Sunday, February 4, 2018

अर्थसंकल्पाची गोष्ट

jetley 2018 के लिए इमेज परिणाम

गुरूवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडला आणि सर्व माध्यमात त्याचीच चर्चा रंगलेली होती. अशा चर्चेत त्या विषयातले जाणकार अभ्यासक नेमके काय सांगत असतात, ते बहुतांश सामान्य माणसाला कधीच समजत नाही. कारण त्यातले काहीजण जनतेचे कल्याण त्यातून होत असल्याची ग्वाही देत असतात आणि उरलेले देशाचा सत्यनाश होणार असल्याची भाकिते करत असतात. आकड्यांचा मोठा खेळ चालतो. पण ज्याच्या आयुष्याशी तो खेळ निगडीत असतो, त्याला त्याबाबत काहीही उमजू नये, असाच एकूण चर्चेचा थाट असतो. अमूकाला तमूक मिळणार आणि अन्य कोणाला लॉटरी लागली, असली भाषा ऐकून सामान्य माणूस सुखावतो. पण प्रत्यक्षात त्यातले त्या जनतेच्या वाट्याला किती आले वा कुठे गायब झाले, त्याची उत्तरे कधीच दिली जात नाहीत. खरे तर त्याविषयी कधी प्रश्नच विचारले जात नाहीत. मग उत्तरे कुठून मिळायची? एक गोष्ट खरी असते. अशा ज्या मोठमोठ्या रकमा या अर्थसंकल्पात सांगितलेल्या असतात, त्या सरकारी तिजोरीतून उचलल्या जातात. पण पुढे कुठे गेल्या, त्याचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. तो लागला असता, तर लालूप्रसाद यादव कुठल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात कशाला फ़सले असते? तेही एक आदर्श राजकारणी म्हणून देशाच्या इतिहासात नोंदले गेलेच असते. कोट्यवधी रुपये गरीब शेतकरी पशूपालकाला मदत म्हणून देण्याची तरतुद अर्थसंकल्पात झालेली होती. त्यानुसार सामान्य लोकांच्या गुरांना अडचणीच्या प्रसंगी सरकारी खर्चाने चारा पुरवला जायचा होता. पण तो कधी पोहोचला नाही. पण सरकारी तिजोरीतून वेळोवेळी कमीअधिक रकमा काढल्या गेल्या. त्यांची तरतुदच केली नसती, तर लालूच काय, इतरही कोणाला तितक्या रकमा उचलता आल्या नसत्या ना? अर्थसंकल्पाचा इतकाच अर्थ सामान्य लोकांना कळतो. कारण तितकी रक्कम गायब झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येत असते.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून व संसदीय लोकशाही अस्तित्वात आल्यापासून प्रतिवर्षी देशाच्या संसदेत अर्थसंकल्प मांडला गेला आहे आणि त्यातून प्रतिवर्षी गरीबाचे भले करण्याची आश्वासने दिली गेली आहेत. पण आजवर त्यापैकी किती रक्कम वा तिचे लाभ त्या गरीबाच्या वाट्याला आलेले आहेत? एकाट्या महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपये पाटबंधारे उभारण्यासाठी निश्चीत करण्यात आले व खर्चही झालेले आहेत. पण किती धरणे व बंधारे उभे राहिले? त्यातून किती शेतकर्‍यांना व गावकर्‍यांना तिथे अडवलेल्या पाण्याचा लाभ होऊ शकला? इतकी मोठी रक्कम अर्थसंकल्पात बाजूला ठेवली गेली आणि तिजोरीतून उचलली सुद्धा गेली. पण त्यातून एक टक्काही सिंचन जमिनीत वाढ झाली नाही, असा आक्षेप चार वर्षापुर्वी तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच घेतला होता. खुद्द मुख्यमंत्रीच असे म्हणत असेल, तर अन्य बाबतीत किती रकमांची तरतुद झाली आणि त्या खर्च होऊनही गरीबाची गरीबी तशीच का राहिली? असा प्रश्न कोणी विचारणार नाही की त्याचे उत्तर कोणी देणार नाही. कारण अर्थसंकल्पात तरतुद झाली म्हणजेच लोकांचे कल्याण होत असते. पर्यायाने गरीबीही दूर होत असते असा सिद्धांत आहे. त्यामुळे वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व मांडणे हा एक उपचार होऊन गेला आहे. सत्ता कुठल्याही पक्षाची असो, त्याच्याकडून असा अर्थसंकल्प बनवला व मांडला जात असतो. आताही त्याची मांडणी झालेली आहे आणि उलटसुलट चर्चा चालली आहे. पण सामान्य माणसाचा त्यातला सहभाग किती आहे? तर सरकारने जे काही खर्च ठरवले आहेत, त्यात आपल्या खिशातून व पाकिटातून किती रक्कम जाणार आहे, त्याचीच चिंता लोकांना भेडसावत असते. पगारदार असो किंवा सामान्य कष्टकरी असोत, त्याला हा अर्थसंकल्प भोगावा लागत असतो. पण त्याचे मत कोणी कधी विचारात घेत नाही.

सामान्य लोकांसाठी वा जनतेसाठी जो अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यातली भलीथोरली दिसणारी अब्जावधी रुपयांची रक्कम, कोणा मंत्र्याच्या खिशातून वा घरातून येत नसते. ती लाखो कोटी रुपयांची रक्कम विविध करांच्या आकारणीतून सरकारी तिजोरीत जमा होत असते. त्यापैकी किती भरावी किंवा किती नाकारावी, अशी काही निवड सामान्य माणूस करू शकत नसतो. त्याच्या नावावर दाखवलेली रक्कम सक्तीने व त्याच्या नकळत त्याच्याकडून वसुल केली जात असते. त्यालाच प्रशासकीय भाषेमध्ये महसुल म्हणतात. म्हणूनच सामान्य जनतेसाठी सरकारी तिजोरीत पैसे कुठून येणार, यापुरता संबंध येत असतो. आपण सिगरेट पित असू तर त्यात किती करवाढ झाली? अन्य कुठल्या वस्तु आपण खरेदी केल्याने आपल्याला किती अधिक वा कमी कर भरावा लागणार, हे प्रश्न लोकांसाठी महत्वाचे असतात. पगारदार असे लोक असतात, की त्यांच्या पगारातून थेट कर कापला जात असतो. सहाजिकच त्यात काही सवलत मिळाली आहे काय, इतकेच त्याचे अर्थसंकल्पाकडे लक्ष असते. बाकी उद्योगपती वा व्यापारी लोक अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले असतात. कारण खरा नफ़ातोटा त्यांच्या वाट्याला येत असतो. चैनीच्या वस्तुंवर कर लादला म्हणजे सरकार समाजवादी वा गरीबांचे झाले, असाही एक भ्रम निर्माण करून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढल्या किंवा अन्य कुठल्या चैनीच्या वस्तुंचे दर वाढले, मग गरीबाला उगाच समाधान वाटते. आपली लूट झाली नाही अशा भ्रमात तो सुखावतो. पण ज्याच्यासाठी किंमती वाढतात, त्याला असल्या वाढीची फ़िकीर नसते. कारण वाढलेल्या किंमती वा दरांची भरपाई असा वर्ग तळागाळावर ढकलून सहीसलामत निसटत असतो. कधी त्याचाही हिशोब व तपशील जनतेला उलगडून सांगण्याचे कष्ट कोणी घेतो काय? नुसतीच उडवाउडवी चालत असते.

उदाहारणार्थ मोठमोठी पंचतारांकित हॉटेल वा चैनीच्या जागा निर्माण झालेल्या आहेत. तिथे किती सामान्य माणसे जात असतात? बहुतांश श्रीमंत वा प्रतिष्ठीत वर्गच त्याचा उपभोग घेत असतो. अशा हॉटेल वा सुविधांचा उपयोग बहुधा मोठमोठ्या कंपन्यांसाठी राखून ठेवलेला असतो. उदाहरणार्थ गुरूवारी जो अर्थसंकल्प मांडला जात होता, तेव्हा अनेक वाहिन्यांनी आपल्या चर्चा अशाच हॉटेलात योजलेल्या होत्या. दिवसभरासाठी तिथे बसून चर्चा चालल्या आणि त्याचा खर्च किती झाला? काही लाखांची किंमत त्यासाठी मोजावी लागत असते. त्याचे एक दिवसांचे थेट प्रक्षेपण होते, उरलेल्या दिवशी अशा सुविधा ओस पडलेल्या नसतात. तिथे प्रक्षेपित होत नसलेले अनेक समारंभ किंवा सोहळे चालूच असतात. कंपन्या, संस्था वा तत्सम लोकांचे पंचतारांकित विचारविनियम तिथेच होतात. त्यात कुपोषित मुलांपासून देशातील गरिबीविषयी उहापोह चालत असतो. मोठे उद्योग कसे उभारावेत आणि गरीबांसाठी रोजगार कसा उपलब्ध करून द्यावा, याचीही माथेफ़ोड तिथेच होत असते. त्यावर वर्षाकाठी देशात किमान काही हजार कोटी रुपये खर्च होत असतात. अशा आलिशान सुविधांचा वापर कोणी सामान्य माणूस करीत नाहीच. पण जे त्याचा उपभोग घेतात, त्यापैकी काही थोडेच लोक त्याची किंमत आपल्या खिशातून मोजत असतात. बहुतांश असल्या सुविधांची किंमत कंपन्या वा सरकारी खात्यातून भरली जाते. मग तो खर्च आपोआप कंपनीच्या उत्पादन खर्चात किंवा सरकारी खर्चात येऊन जमा होत असतो. ती रक्कम सामान्य माणसाला वस्तु वा सेवांच्या किंमतीतून मोजावी लागत असते. म्हणजे त्या सेवा वस्तूंची किंमत वाढवून हा ऐषारामाचा खर्च वसूल होतो. मग तो श्रीमंतांवर लादलेला कर वा खर्च कसा म्हणता येईल? थोडक्यात श्रीमंतांवर करवाढ दरवाढ लादली हाच फ़सवा देखावा असतो आणि त्याला आपल्या देशात समाजवाद मानले जाते.

एकूण गंमत अशी आहे, की अर्थसंकल्प म्हणजे जे या देशातले मुठभर सुखवस्तु लोक आहेत, त्यांच्या चंगळीचे व्यवस्थापन असे त्याचे स्वरूप आहे. त्यातून कुठूनतरी थेंबथेब गळणार्‍या लाभावर सामान्य माणसाने खुश असावे अशी अपेक्षा असते. कारण एकूण खर्च वा तरतुदीमध्ये जितक्या पायाभूत सुविधांच्या योजना असतात, त्याच सामान्य माणसाच्या वाट्याला येणारे लाभ असतात. भव्य महामार्ग, शाळा, आरोग्य, सिंचन वा संशोधन अशा गोष्टींवरचा खर्च सामान्य माणसाला लाभ देत असतो. आज देशाच्या कानाकोपर्‍यात बांधल्या जाणार्‍या रस्त्यांनी गरीबाला जितके स्वयंभू बनवले आहे, तितके कुठल्याही आजवरच्या अनुदानाने सुखी केलेले नाही. पण त्याची कोणी दखल घेत नाही की त्यावर चर्चा करत नाही. मग सामान्य माणसाला आपल्या किरकोळ खरेदीविक्रीत किती दरवाढ करवाढ झाली, त्यावरच समाधान मानावे लागत असते. अलिकडे निदान नेहमीच्या जीवनावश्यक वस्तुंची वाढ अशा अर्थसंकल्पावर अवलंबून राहिलेली नाही. ती वाढ किंवा घट केव्हाही होत असते. म्हणून अशा अर्थसंकल्पाला केवळ चर्चेतले महत्व उरलेले आहे. त्याचे परिणाम आपल्या वाट्याला येण्यातूनच लोकांना त्याची महत्ता उमजू शकते. गरीब महिलांना मिळाणारा सिलींडर वा असाध्य आजारासाठी जाहिर झालेल्या आरोग्य अनुदानाची प्रचिती येईल, तेव्हाच लोक अर्थसंकल्प वा त्याचे फ़ायदेतोटे यांची गंभीरपणे दखल घेऊ लागतील. अन्यथा हा केवळ मुठभर अभ्यासक व तत्सम लोकांच्या विरंगुळ्याचा विषय होऊन राहिल. कुठल्याही योजना व धोरणाचे कौतुक त्याच्या अनुभूतीतून सुरू होत असते आणि तेच टिकावू असते. त्यावरील चर्चा वा युक्तीवाद खर्‍याखुर्‍या आयुष्यात उपयोगी नसतात. संकल्पात अर्थ तेव्हाच असू शकतो. त्या अनुभूतीनंतरच सामान्य लोकांना या शब्द व त्यावरील चर्चेविषयी आत्मियता निर्माण होऊ शकेल.

4 comments:

  1. भाऊ आपण विस्रुत लेख लिहून माहिती दील्या बद्दल धन्यवाद.
    हे सर्व मिडियावाले दाखवत नाहीत आणि किती महत्वाचे आहे हे आपल्या लेखातुन आपल्या ब्लाॅगच्या वाचकांच्या लक्षात येते आहे.
    परंतु भाजप सरकारने म्हणजे मोदी सरकारने बजेट मध्ये नोकरदार मंडळीना काही सवलती न दिल्या मुळे नाराजी आहे असे दाकवले जात आहे.. व तथाकथित बर्याच प्रमाणात नोकरदार वर्ग (म्हणजे बरेचसे सरकारी नोकर सोडून कारण काँग्रेस व ह्या शासकीय वर्गाचे साटेलोटे कित्येक दशके आहे व दोघे मिळुन खाऊ अशी मिलिभगत यांची आहे ) मोदींचा पाठीराखा ( आता आहे का हे 2019 मध्ये समजेल) होता परंतु काही भरघोस जेटली व काँग्रेस हस्तक नोकरशहा यांनी होऊन दिले नाही असे दिसते आहे. व नाराजी सोशल मिडियातुन दिसत आहे.
    हे हळूहळू वाढवत नेऊन जाती- पातीचे राजकारण व तमाम विरोधी पक्षांची मोट बांधुन मोदी सरकारचा लोकसभेतुन / केंद्रीय सरकार मधुन पायउतार करायला सुरवात झाली आहे...
    आंतरराष्ट्रीय पातळी वर जरी मोदी कितीही समर्थ असले तरी मतांचा जोगवा देशवासियांन कडेच मागायचा आहे.
    व लोकलुभावन निर्णय घेताना 56 इंच सिना दिसत नाही हि वस्तुस्थिती आहे. मोदी सरकारला 2019 ची टर्म मिळेणे देश हितासाठी आवश्यक आहे. परंतु अशीच नाराजी जर वाढत गेली तर परत खिचडी सरकार येवुन देशाचे व कदाचित मोदींचे मनसुबे ऊधळे जातील..
    रात्र वैर्या ची आहे...
    पण मांझी जब नांव डुबाये तो कौन बचाये ही वस्तूस्थीती आहे.
    भारत हा खंडप्राय देश एक शापीत भुमी आहे हा ईतिहास परत परत सिद्ध होत आहे.
    यातुन वाट काढायचे एक एक ( बजेट एक मार्ग) मार्ग मोदी बंद करत चालले आहेत. 
    गेल्या 60 वर्षांची व आता मोदी व पुर्वीच्या वाजपेयी सरकारची आपल्या प्रमाणे आकडेवारी मिडियावाले व सोशल मिडियावाले कसे दाखवतात यावर अवलंबून आहे.
    कारण डोकलाम काश्मिर पाकिस्तान यांनी जरा जरी हल्ले वाढवले तर मोदींची 56 इंच छाती चा काही ऊपयोग नाही हे सामान्य जनतेच्या गळी मिडियावाले ऊतवतील व बाजी पलटवतील.. जोडीला जिग्नेश, कन्हैया ऊमर हार्दिक आहेतच...
    अशा परिस्थितीतीत मोदी 2019 कसे जिंकतात हे पाहावे लागले.
    आपण लेख लिहून सत्तेवरील नशेतुन मोदी जेटली व शहांना कसे ऊतरवता यावर पण काही प्रमाणात 2019 चे निवडणूक निकाल अवलंबून आहेत.

    भाऊ
    जेटली मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय यांनी देशासाठी त्याग करायला पाहिजे हे सांगत आहेत का तर यातील बहुसंख्य मध्यमवर्गीयांचा भाजपला पाठिंबा राहिला आहे वर्षांपासुन पाठिंबा दिला आहे. (ईतर अशिक्षीत केव्हाही पलटी मारु शकतात पहा गुजरात निकाल ) परंतु यांचे एका बजेट (निवडणूका लक्षात घेऊन) मध्ये लंगुचालन करण्याची बुद्धी देत नाही. देशहिताला साठी हे आवश्यक होते. स्वातंत्र्य नंतरचा मध्यमवर्ग एवढा समजुतदार व त्यागी देशभक्त असता तर देशाची ही दुर्दशा झाली नसती. परत 2019 मध्ये सत्तेवर आल्यावर मध्यमवर्गीय कडे दुर्लक्षित कले असतें तर काही फरक पडला नसता.
    *पण पुस्तकी ज्ञान वाले व जनतेतून निवडणून न आलेले फायनान्स मिनिस्टर जेटली परत मोदींच्या हाती किटली देणार हे व्हायरल झाले आहे.* मध्यमवर्गीयांची भाजपला निवडणूक देण्याची हौस खासच भागली आहे. परत मोदी भक्ताना काँग्रेस व इतर लाॅजवासी मोदींनी काय आश्वासन दिले व प्रत्याक्षात काय दिले यावरुन कायम हिणवले जाते व आता तर आयते कोलीत दिले आहे. जिग्नेश कन्हय्या व काँग्रेस वासियांना उकळ्या फुटत असतील. हा काँग्रेसचा मोठा विजय आहे.
    *बघा मुंबईत एका बाजुला लोकल मध्ये श्वास घ्यायला जागा नाही बरगड्यां दाबे पर्यंत लोकल डब्यात गर्दी आहे तर दुसरी कडे मोदींनी एसी ट्रेन दिली आहे..*
    *पंधरा डब्यांच्या लोकल चालवुन थोडी रिलीफ देण्या पेक्षा एसी लोकल दिली यावरुन किटली वाले मोदी किती जेटली वाले झाले हे समजू शकते..* यावरुन मोदींना कुणी वेढलेले आहे हे समजून येते.
    मोदी खरोखरच परत 2002
    च्या भुमिकेत जाणे आवश्यक आहे. कारण सत्तेवर भारतीय माणुस जमिनीवरील पाय सोडून हवेत जातो हे दुर्दैव आहे. *परत पाय जमिनीवर आले तर कदाचित मोदी जेटलींची छाटली करुन त्यांच्या हातात किटली देतात का हे बघावे लागेल.*
    *की 2019 नंतर मोदी परत किटली घेतात? हे काळचा सांगेल.*

    ReplyDelete
  2. सध्या खालील मेसेज व्हायरल झाला आहे...
    काही लोकांना शेती हा एक हातभट्या चा जुगार आहे याची कल्पना नाही.... अनेक मोठे शेतकरी जरुर आहेत पण हेच ऊपासमारी सोसणार्या शेतकरीवर्गाचे पुढारी आहेत व अशा शेतकरीवर्गाची आंदोलने रचुन मोठे पुढारी झाले आहेत. व राजकारणी मंत्री पण शेतकरीवर्गातुन आलेले आहेत.
    त्यामुळे हे अशक्यच आहे..
    पण मनस्ताप करणारी गोष्ट म्हणजे गेल्या 70 वर्षांत हे कोणाला सुचले/ मांडले नाही.. किती खोलवर भाजप विरोधी लाॅबि आहे हे सिद्ध होते...
    शेतकरीवर्गा मुळे आपण अन्नधान्य खातो हे माॅल कलचर वाले विसरले आहेत..
    पण जनाधारातुन निवडणूक जिंकुन फायनान्स मिनिस्टर झालेले वित्त मंत्री देशाला कमी काळच मिळाले...
    व मनमोहन सिंग सारख्या पंतप्रधानाला पण कोणाच्या तरी ईशार्या वर च काम करावे लागले.
    त्याचमुळे नेहमीच वित्त धोरण भरकटत राहिले..
    पण जरुर वाचावे..
    *The big myth on Income Tax Payers in India;*

    Data from a Chartered Accountants'Company Secretaries and other professional bodies and groups.......;
    ✍ FM said during his budget speech that we are largely a tax *'non- compliant'* society and presented that only *3.7 crores* are filing ITRs in this poor country of 125 crore population .

    *The reply by CAs ,CSs,CMA,s

    Sir,
    We have 82 crore voters out of which,

    - *75% are agriculturists* ie. 61.5 crores ( You exempted them straightaway, but they can also buy cars , bungalows etc. as you quoted.. Your political colleagues are also enjoying this exemption)

    *Balance remains... 20.5 crores*

    *Less:24% BPL class* ( Below poverty line)

    Means 15 crore population ( which is non agriculturist and non BPL) ..

    *Less : Senior Citizens, Non working wives, unemployed youths, below-taxable income earners... political class.. (say 75%)* ... in a typical indian family only 1 earning member and 5/6 are dependent on him....

    *Balance: (15-11.25)=3.75 crores is the earning class ... which can file ITRs and ... they are already filing it...*

    .... So almost no gap as FM is stressing unnecessarily without knowing his country������

    if FM wants more people to come into tax net ... then... instead foolishly resorting to rampant raids, surveys, notices, scrutiny, demonetisations etc etc viewed as *tax terrorism* ... he should defy his negative bureaucrats and .......

    1. Introduce simple Income Tax on Agricultural Income on large landlords ( Say 10 Acres plus ) - you can add 26% of Agriculturists as tax payers *( Politicians are also enjoying this exemption )*

    2. Instead of introducing 5000 /10000 penalties on late filers of IT return ...
    *come out with positive approach and introduce incentives to IT return filers* ( learn from Pakistan, IT assessee gets discount in purchase of Car )

    3. *Introduce Privilege card to those paying taxes above certain limit.. privilege card to entitle assessee with benefits like Priority quota in railway tickets , Use of airport lounges, subsidised medical facilities, etc etc... let Tax payers feel proud*

    4. *Introduce medical insurance / life insurance on basis of average ITR filled... like coverage upto twice of Gross Income in ITR filed for mediclaim and ten times risk cover in case of life insurance*

    5. *Introduce Pension after 65 yrs of age on the basis of tax paid by tax payer during his working life..*

    Let honest taxpayers get certain direct benefits....

    As on today, 3.3% of Indian population is filing ITRs as compared to 8% of China...adding large agriculturists to Income Tax may shoot the figure to more than 10% .... it may help you to cool your tax terrorism mindset and a tax compliant nation ...��
    *LET'S SPREAD THIS TO EDUCATE HONEST TAX PAYERS*

    ReplyDelete
  3. भाऊ सुंदर लेख

    ReplyDelete
  4. अप्रतिम विश्लेषण भाऊ..! कधीच न कळलेल्या या 'अर्थसंकल्प' नावाच्या गोष्टीचं खूप सुंदर विवरण.!

    ReplyDelete