Saturday, September 28, 2019

पुतण्याचा डाव, काकांना पेच


Image result for pawar ED

शिखर बॅन्क घोटाळा प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यात शरद पवार यांचे नाव आल्यानंतर खळबळ माजली होती. कारण सहा दशकाच्या सार्वजनिक जीवनात पवार यांच्यावर अनेक आरोप झाले, तरी कुठली तक्रार वा गुन्हा त्यांच्या विरोधात कधी दाखल झाला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर हायकोर्टाच्या आदेशान्वये आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे पवार विचलित झालेले असतील, तर नवल नव्हते. कारण त्यातले गांभिर्य राजकीय विश्लेषकांना कळत नसले तरी पवारांना नेमके कळत होते. हा विषय राजकारण खेळण्याचा नाही, तर त्यात आपले शेपूट अडकलेले आहे, हे त्यांना पक्के जाणवलेले आहे. कारण राजकीय सुडबुद्धीने आजवर कोणीही पवारांना कशातही गुंतवू शकलेला नाही. तशी नुसती शक्यता असली तरी पवार पुर्वकाळजी घेऊन त्यातून आपली सहीसलामत सुटका करून घेत आलेले आहेत. सत्तेत कुठलाही पक्ष असो, किंवा पवार विरोधी पक्षात बसलेले असोत, त्यांनी कधी असे बालंट आपल्यावर येऊ दिलेले नाही. म्हणूनच हायकोर्टाचा आदेश व नंतर तडकाफ़डकी दाखल झालेल्या गुन्ह्यातले गांभिर्य, पवारांना पुर्णपणे ठाऊक आहे. मात्र अशा प्रसंगी तोंड लपवायलाही जागा शिल्लक नसल्याने राजकीय आतषबाजी करून तात्पुरती त्यातून सुटका करून घेण्याला प्राधान्य होते. कारण सर्वांना मॅनेज करण्यात तरबेज असलेल्या पवारांना कोर्टाला गुंडाळणे शक्य नव्हते. सहाजिकच चिदंबरम वा शिवकुमार यांच्याप्रमाणेच या घटनेची राजकीय भांडवल करण्यापासून त्यांनाही पर्याय नव्हता. मात्र त्यासाठी त्यांनी निवडलेली वेळ व पवित्रा चक्रावून सोडणारा होता. कारण शुक्रवारी पवारांनी केलेला राजकीय तमाशा वरकरणी कितीही यशस्वी झालेला दिसला, तरी तो मास्टरस्ट्रोक अजिबात नव्हता. तो घाईगर्दीने कौटुंबिक समस्येवर शोधलेला तोडगा होता आणि काही तासातच अजितदादांनी त्यावर पुरता बोळा फ़िरवून टाकला.

शुक्रवारी साधारण दुपारी चारच्या सुमारास पवारांनी विजयी मुद्रेने माध्यमांच्या कॅमेरासमोर येऊन आपण इडीला क्षमा केल्याच्या थाटात निवेदन दिले आणि ते पुण्याच्या अतिवृष्टी पिडीतांना भेटायला निघून गेले. समोरचा देखावा बघून हुरळून जाणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधी व भुरट्या पत्रकार शहाण्यांना तितके पुरेसे होते. त्यांनी पवारांचा तो मास्टरस्ट्रोक जाहिर करून क्रिकेटलाही लाजवणारे समालोचन आरंभले होते. पण नियतीने पुण्याच्या वाटेवर खंडाळ्याच्या जागी कात्रजचा घाट आणून ठेवल्याचा कोणाला पत्ता होता? पवार विजयीवीर म्हणून पुण्याला रवाना झाल्यानंतर अकस्मात एक बातमी अशी आली, की खंडाळा घाटाऐवजी आपला विजयवीर कात्रजच्या घाटात थेट कसा पोहोचला, तेच माध्यमवीरांना समजेना. कारण पवार पुण्याकडे रवाना झाले आणि तासाभरात अजितदादांनी आमदारकीचा राजिनामा दिल्याची बातमी झळकली. विधानसभेची मुदत संपत आली असताना आणि पक्षांतर करायचे नसेल, तर राजिनामा देऊन अजितदादांनी साधले काय? याचे उत्तर कुठल्याही विश्लेषकाकडे नव्हते आणि खुद्द अजितदादा मोबाईलवरही ‘नॉट रिचेबल’ झालेले होते. पत्रकारांना सोडाच. खुद्द काकांनाही पुतण्याचा फ़ोन लागत नव्हता आणि दादा कुठे आहेत? हीच रात्री उशिरापर्यंतची सर्वात मोठी हेडलाईन होऊन गेली. थोडक्यात शनिवारच्या वर्तमानपत्रांची शरद पवारांना आंदण मिळालेली हेडलाईन अजितदादांनी अलगद हिरावून घेतली होती. कात्रजसारखा खंडाळ्याचा घाट चढून शरद पवार पुण्याला पुरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले नाहीत, इतक्यात इडी सोडून त्यांना पुतण्याचा पत्ता सांगण्याची नामुष्की आली. इडीचे पुराण कुठल्या कुठे गायब झाले आणि अजितदादा नावाचे नवे पुराण माध्यमे आळवू लागली. दोनतीन दिवस अनेक सराव करून पवारांनी घडवलेल्या नाट्यावर अजितदादांनी आपला निरर्थक राजिनामा बोळ्यासारखा फ़िरवला आणि पुतण्याचा डाव काकांसाठी पेच होऊन गेला.

पहिली गोष्ट म्हणजे दादांचा राजिनामा व्यवहारत: किंवा राजकीय कारणास्तव निरर्थक आहे. कारण विधानसभेची मुदत जवळपास संपलेली आहे आणि पक्षांतर करायचे नसेल, तर आमदारकीचा राजिनामा देण्याचे काहीही कारण नाही. अगदी लोकसभा लढवायची म्हणूनही राजिनामा देण्याचे कारण नाही. मग त्याला इतके महत्व कशाला आहे? तर असा राजिनामा काकांना अंधारात ठेवून दिला, म्हणजेच काहीतरी गफ़लत आहे, इतकेच अजितदादांना त्यातून दाखवायचे होते. हत्तीचे ‘सुळे’ दिसतात, पण चावायचे दात दिसत नाहीत, तशीच ही कहाणी नाही का? अन्यथा कशावरही ज्ञानप्रबोधन करणार्‍या सुप्रियाताई इडीच्या गुन्ह्याविषयी मौन धारण करून आहेत आणि अजितदादा गायब झाल्यापासूनही त्यांनी कुठे अवाक्षर उच्चारलेले नाही. दादा गायब आणि ताईंचे मौन, यात कुठेतरी मोठी गफ़लत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून पवार कुटुंबातील धुसफ़ुस पोतडीतून साप डोकवावा, तशी जाणवते आहे. आताही अशी माहिती आहे, की रोहित या नातवाला विधानसभेत आणून पवार राजकीय वारसाच त्याच्याकडे सोपवण्याच्या विचारात आहेत. म्हणून दुसरा नातू पार्थ व त्याचे पिताश्री अजितदादा अस्वस्थ होते. यातून ताई्-दादा यांच्यातही खटके उडाल्याच्या अफ़वा होत्या. बारामतीतून पार्थला उमेदवारी देण्यावरूनही वाद झाल्या़चे म्हटले जाते. हा विषय कौटुंबिक बॉम्बस्फ़ोट होण्याचाही धोका निर्माण झाल्याची कुजबुज होती. तो स्फ़ोट रोखण्यासाठीच कुटुंबप्रमुखाने इडीचे नाट्य घडवून घरगुती नाटकावर पडदा पाडायचा प्रयत्न केला होता काय? नसेल तर त्या नाट्याचा राजकीय लाभ शून्य होता. फ़ार कशाला इडीविरोधात रंगलेल्या नाट्याने पवारांनी उत्तम संधी गमावलेली आहे. कारण मतदानाला आणखी २५ दिवस असून आता त्या नाट्यातली हवा गेलेली आहे. इडीही त्यांना आणखी महिनाभर नोटिस समन्सही पाठवणार नाही. म्हणजेच इडीने दाखल केलेला गुन्हा हा हुकूमाचा राजकीय पत्ता पवारांनी अवेळी खेळून वाया घालवला आहे. पण का?

इडीच्या कार्यालयात जाण्याचे आगावू नाटक रंगवून आपण हुकूमाचा पत्ता अकारण अवेळी वाया घालवतोय, हे पवारांना नक्की कळू शकते. तरीही त्यांनी तो पत्ता टाकलाच. कारण घरातली धुसफ़ुस चव्हाट्यावर येण्याची चिंता अधिक मोठी होती. सभापती बागडे म्हणतात, दोन दिवसापुर्वीच अजितदादांनी ‘कुठे आहात’ अशी विचारणा करणारा फ़ोन केला होता. म्हणजेच त्यांनी तो फ़ोन केला, त्याच दिवशी पवारांनी इडीच्या कार्यालयात २७ सप्टेंबरला जाण्याची घोषणा केल्याचे लक्षात येईल. तो राजिनामा किंवा तत्सम काही स्फ़ोटक कृती करण्यापासून अजितदादांना रोखण्यासाठी पवारांनी अवेळी इडीचे खुसपट काढून हे नाट्य रंगवलेले नाही काय? कारण त्यांच्या नावाचा हायकोर्टाच्या आदेशात उल्लेख येऊन महिना झाला आहे. तेव्हा त्यांनी कुठली प्रतिक्रीया दिलेली नव्हती. त्यावर अजितदादा वगैरे मंडळी सुप्रिम कोर्टात स्थगिती मागायला गेली, तेव्हाही हायकोर्टाच्या आदेशात साहेबांचे नाव होते. सुप्रिम कोर्टाने नकार देऊन हायकोर्टाचा आदेश कायम केला आणि मुंबई पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला. तेव्हाही साहेब शांत होते. पण पोलिसांच्या गुन्ह्याची दखल घेऊन इडीने नुसता एफ़ आय आर दाखल केल्यावर साहेबांना खडबडून जाग आली. तेव्हा घरातला कलह शिगेला पोहोचला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा पार्श्वभूमीवर पुतण्याला वडीलधारा म्हणून रोखता येत नसेल, तर पवार यांनी जाहिर तमाशाने त्यावर पडदा पाडण्याचा खेळ रंगवला. त्यांच्या कुठल्याही मुर्खपणाला मुरब्बी धुर्तपणा ठरवण्यात हयात घालवलेल्यांना त्यात मास्टरस्ट्रोक दिसला तरी नवल नव्हते. पण तासाभरातच अजितदादांनी गुपचुप राजिनामा देऊन काकांचा इडी बार पुरता ‘उडवून’ दिला. त्या बातमीने इडीचा दोन दिवस धुमसणारा बार फ़ुसका ठरला आणि पुरग्रस्तांना बुडायला सोडून काका शनिवारी सकाळीच अजितला शोधायला पुन्हा मुंबईकडे धावले. थोडक्यात पुतण्या असा डाव खेळला, की माध्यमांशी एकही शब्द बोलल्याशिवाय त्याने काकाला पेचात पकडले.

27 comments:

  1. भाऊ तुस्सी ग्रेट हो !

    ReplyDelete
  2. काकाला कात्रज घाटा दाखवून. शरद पवार ची खेळी खेळली.

    ReplyDelete
  3. शरद पवार यांनी जे कात्रज घाट कित्येक लोकांना दाखविले. तोच कात्रज घाट अजित पवारांनी शरद पवार यांना दाखवून दिला.

    ReplyDelete
  4. शरद पवार यांना कात्रज घाट दाखवून दिला.

    ReplyDelete
  5. Dear Bhau,will you please explain why Shivsena is backing Pawar ? Please decipher

    ReplyDelete
  6. Dear Bhau, will you please explain why Shivsena is backing up Mr. Pawar..do they want to form an alliance with NCP if there is disagreement with BJP

    ReplyDelete
    Replies
    1. Most probably , Shivsena wants to earn the good will of NCP workers and get benefit during the elections. There is a direct fight between NCP and SS at many places.

      Delete
  7. भाऊ....आपल्या लेखाची वाट पाहत होतो.
    दादांनी, साहेबांना अनेकदा धोबीपछाड दिलाय...
    EVM मशीन, 370 कलम वगैरे वगैरे...
    पण ह्यावेळी मात्र पार धुळीत घातलयं..

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ,
      पण पवारांनी महा जनादेश यात्रेने तयार केलेल्या वातावरणात बाधा आणण्यासाठी आणि राष्ट्रवादी पुनरुज्जीवनासाठी या धरणात आणि वरणात मुतणारास नीट वापरला असे वाटते का ?

      Delete
  8. दादा पण काकांच्या पठडीत तयार झालेत. पण हे सगळं जनतेच्या हितापेक्षा स्वतःच्या हितासाठी काकानी एवढी वर्षे वापरल्याने त्याची धार निघून गेली आहे. सोईस्करपणे शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र (सहसा छत्रपतींचा उल्लेख नाही पण गरज पडली की छत्रपतीं अँड होतात) शेतकरी, मराठा, दणके देण्यासाठी निरुपद्रवी भट, बामन, पेशवे इत्यादी इत्यादी. पण ही सगळी नाटकं आहेत हे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे, त्यामुळे अवस्था केविलवाणी झाली आहे.

    ReplyDelete
  9. सुंदर! पवारांचे काही सपोर्टर्स इतके जहाल आहेत, आमच्या सोसायटीच्या एका ग्रुपमधे मी 'पवार हे अतिशय बिलंदर माणुस आहे', असं म्हटलं तर माझ्यावर टिकेची झोंब उठवली. 'कोण रे हा पवारांना असे बोलणारा?', 'याला सोसायटीत कोण ओळखत नाही आणि चाल्लाय पवारांवर टीका करायला', 'पवार साहेबांना आता अवाक्षरही काढला, तर याद राखा', तुम्ही पवार साहेबांना बिलंदर म्हटलाच कसे? वगैरे , वगैरे... तुमचे आर्टीकल वाचले तर,तुम्हाला शिव्यांच्या लाखोली वाहतील....

    ReplyDelete
  10. G h bhau tu si ne, bhi bahut great li ho

    ReplyDelete
  11. Bhau shivsenela sharad pawarancha yevdha pulka ka ahe krupaya aple vishleshan amhas kalu dyave hi namra vinanti Thanks

    ReplyDelete
  12. धमाल विश्लेषण केलेत भाऊ!

    ReplyDelete
  13. भाऊ तुम्ही अचुक मागोवा घेता. एकदम सर्व समजते आणि म्हणुनच तुमच्या लिखाणाची वाट पहाणे उत्कंठावर्धक असते.

    ReplyDelete
  14. भाऊ...एकच नंवर...तेल लावलेल्या पैलवानाला चेल्यानेच धोबीपछाड मारला...

    ReplyDelete
  15. चोरावर मोर असें नाट्य आहे. आता साहेबांची खरी कसोटी आहे. कोण कोणाची विकेट घेणार. निवडणुकी पर्यंत सामना रंगतदार होणार!!!

    ReplyDelete
  16. वसुदेव गर्जेSeptember 29, 2019 at 2:18 AM

    राष्ट्रवादीने आक्रमक चढाई करून आत्ता तरी डाव उलटवला आहे. भावनेच्या डावपेचात तांत्रिक बाबींना महत्व नसते, परिणामांना असते. आणि साहेबांनी ईडीवर चाल करून गेल्याचे चित्र निर्माण करून, चौकशीला घाबरत नसल्याचे दाखवून दिले. निवडणुकीत वेळ मिळणार नाही, आत्ता काय ते बोला असा 'सरळ भिडणारा' आक्रमक पवित्रा घेतला, ईडीने तांत्रिक बाबीवर भेट नाकारली.

    संदेश सुस्पष्ट गेला तो असा, की साहेब भेटायला तयार,चौकशीला तयार आहेत, आणि आता ईडी मागे हटतेय.
    आणि ईडी फक्त मुखवटा आहे, खरे तर त्या आडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं राजकारण सुरू आहे असे चित्र उभे राहिले. म्हणजे पर्यायाने लोकांसमोर भाजपा मागे सरकतोय हेच चित्र उभे राहिले.

    दुसरा डाव दादांनी टाकला, अत्यंत निरर्थक वाटणारी राजीनाम्याची कृती, लोकांना अर्थ शोधायला भाग पाडत राहिली. अर्थच सापडेना, कारण अर्थच नव्हता त्यात काही. त्या कृतीने दादांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, वरकरणी गृहकलह आहे असे वाटत असताना त्यांनी पत्रकार परिषदमध्ये अश्रूभरल्या नयनांनी मनातल्या राजकारणाला मोकळी वाट करून दिली. आरोप असलेल्या बँकेच्या प्रकरणातून, तसेच इतर सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपातून दादांनी पक्षाची व कुटुंबाची मान सोडवून उजळ माथ्याने ताठ केली.
    साहेब निडर राजकारणी तर दादा भावना-कुटुंबवत्सल आपल्यासारखा हाडामासाचा मोकळ्या मनाचा सरळ साधा स्पष्टवक्ता नेता.

    दिवसअखेर भाजपाचे नेते तांत्रिक बाबी मांडत राहिले, चंद्रकांत दादा तर म्हणाले की शरद पवार आमचे आदर्श. मुनगंटीवार इतिहासातले दाखले देत होते, पण डाव उलटवला जाईल इतकं काही ठाम प्रतिपादन भाजपाकडून आले नाही. आणि मुळात त्यांचं जागावाटप-युती हे सगळं भिजत घोंगडे असताना , काही नेते इथे हजर नसताना, गाफील भाजपाला राष्ट्रवादीने वेळ साधून कोंडीत पकडून डाव टाकून राजकीय प्रचारात दमदार प्रवेश केला, आणि राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांचा विषय कुठल्या कुठे फेकला गेला. भ्रष्टाचाराचा मुद्दा भिरकावून फेकून दिला. सेना-मनसेने उघड पाठिंबा जाहीर करून भाजपा एकटी उभी केली.

    आत्ता सगळेच आपापल्या कामाला निघून गेले.

    ReplyDelete
    Replies
    1. shivay kutumb kalah chavhatyavar n anta ani kakanna blackmail karun dadanni baramatichi jaga latli ani kakanvar kurghodi keli v nantar var tond karun kakanchya bajune asnyache ani gharat kahi bhandane naslyache natakahi kele.. kasle solid tamashe kartat he rajkarani..
      i think bjp also let it happen purposely because if ncp comes back as strong party then shivsena loses its ground. so shivsena will be back with bjp for alliance.

      Delete
  17. त्यांनी च छेडिले ग माझ्या मनी न होते..

    ReplyDelete
  18. पवार द्वेशाची लागण झालेला भाऊ.....

    ReplyDelete
    Replies
    1. बारामतीच्या करामती भानामतीपेक्षा कमी नाही. अजित राजकारणातून सन्यास घेणार म्हणाला. बघूया काय करतोय? मुंदडांनी उमेदवारी जाहीर होऊनही राजीनामा दिला.

      Delete
  19. i think bjp also let it happen purposely because if ncp comes back as strong party then shivsena loses its ground. so shivsena will be back with bjp for alliance. also bjp may have some more secrets relevant with this case which will come out when there won't be much time in hand for ncp to stike back and it will prove all the drama of ncp.
    also it has polarized the voters already. There are many people who are not supporters of bjp but very strong opponents of ncp. they all are very angry with this drama and are gone strongly with bjp.

    ReplyDelete