Saturday, September 21, 2019

पुलवामा आणि पवार

Image result for pawar

महागळतीमुळे विरोधकांच्या शिडातली हवा निघून गेलीय, हे सगळेच अभ्यासक मान्य करीत आहेत. कारण शनिवारी आयोगाने जी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली, त्यात कुठून कोणाला उभे करावे, हा विरोधकांसाठी गहन प्रश्न होऊन गेला आहे. प्रत्येक उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत स्वपक्षातत कोण  शिल्लक उरलेले असतील, याचीच खात्री आज कॉग्रेस व राष्ट्रवादी अशा पक्षांना राहिलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नेते शरद पवार एकाकी झुंजताना दिसत आहेत. अभी तो मै जवान हू, असेही त्यांनी एक सभेत बोलून दाखवले. पण या निमीत्ताने पवार जे काही मन‘मोकळे’ बोलत सुटलेले आहेत, त्यांचे मनोगत अनेकांना थक्क करून सोडणारे वाटल्यास नवल नाही. मात्र त्यातून वय वाढले म्हणून स्वभाव अजिबात बदलत नसल्याची ग्वाहीच पवारांनी दिलेली आहे. अजून आपंण थकलेलो नाही आणि ‘अनेकांना घरी बसवायचे आहे’ हा निर्धार त्यांनी अशाच एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. त्याकडे किती पत्रकार भाष्यकारांनी गंभीरपणे बघितले आहे? पक्ष उध्वस्त होऊन पडलाय. अस्तित्वाची लढाई समोर उभी आहे आणि खांद्याला खांदा लावून लढायला कोणी उमदा तरूण सहकारी सोबत राहिलेला नाही. पण तरीही पक्षाची नव्याने उभारणी करण्यापेक्षाही पवार कोणाकोणाला घरी बसवायचे आहे, त्याच्याच चिंतेत पडलेले आहेत. जे कोणी साथ सोडून गेले, त्यांना धडा शिकवण्याची जिद्द कायम आहे. पण त्यांना धडा शिकवताना राष्ट्रवादी नावाचा त्यांचा पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेऊन कसा उभा रहाणार आहे? अशा दुर्दैवी परिस्थितीतही टिवल्याबावल्या करून लक्ष वेधून घेण्याची ही धडपड कौतुकाची वाटण्यापेक्षा केविलवाणी भासू लागली आहे. कारण चटपटीत बोलण्यासाठी ताळतंत्र सोडायला पवार म्हणजे धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे नाहीत. इतकेही भान नसावे का? असते, तर पुन्हा पुलवामा सारखी घटना घडली नाही, तर राज्यात सत्तांतर होण्याची भाषा त्यांनी नक्कीच वापरली नसती. अशा बोलण्यातून आपण कोणता संदेश जनतेला देतो वा कुठला संकेत पाठवला जातो, याचेही भान इतक्या अनुभवी नेत्याला नसावे का?

पुलवामा येथील पाक घातपात्यांचा हल्ला ४० भारतीय जवानाना शहीद करून गेला, तेव्हा सरकार झोपले आहे काय, असा सवाल विरोधकांनीच पंतप्रधानांना विचारला होता. पुढे त्या हल्ल्याला चोख उत्तर म्हणून भारतीय लष्कर हवाई दलाने बालाकोटचा प्रतिहल्ला केल्यावर शंका घेणारे भारतीय विरोधी पक्षच होते. पुढे त्याचा जनमानसावर प्रभाव पडला, तेव्हा विरोधकांना आपल्या मुर्खपणाची कल्पना आली आणि पुलवामाच्या घटनेवरच शंका काढणे सुरू झाले. त्याचीच किंमत लोकसभा मतदानात विरोधकांनी मोजलेली आहे. कारण पुलवामाचा हल्ला जनमानसात सहानुभूती निर्माण करण्यासाठीच झाला, असा एकूण विरोधी पक्षाचा सूर होता. त्यातला गर्भितार्थ असा होता, की जाणिवपुर्वक सहानुभूती मिळवंण्यासाठी भारतानेच तो घातपात घडवून आणला आणि नंतर चोख प्रत्युत्तर देऊन मतांची बेगमी केली. पवार त्याच जुन्या आरोपांना नवी फ़ोडणी देऊन विधानसभेपुर्वी पुलवामासारखी घटना घडली नाही तर, असे बोलत आहेत. याला थिल्लरपणा म्हणतात. जो त्या काळात संजय निरूपम यांच्यासारख्या छचोर कॉग्रेस नेत्याने केलेला होता आणि पुढे राजकीय हत्यार म्हणून बाकीच्या विरोधी पक्षांनी वापरला होता. त्याची सुरूवात पवारांनी केलेली नव्हती. पण आज आधीच त्यांनी तशी सुरूवात करून ठेवलेली आहे. ती होऊ घातलेल्या पराभवाची मानसिक तयारी म्हणावी लागते. पण त्याच संदर्भाने पवारांना आणखी एक प्रश्न विचारला गेला पाहिजे. अशा रितीने देशाशी घातपाती डाव खेळून निवडणूका जिंकता येतात, हा सिद्धांत आला कुठून व प्रस्थापित कोणी केला? कधी हा सिद्धांत अस्तित्वात आला? २००८ साली नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये पाकिस्तानातून कसाब टोळी पोहोचली होती आणि त्यांनी दक्षिण मुंबईत दीडशेहून अधिक लोकांचे मुडदे पाडले. ते खरेच पाकिस्तानातून आलेले हल्लेखोर होते, की त्यांना तत्कालीन युपीए सरकारने आमंत्रण देऊन निवडणूका जिंकण्याचा डाव खेळलेला होता? कारण त्यावेळी पवार स्वत:च युपीए सरकाचे एक ज्येष्ठ मंत्री होते आणि त्या हल्ल्यानंतरही मुंबईसह महाराष्ट्रात लोकसभेसाठी कॉग्रेसने प्रचंड यश संपादन केले होते ना?

२००८ च्या अखेरीस मुंबई हल्ला झाला आणि अवघ्या चार महिन्यात लोकसभेच्या बहुतांश सर्व जागा कॉग्रेस राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. किंबहूना कुठलेही सबळ कारण वा कर्तृत्व नसतानाही युपीएला पुन्हा सत्ता  मिळू शकली होती. त्याचे करण पुलवामाप्रमाणेच कसाबचे हत्याकांड होते काय? आपणच प्रस्थापित केलेल्या सिद्धांताची ग्वाही देण्यासाठी पवार पुलवामासारखी घटना असा उल्लेख करीत आहेत काय? कारण जनहितार्थ बेधडक खोटे बोलण्यासाठी पवार ख्यातकिर्त आहेत. १९९३ सालातही मुंबईत एकामागूने एक बॉम्बस्फ़ोटाची मालिक घडली व शेकडो लोकांचा त्यात हकनाक बळी गेलेला होता. तर तेव्हाही पवारांनी काही तासात दुरदर्शनवर जनतेची दिशाभूल करण्यासाठी धडधडीत खोटी विधाने केलेली होती. अकरा स्फ़ोट झालेले असतानाही मुस्लिम वस्तीत बारावा स्फ़ोट झाल्याचे असत्य जनतेच्या गळी मारण्याचे काम मुख्यमंत्री म्हणून पवारांनी केलेले होते. सगळे स्फ़ोट हिंदू वस्तीत झाले म्हणून मुस्लिमांवरच संशय घेतला जाईल, म्हणून न झालेला स्फ़ोट मुस्लिम वस्तीत झाल्याची लोणकढी थाप पवारांनी घटनात्मकपदी विराजनाम असताना ठोकलेली होती. असा माणूस कुठलीही घटनात्मक जबाबदारी नसताना किती खोटे बोलू शकतो? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र अशा थिल्लर व छचोर राजकारणातून त्यांची विश्वासार्हता संपत गेली आणि आता तर त्यांचे निकटवर्ती व सहकारीही पवारांवर विश्वास ठेवायला राजी नाहीत. अशी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. पण म्हणून टिवल्याबावल्या करण्याची खोड संपलेली दिसत नाही. अन्यथा आपल्या पाच वर्षाचा हिशोब देत यात्रा करणार्‍या मुख्यमंत्री फ़डणवीसांचा हेटाळाणीयुक्त हिशोबनीस वा खतावणीस असा उल्लेख पवारांनी केला नसता. पक्षाची प्रथमच वा नव्याने उभारणी करणार्‍यापाशी सकारात्न्मक दृष्टी असायला हवी. पवारांचे दुर्दैव असे, की त्यांच्यापाशी कायम विघ्नसंतुष्टताच राहिलेली आहे. त्यामुळे उभारण्यापेक्षा उध्वस्तीकरणातून त्यांची राजकीय वाटचाल झालेली आहे. ते नवे काही निर्माण करू शकले नाहीत. पण यशवंतराव चव्हाण व वसंतदादांनी उभारलेला कॉग्रेसचा भक्कम किल्ला मात्र त्यांनी उध्वस्त करून टाकला आहे.

भाजपाची नव्याने उभारणी करताना नरेंद्र मोदी वा अमित शहांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना खरोखरच घरी बसवले किंवा निवृत्त व्हायला भाग पाडले. ही वस्तुस्थिती कोणी नाकरू शकणार नाही. पण त्यांनी तशी भाषा कधी वापरली नाही. त्यांच्या जागी उमदे नव्या पिढीचे पर्यायी नेतृत्व आपल्या पक्षातून असे पुढे आणलेले आहे, की ज्येष्ठ वा जुन्या नेत्यांना बाजूला होण्याखेरीज पर्याय राहिला नाही. या नव्या पिढीच्या भाजपा नेत्यांनी कोणाला घरी बसवण्या़चे राजकारण केले नाही. तर पक्षाला नव्याने उभारी देण्याचे प्रयास केले आणि त्यातून नवे नेतृत्व उदयास येत गेले. ज्येष्ठांच्या अभावी पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न भाजपाला पडला नाही. मतदारालाही पडला नाही. याच्या उलट छत्रपती उदनयराजे यांचे वक्तव्य लक्षात घेतले तर पवारांच्या राजकीय वाटचालीची दिशा व हेतू लक्षात येतो. अनेकांना पाठ थोपटून वा संधी देऊन संपवण्याची किमया हे पवारांचे राजकारण झालेले होते. छगन भुजबळ वा मधूकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटिल ही पुढली पिढीच होती. त्याना भाजपाने वा अन्य कुणा विरोधी पक्षाने घरी बसवलेले नाही. असे सहकारी घरी बसवले जाण्यापेक्षा अन्य पक्षात आपापले स्थान शोधायला निघून गेले. मग आणखी कोणाला पवार घरी बसवणार आहेत? आणि आपल्याच सहकार्‍यांना अनुयायांना घरी बसवण्यातून नव्याने राष्ट्रवादी पक्षाची उभारणी कशी होणार आहे? आपण नव्या दमाचे हिंमतीचे व उमेदीचे नेते निर्माण करू अशी भाषा पवारांनी एकदाही वापरलेली नाही. आपण अजून म्हातारे झालेलो नाही. अजून अनेकांना घरी बसवायचे आहे, हा निर्धार मनातले सत्य सांगून जाणारा आहे. तो समजून घ्यायला पदमसिंह पाटिल वा मधूकर पिचड यांना उशीर झाला. अमोल कोल्हे वा धनंजय मुंडे यांनाही पन्नाशी-साठी ओलांडल्यावर त्याची प्रचिती येणारच आहे. मात्र तेव्हा खुप उशीर झालेला असेल. वयाच्या ७८ व्या वर्षी माणूस नवे धुमारे शोधण्यापेक्षा अजून कुठल्या फ़ांद्या तोडायच्या राहिल्यात व त्याशिवाय शांत होणार नाही म्हणतो. त्याचे हेतू कुठल्या पक्षाला वा संस्था संघटनेला उभारी देऊ शकत नाहीत. त्याला विधायक नव्हेतर फ़िदायिन राजकारण म्हणतात.

32 comments:

  1. पवारांचे योग्य विश्लेषण. वजाबाकीचे सत्ताकारण केले.धन्यवाद

    ReplyDelete
  2. BHAU NAMASKAR AAPAN PAWARA VISHAYI LIHILELA BLOG ATI UTTAM V SAMPURNA ABHYAS PURVAK AHE YAT SHANKA NAHI PAWAR NEHMI BOLTANA VICHARPURVAK KADHICH BOLAT NAHIT TE SWATALACH KHADYAT GHEUN JATAT ANI KHOTE BOLANYAT KOLANTI UDI MARNYAT TE EKDUM PATAIT AHET MALA ASHCHARYA VATE KI YA MANSALA LOK "JANTA RAJA KA MHANTAT? " BARE EK PATRAKAR DEKHIL TYANA AAPAN ULLEKH KELELYA BABI VISHAYI EK DEKHIL PRASHNA VICHARAT NAHI ULAT PRASIDDHI DETAT YA VELES NCP 20 PEKSHA JAST JAGA JINKU SHAKAT NAHI PAWARANI ATA RAJKARNATUN SANYAS GHETALA PAHIJE V GHARI ARAM KARAYLA PAHIJE KHUP ZALE YANCHE RAJKARAN TYA MULECH DESHAVAR HI PARIRTHI ALI AHE


    APAN

    ReplyDelete
  3. Respected Sir...
    Tumache blog barech divas publish zale navhate.... We waited for u r blogs....

    ReplyDelete
  4. बरेच दिवसांनी आलात भाऊ...वाट पाहत होतो...
    तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जवळचे सगळे सोडुन जात आहेत, ह्या वरून आपण कितीसे उरलोय हे कळायला हवं.

    ReplyDelete
  5. भाऊ, त्यांचा हल्लीचा एक व्हिडिओ पाहिला, त्यात "तुम्हाला इतकी वर्षे सत्ता
    दिली तर तुम्ही काय केलेत" हे बोलताना जे सुचक हातवारे केले आणि समोर बसलेल्या कडून रिस्पॉन्स आल्यावर स्टेजवरच्या सहकाऱ्यांकडे बघून ज्या पद्धतीने हसत होते, ते पाहून अक्षरशः घ्रुणा आली व फ्रस्ट्रेशन माणसाला किती गर्तेत ढकलते याची खात्री पटली. भाऊ, आपला लोकसभेचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला आता महाराष्ट्र विधानसभेत काय होईल याचा अंदाज लवकरच प्रसिद्ध करावा.

    ReplyDelete
  6. Welcome back Bhau.... 😊😊👏👏👏

    ReplyDelete
  7. नमस्कार भाऊसाहेब.
    मध्ये काही दिवस तुमची एकही पोस्ट आली नाही. प्रकृती ठीक आहे ना? 🙏🙏

    ReplyDelete
  8. इतके दिवस कुठे होतात ??
    रोज बघायचो
    निराशा व्हायची

    ReplyDelete
  9. Excellent analysis..

    ReplyDelete
  10. भाऊ, तुम्ही या वक्रतुंडाची फारच खेचता बुवा. पण सत्य आहे, याच्या राजकारण व समाजकारणा मुळे महाराष्ट्र ची वाट लागली. दोन पिढ्या वाया गेल्या, आडवा आडवी व जिरवा जिरवी मधे.
    बिनडोक जितेंद्र आव्हाड वर पण लवकर घरी बसायची वेळ यावी.
    भाऊ, आता निवडणूकी पर्यंत रोज तुमचे लेख येऊ देत, तुमचे मत वाचून ते कँटीन मध्ये मांडुन भाव खायची सवय लागली आहे.गॅप पडल्यावर जरा आवघड होत.

    ReplyDelete
    Replies
    1. #वक्रतुंडाची����

      Delete
  11. खुप दिवस
    झाले पोस्ट नाही

    इलेक्शन पर्यन्त रोज वाट बघतोय

    ReplyDelete
  12. शरद पवार सत्तेमध्ये ज्या आवेशाने इणोदी किंवा कामेडी पचकायचे तसेच आताही पचकत आहेत. सध्या पचकायला पुलवामाचा विषय मिळाला. स्मरणशक्ती कमी झालेली दिसते. राफेल, EVM इ. विषय विसरलेले दिसत आहेत.

    ReplyDelete
  13. पवारांचं आत्ता मनातील कुटकरस्थान ओठावर यायला लागलं आहे. Jaise karni bandi bhari.सुंदर लेख

    ReplyDelete
  14. तुमचे मत वाचून ते कँटीन मध्ये मांडुन भाव खायची सवय लागली आहे.गॅप पडल्यावर जरा आवघड होत.

    सत्यवचन!!!!

    ReplyDelete
  15. पवारांवर बोलण्यामध्ये तुमची बरोबरी कोणी करू शकणार नाही परंतु भाऊ एक नम्र विनंती कृपया करून मध्ये इतकावेळ लेखा शिवाय आम्हाला उपाशी ठेवू नका

    ReplyDelete
  16. अप्रतिम लेख. या व्यकती ला मिडीया नको तितके महत्व देते. तुम्ही त्याना पूर्ण पणे उघडे पाडले आहे.

    ReplyDelete
  17. ज्योत विझायच्या आधी मोठी होते आणि फडफडते तशी ही शेवटची फडफड आहे दुसरे काही नाही !

    ReplyDelete
  18. पवारांची " खाज " अजूनी भागलेली नाही. अवघड जागी त्यांना दुखणे झालेले आहे. सोसवत ही नाही आणि दाखवता ही येत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. दंताजीचे ठाणे उठले... हे त्यांचे " सुळे " पाहूनच समजते... तरी ही ते अजूनी " बाशिंग " बांधायच्या तयारीत आहे. पंतप्रधान पद सोडा आता बारामतीचे " सरपंच " पद तरी मिळतेय का ते बघा म्हणावं !

    ReplyDelete
  19. YouTube वर तुमचे videos आणि भाषण बघतो.

    ReplyDelete
  20. Vidarak satya
    Pan sunder vishleshan

    ReplyDelete
  21. राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम याशिवाय देश हा देश म्हणून ऊभा राहू शकतच नाही. ह्या गोष्टी मुळात रक्तातच असाव्या लागतात. पवार साहेबांच देशप्रेम आणि पाकिस्तानप्रेम कालपरवाच जनतेला कळून चुकलेलं आहे. बाकी विकासाचं म्हणत असाल तर तो होतच आहे, त्यांना दिसत नाही किंवा मान्यच करायचं नसेल तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. झोपलेल्याला जागं करनं सोपं असत पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? बाकी हे असले अवतार आता संपतच आले आहेत, शेपुटच शिल्लक राहीलय, ते वळवळ करनारचं!
    बाकी सुद्न्यास अधिक सांगणे न लागे!

    ReplyDelete
  22. शरद ऋतू असतो, पण आजपर्यंत महाराष्ट्रला शरद ग्रहण लागले होते

    ReplyDelete
  23. मस्त भाऊ. परत लिखाण सुरु केल्याबद्दल धन्यवाद. आरोग्याची काळजी घ्यावी.

    ReplyDelete
  24. भाऊ उत्तम लेख. पवारी राजकारणाचे योग्य वर्णन "फिदायिन राजकारण".

    ReplyDelete