Friday, May 3, 2019

एक्झीट पोलचा सुगावा?

Image result for sharad pawar supriya

महाराष्ट्राच्या अखेरच्या किंवा लोकसभेच्या चौथ्या फ़ेरीतील मतदानानंतर अकस्मात शरद पवार यांची भाषा बदलली आहे. तेही इतर उपटसुंभ राजकीय नेत्यांच्या सुरात सुर मिसळून मतदान यंत्रावर शंका घेणार्‍यांच्या गोतावळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र इतरांपेक्षा पवारांची प्रतिक्रीया सावध आहे. बारामती यंदा भाजपाने जिंकली तर मतदान यंत्रात गडबड असल्याचे मानावे लागेल. लोकांचा निवडणूकीवरचा विश्वास उडून जाईल, अशी ही प्रतिक्रीया थक्क करून सोडणारी आहे. प्रामुख्याने चौदा निवडणूका लढवून सलग जिंकणार्‍या नेत्याच्या तोंडी ही भाषा शोभणारी नाहीच. पण त्याहीपेक्षा त्यांचाच लोकशाहीवरचा विश्वास उडाल्याचे ते लक्षण आहे. दर पाच वर्षांनी किंवा ठराविक मुदतीनंतर निवडणूका कशाला घेतल्या जातात, त्याचाही पवारांना पता नाही काय? तेच तेच उमेदवार आपल्या बालेकिल्ल्यातून सहज निवडून येतात म्हणून लोकांचा निवडणूकीवर विश्वास आहे, असेच पवारांना म्हणायचे आहे काय? अशा बालेकिल्ल्यात कोणी नेता वा त्याचा उमेदवार पराभूत झाला, मग निवडणूकांमध्ये गफ़लत होते, असेच त्यांना म्हणायचे नाही काय? बारामती हा आपला बालेकिल्ला आहे आणि तो शाबूत ठेवण्यावरच लोकशाही टिकून आहे; असेच पवार सांगत आहेत. पण त्यांचा आपल्या बालेकिल्ल्यावरचा विश्वासच उडालेला दिसतो. अन्यथा त्यांनी इतकी टोकाची भाषा केली नसती. आजवर त्यांना कधी आपल्या या बालेकिल्ल्यात प्रचारा़ची मेहनत घ्यावी लागलेली नव्हती. अर्ज भरावा आणि अन्यत्र प्रचाराला निघून जावे. स्वत: पवारांना तिथे कधी ठाण मांडून प्रचार करावा लागला नव्हता. पण यावेळी त्यांना तिथेच आसपास मुक्काम ठोकून बसावे लागलेले आहे. पराभवाची ती पहिली चाहुल होती काय? आणि आता ही अशी पराभव झाल्यास अशी भाषा आत्मविश्वास किती ढासळलेला आहे, त्याचाच पुरावा आहे. पण त्याचे कारण काय? एक्झीट पोल?

ओपिनियन पोल हा प्रकार मतदानाची पहिली फ़ेरी सुरू होण्याच्या आधीच थांबलेला असतो. पण मतदान होत जाते तसतसा एक्झीट पोल चाचणीकर्ते गोळा करत असतात. प्रत्येक फ़ेरीत मतदान संपते, तेव्हा त्यात प्रत्यक्ष मतदान केलेल्यांची चाचणी घेऊन हा निकाल काढला जातो. सहसा एक्झीट पोल चुकणारा नसतो. कारण तेव्हा चाचणीत सहभागी झालेला मतदार मत देऊन आलेला असतो. मात्र अनेक फ़ेर्‍यांमध्ये मतदान चालू असल्याने त्याचे निकाल अंतिम फ़ेरी़चे मतदान होईपर्यंत जाहिर केले जात नाहीत. पण तो निकाल हाताशी असतो. त्यामुळेच पहिल्या फ़ेरीतील मतदानाचा एक्झीट पोल लगेच तयार झाला आणि पुढल्या प्रत्येक फ़ेरीत होणार्‍या मतदानाच्या एक्झीट पोलचे आकडे चाचणीकर्त्यांच्या हाताशी तयार आहेत. मात्र त्याची जाहिर घोषणा करण्यावर प्रतिबंध आहे. पण असे आकडे राजकारणात गुंतलेल्यांसाठी पैसे मोजल्यास उपलब्ध असतात. कुठल्याही प्रकारे त्याची जाहिर वाच्यता केली जाणार नाही, या अटीवर राजकीय पक्षांना चाचणीकर्त्यांकडूना हे आकडे मिळू शकत असतात. अगदी अमेठी वा बारामती अशा मतदारसंघाचाही एक्झीट पोल मिळू शकतो. बहुधा शरद पवारांनी तसा पोलचा आकडा मिळवलेला आहे. त्यात नवल कुठलेच नाही. यावेळी पवार प्रथमच चहूकडून घेरले गेलेले आहेत आणि आपला बालेकिल्लाही धोक्यात असल्याची जाणिव त्यांना खुप आधी झालेली होती. म्हणून त्यांनी माढ्यातून माघार घेतली आणि आपली सर्व शक्ती बारामती टिकवण्यासाठी लावलेली होती. पण तिचा उपयोग झाला नसल्याची खातरजमा एक्झीट पोलच्या माध्यमातून झाल्यावर निकालापुर्वीच त्यांनी मतदान यंत्रावर खापर फ़ोडण्याची सुरूवात केलेली दिसते. अन्यथा बारामतीत पवारांचा किंवा त्यांच्या लाडक्या कन्येचा पराभव, असे शब्द कोणी सहसा उच्चारण्याची हिंमत करत नाही. मग पवारांनीच त्याची मतदान संपताच सुरूवात करून द्यावी का?

इथे आणखी एक संदर्भ तपासून बघायला हरकत नाही. मागल्या खेपेस प्रथमच बारामती मतदारसंघात अटीतटीची लढत झालेली होती आणि इतक्या कमी फ़रकाने प्रथमच कोणी पवार कुटुंबिय बारामतीतून लोकसभेत पोहोचला होता. त्याही आधीच्या निवडणूकीत माढा मतदारसंघात पवार उभे होते आणि त्यांच्याशी टक्कर देताना धनगर नेता महादेव जानकर यांना काही हजार मते मिळाली, तरी पवार नाराज होते. आपल्या विरोधात कोणालाही लाखभर मते मिळतात, याचे त्यांना बारामतीच्या नजिकच्या मतदारसंघातही वैषम्य वाटलेले होते. पण पाच वर्षांनी तोच महादेव जानकर खुद्द बारामतीत आला आणि त्याने पवार कन्येच्या तोंडचे पाणी पळवले होते. प्रथमच सुळे इतक्या कमी मताधिक्याने जिंकल्या होत्या आणि सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात त्यांना जानकरांनी मागे टाकलेले होते. त्यामुळे बालेकिल्ला म्हणावा अशी बारामतीची तटबंदी अभेद्य उरलेली नव्हती. खरेतर त्यानंतरच्या पाच वर्षात पवारांनी व सुप्रियाताईंनी ती ढासळलेली तटबंदी डागडूजी करून ठिकठाक करायला हवी होती. पण त्याऐवजी पिता व कन्या उचापती करीत राहिले आणि पाच वर्षे संपल्यावर ‘कुल’वृत्तांत देण्याची वेळ आल्यावर तोंडचे पाणी पळालेले होते. म्हणूनच जिंकण्या हरण्याच्या गोष्टी सुरू झाल्यावर सुप्रियाताईंनी प्रथमच नरमाईचे वक्तव्य केले. मताधिक्याला महत्व नाही, एका मतानेही जिंकले तरी तो विजयच असतो, असे ताई म्हणाल्या. तेव्हाच बारामती डळमळीत असल्याचे उघड झालेले होते. आता मतदान संपल्यावर पित्यानेच यंत्रावर शंका घेताना ‘बारामती गेली तर’ची भाषा उगाच केलेली नाही. पायाखालची वाळू सरकली असल्याचा तो संकेत आहे. अर्थात एक्झीट पोल अंतिम निकाल नसतो. काठावरची लढत असेल तर ऐन मोजणीत काही हजार मतानेही विजय पराजय ठरत असतो आणि त्याचीच ग्वाही पवारांनी ताज्या विधानातून दिलेली आहे.

एक्झीट पोलने त्यांना भयभीत केलेले असावे. त्यातूनच मग ही प्रतिक्रीया आलेली असावी. आजवर लाखांच्या फ़रकाने जिंकण्याची सवय लागलेली होती आणि मागल्या खेपेस चार विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडावे लागलेले होते, आज त्यात फ़ारसा फ़रक पडलेला नव्हता आणि अधिकच वातावरण तापत गेले, आपले म्हणावे अशा राजकीय मित्रांनीही दगाफ़टका करण्याचा विडा उचललेला असेल, तर मनात शंकेची पाल चुकचुकणारच. पण कितीही झाले तरी पराजयाची तयारी करूनच लढत द्यायची असते. इंदिराजी, वाजपेयी यासारखे दिग्गजही इथल्या मतदाराने पराभूत करून दाखवले आहेत. त्यांच्या तुलनेत बारामती, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे कोणी अफ़ाट व्यक्तीमत्व नाहीत. त्यांच्या पराभूत होण्याने लोकशाही धोक्यात येत नसते, की लोकाचा निवडणूकीवरचा विश्वास संपण्याची बिलकुल शक्यता नसते. उलट असे निकालच लोकांचा निवडणूका व लोकशाहीवरला विश्वास द्विगुणित करीत असतात. कितीही दिग्गज वा पराक्रमी नेता असला तरी मतदाराच्या इच्छेसमोर त्याची काही मातब्बरी नसते, हेच निवडणूका सिद्ध करीत असतात. त्यावर ज्याचा विश्वास नसतो, त्याचा लोकशाहीवरच विश्वास असू शकत नाही. शेकडो पराभव पचवून भाजपा या विजयाच्या रिंगणात पोहोचला आहे. त्यालाही आजवर अनेकदा बालेकिल्ल्यात पराभव पचवावे लागले आहेत. चारच महिन्यापुर्वी तीन हक्काच्या राज्यातली सरकारे भाजपाने गमावली आहेत. तेव्हा लोकांचा विश्वास उडाला नव्हता. कारण ती सरकारे मतदारानेच जमिनदोस्त केली आणि यापुढेही असे कोणी मुजोर माजलेले पुढारीही मतदार संपवून टाकत राहिल. त्या नेत्यांनी जनतेच्या लोकशाही व निवडणूकीवरील विश्वासाची फ़िकीर करायचे कारण नाही. त्यापेक्षा आपण कुठे व कसे चुकलो, त्याचा काळजीपुर्वक अभ्यास करावा. लोकांच्या विश्वासापेक्षा आपल्या ढासळलेल्या आत्मविश्वासाची डागडूजी करावी.

31 comments:

  1. अजित पवार व सुप्रिया सुळेंची भाषा व आता शरद पवारांची भाषा पाहिल्यास यांच्यात किती अहंकार आहे ते कळते. सरळ - सरळ धमक्या देत असल्याचे त्यांचे वक्तव्य फार काही सांगून जाते.

    ReplyDelete
  2. Apratim lekh
    Baramaticha ha shewat disat ahe

    ReplyDelete
  3. गेली १८ वर्षे अश्या निकालाची अपेक्षा ठेवून मतदान केले. बघूया या वेळी तरी आजपर्यंतचा महाराष्ट्रातील धमाकेदार निकाल लागतो का ?

    ReplyDelete
  4. 23 तारखेला हा नारद EVM च्या नावाने रडेल नंतर कमीत कमी 50% तरी VVpat मत confirm करा म्हणेल तोपर्यंत म्हंटवाचे दिवस जातील, नाहीतर उगाच न्यायालयात जाऊन बोंबाबोंम करतीलच. भाऊ एक सांगा या नारदाला आणि त्याच्या चमच्याना आम्ही साधे नागरिक कसे उत्तर द्यावे ????

    ReplyDelete
    Replies
    1. "अनुल्लेखाने मारणे" हाच उपाय! आपण अशा लोकांचं नाव घेऊन एकप्रकारे त्यांची प्रसिद्धीच करतो।

      Delete
    2. दुसऱ्या कानाखाली

      Delete
  5. अत्यंत समर्पक विश्लेषण !
    वेगळं कांही बोलायची गरजच नाही !
    " बारामती " चा " कुल " वृृृृृृत्तांत क्रांती करणार !

    ReplyDelete
  6. Modi ni ainweli baramati madhli sabha cancel keli mhnj settlement zaliye bjp ni jaga ladhvlyache natak kele ani pawarana adkavun thevle modi chi sabha zali asti tar mhnlo asto yetil kul mhnun.

    ReplyDelete
    Replies
    1. Modinchi sabha baramatit fixch kadhi zali nawati sir

      Delete
  7. जातीपातीच्या राजकारणाचा वसा घेतलेल्या नेत्यांनी अंतर्मुख होऊन पराभवाची मिमांसा करावी अशी अपेक्षा करणे हे अवाजवी आहे.
    त्यांना आपले आप्त, निष्ठावंत व कार्यकर्ते टिकवता आले नाहीत ते लोकशाही टिकवायची भाषा करताना केविलवाणे वाटतात. प्रत्येक मुजोर नेत्याला जनतेने जागा दाखवून दिली आहे व राहिल.

    ReplyDelete
  8. अगदी खरे तेच लिहिले आहे, भाऊ. पण सत्य स्वीकारायला माणसाचं मन मोठे असावे लागते.

    ReplyDelete
  9. Mujor aani majlele pudhari . Very good comment. For Pawar family

    ReplyDelete
  10. उत्तम विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  11. अगदी बरोबर जाणत्याचे मुल्यमापन केले आहे ,बारामती ही माझी जहागिरी आहे . मी , माझा परिवार ह्यांच्या copyright बारामती वर आहे अशी संकुचित विचारसरणी ह्याची आहे .परंतु आता वस्तुस्थितीची जाणीव झाल्याने असे निराशेपोटी आरोप करणे सुरु केले आहे .पण जनतेचा कौल हा मानलाच पाहिजे .

    ReplyDelete
  12. हीच खरी लोकशाही ची ताकत आहे देशात भल्या भल्याचा पराभव झालेला आहे पण पवार साहेबांना पराभवाची चाहूल निकाल आगोदर लागलेली दिसते

    ReplyDelete
  13. 23 तारखेला हा नारद EVM च्या नावाने रडेल नंतर कमीत कमी 50% तरी VVpat मत confirm करा म्हणेल तोपर्यंत म्हंटवाचे दिवस जातील, नाहीतर उगाच न्यायालयात जाऊन बोंबाबोंम करतील,बारामती आणि मावळ चे पण असेच होणार इकडे काका बोंबाळणार तिकडे पुतण्या

    ReplyDelete
  14. महेश लोणेMay 4, 2019 at 1:03 AM

    अगदी खरे तेच लिहिले आहे. पराभव दिसू लागल्यामुळेच त्यांची भाषा बदलली आहे. अत्यंत उत्तम विश्लेषण

    ReplyDelete
  15. यंदा बारामतीमधून भाजपने दिलेला उमेदवार हा महादेव जानकर यांसारखा आचानक राजकारणात उगवलेल्या भूछत्री प्रमाणे नाही तर गेली अनेक वर्षे सातत्याने समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या कुल कुटुंबातील उमेदवार भाजपने दिलेला आहे. कुल कुटुंबीय हे पूर्वीपासूनच पवारविरोधी भूमिकेसाठी पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत तसेच त्यांची कामे देखील अनेक लोकांना माहिती आहेत . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपने एक महिला उमेदवार दिलेला असल्यामुळे महिला मतांचे विभाजन होणे ही राष्ट्रवादीला न टाळता येणारी गोष्ट होणार आहे

    ReplyDelete
  16. खर आहे .
    छान विश्लेषण

    ReplyDelete
  17. Very nice reply to dharaneshahila

    ReplyDelete
  18. हा शुद्ध पोरकटपणा झाला. एखादी गोष्ट मिळाली नाही तर तीच तोडून मोडून टाकणे. इतक्या मोठ्या अनुभवी नेत्याला शोभत नाही हे. ज्या यंत्रणेच्या जीवावर इतकी वर्ष सत्ता उपभोगली तिच्यावरच आता प्रश्नचिन्ह? प्रत्येकाला कधीतरी निवृत्त व्हावेच लागते. मानाने होणे केव्हाही चांगले. आदर्श म्हणून लोकांच्या स्मरणांत राहता येतेच , अर्थात तसे वागले तर. भावी पिढीला काय मूल्य शिकवणार हे लोक? किती नुकसान करतात.

    ReplyDelete
  19. बेरकी भूतकाळ आणि अंधक्कारमय भविष्य दोन्ही डोळ्यासमोर चित्रपटासारखे येत असतील. चालायचंच, ते हि नो दिवसा: गता:!!!!

    ReplyDelete
  20. भाऊ,
    आदरणीय यांची ही मुलाखत अगदी पुन्हा पुन्हा बघण्याजोगी आहे.आजूबाजूला नेमके “कार्यकर्ते”आहेत,मुलाखत घेणारे “जोशी” अवघडून बसले आहेत. त्यात जाणते म्हणाले ”असे झालेतर “लोकांचा’ निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास उडील.”लोक” कोणत्याही टोकाला जातील.हा सरळ सरळ दंगल करण्याचा परवाना आहे.माननीय कै वसंत दादा पाटील सांगलीत एका राष्ट्रीय दुर्दैवी घटने नंतर ”लोक चिडले आहेत “असे संगत घरे पेटवत फिरत होते.त्याची आठवण झाली.
    मी नापास झालो तर “लोकांचा” परीक्षा पद्धतीवरचा विश्वास उडेल.

    ReplyDelete
  21. Badal zala pahije vaitag aalay baramaticha

    ReplyDelete
  22. काही वर्ष्यापासून पवार असे बोलत आहेत. एव्हडे मिळून सुद्धा समाधान नाहीच. असंतुष्टतेतून बोलत असावेत.असू द्यात,म्हातारचल लागलंय म्हणू यात. दुसरं काय.

    ReplyDelete
  23. एवढं मिळूनसुद्धा समाधान नाहीच.पैसा आणि पैश्याच पद आणि सत्ता भरमसाठ मिळूनसुद्धा अजून पाहिजेच, ही मानसिकता.आता जनतेने समजायचे ते समजलंय. त्यामुळं सभेला गर्दी होत नाही सबब मानसिक अपमानित वाटतेय .म्हणून ही भाष्या.असूद्यात म्हातारचल लागलंय म्हणायचं.दुसरं काय. राज सारख्याचा आधार घ्यावा लागतो म्हटल्यावर पाणी कुठं मुरतंय लक्ष्यात येते.

    ReplyDelete
  24. वैताग बारामतीचा का बारामतीच्या पुढाऱ्यांचा? 😀😃😃

    ReplyDelete