Thursday, May 9, 2019

त्सुनामीचा सुगावा?

Image result for mamata jai shriram

लोक्सभा निवडणूकीच्या पाच फ़ेर्‍या पुर्ण झाल्या आहेत आणि रविवारी सहावी फ़ेरी व्हायची आहे. आतापर्यंत ४२५ जागांचे मतदान संपलेले आहे. त्यामुळे जवळपास ८० टक्के जागांचे भवितव्य यंत्रामध्ये बंदिस्त झालेले आहे. अशावेळी प्रत्येक पक्ष व प्रामुख्याने त्याचे नेतृत्व यांची देहबोली अधिक बोलकी झालेली आहे. उत्तरप्रदेश आणि बंगाल या राज्यात अजून दोन फ़ेर्‍या व्हायच्या आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणचे कडवे मोदी विरोधक रडकुंडीला आलेले आहेत. उलट तिथून अधिक जागा मिळवायला उत्सुक असलेले नरेंद्र मोदी व त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा अधिकच उत्साहित होऊन विरोधकांवर शाब्दीक हल्ले चढवित आहेत. तितकेच मोदी विरोधातले बेछूट बेताल आरोप अधिकच टोकदार होत चालले आहेत. जिथे मतदान संपलेले आहे, अशा राज्यातील मोदी विरोधक अस्वस्थ होऊन कडेलोटावर उभे असल्यासारखे वागत सुटले आहेत. त्यात प्रामुख्याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांचा समावेश करता येईल. अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी ममताविषयी चांगले उद्गार काढले होते. पण तेही दिदीला पचवता आलेले नाहीत. दिदी आपल्याला कुर्ता वा मिठाई पाठवते आणि राजकारणाच्या पलिकडे ममता चांगल्या स्वभावाची असल्याची ग्वाहीच मोदींनी दिलेली होती. पण मोदी आपल्याला चांगले म्हणतात, हेही दिदीला सहन झाले नाही. म्हणून मोदींना खोटे पाडण्यासाठी़च जणू दिदीने आपल्या विकृत मनोवृत्तीची तात्काळ साक्ष देऊन टाकली. दुसर्‍याच दिवशी एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या, यापुढे आपण मोदींना मातीचे लाडू पाठवणार आहोत. मोदींना थप्पड मारणार आहोत. हा काय प्रकार आहे? मोदीं तुमच्याविषयी चांगले बोलतात, तेही सहन होत नाही? त्यांनी अपशब्द वापरले तर उलट उत्तर समजू शकते. पण चांगले बोलले असताना झोंबण्याचे कारण काय? की हा मनस्थितीचा अविष्कार आहे?

लोकसभा निवडणूका लागल्यापासून ममतांचा तोल पुरता गेलेला आहे. त्यांनी गावोगावी आपल्या गुंड कार्यकर्त्यांना मोकाट सोडलेले आहे आणि बंगालमध्ये मतदानात माजलेल्या हिंसेच्या वार्ता बहुतांश माध्यमांनी प्रसृत केलेल्या आहेत. तृणमूल व ममतांच्या गुंडांच्या तावडीतून माध्यमाचे कर्मचारी पत्रकारही सुटलेले नाहीत. पण त्यांना कोणाचीच पर्वा उरलेली नाही. मागल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत इतका मोठा निर्णायक विजय मिळवलेल्या पक्ष व नेत्याला कुठल्याही निवडणूकीची भिती वाटण्याचे कारण नाही. एकट्याच्या बळावर ममतांनी विधानसभेत नुसते बहूमत मिळवले नाही, तर तीन पक्षांच्या विरोधात बहूमताच्याही पार अधिक जागा मिळवल्या होत्या. कुठल्याही पक्षाने कितीही प्रयत्न केला तरी ममतांशी मतांमध्ये टक्कर घेण्याच्या जवळपास फ़िरकू शकणार नाही, इतकी ती मते व लोकप्रियता होती. तरीही ममतांचा धीर इतका कशाला सुटला आहे? त्यांच्या भाषा व वर्तनाचा तोल इतका कशाला ढळला आहे? भाजपाचे अध्यक्ष ४२ पैकी २२ जागा जिंकण्याची भाषा बोलतात म्हणून दिदी खवळल्या आहेत काय? बोलायला माणसे काहीही बोलतात. म्हणून समोरच्या हिंमतबाजाने भयभीत व्हायचे काहीही कारण नसते. जेव्हा असा हिंमतबाज घाबरल्यासारखा वागू बोलू लागतो, तेव्हा मात्र शंका येऊ लागते. त्याला आव्हानवीराची भिती वाटू लागल्याची ती पहिली खुण असते. बहुधा ममतांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याचे ते लक्षण असावे. अन्यथा मागल्या वर्षभरात ममतांचे वागणे दिवसेदिवस संशयास्पद बनत गेलेले आहे. भयगंडाने पछाडलेल्या व्यक्तीसारखे ममताचे वर्तन दिसू लागले आहे. त्यांना कुठल्याही घटनेत, घोषणेत वा कार्यक्रमात भाजपाचे कारस्थान दिसू लागले आहे. मग ती कारवाई सुप्रिम कोर्टाने केली असो वा आयकर विभागाने केलेली असो. त्यात ममतांना मोदीचे कारस्थान दिसते.

काही महिन्यांपुर्वी सुप्रिम कोर्टाच्या आदेशान्वये तपासकाम करणार्‍या सीबीआय पथकाने कोलकात्याचे पोलिस आयुक्त यांना चौकाशीला बोलावले. त्यालाही ममता मोदींचे कारथान समजून बसल्या होत्या. तिथे लष्कराच्या एका संचलन व प्रात्यक्षिकात त्यांना सरकार बरखास्तीचा संशय आलेला होता. अगदी अलिकडे बंगालला चक्रीवादळाने झोडपले. त्यात केंद्राची मदता देण्यासाठी पंतप्रधानांनी फ़ोनावर संपर्क साधला. तर ममतांनी फ़ोन घेतला नाही की उलट संपर्क साधला नाही. बंगाली जनता वादळाने ग्रासलेली असतानाही त्यांना केंद्रांची मदत म्हणजे मोदींचे कारस्थान वाटलेले होते. म्हणून त्यांनी मदतही नाकारलेली आहे. एकूण ममतांचा भयगंड कुठल्या थराला गेलाय, त्याची ही चाहूल आहे. ममता कशाला घाबरल्या आहेत? मागल्या लोकसभेत दोन खासदार व विधानसभेत चारपाच आमदार निवडून आणणार्‍या भाजपाची ममतांना इतकी भिती कशाला वाटते आहे? घाबरलेला माणूस बाहेरच्या कुठल्या कारणापेक्षाही मनातल्या भयाने बेजार झालेला असतो. ममतांची अवस्था काहीशी तशीच झालेली आहे. मनातले पाप त्यांना भयभीत करते आहे. मागल्या काही वर्षात केलेले राजकारण व उचापतीच त्याला भयभीत करीत आहेत. ज्यामुळे आपल्यापासून मतदार दुरावल्याची समजूत त्यामागे आहे. किंबहूना लोकसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्यांच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते व सहकारी त्यांचा हात सोडून भाजपात जाऊ लागल्याने ममतांचा धीर सुटला आहे. ज्या गुंडगिरीपासून मुक्ती मिळण्यासाठी बंगाली मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, तोच निसटल्याच्या भयामुळे त्यांनी आता त्या मतदाराला घाबरवून मते मिळवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भिती अन्य कोणाची वा मोदींची नसून, आपल्याच नाकर्तेपणाची भिती ममतांना सतावते आहे. अन्यथा त्यांनी उठसुट इतका आक्रस्ताळेपणा केला नसता.

जी कहाणी ममतांची आहे, तीच काहीशी शरद पवार, चंद्राबाबू नायडू किंवा राहुल गांधींच्या कॉग्रेस पक्षाची आहे. जसजसे मतदान संपत आलेले आहे, तसतशी यांची बेचैनी वाढत गेलेली आहे आणि त्यांनी अधिकाधिक शिवराळ भाषेत मोदींवर हल्ले चढवले आहेत. आरोप चालविले आहेत आणि मतदान यंत्रावरही निकालापुर्वीच शंका जाहिर केल्या आहेत. मोठ्या अपेक्षेने चंद्राबाबू सुप्रिम कोर्टात गेले होते. पण तिथूनही फ़टकारून लावल्यावर त्यांनी विविध विरोधी व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम आरंभला आहे. लढण्यापुर्वी ज्यांना समान तत्वावर एकजुट करता आली नाही, किंवा आघाडी करता आली नाही; त्यांची निकालानंतरच्या परिस्थितीशी जुळते घेण्यासाठीची धावपळ नवलाची नाही. बहुधा त्यांना एक्झीट पोलचे आकडे मिळालेले असावेत. जसजसे मतदान संपलेले आहे, तसतसे तिथल्या जागांचे आकडे तयार झालेले आहेत. ते जाहिर करण्याला प्रतिबंध असला तरी राजकीय पक्षांना मोबदला देऊन एक्झीट पोल मिळू शकतात. त्याचे प्रतिबिंब या लोकांच्या वागण्यावर पडलेले असावे. विजयाची मस्ती मोदी वा अमित शहांच्या वागण्यातून दिसू शकते आणि नैराश्य व पराभवाने येणारी अस्वस्थता ममता चंद्राबाबू इत्यादिंच्या वागण्यात दिसू लागलेली आहे. हे आकडे मोदींच्या पराभवाचे असते, तर यंत्रावर याचिका करायला सगळ्या पक्षाचे नेते एकजुटीने जाताना दिसले नसते. त्सुनामी आली, तेव्हा आधी त्याचा सुगावा लागलेली प्रतिक्रीया पाळीव जनावरांमध्ये उमटली होती, काही तास आधीच ही गुरे दावी तोडून पळायला धडपडत होती. तर गाफ़ील माणूस प्राणी बेसावध झोपलेला होता. अशा बातम्या आलेल्या होत्या. आताही मोदींना हरवण्याच्या वल्गना करणार्‍यांना एक्झीट पोलने येऊ घातलेल्या त्सुनामीची चाहुल लागलेली असावी काय? नसेल तर दावे तोडायला धिंगाणा घालणार्‍या गाईसारख्या ममता वा इतर नेते धुमाकुळ कशाला करीत आहेत?

17 comments:

  1. अगदी अचूक विश्लेषण, भाऊ.
    ममता बॅनर्जी चा थयथयाट पराभवाची हताशा दर्शवतो आहे. इतकी उद्धट आणि बेमुर्वत बाई राजकारणात पुन्हा होणे नाही. सत्तेची लालसा किती अधोगती करते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ममता. सत्ताप्राप्तीसाठी देशविरोधी शक्तींनाही या बाई जवळ करतात. चोवीस टक्के मुस्लिम मतांसाठी ही बाई कट्टर हिंदू विरोधक बनली.
    पण या गोष्टीला पायापुरते पाहणारा भद्र बंगाली माणूस अधिक जबाबदार आहे.तो आधी बंगाली अस्मिता जपतो आणि शेवटी शक्य झालं तरच देशाचा विचार करतो. दुर्दैवाने हे तथाकथित भद्रजन संपूर्ण बंगाल चे नेतृत्व करतात.

    ReplyDelete
  2. National Leader like Mr. Sharad Pawar also started doubting on EVM. Their plea in Supreme court was rejected. This happened many times but leaders of opposition are still blaming to EVM. According to Mr. Pawar he himself saw demonstration by expert on EVM hacking. Then why he did not present them in Supreme Court or Election Commission of India? What happened when he voted in Mumbai? I was really shocked by his recent comments. It was not expected from leader such like him. And there are no words for Mamata Banerjee. The way she is behaving not correct as per constitution which she wants to protect. She has such arrogance that she did not reply to Prime Minister. Modi praised CM of Odisha even there is election time. How low these opposition leader will stoop low god knows.

    ReplyDelete
  3. Mamatala gay mhanu naka. Tila mhais kiva bail mhana. Gay bichari garib asate.

    ReplyDelete
  4. ममता दीदी च हुकूमशहा आहेत .हिटलर दीदीने मोदींना हिटलर म्हणणे यापेक्षा मोठा विरोधाभास काय!

    ReplyDelete
  5. Waa waa ,Sir, very good analysis of all these leaders. India need again Modi Government.

    ReplyDelete
  6. आता जरा tension आले आहे. तुमचे लेख एवढाच काय तो दिलासा आहे.

    ReplyDelete
  7. भाऊंच्या तोंडात तुप-साखर

    ReplyDelete
  8. भाऊ हे आपण वर्णन केले आहे ते राजकीय पक्षांचे झाले सत्ता गमावण्याच्या भीतीने त्यांचा आक्रस्ताळेपणा ठीक आहे पण हे लोण आता प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचले आहे,या मोसमात महाराष्ट्र टाइम्स चे अग्रलेख वाचले तर याची प्रचिती येईल, कालचा मटाचा अग्रलेख निवडणूक यंत्रणेवर शंका घेणारा आहे त्यातली भाषा आणि शरद पवार किंवा चंद्राबाबू यांची ईव्हीएम वर शंका घेणारी भाषा यात विलक्षण साम्य आहे, शेखर गुप्ता उघडपणे ममताच्या गुंडगिरीचे समर्थन करतो आहे, आपण वर्णन केलेल्या त्सुनामीत केवळ विरोधी पक्षच नव्हे तर काँग्रेसने पाळलेली ही प्रसारमाध्यमे देखील वाहून जाणार आहेत यात आता शंका उरलेली नाही.

    ReplyDelete
  9. भाऊ
    जबरदस्त विश्लेषण
    धो डाला
    1कच नंबर
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌

    ReplyDelete
  10. नुकत्याच येऊन गेलेल्या वादळासारख्या गंभीर संकटाच्या वेळी तरी ममता अधिक गांभीर्याने वागतील अशी काहीजणांची खुळी अपेक्षा होती. पण त्याप्रसंगातदेखील त्यांनी अतिशय चुकीच्या वर्तणुकीचे दर्शन देशाला दाखवले आहे. पंतप्रधान आणि केंद्र शासनाला धुडकावून लावण्याच्या त्यांच्या वृत्तीने देशात एका नव्या अराजकाला आमंत्रण मिळते आहे ह्याकडे राजकारणाच्या लहानसहान लढाया करणाऱ्या 'जाणत्या राजा'सह इतर अनेकांनी दुर्लक्ष केलेले आहे ते दुर्दैवी आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पटनाईक यांनी भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून देखील ज्या पद्धतीने केंद्र आणि पंतप्रधान यांचा योग्य आदर राखत वादळाच्या संदर्भात संयुक्तपणे कृती करण्याचा प्रयत्न केला तो लक्षणीय ठरला. आता अनेक तथाकथित राजकीय विश्लेषकांना त्यातदेखील राजकीय वास आला ही त्यांचीही विकृतीच. आपण ममतांच्या बेछूट आणि स्किझोफ्रेनिक मानसिकतेचा योग्य समाचार घेतला आहे. नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

    ReplyDelete
  11. उत्तम विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  12. भाऊ तुम्ही म्हणता ते तंतोतंत पटते, जे काही सुरू आहे ते कमालीचे सुरू आहे. मोदी एकेक बाहेर काढत आहेत व त्यामुळे त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार चहोबाजुने सुरू आहे. कोणत्या स्तरावर निवडणूक जाणार आहे माहीत नाही. दोन्ही बाजूने भीती वाटत आहे.

    ReplyDelete
  13. May God make your pridiction true.Hope your pridiction it 3000 to350 seats for BJP will become reality on 23rd may .

    ReplyDelete
  14. भाऊ सही अन्यालेसीस... आपण मांडलेले प्रत्येक विश्लेशण महत्वाचे आहे आता जनता जनार्दन मध्यप्रदेश राजस्थान छतीसगड प्रमाणे कौल देतो का ऊत्तर प्रदेश प्रमाणे तडाख्यात ऊत्तर देतो हे पहावे लागेल..
    पण मोदींचा तोल ढाळवण्यासाठी हे चालले आहे

    ReplyDelete
  15. भाऊ आपले मत परखड आणि वस्तूस्थीतीला धरुन असते. देशात अराजक निर्माण करण्याचे विरोधी पक्षाचे व लुटियन व चानल लाॅबीचे प्रयत्न मोदी नी हाणुन पाडले यामुळे कायम सत्तेत रहाणारे व दलाल बिथरलेले आहेत.
    यातच भर सुप्रीम कोर्ट निर्णय या लुटीयन लाॅबीला पाहिजे तसे देत नाही.
    जनता गरीब अशिक्षीत व भोळी आहे यातच भारतीय जाती धर्म प्रांतीय व वर्णवाद कमालीचा स्वार्थी पणा खुशालचेंडु व भाषीक कडवे पणा (साऊथ इंडिया ईतर भारतीयांची आशा मुड देशाच्या आकांक्षा यांना कधीच झुकता कौल देणारा नाही.. या साऊथ भुमीत रामदास स्वामी ज्ञानदेव तुकाराम, तुकडोजी, तलसीदास, गुरुनानक नामदेव सारखे दिग्गज संतांनी जन्म घेतला की नाही हे पण समजत नाही कारण हे भाषावादाला व उच्च वर्गाला धरुन राहिले असतील व अजुनही ईतर देशवासीयांशी नाळ जुळु शकली नाही.. आपल्या आसपास रहाणारे असे लोक यातुन बोध घेऊन बघा अंतर ठेवूनच रहाणारे असतात.) यामुळे देशहिताचा सर्व भार ईतर देशवासीयांना पेलावा लागत आहे.. आणि याला शेवटी काही मर्यादा आहेत. ....
    अशा परिस्थितीत मोदी शहा सारखेच पट्टीचे पण धुर्त देशहित वादी व भयानक कष्ट घेणारे भाजपचे नेते आहेत म्हणुनच आशा नक्कीच आहे..
    आपले भाकित खरे ठरो
    ठरो
    एकेएस पनवेल

    ReplyDelete
  16. भाऊसाहेब छानच .
    मी तुमचे सगळे लेख वाचतै. खरंच तुम्ही अगदी खरं तेच लिहता.सलाम. तुमच्या कामाला.
    विजय टाकणे. माण.जि. सातारा.

    ReplyDelete