Monday, September 2, 2019

नेतृत्वगुणांची जोपासना

Image result for modi shah advani atal

गेल्या वर्षभरात भाजपाच्या एकामागून एक ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे मृत्यू झालेले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून सुरूवात झाली आणि कलपरवा माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनापर्यंत अर्धा डझन भाजपा नेते निघून गेलेले आहेत. सहाजिकच पक्षामध्ये अशा अनुभवी व कुशल नेत्यांच्या जागा भरून काढण्यासाठी मोठी पोकळीच निर्माण होत असते. अर्थात नेता नुसता कुठल्या तरी पदावर बसला म्हणून गुणी वा कर्तबगार ठरत नसतो. त्याची बुद्धी, प्रतिभा व कर्तृत्वाचा पक्षाला फ़ायदा मिळयला हवा. तरच त्याला खरोखरचा नेता मानता येईल. अन्यथा नुसत्या पदावर आरुढ झाल्याने कोणी नेता म्हणवून घेऊ शकला, तरी व्यवहारात नेता नसतो. कारण पक्षामुळे व पदामुळे त्याचा व्यक्तीगत लाभ होत असला, तरी पक्षाला वा जनतेला त्याच्यामुळे कुठलाही लाभ मिळालेला नसतो. असे नेते बाजूला झाल्याने पक्षाचे वा समाजाचे कुठलेही नुकसान होत नाही. उलट अनेकदा अशा कुणा निरूपयोगी नेत्याच्या जाण्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळते आणि कदाचित कोणी कर्तबगार नेता पक्षाला मिळून जात असतो. सहाजिकच अशा नेत्यांच्या जाण्याने पोकळी वगैरे काहीही निर्माण होत नाही. पण भाजपाने गेल्या वर्षभरात गमावलेल्या नेत्यांकडे नजर टाकली, तरी ते कुशल व प्रतिभावंत असल्याचे लगेच लक्षात येते आणि पर्यायाने त्यांच्या जाण्यातून पक्षाचे नुकसान झाल्याचेही लक्षात येते. पण त्याचवेळी भाजपाचे काम थांबलेले नाही, किंवा कुठल्याही बाजूने पक्षात पोकळीही निर्माण होताना दिसली वा जाणवलेली नाही. म्हणूनच भाजपातील हे नेतृत्वाचे सातत्य राजकीय अभ्यासाचा विषय आहे. त्यातली विविधताही अभ्यासण्याची गरज आहे. विविध पक्षांनी त्याचा अभ्यास करणे लाभादायी ठरू शकेल.

कुठलीही राजकीय सामाजिक संघटना सातत्यामुळे टिकून असते. त्यात वैचारिक सातत्य असायला हवे, तसेच नेतृत्वाचेही सातत्य अगत्याचे असते. अन्यथा नेतृत्वाच्या गुणवत्तेअभावी अशा जुन्या संघटना व पक्ष रसातळाला जात असतात. भाजपाने गमावलेले नेते आणि आजच्या कॉग्रेसमधील नेत्यांची निरूपयोगिता, म्हणूनच तुलमात्मक तपासून बघायला हवी आहे. एका बाजूला भाजपाने वर्षभरात अनेक नेते गमावले आहेत आणि त्याच्या यशामध्ये वाटचालीत तसूभर फ़रक पडलेला नाही. पण त्याच कालखंडात प्रतिस्पर्धी कॉग्रेस पक्षाला मात्र नेतृत्वाचा दुष्काळ भेडसावतो आहे. आधीची चार वर्षे राहुल गांधी कॉग्रेसचे उपाध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष होण्याची कृपा कधी करतात, म्हणून पक्षाचे नेते अगतिक होऊन प्रतिक्षा करीत होते. मग २०१७ च्या अखेरीस राहुल यांनी मेहरबानी करून पक्षाध्यक्ष पद स्विकारले. दिड वर्ष त्या पदाला जगभर हास्यास्पद करून, गेल्या मे महिन्यात त्यांनी अध्यक्षपदाचा राजिनामाही दिला. पण नंतर त्या पदासाठी कोणी नेता पुढे व्हायलाही तयार नव्हता. कॉग्रेसला अडीच महिने अध्यक्षाविना कामकाज चालवावे लागत होते. राहुलची जागा कोणी घ्यायची, हा पे़च सव्वाशे वर्षे जुन्या राजकीय् पक्षाला सोडवता येत नव्हता, की पक्षातला कोणी नेता त्यासाठी पुढाकार घेऊन उभा रहायला धजावला नाही. कारण आपल्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करायचे किंवा पक्षाला उर्जितावस्थेला आणण्याचे गुण असल्याची खात्री त्यापैकी एकाही नेत्यापाशी नाही. कॉग्रेसमध्ये कोणीही नेतृत्व करू शकणारा उरलेला नाही, इतकेच मागल्या तीन महिन्यात सिद्ध झाले वा सिद्ध करण्यात आले. याला पोकळी म्हणतात. नेतृत्वातले सातत्य आज कॉग्रेसपाशी उरलेले नाही. म्हणूनच वैचारिक दिवाखखोरीच्या सोबतच नेतृत्वाचाही बोजवारा उडालेला आहे. मग भाजपाला ती समस्या कशाला वाटत नाही?

त्याचे उत्तर नेतृत्वगुण विकासाच्या मोहिमेला द्यावे लागेल. अर्धी चड्डी वा अंधभक्त, मतिमंद असली शेलकी विशेषणे संघाला किंवा भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्याला लावणे सोपे असते. पण त्यांच्यापाशी आढळून येणार्‍या पक्ष वा विचारनिष्ठांची किंमत कोणाला कळली आहे? बालपणापासून संघाच्या शिस्तीत वाढणे व एका ठराविक विचाराधारेचे पाईक होण्यातून नेतृत्व गुणांचा विकास साधण्याची मोहिम अखंड चालू आहे. त्यामागे कही दशकांतील संघ नेतृत्वाची मेहनत कारणी लागलेली आहे. बालपणापासून संघात आलेल्या मुलांचे गुण ओळखून यांच्या व्यक्तीमत्व विकासाचे बाळकडू पाजले जाते. भविष्यात त्यांच्यावर योग्यतेनुसार जबाबदारी सोपवली जाते, जे राजकीय जीवनात जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी संधी असतात. तशाच सांस्कृतिक संघटनात्मक कामाच्याही संधी असतात. अशा विविधतेतून त्यांच्या आवडीला व गुणांनाही संधी मिळून जाते आणि त्यातून नेतृत्वाचा विकास होत असतो. काही तरूण संघाच्या माध्यमातून भाजपात राजकारण करायला आले, तर काही अभाविप या संघप्रणित विद्यार्थी संघटनेतून राजकीय जीवनामध्ये आले. पण दोन्हीकडला नेतृत्वाचा कस वेगळा आढळणार नाही. आव्हान समोर आल्यावर डगमगून न जाता समस्येवर मात करण्याची त्यांच्यातली क्षमता, योग्य वयात विकसित करून घेतली गेल्याचा तो परिपाक आहे. मग संघातून प्रचारक म्हणून पुढे आलेले मोदी असोत किंवा अभाविपमधून आलेले अरूण जेटली असोत. आपल्यावर सोपवल्या गेलेल्या जबाबदार्‍या पार पाडताना त्यांनी भविष्यातले नेतृत्वही विकसित करण्याची कामगिरी पार पाडलेली आहे. म्हणून तर भाजपाचा प्रत्येक नेता संघातून आलेला नसला तरी तितकाच निष्ठावान व जबाबदार्‍या पेलणारा आढळतो. कॉग्रेस तिथेच नामशेष होऊन जाण्याची पाळी आलेली आहे.

आज मोदींच्या मंत्रीमंडळात सहभागी असलेले अनेकजण किंवा भाजपाच्या संघटनात्मक कामात जबाबदार्‍या पेललेले अनेक कार्यकर्ते अरूण जेटली, लालकृष्ण अडवाणी किंवा सुषमा स्वराज यांच्या पठडीत तयार झालेले दिसतील. अनेकजण त्याहीपुर्वीच्या नेत्यांच्या छत्रछायेत संस्कारीत झालेले आढळतील. निवडणूकांच्या पुर्वीच सुषमाजींनी आपल्याला उमेदवारी नको असल्याचे पक्षाला कळवले होते. निकाल लागताच जेटलींनी प्रकृतीचे कारण देऊन सत्तेत सहभागी व्हायला नकार दिलेला होता. कॉग्रेसमध्ये आज असे किती आघाडीचे नेते आढळतील? पण त्याच सुषमाजी वा जेटलींनी मधल्या काही वर्षात जी नव्या तरूण नेतृत्वाची पिढी उभी केली, तिला समर्थपणे पक्ष व सरकारी जबाबदार्‍या पेलायची क्षमता आलेली आहे. जेटलींच्या जागी आलेल्या निर्मला सीतारामन किंवा धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांना कोणी प्रशिक्षित केले आहे? भाजपातले अनेक प्रवक्ते व नेते आपला गुरू म्हणून जेटलींचा कालपरवा अगत्याने उल्लेख करीत होते. त्यांना संसदीय राजकारणात वा चर्चेत मुद्देसुद बोलण्याचे धडे कोणी दिले? तसे करताना चेलेच आपल्याला शिरजोर होऊन जातील, अशी भिती जेटलींना वाटली नाही. सीतरामन तर त्यांच्या खुर्चीत बसायलाही वचकल्या होत्या. नेतृत्वाचा असा संमृद्ध वारसा भाजपातल्या अनेक नेत्यांनी निर्माण करून ठेवला आहे. आज आपण पक्षाची जबाबदारी उचलली आहे. पण आपल्या नंतरही कोणीतरी तितकीच समर्थपणे पक्षाच्या कामाची धुरा संभाळली पाहिजे, याचे भान असलेले नेतृत्वच संघटनेला मजबूत करीत असते. नेतृत्वाच्या पुढल्या पिढ्या घडवित असते. ह्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले, म्हणून मागल्या तीन दशकात भाजपा शिरजोर व प्रभावशाली पक्ष होत गेला. तर त्याच्याच अभावी कॉग्रेससहीत अनेक लहानमोठे अन्य पक्ष नामशेष होत गेलेले आहेत.

पाऊणशे वयमान उलटून गेल्यावरही शरद पवारांना महाराष्ट्रात आपला वारस उभा करता आलेला नाही, की लालूंना आपल्या कुटुंबाच्या पलिकडे बघता आले नाही. म्हणून त्या पक्षांना देशोधडीला लागण्याची नामुष्की आलेली आहे. गुणी नेतृत्व उभारणे व त्याच्यातल्या गुणांचा विकास करण्याला पक्ष संघटनेत प्राधान्य असायला हवे. तरच नेतृत्वाचे सातत्य विकसित होते आणि कुठलाही मोठा पुढारी अकस्मात निवर्तला वा बाजूला झाला, म्हणून पक्षाचा वैचारिक विनाश होऊ शकत नाही. समाजवादी, कम्युनिस्ट, कॉग्रेस किंवा इतरही अनेक पक्ष आज डबघाईला आलेले दिसतात्. कारण तिथे सामुहीक नेतृत्वाचा र्‍हास झालेला आहे किंवा र्‍हास केलेला आहे. किंबहुना नेतृत्वगुणांना प्रतिबंध घालण्यातून अशा पक्ष व संघटना एकखांबी तंबू बनून गेल्या, मग तो खांब उलथून पडताच त्या पक्षांचा र्‍हास अपरिहार्य होऊन गेला आहे. परिवारवाद किंवा संघटनांना कौटुंबिक मालमत्ता बनवण्यातून त्यांच्याच पक्षातील होतकरू नेतृत्वाची आबाळ करण्यात आली आणि वैचारिक बाजू म्हणजे पोपटपंची होऊन बसली. हे फ़क्त कॉग्रेसपुरते झालेले नाही इतरही पक्षात घडलेले आहे. भाजपातही अनेक नेत्यांच्याच मुलांना नेतृत्वाची संधी मिळते, म्हणून त्याला परिवारवाद ठरवण्याची स्पर्धा चालते. पण नेत्याच्या जागी वारसाला संधी म्हणजेच कुटुंबवाद नसतो. पक्षाची वा संघटनेची अधिकारसुत्रे वारसा हक्काने होण्याला परिवारवाद म्हणतात. कारण नेत्याची कसोटी संघटनेला विजयी करण्यातून लागत असते. पक्षाला पराभव किंवा र्‍हासाकडे घेऊन जाणार्‍या नेत्याला आव्हान् देऊन उभा ठाकणार्‍याला वारस म्हणतात. तो भाजपामध्ये आहे आणि त्यातले सातत्य संघामुळेच त्यात टिकलेले आहे. कोणाला हे सत्य आवडो किंवा नावडो. परिणाम व प्रभाव पाडता येत नसलेली वैचारिक भूमिका वा विचारधारा वांझोटी असते. हे ज्यांना उमजते, त्यांना पक्ष वा संघटना चालवता येतात व टिकवून ठेवता येतात.

18 comments:

  1. छान लेख...
    पण हे शिकायला विद्यार्थी उपलब्ध नाहीत...
    एक समांतर उदाहरण, उद्योग विश्वात देखील आहे...टाटा समूह

    ReplyDelete
  2. भाऊ 2004 च्या पराभवानंतर संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री. सुदर्शनजी यांनी वाजपेयी अडवाणी आणि जोशी यांना बाजूला होऊन नवीन पिढीच्या हातात पक्षाची सूत्रे देण्याचा सल्ला दिला होता,त्यावरून मीडिया मध्ये खूप गदारोळ झाला होता. वाजपेयी प्रकृतीच्या कारणाने बाजूला झाले त्याच वेळी अडवाणी आणि जोशी बाजूला झाले असते तर पक्ष 7 ते 8 वर्षे अलीकडे नवीन पिढीच्या हातात गेला असता आणि 2014 चा इतिहास कदाचित 2009 मधे घडला असता परंतु अडवाणी यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने 2013 च्या गोव्यातील बैठकीत मोदींच्या हातात पक्षाची सूत्रे देण्याविरोधात बंड केले परंतु संघ नेतृत्वाने अतिशय ठाम राहून अडवाणी आणि जोशींच्या हातातून पक्ष काढून घेऊन गडकरी राजनाथसिंह असे नेतृत्व दिल्लीत आणले,भाजपने जाणीवपूर्वक नवीन फळी पुढे आणल्याने भाजप आजच्या स्थितीला आला आहे, अगदी आजच्या घडीला अमित शहांनतर नड्डा यांच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यात आली आहेत

    ReplyDelete
  3. एकदम बरोबर, पूर्ण सहमत

    ReplyDelete
  4. इथ पर्यंत ठीक आहे पण सध्या अन्य पक्षातून नेत्यांची जी घाऊक आवक चालू आहे ते तर आपापल्या विचार धारा इतक्या झटकन स्वीच ओव्हर करू शकतील हे संभवनीय वाटत नाही. अश्यावेळी मूळ पक्षाचीच विचारधारा बदलण्याचे किती चान्सेस असतील ?

    ReplyDelete
  5. चांगले विवेचन. पण संघ भाजप मध्ये, अर्थ समाज प्रचार वैज्ञानिक प्रोफेशनल वाढले पाहिजेत

    ReplyDelete
  6. श्री भाऊ हे RSS च खुप मोठं यश आहे, पण हयची दुसरी बाजू अशी की आपल्या देशात second line develop करायची पद्धत नाही, मी असे कित्येक व्यवसाय पाहिलेत की जे त्या मुख्य माणसांच्या पश्चात रसातळाला जातात

    ReplyDelete
  7. रियासतकार सरदेसाई म्हणतात नेतृत्वाच्या अभावी पेशवाई बुडाली.

    ReplyDelete
  8. काँग्रेस पक्षात गांधी आडनाव असलेले जन्मतः नेते बनतात. आणि पक्षाचे मातेरे करतात.

    ReplyDelete
  9. Adarniya Bhau sadhyachya Arthik Mandi var ekhada lekh lihava

    ReplyDelete
  10. तेजस्वी सूर्या, लदाख चे खासदार, अनुराग ठाकूर,स्मृती इराणी, आणि अनके तरूण चेहरे भाजपा कडे आहे, आणि त्यांचे नेतृत्व त्यांनी सिद्ध केले आहे, हे संघ, व भाजपा नेतृत्व यांच्या मुळेच आहे

    ReplyDelete
  11. भाऊ, तुम्ही योग्य विषयावर लेखन केलेत. सर्व देशांच्या आरमार+नाविक दल+हवाई दल यांच्या प्रमुखाचे पद कधीही रिकामे रहात नाही. त्या पदांवर पुढची व्यक्ती नेमली जाते. हीच परंपरा रा. स्व. संघात, भाजपमध्ये आणि यांच्याशी नेहेमीच विरुद्ध असलेले साम्यवादी पक्ष येथे पाळली जाते. भाजप आणि साम्यवादी पक्षात पक्षाध्यक्ष काही कालावधीपुरता असतो. वंशवादी पक्षात वंशपरंपरेने पक्षप्रमुख नेमले जातात. काँग्रेस पक्ष वंशवादाच्या विरुद्ध आहे असे दाखवतो आणि वंशवादी परंपरा पाळतो. त्याचे परिणाम आपण आता बघतच आहोत.

    ReplyDelete
  12. भाऊ, भाजपा-शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्प्वर व त्ययाच्या परिणामावर एक लेख होऊन जाऊ देत.

    ReplyDelete
  13. Ani Devendra Fadnavis na visarta kaama naye. Tynachyaat Bhavishyaacha PM bannayachi kshamta ahe. Maharashtra saarkhya raajyacha salag 5 varsha netrutva karna soppa nahi. Itnki sankata yeun hi tyanna dheerane samore jaaoun rajyashakat chalavtaayet.
    Sudhir Mungantiwar sudhha.

    ReplyDelete
  14. After very long time I am reading your mind-blowing articles.

    ReplyDelete

  15. I enjoyed reading your blog its quite interesting! Seeking for dispensaries worry no more!
    Wonderful Blog! satta king
    Thank for sharing but may also work in your like commercially.
    Ask your dealer for a aggressive offer for a provided service that includes web site style, growth and hosting
    satta king Up
    satta king Up

    ReplyDelete
  16. भाऊ, तुमचे लेख वाचनीय व तर्कसंगत असतात. मी माझ्या काही लिबरांडू व ढोंगी मित्रांमध्ये शेअर करत असतो. तुमचे लिखाण असच सुरू राहू द्या. ही एक समाजसेवा आहे.

    ReplyDelete