Saturday, January 16, 2016

जगभरचा पुरोगामी जिहाद

Security authorities are growing increasingly concerned by the rising number of sex attacks by gangs of migrants which appear to be spreading across Europe

दोन आठवड्यापुर्वी अवघे जग नववर्षाचे स्वागत करत असताना जर्मनीच्या कलोन शहरात मात्र महिलांचा विनयभंग व शारिरीक शोषणाचा सार्वजनिक सोहळा पार पडला. केवळ जर्मनीच नव्हेतर अनेक युरोपियन देशात असेच अनेक प्रकार घडले. मात्र त्याचा कुठे गाजावाजा झाला नाही. कारण ज्यांनी गाजावाजा करण्याची जबाबदारी उचललेली आहे, त्यांना अशा बातम्या समाजातील सौहार्द बिघडवतील अशी भिती वाटते. हेच लोक कुणी चुकून अरब मुस्लिम देशातून येणार्‍या असंख्य निर्वासितांच्या विरोधात आवाज उठवला, मग गदारोळ करीत असतात. मुस्लिम निर्वासितांना आश्रय देण्याचा आग्रह धरणारी युरोपियन माध्यमे व पत्रकार एकजात सेक्युलर पुरोगामी आहेत. म्हणूनच त्यांनी पुरोगामीत्वाला जागून सामान्य नागरिकाच्या हिताचा बळी देण्याचा पवित्रा घेतला आहे. सहाजिकच कलोन शहरात जे घडले, त्याचा गाजावाजा होऊ शकला नाही. पण तुर्कस्तानच्या किनार्‍याला एका बालकाचा मृतदेह लागला, तेव्हा त्यावरून कल्लोळ माजवण्यात आला होता. पण त्याहीपेक्षा भयंकर घटना युरोपातील महिलांच्या वाट्याला आल्या, त्याविषयी पुरोगामी माध्यमे व राजकारणी मूग गिळुन गप्प आहेत. त्यांच्याच हाती असलेले राजकीय प्रशासनही गप्प आहे. म्हणूनच मग स्वीडनसारख्या देशात अशा लैंगिक गुन्ह्यांची नोंद घेतली गेली नाही. किंवा त्यावर पांघरूण घालण्याचा डाव खेळला गेला. सुदैवाने आता जगभरची जनता सेक्युलर माध्यमांची लाचार राहिलेली नाहीत. त्यामुळे सोशल माध्यमातून ह्या घटनांचा गवगवा झाला आणि अनिच्छा असूनही पुरोगामी प्रशासनाला व माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागते आहे. एकट्या कलोन शहरात रेल्वे स्थानक ते कॅथेड्रल या छोट्या परिसरात हजारहून अधिक अरब मुस्लिम निर्वासितांनी महिलांशी इतके अत्याचार केले, की ६०० हून अधिक महिला तक्रार करायला पुढे आल्या. योगायोग किंवा विरोधाभास बघा. जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मार्केल नववर्षाच्या शुभेच्छा जनतेला देत असताना या घटना घडत होत्या आणि ते भाषण जर्मन भाषेत होत असताना, त्याचा तर्जुमा अरबी अक्षरात दाखवला जात होता.

जर्मनीत अरबी भाषेतले भाषांतर टिव्हीवर कशाला दाखवावे? तर गेल्या वर्षभरात तिथे अकरा लाख अरबी निर्वासितांना आश्रय देण्यात आलेला आहे. त्यांनाही मर्केल यांचे शब्द कळावेत, म्हणून त्याचे भाषांतर दाखवले जात होते. ते किती निर्वासितांनी वाचले ठाऊक नाही. पण त्यातून मर्केल यांनी नवागतांना सभ्यपणे वागायला सांगण्यापेक्षा निर्वासितांच्या विरोधात बोलणार्‍या आपल्याच जर्मन नागरिकांना दम भरण्याचे काम मात्र अगत्याने केले. थोडक्यात जेव्हा नवागत भणंग अरबी निर्वासित जर्मन महिलांवर लैंगिक अत्याचार सार्वजनिक जागी करत होते, तेव्हा त्यांच्या पुरोगामी राष्ट्रप्रमुख आपल्याच पिडीत नागरिक महिलांना दम भरत होत्या. आज हाच जगभरच्या पुरोगामीत्वाचा खरा चेहरा झालेला आहे. जगात सौहार्द टिकले पाहिजे म्हणून अत्याचार अन्यायाशी तडजोड करावी, असा त्याचा मंत्र आहे. पण निदान जर्मनीत त्याविषयीच्या तक्रारी नोंदल्या गेल्या. बाजूला स्वीडनमध्ये तर पोलिसांनी कुठलीही कारवाई अशा निर्वासित गुन्हेगारांवर करायलाच नकार दिला आहे. एकूण लाखो अरबी निर्वासितांना कुठल्याही तपासणीशिवाय आश्रय देऊन युरोप व प्रामुख्याने जर्मनीसारख्या देशांनी कोणते संकट ओढवून घेतले आहे, त्याची चुणूक जर्मनीला बघायला मिळाली आहे. मात्र त्याबद्दल बोलायचे नाही, हा पुरोगामी बाणा आहे. त्याविषयी तक्रार केलीत तर लगेच तुमच्यावर इस्लामफ़ोबियाचा आरोप होतो. म्हणजे तुम्ही मुस्लिमांच्या कुठल्याही गुन्हेगारी वा अत्याचाराच्या विरोघात आवाज उठवला, मग पुरोगामी भाषेत त्याला मुस्लिमद्वेष ठरवले जाते. आपल्याकडे पश्चिम बंगालच्या मालदा शहरात काही वेगळा प्रकार झालेला नाही. जे इथे दंगल स्वरूपात मुस्लिम जमावाने केले, तेच जर्मनीच्या कलोन शहरात मुस्लिम निर्वासितांनी लैंगिक अत्याचाराच्या स्वरूपात केले आहे. पण त्याकडे पोलिस व प्रशासनाने काणाडोळा करणे म्हणजे पुरोगामीत्व असते. हा आता जगभरातला पुरोगामीत्वाचा दंडक बनलेला आहे. ज्याला इथे संघाचा मुस्लिमद्वेष वा अपप्रचार म्हटले जाते, तेच जगभरचे वास्तव आहे.

अर्थात ह्यात काही नवे नाही की अनपेक्षित नाही. सहाआठ महिन्यापुर्वी इराक सिरीयातून युरोपकडे निर्वासितांचा लोंढा जाऊ लागला, तेव्हाच अशा भविष्याचा धोका निदान मी इथे वर्तवला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम अरबी निर्वासितांना युरोपियन देशात सामावून घेणे, म्हणजे तिथल्या ख्रिश्चन समाजाचे संतुलन बिघडवणे आहे. शिवाय मुस्लिम कुठेही गेले तरी आपले धार्मिक अस्मिता घेऊन लढायला उभे रहातात आणि तीच इतरांवर लादण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणुनच छोट्या युरोपियन देशात इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम सामावणे अशक्य आहे आणि त्यातून सामाजिक कलह निर्माण होण्याची भविष्यवाणी मी केलेली होती. किंबहूना इराक सिरीयाच्या नजिक असलेल्या आखाती सुखवस्तू देशात जाण्याऐवजी हा लोंढा युरोपियन देशात जातोय, यामागे काही कारस्थान असल्याची माझी शंका होती. ताज्या घटनांनी त्यालाच दुजोरा दिलेला आहे. दिर्घकाळ शांत व सुखवस्तू असलेल्या युररोपियन समाजात यातून जो भयंकर कलह निर्माण होईल, तो रक्तपातानेच संपवला जाऊ शकेल. आधीच लपूनछपून तिथे पोहोचलेले जिहादी युरोपला ओलीस ठेवत आहेत. तिथे दिर्घकाळ वास्तव्य करूनही पुन्हा जिहाद करायला अरबस्थानात युरोपियन मुस्लिम जातातच. त्यात निर्वासितांना नागरिकत्व देवून भर घातली गेली. आता तर इसिस वा अन्य जिहादी संघटनांना कोणी घातपाती युररोपियन देशात पाठवण्याची गरजच नाही. कसलीही तपासणी न करता लाखो निर्वासितांना त्या देशांनी जवळ घेतले आहे. त्यात कोण जिहादी आहेत वा त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्याचीही तपासणी झालेली नाही. असे असताना अवघ्या सहासात महिन्यात कलोन वा तत्सम युरोपियन शहरात असा धुमाकुळ घातला जात असेल, तर येत्या दोनचार वर्षात युरोपचा सिरीया-इराक वा लिबिया व्हायला काय अडथळा शिल्लक उरणार आहे? युरोपात सौदी वा इसिसचे कायदे नाहीत, की विनाविलंब कोणाची मुंडी उडवून विषय संपू शकतो. मानवाधिकाराच्या जोखडाखाली युरोप झुकलेला दबलेला आहे. मग तिथे निर्वासित काय हलकल्लोळ माजवू शकतील?

गंमत बघा. नववर्षाच्या त्या घटनेला दोन आठवडे उलटून गेले आहेत. पण कुठल्या मुख्य पाश्चात्य माध्यमात त्याचा गवगवा झाला नाही. ‘रशिया टुडे’ वाहिनीने सोशल माध्यमातून बातम्या घेऊन ठळकपणे मांडल्या, म्हणून या घटनांचा गवगवा झाला आहे. भारतात तर अशा बातम्यांचा उल्लेखही माध्यमे करत नाहीत. पुरोगामीत्वाचा एक नियम सरळ असतो. मुस्लिम चुकत नाही वा गुन्हा करत नाही. आणि त्याच्याकडून गुन्हा घडलाच असेल, तर तो मुस्लिमच नाही. किंवा त्याने धर्माचा विपरीत अर्थ लावल्याने मुस्लिम म्हणून त्याच्याकडे बघू नये. ही मानसिकताच जगाला महायुद्धाच्या गर्तेत घेऊन चालली आहे. भारतातच नव्हेतर जगभरच्या तथाकथित पुरोगाम्यांचा हा एकप्रकारचा जिहादच आहे. जिहादी फ़िदायिन काय करतो? आपण मरतोच, पण मरताना इतरांनाही जीवे मारतो. पुरोगाम्यांचे उद्योग किंचित वेगळे नाहीत. असल्या पोरकट मुस्लिम लांगुलचालनाने त्यांचेही अस्तित्व संपणार आहे. अनेक देशात संपलेही आहे. पण दरम्यान त्या देशातील लोकशाही व समाजवादही नष्ट होऊन गेला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात विद्यमान पाकिस्तानी भूमीत बहुतेक जागी पुरोगामी संघटना व चळवळीचा प्रभाव होता. आज त्याचे नावनिशाण पाकिस्तानात बघायला मिळत नाही. कारण स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान कॉग्रेसच्या हिंदू नेतृत्वाला नाकारण्यासाठी डाव्यांनी मुस्लिम लीगचेही समर्थन केलेले होते. इराणमधून शहाची सत्ता संपुष्टात आणण्याची लढाई कम्युनिस्टांनी आरंभली. त्यात खोमेनीला सोबत घेऊन त्यांनी स्वत:चेही नामोनिशाण संपवले. आज युरोपातील पुरोगाम्यांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती चालविली आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाला संपवताना इस्लामच्या आहारी जाऊन अवघ्या युरोपात जिहादला मोकळे रान देण्याचा आटापिटा तिथले पुरोगामी करीत आहेत. परिणामी इराक-सिरीया लिबिया व येमेन अशा पश्चिम आशियात पेटलेला जिहादचा भस्मासूर युरोपला महायुद्धाच्या खाईत घेऊन जाणार आहे. तेव्हा युरोपची अस्मिता जपण्याची लढाई रशियाला तर आशियाची अस्मिता भारत-चीन यांना टिकवावी लागणार आहे. मात्र या पुरोगामी जिहादची किंमत म्हणून करोडो निष्पापांना हकनाक प्राणाचे मोल मोजावे लागणार आहे.

16 comments:

  1. भाऊ, खरोखरच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. हे संकट युरोपपुरते राहणारे नाही. ढोंगी पुरोगामी मानसिकतेचा तुम्ही नेहमीच समाचार घेत आला आहात आणि ते योग्यही आहे. परंतु या गोंधळात सर्व मुस्लिम समाजाला जिहादी असे लेबल लावणे चुकीचे ठरेल. आजही त्यांच्यातील बहुतांश समाज इतर धर्म-समाजातील
    लोक-civiliansप्रमाणे सामान्य आयुष्य जगायला मिळावे, अशा मानसिकतेचे असतील. आधुनिकता-प्रगतीची फळे चाखत सुखेनैव जगावे, असे त्यांनाही वाटत असेल. परंतु सध्या आसपासचे एकूण वातावरण दिवसेंदिवस कट्टरतेकडे झुकत चालले आहे. अशा स्थितीत जिहादी नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा जहरी प्रचार-चिथावणी, इतर समाजातून जिहादींवर केल्या जात असलेल्या कठोर कारवाईची भीती तसेच या कारवाईचा प्रतिशोध यामुळे हा सामान्यांप्रमाणे वागणारा-असणारा मुसलमानही जिहादाकडे झुकण्याची भीती आहे. जगातील सरसकट सर्वच मुसलमान जिहादी झाले तर कुणालाच परवणारे नाही. विवेकबुद्धी शाबूत असलेल्यांना किमान याचे तरी भान ठेवावे लागणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम प्रतिक्रिया.

      Delete

    2. ‘आमचे राज्य प्रेषिताच्या आज्ञेवरून स्थापन झालेले आहे आणि कुराणामध्ये हे लिहीलेले आहे, की ज्या कुठल्याही देशांनी (अल्लाहचे) वर्चस्व स्विकारलेले नाही, ते पापी आहेत. म्हणूनच इस्लाम स्विकारलेल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे, की जिथे कोणी असे पापी सापडतील, त्यांच्या विरोधात युद्ध पुकारावे, त्यांची संपत्ती लुटावी, त्यांना गुलाम करावे आणि असे युद्ध करताना जो मुसलमान मारला जाईल, त्याला जन्नत (म्हणजे स्वर्ग) प्राप्त होईल.’

      थोडक्यात जो कोणी मुस्लिम नाही वा जो समाज-देश मुस्लिम नाही, त्याच्या विरोधात युद्ध पुकारणे, त्याला लुटणे वा गुलाम करणे; हे प्रत्येक मुस्लिमाचे धर्मकर्तव्य आहे. किती सोपे धर्मकर्तव्य आहे ना? कुठल्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला हे कर्तव्य आवडले नाही तरच नवल! 

      शांतता, संहिष्णूता वा उदारमतवादी संवादाने असे प्रश्न सुटत नसतात. तुम्ही भले त्याला पाप समजून आत्मघातकी वागलात, म्हणून त्यांना फ़रक पडत नाही. कारण खंडणी मोजून जी समस्या दोनशे वर्षापुर्वी संपली नाही, ती मेणबत्त्या पेटवून वा हिंसेच्या जागी पुष्पगुच्छ ठेवून सुटत नसते..

      Delete
  2. भाऊ .........नेहमी प्रमाणेच छान माहिती पूर्ण लेख. !! २०११ साली अमेरिकेने लिबिया वर हल्ला करून कर्नल ' गडाफी ' ला ठार मारण्याचा उद्योग केला होता. गडाफीला अमेरिकेच्या या हेतूची पूर्ण कल्पना होती. सद्दाम हुसेन नंतर आपलाच नंबर आहे हे हि तो जाणून होता. त्याच्या काही शेवटच्या मुलाखती मधील ' बी बी सी ' च्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत लक्षात राहण्याजोगी होती. त्या मुलाखती दरम्यान गडाफी म्हणाला होता कि ' सद्दाम ' अथवा तो स्वतः तसेच अखातातील इतर देशांच्या प्रमुखांनी ' जोर जबरदस्तीने का होईना तेथील जनतेला ' हुकुमशाही ' शासन दिलेले आहे. सर्व मुस्लिम देशात ' दमनशाहीच ' चालते हे उघड सत्य आहे. अशा प्रमुख नेत्यांना मारल्यास हि जनता सैर भैर होऊन ' युरोपात ' घुसेल आणि हाहाकार माजवेल. तसेच हे लोकच युरोपात ' मुस्लिम ' धर्माचा प्रसार करतील आणि तेथील राजकारण ताब्यात घेतील. सध्याच्या या सर्व घडामोडी त्या ' भविष्य वाणी ' नुसारच घडत आहेत. ज्या दिवशी सौदी ' कंगाल ' होईल .............आणि त्यानच्याकडून केला जाणारा ' अर्थ पुरवठा ' थांबत जाईल तस तसे हे भोंदू पुरोगामी .........प्रतिगामी होऊ लागतील. .....कारण ह्या सर्व पुरोगामित्वांचा ' प्राण ' ह्या रसदीवर आणि पेट्रो डॉलर वर अवलंबून आहे. शिया आणि सुन्नी या दोघानमध्ये येत्या काही दिवसात ' भडका ' उडाला तर अनेक वेगवान घडामोडी होतील ज्याची सुरुवात सौदी च्या चलनाची किंमत घसरण्यातून होईल.............वाट बघत रहाणे

    ReplyDelete
  3. महत्वाचे निरिक्षण. इतिहासाकडून शिकले नाही तर भूगोल बदलतो. बदलला आणि १९४७ ला झाले देशाचे ३ टुकड़े. तरीही शिकणार नाहीच आम्ही. आम्हाला देवही वाचवू शकत नाही.

    ReplyDelete
  4. भाऊ, या अत्यंत ढोंगी आणि देशविघातक पुरोगाम्याना पुरोगामी म्हणण्यापेक्षा खरे तर 'माध्यम जिहादी' म्हटले पाहिजे. त्यांचे एकमेव काम देशाच्या आणि जगाच्या इस्लामीकरणाला मदत करणे इतकेच आहे. ते खरेच माध्यम जिहादी आहेत. झाडून सगळे - राजकंदील, बरखाबाई, तिस्ताबाई, अरुंधती नक्षत्र, अंधाराचे ७५ वर्षीय 'बाळ' !
    सगळे माध्यम जिहादी !

    ReplyDelete
  5. Bharat pan yach margavar aahe , tyache sheet he aapan M K Gandhi LA dewu shakto

    ReplyDelete
  6. भाऊ आपण अजून वर्तमानातल्या वास्तवच ओळखत नाहि आहोत, तर भविष्य तर दुरची गोष्ट आहे, तुमचे शेवटचे वाक्य माञ भाऊ कित्येक दिवस घर करून राहिल.....पुरोगामी जिहादची किंमत म्हणून करोडो निष्पापांना हकनाक प्राणाचे मोल मोजावे लागणार आहे. वास्तव.......

    ReplyDelete
  7. थोडासा वेगळा विचार आहे...आशा आहे की ह्या ब्लॉगचे विचारी वाचक 'वैचारिक दहशदवादी' नाहीत आणि सुशिक्षित व समंजस आहेत.

    विचार करा:
    - वर उल्लेखलेले 'माध्यम जिहादी'एकाच बाजूला असतील का?
    - आतापर्यंत अमेरिकेने आणि युरोपीय देशांनी केलेला प्रचार, अगदी ह्या जिहादी देशांबाद्दल्चाही, १००% खराच होता का? इराक चेच उदाहरण घ्या.
    - रशियाच्या माध्यमांना जर्मनीच्या नागरिकांचा एव्हडा पुळका का आला आहे?
    - ज्या पाश्चात्य माध्यमांना आपल्या देशात इतका रस असतो ते त्यांच्याच देशातल्या घटनांसंबंधी इतेक उदासीन का आहेत?
    - युरोपातील घटनांमुळे आपण एव्हडे अस्वस्थ का झालोत? आपले पंतप्रधान पठाणकोट हल्ल्याबद्दल एव्हढी समंजस भूमिका का घेतायेत?

    ताप्त्पर्य, आपल्याला खरंच खूप कमी माहिती आहे. अश्या परिस्थितीत आपण एकदम टोकाचे मत बनवणे अयोग्य आणि ते जाहीर प्रदर्शित करणे मूर्खपणाचेच!!!

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब, आपण 'अनामिक' बनुन मतं मांडताय खरे, पण? खरं काय झालय ते माहीत्ये का आपल्याला? कलोन मधे ह्या भाडखाउंनी ३१ डिसेंबरला केलेले किळसवाणे प्रकार पाहिलेत/ ऐकलेत का तुम्ही? ३१डिसेंबर च सेलेब्रेशन जिथे होतं तिथे आम्ही किमान हजार एक जण जमलो होतो, त्यातच ही अरबी डुकरं होती. बायकांच्या अंगाला लगट कर, हात लाव असले फालतु चाळे सुरु होते. ५-७ जणांना पब्लिकनी फटकावल्यावर मग हळुहळु निघुन गेले हे हरामखोर..

      Delete
  8. US / Europe never cared about terrorism in Bharat for a long - long time. Rather, they were interested in making sure that such terrorist acts get intellectual cover fire. Now, Karma strikes back!! :)

    As Atal ji Once said - Dusaraon ke ghar aag lagane ka sapana, sada apane hi ghar me khara hota hai.


    Sometimes, I feel happy about Europe's ongoing downfall...

    ReplyDelete
  9. भविष्य : जनाब कैसा मस्त लेखा लिखतय तुमना मानते मै

    ReplyDelete
  10. Arrested or in protective custody

    Islamabad: Pakistan has reportedly detained Maulana Masood Azhar, leader of Jaish-e-Mohammed, the terror group blamed by India for the deadlyc attack on the Pathankot Air Force base earlier this month, in which seven military personnel were martyred.

    Azhar and four of his top aides have been detained in Islamabad, said local media. Earlier, a statement from the office of Pakistani Prime Minister Nawaz Sharif said, "Several individuals belonging to Jaish-e-Mohammed, have been apprehended.

    Under protective custody! Maybe it's in his best interest..



    and will be soon after released .....?????????????

    meanwhile on internet I am failed to find "protective", all news simply state of his detention/arrest, will see after some time

    protective custody- that means he is going to be safe from any external indian threat

    ReplyDelete
  11. युरोपियन देशांनी ह्या शरणार्थीना शरण देण्या आधी आपल्या देशा चा धर्म स्वीकारण्या ची अट घालायला हवी. तरच तेथे शांतता राहील अन्यथा त्यांचे सुद्धा सिरियन आइसिस होईल.

    ReplyDelete