Sunday, January 13, 2019

ब्रह्म सत्य, जगन मिथ्या

akhilesh mayawati के लिए इमेज परिणाम

मागल्या जुन महिन्यातल्या बंगलो्र येथील विरोधी कुंभमेळ्याने पुरोगामी पत्रकारितेला जी पालवी फ़ुटलेली होती, तिच्या नरडीला अखिलेश आणि मायावतींनी नख लावले आहे. अर्थात तसेच काही होणार याची मला पहिल्या दिवसापासून खात्री होती आणि मी त्यावर काही लेखही लिहून झाले आहेत. कुमारस्वामींच्या शपथविधी मंचावर मायावती व सोनिया गांधींनी कपाळाला कपाळ लावून जे अभिवादन केले, त्याने अनेक विश्लेषकांची डोकी कमालीची फ़िरलेली होती. त्यांना दहाबारा महिन्यांनी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात होणार्‍या शपथविधीची दृष्येही बंगलोरच्या घटनाक्रमात दिसू लागली होती. पण ह्या पुरोगामी शंकराचार्यांना ‘ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या’ म्हणजे माया हा सिद्धांत कार्ल मार्क्सने कथन केलेला नसल्याने, ठाऊक नसावा. अन्यथा त्यांनी सोनिया किंवा ‘माया’ वास्तव मानून आपली बुद्धी गहाण टाकली नसती. सनातन धर्माचा मोठा सिद्धांत हा डोळ्यांना दिसणार्‍या वास्तवाला माया म्हणून भ्रम ठरवतो आणि ब्रह्म म्हणजे जे दिसत नाही, तरीही आहे असा आग्रह धरला जातो, तमाम पुरोगामी नेमके त्याच सिद्धांताला धरून चालत असतील, तर त्यांना सनातनी पुरोगामी म्हणण्याला पर्याय उरत नाही. त्याचीच प्रचिती त्यांना मनुवादाच्या कट्टर विरोधक मायावतींनी आणून दिली आहे. नरेंद्र मोदींना दिल्लीच्या सत्तेतून पदभ्रष्ट करण्यासाठी त्यांना उत्तरप्रदेश हा सर्वात मोठ्या राज्यातून पराभूत करायला हवे आणि तिथे प्रमुख विरोधक कॉग्रेस नसून सपा बसपा आहेत. त्यांचे नेते अखिलेश व मायावती आहेत. ही मायाही मायावतींचीच आहे. बंगलोरच्या मंचावर दिसले त्यात ब्रह्म शोधणार्‍यांना आता उत्तरप्रदेशातली माया अनुभवण्याची वेळ आलेली आहे. कारण त्या ८० जागांच्या राज्यात भाजपाला पराभूत करण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकजुट करण्याचा पट मायावतींनी साफ़ उधळून लावला आहे. ती माया नव्हेतर वास्तव असल्याचा तो साक्षात्कार आहे.

कर्नाटकात निवडणूकपुर्व प्रचारात राहुल गांधी अख्खा वेळ कुमारस्वामींच्या पक्षाला भाजपाची बी टीम म्हणत होते आणि भाजपाने बहूमत हुकल्यावर त्याच बी टीमला कॉग्रेसने मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. त्यामुळे आता उत्तरप्रदेशातही हळुहळू अखिलेश मायावती यांच्यावर भाजपाची बी टीम असा आरोप झाल्यास नवल नाही. मुळातच अशी टांग कॉग्रेसला मारता यावी, म्हणून मायावतींनी मध्यप्रदेश राजस्थानात कॉग्रेसशी आघाडीचा प्रस्ताव दिलेला होता. ३०-४० जागा मागितलेल्या होत्या, त्या कॉग्रेसनेही नाकाराव्यात, हीच मायावतींची अपेक्षा होती. कारण त्यांना उत्तरप्रदेशात कॉग्रेससोबत आघाडी मोडायला कारणच हवे होते. आता त्याचीच प्रचिती आलेली आहे. कॉग्रेसला तिथे आपल्याशी बोलणी होतील ही अपेक्षा होती आणि आशाळभूतपणे कॉग्रेसनेते सपा-बसपाचे आमंत्रण येण्याची प्रतिक्षा करीत बसलेले होते. पण त्यांना तिथेच ठेवून अखिलेश मायावतींनी आपले जागावाटप उरकून घेतलेले आहे. सोनिया व राहुल यांचे मतदारसंघ सोडून बाकीचा हिशोब पुर्ण झाला आहे. मग कॉग्रेसला जाग आलेली आहे. राहुल कायम पित्याची व आजीची आठवण सांगत असतात. पण त्यांना त्यापेक्षाही दुय्यम डावपेच खेळलेल्या आईचेही अनुकरण करता आलेले नाही. जन्मजात अरेरावी व गर्वाचे वरदान लाभलेल्या राहुलना या दोन प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे दार वाजवणे कमीपणाचे वाटल्याने ही स्थिती उदभवली आहे. विधानसभा निवडणूकीत नेमके तेच घडलेले होते. समाजवादी पक्षाशी जगावाटपाचे निश्चीत झाले होते आणि अखिलेशने योजलेल्या पत्रकार परिषदेत त्याची घोषणा व्हायची होती. पण राहुल इथे गेलेच नाहीत आणि अखिलेशने परस्पर आपल्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करून टाकली. त्यानंतर प्रियंका गांधींना नाकदुर्‍या काढाव्या लागल्या आणि अहमद पटेल अपरात्री लखनौला पोहोचले. म्हणून अखेरच्या क्षणी १०५ जागा कॉग्रेसला अखिलेशने दिल्या होत्या. पण त्याचाही पुरता विचका होऊन गेला.

आपण अखिल भारतीय पक्षाचे अध्यक्ष आहोत आणि मागल्या तीन पिढ्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे, त्याची मस्ती राहुलना कोणाही समोर झुकू देत नाही, ही खरी समस्या आहे. जे विधानसभेच्या वेळी झाले, त्यातून अखिलेश धडा शिकला व त्याने यावेळी राहुल वा कॉग्रेसशी संपर्कच साधला नाही. मायावतींना तर कॉग्रेसशी आघाडी नकोच होती. त्यामुळे राहुल मागल्या तीनचार महिन्यात गठबंधनाची पोपटपंची करीत राहिले आणि तिकडे सपा-बसपाने आपल्या जागा आपसात वाटून काम संपवले. तो शहाणपणा आहे असे कोणी म्हणू शकत नाही. कारण त्या दोघांच्या बेरजेने भाजपाला उत्तरप्रदेशात पराभूत करण्या मुद्दा ढिसाळ झाला आहे. कारण दोन्ही पक्षांची विरोधात लढतानाची मते एकत्र आल्यावर बेरजेने जुळत नाहीत. त्यात काही घट होते आणि ती भरून काढायला कॉग्रेसचा आधार सपा-बसपाला उपयुक्त ठरला असता. याचे मुख्य कारण कॉग्रेस अखिल भारतीय पक्ष असून, सपा-बसपा प्रादेशिक पक्ष आहेत. लोकसभेच्या स्पर्धेत दुबळी कॉग्रेसशी शिरजोर होत असते. म्हणूनच ती सोबत ठेवणे उपयोगाचे होते. मात्र त्यासाठी कॉग्रेस १५ जागा मागत होती ती अतिरेक होता. पण जाहिर मागणी व प्रत्यक्ष सौदा यात फ़रक पडू शकला असता. केवळ आठदहा जागांवरही कॉग्रेस समाधानी झाली असती. मगच भाजपाला ८० जागी लढताना घाम फ़ुटला असता. कारण या तिन्ही पक्षांची मागल्या दोनतीन निवडणूकातील मतांची बेरीज ५०-५५ टक्क्यांपर्यंत जाते आणि त्यात सहाआठ टक्के घट झाली, तरी भाजपाला ७१ मधून ५० जागा नक्कीच गमावण्याची पाळी आली असती. कॉग्रेस वेगळी लढण्याचा अर्थच सपा-बसपांनी वाटून घेतलेल्या प्रत्येकी ३८ जागांपैकी प्रत्येकी २८ जागा याच एका निर्णयाने गमावलेल्या आहेत. कॉग्रेस सर्व जागांवर लढताना किमान ५० जागी या दोन्ही पक्षांना पराभूत करण्याची बेगमी झालेली आहे.

भाजपा विरोधी मतांची बेरीज हे सोपे गणित झाले. पण जो मतदार भाजपाला पाडायला उत्सुक आहे, तो अशा विविध पक्षत विभागला गेलेला असतो. तो प्रत्येकवेळी एकाच पक्षाला मत देतो असे नाही. तर त्यातला विधानसभेला सपा-बसपाला मते देणारा बराच वर्ग दिल्लीतली लढाई कॉग्रेस भाजपाची असल्याने कॉग्रेसकडे वळतो. ही बाब अखिलेश मायावतींनी हिशोबात घेतलेली नाही. म्हणूनच बाकीच्या प्रसंगी पोरकट बोलणार्‍या राहुल गांधींचे उतरप्रदेशात चकीत करणारे निकाल लागण्याचे भाकित रास्तच आहे. त्यांना आपल्या पक्षाचे अधिक निवडून येण्याची अपेक्षा त्यात नसून, आपंण वेगळे लढल्याने सपा-बसपाचे अनेक उमेदवार मतविभागणीने पराभूत होतील, असे सांगायचे आहे. ते जाहिरपणे सांगणे म्हणजे भाजपाचे अधिक उमेदवार जिंकण्याचे भाकित होईल. म्हणून राहुलनी चकीत होणारे निकाल म्हटलेले आहे. त्यामध्ये म्हणूनच तथ्य आहे. याखेरीज एक मुददा आणखी आहे. महागठबंधनाची जी बेरीज २०१४ ची सगळे दाखवित आहेत, त्यानंतर २०१७ मध्ये विधानसभेचे मतदान झालेले विसरून गेलेले दिसतात. त्यात कॉग्रेस सपा बसपाची बेरीज पन्नास टक्केहून अधिक होती. म्हणूनच ती बेरीज निर्णायक ठरणारी होती. राहुलच्या बोलण्याचा अर्थ तिथे समजून घेतला पाहिजे. सपाचे २२ बसपाचे २० टक्के लोकसभेतील आहेत. पण तेव्हाही कॉग्रेसला ८ टक्के मते मिळालेली होती. त्याची महागठबंधन करणार्‍यांना फ़िकीर नसेल तर त्यांनाही मोदी वा भाजपाला पराभूत करण्यापेक्षाही आपासातले हिशोब चुकते करण्याचे प्राधान्य असल्याचे मान्य करावेच लागते. मायावतींनी महागठबंधनाची घोषणा करतानाच कॉग्रेसला शिव्याशाप देऊन घेतलेले आहेतच. त्यामुळे विरोधी एकजुटीच्या लेंग्यातली नाडी मोदीद्वेषाची असल्याचे लक्षात येऊ शकते. ती नाडी सैल झाली की कंबरेचे सुटून जाण्याला पर्याय रहात नाही. पण तितक्याच मोदीद्वेषाने भारावलेल्या विश्लेषकांना ते कोणी कसे समजवायचे?

थोडक्यात विरोधी पक्षांची एकजुट आणि त्यातून समर्थ राष्ट्रीय पक्षाची सत्ता जाणे, हे एक मृगजळ आहे. ते खर्‍याखुर्‍या विरोधी पक्षांना दिसले तरी समजू शकते. पण जे राजकारणात कार्यरत नाहीत आणि राजकीय विश्लेषण व पत्रकारितेत वावरत असतात, किंवा विविध सामाजिक सांस्कृतिक मार्यात गढलेले भासवतात, त्यांनाच असले मृगजळ खूणावत असते. म्हणूनच कुमारस्वामींच्या शपथविधीत सोनिया मायावतींनी डोक्याला डोके लावले, तर अनेक पत्रकारांनाच उमाळे आलेले होते. आता मायावती कॉग्रेसच्या नावाने शिमगा करीत असताना त्यांचीच वाचा बसलेली आहे. कारण सोनिया, मायावती वा राहुल यांच्यापेक्षाही माध्यमातून चमकणार्‍यांना मोदींना पराभूत होताना बघायचे डोहाळे २०१४ पासून लागलेले आहेत. पण अशांचे हे पहिलेच बाळंतपण तरी कुठे आहे? २००२ पासून म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच या सगळ्यांचे डोहाळजेवण त्याच एका पदार्थासाठी अडून पडलेले नाही काय? पण मोदी पराभूत होत नाहीत आणि अशा भरवशाच्या म्हशींना टोणगा होत असतो. आता खुद्द मायावती अखिलेशने त्यांचा अपेक्षाभंग केलेला आहे. अन्यथा ४०-४२ टक्के मतांवर मोदी पुन्हा उत्तरप्रदेश जिंकण्याचा मनसुबा तरी कशाला करू शकले असते? हे असले डोहाळकरी विश्लेषक आणि त्यांच्यावर विसंबून राफ़ायलच्या विमानात बसून लढणारे राहुल गांधी, हिंदी हार्टलॅन्डच्या गमजा करीत आहेत. तर मोदी-शहांनी पुर्वेला बंगाल ओडीशा व इशान्य भारतात नवी भूमी व्यापली आहे आणि तिथे किमान शंभर जागी तुंबळ लढाईने नव्या ४०-५० जागा पदरात पाडून घेण्याची जमवाजमव केली आहे. पण वास्तविक जगाला माया समजून आपल्या पुरोगामी ब्रह्माला चिकटून बसलेल्या सेक्युलर मनूवाद्यांना उगवलेला सूर्य कोण दाखवू शकणार आहे? मायावती खुप दाखवतील. पण यांनी डोळे तर उघडायला हवेत ना?

18 comments:

  1. There is still possibility that at last moment Congress will be offered 8/10 seats indirectly by fielding weak candidates and Congress will tell their supporters to vote for SP ,BSP . BJp need to be extremely cautious.

    ReplyDelete
  2. अप्रतिम विश्लेषण भाऊ..

    ReplyDelete
  3. यात दोन्ही बाजुंनी चूका केल्या आहेत, असे दिसते. अहंग॔ड हे त्याला कारण आहे.

    ReplyDelete
  4. The best artical based on real facts. Bhau ,your thinking is rational depend on real logic . I like your artical vary much

    ReplyDelete
  5. bhau
    last eeek modi govt took historik decision of 10% reservstion where poor upper caste will get benefited too.

    But u didnt feel to write an aryicle on that. U write on almost usrless people and outdated things but u didnt find this greatest decidion worth of writing on it. u wrote multiple articles on maratha, patel reservation.
    What does it shows/ what message u r giving by ignoring the greatest decision of modi govt?

    ReplyDelete
  6. भाऊ अतिशय समर्पक असे विश्लेषण केले आहे, मायावती आणि अखिलेश यांना उत्तर प्रदेशात आपले अस्तित्व राखायचे आहे उद्या केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार येवो राज्यात 325 जागा असलेले योगी सरकार 2022 पर्यंत राहणार आहे त्यासाठी या दोघांची लढाई आहे त्यामुळे उत्तर प्रदेशात काँगेसला बरोबर घेणे म्हणजे स्वतः खड्ड्यात जाऊन पडणे हे या दोघांनी ओळखले आहे,राहूल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणून स्वतःचे अस्तित्व संपुष्टात आणायला हे दोघे बिनडोक कम्युनिस्ट नाहीत,दुसरीकडे राहुल गांधी फक्त पंतप्रधान होण्यासाठी जन्माला आले आहेत हे पक्के असल्याने सोनिया गांधी केवळ मोदी हारावेत म्हणून 5 वर्षे ममता किंवा मायावती यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारतील हे कसे शक्य आहे त्यामुळे आपण म्हणता तसे मोदी यांना सत्तेतून बाहेर काढणे अशक्य आहे

    ReplyDelete
  7. भाऊ, तरीपण सप आणि बसप या दोघांच्या एकत्र येण्यामुळे भाजपला नक्कीच धोका आहे असेच वाटते..फुलपूर आणि गोरखपुर उदाहरण आहेच
    भाजपाला उ.प्र.ची लढाई आता नक्कीच अवघड झाली आहे असे वाटते

    ReplyDelete
  8. गंमत अशी दर वेळेला युती/आघाडी झाल्यावर असे दाखवतात की आतापर्यंत कधीही युती/आघाडी झालीच नाही.

    ReplyDelete
  9. काल हे पुरोगामी पत्रकार तर पार मोदी पराभूत झाले समजुन काही बरळत होते म्हणे कांगरेस भाजपचीु उच्चजातीय मते खाणार व गठबंधंनला फायदा होणार पण लोकसभेत कांगरेस कितीतरी जास्त मुस्लिम मते खाइल यावर कोणी बोलेचना

    ReplyDelete
  10. भाऊ, पुन्हा एकवार आपली मांडणी अचूक ठरत आहे. आपले अभिनंदन।.💐💐

    ReplyDelete
  11. श्री भाऊ, तुम्ही असेच लिहीत राहा, अजून २-३ महिन्यांनी आणखी मज्जा येईलच, शेवट मे महिन्यात तुम्ही म्हणताय तसा दिसेलच

    ReplyDelete
  12. नागपूरवाले आणि गडकरी, अघळपघळ बडबडत बसले नाहीत आणि २००३ सालच्या सुदर्शनचक्रासारख्यांशी दोन हात करण्यात मोदी-शहांची शक्ती फुकट गेली नाही तर उत्तर प्रदेशात दया माया न दाखवता ध्रुवीकरण केल्यास ७५ जागा सहजच मिळतील. शहा म्हणतात तशी पानिपतची लढाई आहे पण ती गरीब माणसासाठी आहे यात भाजप हरला तर राजकीय पक्ष म्हणून तो थंड बसेल आणि मग जसा मध्य प्रदेश --राजस्थान मध्ये आत्ताच सामान्य लोकांची फरफट व्हायला लागली आहे त्याला वाली कोणी रहाणार नाही फक्त बंद पडलेल्या एनजीओ वाल्यांची चांदी होणार आहे देशभर.प्रश्नांचीच चर्वितचर्वण करायचे उत्तरे शोधून निराकरण कधीच करायचे नाही साहीत्य समेंलनासारखे.

    ReplyDelete
  13. राष्ट्रीय मुस्लिम मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील एक संघटना आहे.यूपी मध्ये त्याचे काम इतके जबरदस्त आहे की सपा बसपा आणि काँग्रेस ला अजूनही लक्षातच येत नाही की उत्तर प्रदेश मध्ये मुस्लिम मते सुद्धा भाजप ला मोठ्या प्रमाणात 2014 पासून मिळतात.मला असा वाटतंय की भाजपला येणारी निवडणूक यूएस सारखी अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे लढवायची आहे आणि त्यांना मुद्दाम राहुल गांधींना मोदींचा मुख्य व एकमेव विरोधक आहे हे दाखवून शक्य होईल तेवढे राहुल गांधी महागटबंधनाचे उमेदवार होतील याकरिता भाजप प्रयत्न करणार.

    ReplyDelete
  14. भाऊफार सुन्दर लेख

    ReplyDelete
  15. सोमवारच्या महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ या दैनिकात आलेली दिल्ली वार्तापत्रे वाचली की मोदी आणि शहा यांचा पराभव नक्की झाला आहे आणि म्हणून घाबरून शहांनी पानिपतचा उल्लेख केला आहे अशा पध्दतीने चित्र रंगवण्यात आले आहे .वृत्तपत्र आणि मीडियाचे लोक वैयक्तिक पातळीवर मोदी शहांचा द्वेष करतात आणि या द्वेषाने आंधळे झाल्याने वस्तुनिष्ठ विश्लेषण हा प्रकार बंद झाला आहे,एकेकाळी नावाजलेली महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता ही दोन्ही वृत्तपत्रे आज अधिकृत रित्या काँग्रेसची मुखपत्रे झाली आहेत आणि मग मोदींचा द्वेष, संघाचा द्वेष हिंदुत्वाचा द्वेष हे ओघाने आलेच आणि मग याने आंधळे झालेल्या या लोकांना आलोक वर्मा यांना हाकलून दिले त्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिक्रि होते हेही दिसत नाही आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात वर्मा यांच्या निमित्ताने न्यायालयावर आगपाखड करण्यात आली आहे,यामुळेच भाऊ माध्यमांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे.

    ReplyDelete
  16. It is not as easy as it seems. There is likely to be underhand or behind curtain dealing while deciding candidates. Further, one section of voters is definitely going to vote strategically to defeat BJP and Modi.

    ReplyDelete