Monday, January 7, 2019

दाताच्या ‘कण्या’चे डॉक्टर

संबंधित इमेज

रविवारी तुळजापुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला गेलेला होतो. रात्री निघण्यापुर्वी त्यापैकी एका प्रमुख पत्रकाराच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. तिथे टिव्हीवर एबीपी माझा वाहिनीच्या माझा विशेष चर्चेचा कार्यक्रम लागलेला होता. मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यासाठी पंडित नेहरूंची भाची व कथित लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आल्याचा विषय घेतलेला होता. तिथे उपस्थित असलेल्या दोघाही पत्रकारांना मी टिव्हीकडे बोट दाखवून विचारले, तुम्हाला ही नयनतारा कोण ठाऊक आहे काय? तालुका पातळीवर मराठी पत्रकारिता करणार्‍या त्यांनी, हे नाव पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगत मलाच या महिला कोण म्हणून सवाल केला. तेव्हा त्या पंडित नेहरूंची भाची असल्याचे सांगून मी त्या पत्रकारांच्या ज्ञानात भर घातली. मुद्दा इतकाच, की जी महिला कोण हे मराठी पत्रकारितेत कार्यरत असलेल्या बहुतांश लोकांनाही अजून माहिती नाही, अशा कुणा लेखिकेला आमंत्रण नाकारले म्हणून मराठी साहित्य व्यवहार रसातळाला गेला आहे; अशी एकूण चर्चा तिथे रंगवण्यात आलेली होती. त्याकडे बघितले तर वाहिन्या वा संपादकीय अग्रलेख कसे सामान्य जनताच नव्हेतर वाचकापासूनही दुरावलेत, त्याची खात्री पटली. कोण ही नयनतारा हेच मराठी वाचकाला माहिती नसेल आणि कोणी मुठभर लोक तीच महान लेखिका असल्याचे सामान्य लोकांच्या गळी मारण्याचा आटापीटा करत असतील, तर त्यांच्याकडे लोकांनी पाठ फ़िरवली म्हणून नवल नाही. एकूण मराठी साहित्य व त्याची अस्मिता या लोकांनी कशी संकुचित करून टाकली आहे, त्याचा हा जीवंत पुरावा आहे. अर्थात त्याचा अर्थ ते स्थानिक पत्रकार अनभिज्ञ आहेत, असाही नाही. किंबहूना तितकेच त्या चर्चेत सहभागी झालेले वाहिनीचे संपादक व दोन माजी संमेलनाध्यक्षही अडाणी व अजाण असावेत. अन्यथा त्यांना यामुळे आनंदित का व्हावे, ते नेमके कळले असते. नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन मागे घेण्यात कसला आनंद असू शकतो, ते जाणून घेण्यासाठी तब्बल सहा वर्षे मागे जावे लागेल. पण तितकी स्मरणशक्ती अशा पॅनेल चॅनेल चर्चेत सहभागी झाल्यावर शाबूत उरत नसते. म्हणूनच मी अशा चर्चेची आमंत्रणे टाळू लागलो आहे.

सहा वर्षापुर्वी २०१३ च्या फ़ेब्रुवारी-मार्च महिन्यात असाच एक आमंत्रण देऊन दबावाखाली मागे घेण्याचा प्रकार गाजला होता आणि तेव्हा हेच सगळे संपादक साहित्यिक आनंदातिरेकाने थयथया नाचले होते. तेव्हा त्यांच्या पाठीचे कणे कसे पोलादी शक्तीने ताठ झालेले होते. पण आज त्यांना तोच आपल्या पाठीतला कण एकाएकी ठिसूळ फ़ुसका होऊन गेल्यासारखे वाटते आहे. कारण त्यांच्या पाठीत कधीच कणा नव्हता आणि आपल्या कण्याला सुखरूप करण्यापेक्षा असले भुरटे कायम दुसर्‍यांच्या पाठीचे कणे शोधत फ़िरत असतात. म्हणून मग नयनताराला आमंत्रण नाकारले, तर त्यांच्या पाठीतला कणा कोसळून पडत असतो. नयनताराकडे वळण्यापुर्वी सहा वर्षापुर्वी नेमके काय घडले होते, त्याचे जरा स्मरण करूयात. त्या दरम्यान अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील एका संस्थेने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद़्र मोदींना एका चर्चासत्राचे बीजभाषण करायला आमंत्रित केलेले होते. व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फ़ोरम नामक या संस्थेने ते आमंत्रण दिलेले होते. तर ते रद्दबातल करावे. यासाठी १५५ भारतीय तथाकथित बुद्धीमंत प्राध्यापकांनी सह्यांचे एक निवेदन त्या विद्यापीठाला पाठवले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यात एकही अमेरिकन प्राध्यापक सहभागी झाला नव्हता आणि सर्वच प्राध्यापक भारतीय होते. ते एका निवडून आलेल्या भारतीय मुख्यमंत्र्याचा आवाज दडपण्य़ासाठी परदेशी विद्यापीठाच्या प्रशासनावर दबाव आणत होते आणि ते प्रशासन त्याला बळी पडले. अशा रितीने मुळचे आमंत्रण देऊन मागे घेण्यातून कोणाच्या पाठीचा कणा गळून पडणार असेल, तर त्याविषयी तेव्हाही बोलले जायला हवे होते. त्याची अशा वाहिन्यांवर तेव्हाही चर्चा झालेली होती आणि ते आमंत्रण रद्द करण्यासाठी कणा हरवलेल्या विद्यापीठाची पाठ थोपाटली गेली होती. आमंत्रण देण्याने कणा असतो आणि मागे घेण्याने मोडत असेल; तर तेव्हाही मोडलेल्या कण्याची चर्चा व्हायला नको काय? पण तेव्हा त्याच कृतीसाठी पाठ थोपटायची आणि आता तशीच कृती इथे साहित्य महामंडळाने केली तर रडारड सुरू करायची; हा कुठला न्याय झाला?

नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्यासाठी महामंडळावर आज कोणी दबाव आणला ती गुंडगिरी असेल, तर तेव्हा ते १५५ भारतीय प्राध्यापकही चक्क गुंडगिरीच करीत होते ना? अशा कृती्ला गळचेपी म्हणायचे असेल तर तेव्हाही झाली ती गळचेपीच होती आणि त्याचाही तितकाच निषेध अविष्कार स्वातंत्र्याच्या मुखंडांनी केला पाहिजे होता. पण विषय ‘पसंतांच्या संतां’चा असतो आणि नापसंतांच्या संतांचा असतो. तेव्हा पक्षपात पंक्तीप्रचंच करण्याला पुरोगामी न्याय म्हणतात. व्हार्टनच्या त्या चर्चासत्राचे आमंत्रण मोदींप्रमाणेच बॅन्कींग क्षेत्रातले जाणकार म्हणून सुरेश प्रभूंना होते आणि तेव्हा आपल्या पाठीत पुरोगाम्यांपेक्षाही भक्कम कणा असल्याचे त्याच एका भारतीय प्रतिष्ठीताने दाखवून दिले होते. कारण भारतीय जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्याला जिथे अपमानित केले जाते, त्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार नाही अशी ठाम भूमिका प्रभू यांनी घेतली होती. मात्र आज महामंडळाच्या पाठीच्या कण्यातली कणखरता तपासंणारे सगळे तेव्हा शेपूट उंच करून आपला कणा शेपटीतच सामावला असल्याची जगासमोर साक्ष देत होते. आजही नयनतारा यांच्यासाठी ते आपापल्या शेपट्याच हलवित आहेत आणि त्यालाच ताठ कणा असल्याचा फ़क्त देखावा निर्माण करीत आहेत. त्यांना साहित्य व्यवहार किंवा अविष्कार स्वातंत्र्याची काडीमात्र कर्तव्य नसून, मोदी वा त्यांच्या वैचारिक भूमिकेची गळचेपी करण्यालाच असे भामटे अविष्कार स्वातंत्र्य ठरवू बघत असतात. म्हणूनच त्यांनी साहित्य संमेलनाला कणाहीन म्हणत कितीही दाताच्या कण्या केल्या, म्हणून त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. थोडक्यात जे शेपट्या हलवण्याला स्वातंत्र्य समजून जगतात, त्यांनी कण्याच्या गोष्टी करू नयेत. मात्र सहा वर्षापुर्वी ज्यांना व्हार्टनला मोदींच्या रुपाने भारतीय घटनात्मक पदाचा अपमान झाल्याचा राग आला होता, त्यांनी आज खुश व्हायला हवे आहे. कारण ते उद्योग करणार्‍या गोतावळ्यातल्याच नयनतारा यांना त्यांच्याच पद्धतीने चोख उत्तर मिळाले आहे आणि ते मराठी साहित्य महामंडळाकडून दिले गेले असेल, तर मराठी अस्मितेसाठी ती अभिमानास्पदच गोष्ट आहे.

नयनतारा कोण अशा महान साहित्यिक लागून गेल्यात? मुठभर अवार्डवापसी गॅन्गमध्ये सहभागी झाल्या म्हणून कोणी विचारवंत वा साहित्यिक होत नाही. पुरस्काराचे ढिग घरात पडलेले असल्याने कोणी मान्यवर होत नाही. लोकांमध्ये ज्याला मान्यता आहे आणि ज्याची काही ओळख आहे, तो सन्माननीय असतो. त्याच्यावर कोणी अपमानास्पद विधान केल्यास पाठकण्याचा विषय निघत असतो. त्या वाहिनीवरची चर्चा किंवा इतरत्र चाललेली रडगाणी, निदान माझ्यासारख्या सामान्य भारतीय मतदारासाठी आनंददायी आहेत. कारण अशाच सामान्य मतदाराने व्हार्टनने मोदींच्या केलेल्या अपमानाचा बदला वर्षभरात २०१४ मध्ये मतदानातून घेतला होता आणि त्यानंतर त्याच अमेरिकन सरकार वा विद्यापीठांना पंतप्रधान बनवून मोदींसमोर शरणागत व्हायला भाग पाडलेले होते. अशा प्रत्येक भारतीयासाठी नयनतारांचा अवमान नक्कीच अभिमानास्पद आहे. कारण त्यातून व्हार्टनचा हिशोब चुकता झालेला आहे. तेव्हा व्हार्टनवर दबाव आणणार्‍यांनी नरेंद्र मोदी नामक कुणा एका व्यक्तीचा अपमान केलेला नव्हता, तर त्याला भारतीय राज्याच्या एका घटनात्मक प्रमुख पदावर बसवणार्‍या भारतीय जनतेचा अपमान केला होता. तो अपमान भारतीय मतदार वा नरेंद्र मोदींचा नव्हता, तर भारतीय घटनेचा व इथल्या लोकशाहीचाही होता. त्या अपमानाची जाण ज्यांना नाही, त्यांना तितक्याच अपमानास्पद वागणूकीने वागवले पाहिजे. मग त्या नयनतारा सहगल असोत, त्यांची अवार्डवापसी गॅन्ग असो, किंवा कुठली वाहिनी वा संपादक असोत. त्यांची तीच लायकी असते. ज्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार घटनात्मक म्हणून हवा असतो, पण त्यातून इतरांच्या अधिकाराचा तितकाच सन्मान राखता येत नाही, ते सभ्यतेच्या पात्रतेचेच नसतात. मग त्या नयनतारा असोत किंवा त्यांचे भाटभक्त असो. त्यांनी दाताच्या कितीही कण्या केल्या म्हणून आपला वा मराठी अस्मितेचा कणा पिचला असे समजण्याचे कारण नाही. उलट अशाच कृतीने आपण आपला मराठी कणा ताठ असल्याची साक्ष मिळते. म्हणून सामान्यांचे संत म्हणतात, ऐशा नरा माराव्या मोजूनी पैजारा.

25 comments:

 1. श्री भाऊ ही नयनतारा कोण आणि तिने असे काय दिवे लावले म्हणून तिला आमंत्रण दिले गेले होते ह्यवर जरा सविस्तर लिहा ना

  ReplyDelete
 2. खरे तर,कोण ते श्रीपाल सबनिद साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले होते,त्यांच्या बद्धल मी ते अध्यक्ष झाल्यानंतरच कळले,तशीच ही कोण नयनतारा सहगल ?

  ReplyDelete
 3. Bhau...this lady Nayantara Sahgal had delivered lecture at Justice Sunanda Bhandare Memorial lecture program.That lecture shows how and what she thinks about current Indian society and position of women in current society.In that lecture she said " INDIA IS WORLD'S MOST DANGEROUS COUNTRY FOR WOMEN AND WE DO NOT NEED FOREIGN OBSERVERS TO SAY THIS"...This whole lecture is available on internet. And we Marathi people invited that WOMAN to inaugrate our literature festival. Why..??? Don't we have anyone capable doing this honour in our own marathi writers/authors community?..

  ReplyDelete
 4. या लेखाबद्दल खास अभिनंदन व धन्यवाद

  ReplyDelete
 5. भाऊ अप्रतिम , जे झालं ते अगदी उत्तम झाल.

  ReplyDelete
 6. Ya sagalya channels cha trp ani business 2019 paryant ahe.ajun 4mahine hi jatra chalanar ahe tyanantar punha ikadale sampadak tikade ani tikadale anchor ikadae houn thodi shantata yeil. Mulat ata channels ni public perception banvayach kinva badalayache divas gelet pan ya atishahanya lokana kon samajavanar

  ReplyDelete
 7. Mulat abhivyakti swatantra, vichar, dharm, mahiti, ase hakk ani adhikar denyalayak janateche praman Kami ahe.tya goshti kasha vaparavyat he patrakarana Kalat Nahi tith samanya manasachi Kay avastha asel.asha paristhitit tumacha lekh Sundar ahe

  ReplyDelete
 8. Bhau
  He sagale so called Patrakar kahi patrakar nahit. Te Paliv aahet eka khandanache. Tich tyanchi olakh aahe. Te mhantil teva & tyachyavar Bhunkane yala he lok patrakarita mhantat.

  Motya choo mhantle ki motya jato, he sagale tyach laykiche aahet. Rather only because of this ability of their, they might have got selected for their Job. Hardly anyone takes them seriously. Only when its related to some monitory benefit of any caste / community, then that group only follow them but again as their (that groups) own interest is involved in it.

  So don't waste your energy & time for such puppets again & again.

  ReplyDelete
 9. ABP Majha should stop this type of stories other wise people will not subscribe the channel.

  ReplyDelete
 10. पसंतांचे संत इतकी चापलुसी करतायत की नयनताराच होणार नसणार भाषण छापलय.जणु काही सगळे वाटच पाहत होते चुकल म्हनुन.एकतर ती कोणाला माहित नाही दुसर ती काही खरच प्रतिभावंत नाही ecosystem चा भाग आहे.

  ReplyDelete
 11. काँग्रेस प्रणित वैचारिक आणि शैक्षणिक दहशतवाद मोडून काढलाच पाहिजे, तरच या देशाचे भले होईल. पण या देशातील जनतेला गेली हजार वर्षे गुलामीतच राहण्याची सवय झाली आहे. जनतेच्या लायकीचे राज्यकर्ते जनतेला मिळतात.

  ReplyDelete
 12. भाऊ ग्रेट आहात तुम्ही

  ReplyDelete
 13. मुठभर अवार्डवापसी गॅन्गमध्ये सहभागी झाल्या म्हणून कोणी विचारवंत वा साहित्यिक होत नाही. पुरस्काराचे ढिग घरात पडलेले असल्याने कोणी मान्यवर होत नाही. लोकांमध्ये ज्याला मान्यता आहे आणि ज्याची काही ओळख आहे, तो सन्माननीय असतो. हे वाक्य अप्रतिम होतं सर...!! दोन दिवस नयनतारा दिवस रात्र बातम्यावर झळकल्यावर घरचे ही विचारात पडले की हिची कामगिरी काय? त्यामुळे हे वाक्य अगदी समर्पकच...

  ReplyDelete
 14. Such women /person who are anti national and anti Hindu should be kicked out. In today's NCP paper ( Sakal) lot many writers have protested. No body knows their names. I feel ,they are all anti Hindu and leftist.

  ReplyDelete
 15. "मात्र आज महामंडळाच्या पाठीच्या कण्यातली कणखरता तपासंणारे सगळे तेव्हा शेपूट उंच करून आपला कणा शेपटीतच सामावला असल्याची जगासमोर साक्ष देत होते. आजही नयनतारा यांच्यासाठी ते आपापल्या शेपट्याच हलवित आहेत आणि त्यालाच ताठ कणा असल्याचा फ़क्त देखावा निर्माण करीत आहेत"

  - Wah wah wah .... :)

  ReplyDelete
 16. पत्रकाराला अशी स्मरणशक्ती हवी असे लेख वाचून वाटले . Sharp memory of a journalist makes his / her pen mightier than a sword .

  ReplyDelete
 17. भाऊ,या नयनतारा सहगल म्हणजे भारतात असहिष्णुता वाढत आहे म्हणुन Award वापसी करणाऱ्या बुद्धिमान व विचारवंत असे स्वतःला समजणार्या कंपू मधिल आहेत.त्या साहित्यिक आहेत हे हे आजच कळले. आयोजकांनी मराठी साहित्य सम्मेलनात त्यांना बौलवायची काहिच गरज नव्हती .

  ReplyDelete
 18. भाऊ, जबरदस्त फटकारे!

  ReplyDelete
 19. Print ani electronic media chi NAUTANKI agadich vivastra karun dakhavlit ki ho!!

  ReplyDelete
 20. धन्यवाद भाऊ !!! आपण सप्रमाण इतिहास व वर्तमान जोडून दिलात.....

  ReplyDelete
 21. भाऊ ,,,,,,,,,,,,,,,लेख अप्रतिम..!! अगदी मनातलं बोललात ...धन्यवाद !! कोण ही नयनतारा आणि तिचे साहित्यातले योगदान काय ? ह्या पुरोगामी भामट्यांचा जो ' माफिया ' यत्र - तत्र - सर्वत्र ' असा पसरलेला आहे की ........वरून कोणी आदेश दिला की लागले हे ' गळा ' काढायला. ह्या बयेला पहिल्यांदा ' आवतण ' देणारा हा पहिला हरामखोर. ते आमंत्रण देताना बाकीच्यांनी झोपा काढल्या हे तर महा ' दुर्दैव ' अर्थात त्यांना ह्या बाईबद्दल माहितीच न्हवते की काय कोण जाणे. सरकारकडून संमेलनासाठी पैका गोळा करा आणि मग अशा व्यक्तीला बोलावून सरकारवरच ' पिचकाऱ्या ' मारायला आणि ' उलट्या ' काढायला हे ' भडभुंजे ' मोकळे. ही बया म्हणजे दिल्लीतील ' ल्युटेन्स ' टोळीतील एक दादाच !! ह्यांचा कुटुंब कबिल्यातील नावे बघितली तर कळेल की हे सर्व ' शहरी नक्षलवादी ' कसे आहेत. विजयालक्ष्मी पंडित , करण थापर , नयनतारा सेहगल आणि किमान २५ जण तरी त्या नेहरू कुटुंब कबिल्यातील आहेत. सरकारमधून खांग्रेस बाहेर गेल्याने ह्या सर्वांचे दाणापाणी बंद झाले आहे. एकानेही चर्चेदरम्यान हा प्रश्न विचारला नाही की ' कोण हि नयनतारा ' ?? तिने कोणती पुस्तके लिहिली आहेत. एक बरे झाले की त्या बयेने तिचे भाषण लिखित स्वरूपात आधी पाठवले म्हणून कळले तरी ती काय ' चुळा ' भरणार आहे ते आणि ज्याला कोणाला त्या भाषणाचा मतितार्थ कळाला त्याचे तर पहिल्यांदा ' अभिनंदन ' च करायला हवे. बातम्या बघणारे सामान्य लोक आता एवढे कमी झाले आहेत.........आणि तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ह्या सर्व टोळक्याचा सामान्य लोकांशी संपर्कच तुटला आहे. कोठल्या जगात राहतात हे लोक कोण जाणे.

  ReplyDelete
 22. भरल्यापोटी तृप्ततेच्या ढेकरा देत एक फॅशन म्हणून स्वतःला पुरोगामी आणि डावे म्हणवून घेत पत्रकारिता करणारी एक टोळी सध्या विशेष सक्रीय आहे . माझावरचे विपन्न जोशी त्यात आघडीवर आहेत. परवाच्या सहगलबाईंच्या चर्चेच्या वेळी त्यांचा आणि त्यांचे बॉस असणाऱ्या खांडेकरांना जणू एक पर्वणी लाभल्याचा जो आनंद होत होता तो त्यांना लपवता येत नव्हता.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सोयीने आणि ह्या तथाकथित विचारवंतांना रुचेल अशाच पद्धतीने चर्चेत घेतले जाते. त्यांना गैरसोयीचे असणारी उदाहरणे त्यांच्याकडून दुर्लक्षितच राहत असतात. तुम्ही अशाच एका महत्वाच्या घटनेची आठवण करून दिली आहे.

  ReplyDelete
 23. न्याय दर्शन आणि तर्कशास्त्र विषयात तर्कदोष हे प्रकरण असते. तर्कदोष जर काढले तर राजकारण नष्ट होईल.

  ReplyDelete