Thursday, June 9, 2016

मनसे, खडसे आणि शिवसेना



सध्या म्हणजे गेली दोन वर्षे शिवसेना व भाजपा यांच्यात जो कलगीतुरा रंगला आहे, त्याचा आता अतिरेक होऊ लागला आहे. सहाजिकच हे भांडण हास्यास्पद होत चालले आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत आणि मित्रपक्ष म्हणून कसे वागावे, याचा किंचितही गंध त्यांना असल्याचे जाणवत नाही. सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही बाजूंनी शोधली जाते. त्यात अर्थातच शिवसेना आघाडीवर आहे आणि भाजपा प्रतिसाद देण्याची संधी सोडायला राजी दिसत नाही. विधानसभा निवडणूकीच्या ऐन मुहूर्तावर सेनेला गाफ़ील ठेवून भाजपाने युती तोडली आणि आपण सेनेला कसा धोबीपछाड दिला, त्याची आत्मस्तुती सांगणारे नाथाभाऊ खडसे, आता सत्तेबाहेर फ़ेकले गेले आहेत. त्यामुळेच अन्य कुणापेक्षा सेनेत अधिक आनंदोत्सव साजरा झाला तर नवल नाही. पण अशा बेबनावालाही काही मर्यादा असतात किंवा त्यात काही मर्यादा पाळायच्या असतात. त्याचे भान शिवसेनेच्या नेत्यांना उरलेले नाही. किंबहूना अशा परिस्थितीत कार्यकर्ते व दुय्यम नेत्यांनी आघाडी लढवावी आणि ज्येष्ठ नेत्यांनी त्यावर सारवासारव करावी, असा राजकारणाचा शिष्टाचार आहे. पण सेनेत भाजपा सेनेत उलटेच घडताना दिसते. तुलनेने सामान्य कार्यकर्ते व स्थानिक दुय्यम नेते अधिक जबाबदारीने वागतात आणि ज्येष्ठ नेतेच हमरातुमरीने भांडताना दिसतात. प्रामुख्याने त्यात आग ओतण्याचे काम ‘सामना’मधून चालते याचे नवल वाटते. ते पक्षाचे मुखपत्र आहे आणि त्यातून अनुयायांना सुचक आदेश दिले जायला हवे. पण तिथूनच चिथावण्या दिल्या जात असतील, तर आनंदच ना? बाळासाहेब ह्या गोष्टी कशा हाताळायचे, ह्याचेही कोणाला भान दिसत नाही. आपण बाळासाहेब नाही, म्हणून आपल्या मर्यादा किती, त्याचीही जाणिव तिथे औषधाला दिसत नाही. नुसती आवेशपुर्ण भाषा ही बाळासाहेबांही शक्ती नव्हती.

पहिली गोष्ट म्हणजे बाळासाहेब व्यंगचित्रकार होते आणि म्हणूनच शिवसेनाप्रमुख असूनही त्यांनी केलेल्या शेरेबाजीकडे फ़क्त राजकीय नेता म्हणून बघितले जात नव्हते. त्यांच्या कुठल्याही शेरेबाजी वा मताकडे म्हणूनच गंभीरपणे बघितले जात होते. आपल्या फ़टकळ व स्पष्ट मतासाठी ते ख्यातनाम होते आणि राजकीय फ़ायदातोट्याच्या पलिकडे जाऊन मतप्रदर्शन करण्याची त्यांची हिंमत हीच त्यांची खरी शक्ती होती. तितकी कुवत आजच्या शिवसेनेपाशी असती, तर तिने कुठल्याही निरर्थक मंत्रीपदासाठी भाजपाशी तडजोड केली नसती. दोनदा महापौरपदाच्या निवडणूकीत मते फ़ुटली, म्हणून ठाण्याच्या तमाम सेना नगरसेवकांचे राजिनामे घेऊन साहेबांनी ठाणे महापालिका कॉग्रेसला तीन वर्षे बहाल केलेली होती. पण पुढल्या वेळी संपुर्ण बहूमताने सत्ता पादाक्रांत केली होती. तितकी हिंमत आजच्या शिवसेनेत आहे काय? असेल तर कुरघोड्या करीत बसण्याची गरज नव्हती. बाहेरून पाठींबा देऊनही देवेंद्र फ़डणविसांना खेळवायचे राजकारण शिवसेना करू शकली असती. ते शक्य झाले नसेल, तर मिळाले त्यात समाधान मानून पुढल्या लढाईची सज्जता करण्याला बाळासाहेबांचा वारसा मानता येईल. रोज नाराजीचे प्रदर्शन करून निदान आपल्या संस्थापकाची मान तरी खाली जाण्यास हातभार लावतोय, एवढेही ज्यांना उमजत नाही, त्यांच्याबद्दल काय बोलावे? निजामाच्या बापाचे राज्य आहे, असली भाषा पल्लेदार वाटते. पण मोदी हा निजामाचा बाप असेल, तर त्याच्या पदरी कशाला पाणी भरत आहात? ‘सामना’ चालवताना किंवा बाळासाहेबांचा वारसा सांगताना त्यांनी अशा कित्येक प्रसंगात कशा भूमिका घेतल्या होत्या आणि निभावल्या होत्या, त्याचे तरी स्मरण करायला हवे ना? मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि परराष्ट्रनिती हा पोरकटपणा करण्याचा विषय नाही. इंदिराजींच्या बाबतीत बाळासाहेब कसे वागत होते?

देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींच्या कर्तृत्वाला बाळासाहेबांनी नेहमी मुजरा केला. इंदिराजी कॉग्रेसच्या पंतप्रधान होत्या आणि साहेबांनी सतत कॉग्रेस विरोधातलेच राजकारण केले. पण कॉग्रेस आणि इंदिराजी यांच्यात कसा व कुठे फ़रक करावा, याचे भान त्यांनी कायम राखले होते. पक्षिय विरोधाच्या भूमिकेतून बाळासाहेबांनी कधी इंदिराजींची खिल्ली उडवली नाही, की विरोधाचा शड्डू ठोकला नाही. पण त्याचवेळी कॉग्रेसनेत्या म्हणून इंदिराजींवर कठोर टिका करण्यात त्यांनी कुठलीही कसर सोडली नव्हती. अगदी कम्युनिस्ट विरोधातले राजकारण करणार्‍या बाळासाहेबांनी सोवियत-भारत कराराला विरोध करण्याची भूमिका घेतली नव्हती. देशहिताच्या विषयात ते कधी पक्षिय राजकारण आडवे येऊ देत नव्हते. किंबहूना कॉग्रेसला झोडताना पंतप्रधानाची प्रतिष्ठा कमी होऊ नये, याचे तारतम्य त्यांनी कायम राखले होते. अनेकदा त्यासाठी शिवसेनेला कॉग्रेसची बटीकही म्हटले गेले. पण म्हणून कॉग्रेसच्या समर्थनासाठी साहेब कधी उभे राहिले नव्हते. फ़ार कशाला, पडता काळ असताना आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ आली, तेव्हा सत्तेच्या स्पर्धेत जाण्यापेक्षा साहेबांनी निवडणूका लढवायचे सोडून दोन विधानपरिषद आमदारांच्या बदल्यात कॉग्रेसला पाठींबा देऊन टाकला. पण पुढल्या पाचसहा वर्षात शिवसेना अशी ठामपणे उभी केली, की मुंबईच्या महापालिकेची सत्ता स्वबळावर हस्तगत केली होती. अशा कुठल्याही प्रतिकुल कालखंडात त्यांनी रडवेले होऊन सत्तेसाठी अगतिक ठरणारे पाऊल उचलले नव्हते. पण त्याचवेळी इंदिराजी आणि कॉग्रेस यांच्यातला फ़रक राखण्याचे भान राखले होते. आजच्या ‘सामना’ किंवा सेना नेत्यांना त्याची आठवण तरी आहे काय? आपणच पाठींबा दिलेला देशाचा पंतप्रधान आणि मित्रासारखा वागत नसलेला भाजपा, यामध्ये खुप मोठा फ़रक असतो. तसाच मोदी आणि खडसे-शेलार वा अमित शहा यातही फ़रक असतो.

शपथविधीला आलेले नवाज शरीफ़ यांनी मोदींच्या आईचे कौतुक केल्यावर त्यांच्या मातोश्रींना मोदींनी शाल भेट पाठवणे. शरीफ़नी परतभेट म्हणून मोदींच्या आईला साडी पाठवणे, हा ‘सामना’च्या टिकेचा विषय होऊ शकतो का? अशा भेटीतून कुठलीही परराष्ट्रनिती केली जात नसते. म्हणूनच तो टिकेचा विषयही होऊ शकत नाही. पण त्यातून माणसे दुखावली जातात आणि शत्रू मात्र निर्माण केले जातात. आताही मोदींच्या दौर्‍याची जगभर चर्चा चालू असताना आणि विरोधकांनाही मोदींच्या कर्तबगारीला दाद द्यावी लागत असताना, ‘सामना’तून होणारी शेरेबाजी पोरकटपणाचे मासलेवाईक उदाहरण आहे. राज्यातील भाजपावरील टिका किंवा राज्यातील भाजपाच्या धोरण भूमिकांवर आघात करण्यासाठी पंतप्रधानावर झाडलेल्या दुगाण्या, यातून काय साधले जाते? मोदी पंतप्रधान म्हणून लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या यशावर दुगाण्या झाडून सेनेला लाभ होऊ शकत नाही. भाजपावर कितीही टिका केल्याने फ़रक पडणार नाही. पण यशस्वी पंतप्रधानावर पक्षिय विरोधासाठी टिका करून सेनेच्या वाट्याला तोटाच येऊ शकतो. इंदिराजींचे कौतुक व त्यांच्या यशस्वी कर्तबगारीचे गुणगान करणार्‍या बाळासाहेबांनी, म्हणूनच महाराष्ट्रात आपली बिगरकॉग्रेस पक्ष अशी प्रतिमा संपादन केली. त्यातून शिवसेना हा राज्यव्यापी बिगरकॉग्रेसी पक्ष म्हणून पुढे आला. भाजपाला म्हणूनच सेनेबरोबर युती करावी लागली होती. भाजपाच्या नावाने शंख करून वा अन्य कुणाच्या नावाने बोटे मोडून शिवसेना इथपर्यंत पोहोचली नाही. त्यातून पक्षाच्या भूमिकेपलिकडे बाळासाहेबांच्या मताला प्रतिष्ठा मिळत गेली. त्यांच्या मताला, विधानाला बळ मिळत गेले. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून त्यांचा दबदबा निर्माण झाला नव्हता. हे आजच्या शिवसेना नेत्यांनी व बरळल्यागत बोलणार्‍यांनी लक्षात घेतले, तरी शिवसेनेला आपल्या पायावर उभे राहून एकहाही सत्ता मिळवता येईल. पण असाच पोरकटपणा चालू राहिला, तर मनसे-खडसे व्हायलाही वेळ लागणार नाही.

11 comments:

  1. I am shivsainik but you are correct bhau. shivsena want to focus only for good job not for politics...we are going to cut our legs our self...& that is funny

    ReplyDelete
  2. Amachya sahebanchi sena var vaar karit karit tumache ajjkalache modi bhakti puran anni jhukalele mapp disatee.. Bjp anni tyachya mastavalelya pilavalhiche matra as usual nakalhat pan agadi intentionally samarthanach kele mang te shelar mama, kallu mama or dhurt fadanavis asso... Senala jya padhatine atalya gathitun khijavale jate mang te kase te sangayachi garaj nahi mang karave kay he tari bahumatat aalelya bhaktani sangavee.. Satta sodavi or baherun pathimbaa he agadi khare .. Hi chukach hotey sadhya pan bjp anni shaha modi or to shelar hyanchya dhurtpanache samarthan kasach hou shakat nahi ... Je ithe jhalya sarakhe vatate... Jamal tar publish kara vinanti

    ReplyDelete
  3. सप्रेम नमस्कार
    माझ्या विचारांना बरोबर शब्दांकन केले आहे. मा. मोदीं साहेबानी पण माजी पंतप्रधानवर टीका केली पण जेव्हा राहुल गांधींनी कागद फाडून अपमानास्पद वागणूक दिली तेव्हा मोदींनी पंत प्रधानाचा पाठिंबा दिला होता...
    आताच्या नेतृत्वाला वाटते अशी नळावरची भांडणे केली म्हणजे आपल्याला सगळे भारी समजतील

    ReplyDelete
  4. Atishay yogya vishleshan

    ReplyDelete
  5. दोन राजकीय पक्षांमधील कलगीतुरा ह्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने या घटनांकडे बघायला पाहिजे. केंद्रीय पक्ष विरुध्द प्रादेशिक पक्ष अशी ही लढाई आहे. जेंव्हा केंद्रीय पक्ष प्रादेशीक पक्षाचे अस्तित्व संपवायचा प्रयत्न करतो तेंव्हा प्रादेशिक पक्ष आपले सर्वस्व पणाला लावून अस्तीत्वाची लढाई लढतो.
    लोकशाहीच्या भल्यासाठी प्रादेशिक पक्ष जिंकणे आवश्यक आहे. सत्तेचे केंद्रीकरण हुकुमशहा निर्माण करते. आणि हुकुमशहा कधीच चांगला असू शकत नाही.
    प्रादेशिक पक्ष नको असतील तर भाजपा मध्य नरेंद्र मोदी यांना आव्हान देईल असे नेतृत्व उभे राहिले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ नी प्रादेशीक पक्षांची वाढ राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षा मुळे होतो हे अनेक लेखातून सांगितले आहे.
      त्याचबरोबर प्रादेशीक पक्षांची राज्य सरकारे आल्या मुळे केंद्रात राज्य सभेवर एका पक्षाचे बहुमत होत नाही व लोकसभेत जरी विधेयके पास झाली तरी राज्य सभेतील अडवणुकी मुळे त्याला कायदेशीर स्वरुप येत नाही.
      आता देश याच परिस्थितीतुन जात आहे. व भाजपचे सरकार कोणतेही Landmark decicion घेऊ शकत नाही.
      भारतीय लोकशाही चा ढाचा बघीतला तर लोकांनी निवडून दिलेल्या प्रादेशीक राज्य सरकारने हा मोठा गंभीर स॔विधानीक प्रश्न निर्माण केला आहे.
      अशा प्रादेशीक प्रेमा मुळे जयललिता सारख्या भ्रष्टाचारी नेतृत्वाला लोकांनी निवडून दिले. व केंद्रात राष्ट्रीय पक्षा बरोबर सहभागा साठी मोठी रक्कम मगतात /सत्तत सहभाग मागणारे भ्रष्टाचार करुन राष्ट्रीय पक्षाला बदनाम करण्यासाठी व मिडियाला हातभार लावतात व राष्ट्रीय पक्ष जर भ्रष्टाचारी असेल तर अशा भ्रष्टाचाराचा दोघे वाटणी करतात. (2G 3G घोटाळे दुरातो ट्रेन याची उदाहरणे आहेत ).
      त्याचप्राणे अटलबिहारी वाजपेयी यांची ममता समता जयललिता यांनी उडवलेली त्रेधा आठवा.
      मोदी सारखे नेतृत्व पण लोकांना या (प्रादेशिक पक्षांच्या सरकारला मी केंद्रात सरकार मध्ये असे पर्यंत निवडुन देऊ नका ) विषयी आवाहन करताना दिसत नाही. ह्याचे वैष्णव्य आहे.
      काँग्रेस पक्षाने केलेल्या पापाचे/दुर्लक्षाचे परिणाम भारताच्या एकसंधते वर होत आहेत.
      अमुल शेटे पनवेल

      Delete
    2. प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक अस्मितेला त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारुनच भारताच्या कुठल्याही पंतप्रधानांना काम करावे लागणार आहे. मुंबईत कुठलाही कार्यक्रम असला की अटलजींच्या बाजुला बाळासाहेब बसलेले असायचे. इंदिरा गांधी एखाद्या राज्याला भेट द्यायला गेल्या की त्या राज्यातील लोकांप्रमाणे कपडे घालायच्या.
      भारत देश हा गणतंत्र देश आहे. गणांनी चालवलेल्या राज्यात सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असते. एक व्यक्ति निर्णय घेत नाही तर गणांचा समुह बहुमताने निर्णय घेतो. निर्णय प्रक्रियेत त्यामुळे वेळ लागतो. पण घेतलेला निर्णय बरोबर असायची शक्यता जास्त असते. अटलजींने हे स्वीकारले होते. त्यामुळे विधेयके पास करवून घेताना त्यांना जास्त त्रास झाला नाही.
      मोदीजींनी पण तोच मार्ग स्वीकारला तर बरे होईल.

      Delete
  6. भाऊ दोघांनाही यडलागलय यडलागुन दोघे मेले आता हे मरायला चाललेत

    ReplyDelete
  7. सर,
    अतिशय उद्बोधक आणि जीवन खऱ्या अर्थाने चांगले जगण्यासाठी विपश्यना हा अभ्यास आवश्यक आहे. प्रत्येकाने एकदा आनुभवावा!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  8. शिवसेनेची प्रतिक्रिया ही एका मुद्द्यावरून होती. त्या मुद्दयाकडे कोण लक्ष देत नाहीये. मोदी देश-विदेश फिरत आहेत. अर्थात त्यात परराष्ट्र नीतीचा भाग असेल किंवा स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्नही असू शकतो. नेहरूंप्रमाणे! केरळ मध्ये निवडणुका चालू असताना तिथे एका मंदिरात अपघात होऊन भाविकांचा जीव गेला होता. मोदी त्यावेळेस आवर्जून तेथे गेले. का? तर निवडणुका चालू होत्या म्हणून. लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या वेळेस वाट्टेल ती आश्वसणे दिली. मराठवाड्यात दुष्काळ झाला, मुंबईत आणि अन्य ठिकाणी अनेक प्रश्न उद्भवले तरी मोदी चकार शब्द काढायला तयार नाहीत. सेना म्हणत आहे ती तेथील जनतेची भावना आहे. त्यांनी केलेली टीका दिसते पण मुद्दा गायब होतो. युती वगैरे काही नाही फक्त 'तात्पुरती तडजोड' आहे. आणि पंतप्रधान पदाची प्रतिमा म्हणाल तर दोन वर्षांपूर्वी सोशल मीडिया बघितला असता तर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आहेत की गल्लीतील चेष्टेचा विषय, असे प्रकार चालू होते.
    आममच्यासारख्या तरुणांनी लोकसभेला-विधानसभेला मोदींना मते दिली पण टोकाची निराशा झाली. मग त्याच भावनेतून ही टीका होत आहे. शिवसेना-भाजप युती अन त्यांच्यातील कलगीतुरा हा वेगळा विषय आहे. सेनेच्या सर्वोच्च नेत्यावर साधारण भाजप कार्यकर्ता जर टीका होत असते तर त्यावर अशा प्रतिक्रिया येणं साहजिक आहे.

    ReplyDelete
  9. Bhau you said rightly now shiv sena is absolutely political party. When suprimo use to be very straight forward. You state correct of Thane incident. I recall one of the I incident, kirit samaya used very bad terms about ss n it's suprimo. That day I was in lalbag parrel at late Vithal chavan residence in morning by 9.00 or so within few sainik gathered n we entered inside kirit house. He hide himself. Shiv sena show was going on, After few minutes later suprimo talked to Vithal and called him to Matoshree with all other sainik. Everyone feel proud of it.Then kirit never dare to do something like that till he was control good ss. Now ss n sainik converted into politicians. So that they are not firm on standing. They are using ministries at same time playing roll of opposite critics.

    ReplyDelete