Sunday, November 18, 2018

अमेरिकन निवडणूकीत हिंदूत्व?

Image result for tulsi gabbard

अयोध्येच्या राममंदिरासाठी काही हिंदू संघटनांनी अध्यादेश काढण्याची मागणी आग्रहपुर्वक मांडल्यावर लगेच आता निवडणूकांसाठीच भाजपा हिंदूत्वाचा अजेंडा नव्याने पुढे आणत असल्याचा आरोप झाला आहे. खरेतर त्यात नवे काही़च नाही. मागल्या तीन दशकांपासून हा आरोप सातत्याने होत राहिला आहे आणि आताही होतो आहे. १९८९ सालच्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा विषय ऐरणीवर आला होता. त्याला खरेतर राहुलचे पिताश्री राजीव गांधी जबाबदार होते. त्यांच्या पाठीशी दोन्ही सभागॄहात भक्कम बहूमत होते आणि सुप्रिम कोर्टानेच शहाबानुचा विषय निकाली काढलेला होता. पण मुठभर मुस्लिम धर्मांध नेते व मौलवींनी तो वादाचा विषय केला आणि मुस्लिमांची मते गमावण्याचे भय कॉग्रेसला घातले. त्याला राजीव गांधींनी दाद दिली नसती, तर आज खुप वेगळे राजकारण व समिकरण दिसले असते. राहुल गांधींना गळ्यात जानवे घालून मंदिरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या नसत्या, की कॉग्रेसला भाजपावर हिंदूत्वाचे आरोपही करावे लागले नसते. पण राजीव गांधी मौलवींच्या धमक्यांना शरण गेले व त्यांनी सुप्रिम कोर्टाचा निकाल फ़िरवणारा अध्यादेश काढला. त्यातून सामान्य हिंदूंच्या मनात शंका निर्माण केली. हा देश मुस्लिमांचे लांगुलचालन करतो आणि हिंदूंना आपल्या धार्मिक भावनांची जपणूकही करू देत नाही; अशी धारणा त्यातून निर्माण झाली. मग उलट दबाव कॉग्रेसवर आला. हिंदूंच्या भावनांना हिंदू संघटनांनी उत्तेजित केले आणि त्या शांत करण्यासाठी राजीव गांधी यांनी अयोध्येतील दिर्घकाळ वादग्रस्त असलेल्या मंदिराचे दरवाजे खुले केले. तिथे पूजाअर्चा करण्य़ाची मोकळीक दिली. परिणामी हिंदू खुश होण्यापेक्षा मुस्लिम खवळले आणि बाबरी मशिदीच्या आवारातील त्या मंदिराचा विषय मोठा गंभीर होऊन गेला. तिच रामजन्मभूमी असल्याची धारणा असल्याने तिथेच भव्य मंदिर उभारण्याच्या विषयाला चालना मिळून गेली. ही प्रेरणा वा हिंदूत्व फ़क्त भारतीय निवडणूकांपुरते असते का? की अमेरिकेतही हिंदूत्वाचे राजकारण चालू शकते?

आपल्याकडला हिंदूत्वाचा विषय सध्या बाजूला ठेवू या. कारण लोकसभेचे पडघम वाजायला अजून अवधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीलाही अजून दोन वर्षे बाकी आहेत. पण नुकत्याच तिथल्या मध्यावधी, म्हणजे संसदीय निवडणूका पार पडल्या असून त्यात रिपब्लिकन पक्षाला काहीसा फ़टका बसला आहे. त्या संसदेतील प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाच्या हातून निसटली असून लौकरच अध्यक्षीय निवडणूकीच्या प्राथमिक हालचाली सुरू होतील. त्यापैकी रिपब्लिकन पक्षाला नवा उमेदवार शोधण्य़ाची गरज नाही. कारण ट्रंप पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि तिथल्या पद्धतीनुसार त्यांना दुसर्‍या खेपेला उभे रहाताना पक्षाची संमती घ्यावी लागणार नाही. म्हणूनच त्यांचा दोन वर्षानंतरचा आव्हानवीर कोण असेल, त्याची चर्चा आतापासून सुरू झालेली आहे. अमेरिकन सिनेट म्हणजे वरीष्ठ सभागृहाचा प्रत्येक सदस्य सिनेटर म्हणून ओळखला जातो आणि तो अध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मानला जातो. तशी अनेक नावे समोर येऊ लागली असू,न ती अर्थातच डेमॉक्रेट पक्षाची आहेत. कारण आव्हानवीर त्याच पक्षाला द्यायचा आहे. असे इच्छुक आधीपासून पक्षातील प्रतिनिधींनाच आपल्या बाजूला वळवण्य़ाची खेळी सुरू करतात आणि त्यातून दुर्बळ वाटणारे एकेक माघार घेत, तीनचार खरेखुरे स्पर्धक शिल्लक उरतात. त्यांची तुफ़ान झुंज होऊन पक्षाचा अंतिम उमेदवार निश्चीत होतो. दहा वर्षापुर्वी म्हणूनच अशी झुंज हिलरी क्लिंटन व बराक ओबामा यांच्यात जुंपलेली होती. त्यात ओबामा यांनी बाजी मारली आणि हिलरींना माघार घ्यावी लागली होती. त्यांनी पुन्हा आठ वर्षांनी आखाड्यात उडी घेतली आणि उमेदवारी २०१६ साली मिळवली. मात्र त्यांची डाळ रिपब्लिकन डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर शिजली नाही. आता हिलरींना संधी उरलेली नाही. डेमॉक्रेट पक्षाला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. तो चेहरा हिंदू असू शकतो काय?

डेमॉक्रेट पक्षाचे एक भारतीय वंशाचे नेते डॉ. संपत शिवांगी यांनी तशी शक्यता वर्तवली आहे. एका समारंभात शिवांगी यांनी तुलसी गब्बार्ड या अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतील, अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. शिवांगी हे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचे नेते असून, तिथल्या मतदारात हल्ली भारतीयांची संख्या लक्षणिय झालेली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिवांगी यांच्याकडे बघितले जाते. मात्र त्यांनी नाव सुचवलेले असले, म्हणून तुलसी या भारतीय वंशाचा अजिबात नाहीत. त्या मुळच्या अमेरिकन असून त्यांच्या जन्मदात्या आईने हिंदू धर्माचे पालन आचरण सुरू केल्याने तुलसी यांचा धर्म हिंदू आहे. त्या हवाई बेटाच्या राज्यातून अमेरिकन संसदेत निवडून आलेल्या आहेत. अजून त्यांनी चाळीशीही गाठलेली नसली, तरी त्यांनी चार वेळा संसदेच्या प्रतिनिधीसभेची निवडणूक जिंकलेली आहे. तुलसीचे वडील हवाई राज्याच्या कायदेमंडळाचे दिर्घकाळ सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांच्या मुलीने आरंभापासून राजकारणात आपले अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण केले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकनांमध्ये तुलसी खुप लोकप्रिय आहेत. तिची आई गोरी अमेरिकन ख्रिश्चन आहे. पण आध्यात्मिक आकर्षणामुळे त्यांनी हिंदूधर्माचे आचरण सुरू केले आणि तुलसीही त्याच प्रभावाखाली आल्याने हिंदू झालेली आहे. शिवांगी यांनी तुलसीचे नाव त्या समारंभात जाहिर केलेले असले तरी तिथेच नंतर भाषण करताना तिने त्याविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. नकारही दिलेला नसल्याने त्यालाच होकर ठरवून तुलसीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा एका वेगळ्या अंगाने जाऊ लागली आहे. येत्या काही महिन्यात अध्यक्षीय प्राथमिक चाचण्या सुरू होतील आणि त्यात खरोखरच तुलसीने उडी घेतली तर ती ओबामा किंवा हिलरी यांच्याप्रमाणेच एक वेगळा उमेदवार म्हणून इतिहास घडवू शकेल. त्या निवडणूकीतला तो पहिला हिंदू उमेदवार असेल.

दहा वर्षापुर्वी जॉर्ज बुश ह्यांची दुसरी मुदत संपत असताना डेमॉक्रेट पक्षातर्फ़े दोन नावे अगत्याने पुढे आलेली होती. ती दोन्ही इतिहास घडवणारीच मानली जात होती. ओबामा हे निवडून आल्यास प्रथमच अमेरिकेचा अध्यक्ष कृष्णवर्णिय वा गौरेतर असणार होता आणि हिलरी क्लिंटन निवडून आल्या असत्या, तरी प्रथमच अमेरिकेला महिला अध्यक्ष लाभली असती. तुलसीचा वेगळेपणा असा आहे, की आजवर कोणी हिंदू अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीतला उमेदवार झालेला नव्हता. बहुधा ख्रिश्चन नसलेलाही कोणी अध्यक्ष अमेरिकेला मिळालेला नाही. म्हणूनच तुलसीला तशी संधी मिळाली तर ती पहिली हिंदू उमेदवार असेल आणि निवडून आलीच तर पहिलीच महिला व पहिलाच हिंदू अध्यक्ष, असा अपुर्व योगायोग घडून येऊ शकेल. आपल्याकडे कुठल्या मतदारसंघात वा कुठल्या पदासाठी कुठल्या जातधर्माचा उमेदवार दिला, यावर राजकारण व टिकाटिप्पण्या होत असतात. अमेरिकेत तितका प्रकार होत नाही. पण कुजबुज मात्र नक्की चालते. त्यातही रिपब्लिकन पक्ष हा कट्टर ख्रिश्चन धर्मियांचा मानला जातो आणि त्यातले बहुतांध पंथ संप्रदाय त्याच पक्षाच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे तुलसी यात उतरली, तर तिला ख्रिश्चन कडव्या नागरिकांची मते कितपत मिळतील याची शंका आहे. मात्र एकूण ट्रंप विरोधातले अमेरिकन मग पुराणमतवादी त्यांना हरवण्यासाठी तुलसीच्या ‘हिंदूत्वाचे’ समर्थक होऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो किती मोठा विनोद असेल? उदारमतवादी पुरोगामी मानले जाणारे डेमॉक्रेट अमेरिकेत हिंदूत्वाचे समर्थन करतील आणि भारतात मात्र त्यांचेच इथले भाईबंद हिंदूत्वाच्य नावाने तेव्हाच गळा काढत असतील. अर्थात ही जर-तरची गोष्ट आहे. कारण अजून प्राथमिक चाचण्याही सुरू झालेल्या नाहीत आणि तुलसी वा कुठल्याही इच्छुकाने त्यासाठी हालचाली सुरू केलेल्या नाहीत. पण तसे झाले तर? इथले पुरोगामी हिंदूत्वाचा विरोध म्हणून ट्रंपचे समर्थन करणार काय? प्रतिक्षा करावी लागणार आहे.

7 comments:

  1. झेंड्यातल्या चांदण्या भगव्या दाखवायच्या मग :)

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे मस्त लेख. टिपीकल भाऊ टच असलेला लेख. आवडला.

    लेखात उल्लेख आहे की ट्रम्पसाहेबांची ही पहिलीच कारकिर्द असल्याने ते परत एकदा निवडणुक लढवायला पात्र आहेत आणि त्याकारणाने रिपब्लिकन पक्षाला उमेदवार शोधायची गरज नाही कारण त्यांचा उमेदवार तयारच आहे. बहुतेक वेळा अध्यक्षाला दुसऱ्या टर्मसाठी कोणी आव्हान देत नाही त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पुढच्या निवडणुकीसाठी उमेदवार असतो. तरीही पक्षाला प्रायमरी घ्यावी लागते. अर्थात दुसरा कोणी उमेदवार नसेल तर ट्रम्पसाहेबांना १००% मते प्रायमरीत मिळतील. २००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुशना काही राज्यात रिपब्लिकन पक्षातून आव्हान मिळाले होते त्यामुळे त्यांना १००% नाही तर ९८% मते प्रायमरीत मिळाली होती.(https://en.wikipedia.org/wiki/Republican_Party_presidential_primaries,_2004)

    १९६८ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरीत अध्यक्ष लिंडन जॉन्सन पुढे होते पण त्यांना आव्हान देणाऱ्या सिनेटर युजीन मॅकार्थींना लक्षणीय प्रतिसाद मिळत होता. त्याचे कारण व्हिएटनाम युध्दामुळे जनतेत असलेली नाराजी हे होते. तेव्हा अध्यक्षीय निवडणुकीत आपला पराभव होईल ही शक्यता लक्षात घेऊन लिंडन जॉन्सन यांनी माघार घेतली. डेमॉक्रॅटिक पक्षाने नंतर एडवर्ड केनेडी यांना उमेदवार निवडले. त्यांची हत्या झाल्यावर लिंडन जॉन्सन यांचे उपाध्यक्ष हर्बर्ट हम्फ्रे यांना उमेदवारी दिली. त्यांना रिचर्ड निक्सन यांनी हरविले.

    ReplyDelete
  3. शेवटच वाक्य एकदम भारी मजा येइल तस झाल तर.तुमच अमेरीकन निवडनुकीच भाकीत खर ठरल होत.इथले पुरोगामी संपादक तिथे जाउन हिलरी जिंकनार म्हनत होते तुम्ही इथुनच अचुक अंदाज केला त

    ReplyDelete
  4. श्री भाऊ हा विषय सगळ्या जगाला वेगळेच वळण लावेल

    ReplyDelete
  5. भाऊ डॉ. संपत शिवांगी डेमोक्रॅट नाहीत ते रिपब्लिकन आहेत.http://www.sampatshivangi.com/#about

    ReplyDelete
  6. भाऊ, तुमची ही टिप्पणी वाचून जरा ह्या विषयावर काही लिहावेसे वाटले. मुळात, अमेरिकन उजव्या ख्रिस्तधर्मियांचा भारतातील अनुरूप पक्ष म्हणजे भाजप, ही तुलनाच चुकीची आहे. अमेरिकन आणि भारतीय इतिहास आणि राजकारणाने घेतलेली वळणे ही इतकी वेगळी आहेत की ही तुलना वेगळ्या निकषांवर केली पाहिजे.

    मुळात, भारताला स्वातंत्र्य कुणाकडून मिळाले? तर ब्रिटिशांकडून. म्हणजे ख्रिस्त धर्मियांकडून.
    ब्रिटिशांच्या अगोदर कुणाचे राज्य होते? तर बहुतांश मोगलांचे. ते मुस्लिम होते हे आपण जाणतोच.

    मोगल साधारण १४व्या शतकांपासून संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करीत होते. म्हणजे, १४व्या शतकापासून १९४७ पर्यंत जरी हिंदुस्थान नाव असले तरी भारताचे सम्राट होते ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन. या दरम्यान हिंदूंची कोंडी कशी केली गेली हा इतिहास आहे. जिझिया कर, बहुतांशी हिंदू-द्वेष्टे धोरण, जबरदस्तीने बाटवणे इत्यादी सर्रास चालणाऱ्या घटना होत्या. काही मोगल सम्राट थोडेसे उदारमतवादी होतेही, पण भारताच्या हिंदू लोकसंख्येवर राज्य करणारे मुस्लिम राजे होते आणि त्यांचा राज्यकारभार निःसंशय धर्माधारित (मुस्लिम धर्माधारित) होता. तरीही, १९४७ नंतर आपल्या उदार राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वामुळे नंतरही अल्पसंख्यांक म्हणून बोटचेपे धोरण तसेच राहिले. इतकेच नव्हे, तर त्यांचा कळवळा येऊन त्यांचे लांगूलचालन केले गेले. अगदी शिवाजी महाराज, ज्यांनी ही परकीय व्यवस्था झुगारण्याचा प्रयत्न केला त्यांनाही ह्या शहाण्यांनी "हुकलेला मनुष्य" ठरवले. म्हणजे, जो माणूस त्याच्या हक्काची भूमी परक्यांपासून परत मिळवायला आयुष्यभर लढला, तो हुकलेला आणि बळकावणारे बाहेरून आलेले ते शेहेनशहा! असा न्याय.

    आता हे मुद्दाम सांगायला हवे की मी मुस्लिमांच्या विरोधात नाही, पण त्यांना अगदी वेगळा कायदा कानून देण्यापर्यंत जे राजकारण केले गेले ते त्यांना झुकते माप देण्याचेच होते. सगळीकडे ज्या जाती-जमाती भरडलेल्या, अन्यायात पिचलेल्या असतात त्यांना सवलती देण्याचे धोरण असते, पण इथे ज्या धर्मियांनी समग्र देशावर राज्य केले आणि सत्ता गाजवली त्यांना त्यांची "शरियत" सुरु ठेवता आली, आणि शतकानुशतके ज्या समाजाने पारतंत्र्य पहिले त्यालाच दाबते ठेवले गेले.

    थोडक्यात, भाजप हा प्रबळ गटाचे नेतृत्व करणारा पक्ष नसून, अनेक शतके दबलेल्या गटाचे नेतृत्व करणारा पक्ष आहे. आता, अमेरिकेतल्या उजव्या म्हणजे ख्रिश्चनधर्मियांचे उदाहरण घेऊ.

    मेफ्लॉवर जहाजावरून पहिल्यांदा जे पिलग्रिम्स उतरले ते ब्रिटनच्या राजाच्या जाचाला कंटाळून आले होते. परंतु आल्यानंतर काही शतके त्यांनी/त्यांच्या वंशजांनी काय केले? इथल्या मूळ इंडियन रहिवाश्यांचे निर्घृण शिरकाण केले, स्वतःचा जम बसवला, मग आफ्रिकेतून गुलाम सरळ सरळ बाजार मांडूनच घेऊन आले आणि त्यांना अमानुष वागणूक दिली. बरे, हा संघर्ष सरळ सरळ गोरे प्रबळ ख्रिस्तीधर्मीय आणि बाकी, असा होता. हे वर्चस्व ह्या गटाने अगदी आजपर्यंत कायम राखले आहे, हे अमेरिकी बुद्धिवंतसुद्धा कबूल करतात. हे असे वर्चस्व हिंदूंना कधी मिळाले होते? विजयनगरचे साम्राज्य पडले आणि हे वर्चस्व संपुष्टात आले. जेव्हा हे वर्चस्व होते तेव्हा इतर धर्मीयांवर कुठलेही कर लावले नव्हते. पारशी, ज्यू आणि कितीतरी धर्मीय इथे येऊन सुखाने नांदले.

    असे असताना भाजप आणि रिपब्लिकन पक्षांची तुलना कशी काय होऊ शकते बरे? पण आपले पंडित(!) ही सतत करत असतात, इतकेच नव्हे तर डेमोक्रॅटिक पार्टीची तुलना काँग्रेसबरोबरआणि रिपब्लिकन पक्षाची तुलना भाजप बरोबर, असा हा उफराटा खेळ आहे.

    ReplyDelete