Sunday, September 22, 2019

प्रेरक आणि प्रचारक


Image result for prashant kishor rahul

गेल्या शनिवारी सातारा येथील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेले मत अतिशय चिंतनीय आहे. आज राष्ट्रवादी वा कॉग्रेस पक्षाला इतकी गळती कशाला लागलेली आहे. त्यामागचे खरे कारण सांगण्याची हिंमत उदयनराजे यांच्यापाशी असली, तरी ते सत्य पचवण्याची कुवत कॉग्रेस राष्ट्रवादींच्या नेतृत्वापाशी आहे काय असा खरा प्रश्न आहे. आत्मचिंतन व आत्मपरिक्षण वेळीच झाले असते, तर आत्मक्लेशाची वेळ आली नसती, असे उदयनराजे म्हणतात. २०१४ सालात भाजपा किंवा नरेंद्र मोदींनी लोकसभेत बहूमत संपादन केले आणि देशात सत्तांतर घडून आले. तुलनेने भाजपा इतका मजबूत नव्हता किंवा कॉग्रेस तितकी दुबळी नव्हती. तरीही हा चमत्कार घडला असेल, तर त्याची कारणमिमांसा करणे भाग होते. प्रामुख्याने पराभूत पक्षांना वा नेत्यांना आत्मपरिक्षणाची गरज असते. कारण नुकसान त्यांचे झालेले असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती, की विजेत्यांनी आत्मपरिक्षण चालविले होते आणि पराभूत मात्र गमजा करीत बसलेले होते. मोदींना मिळालेले बहूमत हा योगायोग होता आणि असे पुन्हा पुन्हा होत नसल्याच्या खोट्या आत्मविश्वासाने २०१९ मध्ये त्यांच्या विरोधकांना खिंडीत गाठले. पुन्हा एकदा दारूण पराभव झाला आणि आता कॉग्रेस नेतॄत्वाला आता जाग आलेली आहे. म्हणूनच विस्कटून गेलेल्या कॉग्रेस पक्षाला नव्याने सावरण्यासाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी नव्या काही कल्पना हाती घेतल्या आहेत. पण त्यात नवे काय आणि त्यातून काय साधणार हा खरा प्रश्न आहे. किंबहूना आजही कॉग्रेस किंवा विरोधी पक्षांनी आपला पराभव गंभीरपणे घेतला नसल्याचीच ती साक्ष आहे. अन्यथा सोनियांनी संघाच्या प्रचारक या धर्तीवर कॉग्रेसमध्ये प्रेरक नावाची संकल्पना राबवण्याचा विचार कशाला केला असता? त्यांना प्रचारक म्हणजे काय तेही कळलेले नाही आणि प्रेरक कशासाठी त्याचाही थांगपत्ता नसावा.

जेव्हा आपल्या अपयशाकडे आपण गंभीरपणे बघत नाही, तेव्हा त्यासाठीची सोपी कारणे शोधतो आणि थतूरमातूर उपाय योजू लागतो. भाजपाला लागोपाठ दोन लोकसभा निवडणूकीत बहूमत मिळाले आणि मागल्या पाच वर्षाता अनेक राज्यात भाजपाने प्रथमच मुसंडी मारून सत्ता मिळवली. त्याची सोपी मिमांसा करताना माध्यमातून संघाच्या प्रचारक नामे कार्यकर्त्याचे फ़ार कौतुक झाले. रा. स्व. संघ ही संस्था आता नव्वदी पार करून गेलेली आहे आणि इतक्या वर्षात देशाच्या कानाकोपर्‍यात आपका विस्तार संघाने प्रचारकांच्याच माध्यमातून केला असे वारंवार सांगितले जाते. खुद्द पंतप्रधान नरेंद्रा मोदी संघाचे प्रचारक होते आणि अनेक भाजपा नेतेही कधीकाळी प्रचारक म्हणून राबलेले आहेत. पण प्रचारक म्हणजे कोणी वेगळा प्राणी नसतो. ज्याला सामान्य भाषेत कार्यकर्ता म्हणतात त्यापैकीच एकाला संघ प्रचारक म्हणून संधी देत असतो. हा प्रचारक पुर्णवेळ कार्यकर्ता असतो आणि घरदार कुटुंब सोडून संघटनेच्या कामासाठी आदेश असेल तिथे जाऊन वास्तव्य करतो. व्यक्तीगत जीवनातील काही वर्षे संघटनेला अर्पण करून तो त्यागभावनेने काम करतो व जिथे नेमणूक असेल, तिथे आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करीत असतो. त्यातून तिथे संघ विचारांची एक नवी फ़ळी उभारण्यासाठी झटत असतो. त्याचे फ़ळ कधी कितपत मिळेल याची त्याला चिंता नसते की अपेक्षा नसते. शिवाय संघाला लाभ मिळत असला तरी त्या कार्यकर्त्याला व्यक्तीगत कुठलाही लाभ मिळण्याची बिलकुल शक्यता नसते. अशा हजारो कार्यकर्ते म्हणजे प्रचारकांची फ़ळी उभी राहिली आणि त्याचे फ़ळ आज सहासात दशकानंतर मिळालेले आहे. उद्या कधीतरी संघाची वा संघप्रणित भाजपाची सत्ता आल्यानंतर कुठले तरी सत्तापद मिळणार म्हणून हा प्रचारक राबत नाही किंवा तशा अपेक्षेने प्रचारक होतसुद्धा नाही. म्हणूनच त्याची नक्कल करताना कॉग्रेसने प्रचारक समजून तरी घेतला आहे काय?

भाजपाच्या यशामाह्ये प्रचारकांचे योगाअन कोणी नाकारू शकत नाही. पण हे प्रचारक निरपेक्षवृत्तीने एका विचारधारेसाठी घरदार सोडून झटतात. तशा कार्यकर्त्यांनाच प्रचारक म्हणून कुठेही पाठवले जात असते. संघटना वा पक्षात त्यांच्या शब्दाला वजन असते. कॉग्रेसने अशा कार्यकर्त्यांना कधी महत्वाचे स्थान दिलेले आहे? ज्या नेत्यांना मोठेपण मिळाले त्यांनी आपापल्या कुटुंबाला अधिकाधिक लाभ मिळावेत म्हणूनच काम केलेले आहे. एक प्रचारक नरेंद्र मोदी आहेत. ज्यांनी देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला कुठला लाभ मिळू शकला आहे? बाकीच्या गोष्टी सोडून देऊ. दोनदा या प्रचारकाचा पंतप्रधान म्हणून शपथविधी पार पडला. त्यात आपल्या आप्तस्वकीयांपैकी एकालाही मोदींनी त्या समारंभाचे साधे आमंत्रणही दिले नाही. देशाच्या सामान्य जनतेप्रमाणे मोदी कुटुंबालाही आपल्या एका आप्ताचा हा शपथविधी दुरदर्शनवरूनच् बघावा लागलेला आहे. प्रचारक म्हणून गुजारात वा देशाच्या इतर भागात काम करताना मोदी एकटे होते आणि आता पंतप्रधान झाल्यावरही ते एकटेच आहेत. उलट आपण कॉग्रेसची अवस्था बघू शकतो. पक्ष इतका डबघाईला आलेला आहे आणि त्याच्या जिर्णोद्धारासाठी विचार चालू आहे. त्यासाठी पक्षाची सर्वोच्च संस्था म्हणून कार्यकारिणीची बैठक झाली, त्यातल्या तीन व्यक्ती एका घरातल्याच नव्हेतर एकाच कुटुंबातल्या होत्या. सोनिया हंगामी अध्यक्षा म्हणून तर प्रियंका पक्षाच्या सरचिटणीस म्हणून आणि माजी अध्यक्ष म्हणून राहुल गांधी उपस्थित होते. हा किती भयंकर फ़रक आहे ना? इथेच गल्लत लक्षात येते. किंबहूना आत्माचिंतन झालेले नाही, याची साक्ष मिळते. सार्वजनिक जीवनात निरपेक्षवृत्तीने काम करू शकणार्‍यांना प्राधान्य असायला हवे आणि आजही कॉग्रेसच्या नेतृत्वाला पक्ष ही आपल्या खानदानाची खाजगी मालमत्ता वाटते आहे. त्यातून गांधी कुटुंब बाहेर पडलेले नाही,म् की गुलामीच्या मनस्थितीतून त्यांचे समर्थन बाहेर पडायला राजी नाहीत.

संघाच्या प्रचारकाच्या पद्धतीने कॉग्रेसमध्ये प्रेरक नेमायचे तर ते आणणार कुठून? तसे कोणालाही कुठेही नेमायची मोकळीक पक्षाला जरूर आहे. पण नेमणूक महत्वाची नसून त्याच्याकडून व्हायच्या कामाला प्राधान्य असायला हवे. आणखी एका प्रचारकाची कथा इथे सांगितली पाहिजे. सुनील देवधर हा संघाचा मुंबई महाराष्ट्रातला तरूण कार्यकर्ता होता. त्याने पुर्णवेळ संघासाठी प्रचारक व्हायचे ठरवले आणि त्याची नेमणूक इशान्य भारतात करण्यात आली. तिथे तब्बल पंधरा वर्षे ठाण मांडून बसलेल्या सुनीलने तिथे मोठा चमत्कार घडवला. इशान्येतील त्रिपुरा हे मार्क्सवादी पक्षाचे हक्काचे राज्य होते. तीस वर्षे त्यांची तिथे अबाधित सत्ता होती आणि अन्या कुठलाच पक्ष त्यांना राजकीय आव्हान देऊ शकत नव्हता. अन्य कुणाला निवडणूक लढवणेही अशक्य होते. सुनीलने तीच् सत्ता उलथून पाडली आणि आज तिथे भाजपाचे बहूमताचे सरकार आहे. सहाजिकच प्रचारकाविषयी कौतुक सुरू झाले. पण मुद्दा असा की सुनीलने तिथून कुठली निवडणूक लढवलेली नाही किंवा बदल्यात त्याला कुठले सत्तापद पक्षाने दिलेले नाही. उलट तेलंगणा आंध्रा अशा प्रतिकुल राज्यात आता सुनीलला पाठवण्यात आलेले आहे. संघ वा पक्षासाठी इतके राबून त्याच्या पदरात नेमके काय पडले? हा विचार त्त्याच्या मनात आलेला नाही, किंवा प्रचारकाच्या मनात येऊ शकत नाही. ही प्रचारकाची खासियत आहे. माझे काय? हा विषय विसरून राबतो, त्याला प्रचारक म्हणतात. कॉग्रेसने त्याच धर्तीवर प्रेरक नेमायचे ठरवले असेल, तर आधी ही गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. त्यासाठी आदर्श उभे केले पाहिजे. कॉग्रेससमोर आदर्श कोणाचा आहे? राहुल गांधींचा पक्षासाठी कायम सुरक्षित मानल्या गेलेल्या अमेठी नामक मतदारसंघात दोनदा निवडून आल्यावर राहूलनी तोही गमावला आणि त्याच्या बदल्यात पक्षाने सुरक्षित केलेल्या वायानाड येथून पुन्हा लोकसभा जिंकली. हा आदर्श आत्या बिळावर नागोबा म्हणतात, तसा आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात पुर्वजांनी मिळवलेली लोकप्रियता वा प्रतिष्ठा कॉग्रेसने क्रमाक्रमाने उधळून टाकली. स्वातंत्र्य चळवळीत शेकडो निरपेक्ष कार्यकर्त्यांनी मिळवलेली ती पुण्याई व पुंजी होती. त्याचे दुष्परिणाम आता पक्षाला भोगावे लागत आहेत. पक्षाने नुसतीच सत्ता गमावलेली नाही, तर प्रतिष्ठा व विश्वासार्हताही गमावली आहे. ती नव्याने मिळवायची असेल, तर म्हणूनच आत्मचिंतन किंवा आत्मपरिक्षणाची गरज आहे. सोपे उपाय किंवा मलमपट्ट्य़ा कामाच्या नाहीत. पण त्याबाबतीत पुर्ण उलटा कारभार आहे. सत्तेचा किती म्हणून गैरवापार होऊ शकतो आणि देशाची किती उजळमाथ्याने लूटमार करता येऊ शकते. त्याचा वस्तुपाठच युपीएच्या दहा वर्षाच्या कालावधीत सादर करण्यात आला. त्याच पापकर्मामुळे पक्षाला अशी दुरावस्था आलेली आहे. तर निदान असे जे पापी नेते आहेत, त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याला प्राधान्य असायला हवे. पण कारभार उलटाच आहे. ज्या चिदंबरम यांनी अर्थमंत्री म्हणून इतके घोटाळे केले व अफ़रातफ़री केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी कॉग्रेस निदर्शने करीत आहे. जणू चिदंबरम हा आजच्या कॉग्रेसचा आदर्शच आहे. सार्वजनिक कार्य म्हणजे समाजाची व देशाची लूटमार असेच कॉग्रेसला म्हणायचे आहे काय? नसेल तर चिदंबरम यांच्याविरोधी कारवाई सुरू झाल्यावर पक्षाने त्यांना कोर्टाकडून प्रमाणपत्र आणायला फ़र्मावले पाहिजे होते. जोपर्यंत तुमच्यावरील आरोपातून सुटका होत नाही, तोपर्यंत पक्षाच्या गोतावळ्यातून बाजूला रहा असे फ़र्मावले पाहिजे होते. याचा अर्थ इतकाच की चिदंबरम हेच कॉग्रेससाठी खरेखुरे प्रेरक आहेत आणि प्रेरणादायी आदर्श आहेत. पक्षाची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी गेल्या पाच वर्षात कोणी कॉग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर आला नाही, पण चिदंबरम वा शिवकुमार यांच्या अटकेनंतर शेकडो कॉग्रेसवाले रस्त्यावर आले. याला प्रेरक म्हणावे की प्रेरणादायी नेतृत्व म्हणावे?

उदयनराजे आत्मचिंतन वा आत्मपरिक्षण म्हणतात, तेव्हा ते आपले चुकाले कुठे त्याची मिमांसा व्हावी अशीच अपेक्षा करीत असतात. कारण चुक शोधली व दुरूस्त केली, तरच पुढले पाऊल टाकले जात असते. इथे आपली चुक शोधण्यापेक्षा सगळे निकष मोजपट्ट्या खोट्या पाडण्याची स्पर्धा चालते. सोनिया राहुल यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणी घोटाळा केल्याचा खटला आहे. चिदंबरम यांच्यावरही आर्थिक घोटाळ्याचा आरोप् आहे. प्रियंकाचा पती तर बेकायदा जमिनी हडपल्याच्या आरोपत गुंतला आहे. त्या आरोपांच्या बाबतीत यापैकी कोणी स्पष्टीकरण देत नाहीत. विचारले तर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची पळवाट शोधली जाते. मात्र आपल्यावरचे आरोप व खटले राजकीय सुडबुद्धीचा खेळ असल्याचे अगत्याने सांगितले जाते. पण आरोपातील तथ्याविषयी चकार शब्द उच्चारला जात नाही. असे लोक नेतृत्व करतात किंवा प्रेरक नेमणार म्हणजे विनोदच नाही काय? मोदी वा भाजपा-संघाची नक्कला करून काहीही साधणार नाही. प्रचारक किंवा प्रेरक हा मुळात उदात्त भूमिकेतून प्रभावित झालेला असावा लागतो. तरच त्याच्याकडे बघून वा त्याला ऐकून लोक प्रभावित होतात आणि त्याच्या मागे एकवटू लागतात. नुसते कुणालाही प्रेरक नाव दिले म्हणून तो प्रेरणादायी होता नाही वा समाजाला प्रेरीत करू शकत नाही. तितकीच प्रभावी विचारधारा व तिचे अनुकरण होताना लोकांनाही दिसावे लागते. प्रियंका सोनभद्रच्या दलित पिडीतांच्या जमिनीविषयी न्याय मागायला जातात आणि त्यांच्याच पतीने गरीबांच्या जमिनी हरयाणा राजस्थानात बळकावल्या आहेत, त्याविषयी चकार शब्द बोलत नाहीत, तेव्हा पक्षाचा प्रेरक काय बोलू शकणार आहे? त्याच्याकडे उदात्त व्यक्तीमत्व म्हणून बघण्यापेक्षा लोक त्यालाही कोणी भामटा म्हणूनच बघणार ना? म्हणूनच आत्मचिंतन महत्वाचे आहे, चुका शोधाव्या लागतील, दुरूस्त कराव्याच लागतील. नक्क्ला करून हाती काहीही लागणार नाही.

नक्कल किती महागात पडते त्याचे फ़टकेही कॉग्रेसला बसलेले आहेत. लोकसभेत मोदींना प्रशांत किशोर या रणनितीकाराने मोठी मदत केली. तर राहुलनी उत्तरप्रदेशात त्यालाच हाताशी धरले होते. कात फ़ायदा झाला? भाजपाने सोशल मीडीयाचा मुक्तहस्ते वापर केल्याचा गवगवा झाला म्हणून २०१९ च्या निवडणूकीपुर्वी पैसे मोजून भाडोत्री प्रचारक कॉग्रेसने गोळा केले, आज त्यापैकी कोणाचाही कुठे आवाजा ऐकू येत नाही. करोडो रुपये उकळून अशी मंडळी फ़रारी झाली आहेत आणि कॉग्रेस मात्र त्याच् दुरावस्थेमध्ये रुग्णाईत म्हणून पडलेली आहे. पैशाने मोई जिंकतात, सोशल मीडीयातील आक्रमकतेने भजपा बाजी मारतो असल्या भ्रमातून कॉग्रेसने आधी बाहेर पडावे लागेल. आपल्या वर्तनात आणि उक्तीकृतीतले विरोधाभास संपवावे लागतील्. जनतेला जऊन भिडावे लागेल. जनमानसात् गमावलेले स्थान नव्याने मिळवावे लागेल. ते एकदोन आठवड्याच्या झटपट कोर्समध्ये शिकलेल्या प्रेरक नावाच्या प्राण्याकडून साध्य होणारे नाही. पक्षाची असलेली संघटना चाळण लावून तपासावी. त्यात निरपेक्षवृत्तीने पक्षासाठी झटायला उत्सुक असलेल्यांना बाजूला काढून त्यांच्याकडे पक्ष विस्ताराचे काम सोपवावे. त्यात अन्य कुणा नामवंताला हस्तक्षेप करण्याची मोकळीक असता कामा नये. तरच नव्याने पक्षाची उभारणी शक्य आहे. आधी अशा कार्यकर्त्याच्या मनात पक्षाविषयी व विचारधारेचा विश्वास रुजवावा लागेल. त्यातूनच तो कार्यकर्ता प्रेरक पक्षाची पाळेमुळे होऊन स्वत:ला त्या जनतेमध्ये सामावून घेईल आणि नव्याने पक्षाला पालवी फ़ुटू शकेल. संघाची वा अन्य कुणाची नक्कल करून काहीही साध्य होणार नाही. नव्या युगाचा विचार करणारेही कॉग्रेसमध्ये आहेत, त्यांना संधी देताना जुनाट विचारांच्या नेत्यांना खड्यासारखे बाजूला करावे लागेल. सोनियांनी त्याचा किंवा तसा विचारही केलेला नसेल तर नुसते प्रेरक नेमून नव्या पराभवाला आमंत्रण देण्यापेक्षा अधिक काही हाती लागण्याची शक्यता नाही

17 comments:

  1. काँगेसी लोक प्रेरकी कामे करत नाहीत बेरकी कामे करून आपल्या तुंबड्या भरतात

    ReplyDelete
  2. आदरणीय bhau,
    नमस्कार.
    मधे बरेच दिवस लेख आला नाही, सर्व कुशल मंगल आहे अशी अपेक्षा करतो.
    सुंदर विश्लेषण संघा बद्दल आणि त्यांच्या कार्य पद्धती बद्दल सुद्धा.
    अचूक आणि योग्य शब्दात काँग्रेस चे " गुणधर्म " मांडले आहेत.
    मनःपूर्वक धन्यवाद
    दया

    ReplyDelete
  3. अप्रतिम, आजचा लेख फार वेगळा आहे!!! जतन करून ठेवण्याजोगा..!
    देशाला सध्या चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे.

    ReplyDelete
  4. Excellent and exact analysis. I know many Pracharak in person. I really salute them. They work without any remuniration. Hats off to them. Narendra Thatte

    ReplyDelete
  5. कांग्रेसला अजुनही वाटते की त्यांचा पक्ष हा फोनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेवुन येईलया आधीही जेंव्हाही कांग्रेस पक्ष लयाला गेला तेंव्हा त्यावेळस कांग्रेस कडे खंबीर नेतृत्व होते.आणीबाणी नंतट दणदणीत पराभव नंतरही इंदिराजी सारख्या पक्षाध्यक्ष होत्या ज्या पुर्ण वेळ राजकारण वा समजकरण करीत होत्या.त्यानी आत्मचिंतन व आत्मपरिक्षण करुन पुन्हा पक्षास वर आणले.दुर्देवाने आता तसे नेतृत्व नाही.इतके वर्षात कोणी चिंतनच केले नाही व फोनिक्स पक्षाच्या भ्रामक कल्पना उराशी बाळगून आहे.

    ReplyDelete
  6. स्वतःच्या तुमड्या भरून, स्वतःच्या उंटांना पाणी पाजून, स्वतःच्या भाटांना तुकडे टाकत उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचा आणि वेळप्रसंगी त्या शेळ्यांना मारून मेजवानी करणाऱ्यांनी हा पक्ष टिकवलेला नव्हता तर म.गांधींच्या अफाट लोकप्रियतेचे बाळकडू पिऊन सुद्धृढ झालेल्या दीर्घायुषी पक्षाची या लोकांनी वाट लावली. त्याची सुरुवात नेहरूंच्या कारकीर्दीपासूनच सुरू झाली म्हणून कमावलेले शरीर 70 वर्षे टिकले! 😁

    ReplyDelete
  7. सेवादलाच monthly budget ₹₹₹₹ २ लाख असल्याचं recently वाचनात आले होतं 😊

    ReplyDelete
  8. नरेंद्र स ताकटेSeptember 22, 2019 at 8:53 AM

    प्रेरक लेख..

    ReplyDelete
  9. व भाऊ, जबाब नाही ! चिदंबरम जे लिहले आहे ते तर अफलातून ! भाऊ तुम्ही काँगेसचे पोस्ट मार्टेम इतक्या वेळा केले आहे पण प्रत्येक वेळी नवीनच कारण जुन्याचा हात धरून पुढे येत आहे. पण या मंदबुद्धी लोकांना अजून समजत नाही व कदाचित तुमचा ब्लॉग वाचत नाहीत. गांधी परिवाराचे सर्व पैसे संपल्याशिवाय हे कोणीच सुधारणार नाहीत असे दिसते. गेंड्याचे कातडे पांघरलेले आहेत सगळे. हे लोक प्रेरक काय होणार देव जाणे!

    ReplyDelete
  10. भाऊ, तुम्ही कसे आहेत ?

    ReplyDelete
  11. राष्ट्र सेवा दलाचे कुणी कार्यकर्ते सापडले तर त्यांच्या हातात पक्ष सोपवावा

    ReplyDelete
  12. मला वाटते की प्रचारक ही कल्पना जगात फक्त ख्रिस्ती चर्चने आणि रा. स्व. संघाने योग्य रितीने वापरली. इतरांनी त्याची टिंगल टवाळी केली आणि कधीच गंभिरपणे घेतली नाही. आता काँग्रेसला सर्व काही झटापट हवे आहे. त्यामूळे ते कधीच प्रचारक पद्धती राबवणार नाहीत.

    ReplyDelete
  13. अगदी खरी गोष्ट आहे भाऊ. मी लहानपणी शाखेत जात असे. तिथे जे बाळकडू मिळाले ते अजूनही शाश्वत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये तयार होणारा प्रत्येकजण जरी प्रचारक होऊ शकला नाही तरी त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे काम करत असतो. पण एका बाबतीत मात्र सर्वजण हे सारखेच असतात. ते म्हणजे जाज्वल्य देशाभिमान आणि मातृभूमीसाठी निरपेक्ष वृत्तीने झोकून देऊन कांहीही करण्याची तयारी! कोंग्रेस ने तयार केलेत असे कार्यकर्ते ? माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. भूमिगत जहाल कारवायांसाठी ७ वर्ष जेलमध्ये सक्तमजुरी भोगून स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सुटले. त्या वेळची परिस्थिति ते सांगत. त्या वेळीच संधीसाधू आणि स्वार्थी लोकांनी कोंग्रेस ला पोखरायला सुरुवात केली होती. आता कितीही मलमपट्टी केली आणि आत्मपरिक्षण केले तरी पुन्हा उभे रहायला योग्य पावले उचलली तरच किमान १० वर्षे लागतील. आहे एवढी हिम्मत आणि धीर ? आणि आता परिस्थिति बदलली आहे. सामान्य माणसाला तेंव्हा ते मूर्ख बनवू शकले. आता ते शक्य नाही.

    ReplyDelete
  14. Congress ne lokana fukat paise deun tyanchyatla aatmsanman sampavaycha prayatn kela. Pan thodyafar pramanat tich gosht congress chya hi vatyala aali aahe ase disate. Vastavik Rahul gandhini Amethitun padlyavar, "lokanchya bhavna mala kalalya asun pudhchya veli mi tithun nakki nivadun yein" ase kahitari mhanayla pahije hote. kadachit tyane congress chya karykartyana thodasa hurup ala asta. pan tase kahi n karta, rahul punasch tya gavchech zale nahit ase disate aahe... Rahul na waynad chi khasdarki "fukat" milali hech tyache karan asave.

    ReplyDelete