Friday, August 24, 2018

नरसिंहराव आणि अटलजी

rao vajpayee के लिए इमेज परिणाम

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने व्याकुळ झालेला भारत देश बघताना त्यांचे राजकीय समकालीन व माजी पंतप्रधान नरसिंहराव यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. राजीव गांधी यांच्या घातपाती निधनामुळे कॉग्रेसमध्ये जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी निवृत्तीत गेलेले नरसिंहराव पुन्हा क्रियाशील राजकारणात परतले आणि ज्येष्ठ म्हणून त्यांना कॉग्रेस अध्यक्ष बनवण्यात आलेले होते. तेव्हाही गांधी घराण्याचे निष्ठावंत नारायणदत्त तिवारी व अर्जुनसिंग यांनी सोनियांच्या निवासस्थानी धरणे धरून त्यांनीच पक्षाचे नेतृत्व स्विकारावे म्हणून आग्रह धरला होता. पण मुले लहान असल्याने सोनियांनी ती मागणी फ़ेटाळून लावली होती. पर्यायाने राव यांच्याकदे नेतृत्वाची धुरा आलेली होती. सहाजिकच निवडणूका पुर्ण झाल्यावर पंतप्रधान पदही त्यांच्याच वाट्याला आले. पण त्यांनी सोनियांच्या रिमोटनुसार कारभार केला नाही आणि ते रोषाला पात्र झालेले होते. पुढे जेव्हा सोनियांनी काही दरबारी हाताशी धरून पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली त्यानंतर राव यांना बहिष्कृत करण्यात आले. नवे नेतृत्व आले मग जुन्याचे महत्व संपुष्टात येते ही जगरहाटीच आहे. पण ज्याने पाच वर्षे पक्षाची व देशाची धुरा संभाळली, त्याच्या वाट्याला पुढल्या काळात स्वपक्षातच आलेली लाजिरवाणी व अपमानास्पद वागणूक जगाच्या इतिहासात अपुर्व मानावी लागेल. पंतप्रधान म्हणून पायउतार झाल्यापासून अवघ्या आठ वर्षात राव यांचे निधन झाले आणि मारणोत्तर त्यांच्यावर सूड घेण्य़ाची एकही संधी सोनियांनी सोडली नाही आणि राव यांना अपमानित होऊन इहलोकीचा   निरोप घ्यावा लागला होता., आज देश अटलजींसाठी अश्रू ढाळत असताना व त्यांना सर्व इतमामाने निरोप दिला जात असताना अपमानित नरसिंहरावांचे स्मरण म्हणूनच अगत्याचे ठरावे. देशाच्या राजकीय व सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचा गळा त्यांच्या अपमानाने घोटला गेला होता.

राव यांना ९ डिसेंबर २००४ रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना एम्स या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तिथेच चौदा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माजी पंतप्रधान म्हणूअन सरकारी व शाही इतमामाने त्यांना निरोप दिला जावा ही अपेक्षा सर्वांचीच होती. ती भारताची परंपरा राहिलेली आहे. पण नरसिंहराव तितके सुदैवी नव्हते. कारण देशात पुन्हा त्यांच्याच पक्षाच्या हाती सततसुत्रे आली असली, तरी पक्षाची सुत्रे सोनिया गांधींच्या हाती गेलेली होती. राव यांचे पुत्र प्रभाकर यांनी आपल्या पित्याची दिल्ली हीच कर्मभूमी असल्याने त्यांच्यावर तिथे अंत्यसंस्कार व्हावे म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मागणी केली होती. सिंगही त्याला तयार होते. पण ते शक्य झाले नाही. कारण रिमोटवर चालणार्‍या सरकार वा पंतप्रधानाला आपले निर्णय घेता येत नाहीत. परिणामी नरसिंहराव यांचे पार्थिव त्यांची जन्मभूमी असलेल्या आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबादला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. दिल्लीत इस्पितळातून त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणले गेले आणि तिथून थेट विमानतळावर हैद्राबादसाठी रवाना करण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कार हैद्राबादला झाले आणि तिथे तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थमंत्री चिदंबरम, संरक्षणमंत्री प्रणब मुखर्जी व गृहमंत्री शिवराज पाटिल औपचारिकता म्हणून उपस्थित राहिले. भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी तिथे अगत्याने गेले होते. पण ज्या पक्षाची राव यांनी आयुष्यभर सेवा केली त्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी तिथे फ़िरकल्याही नाहीत. फ़ार कशाला राव यांचे पार्थिव राजधानी दिल्लीतील कॉग्रेसच्या मुख्यालयातही आणण्याला प्रतिबंध घालण्यात आला होता. वाजपेयींच्या वाट्याला आलेला शोक व समारंभ म्हणूनच राव यांची आठवण करून देणारा आहे. कारण गेली चौदा वर्षे वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून अलिप्त राहिलेले होते.

कुणाला वाटेल की सोनिया गांधी वा कॉग्रेसच्या द्वेषमूलक राजकारणाची आठवण करून देण्यासाठीच या आठवणी करून दिल्या जात आहेत. पण आज नाहीतर त्याही भारताच्य सुपुत्राच्या आठवणी कधी व कोणी सांगायच्या? कॉग्रेसच्या मागल्या दोन दशकाच्या कारभारात व कार्यक्रमात कधी कुठे आपल्या या पाच वर्षे पंतप्रधानपदी बसलेल्या नेत्याचा उल्लेखही येत नाही. जणू नरसिंहराव नावाचा पंतप्रधान भारतात कधी झाला नाही आणि तसा कोणी व्यक्ती कॉग्रेसच्या इतिहासातही नसावा अशीच एकूण स्थिती आहे. राव यांना दिल्लीत अंत्यसंस्कार नाकारणार्‍या सोनिया होत्या हे अवघ्या दिल्लीला ठाऊक आहे. पण त्याचा पुरावा कोणी देऊ शकणार नाही. बोफ़ोर्स घोटाळ्याची महत्वाची कागदपत्रे राव यांच्याच कारकिर्दीत भारताला मिळाली आणि त्याचा बभ्रा झाल्यापासून सोनिया त्यांच्यावर नाराज होत्या आणि आपल्या निष्ठावंत हस्तकांकरवी त्यांनी राव यांच्यावर यथेच्छ शरसंधान केलेले होते. म्हणूनच नंतरच्या काळात पक्षाची सुत्रे हाती घेतल्यापासून सोनियांनी या ज्येष्ठ नेत्याला व माजी पंतप्रधानाला कायम दुर्लक्षित केले, नुसते दुर्लक्षितच केले नाही, तर कॉग्रेसच्या सर्व नोंदी व इतिहासातूनच नरसिंहरावांची पाच वर्षे पुसून टाकण्याचा कायम आटापिटा केला, तो अगदी मरणोत्तरही चालू राहिला. म्हणूनच राव यांना दिल्लीत हक्काचे अंत्यसंस्कार नाकारले गेले आणि त्यांच्या पार्थिवालाही पक्ष कार्यालयात ‘पाऊल’ टाकू देण्यात आले नाही. द्वेषाचा यापेक्षा कुठला मोठा व धडधडित पुरावा आवश्यक असतो? योगायोग असा की पाच वर्षानंतर त्याच आंध्रप्रदेशचे कॉग्रेस मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले तेव्हा त्याच सोनिया गांधी अगत्याने हैद्राबादला अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिल्या होत्या. मग नरसिंहराव यांच्याच बाबतीत अपवाद कशाला केला होता? याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात अटलजींसाठी देश का हळहळला त्याकडे बघावे लागते.

आटलजीं विरोधी नेता आणि नरसिंहराव पंतप्रधान होते. पाकिस्तानने एका जागतिक व्यासपीठावर काश्मिरचा मुद्दा उकरून काढला होता आणि तिथे भारत सरकारची बाजू मांडण्यासाठी जाणार्‍या शिष्टमंडळाचे नेतृत्व राव यांनी विरोधी नेता अटलजींकडे सोपवले होते. तात्कालीन परराष्ट्रमंत्री दिनेश सिंग रुग्णशय्येवर पडलेले होते आणि ती जबाबदारी मोठ्य विश्वासाने राव यांनी विरोधी नेत्यावर सोपवली. परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद अटलजींचे सहकारी म्हणून त्या शिष्टमंडळात सहभागी झालेले होते. हा राजकारणातला सभ्यपणा व समन्वय सोनियांच्या हाती पक्षाची व देशाची सुत्रे जाण्यापर्यंत कायम होता. आज त्याच देशाचा माजी मंत्री मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदी हटावसाठी मुशर्रफ़ यांची मदत मागतो. ही इतकी उलथापालथ कुणामुळे व कशामुळे झालेली आहे? लोकसभेत प्रथमच निवडून आल्यानंतर १९९९ सालात सोनियांनी वाजपेयी सरकारवर इतक्या शेलक्या भाषेत झोड उठवली होती, की त्यांच्यासारखा भीष्माचार्यही विच़्हलीत झाला होता. सोनियांच्या भाषणातील ते भेदक शत्रूवत शब्द मुद्दाम उल्लेखून वाजपेयींनी भारतीय राजकारणात विष कालवले जात असल्याचे सभागृहाच्या तेव्हाच नजरेत आणून दिले होते आणि अवघ्या पाच वर्षांनी त्याचा अनुभव खुद्द कॉग्रेसच्याच माजी पंतप्रधानाला म्हणजे नरसिंहरावांना मरणोत्तर घ्यावा लागला. ज्यांना आपल्याच दिवंगत पंतप्रधान व ज्येष्ठ नेत्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याइतका द्वेष करता येतो, त्याच मातेच्या पोटी जन्माला आलेला आजचा कॉग्रेस अध्यक्ष लोकसभेत मोदींना कृत्रीम मोठी मारून प्रेमाचे संदेश देतो, यावर कोण कशाला विश्वास ठेवणार ना? उलट अटलजींना मिळालेला सन्मानजनक निरोप तपासून बघितला पाहिजे. कुठल्या माजी पंतप्रधानाला अथवा अन्य कुणा मोठ्या नेत्याला पक्ष व जनतेने अशी आदरांजली वाहिलेली आहे?

मध्यंतरी देशात एक असहिंष्णुता बोकाळत चालल्याचा खुप गवगवा झालेला होता. विद्यमान पंतप्रधान मोदी कसे वाजपेयींपेक्षा असहिष्णू आहेत, त्यावरून चर्चासत्रे रंगवली गेली व जात आहेत. पण नरसिंहराव आणि अटलजी यांच्या या मरणोत्तर अनुभवातूनच सत्य समोर येत असते आणि त्यातला फ़रक लोकांना कळण्यासाठी अशा दु:खद प्रसंगीही त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची गरज भासत असते. आज नरेंद्र मोदी आपल्या कृतीतून नेहरूंच्या कारकिर्दीच्या खाणाखूना पुसून टाकत असल्याचा सरसकट आरोप होत असतो. पण ज्या धाडसी पंतप्रधानाने देशाला आर्थिक गर्तेतून काढण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले व आर्थिक सुधारणांचा पराक्रम यशस्वी करून दाखवला, त्याचा कोणता मान कॉग्रेसने राखला होता? आजही आर्थिक सुधारणांचे श्रेय कॉग्रेसवाले अगत्याने घेत असतात. पण त्या सुधारणांचा जनक म्हणून मनमोहन सिंग यांना पेश केले जाते. पण चुकूनही नरसिंहराव यांचा उल्लेख कोणी कॉग्रेसवाला करीत नाही. नेहरूंच्या दुरदृष्टीने गुणगान करणार्‍यांना राव यांनी भारताला एकविसाव्या शतकात खेचून आणण्यासाठी केलेल्या धाडसी निर्णयाच्या पाऊलखूण क्रुरपणे पुसून टाकण्यातली सूडबुद्धी कशी दिसत नाही? त्याच राव यांनी अणुस्फ़ोटाची तयारी करून ठेवली होती आणि त्याची पुर्तता अटलजींनी आपल्या हाती सुत्रे आल्यावर केली. या दोन नेत्यांनाच संपवण्याच्या द्वेषमूलक राजकारणाने भारतीय सार्वजनिक जीवनातील सहिष्णूतेचा गळा घोटला गेला होता. त्याचे श्रेय सोनियांना जाते. सोनिया राहुल यांना नरसिंहरावांच्या कर्तबगारीने भयभीत केले होते. म्हणून पदोपदी त्यांना त्या गुणी नेत्याच्या पाऊलखुणा पुसण्य़ाची गरज वाटली. नरेंद्र मोदींना पदोपदी मरणोतरही अटलजींचे स्मरण करून त्यांचेच गुणगान करण्यात कधी कमीपणा वाटलेला नाही की आपल्या छोटेपणाची शरम वाटलेली नाही. दोन समकालीन नेते व माजी पंतप्रधानांच्या मरणोत्तर अनुभवाची नोंद म्हणूनच अगत्याची व आवश्यक वाटली. अगदी वेळ योग्य नसली तरी त्याचे स्मरण करून देणे अपरिहार्यच आहे.

15 comments:

  1. भाउ सोनियांनी नरसिंहरांवाना आंध्रमध्ये पन सोडले नाही रेड्डींना हाताशी धरुन रावांच्या चितेची केलेली विटंबना त्याची तेलगु वाहीन्यावरची चित्रने हिडीसपनाचा कळस आहे परत १० वरषे सरकार असुन पन रावांना समाधी स्मृती स्थळी मिळण्यासाठी २०१५साल उजाडाव लागल मोदींनी ती दिली तुमच खरय आताच्या राजकारनात जो द्वेष दिसतो तो सोनियांनी सुरु केला मोदींना नाही का गुजरात मधे नाहकत्रास दिला

    ReplyDelete
  2. सोनियांना घरानेशाहीचा इतका गर्व आहे की इथले घराने बहादर मुख्यमंत्री हायकमांडला म्हनुन भेटायला जात आनि अहमद पटेलांना भेटुन येत सोनियांच्याघरी त्यांना प्रवेश नव्हता आजपन नाही

    ReplyDelete
  3. A very very talented,courageous yet unnoticed PM of India.....thank you for cherishing his memories....A separate article of his PM term will be of value..Of course Atalji remains as incomparable virtue. loved the article..

    ReplyDelete
  4. भाऊ ,,,,,,,,,,,,,लेखामधून नरसिंह रावांचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद !! सोनिया गांधी राजकारणात आल्यापासून त्यांचे प्रतिस्पर्ध्यावर विषारी ' फुत्कार ' टाकणे सुरूच आहे. पण दुर्दैवाने भारतात ' चाटू ' संस्कृती ' सार्वकालिक भरात असल्याने हे सर्व चालून जाते आहे.नाहीतर खरे तर ' नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा ' हीच परिस्थिती आहे. मनमोहन सिंग या माणसाची काय ' मजबुरी ' आहे तेच कळत नाही. सोनिया गांधी समोर हा माणूस एका ' रोबोट ' प्रमाणे उपस्थित असतो.

    ReplyDelete
  5. काय perfect लिहिलं आहे तुम्ही ... 👏👏

    I am of the view that 75 years later when the nation looks back it will see PVNR as the PM who was pivotal in decisively transforming the economic path of India... And Congress would be castigated severely for treating him the way he was treated in his life as well as in his death....

    ReplyDelete
  6. भाऊ,
    नरसिंह रावांबद्दलच्या माझ्या मनातल्या नेमक्या भावना तुम्ही मांडल्यात त्याबद्दल धन्यवाद. आर्थिक, परराष्ट्रीय संबंध, कठीण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या सारख्या संकंटांच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी देशाची धुरा हाती घेतली आणि बघता बघता पाच वर्षात त्यांनी अमूलाग्र बदल घडवला. मनमोहन सिंगांसारख्या अराजकिय नोकरशहाच्या हातात अर्थमंत्रीपद देउन त्यांनी भारतीय जनमानस समाजवादी मनस्थितीतून बाहेर काढले. त्यांच्या या भक्कम पायावरच वाजपेयींनी विकासाची ईमारत उभी करण्याचे कार्य केले. गमतीदार भाग असा कि अर्थमंत्री मनमोहनांनी केलेला विकास प्रधानमंत्री मनमोहनांनी नष्ट करायण्याच्या प्रयत्नाला हातभार लावला. मनमोहन हे जितके उत्तम नोकरशहा आहेत तितकेच ते वाईट राजकीय नेते आहेत. कारण काँग्रेस आपल्या स्वच्छ चेहर्याचा दुरुपयोग ते कळूनही थांबवू कडून होणारा शकले नाहीत

    ReplyDelete
  7. हे राव डिसेंबर १९९५ च्या सुमारास पंतप्रधान होते आणि संरक्षण मंत्री सुद्धा होते. १७ डिसेंबर रोजी रात्री एक विमान परदेशातून येऊन बंगाल मधील पुरुलिया वर शस्त्रास्त्र टाकून मुंबईत उतरतात. वाटेतील रडार भारतीय वायुसेने ने बंद केलेली असल्यामुळे त्यांना याचा थांगपत्ता लागत नाही. भारतीय गृहखात्याने ३ दिवस आधी लिहिलेले पत्र सुद्धा बंगाली गृहखात्याकडे पोहचलेले नसते. तरीही बंगाली पोलिसांना आधीच याचा सुगावा लागलेला असतो. ते सर्व शस्त्रात्रे ताबडतोप जप्त करतात. या सर्व प्रकरणात RAW गुंतली असल्याचा आरोप होतो. जे लोक विमान उडवून भारतात आले होते त्यांनी काही वर्ष पूर्वी हा आरोप पुन्हा केला आहे. नरसिंहराव यांच्या वर पंतप्रधान म्हणून आणि तात्कालिक गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची जबाबदारी येतेच. तिचे त्यानी कसे पालन केले? मुंबई मध्ये २ लोक पकडले जातात आणि १ निसटतो. जे २ लोक पकडले जातात त्यांना Presidential Pardon देण्यात येतं.

    ReplyDelete
  8. Congratulations bhau for 1 carod views

    ReplyDelete
  9. याहून वाईट अवस्था सीताराम केसरींची झाली.
    कृपया त्यावर पण लिहावे.

    ReplyDelete
  10. अटलजींचा मरणोत्तर जो सन्मान झाला, त्या सन्मानाचा हक्क नारसिहराव यांचा खचितच होता. खूप विद्वान, बहू भाषा जाणकार, धाडसी आणि चांगल्या विरोधीपक्ष नेत्याची कदर असणारा असा हा नेता होता. पण निव्वळ इटलीच्या बाईच्या हट्टापायी त्यांची मरणोत्तर विटंबना झाली,चालली आहे. पण त्याच्या उलट अटलजींच्या अंत्ययात्रेत मोदी स्वतः पायी 6 किलोमीटर चालत गेले, सर्व कामे सोडून दिवसभर तिथे थांबून होते, त्यांचे संस्कार यातून दिसतात.पण जी गत नरसिंह राव यांची झाली तीच गत सीताराम केसरी यांची केली गेली, कारण त्यांनी सुध्दा इटलीच्या बाईंचा आदेश मानला नव्हता.

    ReplyDelete
  11. ये हात नहीं ये वाळवी है....

    ReplyDelete
  12. श्री भाऊ, नरसिंह राव हे खरोखरच कर्तृत्ववान होते यात काहीच शंका नाही कारण त्यानी आधी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी ह्यनच्या बरोबर निरनिराळी खाती सांभाळ ली होती

    ReplyDelete
  13. मनाला अस्वथ करणारा लेख ...

    ReplyDelete