
  26. वरील लेखावर नकारात्मक प्रतिक्रिया देणार्‍या सर्व वाचकांना एक सांगावेसे वाटते. भाऊ हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. भाऊंना हे खूप चांगले माहिती आहे की शरद पवार त्यांचा ब्लॉग आवर्जून वाचतात. या ब्लॉगच्या माध्यमातून रद पवारांना हरभर्‍याच्या झाडावर चढवत आहेत व त्यांनी माघार न घेता पुढाकार घेऊन घडत चाललेली तिसरी आघाडी b घडावी अशी भाउंची सुप्त इच्छा आहे हे कुठल्याही राजकीय जाणकाराला सहज कळण्यासारखे आहे. भाऊ आपल्याला आवडली ही आयडिया

    ReplyDelete
  27. Strogly disagree...

    भाऊ....काय झालं?

    तुमच्या कडून आम्ही पूर्ण देशाचं राजकारण शिकायचं प्रयत्न करतोय असं असताना मराठी अस्मिता?? ...ती पण पवारांसाठी??

    शक्यच नाही. असा मराठी माणूस पंतप्रधान म्हणून आम्हाला अजिबात नको.

    ReplyDelete
  28. भाऊ आपल मत अजिबात पटलं नाही. ज्याने राजकीय फायद्यासाठी मराठी जनतेत जातीय फूट पडण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे महाराष्ट्र कधीच उभा राहणार नाही.. आणि राहिलाच तर त्याच्या ऐवढी दुसरी शोकांतिका नसेल. असा मराठी माणूस पंतप्रधान न झालेलाच बरा नाहीतर त्यांचा कारामातींनी महाराष्ट्राची इज्जत जायची

    ReplyDelete
  29. देशाची पर्वा पवारांनी कधीच केली नाही. अत्यंत स्वार्थाचे कपटी आणि तोडफोडीचे राजकारण केलेल्या माणसाला PM पाहतांना अवघा महाराष्ट्र शरमेने मान खाली घालेल. भाऊ, नाही पटत हे.

    ReplyDelete
  30. भाऊ,, 1गोष्ट तुम्ही विसरलात ती सांगावीशी वाटते. इंदिरा गांधी व कामराज ह्या मध्ये जेव्हा काँग्रेस वरून वाद चालू होता आणि इंदिराजींनी यशवंतराव ना त्यांच्या( इंदिरा) बाजूनी मतदान करायला सांगितलं तेव्हाचं इतिहास आठवा. आणि श्री. पवार त्यांचे विद्यार्थी. अर्थात सुज्ञास सांगणे न लगे

    ReplyDelete