Wednesday, January 20, 2016

‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती



(पठाणकोटचे वास्तव’ अग्रलेखासोबतचे हे छायाचित्र बघा. त्यात काळ्या गणवेशातले एनएसजी कमांडो दिसतात की हिरव्या गणवेशातील लष्करी कमांडो दिसतात?)

‘वाकडी वाट न करताही..’  अशा शिर्षकाचा एक संपादकीय लेख मंगळवारी ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाला आहे. अर्थात तो अतिशय मनोरंजक असून त्याचा शेवट कुबेरांनी ‘तात्पर्य’ स्वरूपात केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘अमेरिका आणि इराण यांच्यात गेले १३ महिने चर्चा सुरू आहे. त्याचा कोणताही सुगावा उभय बाजूंनी कोणालाही लागला नाही. ती सभ्यता दोघांनीही पाळली. आणि जेव्हा अखेर अंतिम तोडगा दृष्टिपथात आला तेव्हा अध्यक्ष रोहानी यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी वाकडी वाट करून तेहरानला जाण्याची अतिउत्साही कृती ओबामा यांनी केली नाही. परराष्ट्र संबंध हे धिम्या लयीत, सर्व संकेत आणि चौकटी सांभाळतच सुधारावे लागतात हे जरी आपण यातून शिकलो तरी पुरे.’ असे काही लिहील्याने किंवा सांगितल्याने परराष्ट्र संबंध व धोरणाचे सर्व धडे बहुधा कुबेरांनीच आजवर लिहीलेले असावेत, असेही कोणाला वाटू शकेल. कारण इराण अमेरिकेचे कौतुक करताना कुबेरांना मोदी सरकारला लाथा घालायच्या आहेत. प्रामुख्याने इराण अमेरिकेने किती धुर्तपणे आपल्यातील विवाद सोडवून गोड संबंध निर्माण केले, हे कुबेरांचे आख्यान आहे. त्याच्या उलट काबुलहून माघारी दिल्लीला येताना मोदी लाहोरला ‘वाट वाकडी करून’ गेले, त्याला दोषही द्यायचा आहे. तसे करायला काहीही हरकत नाही. पण म्हणून लाहोरला जाण्यात गैर होते किंवा अमेरिकेने तसे न करण्यात शहाणपणा असल्याचा आग्रह कशाला? मुदलात मुत्सद्देगिरी हा जाहिर चर्चेचा विषय नसतो. तेरा महिने अमेरिकेने गुपचुप इराणशी बोलणी केली. ती गुपचूप रहाण्यामागे अमेरिकन माध्यमांचे कौतुक करावे लागेल. तिथल्या कुणा संपादक पत्रकाराने दोन देशांच्या संबंध विषयक चड्डीत काय झाकलेले आहे, तिकडे डोकावून बघण्याचा उद्योग केला नाही, ह्याला सभ्यपणा म्हणतात. बाकी दोन देशात व्हायचे ते चालूच होते. भारतातल्या माध्यमे व पत्रकारांपाशी त्या सभ्यपणाचा अभाव आहे. म्हणून कुठल्याही बारीकसारीक गोष्टीचा बोभाटा होत असतो.

नसलेली अक्कल वापरण्याचा हव्यास आणि निर्बुद्धतेचे प्रदर्शन मांडण्याचा उतावळेपणा म्हणजे पत्रकारिता; अशा समजुतीने पछाडलेल्यांचा माध्यमातून भरणा झाल्याचे ते दुष्परिणाम आहेत. त्यामुळे युद्धस्थिती असो किंवा परराष्ट्र धोरण असो, त्यात कुठेही नाक खुपसण्याने एकूणच स्थितीचा बोजवारा उडवण्यास कुबेरांसारखे पत्रकार हातभार लावत असतात. दोन देशातील चर्चा सोडा, पठाणकोटवरचा घातपाती हल्ला घेतला, तरी या लुडबुडीचे पोस्टमार्टेम करता येईल. चारपाच दिवस आधी पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात कुबेरांनी आपली अक्कल पाजळली आहे. ‘पठाणकोटचे वास्तव’ या शिर्षकाचा संपादकीय लेख लिहीताना त्यांनी तिथे एनएसजी कमांडो कशाला पाठवले, असा खडा सवाल सरकारला विचारला आहे. किंबहूना हे कमांडो अशा घटनास्थळी पाठवणे कसे गैरलागू होते, त्यावरही ज्ञानदान केलेले आहे. त्या हवाईतळावर हल्ला झाला ती युद्धजन्य स्थिती होती आणि म्हणूनच तिथे लष्कराचे कमांडो बोलवायला हवे होते. ते जवळच एका छावणीत होते. पण एनएसजी कमांडो पाठवून चुक केल्या्चा कुबेरांचा निष्कर्ष आहे. तो मान्य करायचा तर अवघे आयुष्य सुरक्षा वा लष्कराच्या कारवायात घालवणारे बेअक्कल आणि आयुष्यभर खर्डेघाशी करणारे जनरल (नॉलेजीयन) कुबेर मोठे रणनितीकार ठरतील. पण म्हणून वस्तुस्थिती काय होती, ती सेनाधिकार्‍यांना वा सुरक्षा अधिकार्‍यांना बघावी लागते. त्यानुसार योजना बनवावी लागते. कुबेरांप्रमाणे परदेशी पुस्तके वाचून योजना आखता येत नाही, की राबवता येत नाही. लष्करी तळावरचा हल्ला घातपाती आहे, म्हणून युद्धजन्य परिस्थिती नक्कीच होती. त्यासाठी लष्कराचे कमांडो पाठवले नाहीत, ही माहिती कुबेरांनी वा तत्सम अर्धवटरावांनी कुठून मिळवली? निदान ‘लोकसत्ता’ वेबसाईट बघितली तरी तशी साक्ष मिळत नाही. जो अग्रलेख वेबसाईटवर आहे, त्याच्या शिर्षस्थानी जे छायाचित्र कुबेरांनी प्रकशित केले आहे, त्यात लष्कराचे कमांडो बंदुका रोखून सज्ज दिसतात. म्हणजेच घटनास्थळी लष्कराचे कमांडो कार्यरत असल्याची साक्ष लोकसत्ताच देतो.

कमांडो कुठले पाठवले व कुठून पाठवले? कुठले कमांडो कधी जागेवर पोहोचले व कोणी काय जबाबदार्‍या हाताळल्या, त्याचा तपशील कुबेरांनी कधी समजून तपासून घेतला आहे काय? सामान्य नागरिक ओलिस ठेवले जातात वा शहरी वस्तीच्या जागी काम करण्यासाठी एनएसजी कमांडो प्रशिक्षित असतात. पण ते प्रशिक्षण घेण्यापुर्वी तेही जवान लष्कराच्याच कुठल्या तरी विभागातून निवडलेले असतात. मोकळ्या मैदान वा झाडाझुडपातील लढाईपेक्षा वेगळे म्हणजेच मानवी वस्तीतल्या युद्धासाठी त्यांना तयार केलेले असते. अशा तुकड्या देशात मोक्याच्या जागी विखुरलेल्या असतात. प्रत्येक लष्करी तळ वा छावणीत तैनात नसतात. म्हणूनच अशा तुकड्यातील कमांडोंना एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी वेगाने पोहोचवावे लागते. लष्कराच्या अन्य विभागातील कमांडो तळ वा छावण्यांच्याच परिसरात असतात. त्यांना मुद्दाम आणावे वा पाठवावे लागत नाही. म्हणूनच पठाणकोटमध्येच असलेल्या लष्करी कमांडोंना घातपात्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवण्याचा विषय नव्हता, किंवा असा निर्णय दिल्लीत संरक्षणमंत्री वा सुरक्षा सल्लागार घेत नसतात. तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जात असतो. त्याची माहितीही तात्काळ दिल्लीला पाठवण्याचा संबंध येत नाही. म्हणूनच जी घटना घडली, तेव्हा विनाविलंब लष्करी कमांडो आणले गेले, तरी त्याचा कुठल्या बातमीत उल्लेखही आला नाही. पण पठाणकोट बाहेरून  खास प्रशिक्षित एनएसजी कमांडो तुकडीला पाठवले गेल्याच्या बातम्या झळकल्या. पण तिथल्या तिथे झालेल्या हालचालीची बातमी देण्याची बुद्धी कुणाला झाली नाही. पण एनएसजी तिथे पाठवायचेच कशाला? कुबेर यांना हवाईतळ वा लष्करी छावणीचे स्वरूप कितीसे ठाऊक आहे? तिथे नुसती शस्त्रास्त्रे वा युद्धसामुग्रीच नसते. अनेक वरीष्ठ कनिष्ठ अधिकार्‍यांचे कुटुंबिय वसाहती करून वास्तव्य करीत असतात. ते सैनिक नसतात. म्हणूनच त्यांना ओलिस ठेवले जाण्याचा धोका संभवत असतो. पण तशी स्थिती हाताळण्याला लष्करी कमांडो सज्ज नसतात.

पठाणकोट तळावर मोठी कौटुंबिक वस्ती व नागरी लोकसंख्या आहे. तिथे घुसलेले जिहादी कुठल्याही घरात वा वसाहतीत जाऊन सामान्य कुटुंबांना ओलिस ठेवू शकले असते.  मग त्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे वा त्यांच्यापासून घातपात्यांना वेगळे पाडणे, हे कौशल्याचे काम आहे. तशी स्थिती निर्माण झाल्यावर बाहेरून त्या कमांडोंना शोधायचे व पाठवायचे, असे ‘जनरल कुबेर’ यांचे आदेश आहेत काय? बाकीचा तळ लष्कराचे अन्य विभागातील कमांडो व जवान हाताळत होते. पण नागरी वस्त्यांना सुरक्षित करण्याचे कुशल काम एनएसजी कमांडोंना करणे भाग होते. त्यामुळेच दोन दिवस दोनतीन घातपात्यांनी खिंड लढवली, त्यांना कुटुंब वस्तीत आश्रय घेता आला नाही किंवा कुणाला ओलिस ठेवता आले नाही. ओसाड पडलेल्या जुन्या इमारतीमध्ये आडोसा शोधून त्यांना तिथेच अडकून रहावे लागले. मग सोबत आणलेला दारूगोळा संपण्यापर्यंत त्यांना झुंजवणे शक्य झाले. पण हे सर्व समजून घ्यायचे तर विविध सुरक्षा दले काय व कोणते काम करतात, त्याची माहिती घेतली पाहिजे. ती पाश्चात्य पुस्तकात किंवा ‘गुगल’वर उपलब्ध नाही. सहाजिकच कालबाह्य झालेला आपल्या अकलेचा खजिना कुबेर मोकळा करीत बसले. पठाणकोटवर अशा अनावश्यक गावगप्पा करून कोणाचा बंदोबस्त करता येत नाही. त्यासाठी कारवाई पुर्ण होईपर्यंत व हाती माहिती येईपर्यंत उतावळेपणा होणार नाही, अशा सभ्यपणाची आवश्यकता असते. ती कुबेरांपाशी नाही की भारतीय माध्यमांपाशी नाही. सुदैवाने भारत सरकार व संरक्षण दलापाशी तितका सभ्यपणा टिकून आहे. म्हणून अंगावर आलेले मोठे संकट टळू शकते. कुबेरांसारखे चार अधिकारी प्रशासन वा सुरक्षा व्यवस्थेत असतील, तर किडामुंगीसारखी माणसे मारली जाऊ शकतील. जे मुंबईत घडलेले होते. ‘पठाणकोटचे वास्तव’ इतके सरळ आहे आणि ‘वाट वाकडी न करताही’ ते समजून घेता येईल. पण नागमोडी चालीची सवय जडली मग कुबेराचेही दिवाळे वाजायला पर्याय नसतो ना?

22 comments:

  1. अगदी बरोबर भाऊ

    ReplyDelete
  2. भाऊ ...............मस्त लेख !! आवडला .............आपल्या येथे म्हणजे ' हिंदुस्थान ' मध्ये आपले ' पुरोगामित्व ' व मी कित्ती कित्ती ' धर्म निरपेक्ष ' आहे हे दाखविण्याचा अत्यंत सोपा उपाय म्हणजे पंतप्रधान ' मोदी ' यांना जमेल तश्या ' शिव्या ' देणे............ अमेरिका व इराण या दोन देशान मध्ये झालेल्या कराराबद्दल बोलताना उगीचच ' भारतीय पंतप्रधानांना ' टपली मारण्यचा हा उद्योग आहे. नाहीतरी लोकसत्ताच्या पूर्वीच्या संपादकांना ( कुमार केतकर )............वडाची साल पिंपळाला लावायची हौस होतीच............ काय ' एक्सप्रेस ' ग्रुप च्या ' शेठजींचा ' अशा प्रकारे ' पुरोगामित्व ' अधे मधे ' झळकाविण्याचा ' आदेश आहे कि काय न कळे. ..........याच महाशयांनी ' याकुब मेमन ' च्या फाशीवर असेच तारे तोडले होते.

    ReplyDelete
  3. भाऊ, निम्मी लोक तुमच्यामुळे लोकसत्ता वाचतात.

    ReplyDelete
  4. भाउंचा धक्का . ग्रेट

    ReplyDelete
  5. झणझणीत लेख भाऊ

    ReplyDelete
  6. 'लोकसत्ता'पेक्षा 'लोकमत', 'सकाळ वाईट असले तरी त्यामुळे कुबेर शहाणे ठरत नाहित. पठाणकोटला नक्की काय झाले हे मिडियापासून दूर ठेवण्यात सरकार यशस्वी झाले असे म्हणावे लागेल आणि ज्या देशात 'लोकसत्ता' सारखी वृत्तपत्रे आहेत तिथे ते योग्यच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक न कळणाऱ्या किवा कळूनही जाणीवपूर्वक बेजबाबदार लेखन करणाऱ्यांना हे जोडे खावेच लगतिल.

    ReplyDelete
    Replies
    1. HO he khare aahe, pathankot la naaki kay zale he konalach mahit nahi. pratyek goshtiche dnyan malach aste ase ya tatakathit patrakarana vatat aste. kuber tar sarkarchya roj eka khatyache mantri astat.

      Delete
  7. buddhi chya babatit bhikari asalela kuber!!!

    ReplyDelete
  8. मुद्यासह स्पष्टीकरण केलात तर बार होईल

    ReplyDelete
  9. Dear bhau, your each and every article is simply extra ordinary. In every article you mention such points which can easily over look by anybody. But I think every time you teach people to how to think rationally.

    ReplyDelete
  10. It is a great joke that LOksatta is impartial(Maharashtra times too). All (except Vidhyadhar Gokhale)past and present editors were/are hidden politician, better to say Shikhandi.

    ReplyDelete
  11. अतिशय चपखल विस्लेषण भाऊ! लोकसत्ता हे वर्तमान पत्र निष्पक्ष बातम्या देत होते म्हणुन गेले १०,१५ वर्ष वाचतोय.... स्व.माधव गडकरी,स्व.अरुण टिकेकरांनी लोकसत्ता एका वेगळ्याच उची नेवून ठेवला! त्या नंतरच्या संपादकांनी उतरती कळा आणली आहे .... लोकसत्ता निष्पक्ष आहे म्हणूनच त्याची दाखल घेतली जाते अन्य वर्तमान पात्रांविषयी न बोलणेच बरे !!!! त्यांच्या ह्या प्रतिमेमुळेच त्यांना १ रु स्वागत मूल्यावर पेपर विकावा लागतो

    ReplyDelete
  12. लोकमानस ला पाठवुन बघा!!प्रसिद्ध होते कि नाही समजेल...

    ReplyDelete
  13. सुंदर पोस्टमार्टेम भाउ. अकलेची अशीच दिवाळखोरी अनेक वृत्तपत्रातून येतच असते. तुमच्यासारखा एखादाच असे वास्तव लोकांसमोर आणतो. याच लोकसत्ताने माझ्या मित्राचा एक फोटो ढापून त्याचे नाव कापून प्रसिद्ध केला. नोटीस पाठवताच व्यक्तीगत दिलगिरी फोन करुन व्यक्त केली गेली पण पेपरमधे त्याबाबत काही छापले नाही त्यानी

    ReplyDelete
  14. साहेब भाऊंनी सुरवातीलाच वैधानीक इशारा दिला आहे

    ReplyDelete
  15. या देशात काय चालले आहे तेच समजत नाही एक सामान्य कुटुबांतला व्यक्ती सर्वसामान्यांचा बहुमताने पंतप्रधान पदी विराजमान झाल्याचे या देशातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाले,एका परिवाराची चापुलसी करनारे व बुध्दीजीवी यांचे पचनी पडत नसल्याने इलेकट्रानीक,प्रिंट मियाडतले आपल्या हस्तकांकडुन देशात खोटे असहिश्नूतेचे वातावरन निर्मान केले जात आहे त्यामध्ये लोकसत्तेचे ही मोठे योगदान आहे त्यामुले भाऊ तुम्ही लिहत रहा आमचे कडुन शुभेच्छा

    ReplyDelete
  16. मला अस वाटत की लोकसत्ता व सम्पादक ह्यांना दिलेली चपराक हि प्रातिनिधिकच आहे.

    ReplyDelete
  17. Bhau, loksattat yakub meman ani nantar cinemachya adhichya rashtrageeta varacha agralekha vachalyavar ata far kahi apeksha
    uralelya nahit.....pan mala ek kalat nahi media madhe je kahi chalalay tyala 'fraud' mhanayacha ka 'misrepresentation'?.(fraud ha wilful tar misrepresentation he innocent manala jata)

    ReplyDelete
  18. कुबेरांचे हे शहाणपण अजय शुक्ला यांच्या लेखावर आधारीत आहे. Shukla writes on Defence matters & he is retired colonel

    ReplyDelete
  19. कुबेराला दरिद्री केलंत 😆

    ReplyDelete
  20. मला शंका आहे की कुबेराचा बोलविता धनी कोण हे कळले तर बर्‍याच गोष्टींचा उलगडा होईल.

    ReplyDelete